✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रिओ ऑलिम्पिक २०१६

ख
खेडूत यांनी
गुरुवार, 08/04/2016 - 21:29  ·  लेख
लेख
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच. भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते. तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा. भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा ! काही दुवे स्पर्धेचे संस्थळ पदकतालिका
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
79454 वाचन

💬 प्रतिसाद (405)

प्रतिक्रिया

मस्त खेळती आहे सिंधू

सामान्य वाचक
गुरुवार, 08/18/2016 - 21:19 नवीन
कॉन्फिडेन्ट दिसती आहे
  • Log in or register to post comments

१५-१० सिंधू

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 21:20 नवीन
१५-१० सिंधू स्टॅमिना महत्वाचा असणार आहे..
  • Log in or register to post comments

19 10

सामान्य वाचक
गुरुवार, 08/18/2016 - 21:20 नवीन
,,
  • Log in or register to post comments

जिंकली

सामान्य वाचक
गुरुवार, 08/18/2016 - 21:21 नवीन
येईईईई
  • Log in or register to post comments

अभिनंदन...!

खेडूत
गुरुवार, 08/18/2016 - 21:24 नवीन
अभिनंदन...! अभ्याभाऊ: ब्यानर अपडेटवावे लागणार! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

+१

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 21:26 नवीन
दोघींना ठेवा बॅनरवर. स्त्री-शक्ति झिंदाबाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

दोघींचे बॅनर बसवतच आहे.

अभ्या..
गुरुवार, 08/18/2016 - 22:21 नवीन
दोघींचे बॅनर बसवतच आहे. आणि अजुन कितीही वेळा अपडेटावे लागले तरी मी करीन आनंदाने. . साक्षी आणि सिंधू, टोपी काढली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

धन्यवाद!

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 22:25 नवीन
आणि अजुन कितीही वेळा अपडेटावे लागले तरी मी करीन आनंदाने. That's the spirit! टोपी काढली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तुला अपडेटावे लागो अशा सदिच्छा!

चतुरंग
गुरुवार, 08/18/2016 - 22:51 नवीन
पदकासाठी कायपण!! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पदकासाठी म्हणून नाय रंगाकाका,

अभ्या..
गुरुवार, 08/18/2016 - 23:00 नवीन
पदकासाठी म्हणून नाय रंगाकाका, मी स्वतः जिल्हा टीमकडून खेळलेलो आहे. अजुनही ग्राउंडवर रनिंगला जातो तेंव्हा असे काही एकांडे शिलेदार घाम गाळत असतात तेंव्हा मन भरुन येते. रेसलर, अ‍ॅथलीटस ह्यांची जिल्हा पातळीवर मेहनत तोंडात बोटे घालायला लावते. ह्या तर विश्वाशी लढा देताहेत. त्यांच्या तुलनेत अपुर्‍या सुविधा असताना सुध्दा. अंतर्गत राजकारण, कंपूबाजी, सुविधांची वानवा असे असताना केवळ जिद्द, मेहनत आणि अंगातील कला ह्याच्या जोरावर लढणारे मला कायमच वंदनीय आहेत. त्यांनी पदके मिळवली तर चीज असे नाहीच. लढा महत्त्वाचा. परवाचे दीपाचे प्रोडुनोवा पाहताना काळजाचा ठोका चुकला. काय ते डेडीकेशन. सलाम है भौ ह्या सार्‍यांना. म्हणून कीतीही सांगा ह्यांचे बॅनर. अपुन बनायेंगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अरेरे, चुकीचा संदेश गेला माझ्याकडून, क्षमस्व!!

चतुरंग
गुरुवार, 08/18/2016 - 23:05 नवीन
मला तेच म्हणायचं होतं पदक हा फक्त साइडइफेक्ट आहे.... तू पदकासाठी हे करतो आहेस असं म्हणायचं नवहतं...असो आपल्या भावना एकच आहेत!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

येस रंगाकाका. आपल्या सार्

अभ्या..
गुरुवार, 08/18/2016 - 23:11 नवीन
येस रंगाकाका. आपल्या सार्‍यांच्या शुभेच्छा आहेत त्या सगळ्या लढवय्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अभ्या तुमच्या तळमळीला

क्षमस्व
Fri, 08/19/2016 - 08:17 नवीन
अभ्या तुमच्या तळमळीला मनापासून सलाम। अगदी मनातलं बोललात।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बॅनर 1 नं बनविला आहे

निओ
Fri, 08/19/2016 - 23:00 नवीन
भारी काम केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सिंधू १९-१०

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 21:23 नवीन
८ मिनिटांत महत्वाची मीटींग होती.. मी येत नाही म्हणून सांगितलं :-) !
  • Log in or register to post comments

...आणि मला एकाने पार डेस्काशी

आदूबाळ
गुरुवार, 08/18/2016 - 21:29 नवीन
...आणि मला एकाने पार डेस्काशी येऊन पकडलं. नेमका विजयाचा क्षण मिसला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

४९ मिनिटांत फायनल मध्ये!

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 21:24 नवीन
वॉव!
  • Log in or register to post comments

भारी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/18/2016 - 21:27 नवीन
पि सिंधु चं अभिनन्दन.... अजुन एक पदक मिळालं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

या धाग्यावर सतत येऊन वाचतेय.

पिशी अबोली
गुरुवार, 08/18/2016 - 21:31 नवीन
या धाग्यावर सतत येऊन वाचतेय. कालपासून खूप बरं वाटतंय इथे वाचून. सिंधूचे अभिनंदन. बॅनर भारी आहे.
  • Log in or register to post comments

वाह्ह्ह्ह्ह सिन्धु वेल्ल डन.... ...

विखि
गुरुवार, 08/18/2016 - 21:43 नवीन
अगगगगग्गग्ग्ग्ग्ग, काय सामना होता, , स्मॅश बघुन पारणे फीटले, वाह्ह्ह्ह्ह सिन्धु वेल्ल डन....
  • Log in or register to post comments

जपानी कुस्ती-पटू स्पर्धक

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 21:43 नवीन
टोकियोतल्या मावस बहिणीबरोबर सिंधूच्या गेम बद्दल चॅट करत होतो कारण ती सिंधू-ओकुहारा मॅच लाईव्ह पहात होती. तिने सांगितलं की काल ज्या तीन जपानी कुस्ती-पटू महिलांनी सुवर्ण पदक मिळवलं त्यांपैकी सलग तीन ऑलिंपिक्स मध्ये जिने सुवर्ण पदक मिळवलंय तिला म्हणे तिच्या मरणासन्न आईने सांगितलं होतं की losers get silver, so it is better to die while winning rather than taking silver.....
  • Log in or register to post comments

वाह! क्या बात है!

खेडूत
गुरुवार, 08/18/2016 - 21:59 नवीन
वाह! क्या बात है! त्यांच्या जिद्दीला सलाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

सिंधूचे हार्दिक अभिनंदन!!!

साधा मुलगा
गुरुवार, 08/18/2016 - 22:02 नवीन
आज कधी नव्हे तो भारतीय खेळाडूंना 'किलर इन्स्टिंक्ट' ने खेळताना पाहिलं, अक्षरशः धुव्वा उडवला, सिंधूची उंची जास्त असल्याचा तिने पुरेपूर फायदा उठवत तिने जपानीला लोळवले, मजा आया!!! आता सिंधूची गाठ त्या कॅरोलीन शी आहे, ती पण talented खेळाडू आहे, फायनल रोमांचक होईल, गोल्फ मध्ये अदिती अशोक पुढील फेरीत जाण्याची शक्यता आहे, तिला शुभेच्छा!!! बबिता कुमारी कुस्तीमध्ये हरली. बाकी उद्या पुरुष चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार आणि महिलांमध्ये गुरुबारीत कौर आणि सपना आहेत. आणि मुख्य म्हणजे आपले कुस्तीगीर बाकी आहेत!
  • Log in or register to post comments

मस्त वाटतंय. आधी साक्षी, आज

आतिवास
गुरुवार, 08/18/2016 - 22:07 नवीन
मस्त वाटतंय. आधी साक्षी, आज सिंधु. दीपा, दत्तू, श्रीकांत, अभिनव... सगळे बाजी लावून खेळले.. त्यांचही कौतुक..
  • Log in or register to post comments

ग्रेट्ट!!

चतुरंग
गुरुवार, 08/18/2016 - 22:15 नवीन
सिंप्ली ग्रेट्ट!! आता सामना सुवर्णपदकासाठी. उद्याची लढत बघायलाच हवी!!! सिंधू पॉइंट्स घेते त्यावेळी खच्चून ओरडते तिची बॉडी लँग्वेजसुद्धा आक्रमक आहे.. अशी किलर इंस्टिंक्ट भारतीय खेळाडू क्वचितच दाखवतात.. महिलाशक्ती झिंदाबाद आहे!!! __/\__
  • Log in or register to post comments

+१

अंतरा आनंद
गुरुवार, 08/18/2016 - 22:18 नवीन
+१ मस्तच खेळली ती. आपल्या उंचीचा व्यवस्थित उपयोग करून घेतला. आपल्या रक्षणाकरता स्त्रिया भावाला राखी बांधतात त्या मुहूर्तावर दोन स्त्रियांनीच देशाची लाज राखली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नरसिंग यादवचं काय झालं?

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 22:19 नवीन
कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन चा निकाल आज भारतीय प्रमाणवेळेला ९.३० रात्री जाहीर होणार होता, झाला का?
  • Log in or register to post comments

त्या वेळेला हियरिंग सुरू

आदूबाळ
गुरुवार, 08/18/2016 - 22:23 नवीन
त्या वेळेला हियरिंग सुरू होणार होतं. निकाल आता कधीपण लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

डोळे भरून आले राव!

संदीप डांगे
गुरुवार, 08/18/2016 - 22:27 नवीन
डोळे भरून आले राव! सगळ्यांच्या मेहनतीला सलाम!!!
  • Log in or register to post comments

Awesome game by Sindhu! Hats

श्रीगुरुजी
गुरुवार, 08/18/2016 - 22:56 नवीन
Awesome game by Sindhu! Hats off!! She was attacking well. Got so many points on right hand smash. Her opponent was only defending. Whatever points she got because of Sindhu's mistakes. Sindhu has to face a very very tough opponent in the finals Her Spanish counterpart is a very tough player. All the best Sindhu! Go for Gold!!!! We are proud of you!!!
  • Log in or register to post comments

नरसिंग यादवला वाडा कडून

साधा मुलगा
गुरुवार, 08/18/2016 - 22:56 नवीन
नरसिंग यादवला वाडा कडून क्लीन चीट!
  • Log in or register to post comments

नरसिंग यादव वाडाकडून क्लिअर झाला!! हे धत्तड तत्तड!!

चतुरंग
गुरुवार, 08/18/2016 - 23:16 नवीन
शुक्र्वारी संध्याकाळी पहिली लढत खेळतोय फ्रान्सच्या झेलिमखान खादजिएव बरोबर. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी ६.३८. शुभेच्छा नरसिंग!! अब पटक दे उठाके!!
  • Log in or register to post comments

ज्जे बात!

बहुगुणी
गुरुवार, 08/18/2016 - 23:23 नवीन
नरसिंग ला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अजून नाही क्लिअर झाला!

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 03:59 नवीन
मीटिंग म्हणे ४ तास झाले चालू आहे, निकाल लागलेला नाही. ड्रॉ मध्ये त्याचं नाव आहे, पण निर्णय झाल्याशिवाय मॅच नक्की नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

काका, चार वर्षाचा बॅन लागला

अनुप ढेरे
Fri, 08/19/2016 - 12:27 नवीन
काका, चार वर्षाचा बॅन लागला त्याच्यावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सिंधुचे अभिनंदन

बेकार तरुण
Fri, 08/19/2016 - 07:05 नवीन
सिंधुचे अभिनंदन आपल्या उंची चा पुरेपूर फायदा करून घेतला तिने. २र्‍या गेम मधे ११-१० ला जरा दडपण आले आहे अस वाटत होतं. पण बहुतेक कोचच्या सुचना आणि त्यांचे तंतोतंत अवलंबन केलं सिंधुनी. शेवटी अगदीच आरामात जिंकली. मरिन ला नक्की मारीन अश्याच भावनेने उतरुन आज सिंधु जिंकणार गोल्ड नक्की !
  • Log in or register to post comments

भारताचा कुस्तीगिर नरसिंग यादव

नावातकायआहे
Fri, 08/19/2016 - 08:00 नवीन
भारताचा कुस्तीगिर नरसिंग यादव आपले निर्दोषत्व सिद्ध करू न शकल्यामुळे ब्राजीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्‍पोर्ट्सने (सीएएस) त्याच्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे तो रिओ ऑलिंपिक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. - सकाळ
  • Log in or register to post comments

कुस्तीपटू नरसिंग यादव ऑलिम्पिकमधून बाहेर

जेसीना
Fri, 08/19/2016 - 08:45 नवीन
कुस्तीपटू नरसिंग यादव ऑलिम्पिकमधून बाहेर ...... हे नक्की मग काय आहे .... नक्की काय निकाल लागलाय, कोणी निश्चित माहिती पुरवेल का ??? http://maharashtratimes.indiatimes.com/sports/rio-olympic-games-2016/rio-olympic-games-2016-news/wrestler-narsinghyadav-banned-for-4-years/articleshow/53763997.सिम्स
  • Log in or register to post comments

http://www.hindustantimes.com

महासंग्राम
Fri, 08/19/2016 - 09:41 नवीन
http://www.hindustantimes.com/olympics/cas-upholds-world-anti-doping-agency-s-appeal-wrestler-narsingh-banned-for-four-years/story-70ORCKr4zlCXmw48bXBYvO.html वाडा च अपील The Court of Arbitration for Sport ने उचलून धरलं त्यामुळे नरसींग वर ४ वर्षांची बंदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेसीना

रिओ - भारताचा कुस्तीगिर

नावातकायआहे
Fri, 08/19/2016 - 09:05 नवीन
रिओ - भारताचा कुस्तीगिर नरसिंग यादववर चार वर्षांची बंदीचा निर्णय आल्यापासून "तो बोलण्याच्या अवस्थेत नसून सतत रडत आहे‘ अशा प्रतिक्रिया भारतीय कुस्ती फाऊंडेशनचे बीबी शरन सिंह यांनी दिल्या - सकाळ
  • Log in or register to post comments

दुर्दैवी आहे, तरीही

खेडूत
Fri, 08/19/2016 - 09:46 नवीन
दुर्दैवी आहे, तरीही स्वीकारायला हवे आणि अन्य स्पर्धांमधे काळजी घ्यायला हवी. आज सिंधूचा खेळ बघायला अर्धा दिवस सुट्टी! संध्याकाळी ६:५५ ला सुरू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

संध्याकाळी ६:५५

नावातकायआहे
Fri, 08/19/2016 - 11:32 नवीन
संध्याकाळी ६:५५ रिओचे का आपले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

आपले! :)

खेडूत
Fri, 08/19/2016 - 11:37 नवीन
आपले! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

नरसिंह यादवचा गेम केला आहे

गामा पैलवान
Fri, 08/19/2016 - 12:16 नवीन
लोकहो, नरसिंह यादवचा गेम केला आहे हे वेगळे सांगणे नलगे. प्रथमदर्शी पाहता त्यास आहारातून विष चारून अपात्रतेकडे ढकलण्यात आलंय. स्पर्धेच्या केवळ दोन आठवडे आधी उत्तेजक घेण्याइतका तो बावळट आहे का? या प्रकरणाची चौकशी भरकटत तर नाही? अमेरिकी जलतरणपटू रायन लॉख्त आणि त्याचे सहकारी रियोमध्ये धुडगूस घालतात. वर उलट्या बोंबा मारतात की आम्हाला चोरांनी लुबाडलं म्हणून. पोलीस बरोब्बर सगळी माहिती काढून त्यांना पकडतात आणि त्यातल्या दोघांना देश सोडायला बंदी घालतात. अशा वेळेस खास ऑलिंपिक न्यायालय भरवण्यात येते आणि त्यामार्गे या दोघांना अमेरिकेत परतायची मुभा मिळते. याउलट नरसिंह यादवला पात्र घोषित करूनही कुठलंसं अपील करण्यात येऊन त्याची संधी हिरावून घेतली जाते ! मोदींसमोर काय प्रकारची आव्हाने उभी आहेत याची एक झलक !! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मोदींसमोर काय प्रकारची

महासंग्राम
Fri, 08/19/2016 - 13:33 नवीन
मोदींसमोर काय प्रकारची आव्हाने उभी आहेत याची एक झलक !!
पै अण्णा इथे मोदींचा संबंध. ऑलिम्पिक न्यायालये आणि वाडा दोन्ही वेगवेगळी आहेत आणि स्वतंत्र आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

चला आवरलं का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/19/2016 - 16:41 नवीन
सिन्धुचा सामन्यासाठी तयार व्हा. देवांना नमस्कार करून या...! आज सिंधु जिंकु दे...बस. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सिंधू- समुद्र

असंका
Fri, 08/19/2016 - 19:07 नवीन
सिंधू- समुद्र मरिन (थोडं स्पेलिंग बदलून...)- समुद्रासंदर्भातील....
  • Log in or register to post comments

ही मॅच मला लाइव्ह कुठे बघता

पिलीयन रायडर
Fri, 08/19/2016 - 19:20 नवीन
ही मॅच मला लाइव्ह कुठे बघता येईल. अमेरिकेतल्या कोणत्याही चॅनलवर दाखवत नाहीयेत. एक दोन लिंक्स वर गेले तर ह्या रिजन साठी नाही म्हणे..
  • Log in or register to post comments

डिडि नॅशनलचे लाइच स्ट्रिमेंग

पिलीयन रायडर
Fri, 08/19/2016 - 19:24 नवीन
डिडि नॅशनलचे लाइच स्ट्रिमेंग बघत आहे. तिथे वेगळीच मॅच आहे. सिंधुची मॅच अजुन सुरु व्हायचीये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कृपया लिंक द्यावी

चतुरंग
Fri, 08/19/2016 - 19:30 नवीन
डीडीनॅशनल्ची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा