प्रस्ताव: मिसळपाव बॅज

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
12 Aug 2016 - 1:42 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकर मित्रांनो,

सहजच एक कल्पना आली, आपण मिपाकर बरीच भटकंती करत असतो, किंवा गावातल्या गावातही फिरत असतोच, असंख्य मिपाकर तुमच्या अवतीभवती वावरत असतील पण आपली ओळख होत नाही. जर आपण आपल्या वाहनावर दुचाकी व चारचाकी असो, मिसळपाव चा बॅज लावला तर ...

हि कल्पना मला टीम बीएचपी ह्या वेबसाईट वरून सुचली, ते लोक आपल्या गाड्यांना असा बॅज लावतात, व अशा बॅज असणाऱ्या वाहन चालकांना मित्रत्वाची वागणूक देतात,

आपण तयार असाल तर मिपा रंगभूषा मंडळ या साठी पुढाकार घेऊ शकते, आपले सल्ले व कल्पना जरूर कळवा!

धन्यवाद!

प्रतिक्रिया

मोदक's picture

12 Aug 2016 - 1:48 pm | मोदक

मी समजा असा बॅज लावून वर्ध्याला गेलो तर मला बॉडीगार्ड घेवून जावे लागेल. ;)

हलके घ्या वो काका...

(व्हायरसश्री) मोदक.

गणामास्तर's picture

12 Aug 2016 - 1:52 pm | गणामास्तर

पत्ता द्या आधी. .म्हणलं बॅज पाठवायला बरं पडेल हो, बाकी काही नाही :)

आदूबाळ's picture

12 Aug 2016 - 3:09 pm | आदूबाळ

डिझाईनः

वारली पद्धतीने काढलेला शेताचा देखावा. वारली शैलीतच काढलेला एक मोदक. आणि किलवर चव्वी.

अभ्या..'s picture

12 Aug 2016 - 4:11 pm | अभ्या..

वारली इमॅजिनून वारलो.

मोदक's picture

12 Aug 2016 - 5:33 pm | मोदक

:=)) :=)) :=)) :=)) :=)) :=))

उडन खटोला's picture

12 Aug 2016 - 6:09 pm | उडन खटोला

वारली शैलीत 'अभय' कसं लिहितात?

बाळ सप्रे's picture

12 Aug 2016 - 1:56 pm | बाळ सप्रे

बॉडीगार्ड कशाला??
तुम्ही नाहीच आहात :-)

आदूबाळ's picture

12 Aug 2016 - 2:22 pm | आदूबाळ

भारी आयड्या!

डिझाईनविषयी सुचवणी: "मिनिमलिस्टिक" डिझाईन असावं.

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 2:31 pm | संदीप डांगे

तेच आहे डोक्यात! अगदी सूचक असावं, कोडवर्ड टाईप!

आणि बरोबर एक क्यूआर कोड. तो कोड मिपावर घेऊन येईल.

इरसाल कार्टं's picture

28 Dec 2016 - 10:21 pm | इरसाल कार्टं

हे भारी वाटेल

शाम भागवत's picture

12 Aug 2016 - 2:00 pm | शाम भागवत

काही जणांना बरेच बॅच मिळणार तर.
मज्जाय न काय.
:))

नावातकायआहे's picture

12 Aug 2016 - 2:02 pm | नावातकायआहे

टि-शर्ट बनवा ना सर.
घेतिल मंडळी विकत!

सोलापुरचे साहेब देतिल डिझाईन बनवुन
बघा पटतय का...

कल्पना चांगली आहे. बॅज, टी-शर्ट, स्टिकर इ. तयार करून लावावेत.

प्रसाद_१९८२'s picture

12 Aug 2016 - 2:31 pm | प्रसाद_१९८२

मायबोली वर जसे दरवर्षी टिशर्ट देण्यात येतात व मिळालेल्या पैशातील काही हिस्सा एकाद्या गरजू संस्थेला देणगी म्हणून दिला जातो तसाच एकादा उपक्रम इथे ही करता येईल.

टीशर्टवरच्या संदेशासाठी / डिझाईनसाठी मतं मागवता येतील.

उदा०

प्रकार १: पाठीवर चपलांचं चित्र
प्रकार २: पैठणीचा असतो तसा 'फिरता रंग'. पाठीवर "मी डूआयडी आहे नाही"
प्रकार ३: "अच्चं झालं तल..."
...

प्रकार १: पाठीवर चपलांचं चित्र

आणि त्याच्या खाली एकच ओळ..

मोकलाया दाहि दिश्या...

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 3:03 pm | संदीप डांगे

एकच नंबर! परफेक्ट कोड आहे!

आदूबाळ's picture

12 Aug 2016 - 3:05 pm | आदूबाळ

नाही. मोकलायासाठी वेगळं डिझाईन डोक्यात आहे.

मोकलायाचा वर्डक्लाऊड. त्यात विशेष भावलेले शब्द मोठे / ठळक.

उदा. जाड ठशातले शब्द मोठे

निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा

जव्हेरगंज's picture

12 Aug 2016 - 6:07 pm | जव्हेरगंज

=))))

ही आयड्या येक नंबर!!!

हे आधी झाले असते तर मोदकाला लदाखची दिशा टीशर्ट घालून गाजवता आली असती.
एनीवे.... नेक्श्ट टाइम.

चिनार's picture

12 Aug 2016 - 2:39 pm | चिनार

कल्पना चांगली आहे!!!

मिसळपाव बॅज- मस्तं कल्पना आहे.

बरखा's picture

12 Aug 2016 - 2:59 pm | बरखा

मिसळपाव बॅज- मस्तं कल्पना आहे.

मस्त कल्पना. बॅज टी शर्ट .मला मोकलाया पाहिजे आहे आत्ताच बुकिंग करतेय!!

स्मिता_१३'s picture

12 Aug 2016 - 4:02 pm | स्मिता_१३

मस्तं कल्पना आहे.

साधा मुलगा's picture

12 Aug 2016 - 5:09 pm | साधा मुलगा

कल्पना चांगली आहे, मला GOT मधल्या सीन ची आठवण झाली , आर्या लोखंडाचे नाणे दाखवून valar मोरघुलीस म्हटल्यावर कसा जहाजाच्या कप्तानाने सलाम ठोकला, तसाच काहीसे करायला हवे.
अवांतरः मोकालया दाही दिशा वाचला नाहीये कशावर आहे?

महासंग्राम's picture

12 Aug 2016 - 5:15 pm | महासंग्राम


अवांतरः मोकालया दाही दिशा वाचला नाहीये कशावर आहे?

अर्रर्र फार हाय कम्बख्त तुने पी हि नही

तुषार काळभोर's picture

13 Aug 2016 - 10:41 am | तुषार काळभोर

अरे ये मोकलाया दाहि दिश्या नही जानता...!!!

मुक्त विहारि's picture

12 Aug 2016 - 5:30 pm | मुक्त विहारि

आपल्याला टी शर्ट किंवा बॅज किंवा दोन्ही एकत्र पण चालेल.

पिलीयन रायडर's picture

12 Aug 2016 - 8:20 pm | पिलीयन रायडर

मस्त! काही हिट वाक्य:-

"वाढदिवसाच्या शुभेच्छा!"
"मी पयला"
"बशीवला टेम्पोत"
"मिपाकर म्हणुन शरम वाटली"
"इंचा इंचाने धागा लढवु"
"टक्याचे वर्‍हाड"

अशी वेगवेगळी मिपा फेम वाक्य टाका बॅजेसवर!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2016 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा ! असं कनेक्शन आहे तर....!

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

12 Aug 2016 - 9:11 pm | पिलीयन रायडर

हे काही नवीन आहे का? जमल्यास जरा बॅकग्राऊंड द्या की!

सुबोध खरे's picture

13 Aug 2016 - 11:57 am | सुबोध खरे

"ब्वॉर " राहिलं की !!!

माम्लेदारचा पन्खा's picture

12 Aug 2016 - 9:35 pm | माम्लेदारचा पन्खा

लयच सूचक होईल....कट्ट्याला फायदा होईल तो निराळाच !

राँर्बट's picture

12 Aug 2016 - 9:51 pm | राँर्बट

पोकेमॉन गो च्या धर्तीवर बॅचवर 'मिसळपाव भो भो' अशी टॅगलाईन लिवा.

नाविन्यपूर्ण कल्पना आहे. अभ्याकडून ष्टिकर्स करून घेऊयात. आयडिया चांगली आहे. टीशर्ट्स नकोत बुवा! एकच टीशर्ट बाहेर कसा नेहमी वापरणार.

उडन खटोला's picture

12 Aug 2016 - 10:12 pm | उडन खटोला

वेगळी वेगळी ष्टिकर्स बनवून ते आपापल्या शर्टखाली (अंगात घातलेला नाय बरं का) ठेवून पितळी तांब्यात गरम लाल कोळसे घालून तांब्या शर्टवर फिरवायचा म्हणजे शर्ट वर मस्त ष्टिकर उमटतं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Aug 2016 - 10:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

बुआ एक खऊट आयडिया आलेली आहे बॅज संबंधी! पर आत्ता नको, वेळेवर सांगतो

मिपाच्या लोगोचंच स्टिकर बनवता येईल.

संदीप डांगे's picture

13 Aug 2016 - 12:13 am | संदीप डांगे

तेच अगदी सर्व बाबतीत ओके ठरतं. लोगो फक्त इथे येणार्‍यांनाच माहिती, नवीन कोणी उत्सुकतेने विचारपूस केली तर सांगताही येईल. ज्याला काही समजलं नाही त्याच्यासाठी गूढच राहिल. =))

साधा मुलगा's picture

13 Aug 2016 - 9:09 am | साधा मुलगा

लोगो बद्दल गुप्तता पाळायची असेल तर तो फक्त खफ वर प्रसिद्ध करू किंवा मग त्याच्यासाठी फक्त सदस्यांना प्रवेश केल्यावर दिसणाऱ्या धाग्यावरच दाखवू.
बाकी डांगे साहेब कल्पना लायी भारी आहे.

किंबहुना's picture

12 Aug 2016 - 11:53 pm | किंबहुना

छान कल्पना आहे.. माझी मागणी अगोदरच नोंदवून ठेवतो.

छान कल्पना आहे.. "दा विन्ची कोड" वाचल्यापासून मला आपणही कुठल्या तरी सिक्रेट ब्रदरहूडममध्ये असावे असे फार वाटत होते. यानिमित्ताने - खास करुन मिनिमलिस्टीक डिझाईनमुळे तसं काहीतरी साध्य झाल्यासारखं वाटेल. :)

असंका's picture

13 Aug 2016 - 7:10 am | असंका

+१. फक्त मला एंजेल्स अँड डीमन्स आठवलेला एवढंच...

असेल बहुतेक. खरे तर प्रतिसाद प्रकाशित केल्यावर मलाही वाटलं की पुस्तकाचं नाव चुकलंय .. ;)

बहुगुणी's picture

13 Aug 2016 - 1:54 am | बहुगुणी

अभ्या वगैरे मंडळी अर्थातच या संधीचं सोनं करतील, पण आमच्या नापीक डोक्यातून ही low hanging फळं!

आहहह, बहुगुणीसाहेब जब्बरदस्तच कि.
सीआरव्हीवर मिपाचा लोगो बघून असं भरून आलं मन कि काय सांगू. अशा कोर्पिओ, इंडेव्हर, फोरचूनर, कॅप्टिव्हा, ऑडया, मर्क लागल्यात कट्ट्याला. सगळ्यावर लोगो झळकताहेत मिपाचे अशा स्वप्नात डुबलो......
आमच्या पॅशनमधले पेट्रोल संपलेय, जरा बाटली हुडकतो. ;)

बाहेरची गोल ताटली काढून फक्त अक्षरस्वरूपातलं "मिपा" ठेवायचं. ब्याकग्राऊंड गडद असेल तर पांढरं, एरवी काळं.

अभ्या..'s picture

13 Aug 2016 - 11:49 am | अभ्या..

हीहेहेहे
डिझाईन आयड्याला सहमत. मात्र ताटली शब्दावर जीव बसला. शेजारी ताटली बाटली अशे काही शिंबोलीक घ्यावे का आबासाहेब?

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2016 - 5:03 pm | प्रभाकर पेठकर

टि शर्ट नको बाबा! आमच्या सुटलेल्या पोटाला शोभत नाही.

DeepakMali's picture

13 Aug 2016 - 1:58 am | DeepakMali

सुंदर कल्पना...

एक मिपाकर दुसय्राला आढळण्याची शक्यता फारच कमी आहे.बॅज लहान असला तर कट्ट्याला वगैरे जमताना गर्दीत न्याहाळण्याने गैरसमज वाढण्याची शक्यता अधिक.पास.

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2016 - 5:04 pm | प्रभाकर पेठकर

१६ सेकंदांपेक्षा जास्त न्याहाळू नका.

अभिजीत अवलिया's picture

13 Aug 2016 - 8:23 am | अभिजीत अवलिया

छान कल्पना ...

भंकस बाबा's picture

13 Aug 2016 - 9:21 am | भंकस बाबा

गाडीवर स्टिकर लावण्याची कल्पना आवडली,
माझी ऑर्डर नोंदवून ठेवा, नक्की सामिल होणार

चतुरंग's picture

13 Aug 2016 - 12:17 pm | चतुरंग

qrcode-logo-design-smilie

तुषार काळभोर's picture

13 Aug 2016 - 12:19 pm | तुषार काळभोर

यातून प्रचारही होईल अन् सदस्यांना हुच्चभ्रु होण्याची संधी ;)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

13 Aug 2016 - 1:20 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अनुमोदन

तिमा's picture

13 Aug 2016 - 1:32 pm | तिमा

बॅज लावून फारिनला गेलो तर तिथला सर्व खर्च तिथले बॅज होल्डर करणार का ? जमलंच तर एकवेळचं तिकीट ?

तुम्ही अजून सर्वस्व पणास लावू शकणारे मिपासाधक बनलेले दिसत नाही आहात. मिपा व मिपाकर तुमच्या साठी काय करतात यापेक्षा तुम्ही मिपासाठी काय करु शकता याबाबत विचार करा.

डांगेण्णा, अभ्या, नीमो यांच्या सारखे दोन चार लोक्स विमान प्रवास करुन लंडन दौरा करुन मिपा बाबत लोकप्रसार आणि अभ्यास करतील. त्यांच्यासाठी मदत निधी गोळा करायचा.
मी माझे १०१ (काय ते नंतर कळिवतो) जाहीर करतो.

चैयला, साधं पुण्याला कट्टे केले तरी टीटीएमएम दिलीय. खर्चाची बातच सोडा. ;)
आमचं धण्यामालकाची मात्र गोष्ट येगळीय, ते पैसे काढू देत नाहीत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2016 - 2:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

TTMM =)) =))

टिटीएमेम म्हणजे जनतेला आपला "निस्पृहपणा" दाखवायचा एक आदर्श मौका!!, म्हणजे बघा, माझ्या अमृततुल्याचे पैशे मीच देणार!

बापू आत्ताच सांगतो, कट्टा करायचा असेल तर पुण्याऐवजी सोलापूराला ये. आमच्यात पाव्हण्याला गायछापबी काढू देत नाहीत.

उडन खटोला's picture

13 Aug 2016 - 2:36 pm | उडन खटोला

चुन्याचं काय? गायछाप बरोबरचा चुना कोण लावतं? ;)

अभ्या..'s picture

13 Aug 2016 - 2:38 pm | अभ्या..

राजेश.

बोका-ए-आझम's picture

18 Aug 2016 - 2:14 am | बोका-ए-आझम

त्यांना काय काय काढू देत नाहीत ?

पैशे ओ बोकामालक. दुसरे कै नै.
तुमचा सोफाएआझम बनवायला सांगू काय?

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Aug 2016 - 7:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

गायछापवाल्यांची चेष्टा करू नये बोका भाऊ ;)

अभ्या लेका काय आठवण काढलास रं!!! अहाहा

महासंग्राम's picture

20 Aug 2016 - 3:34 pm | महासंग्राम


गायछापवाल्यांची चेष्टा करू नये

एकदम बरोबर बोलले बापू तुमी

सध्या तर जमाना असाय की गायीशी संबधित कशाचीच चेष्टा करु नये. ;)

ब्याज बिल्ला वाटपानिमित्तं मिपां अतिमहां कट्टां सुद्धां करतां येईल कीं बरें कशें!

खिशाला लावायला मागे पिन किंवा क्लिप असलेला धातूचा बॅज बनवा

हीहेहेहे, नाणीजपीठ आठवले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Aug 2016 - 2:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

या निमित्त मिपाचा लोगो असलेले चांदीचे पेले बनवावे अशी आग्रही मागणी करतो.
तसाही मिपावर चांदिच्या पेल्यांचा बराच जुना इतिहास आहे.
पैजारबुवा,

का जुन्या दुधाळ भावना आटवताय?

लालगरूड's picture

13 Aug 2016 - 2:17 pm | लालगरूड

लालगरूड's picture

13 Aug 2016 - 2:18 pm | लालगरूड

लालगरूड's picture

13 Aug 2016 - 2:23 pm | लालगरूड

redeagle

बाबा योगिराज's picture

13 Aug 2016 - 2:46 pm | बाबा योगिराज

लोगो मध्ये एक फाटा अन टेम्पो बसवता येतो का ते बघावं.
सोबत लुलुलू दुदुदु ह्ये बी जोडा.
बढिया घोषवाक्य,आच्चा आच जाल तर किंवा अस कनेक्शन आहे तर किंवा अजून कै.
सगळ्यात वर 4-5 देवांचे फोटू. मंग मिपा वरल्या 5-7 म्हराजांची किरपा वगैरे, ई. ई.
ज्रा साह्येब लोकायच्ये फोटू येऊ द्या. कस विंटरण्याशनल वाटलं पायज्येल.
दोनी बाजूनी दोन-दोन स्कार्पिओ चे फोटू, आड्या बी चालत्यांन.
ह्या सगळ्यात मिपावरल्या लेडीज-बायांना ईसरु नगा.
तुमाला अजून कै टाकाच आसन तर टाका.
आन जमलं तर मिसळीचा एक मोठ्ठा फोटू बी टाका.
अन ह्ये सगळं वारलीत बनवा.चला लागा कामाला. चार दिवसात एक कोपि पाठवा प्रुफ तपासून आर्डर देण्यात येईल.

पेमेंट उसाचं बिल आलं कि दिउ.

काम एकदम झ्याक झालं पायज्येल बगा.

बाबा योगीराज ब्यानर वाले.

जावई's picture

13 Aug 2016 - 3:04 pm | जावई

आपलीपण आर्डर घ्या साहेब..

विनायक प्रभू's picture

13 Aug 2016 - 5:04 pm | विनायक प्रभू

वाटप झाल्यावर "मिपासिस" मधे दाखल होणार्या युवक युवती वर एक अमर लेख येउ द्यात.

सविता००१'s picture

18 Aug 2016 - 10:35 am | सविता००१

आयडिया

मुक्त's picture

18 Aug 2016 - 11:06 am | मुक्त

कल्पना आवडली.
आपली 5-50 ची ऑर्डर बुक करा.

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2016 - 5:08 pm | प्रभाकर पेठकर

कल्पना चांगली आहे. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या शर्टांवर, साडी किंवा ड्रेसवर वापरता येईल असा असा असावा.

मराठी कथालेखक's picture

20 Aug 2016 - 3:49 pm | मराठी कथालेखक

Jalebi-Misal Pav

साधा मुलगा's picture

28 Dec 2016 - 7:06 pm | साधा मुलगा

या उपक्रमाचे काय झाले?
हे विचारायला धागा वर काढला आहे.

संदीप डांगे's picture

28 Dec 2016 - 7:14 pm | संदीप डांगे

आठवण करुन देण्यासाठी धन्यवाद! :-)

सर टोबी's picture

28 Dec 2016 - 7:34 pm | सर टोबी

पण स्कोर सेटल होण्याचा हि धोका आहे. सध्या फक्त भासमान स्कोअर सेटल होतात, पण प्रत्यक्ष स्कोअर सेटल होण्याची शक्यता वाढीला लागेल. माझे आपले $.०२.

आदूबाळ's picture

29 Dec 2016 - 1:22 am | आदूबाळ

अण्णा मनावर घ्याच.