✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रिओ ऑलिम्पिक २०१६

ख
खेडूत यांनी
गुरुवार, 08/04/2016 - 21:29  ·  लेख
लेख
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच. भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते. तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा. भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा ! काही दुवे स्पर्धेचे संस्थळ पदकतालिका
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
79454 वाचन

💬 प्रतिसाद (405)

प्रतिक्रिया

वेल प्लेड दत्तू ... त्याच्या

असंका
Tue, 08/09/2016 - 17:43 नवीन
वेल प्लेड दत्तू ... त्याच्या हीटमध्ये चौथा आलाय.
  • Log in or register to post comments

रिओ ऑलिम्पिकः रोईंगपटू दत्तू

जेसीना
Tue, 08/09/2016 - 18:07 नवीन
रिओ ऑलिम्पिकः रोईंगपटू दत्तू भोकनळ पदकाच्या शर्यतीतून बाहेर, चौथ्या उपांत्य फेरीत दत्तू चौथ्या स्थानावर
  • Log in or register to post comments

नै हो...

असंका
Tue, 08/09/2016 - 18:13 नवीन
नै हो... ही उपांत्य फेरी नवती. ही उप-उपांत्य फेरी होती. उपांत्य फेरी उद्या असेल. आणि दत्तू चौथा आल्याने, सी/डी सेमी फायनल मध्ये त्याला जागा मिळेल. अजून आहे तो स्पर्धेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेसीना

पदकासाठी A/B semi आणि final A

थॉर माणूस
Tue, 08/09/2016 - 20:23 नवीन
पदकासाठी A/B semi आणि final A असते. A/B semi -> medal finals. Quarterfinals मधले पहिले 3 खेळाडू A/B semi ला पात्र ठरतात. बाकीच्या रेस रॅकींग ठरवण्यासाठी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

ह्म्म्म... आता आलं लक्षात...!

असंका
Tue, 08/09/2016 - 22:33 नवीन
ह्म्म्म... आता आलं लक्षात...!! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

अर्जेन्टीनाला हॉकीत दिली मात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/09/2016 - 21:03 नवीन
टेंशन देणा-या सामन्यात मजा आली. भारत २ आणि अर्जेन्टीनाचा ०१ गोल असतांना शेवटची चार मिनिट असतांना तीन पेनाल्टी त्यांना मिळाले, आपला बचाव भारी होता. आनंद वाटला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+1

साधा मुलगा
Tue, 08/09/2016 - 23:50 नवीन
हे आणि नेमबाजी यामध्ये आपण पूढे गेलो. दत्तू उपांत्यपूर्व फेरीत हरला, हीना कडून पुन्हा निराशा, बाकी रात्री 2.45 ला बॉक्सिंग आहे 75 किलो वजनी गटात, विकास कृष्णन यादव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेमबजीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/09/2016 - 21:12 नवीन
अंतनु दास ही जिंकून पुढील फेरीत गेला. बरा दिवस गेला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

त्याचे 2 सामने होते आज.

थॉर माणूस
Tue, 08/09/2016 - 21:19 नवीन
त्याचे 2 सामने होते आज. दोन्ही जिंकून 1/8 राऊंड गाठलाय. पण आता पुढचा सामना कोरीयाशी असणार आहे. जिंकण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उद्याचे सामने

साधा मुलगा
Wed, 08/10/2016 - 00:02 नवीन
प्रकाश नंजाप्पा , जितू रे 50 मी पिस्तूल नेमबाजी, 5.30 वाजता तिरंदाजी बोम्बयला देवी 6.09 वाजता दीपिका 1.27 वाजता जुडो-अवतार सिंग 7.19 वाजता महिला हॉकी 7.30 वाजता भारत वि. ऑस्ट्रेलिया दत्तू भोकनल रँकिंगची मॅच 7.50 वाजता 64 किलो वजनी गटात बॉक्सिंग मध्ये 3.00 वाजता
  • Log in or register to post comments

Thanks

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/10/2016 - 09:44 नवीन
माहिती बद्दल, आभार..!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

आणखीन एक राहिलं

साधा मुलगा
Wed, 08/10/2016 - 10:53 नवीन
सानिया, बोपनां मिक्स दुहेरी रात्री 12 वाजता, वि ऑस्ट्रेलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

जीतू रे बाहेर. बोम्बयला देवी

थॉर माणूस
Wed, 08/10/2016 - 21:00 नवीन
जीतू रे बाहेर. बोम्बयला देवी विजयी. अवतार सिंग 1/32 राऊंड मधे हरला. हाॅकीमधे भारताची वाईट हार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

. हॉकीत...किती वाईट हार?

असंका
Wed, 08/10/2016 - 21:34 नवीन
. हॉकीत...किती वाईट हार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

1-6 नी हरल्या. तिरंदाजीमधे

थॉर माणूस
Wed, 08/10/2016 - 23:08 नवीन
1-6 नी हरल्या. तिरंदाजीमधे बोम्बयला देवी प्री-क्वार्टर्स मधे आहे आणि आता दिपिकाचे सामने सुरू होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

दीपिका कुमारी पुढच्या फेरीत

थॉर माणूस
गुरुवार, 08/11/2016 - 02:06 नवीन
दीपिका कुमारी पुढच्या फेरीत पोहोचली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

अरे वा! चांगला दिवस...!

असंका
गुरुवार, 08/11/2016 - 07:47 नवीन
अरे वा! चांगला दिवस...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

बाॅक्सिंगमधे क्रिश्नन विजयी.

थॉर माणूस
Wed, 08/10/2016 - 04:20 नवीन
बाॅक्सिंगमधे क्रिश्नन विजयी. प्री-क्वार्टरस् मधे पोहोचला.
  • Log in or register to post comments

β शोध मराठमोळ्या दत्तूच्या

लालगरूड
Wed, 08/10/2016 - 08:33 नवीन
β शोध मराठमोळ्या दत्तूच्या पराभवाचा ( संजय दुधाणे ) 10 ऑगस्ट 2016 - 07: 55 AM IST माझी शेवटची इच्छा एकच आहे , माझ्या गावाला पिण्याचे पाणी मिळू दे असे सांगून बीबीसीवर मुलाखत देणार्या मराठमोळ्या दत्तू भोकनळची ऑलिम्पिक पदकाची तहानही तृप्त होऊ शकली नाही . खिन्न मनाने तो लागोवा स्टेडियममधून बाहेर पडला तेव्हा तो एकाकी दिसत होता . ना त्यांच्यासोबत प्रशिक्षक दिसले , ना चाहते , ना रोईंग संघटनेचे पदाधिकारी, ना भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे कारभारी . मला अधिक चांगले प्रशिक्षण लाभले असते तर मी देशासाठी अजून मोठा पल्ला गाठला असता , माझ्या पाठीमागे केवळ आईचे आशीर्वाद होते ही त्याची प्रतिक्रियाही खूप बोलकी ठरली . अवघ्या तीन वर्षात भोकनळने नाशिक ते रिओ अशी मजल मारून सार्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते . ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठेपर्यंत त्याला फारसे कोणी ओळखत नव्हते . रिओमध्येही तो कमालीचा एकटा पडला होता . सेनादल आणि भारतीय रोईंग संघटनेची तू - तू -मे -मे असल्याचाही मोठा फटका भोकनळला बसला. पहिल्या फेरी जिंकली तेव्हाही त्याचे अभिनंदन करण्यास भारताचे कोणीच लागोवा स्टेडियममध्ये नव्हते . त्याने धडाकेबाज कामगिरी करताच क्रीडाग्रामत त्याचे नाव चर्चेत आले . उपांत्यपूर्व फेरी पहाण्यासाठीही बोटावर मोजण्या इतकेची भारतीय प्रेक्षक हजर नव्हते . काही मराठी पत्रकार आणि एक दिल्ली आकाशवाणीचा समालोचक. इनमीन चारच भारतीयांनी त्याचा खेळ पाहिला . अमेरिका , रशिया , इंग्लंड, पोलंडचे ध्वज स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या हाती फडकत असताना तिरंगा कोठेच दिसत नव्हता. रिओत लाटेवरील हालत्या पाण्यात भोकनळचा वेग मंदावला . पहिल्या फेरीपेक्षा थोडी कामगिरी सुधारली तरी वाहत्या पाणीतील सराव मिळाला नसल्याने तो मागे पडत गेला . त्यात स्पर्धेपूर्वी त्याने अमेरिकेत प्रशिक्षण घेतले होते . तेथिल सराव काहीच फायदेशीर ठरला नाही . त्याचे प्रशिक्षकांचे घर अमेरिकेत असल्याने त्यांनी सेनादलाला अमेरिकेत प्रशिक्षण घेण्याची विनंती केली . मितभाषी दत्तूू सेनादलाच्या शिस्तीत खेळाडू घडला आहे . तो सेनादलात साधा जवान असल्याने त्याला आपल्या प्रशिक्षणाबाबत काहीच बोलता आले नाही . प्रशिक्षक अमेरिकेतील घरी राहत होते तर भोकनळ हॉटेलवर एकटाच असायचा . ना फिजिओ , ना मानसतज्ञ, ना मदतीला कोणी . असा लढा देत तो रिओत दाखल झाला होता . तरीही त्याच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने परिपक्व असणार्या खेळाडूंची तो झुंजत राहिला. महाराष्ट्रही पाठीशी उभा राहिला नाही अशी भोकनळची खंत आहे . महाराष्ट्र शासनाने पाच लाख दिले असले तरी ते खूप उशिरा. मूळात रोईंग आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्याला विशेष सहकार्य केले नाही . सेनादलाचा असल्याने खेळातील छोट्या- छोठ्या पण महत्वपूर्ण बाबींपासून तो वंचित राहिला. मूळात मानसिकदृष्टया तो दुबळा पडला होता . आई रूग्णालयात असल्याने तो सरावात पूर्ण लक्ष केंद्रित करू शकला नाही . रिओत एकाकी झुंज अपुरी ठरली तर त्याने माघार घेतली नाही . पदक हे एकटा खेळाडू जिंकू शकत नाही , त्याच्या यशासाठी अनेक हात गरजेचे असतात हे त्याला रिओ ऑलिम्पिकने शिकवले आहे . मला यशासाठी सहकार्य हात लाभो , असे सांगत भोकनळ रिओत शेवटी म्हणाली की , मी सच्चा सैनिक असून मला तिरंगा फडकताना पहायचायं हीदेखिल आता माझी शेवटची इच्छा बनली आहे .
  • Log in or register to post comments

असे कितीतरी गुणी खेळाडू वंचित

साधा मुलगा
Wed, 08/10/2016 - 11:21 नवीन
असे कितीतरी गुणी खेळाडू वंचित राहतात, ऐकून वाईट वाटलं. सहानुभूतीच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

वाईट वाटले

निओ
Fri, 08/19/2016 - 22:49 नवीन
रोईंग मध्ये दत्तू बबन भोकनल हे अस्सल मराठी नाव वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तो नॅशनल चॅम्पियन आहे, मिळवेल अजून. ऑल द बेस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

नाशिक चा आहे, भारतीत सैन्यदलात काम करतो

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 23:42 नवीन
माथाडी कामगार आई-बापांचा मुलगा. तो रोईंग करायला म्हणे २०१२ चं ऑलिंपिक पाहून शिकला, बाकी सगळी कमाई गेल्या चार वर्षांच्या कष्टांची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ

खेळाडू ग्रेट्च आहेत आपले,

खेडूत
Wed, 08/10/2016 - 09:02 नवीन
खेळाडू ग्रेट्च आहेत आपले, व्यवस्था अन राजकारणात समस्येचं मूळ दिसतंय. दीपा किंवा पूर्वी साईना, त्यांना पालकांनी घडवले त्यांना. मग क्रीडा मंत्रालय काय कामाचे?
  • Log in or register to post comments

खरं आहे!

चतुरंग
Wed, 08/10/2016 - 10:35 नवीन
आपल्या बहुतांश खेळाडूंमध्ये कौशल्याची कमी नाहिये. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरेसा सराव, योग्य आहार, शारीरिक तंदुरुस्ती या आघाड्यांवरती जाम बोंब असते, कारण तिथेपर्यंत कसं जायचं हे कोणालाच नीट माहीत नसतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची वर्णी लागेल, कोण वशिल्याचे तट्टू पुढे घुसेल यातली अनिश्चितता भेडसावत असते बर्‍याचदा. त्यामुळे मानसिक तणाव उत्पन्न होतो. मनःस्वास्थ्य हरवले तर कामगिरीवर जोरदार परिणाम होतोच. क्रीडामंत्रालयातले आणि विविध खेळांच्या पदाधिकार्‍यातले अंतर्गत हेवेदावे आणि राजकारण यात खेळाडूंचा, खेळाचा आणि पर्यायाने देशाचा बळी जातो! अन्यथा भारतासारख्या देशाने किमान ५० पदके खेचून आणायला काहीच हरकत नसावी!!:( (उद्विग्न)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

होय

नाखु
Wed, 08/10/2016 - 11:17 नवीन
आवाजम्श्ये का जत्रा मध्ये खेळाडूंपेक्षा बरोबरच्या बाजार बुणग्यांचा ताफा जास्ती (आणि खर्चीकही) असल्याचे व्यग्नचित्र आले होते. ज्यावर्षी अत्यंत निराशाजनक कामगीरी होईल त्या वर्षी त्या अधिकार्यींची दुसर्या खात्यात (आणि मूळ खात्यासी संबध नसलेल्या विभागात पदावनती करावी) तसेच उत्तुंग यश मिळाल्यास प्रशिक्षक आणि मदतनीस सहकार्याम्चा य्थोचित सन्मान्+बढती करावी म्हणजे जरा उत्तेजन प्रोत्साहन मिळेल. अर्थात ही माझी मते आहेत याला अनेक अडचणी किंवा आक्षेप असू शकतात. झारीतील शुक्राचार्यांनी जवळच्या मित्राची केलेली परवड पाहिलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

दुर्दैवाने केवळ हळहळ व्यक्त

एस
Wed, 08/10/2016 - 13:41 नवीन
दुर्दैवाने केवळ हळहळ व्यक्त करण्यापलिकडे आपण फारसं काही करू शकत नाही. दत्तू भोकनळचा अभिमान वाटतो. त्याला किमान एखादं पत्र लिहून आपण त्याचा हुरूप वाढवू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

दत्तु चा लै अभिमान आहे

विखि
Wed, 08/10/2016 - 21:59 नवीन
गडी लढला पण, अंतनु दास बी चान्गल खेळतय, योगेश्वर दत्त च्या कुस्ती ची वाट बघतोय, रविवारी २१ ऑगस्ट कुस्ती कडुन अपेक्षा आहेत.
  • Log in or register to post comments

१०० मी

चतुरंग
गुरुवार, 08/11/2016 - 07:34 नवीन
फ्रीस्टाईल फायनल सुरु होतेय!! :)
  • Log in or register to post comments

संपली सुद्धा रेस!! ४७.५८से,

चतुरंग
गुरुवार, 08/11/2016 - 07:43 नवीन
अमेरिकन नेट अ‍ॅड्रिअनला हरवून ऑस्ट्रेलियाचा काईल चामर्स विजेता!! :) काय तयारी राव एकेकाची, कसल्या संट्या बॉड्या!! आपले खेळाडू कधी दिसायचे असल्या ठिकाणी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

:)

खेडूत
गुरुवार, 08/11/2016 - 08:06 नवीन
:) काल महिला हॉकीत पण सर्व ऑस्ट्रेलियन भारतीय मुलींपेक्शा फारच उंच आणि फिट होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आज बॅडमिंटन. नक्कीच पहाणार.

खेडूत
गुरुवार, 08/11/2016 - 08:07 नवीन
आज बॅडमिंटन. नक्कीच पहाणार.
  • Log in or register to post comments

अरे वा!

चतुरंग
गुरुवार, 08/11/2016 - 09:41 नवीन
किती वाजता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा-

खेडूत
गुरुवार, 08/11/2016 - 09:53 नवीन
ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा- तिकडे ८ वाजता. भारतात साडेचारला आहे. साडेपाचला अत्री मनू आणि सुमित रेड्डी. त्याच वेळी दीपिका कुमारी आणि बोमल्यादेवी- धनुष्यबाण चालवतील. साडेसहाला पी सिंधूची मॅच, त्यचवेळी हॉलंडसोबत हॉकी! अन साडेसातला साईना नेहवाल्चा सामना! एकूण काय, आज मेजवानी आहेच.
  • Log in or register to post comments

Ok

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/11/2016 - 12:49 नवीन
मस्त मेजबानी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

अपडेट टाका

लालगरूड
गुरुवार, 08/11/2016 - 18:00 नवीन
अपडेट टाका
  • Log in or register to post comments

मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर

थॉर माणूस
गुरुवार, 08/11/2016 - 20:30 नवीन
मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर गुट्टा-पोनप्पा बॅडमिंटन बाहेर बोम्बयला देवी तिरंदाजी बाहेर दीपिका तिरंदाजी बाहेर शिव थापा बाॅक्सिंग बाहेर पुरूष हाॅकी सामन्यात हरले सिंधू बॅडमिंटनमधे विजयी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

नवते अपडेट तेच बरं होतं

असंका
गुरुवार, 08/11/2016 - 20:33 नवीन
नवते अपडेट तेच बरं होतं म्हणायची पाळी आली ना? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

बॅडमिंटन मधे चुकून बाहेर

थॉर माणूस
गुरुवार, 08/11/2016 - 22:00 नवीन
बॅडमिंटन मधे चुकून बाहेर लिहीले गेले आहे. आजचे सामने हरले तरी अजून पुढच्या फेरीत जाण्याची संधी आहे. चोप्य-पस्ते करताना घोळ झाला. ☺
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

बॅडमिंटन एकेरीमधे साईना आणि

खेडूत
गुरुवार, 08/11/2016 - 22:51 नवीन
बॅडमिंटन एकेरीमधे साईना आणि सिंधू आपापल्या पहिल्या फेरीत विजयी झाल्या.
  • Log in or register to post comments

हाॅकीचा खेळ मस्त झाला.. अगदी

सानझरी
Fri, 08/12/2016 - 22:39 नवीन
हाॅकीचा खेळ मस्त झाला.. अगदी interesting..
  • Log in or register to post comments

सानिया-बोपण्णा टेनिस

थॉर माणूस
Sat, 08/13/2016 - 04:32 नवीन
सानिया-बोपण्णा टेनिस क्वार्टरफाइनल मधे विकास बाॅक्सिंग क्वार्टरफाइनल मधे
  • Log in or register to post comments

हा धागा अगोदर ज्या उत्साहाने

असंका
Sat, 08/13/2016 - 07:07 नवीन
हा धागा अगोदर ज्या उत्साहाने उघडला जायचा तितकाच आता भित भित उघ्डला जातोय... :( दत्तू भोकनळ परत एकदा सुरेख खेळला मात्र काल...पूर्ण वेळ आघाडीवर राहून शेवटच्या एक सेकंदात दुसर्‍या स्थानावर गेला.
  • Log in or register to post comments

अरेरे, थोडक्यात हुकले, आत्ता

खेडूत
Sat, 08/13/2016 - 14:07 नवीन
अरेरे, थोडक्यात हुकले, आत्ता पाहिलं.. उद्या दीपा आणि साईनाकडून मोठी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

आजचे अपडेटस..

खेडूत
Sat, 08/13/2016 - 19:43 नवीन
आजचे अपडेटस.. अश्विनी, ज्वाला, भारतीय महिला हॉकी संघ स्पर्धेबाहेर गेले. पण किदम्बी श्रीकांतने बॅडमिंटन मधे विजयी सलामी दिली. उद्या स्वीडीश खेळाडूसोबत खेळणार. त्याला शुभेच्छा ...! सानिया -बोपन्ना उपान्त्यपूर्व फेरीत उद्या खेळतेल
  • Log in or register to post comments

ललिता बाबर चा नॅशनल रेकॉर्ड.

असंका
Sat, 08/13/2016 - 19:43 नवीन
ललिता बाबर चा नॅशनल रेकॉर्ड. फायनल खेळणार. ३००० मीटर्स..स्टीपलचेज. ..?
  • Log in or register to post comments

हो, तिचेही अभिनंदन आणि

खेडूत
Sat, 08/13/2016 - 19:52 नवीन
हो, तिचेही अभिनंदन आणि शुभेच्छा! वादग्रस्त पैलवान नरसिंग आज रिओला पोहोचला. १९ तारखेला तो पहिला सामना खेळेल. उद्या दीपा कर्माकर्च्या कामगिरीची उत्सुकता आहे!
  • Log in or register to post comments

ललिता बाबरचे अभिनंदन. पी

एस
Sat, 08/13/2016 - 20:44 नवीन
ललिता बाबरचे अभिनंदन. पी टी. उषानंतर ऍथलेटिक्स फायनलमध्ये खेळणारी पहिली भारतीय खेळाडू ठरेल.
  • Log in or register to post comments

साईनाचा १८-२१, १९-२१ असा सरळ

श्रीगुरुजी
Sun, 08/14/2016 - 19:03 नवीन
साईनाचा १८-२१, १९-२१ असा सरळ सेट्समध्ये पराभव. पदकाची आशा संपुष्टात.
  • Log in or register to post comments

सायना फिट नव्हती बहुतेक.

असंका
Sun, 08/14/2016 - 23:27 नवीन
सायना फिट नव्हती बहुतेक. दीपा करमाकर मैदानात येत आहे....
  • Log in or register to post comments

काही खास नव्हते...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/15/2016 - 16:15 नवीन
सायनाचा खेळ पाहता ती जिंकेल असं एकदाही वाटलं नाही. अजिबात उत्साह नाही, की पर्फेक्ट स्म्याशिंग दिसली नाही की रिटर्न विशेष वाटले नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा