एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो.
समजा, तुम्हाला तातडीने दुसर्या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात.
आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले.
तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा.
अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?
प्रतिक्रिया
10 Aug 2016 - 11:48 am | संदीप डांगे
समर्थ सांगून गेलेत हो...
आणि वस्ती चांगल्या ठिकाणी करावी म्हणून आम्ही मुंबई सोडून नाशिक ला शिफ्ट झालो... मोठे चांगले रस्ते, नागरी सुविधा, कर्तव्यदक्ष नगरसेवक, पुढाकार घेऊन शहर उत्तम ठेवण्याची पराकाष्ठा करणारे नागरिक इथे लाभले, स्वतःचे शहर म्हणून लोक जीव ओततात शहराच्या जडणघडणीत असा अनुभव आहे, बाकी जी शहरे बकाल होत आहेत त्याला बाहेरून येणाऱ्या नागरिकानची अनास्था कारणीभूत असते, ही संख्या जिथे मूळ निवासीपेक्षा जास्त तिथे समस्या वाढतात,
10 Aug 2016 - 2:23 pm | नाखु
असं म्हणून तुम्ही असहिष्णु आहात असे म्हणायची सोय केली.
तसंही वरील विधानाला ऊभा छेद देणारी व्य्वस्था पिंची मध्ये आहे.
गणामास्तरांसाठी नम्र विनंती : चाफेकर चौकातील पूल हे राजकारण्यांच्या नियोजन शून्य बिनडोकपणाचे स्मारक आहे हे तुम्हीच साम्गू शकाल.
वल्ली शेठ: हा पूल सद्यकालीन असल्याने तसेच (त्यांच्या घरासमोरील पूलाचा त्यांना १ पैसाही उपयोग होणार नाही,पण त्रास नक्कीच होणार आहे) तरी लिहिणार नाहीत.
दोन्ही पुलांचा अनुभव असलेला नाखु
10 Aug 2016 - 3:17 pm | गणामास्तर
चापेकर चौकातला उड्डाणपूल हा एक विनोद आहे हो नाखुनचच्चा. तो विनोद म्हणूनचं घ्यायचा, वापरायचा नाही ;)
10 Aug 2016 - 3:13 pm | गणामास्तर
फक्त याबद्दल असहमत.
बाकी पिंचिं काही बकाल म्हणावे असे नाही, पण जो काय बकालपणा चालवलाय तो 100% मूळनिवासी आणि स्थानिक गावगुंडांनीच. या कधी तरी दाखवीन मजा :)
10 Aug 2016 - 3:37 pm | नाखु
आम्ही तेच म्हणून राहिलो डांगे सरांशी असहमती दाखवून.. प्रतिसाद पुन्हा नजरेखालून घाला महाराजा.
स्थानीक गाववालेच बकालपणा आणि गुंडगिरी करून बाहेरून आलेल्यांना (गुंडाना-राजकारण्यांना यथोचीत साथ देत आहेत) त्यांच्यात कोण जास्ती नियोजनशून्य आणि गावगुंड याची स्पर्धा चालू आहे.
यादगार नाखु
10 Aug 2016 - 4:44 pm | गणामास्तर
तो प्रतिसाद डांगेंनाच होता. आमची टाकायची गल्ली चुकली वाटतं, आता तुम्हीच घ्या समजून.
10 Aug 2016 - 5:05 pm | संदीप डांगे
पिंची आणि डोंबोली ह्या दोन जागा सोडून द्या, गॉन केसेस आहेत
10 Aug 2016 - 5:53 pm | मुक्त विहारि
आजकाल डोंबोली मात्र खरोखरच गॉन केस वाटत आहे.
7 Aug 2016 - 1:36 pm | नेत्रेश
फुटपाथ फेरीवाल्यांनी भरले आहेत? - त्यांच्याकडुन कुणीही एकही वस्तु खरेदी करु नका, ८ दीवरात सर्व फुटपाथ आपोआप मोकळे होतील.
अनधीकृत बांधकामे वाढली आहेत? - फक्त अधीकृत ईमारतीत घर खरेदी करा.
वाहतुकीची शीस्त सर्वांनी पाळा - ट्राफीक ज्याम होणार नाही, पोलिसांना कामाचा बो़आ कमी होईल.
राजकारणी चोर आहेत - पुढच्या निवडणुकीत मतदान करा व त्यांना घरी बसवा
आपल्याला जर एवढ्या बेसीक गोष्टी करायच्या नसतील तर आहे त्या परीस्तीतीला आपलेच वागणे कारणीभुत आहे हे समजुन गप्प बसावे.
7 Aug 2016 - 2:11 pm | चंपाबाई
मागच्याच निवडणुकीत मोदी , भाजपा सेना निवडुन दिले ना ?
अनधिकृत बांधकामे नव्या सरकारनेही अधिकृत केली आहेत.
आता अजुन नवे सरकार कुठुन आणायचे ? की शक हूण ग्रीक म्लेंच्छ यवन इ ना पुन्हा चान्स द्यायचा ?
7 Aug 2016 - 6:54 pm | अभिजीत अवलिया
ज्या देशात जन्म घेतला तो आवडलाच पाहिजे असे नाही.
मुक्त विहारी ह्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याच्याशी सहमत.
दिवसेंदिवस सामाजिक प्रगती होण्याऐवजी आपण माजोरडेपणा, उद्दामपणा, बेशिस्त ह्या दिशेने झुकत आहोत असे वाटत आहे.
8 Aug 2016 - 4:24 am | चित्रगुप्त
मुळात विज्ञाननिष्ठ किंवा आणखी कोणती लेबले लावून जगण्याची गरजच काय ?
8 Aug 2016 - 9:37 pm | ट्रेड मार्क
भारतात असलेल्या प्रॉब्लेम्स विषयी बरीच चर्चा झालीये. माझ्या दृष्टीने भारतीय मनोवृत्ती अथवा मानसिकता हा प्रगतीसाठी एक मोठा अडथळा आहे.
कुठेही कचरा न टाकणे, जिथेतिथे न थुंकणे, नियम पाळणे, प्रामाणिकपणे वागणे ई. स्वतः करता येणाऱ्या गोष्टी पण किती टक्के लोक्स करतात? सुधारणा स्वतःपासून करावी हे नुसतं तत्वज्ञान दुसऱ्याला सांगतात पण स्वतःचं काय?
भारतातून पहिल्यांदा परदेशात (विशेषतः अमेरिका, युरोप) गेल्यावर आश्चर्याचे बरेच धक्के बसतात. सामान्य माणूस किती काटेकोरपणे नियम पाळतो, स्वच्छता पाळतो हे बघून थक्क व्हायला होतं. सार्वजनिक जीवनात पण हे लोक खूपच प्रामाणिक असतात. जमल्यास माझे काही अनुभव लिहीन वेगळ्या लेखात. बाकी काही प्रतिक्रियांत म्हणल्याप्रमाणे परदेशातही प्रॉब्लेम्स आहे जसे की गन कंट्रोल नसणे ईई. पण रोजचा त्रास नाही.... जगाल तर सुखाने नाहीतर परस्पर सद्गती. पण दुर्दैवाने अश्या एखाद्या हल्यात कोणी मारला गेलाच तर सरकार आणि विमा कंपन्यांकडून चांगली वागणूक मिळते.
परदेशात काही वर्ष राहून भारतात परत आलं की संमिश्र भावना होतात. आपले लोक भेटतात म्हणून बरंही वाटतं पण बाकी अस्वच्छता आणि अनास्था बघून उद्विग्नता पण येते.
त्यामुळे तिमा आणि मुवींशी बऱ्याच अंशी सहमत.
10 Aug 2016 - 7:31 pm | पिलीयन रायडर
भारतात खुप प्रॉब्लेम्स आहेत हे खरेच, पण म्हणुन ते जगातल्या इतर देशात नाहीत असं थोडीच आहे? अमेरिकेतले लोक काय स्वर्गात थोडीच रहातात? इथेही डोक्याला शॉट खुप गोष्टी आहेत. फक्त इथले लोक तुलनेने आपल्या देशाला कमी शिव्या घालताना दिसतात असं माझं निरीक्षण. आपण मुळातच "मी देशापेक्षा एक वेगळी व्यक्ति आहे" असं समजुन देशाला शिव्या घालतो. पण आपण म्हणजेच देश आहोत ना?
भारत निश्चितच एक खुप चांगला देश आहे, वादच नाही. आपली आई कितीही कशीही असली तरी आई असते. तिचा तिरस्कार करुच शकत नाही. बाकी आया कितीही सुंदर आणि प्रेमळ वाटल्या तरी आपल्या आई सारखा हक्क बाकी कुणावर नसतो.
10 Aug 2016 - 7:44 pm | संदीप डांगे
अगदी अगदी,
टेढा है पर मेरा है।
11 Aug 2016 - 2:47 am | डॉ सुहास म्हात्रे
टेढा है पर मेरा है।
हे नक्की, पण...
"और इसको सिधा करने के लिये खुद मुझे सिधा होना पडेगा और दुसरोंको सिधा बनानेमे योगदान भी देना पडेगा।"... या पुढच्या मुद्द्यात आपण कमी पडतो.
...आणि हाच मुख्य मुद्दा एखादा देश विकसित आहे/होईल की अजून बराच काळ अविकसित (किंवा जीवाला बरं वाटावं म्हणून वापरला जाणारा शब्द... विकसनशील) राहील ते ठरवतो. :) :(
11 Aug 2016 - 6:11 pm | NiluMP
could you say same for sheena bora's mother.
11 Aug 2016 - 6:06 pm | नगरीनिरंजन
"भारतात प्रॉब्लेम्स आहेत; पण ते जगात कुठे नाहीत?" असं म्हणणे ही स्वतःची फसवणूक होईल. असं म्हणणार्या लोकांना एकतर सुदैवाने भारतात काहीही त्रास झालेला नसतो किंवा विकसित देशात राहणे कसे असते त्याचा अनुभव नसतो.
रस्त्यावर कितीही साधा अपघात झाला तरी अक्षरशः पाव्ह मिनीटात पोलिस हजर होतात. नुकतीच दिल्लीत घडलेली घटना पाहा. तो माणूस जखमी होऊन पडून राहिला आणि मेलप; पण त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. आणि ही फक्त उघडकीला आलेली एक घटना आहे. विकसित देशांमध्ये असा माणूसच काय कुत्रा-मांजरसुद्धा जखमी अवस्थेत पडून राहणार नाही.
हे आपलं काम आहे आणि ते आपण प्रामाणिकपणे करणे ह्यात आपला आत्मसन्मान आहे हे तर तिथल्या लोकांना कळतंच शिवाय दुसर्यांशी संवेदनशीकतेने कसं राहावं हेही कळतं. भारतात चांगल्या सुखवस्तु माणसालाही बाहेर गेल्यावर जिवंत घरी येऊ की नाही ह्याची खात्री नसते. अठराव्या शतकात टीबीने मेलेल्या माणसाच्या जागी आपण नाही ह्या आनंदापेक्षा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या माणसाच्या जागी मी किंवा माझा आप्त असेल तर काय होईल ह्याची धास्ती कैकपटीने जास्त आहे.
बाकी सुधारणा होण्यासाठी प्रॉब्लेम आहे हे मान्य करावं लागतं. इथे तर "संतुलित" राहण्याची स्पर्धा चालू आहे.
11 Aug 2016 - 6:27 pm | संदीप डांगे
ननि, थोडी गल्लत होतेय, इथे कोणीही "भारतात अजिबात समस्या नाहीत" असे म्हणत नाही आहे, पण गेल्या तीस वर्षांपासून आम्हाला फक्त समस्याबद्दल कुरकुरायला शिकवले गेले आहे, पुढे होऊन दोन हात करायचे म्हटले तर हजार कारणं तयार असतात, एकटा काय करू शकतो पासून व्यवस्था बदलणे शक्यच नाही इत्यादी..
तसेच आजकाल कुरकुऱ्यांवर टीका केली की टिपिकल उत्तर मिळते ते हेच की सुधारणा होण्यास समस्या मान्य कराव्या लागतात,
हो, समस्या मान्यच आहेत आम्हाला पण उपाय कोणी शोधायचे /करायचे? त्या आघाडीवर कुरकुरे बंधू नक्की काय करतात हे विचारायचे नसते! निव्वळ माजघरात देशाला नावे ठेवली कि यांचे कर्तृत्व सिद्ध होते ना!
या वर्षीच्या मॅगेसेसे चे विजेते आणि त्यांची कामे बघावी, भारतात काहीच चांगले होऊ शकत नाही ह्याची जपमाळ ओढणार्यांना कदाचित हि नावे ठाऊक नसतील किंवा असली तरी त्यांच्या कुरकुर चळवळीला सूट होत नसल्यामुळे जाणवत नसतील!