एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो.
समजा, तुम्हाला तातडीने दुसर्या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात.
आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले.
तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा.
अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?
प्रतिक्रिया
4 Aug 2016 - 12:18 pm | कंजूस
केविलवाणा चेहरा ठेवायचा.हुशारी मारायची नाही.
#बस थांबवली आरटाओने थांबवली.ड्राइवर म्हणाला इकडचे परमिट नाहीये या बसला.काय करायचे? म्हटलं चला .खपचिप पंधरा मिनिटे बाजूला उभे राहिलो.जरा वेळाने सायबाने विचारपूस केली."ऐनवेळी परमिटवाली बस डौन झाली.ही काढली.मिस्टेक झाली सायेब,चलन फाडा.उद्या पैसे भरून येतील मालक." " जाऊ दे ,पुढच्या वेळेला लक्षात ठेवा." एक तात्पुरते परमिट देऊन टाकले त्याने.
4 Aug 2016 - 12:27 pm | मुक्त विहारि
तुम्हाला जे प्रश्र्न पडले तेच मला पडलेले होते.
मागच्या जन्मी आपण काही तरी वेडे-वाकडे पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म झाला, असे माझे मत.
आता ह्यातून सुटका हवी असेल तर, त्यामुळे जसे जमेल तसे पुण्य गोळा करा.
फार साधे उपाय आहेत.
जे उपाय मी केले तेच सांगत आहे.
१. अभ्यास करून परदेशी शिक्षणासाठी जा आणि तिथेच स्थाईक व्हा. (हे मला जमले नाही.)
२. आपल्या कामात कुशलता मिळवा आणि भरपूर पैसे जोडून मुलांना परदेशी पाठवा. (हे जमेल असे वाटत आहे.)
आणि
३. एखाद्या शांत अशा खेडेगावात स्थाइक व्हा. (हे पण जमले.सुदैवाने मी जिथे स्थाईक व्हायचे ठरवले आहे, तिथे नविन पुलांचे बांधकाम दोन्ही दिशेने चालू असल्याने, पुढील ७-८ वर्षे तरी चिंता नाही.)
असो,
ह्या ३ही गोष्टी जमत नसतील तर, भरपूर पैसे गोळा करा आणि एखाद्या वृद्धाश्रमात रहायला जा.(शेती नसती घेतली, तर मी पण "वृद्धाश्रम" हाच पर्याय निवडला होता.)
4 Aug 2016 - 12:32 pm | सुमीत
विचार माझे पण, ++++
4 Aug 2016 - 12:45 pm | कपिलमुनी
वाचून वाईट वाटले!
नो कॉमेंटस्
4 Aug 2016 - 12:52 pm | अभ्या..
जननि जन्मभुमिश्च स्वर्गादपि गरियसी.
मला पण वाईट वाटले.
4 Aug 2016 - 12:54 pm | मुक्त विहारि
सकाळी उठल्या उठल्या होणारा वाहनांच्या आवाजाचा त्रास, अरुंद रस्ते, वाहनांनी सोडलेल्या धुराचे प्रदूषण, लोकांच्या संख्येनुसार नसलेली मैदाने, माणसांनी भरून वाहणारी सार्वजनिक वाहने, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, बुद्धीपेक्षा जाती किंवा सत्ता किंवा पैसा आधारीत शिक्षण पद्धती, फुटपाथवर धंदा करणारे फेरीवाले, मीटर नसलेल्या रिक्षा, वृद्धांसाठी नसलेली सार्वजनिक, भरवशाची आणि सुयोग्य साधने व्यवस्थित रित्या चालत असलेली आरोग्य व्यवस्था, सणाच्या निमित्ताने वाढणारे ध्वनी प्रदूषण.
यादी बरीच मोठी आहे,
आता ह्या गोष्टी ह्या ठिकाणी आहेत, त्याला जर तुम्ही स्वर्ग म्हणत असाल तर, तुमच्या मताचा आदर आहेच.
4 Aug 2016 - 12:58 pm | अभ्या..
गतजन्म पाप वगैरे संकल्पनाबाबत काही नाही म्हणणे पण तुमच्या "ऑल्वेज थिंक पॉझिटीव्ह" विचारसरणीत १८० अंशाचा फरक पडला म्हणून अंमळ आश्चर्य वाटले. बाकी कै नै.
4 Aug 2016 - 1:09 pm | मुक्त विहारि
अशा देशात मी एकटा काहीच करू शकत नाही, ही वस्तूस्थिती.
पण इथून सुटका करून घेवू शकतो किंवा किमान त्यातल्या त्यात स्वतःला जास्त त्रास होणार नाही, ह्या जागेत तरी जावू शकतो.
"ऑल्वेज थिंक पॉझिटीव्ह" ह्याच बरोबर "ऑल्वेज अॅक्सेप्ट द थिंग्स" हे पण आहे.
4 Aug 2016 - 1:01 pm | चंपाबाई
आमीरची बायकू असेच बोलली तर ती देशद्रोही ? आता तुम्ही कोण ?
4 Aug 2016 - 1:04 pm | सुबोध खरे
आम्ही शांताबाई
5 Aug 2016 - 6:28 am | नावातकायआहे
ख्विक...
4 Aug 2016 - 1:19 pm | मुक्त विहारि
तिला असुरक्षित वाटत असेल तर तिचा तिने उपाय शोधावा, जसा मी शोधला.
आता तुम्ही कोण?
आम्ही कुणीही का असेना? पण तुमच्या सारखा लोचट तर नकीच नाही. (आत्ता पर्यंत मायबोली आणि मिपातून ३-४ वेळा हकालपट्टी झालेल्या आय.डी.ला लोचटच म्हणावे लागते.दुसरा कुठला सुयोग्य शब्द अशा गुणांना असल्यास, मला माहित नाही.)
आणि परत-परत तेच तेच मुद्दे घेवून, तुम्ही मला प्रतिसाद करणार असाल तर, माझ्याकडून एकही प्रतिसाद दिल्या जाणार नाही.तुमच्या भंपक आणि मुळ मुद्दा सोडून भलतीकडेच नेणार्या प्रतिसादांना उत्तर द्यायला आज मला वेळ नाही.
4 Aug 2016 - 3:27 pm | मोदक
वाईट वाटले याला हजारवेळा सहमत.
अनेक आफ्रिकेतले मागासलेले देश किंवा मध्यपूर्वेतले देश किंवा अगदी भारतातल्याच बिहार हरियाणातल्या खेड्यातल्या गरीब माणसाची परिस्थिती आणि आपली तुलना करा. बरेच सकारात्मक मुद्दे सापडतील.
"आपले दु:ख मोजायचे असेल तर आपल्यापेक्षा जास्त त्रासात असणार्या व्यक्तीकडे पहा" वगैरे विचार मागासलेले वाटले तरी ते सार्वकालीन सत्य प्रकारात मोडतात.
एक मेल / ढकलपत्र वाचले होते ते आठवले...
तुम्ही जर हल्ला न होता किंवा न लुटले जाता घरी पोहोचत असाल तर जगातील अमुक अमुक व्यक्तींपेक्षा भाग्यवान आहात, तुमच्याकडे राहण्यासाठी किमान स्वतःची किंवा भाड्याची जागा असेल तर जगातील अमुक अमुक व्यक्तींपेक्षा भाग्यवान आहात
असे बरेच काही होते.
ते कोणाकडे असले तर प्लीज द्या येथे.
4 Aug 2016 - 3:56 pm | मुक्त विहारि
तुलनाच करायची तर ती, आपण राहतो तो प्रदेश दिवसेंदिवस उत्तम होत चालला आहे की अधिकाधिक बकाल, ह्याची केली तर उत्तम.
पुर्वीचे पुणेच नाही तर पुर्वीची कुठलीच शहरे, आज तरी आधीच्या १०-१२ वर्षांपेक्षा उत्तम म्हणता येतील अशी झालेली नाहीत.
"आपले दु:ख मोजायचे असेल तर आपल्यापेक्षा जास्त त्रासात असणार्या व्यक्तीकडे पहा."
ह्याचा वैयक्तिक फायदा झालेला आहे.
पण एखाद्या देशा बाबत असे म्हणणे योग्य नाही.किंबहूना अशी विचारसरणी एखाद्या देशाबाबतीत योग्य पण नाही.
हे म्हणजे एखाद्या देशाने, आमच्याकडे फक्त चोर्याच होतात, आतंकवादी हल्ले होत नाहीत, ह्यातच समाधान माना.असे म्हणण्यासारखे आहे.
4 Aug 2016 - 4:36 pm | मोदक
तुलनाच करायची तर ती, आपण राहतो तो प्रदेश दिवसेंदिवस उत्तम होत चालला आहे की अधिकाधिक बकाल, ह्याची केली तर उत्तम.
मान्य. पण एखाद्या प्रदेशाची एकाच दिशेने वाटचाल होत नाही. ज्या चांगल्या गोष्टी येतात त्याबरोबर कांही वाईट गोष्टीही येतातच.
पुर्वीचे पुणेच नाही तर पुर्वीची कुठलीच शहरे, आज तरी आधीच्या १०-१२ वर्षांपेक्षा उत्तम म्हणता येतील अशी झालेली नाहीत.
सरसकटीकरण वाटत असल्याने पास.
पण एखाद्या देशा बाबत असे म्हणणे योग्य नाही.किंबहूना अशी विचारसरणी एखाद्या देशाबाबतीत योग्य पण नाही.
नाही हो मुवि, फक्त दु:खाची तुलना करून थांबायचे नाही. सुखाची तुलना करताना आपल्यापेक्षा वरच्या लोकांशी तुलना करून कुठे प्रगती करायची आहे त्याचे मूल्यमापन करायचे.
खूपच भाबडे विचार वाटत आहेत का?
4 Aug 2016 - 4:55 pm | मुक्त विहारि
पण त्या यायलाच नकोत...
हा भले आदर्शवाद असेल...किंबहूना आहेच....पण निदान त्या दिशेने प्रयत्न तर व्हायला हवेत.
"सरसकटीकरण वाटत असल्याने पास."
हे सरसकटीकरण नाही.
तुम्ही महाराष्ट्रातील कुठलेही एखादे शहर निवडा.आपण दोघेही जावू या.तिथल्या वयस्कर व्यक्तींना विचारून बघू या.
"सुखाची तुलना करताना आपल्यापेक्षा वरच्या लोकांशी तुलना करून कुठे प्रगती करायची आहे त्याचे मूल्यमापन करायचे."
मग मी पण तेच केले.
"खूपच भाबडे विचार वाटत आहेत का?"
जिथे विचारांची आदानप्रदान होवू शकते (आणि मी जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर ती चूक दुरुस्त करण्यात मला कमी पणा वाटत नाही.) तिथेच मी साद-प्रतिसाद देत राहतो.
प्रत्येक जण आपापल्या परीने एखाद्या घटनेकडे पहात असतो.कुणी डोळस पणे तर कुणी दुसर्याच्या सल्ल्याने तर कुणी एक-रंगी चष्मे वापरून.
तुमचे विचार भाबडे ठरवण्याचा मला अधिकार नाही आणि तितकी माझी योग्यता पण नाही.
4 Aug 2016 - 4:33 pm | आदूबाळ
माझा वैयक्तिक अनुभवः
एका येमेनमधल्या माणसाशी कामानिमित्त बोलत होतो. सगळी चर्चा झाली - त्याने मला काही अॅनालिसीस करून द्यायचं होतं. मी विचारलं कधीपर्यंत देशील?
तो म्हणाला, "थोड्या वेळाने बॉम्बहल्ल्याला सुरुवात होईल. उद्या ऑफिसला यायला जमेल की नाही माहीत नाही. रविवारपर्यंत देतो, चालेल ना?"
...यावर मी काय बोलणार?
4 Aug 2016 - 4:58 pm | मुक्त विहारि
उद्या कदाचित ते भारताच्या बाबतीत पण होवू शकेल, अशी मला शक्यता वाटते.
इथे रोजचा लोकलचा प्रवास पण तसाच बेभरवशी आहे.
4 Aug 2016 - 5:03 pm | अभ्या..
बघा मुवि,
मला स्वप्ने पडत होती ते नॉर्मल होते की नै.
.
नॉर्मल आहे हो मी. ;)
.
(मृत्यो, हल्के घे रे बाबा. मी खरच धसका घेतलाय)
4 Aug 2016 - 5:12 pm | मुक्त विहारि
रोजचा लोकलचा प्रवास करणे वेगळे.
१९८० मधला लोकल प्रवास जितका सुखावह होता, तितका आज नाही, ही वस्तूस्थिती.
गेल्या ७-८ वर्षात स्थिती खूपच बिघडली आहे.
मग ती दिव्यातली दंगल असो किंवा लोकलमधून झालेला अपघात आणि त्याचे चित्रण असो.
जर तुम्ही झुंडीत सामील झालेले नसाल, तर इथे जगणे कठीण आहे.
4 Aug 2016 - 5:21 pm | अभ्या..
अगदी परफेक्ट वाक्य. प्रत्येक ठिकाणी लागू.
.
असल्या कठीणपणाचीच लै हौस दांडगी मला. ;)
10 Aug 2016 - 9:41 am | मृत्युन्जय
नॉर्मल आहे हो मी. ;)
.
(मृत्यो, हल्के घे रे बाबा. मी खरच धसका घेतलाय)
हाहाहा. *** तु खरेच नॉर्मल आहेस :)
7 Aug 2016 - 12:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला.
-दिलीप बिरुटे
7 Aug 2016 - 12:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देश जसा आहे, तसा आहे, आवडतो आम्हाला आमचा देश. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2016 - 1:10 pm | ज्ञानोबाचे पैजार
हे वाचून अतिशय वाईट वाटले, माझा देश इतकाही वाईट नाही की कोणाला पापकृत्याचे परिणाम म्हणुन इथे जन्म घ्यावा लागावा.
हे असे वाचायला लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
पैजारबुवा,
4 Aug 2016 - 1:19 pm | यशोधरा
अगदीच.
आणि डोंबोलीत असून असे?!
4 Aug 2016 - 1:31 pm | मुक्त विहारि
जे डोंबोलीत तेच इतर शहरांत पण आहे.
मग ते सोलापूर असो की नागपूर की औरंगाबाद किंवा लातूर.
फूटपाथ वरून व्यवस्थित चालता येणे आणि झेब्रा क्रॉसिंग वरून व्यवस्थित रस्ता क्रॉस करणे, हा सामान्य अधिकारच जिथे डावलला जातो, त्या देशाबद्दल काय बोलणार?
4 Aug 2016 - 1:32 pm | यशोधरा
आपल्या आजूबाजूची जी व्यवस्था आपल्याला पटत नाही, ती बदलायचा आपण कितीसा प्रयत्न करतो? तुम्ही असे काही प्रयत्न केले असल्यास मला वाचायला खरंच आवडेल.
4 Aug 2016 - 1:56 pm | मुक्त विहारि
असा प्रयत्न केला होता.
१. आमच्याच एका गृपने त्यावेळी डोंबिवलीत लोकांना प्लॅस्टिकच्या सोडून कापडी पिशव्या बाळगण्याचा एक प्रयत्न रस्त्यावर केला होता.
आज निदान मी आणि माझ्या घरचे, शक्यतो पिशवी घेवूनच बाहेर पडतो. (लोकांना जसे हवे तसे वागू देत.)
२. डोंबिवलीतल्या चौकांत होणार्या दुर्दशेची तक्रार दिल्लीला पण करून झाली.
३. धार्मिक कार्या निमित्ताने होणार्या ध्वनी-प्रदूषणाची तक्रार न करण्यातच शहाणपण असते, सत्तेपुढे आणि झुंडीपुढे सामान्य माणसाचे, मग ते कितीही योग्य असले तरी, चालत नाही, हा धडा पण शिकलो.
थोडक्यात काय तर,
गृप जमवून किंवा वैयक्तिक, किंचित प्रयत्न करून पाहिला आणि ह्या कामासाठी आपला जन्म झालेला नाही, हे उमगले.
मी खरे तर ह्या गोष्टी सांगीतल्याही नसत्या, पण तुम्ही पोटतिडिकेने विचारलेत म्हणून लिहिले.
4 Aug 2016 - 2:00 pm | यशोधरा
पण हे सतत करावे लागते मुवि. एक दोनदाच करुन जमत नाही.
अथक प्रयत्न सुरु ठेवावेच लागतात. त्याला उपाय नाही.
4 Aug 2016 - 3:05 pm | मुक्त विहारि
+१
आणि त्याच बरोबर आमच्या बरोबर एखादा उत्तम मार्गदर्शक पण न्हवता.
4 Aug 2016 - 1:26 pm | मुक्त विहारि
मला ही ते लिहितांना फार काही आनंद झालेला नाही....पण इतर देशांची तुलना केल्यानंतर हे असे वाटणे मला तरी साहजिकच वाटते.
१. सुयोग्य नियोजित रस्ते,
२. गर्दी नसलेला आणि आवाज नसलेला फुटपाथ.
३. आरामात झेब्रा क्रॉसिंगवर रस्ता ओलांडता येणे
४. अनावश्यक हॉर्न न वाजवता सुरळीत जात असलेली वाहने.
५. जीवनावश्य वस्तूंच्या भाववाढीवर नियंत्रण
६. २४ तास लाईट आणि पाणी.
ह्या आणि इतर बर्याच गोष्टी, भारता नंतर स्वतंत्र झालेल्या देशात पण पहायला मिळतात.
सामान्य माणसांना अद्यापही ह्या गोष्टी दुरापास्तच आहेत.
4 Aug 2016 - 2:00 pm | गॅरी ट्रुमन
मुविकाका,
तुम्ही म्हणत आहात त्या सगळ्या सुविधा झाल्या असे गृहित धरले तरी त्यामुळे माणसाच्या समस्या संपणार आहेत का? ही नाहीतर दुसरी समस्या निर्माण होईलच. तुम्हाला पाहिजे आहेत त्यापैकी बर्याचशा सुविधा युरोप, अमेरीका, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी झालेल्या आहेत.पण तिथल्या लोकांच्या समस्या या नसतात तर वेगळ्या स्वरूपाच्या असतात. उदाहरणार्थ ड्रग्स, ओबेसिटी इत्यादी. एकूण काय तर समर्थ म्हणाले आहेत त्याप्रमाणे जगी सर्वसुखी असा कोणीच नाही.एक समस्या सुटली की दुसरी समस्या आ वासून उभी राहणार आहे---या नाहीतर त्या स्वरूपात.म्हणजे आपण रस्त्यावरच्या खड्ड्यांविषयी तक्रार करत असू तर अमेरीकेतील लोक कधीही जाणार्या नोकर्यांविषयी, कुठेही होणार्या गोळीबाराविषयी तक्रार करतात. अर्थात याचा अर्थ रस्त्यावर खड्डे तसेच राहूदेत किंवा २४ तास लाईट आणि पाणी नको असा नक्कीच नाही. पण या समस्या आहेत म्हणून भारतात पूर्वजन्मीचे पाप म्हणून जन्म मिळाला असे का म्हणावे? कदाचित वेगळ्या कुठल्यातरी समस्यांमुळे युरोप-अमेरीकेतील लोकही असेच म्हणत असतील (जर का त्यांचा पूर्वजन्मावर विश्वास असेल तर).म्हणजे सर्वच ठिकाणचे लोक कुठच्या ना कुठच्या कारणावरून हेच म्हणत असतील. तसे असेल तर जन्माला आलो हेच मागच्या जन्मीचे पाप म्हणायचे का?
मुविकाका, मागच्या जन्मीचे पाप म्हणून भारतात जन्माला आलो हे तुमचे वाक्य केवळ उद्विग्नतेतून आलेले असावे ही आशा आणि बर्याच अंशी खात्री आहे.
4 Aug 2016 - 2:11 pm | अमितदादा
+१
4 Aug 2016 - 2:53 pm | मुक्त विहारि
त्यातूनच आले आहे....
कारण,
गेली २५-३० वर्षे ह्या ना त्या निमित्ताने भारत बघणे आणि थोडे भारता बाहेरील देश बघणे झाले होते आणि ह्यापुढेही चालू राहिल.
समस्या २ प्रकारच्या असतात.
१ वैयक्तिक (अन्न, वस्त्र, निवारा,)
तर
२. सामाजिक (दळणवळण, समाजाची शारिरीक आणि मानसिक वाढ,बेकारी इ.) ह्या सारख्या.
मुळात वैयक्तिक मागण्याच जर पूर्ण होत नसतील तर मग सामाजिक गोष्टी तर फार दूर.
4 Aug 2016 - 6:47 pm | आजानुकर्ण
गॅरी साहेबांशी सहमत. सर्वच ठिकाणचे लोक हेच म्हणत असतात. भारतात जन्माला आल्याचे कारण एखादे पूर्वजन्मीचे पाप असावे असे किमान अच्छे दिननंतरतरी वाटू नये असे मोदी साहेब म्हणतात ब्वॉ. (http://www.news18.com/news/buzz/modi-insults-india-993961.html)
चंपाबाईशीही सहमत. आमीरखानच्या बायकोनेही असेच काहीतरी म्हटले होते ना? बिचाऱ्याला अतुलनीय भारतपासून स्नॅपडील पर्यंत सगळ्यांनी झोडले. मात्र गॅरी साहेबांशी पुन्हा सहमत.
4 Aug 2016 - 7:31 pm | सुबोध खरे
कुठलाही विषय शेवटी मोदी साहेबांशी आणून चिकटवल्याशिवाय चैनच पडत नाही काही लोकांना.
या सर्व लेखात राजकारणाचा काय संबंध?
4 Aug 2016 - 7:35 pm | आजानुकर्ण
हा विषय मोदी साहेबांशी आणून चिकटवला असे का वाटले आपल्याला? तुमचा वरील 'शांताबाई' हा प्रतिसाद चर्चेच्या मुद्द्याशी कितपत सुसंगत आहे? मग मी काय घोडं मारलंय? बाकी माझा प्रतिसाद पटत नसेल तर दुर्लक्ष करा ही विनंती. भारतात जन्माला आल्याची लाज वाटते या संदर्भातील असेच वाक्य मोदी यांचे आहे असे आठवले. म्हणून लिहिले.
4 Aug 2016 - 8:25 pm | सुबोध खरे
चंपाबाई बद्दल बोलू नका
जिथे तिथे पिंक टाकायची सवयच आहे.
इथे एखादा माणूस उद्विग्न झाल्यामुळे देश सोडायचे बोलत आहे. त्यात कोणताही पक्षीय हेतू नाही ("काँग्रेस" मुळे "आप" मुळे किंवा "भाजप"मुळे नव्हे).
अमीर खानच्या बायको ने असुरक्षिततेमुळे देश सोडायचे म्हटले होते.( तरी बरं हि बाई अगोदरची हिंदूच होती). ते आमीरखानने "सार्वजनिक" करण्याचे कारण नव्हते. चंपाबाईनी हे उदाहरण राजकीय स्वार्थातून( कि मोदी द्वेषातून) दिले आहे. चंपाबाई( कि हितेश बुवा, मोगाखान जामोप्या इ )सुद्धा जिथे तिथे राजकारण आणल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही तिचीच( का त्याचीच) री ओढता आहात.
मुविच्या प्रतिसादाशी मी सहमत नाही परंतु तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
आपल्या एकंदर प्रतिसादाची पातळी चंपाबाई पेक्षा किती तरी उच्च असते ती अशी खाली आणू नका एवढी विनंती आहे
4 Aug 2016 - 11:21 pm | आनंदी गोपाळ
संपूर्ण युक्तिवाद प्रिजुडिस्ड वाटतो. तस्मात, असहमत :)
5 Aug 2016 - 1:36 am | आजानुकर्ण
मुविंशी माझे वैयक्तिक काहीही वैर नाही. परंतु त्यांच्या प्रतिसादाने ही उपचर्चा सुरु झाल्याने त्याचा संदर्भ घेतो.
मुवि आणि तिमा यांनीही रस्त्यांची स्थिती, बेभान चालक यामुळे असुरक्षितता वाटते असेच म्हटले आहे. आमीरच्या बायकोने मुलांसाठी देश सोडावा असे वाटते असे म्हटले होते. येथेही मुविंनी मुलाचे शिक्षण (व पुढे वास्तव्य) परदेशात झालेले चांगले असे मत व्यक्त केले आहे. मुविंचे मत आणि सौ. आमीर खान यांचे मत दोन्हीही वैयक्तिक प्रश्न असूनही आमीरने ते सार्वजनिक करण्याचे कारण नव्हते असे तुम्हाला वाटते. पण मुविंनी त्यांचे मत सार्वजनिक केले तर त्याबाबत तुम्हाला आक्षेप दिसला नाही. हे थोडेसे विसंगत वाटले.
कुणी कुठं राहावे हा वैयक्तिक प्रश्न आहे. मिपावर नियमितपणे येणारे अनेक अनिवासी सदस्य मुलांचे भविष्य, आर्थिक दृष्टिकोण, स्टँडर्ड ऑफ लिविंग, सुरक्षितता, वगैरे अनेक मुद्द्यांमुळे भारताऐवजी परदेशात स्थायिक झाले आहेत. मुलांबाबतचा हाच दृष्टिकोण सौ. आमीर खान यांचा असणे योग्य नाही की काय?
5 Aug 2016 - 5:46 am | डॉ सुहास म्हात्रे
मुवि आणि तिमा यांनीही रस्त्यांची स्थिती, बेभान चालक यामुळे असुरक्षितता वाटते असेच म्हटले आहे. आमीरच्या बायकोने मुलांसाठी देश सोडावा असे वाटते असे म्हटले होते...
१.
अ) मुवि आणि तिमा यांनी त्यांचा प्रामाणिक उद्वेग व्यक्त केला आहे असे वाटते.
आ) शिवाय, त्या दोघांनी कधी दोन पैसे घेऊन अथवा न घेऊन देशप्रेम आणि नैतिकता यांचे व्यावसायिक प्रदर्शन केले असे माहितीत नाही.
२.
अ) आमीरच्या देश सोडण्याच्या विधानासंबंधी त्याने त्याच्या बायकोच्या खांद्याचा आधार घेत दुसरीकडे शरसंधान केले असा सर्वसाधारण समज आहे (खखो आमीर आणि त्याची पत्नी जाणो).
आ) कमीत कमी, समतोल विचार करणार्याला, "इन्क्रेडिबल इंडिया" ची जाहिरात करत असलेल्या व्यक्तीने केलेले "इन्टॉलरंट इंडिया" हे विधान विरोधाभासी व अगम्य वाटायला हरकत नसावी ! शिवाय, पैसे घेऊन (अथवा न घेऊनही) देशप्रेम आणि नैतिकता यांचे व्यावसायिक प्रदर्शन करणार्याने असे विधान सार्वजनिक व्यासपिठावर केले तर त्याचे काय परिणाम असू शकतात याचा विचार आमीरने केला नसेल असे म्हणणे म्हणजे बहुश्रुत असलेल्या त्याच्या बुद्धीमत्तेचा अपमान होईल... तेव्हा, प्रत्यक्षातला परिणाम आमीरला अपेक्षित असलेल्या परिणामापेक्षा वेगळा झाला हा विचार जास्त संयुक्तिक वाटतो.
वरचे मुद्दे ध्यानात घेतले तर मुवि/तिमा आणि आमीर यांच्या विधानांमागचे वेगवेगळे अर्थ स्पष्ट व्हायला मदत होईल असे वाटते.
जरा अजून इस्काटून...
"(बर्याचदा फक्त सोयीच्या वाटणार्या का होईना, पण) अनेक सामाजिक विचारांना सार्वजनिक माध्यमांतून नैतीक विरोध करणार्या" आणि ते करताना "सामाजीक-राजकीय मते परखडपणे मांडणारी, समतोल, विचारवंत व्यक्ती अशी आपली छबी निर्माण करणार्या" व्यक्तीने आपण (कमीत कमी सार्वजनिक पटलावर तरी, आणि कांगावाखोर नसल्यास खाजगीतही) आपल्या वागण्या-बोलण्यावर ताबा ठेवणे आणि त्यांत विरोधाभास होऊ नये, ही काळजी घ्यावीच... जनांसाठी नाही तर मनासाठी तरी :)
आपले म्हणणे तार्किकरित्या सुस्पष्टपणे मांडणे कठीण असले आणि/किंवा लोकप्रिय सार्वजनिक व्यासपिठावर व्यक्त होण्याची संधी मिळणे कठीण असले तरी; "दालमे कुछ काला है।" हे चटकन समजण्याइतकी बुद्धी सर्वसामान्यपणे जनतेत जरूर असते. ;)
5 Aug 2016 - 12:10 am | चंपाबाई
मोदी / भाजपा हे मी लिहिलेही नव्हते. खरेबुवाना कुठुन दिसले ?
उद्विग्नता कुणाला कोणत्या कारणाने यावी हेही यांच्या मताप्रमाणेच ठरले पाहिजे , हे वाचुनकरमणुक जाहली.
माझ्या प्रत्येक पोस्टला खरेबुवा पिंक असे हे संबोधतात , पण तिची चव घ्यायलाही हेच महोदय वारंवार पुढे येत असतात, ही तर अजुन मोठी गंमत !
5 Aug 2016 - 10:40 am | सुबोध खरे
पिंक असे हे संबोधतात , पण तिची चव घ्यायलाही
काय प्रतिसाद आहे?
आजानुकर्ण साहेब
आता कळलं का मी काय म्हणत होतो?
5 Aug 2016 - 12:09 pm | मुक्त विहारि
डू.आय.डीं बद्दल काय बोलणार?
ह्या अशा लोचटपणा हा गूण असलेल्या व्यक्तींना प्रतिसाद देण्याच्या भानगडीत पडू नये, असे मला बर्याच जणांनी सांगीतले आणि मला ते पटले देखील. उगाच आपला वेळ जातो.
वरील प्रतिसाद हा "सुबोध खरे" ह्यांनाच आहे.
4 Aug 2016 - 11:17 pm | अर्धवटराव
आमीरच्या बाबतीत कॉन्टेक्स्ट अगदी वेगळा होता. तेंव्हा सो कॉल्ड पुरस्कारवापसी वगैरे प्रकरणं सुरु होती व त्यातच आमीरची मुलाखत आली. अन्यथा सत्यमेव जयते मधे आमीरने व्य्वस्थेची पिसं काढली व त्याचं सर्वत्र कौतुकच झालं.
5 Aug 2016 - 6:19 am | अनिरुद्ध.वैद्य
हे सगळे सर्व कर भरून व सगळ्या कायद्यांचे पालन करूनही भेटत नसेल तर काय करावे?
माफी असावी, पण मी फारच वैयक्तिकरीत्या बोलतोय!
इतरांना सुधारावयाची माझी कॅपॅसिटी नाही.
4 Aug 2016 - 1:24 pm | प्रसाद गोडबोले
मुवी , एकदम मन की बात बोललात :)
4 Aug 2016 - 1:52 pm | स्पा
+१
4 Aug 2016 - 9:50 pm | अभिजित - १
" मागच्या जन्मी आपण काही तरी वेडे-वाकडे पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म झाला, असे माझे मत. " > >>
सहमत आहे मुवि यांच्याशी .. एक addition .. जे लोक मुक्ती कडे जाऊ इच्छितात ते पण इथेच जन्म घेतात !!
अमेरिका - सर्वसामान्य माणसाचे आयुष्य अतिशय सेफ आहे. कसलीही डोक्याला त्रास नाही. रोज जॉब , वीकएंड ला छोटी पिकनिक . सोमवारी परत जॉब . महिन्यातून 2/4 वेळा हॉटेल , सिनेमा . पिझा / बिअर / चीज / भाज्या / गॅस ( आपले पेट्रोल हो ) एकदम स्वस्त ..
पण त्या मुळे देवाचे नाव घ्यायची , देवाला आठवायची वेळ फारशी येत नाही !! इथे भारतात ते सतत करावे लागते . हो कि नाही ? कोण तुम्हाला कसा अडकवले सांगता येत नाही. दुसऱ्याला त्रास देयायची इच्छा असलेले लोक खूप . स्वानुभव आहे. तुमचा पण असेल. ( डोक्टर खरे तुम्ही अपवाद आहात , तुमचे आयुष्य एकदम छान आहे .. तसेच असू दे !! ) अमेरिका मध्ये असे फालतू लोक नसतात. जे इथे आहेत. त्या मुळे सतत देवाचे नाव ओठी. आणि काही भाग्यवान त्या मुळे मुक्ती पण मिळवतात. जे अमेरिका / युरोप मध्ये होत नाही. कारण सतत देवाला आठवावे लागत नाही !!
मी पण हाच विचार मध्ये मांडला होता. पण एक अर्धवट राव लगेच आडवे आले. इथे बघा ..
http://www.misalpav.com/comment/831641#comment-831641
10 Aug 2016 - 9:48 am | मृत्युन्जय
मागच्या जन्मी आपण काही तरी वेडे-वाकडे पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म झाला, असे माझे मत.
पापे कमी पडली म्हणायची नाही तर पाकिस्तान, सोमालिया, नायजेरिया, चाड रिप्लब्लिक, सुदान, सिरीया, म्यानमार, घाना, पॅलेस्टिन यांची दारे पण नविन जन्म घेणार्यांसाठी उघडीच होती की. गेला बाजार सौदी, येमेन, अफ्गाणिस्तान, काँगो हे देखील कमी नाहित. या देशांमध्ये बाई म्हणून जन्माला आला असतात तर नरक पण बरा वाटला असता डेन्मार्क, स्विझर्लंड, न्युझीलंड इत्यादी देशांमध्ये जन्म घेण्याएवढे पुण्य नसेल कमावले कदाचित पण वरीलपैकी एखाद्या देशात जन्म नाही घेतलात हे सुद्धा मोठे पुण्याचेच काम म्हणायचे की.
10 Aug 2016 - 6:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
तर्कशास्त्राच्या कसोटीवर उतरणारा प्रतिसाद ! मुविसाहेब, मुद्दा विचार करण्यायोग्य आहे ;)
10 Aug 2016 - 7:36 pm | अभ्या..
हा ना.
शिवाय गतजन्मी कुणा खबुत्रांना चार दाणे जास्त घातल्याबद्दल चारचौघात हे मत बोलायला मिळाले हेही नसे थोडके.
4 Aug 2016 - 12:34 pm | बाळ सप्रे
दिलेली उदाहरणे जीवनतील अनिश्चिततांची आहेत. भ्रष्टाचार नसला तरीही अनिश्चितता या रहाणारच.
त्यामुळे पूल पडणे वगैरे दुर्घटना समजून सोडून देणे याखेरीज जास्त विचार करण्याला अर्थ नाही.
(सामान्य माणसांनी.. पूलाच्या घटनेसंदर्भातील अधिकारी / अभियंते यांनी नव्हे)
आता चांगली वाईट माणसे सगळीकडेच असतात. म्हणून आपण पूल दुर्घटनेला घाबरून पुलाशी येउन थांबून राहू शकत नाही.
आता अनिश्चितता स्वीकारणे म्हणजे देवावर भरोसा म्हणजेच आस्तिकता म्हणजेच विज्ञाननिष्ठेशी प्रतारणा समजायचे काहीच कारण नाही.
4 Aug 2016 - 12:50 pm | उडन खटोला
लेख गंडलाय.
4 Aug 2016 - 1:30 pm | संदीप डांगे
ज्यांना या देशात जन्म झाला याचे वाईट वाटते, त्यांनी इतर देशातल्या (अगदी विकसित देशातल्याही) लोकल बातम्या जरा वाचायची सवय लावून घ्यावी, 'अदर साईड ऑफ ग्रास इज ग्रीनर' म्हणून कुढत बसण्यात पॉईंट नाही,
एखाद्याला जसे हवे तसे आयुष्य देण्याची क्षमता या माझ्या देशात नक्कीच आहे, "आपलीच झोळी दुबळी आहे का" हे तपासून घेऊन नंतर देशावर टीका करणे योग्य....
4 Aug 2016 - 2:01 pm | अमितदादा
सहमत। चांगल्या भौतिक सुविधा, चांगली शासन व्यवस्था, चांगली शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था ह्या सुविधा परदेशात काही एका दिवसात आलेल्या नाहीत, त्या काही शतकांच्या सिव्हिलिझशन आणि industrialization चे परिणाम आहेत. आणि इकडे social issue हे भविष्यात भयंकर रूप धारण करतील किंवा करत आहेत हे अनुभवतो आहे, पुढील पिढी मानसिक समाधानी असेल का ह्याच इकडचे तज्ञ चर्चा करत असतात. आणि भारत ज्या स्टेज मधून जात आहे त्या स्टेज मधून कित्येक देश गेले आहेत मोठं उदाहरण चीन. आपल्या हि देशाचे दिवस बदलतील पण ते बगायला आपण असू कि नाही माहित नाही.
4 Aug 2016 - 1:45 pm | आदूबाळ
तिमा, आयुष्य रँडम असतं हो. जास्त लोड घेण्यात पॉईंट नाही.
4 Aug 2016 - 1:55 pm | कंजूस
चला चारशेची निश्चिती.
4 Aug 2016 - 2:01 pm | कंजूस
माझ्या गतजन्माचं माहित नाही पण दहा शतकांपुर्वी या देशात सोन्याचा धूर निघत होता ना? आता जर्मनीत निघतो उसात निघतो तिकडे घुसताहेत/धावताहेत.जिथे आपण आहोत तिथेच काढूयाना सोन्याचा धूर.
4 Aug 2016 - 2:01 pm | ज्ञानोबाचे पैजार
तिमा उगाच जास्त विचार करु नका नाहितर डोक्याला या पेक्षा मोठा शॉट बसेल.
पैजारबुवा,
4 Aug 2016 - 5:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
अजून एक.
हे असे विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ, नास्तिक, गोब्राम्हणप्रतिपालक, धर्मपरायण असले शिक्के स्वतःवर मारुन घेउ नका. मारुन घेतले असतील तर ते ओले आहेत तो पर्यंत पुसून टाका.
असला शिक्का कपाळावर नसला की विचार करणे किंवा व्यक्त होणे, प्रश्र्णांची उत्तरे शोधणे सहज सोपे होते. मग आपण सर्वच प्रश्र्णांची उत्त्तरे आपल्याच डबक्यात शोधत बसत नाही. एखाद्या प्रश्र्णाचे विज्ञानाला उत्तर देता आले नाही तर ते दुसरीकडे शोधण्याचा मोकळे पणा असायलाच हवा.
उत्तर मिळणे महत्वाचे, कसे मिळाले याला फारसे महत्व देउ नये. असे मला वाटते.
विज्ञानानेच / अध्यात्मानेच सगळ्या प्रश्र्णांची उत्तरे द्यायला पाहिजे असा हट्ट कदापी नसावा. याने भ्रमनिरासाशिवाय दुसरे काही पदरात पडत नाही.
पाणी नेहमी वहाते असावे नाहीतर मग ते तुंबते आणी त्याला वास यायला लागतो.
पैजारबुवा,
4 Aug 2016 - 9:37 pm | सतिश गावडे
प्रतिसाद प्रचंड आवडला.
5 Aug 2016 - 6:23 am | अनिरुद्ध.वैद्य
आवडेश!
4 Aug 2016 - 2:07 pm | नाखु
मोठ्या (आणी जाणत्या) लोकांच्या मांदीयाळीत "वाचकाला विचारतो कोण?" या न्यायाने गप्प आहे.
मिपाकर वारकरी नाखु
4 Aug 2016 - 6:58 pm | कपिलमुनी
तुम्हाला या देशात जन्म घेणे पाप वाटते का?
एवढच सांगा [ आणि कळपात या , किती दिवस कुंपणावर ? =)) ]
5 Aug 2016 - 8:44 am | नाखु
मला माणसाने जन्माला येणेच पाप वाटू लागले आहे....
तोच नसता तर मिपाकाथ्याकुट चावणे,मिपाकवीता पचवणे आणि मिपासाहीत्य चघळणे नशीबी आले नस्ते. पण असे मत दिल्यावर मी धर्मसंस्कृती रक्षकांना पाखंडी/धर्मभ्र्ष्ट तर कट्टर नास्तीकांना (नशीब आणि पुण्य शब्दाने) अगदी देवभोळा,आणि कर्मकांडी असल्याची ठाम समजूत होते.
अता ही दोन्ही धॄवावरची माणसे आपलीच (मिपाकर)आहेत म्हणून कुंप्णावरून भींतीवर जायचा विचार करतोय्,पण अभ्या भिंतीवच्यांना ढकलून देतो त्यामुळे दुसरा ऊपाय शोधावा.
पुन्हा वाचकांचीच पत्रेवाला नाखु
5 Aug 2016 - 8:52 am | मुक्त विहारि
+ १
माणसाचा पाय ह्या पृथ्वीवर पडला आणि पृथ्वीची वाट लागायला सुरुवात झाली.
निसर्गाशी सगळ्यात बेईमानपणे वागणारा, सगळ्यात खतरनाक प्राणी म्हणजे माणूस.
4 Aug 2016 - 2:19 pm | जाबाली
यथा धेनुसहस्त्रेषु वत्सो विन्दति मातरम् |
तथा पूर्वकॄतं कर्म कर्तारमनुगच्छति ||
विज्ञाननिष्ठ राहणे कठीण आहेच. मनुष्य प्राण्याचा स्वतःवर ताबा नाही. केस वाढवणे थांबवू शकत नाही, वृद्ध होणे थांबवू शकत नाही आणि ईतरसुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. आज काल आपल्या पूर्वजांच्या विचारांना झुगारून देण्याची फॅशन आली आहे. आपण कर्म करीत राहावे आणि शेवटी कृष्णार्पणमस्तु... असेच होते !
4 Aug 2016 - 2:36 pm | गवि
मागला जन्म आणि पापपुण्य या कल्पना सत्य आहेत असं क्षणभर मानून आणि आपल्या देशातल्या सर्व परिस्थितींचा पूर्ण विचार करुन आणि जे काही आठदहा भारताहून प्रगत आणि कमी प्रगत मानले जाणारे इतर देश थोडक्यात का होईना पण पाहिले त्या सॅम्पलवरुन (अनेक देश फार आवडूनही) सर्व जन्मांचं उत्तमात उत्तम फळ म्हणूनच भारतात जन्म मिळाला असं म्हणावंसं वाटतं. काळासोबत हे मत अधिकाधिक पक्कं होत गेलं आहे.
4 Aug 2016 - 2:46 pm | यशोधरा
जे ब्बात!
4 Aug 2016 - 2:50 pm | उडन खटोला
तालियाँ.
.. संपादित
व्यक्तिगत टिपणी टाळावी.
..........
व्यवस्थेला निव्वळ नावं ठेवण्यापेक्षा व्यवस्थेमध्ये उतरून सुधार करावा.
4 Aug 2016 - 3:20 pm | मुक्त विहारि
....व्यवस्थेमध्ये उतरून सुधार करावा."
आपण बहूदा असे करायचा प्रयत्न केला असावा किंवा करणार असाल.
मी प्रयत्न केला.अपयश आले आणि माघार घेतली.
तितका वेळ आणि पैसा आणि श्रम माझ्याकडे नाहीत.
5 Aug 2016 - 6:24 am | अनिरुद्ध.वैद्य
व्यवस्था चालकांना हेही जमत नाही का?
4 Aug 2016 - 3:17 pm | मुक्त विहारि
पण....
जी जी शहरे मी दर १०-१२ वर्षांनी पाहतो, ती ती शहरे (मग ते डोंबोली असो, की बदलापूर किंवा ठाणे किंवा कल्याण, विदर्भातल्या वर्धा, नागपूर, इथलीही परिस्थिती काही वेगळी नाही.) दिवसेंदिवस अधिकाधिक बकाल झालेलीच आणि सामाजिक सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेलीच दिसतात.
कदाचित आमच्या नजरेचा दोष असेल.
4 Aug 2016 - 3:58 pm | शलभ
+१०००००
4 Aug 2016 - 6:35 pm | सुमीत भातखंडे
एकदम मनातलं बोललात. हजार वेळा सहमत.
(पुण्यवान) सुमीत भातखंडे
5 Aug 2016 - 12:54 am | लाल टोपी
गविंशी शतशः सहमत.
5 Aug 2016 - 1:29 am | आजानुकर्ण
उत्तम प्रतिसाद गवि! भारत आणि अमेरिका या दोन देशांत वास्तव्यानंतर सर्व जन्मांचं उत्तमात उत्तम फळ म्हणूनच भारतात जन्म मिळाला असंच मलाही म्हणावंसं वाटतं. काळासोबत हे मत अधिकाधिक पक्कं होत गेलं आहे. गेल्या साठ वर्षात भारताची चांगली प्रगती झाली आहे. उत्तरोत्तरही प्रगतीच होणार आहे असा मला विश्वास वाटतो.
7 Aug 2016 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गविंच्या मताशी सहमत. बराय भारतात मी आणि सूखी आहे.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2016 - 3:29 pm | मोहनराव
कोणताही देश परफेक्ट कधीच नसतो. त्याला परफेक्ट बनवावं लागतं.
सगळंच काही राजकारण्यांवर सोपवुन शिव्या देत बसण्यात काही अर्थ नसतो. नाम सारख्या लोकसहभागातुन साकारलेल्या संस्थांनी हे दाखवुन दिले आहे.
5 Aug 2016 - 8:20 pm | अभिजित - १
नाम बीम या सगळ्या राजकारणी लोकांच्या दृष्टीतून "निरुपद्रवी" संस्था आहेत. त्याच्यातून बाकी काहीही सध्या होणार नाहीए. व्यवस्थेत काहीही बदल होणार नाहीएत हे सत्य आहे.
जर का व्यवस्थेत बदल करायचा , अगदी व्यवस्थे विरुद्ध एखादा प्रश्न विचारायचा प्रयत्न जरी केलात ना तर इथे भारतात तुमचा सतीश शेट्टी ( भ्रष्टवादी च्या राज्यात ) / सत्येंद्र दुबे ( भाजपच्या राज्यात ) होतो. अशी शेकडो उदाहरणे इथे भारतात मिळतील.
अमेरिकेत असे होत नाही. फक्त माफिया ला नादाला तर शक्यता आहे .. नाहीतर बहुतेक वेळा नाहीच.
फॉक्स वॅगन चा झोल शोधला गेला. इथे असा कोणी शोधायला गेला असता तर कधीच वर पोचला असता.
4 Aug 2016 - 3:32 pm | आनंदी गोपाळ
मागच्या जन्मी मुविंनी वेडीवाकडी पापे केलीत.
या जन्मात सरळ पापं करा ;) नेक्ष्ट जन्म वेगळ्या देशात मिळेल
4 Aug 2016 - 3:58 pm | अभ्या..
हीहीहीही.
सरळ पापाने वेगळ्या देशात म्हण्जे उदाहरणार्थ?
4 Aug 2016 - 4:18 pm | मुक्त विहारि
होना...
एक साधे चालणे पण ह्या देशांत स्वस्थपणे उपभोगू देत नाहीत.
एका देशात, मी कधी सलग ५-६ किमी चालत असतांना ना फूटपाथ मध्ये खड्डा आला ना कुणी हॉर्न वाजवला ना फेरीवाले आडवे आले.
असो,
प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या.
तसेच, वैयक्तिक आणि सामाजिक जाणीवेच्या कल्पना पण वेगळ्या-वेगळ्या.
एखाद्याला हॉस्पीटलच्या खाली सुरु असलेला बँड म्हणजे आनंद वाटत असेल, (आमचा सण आहे, आम्ही वाजवणारच, हे उत्तर ऐकलेले आहे.) तर दुसर्याला त्या हॉस्पीटल मधल्या रोग्यांविषयी कणव वाटत असेल.
4 Aug 2016 - 3:46 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
इंजिनिअर कोणत्या कोट्यातून आला त्यावर पुलाचे भविश्य ठरते हे लॉजिक पटले नाही.आणि आजकाल खाऊजा धोरणामुळे pwd ला काही काम नसते .सगळे पुल ,सार्वजनिक बांधकामं खाजगी कंपण्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन बांधली जातात,अश्या कंपण्यात ' जात्यात हुशारचा ' टेंभा मिरवणारेच अधिक आहेत हेवेसांनल.परवा जो पुल पडला तो १९२८ साली बांधला होता व त्यावरचे विंजेनिअर त्याकाळानुसार 'जात्याच हुशार' कॅटेगरीतले होते.
4 Aug 2016 - 3:54 pm | बाळ सप्रे
पुलाचे भविष्य ठरवायला इंजिनिअरची कॅटॅगरी काढायची गरज नाही हे पटले. पण हे सांगताना १९२८ सालच्या इंजिनिअरची कॅटॅगरी काढणेदेखिल तितकेच हास्यास्पद.
बादवे १९२८ सालच्या ईंजिनिअरने आपले काम चोख केले आहे. आजच्या स्ट्रक्चरल ऑडीट करून या पुलाला पास करणार्याबद्दल विधान असते तर एकवेळ समजू शकतो.
4 Aug 2016 - 4:57 pm | चंपाबाई
आणि हा कोटा फक्त जात आरक्षणाचाच बरं का ! पेमेंट आरक्षणावर टीका नै करायची.
5 Aug 2016 - 6:26 am | अनिरुद्ध.वैद्य
त्येंनी पत्र पाठवले होते म्हणे. यंद्याच्या हुशार लोकांनी फेकून दिले त्याला.
4 Aug 2016 - 4:55 pm | पैसा
काय झालं तिमा? निराश होण्यासारखं काही तात्कालिक घडलंय का? तुम्ही निराश वाटताय. तुम्हालाच यातून बाहेर यावे लागेल. मध्यंतरी अशा काही दुर्दैवी घटना एकामागून एक कानावर आल्या की रोज सकाळी आपण उठून श्वास घेतो आणि उद्याचा विचार करतो हाच मोठा चमत्कार वाटायला लागला. खरंच माणूस म्हणून जन्माला येणं हे मोठं नशीबच म्हटलं पाहिजे. मग ते मिळालेलं किंवा घडलं/बिघडलेलं आयुष्य बरंवाईट कसंही असो. त्याचा विज्ञाननिष्ठ असण्या नसण्याशी काही संबंध नाही. आपण मेलो की श्वासाबरोबर सगळंच संपणार आहे. तेव्हा आपल्यासाठी देव नशीब आणि ज्ञान विज्ञानासकट सगळंच संपलेलं असेल. नका जास्त विचार करू. आला तो दिवसच काय क्षण सुद्धा आपला म्हणायचा. उद्या कोणी बघितलाय?
4 Aug 2016 - 5:16 pm | मुक्त विहारि
तिमांचा मुद्दा फार वेगळा आहे.
इतरांनी केलेल्या चुकीसाठी, सामान्य माणसाने आपले आयुष्य पणाला का लावावे? आणि त्या चुकी साठी हे असे बळी का जावेत?
4 Aug 2016 - 5:24 pm | पैसा
चूक कोणाची कसे ठरवणार? आपण सगळेच त्या सिस्टीमचा भाग आहोत. दुसर्याकडे बोट दाखवून मोकळे होता येत नाही. आणि खरंच सांगा, आपण माणूस म्हणून जन्मलो नसतो तर हे सगळे असेच वाटले असते का? तुम्ही विज्ञाननिष्ठ रहा की पोथीनिष्ठ, पुढच्या क्षणी आपण जिवंत असू अशी काय गॅरेंटी आहे? तरी आपण उद्या सकाळी उठून काय करणार याचा विचार करतोच ना!
4 Aug 2016 - 5:48 pm | मुक्त विहारि
असे नसते हो.
साधारणतः प्रत्येक आस्थापनांत, अपघातांची पुनरावृत्ती परत घडू नये म्हणून प्रयत्न केले जातात.
त्यासाठी योग्य ती उपाय=योजना पण केली जाते.
एखाद्या व्यक्तीचे नैसर्गिक मरण वेगळे आणि एखाद्या गटाचे सामुहिक अपघातात मरण ओढवणे वेगळे.
हलगर्जी पणामुळे घरी असतांना गॅसच्या सिलिंडरचा स्फोट होवून अपघात होणे आणि हलगर्जी पणामुळे एखाद्या हॉटेलमधील गॅसचा स्फोट होवून अपघात होणे वेगळे.
काही आस्थापनात काही वर्षे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काम केलेले असल्याने, भारतात सामाजीक सुरक्षेला अद्यापही म्हणावे तसे स्थान नाही, हे खेदपुर्वक म्हणावे लागते.
-------
"आपण माणूस म्हणून जन्मलो नसतो तर हे सगळे असेच वाटले असते का?"
कधी-कधी वाटते की, ह्या जगांत माणूस जितका स्वार्थी, तितका कुणीही स्वार्थी नाही.त्यामुळे इतर कुठल्याही प्राण्यांच्या रुपात जन्मलो असतो तरी, बहूदा माणसांच्या बाबत असेच मत आज तरी झाले असते.
घरातील पाळीव प्राणी पण ह्या ना त्या रुपात त्यांना दिलेल्या अन्नाची परतफेड करत असतात, पण मनुष्य प्राणी मात्र, जिथे खाईल तिथेच घाण करेल.
4 Aug 2016 - 7:01 pm | कपिलमुनी
सहमत ! बहुधा जास्त लोकसंख्या असल्याने ( अपघातात) माणूस मरणे ही घटना सामाजिकरीत्या संवेदनशील राहिली नाही.
4 Aug 2016 - 6:37 pm | तिमा
मी निराश वगैरे अजिबात झालो नाहीये. या देशांत जन्म घेतल्याचा मला आनंद आणि अभिमानच आहे. आपल्या देशावर प्रेम आहे म्हणूनच महाड सारख्या घटना घडल्या की दु:ख होते. वरवर पहाता ती नैसर्गिक आपत्ती वाटली तरी त्यामागे आपल्या सडलेल्या सिस्टिमचाही सहभाग आहेच. जे आज एकमेकांवर दोषारोप करत आहेत, त्यांना जर आधी त्या पूलाची माहिती होती तर दोन वर्षे स्वस्थ का बसले ? गेलेल्यांविषयी कुणालाच दु:ख नाही, उलट त्यातून राजकीय कुरघोडी सुरु झाल्यात. मी फक्त राजकारण्यांना दोष देत नाही. या देशातल्या प्रत्येक माणसाला, 'मी करीन ते प्रत्येक काम परफेक्ट करीन' असे वाटेल तो सुदिन.
बाकी या निमित्ताने ज्या प्रतिक्रिया आल्या व येत रहातील त्या सर्वांचे आभार.
4 Aug 2016 - 6:52 pm | मुक्त विहारि
'मी करीन ते प्रत्येक काम परफेक्ट करीन' असे वाटेल तो सुदिन....
असे होणे शक्य नाही.
ह्या देशात बर्याच व्यक्ती घरात व्यवस्थित असतात, पण घराबाहेर पडल्या, की मग बेशिस्त होतात.
आमचे एक बुजुर्ग म्हणायचे ,"शिस्तबद्ध लोकांचा बेशिस्त देश, म्हणजे भारत." सध्या ते इंग्लंडला असतात.
"वरवर पहाता ती नैसर्गिक आपत्ती वाटली तरी त्यामागे आपल्या सडलेल्या सिस्टिमचाही सहभाग आहेच.जे आज एकमेकांवर दोषारोप करत आहेत, त्यांना जर आधी त्या पूलाची माहिती होती तर दोन वर्षे स्वस्थ का बसले ? गेलेल्यांविषयी कुणालाच दु:ख नाही, उलट त्यातून राजकीय कुरघोडी सुरु झाल्यात."
ते तर फार पुर्वी पासून सुरु आहे.अगदी १०००-१२०० वर्षां पासून हीच स्थिती आहे.अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून.पण निदान त्यावेळी चाणक्य तरी होता, आता चुकुन एखादा चाणक्य झाला तर त्याला पण कुठल्या तरी लफड्यात अडकवतील.
म्हणूनच म्हणालो की, हा देश अधोगतीच्या मार्गावर आहे आणि आता प्रगतीचा मार्ग ही फार दूर आहे.
4 Aug 2016 - 5:34 pm | स्पा
न्यूझीलंड ला जॉब मिळायला हवा
आवडता देश, जगापासून दूर असतो
4 Aug 2016 - 5:49 pm | मुक्त विहारि
आमच्या ओळखीतले एक जण तिथेच आहेत.
त्यांचे पण हेच म्हणणे आहे.
4 Aug 2016 - 5:59 pm | प्रसाद गोडबोले
मी अत्ता असाच विचार करत होतो ,
रेजविक, आईसलॅन्ड येथे जॉब मिळायला हवा
आवडता देश, जगापासून दूर असतो
:)
4 Aug 2016 - 6:11 pm | आदूबाळ
तिथे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. बघा बॉ.
4 Aug 2016 - 6:18 pm | प्रसाद गोडबोले
मला अॅक्चुअली तसे आवडेल :)
शिवाय नॉरदन अटलान्टिक उष्ण प्रवाहामुळे वातावरण कायम उबदार असते म्हणे.
जसे अलास्का , नॉर्वे वगैरेत कच्या काई निगेटीव्ह २०, ३० ४० असते तसला काही प्रकार इथे होत नाही म्हणे !
शिवाय लोकसंख्या केवळ साडेतीन लाख आहे म्हणजे आमच्या सातार्यापेक्षा कमी !! हे म्हणजे बेस्टच की हो !!
4 Aug 2016 - 6:29 pm | आदूबाळ
बघा, सीरियसली विचार करत असाल तर सांगा. माझी एक मैत्रीण आईसलँडिक आहे - रेकयेविकच्या जवळ त्यांच्या कुटुंबाचा घोड्याचा तबेला आहे.
4 Aug 2016 - 7:46 pm | प्रसाद गोडबोले
बेस्टच की !
तुम्हाला सविस्तर व्यनि करतोय ;)
बाकी घोड्यांच्या तबेल्याचा रेफरन्स कळाला नाही , आम्ही आपले ब्यंकर आहोत , एक्सेल वर्ड मधे कागदी घोडे नाचवणारे !!
4 Aug 2016 - 7:57 pm | अस्वस्थामा
हा हा हा..
लय भारी ..!!
"मार्कुस घोड्यांच्या तबेल्यात घोड्यांना खरारा करताना आणि लाल केसांची एक (टंच, मादक इ.इ.) तरुणी तबेल्याच्या दारातून नेत्रपल्लवी करताना ... " असं दृश्य समोर आलं राव.
(स्वगत : आदूबाळच्या जबरा वळखी दिसत्यात ब्वॉ. मालक लक्ष असू द्या. ;) )
4 Aug 2016 - 8:15 pm | प्रसाद गोडबोले
लाल केस , अरेरे , रेकयेविक मध्ये जाऊन लाल केसांचे काय कौतुक ? आम्ही प्लॅटीनम ब्लाँड केसांची स्वप्ने पहात आहोत ;)
4 Aug 2016 - 8:46 pm | आदूबाळ
मला माहीतए तुम्ही कोण आहात. :) आईसलँडच्या बँकांच्या लफड्यानंतर आता तिथे एक्सेलीय घोडे नाचवण्यासारखं काही उरलेलं नाही.
प्लॅटिनम ब्लाँड केसांची आकांक्षा पूर्ण होईल. आईसलँडिक लोकं व्हायकिंग लोकांचे वंशज आहेत. त्यांनी आपल्या स्वार्यांत सगळ्या सुंदर सुंदर तरूणी पळवून नेल्या अशी एक ऐतिहासिक बोलवा आहे ;)
4 Aug 2016 - 6:00 pm | जयन्त बा शिम्पि
अगोदर " विज्ञाननिष्ठ " रहाणे याची व्याख्या तर स्पष्ट करावयास हवी. मी कोणतेही औषध घेतो, त्यावेळी ते औषध कशा पध्दतीने बनविले आहे ? त्यात कोणकोणते घटक मिसळलेले आहेत ? त्याचा माझ्या शरीरावर नेमका परिणाम कसा होणार आहे ? मी आजारातून बरा होणार की माझे काहीतरी " बरें वाईट " होणार ? ज्याने औषध बनविले,ज्याने लिहून दिले,ज्याने विकत दिले , त्या सर्वांचीच पात्रता मी तपासतो कां ? माझा त्यावेळी उद्देश असतो की मी आजारातून लवकरात लवकर मुक्त व्हावे. बरं, एका डॉक्टरचा गुण आला नाही, तर मी लगेच दुसर्या डॉक्टरकडे जातो, त्यावेळी त्याही डॉक्टर ची गुणवत्ता अगोदर तपासतो कां ? नाही ना ? म्हणजे प्रत्येक घटनेमागे अशी विज्ञाननिष्ठा लावत गेलो तर जगणे कठीण होईल, असे नाही कां वाटत ? त्या साठी अगदी देश वा शहर बदलावयाचे, इतक्या टोकाला जाण्याची गरज काय ? याबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेला विचार मला अधिकच आश्वस्त करतो, त्यांनी लिहून ठेवले आहे की " वाईटात वाईट काय घडेल, त्याचा विचार करुन , प्रत्येक पाऊल टाकावे. इंग्रज सरकार जास्तीत जास्त काय करील , मला फाशी देईल, यापेक्षा अधिक काय करु शकेल ? " याचा अर्थ मी घरातून बाहेर पडतांना, म्रुत्युपत्रच खिशात ठेवून बाहेर पडावे असेही नाही. थोडं तारतम्यानं जगायला शिका, अगदीच निराशा पदरी बाळगणे बरं नव्हे.
4 Aug 2016 - 6:20 pm | हेमन्त वाघे
https://en.wikipedia.org/wiki/List_of_school_shootings_in_the_United_States
4 Aug 2016 - 6:35 pm | मुक्त विहारि
https://www.youtube.com/watch?v=kwY2iWBYYT0
https://www.youtube.com/watch?v=T1WbCBVGCHg
https://www.youtube.com/watch?v=jmJt9CtaWaU&spfreload=10
https://www.youtube.com/watch?v=Y8O_t5_mfLQ
https://www.youtube.com/watch?v=Ob-zIOJz3A0
https://www.youtube.com/watch?v=o-3K7TtECZQ
https://www.youtube.com/watch?v=UuO61eJ-NJM
जमल्यास ह्या गणपती उत्सवाच्या वेळी डोंबिवलीत या.
आणि ध्वनी प्रदूषणाचा मस्त आनंद घ्या.
मी नसेन. कारण ते १०-१२ दिवस आणि नवरात्र मी डोंबिवलीच्या बाहेर असतो.
4 Aug 2016 - 6:36 pm | लालगरूड
¥}÷¤\♥£¤£》£♡€¡▼☆▼☆:-(▪▪☆▼:'(▲☆▼:'(▶☆▼♣▲:-(▶▼▼:-(▼☆☆▼☆▼:O•◆▼☆▼☆▼:O▼:-(•★▶:'(:'(•:-(▼→▪☆▶☆▶:-(▼☆▼☆▶:O▶:'(▶☆▶☆▶☆▼:-(▶☆▼☆▼:'(▼☆:-)☆▶:'(▶☆○☆:-):'(◀:O→;-)♧○→▶:'(:-):O▶♧•←:-):'(▪:O▼♧▶:'(:-):'(▶:O▶☆▼:-(:-):-)☆▶:O•♧▶→:-):-(▶☆▶★•→◇◀:-):'(:-):'(:O▼•♧◀♧:-):'(▼☆•♣◀□▼♧°♣○:'(:-)☆▶♣▼:'(▶:'(:-)☆▶♧•→▶:-(:-)→▼☆•★
8 Aug 2016 - 10:18 pm | साती
:'(:-):'(▶:O▶☆▼:-(:-):-)☆▶:O•♧▶→:-):-(▶☆▶★•→◇◀:-):'(:-):'(:O▼•♧◀♧:-):'(▼☆•♣◀□▼♧°♣○:'(:-)☆▶♣▼:'(▶:'(:-)☆>>>
अगदी बरोबर.
१०० टक्के सहमत आहे!
10 Aug 2016 - 10:11 am | उडन खटोला
काय सांगताय????
4 Aug 2016 - 7:08 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
धाग्याच्या आशयाशी आणि मुविंच्या प्रतिसांदाशी सहमत आहेत.
त्याचं असं आहे, माझं पण माझ्या देशावर प्रेम आहे,याचा अर्थ असा नाही कि देशाबद्दल काही नकारात्मक बोलायचचं नाही.
1) अन्न - सर्वांना मिळत नाही,कुठे सडून नष्ट होते तर कुठे लोक कुपोषित होतात.
2) वस्त्र - अनेक अर्धनग्न लोक्स भीक मागताना इकडेतिकडे/सार्वजनिक ठिकाणी पाहिले आहेत.तर काहीजण 10 लाखाचा कोट घालतात.
3)निवारा - बरेचजण बेघर आहेत,तर काहीजणांची एकापेक्षा अधिक घरे असतात.
तर अशी सगळी विषमता पसरली आहे.
या देशात माणसाला किंमत नाही,इतर प्रगत देशांत माणसाला किंमत आहे,तिथे कामगार सुद्धा कामावर कार घेवून येतात आणि इकडे मालक लोन काढून कार घेतो.
4 Aug 2016 - 10:44 pm | संदीप डांगे
विषमतेच्या तीनही मुद्द्यांबद्दल सर्वच देशात समानता आहे, वेळ मिळाला की अधिक लिहितो,
बाकी सर्वांना,
अजून मुद्दे येऊ द्यात...सविस्तर समाचार घेईन म्हणतो ☺
4 Aug 2016 - 7:57 pm | विवेकपटाईत
दिल्लीत सलूनमध्ये ३०० रुपये देऊन केस कर्तन करणारे अमेरिकेत स्वत:चे केस स्वत: कापतात. खिश्यात डॉलर नसेल तर गुंड लोक तुम्हाला गोळी घालू शकतात. गोळ्या तर कुणीही कुठे हि चालवू शकतो. शिवाय इराक, सिरीया यमन कदाचित पाताळलोकातून हि भारतीय लोकांना हाकलले तर शेवटी या मायभूमीतच याचे लागेल. पाळणार्या लोकांना सतत पाळावेच लागते.
4 Aug 2016 - 8:06 pm | कंजूस
घोड्यांचा तबेला ( त्याला इकडचे घोड्याची फॅक्टरी म्हणतात)डोंबिवलीतही आहे.
4 Aug 2016 - 8:12 pm | जयन्त बा शिम्पि
न्यु जर्सी मधील आजचा कटिंग चा दर १५ डॉलर्स म्हणजे ९०० रुपयांच्या आसपास आहे , आता बोला ?
4 Aug 2016 - 8:21 pm | उडन खटोला
अजुन शतक नाही?
आमच्या वेळचे मिपा राहिले नाही हेच खरे.
4 Aug 2016 - 8:31 pm | माम्लेदारचा पन्खा
आज या निमित्ताने निवासी अभारतीय पाहिले... धन्य हो प्रभू !
4 Aug 2016 - 10:34 pm | खटपट्या
चांगली चर्चा...
4 Aug 2016 - 11:33 pm | शाम भागवत
जगदंब
5 Aug 2016 - 5:07 am | राजेश घासकडवी
लेखनातली कळकळ आणि आसपास दिसणाऱ्या अव्यवस्थेमुळे होणारी अगतिकता भिडते. मात्र मला विज्ञाननिष्ठ या शब्दाबद्दल थोडंसं कोडं आहे. मला जो अर्थ माहीत आहे त्यानुसार विज्ञाननिष्ठ म्हणजे आसपासच्या घटनांचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अर्थ लावतो आणि भावनांऐवजी तर्कावर आधारलेले निर्णय घेतो असा. हा लेख तर्कापेक्षा भावनेवर आधारलेला दिसतो. याचं कारण खालीलप्रमाणे.
'आसपास दुरवस्था आहे आणि त्यामुळे माझं जीवन धोक्यात आहे' हे विधान सत्य आहे, मात्र या धोक्याचा अंदाज घेणं, आणि आपल्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता किती आहे याची मोजमाप करण्याची प्रवृत्ती लेखात दिसली नाही. तो प्रयत्न केला असता तर असं लक्षात येईल की आपल्याला वाटणाऱ्या अनेक प्रकारच्या भीती या गरजेपेक्षा जास्त फुगलेल्या असतात, तर काही प्रचंड धोकादायक गोष्टी आपण बिनधास्त करतो.
उदाहरणार्थ - पूल पडून किंवा बांधकाम पडून होणारे मृत्यू किती? अचूक आकडेवारी माझ्याकडे नाही. पण सदृढ पुलावर कारच्या अॅक्सिडेंटमध्ये मरणारांचं प्रमाण यापेक्षा कितीतरी जास्त आहे. अमेरिकेत साधारणपणे दहा लाख प्रवासांमागे एक मनुष्य मरतो. भारतातही हा आकडा साधारण याच आसपास असावा. पुलांवरून रोज कोट्यवधी माणसं जातात. मात्र पूल पडल्याची बातमी होते. रोजमर्रा शेकडो माणसं अपघातात मेल्याची बातमी होत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळा प्रवास करण्यासाठी कारमध्ये किंवा बसमध्ये बसताना भीती वाटत नाही.
विज्ञाननिष्ठ राहून जगणं कठीण ऐवजी तुम्हाला नियतीवादी असल्याशिवाय जगणं कठीण असं म्हणायचं आहे का? पण तेही पटत नाही, कारण गेली कित्येक दशकं माणसाचं जीवन नियतीवर कमी कमी आधारित होत गेलेलं आहे. पेशव्यांकडे त्याकाळच्या सर्वोत्तम सुविधा होत्या, पण त्यांचा मृत्यू २९ व्या वर्षी टीबीने झाला. आज सामान्य माणूस आपला टीबी बरा करून घेऊ शकतो.
काही वेळा डोळ्यासमोर घडणाऱ्या प्रसंगांमुळे उद्विग्न व्हायला होतं हे खरं आहे. मात्र जग प्रचंड सुधारलं आहे यात समाधान मानण्यासाठी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन खरं तर खूप उपयोगी पडतो.
5 Aug 2016 - 6:08 am | नगरीनिरंजन
प्रत्येकवेळी न पाहिलेल्या भूतकाळाशी तुलना करुन बळंच आनंदी राहणे हीसुद्धा विज्ञाननिष्ठता नाही. तेव्हा माणसे पटापटा मरायची म्हणून जिवंत असलेल्यांना किंमत होती.
तेव्हाच्या टीबी न झालेल्या माणसाची आनंदाची पातळी आणि आजच्या टीबी न झालेल्या माणसाची आनंदाची पातळी यात काही फार फरक नसावा. पण आजच्या माणसाचं विविध गोष्टींवरचे अवलंबित्व बघता हतबलतेची भावना येणे स्वाभाविक आहे.
6 Aug 2016 - 3:57 pm | राजेश घासकडवी
भूतकाळ कसा होता याचा विचार केल्याशिवाय सध्याची परिस्थिती बघितली तर 'परिस्थिती बिघडत चाललेली आहे' अशी उद्विग्नता येणं सहज शक्य आहे. पण जवळपास प्रत्येक बाबतीत गेली काही दशकं-शतकं परिस्थिती सुधारते आहे हे समजून घेतलं तर ती उद्विग्नता कमी होऊ शकते.
यावर विश्वास बसणं कठीण आहे. शंभरेक वर्षांपूर्वी
- किमान साठ-सत्तर टक्के लोक अतीव दारिद्र्यात खितपत होते.
- दलित आणि अस्पृश्य लोकांना शिवाशीव विटाळ यापायी पाणी मिळण्याचीही ददात होती.
- जवळपास प्रत्येक दांपत्याने आपल्या एक किंवा दोन मुलांना पाच-दहा वर्षांच्या आत अग्नि दिलेला होता.
- टीबीपलिकडे अनेक रोगांच्या साथी लाखो-कोट्यवधी लोक मारून जात. देवीचे व्रण, पोलियोची अपंगता आणि कुष्ठरोग घेऊन अनेक लोक वावरत होते.
- सरंजामशाही आणि वसाहतवादाने आख्खं जग ग्रासलेलं होतं. लोकशाहीचा नामोनिशाणाच फक्त होता.
- शिक्षण मोजक्याच लोकांना उपलब्ध होतं.
ही यादी अजून वाढवता येईल. माझा मुद्दा असा आहे की सुधारणा होत आहेत. अजून बरंच अंतर जाणं शिल्लक आहे. पण सुधारणा चालू आहेत हे ध्यानात घेतलं तर उद्विग्नता कमी होऊन आशावादाला जागा निर्माण होईल.
7 Aug 2016 - 12:01 pm | शाम भागवत
जे मिळालयं ते पचून जाते व विसरायला होते.
जे मिळालेले नाही त्याची मात्र सदैव उजळणी होते.
माणसाच्या प्रगतीला हे जरी हे आवश्यक असले तरी..
कित्येक वेळेस ही उजळणी नैराश्य वाढवते.
आणि तिथेच स्वत:ला सांभाळायचे असते.
असो.
8 Aug 2016 - 5:24 am | नगरीनिरंजन
उद्विग्नता ही देखील मानवी भावना आहे आणि हळूहळू सुधारणा होत असल्यातरी आपल्या हयातीत आपल्याला हवे तसे आयुष्य जगायला मिळणार नाही म्हणून उद्विग्नता येते आणि ते पूर्णतः स्वीकारार्ह आहे. साठ-सत्तर वर्षांपूर्वी साठ-सत्तरटक्के लोक दारिद्र्यात खितपत होते असे म्हटल्याने मला त्या दारिद्र्यातून सुटल्याचा प्रत्यक्ष आनंद थोडीच मिळणार आहे? उलट आत्ता ह्या क्षणी युरोपात लोक कसे जगतात हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
मुळात समकालीन सोडून भूतकाळातल्या लोकांशी तुलना का करावी? आत्ता जर्मनीत राहणार्या माणसांशी तुलना का करायची नाही? तिमांनी उद्विग्नता मांडली म्हणजे त्यांच्या इतर सगळ्या भावना करपल्या असे नाही. किंवा आता विज्ञान सोडून ते देवदेव करायला लागणार असेही नाही. भारतात विकसित देशांच्या तुलनेत उद्विग्नता येण्यासारखी परिस्थिती आहे. पूर्वी काय होतं आणि भविष्यात काय होणार त्याने वर्तमान बदलत नाही. आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत अब्जावधी लोक आहेत हे माहित असूनही उद्विग्नता येते आणि ते नॉर्मल आहे.
8 Aug 2016 - 8:36 am | संदीप डांगे
अर्धा ग्लास कसा बघितला जातो त्यावर अवलंबून आहे, चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या देशात असतात, प्रत्येकाचे प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचे असतात , आज अमेरिकेचं कौतुक वाटत असला तरी २००८-२०१२ पर्यन्त तिकडे नोकऱ्यांची भयंकर परिस्थिती होती, असं प्रत्येक देशाचं काहीतरी असतंच,
कोणत्याही काळात निव्वळ चांगले किंवा निव्वळ वाईट घडत नसते, परस्पर दोन्ही सुरूच असते,
8 Aug 2016 - 10:52 am | नगरीनिरंजन
अगदी बरोबर. शिवाय एकाला जे चांगले वाटेल ते दुसऱयाला चांगले वाटेल असे नाही.
5 Aug 2016 - 10:45 am | उडन खटोला
>>>पूल पडून किंवा बांधकाम पडून होणारे मृत्यू किती? अचूक आकडेवारी माझ्याकडे नाही.
असं नाही बाबा करायचं. बनवता की आकडेवारी तुम्ही. मस्त आलेख वगैरे काढता रंगीत. करा ना गडे. ;)
१.सर्वसामान्य लोकांच्या बेजबाबदारपणामुळे होणारे अपघात
२. सर्वसामान्यांमधल्या काही ठराविक लोकांमुळे होणारे बलात्कार आणि मृत्यू,
३. सर्वसामान्यांमध्ये होणाऱ्या भ्रूण हत्या
४. सर्वसामान्यांमध्ये दिसणारं व्यसनाधीन व नंतर दीन होण्याचं प्रमाण
५. बेशिस्त वागणं, चोऱ्या
या सगळ्याला नक्की कोण जबाबदार आहे? पुलाचं ऑडिट करुन त्याला वापरास योग्य असा शेरा देणारा माणूस सरकारी आहे म्हणून आपण सरसकट श्या देतो (द्यायला पाहिजेतच) पण त्याबरोबर असंच मरणारे लोक अनेकानेक आहेत. त्यांचं काय?
5 Aug 2016 - 5:33 am | कंजूस
केस कापण्याच्या बाबतीत काय विज्ञाननिष्टता आहे?
5 Aug 2016 - 8:35 am | राही
अवांतर
धाग्याच्या मजकुरापासून थोडे दूर जाऊन, पण काही प्रतिसादांमध्ये दिसलेल्या देशान्तर म्हणजे देशद्रोह किंवा 'छे छे' (नो नो) गोष्ट, या मुद्द्यावर लिहावेसे वाटते. चांगल्या (इथे 'चांगले' म्हणजे काय, यावर मतान्तर होऊ शकते.) भविष्याची हमी देणार्या ठिकाणी स्थलान्तर ही खरेच जन्मभूमीशी प्रतारणा होऊ शकते काय? समृद्धी-संपत्तीच्या आशेने भारतात अनेक लोक आले त्यांनी त्यांच्या भूमीशी प्रतारणा केली काय? शक, हूण, आयोनियन्स्, तुर्क, झोराश्ट्रियन्स, मुघल, ब्रिटिश हे सर्व त्यांच्या त्यांच्या देशाचे द्रोही होते काय? उलट बाजूने, ज्या दक्षिण भारतीयांनी स्रि लंका, इन्डोनीशिया, मलेशिया येथे, किंवा मौर्यांनी अफ्घानिस्तानात साम्राज्यवर्धन केले तो सर्व भारतवर्षाशी द्रोह होता काय? (अफ्घानिस्तान तेव्हाही वेगळा प्रदेश म्हणूनच ओळखला जात असे, जरी सोयरिकी होत होत्या तरी.) किंवा सत्यनारायणकथेतला साधुवाणी दूरदेशी गेला, वरसईकर गोडसे भटजी द्रव्याच्या आशेने आर्यावर्ती गेले , नशीब काढायला अनेक जण परदेशी जातात, किंवा अगदीच जवळचे म्हणजे कोंकणातले लोक दोनशे वर्षांपूर्वीपासून मुंबईत आले, सध्या बिहारी, ओडिया लोक येतात हा त्यांच्या जन्मभूमीशी द्रोह ठरतो का? जन्मभूमी म्हणजे काय? देश म्हणजे काय? की चतु:सीमांचे सध्याचे वास्तव म्हणजे देश? राष्ट्र आणि देशमधल्या अर्थातल्या फरकाची गुंतागुंत सोडून देऊ. पण समजा उद्या विदर्भाचे राज्य झाले तर वैदर्भीयांची महाराष्ट्राशी निष्ठा भूमिद्रोह ठरेल काय? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मारल्या गेलेल्या १०५ लोकांना त्यांनी 'हुतात्मा' म्हणणे आवश्यक असेल काय?
5 Aug 2016 - 8:38 am | संदीप डांगे
देशांतर म्हणजे देशद्रोह असे कुणी म्हटल्याचे वा सुचवल्याचे वरील प्रतिक्रियांमध्ये आढळले नाही..
5 Aug 2016 - 9:25 am | मराठमोळा
आनंदात जगणे हा जनरली सर्वांचा जगण्यामागे मुख्य हेतू असतो. आनंदाची व्याख्या व्यक्तीपरत्वे बदलते आणी असते हे मान्य करायला हवे. उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी 'बेस्ट फिट' शोधून तो स्विकारणे कधीही योग्यच. जर कुणाला (त्याच्या मते)दुसर्या देशात आनंदी आणी समाधानी आयुष्य जगण्याचा पर्याय उपलब्ध असेल आणी तो ती व्यक्ती स्विकारत असेल तर ईतर कुणालाही त्यात आक्षेप असू नये आणी ते चूक की बरोबर हे ठरवण्याचाही अधिकार असू नये. (अर्थात अमूक देश खराब आहे असे म्हणण्यापेक्षा, मला सुटेबल नाही किंवा मला हा जास्त सुटेबल आहे असे म्हंटले की वाद होणार नाहीत. जसं एखादी नोकरी/कंपनी खराब आहे पेक्षा मला ती सुटेबल नाही म्हणून बदलली असे कारण तीच नोकरी दुसर्या कुणाला परमोच्च आनंद देणारी ठरू शकते)
बर्याच जणांना हा पर्याय उपलब्ध नसतो, किंवा काहींना असूनही तो बेस्ट फिट नसतो. परफेक्ट लाईफ कुठेच नसावे. प्रत्येक देशात्/शहरात अधिक उणे असतेच पण मला/माझ्या गरजा/ईच्छांना कोणता सुट होतो ते मीच ठरवावे. भारताला पाणी, वाहतूक, प्रदूषण, लोकसंख्या, भ्रष्टाचार आणी अश्या अनेक समस्यांनी घेरले आहे आणी त्या वाढत आहेत हे मान्य आहे, पण काही लोकांना ह्या समस्या दुय्यम वाटू शकतात. आपला निर्णय किंवा विचार दुसर्यांवर लादण्याचा प्रकार म्हणजे 'आद्यगाढवपणा' ;) आहे असे मला वाटते. ('मला डॉक्टरने या लक्षणांवर हे औषध दिले म्हणून तुही तेच घे' प्रमाणे).
अवांतर :परफेक्शनिस्ट मानसिकतेच्या लोकांना सध्या भारतात असलेल्या समस्यांना सामोरे जाणे फार कठीण असते असे निरिक्षण आहे.)
5 Aug 2016 - 9:51 am | नावातकायआहे
जन्माला यायचच नाही हा पर्याय असतो का?
कुणाच्या पोटी जन्माला यायच हा पर्याय असातो का ? ?
मातृभूमी हि कितीही वाईट असली तरी मातृभूमीच आहे.
चुकीचे संस्कार असतील कदाचित पण आपली स्वताची आई आवडली नाही म्हणून घर सोडून दुसऱ्या कुणाच्या आईकडे जाण्यातला प्रकार आहे हा..
5 Aug 2016 - 9:56 am | नावातकायआहे
वरील प्रतिसाद मुवि यांना आहे
5 Aug 2016 - 12:05 pm | मुक्त विहारि
मान्य....
पण
एखादी आई आपल्या मुलांवर अन्याय होवू देत नाही.
"आपली स्वताची आई आवडली नाही म्हणून घर सोडून दुसऱ्या कुणाच्या आईकडे जाण्यातला प्रकार आहे हा.."
तुम्हाला कदाचित "चोर आणि चोराच्या आईची" कथा आठवत असेल.
आई-वडील-भावंडे-नातेवाईक-धर्म-मातृभाषा आणि देश जन्मण्या पुर्वी निवडता येत नाहीत.
पण, समजा जर तुमचे आणि त्यांचे पटत नसेल तर त्यांना सोडून स्वतःला जिथे समाधान वाटेल तिथे जाण्यात काहीच वावगे नाही.असे माझे मत.
एखाद्या व्यक्तीने, जर आयुष्यभर इमाने इतबारे इनकम टॅक्स भरला असेल, तर त्याला सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधा योग्य त्या दरांत मिळाल्याच पाहिजेत...आणि आपला देश इथे कमी पडत होता, कमी पडतो आणि कमी पडणार.
आज मला किंवा माझ्या घरच्यांना ही चिंता नाही,(सुदैवाने आमची आर्थिक आणि कौटुंबिक बाजू ह्या बाबतीत बक्कम आहे.) ह्याचा अर्थ असा नाही की मी इतर गरीब लोकांची चिंता करू नये.
आज तुम्ही नौकरी करत असाल, इनकम टॅक्स ही वेळेवर आणि कायदेशीर भरत असाल.
मग तुमच्या अतिसामान्य अपेक्षा पण हा देश पुर्ण करतो का?
ह्याचे उत्तर जर होकारार्थी असेल तरी ठीक आणि नकारार्थी असेल तरी ठीक.
एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या नजरेने त्या बाजू कडे बघतो.
तुम्ही तुमच्या जागी सुखी आणि मी माझ्या जागी.
5 Aug 2016 - 2:54 pm | मार्मिक गोडसे
सगळ्या सार्वजनिक सुविधा योग्य दरातच मिळतायेत की.
5 Aug 2016 - 1:30 pm | नावातकायआहे
हे मान्य. पण उम्मिद पे दुनिया कायम आहे साहेब! Have faith!!
5 Aug 2016 - 2:07 pm | मुक्त विहारि
एके काळी म्हणजे १९८० पर्यंत आम्हाला पण हेच वाटत होते....
पण पुढे हर्षद मेहता घोटाळा, राखीव जागेच्या जागी आलेली बांधकामे आणि इतरही बर्याच गोष्टी बघण्यात आल्या.
स्वातंत्र्य मिळून भारताला जितकी वर्षे झाली जवळपास तितकीच वर्षे द.कोरियाला पण झाली.
पण, आज भारतातील जपानची आणि द.कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्यांची बाजारपेठ जवळपास सारखीच आहे.
असो,
देशा विषयी फार कटू सत्ये बोलण्यात अर्थ नाही.
5 Aug 2016 - 1:56 pm | सुमेरिअन
वाईट वाटलं हा लेख वाचून. मागच्या काही वर्षात भारतात काही गोष्टी बिघडल्या असतील, पण बऱ्याच गोष्टी सुधारल्या पण आहेत.
विविध जाती, धर्म, भाषा आणि 'बॅकग्राऊंड' असणाऱ्या 125 कोटी लोकांना सांभाळणे गम्मत नव्हे. इथे तर छोट्या छोट्या लोकल organisations सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. leadership चा अनुभव असलेल्यांनी खरे खोटे ते सांगावे.
भारतापेक्षा बाहेरील/प्रगत देशातील जीवन सुकर आहे - असं सरसकटीकरण आपण करू शकत नाही. बरीच लोकं प्रगत देशात स्थायिक होतात आणि तेवढीच लोकं स्वइच्छेनी भारतात परत पण येतात. कोणाला तरी भारतातलं जीवन आवडत नाही म्हणून भारताला नावं ठेवणं योग्य नव्हे.(मुवि काकांचा आदर ठेवून बोलतोय)
माझ्या मते - मला माझा देश आवडत नाही म्हणून मी बाहेर देशात स्थायिक झालो तर 'घर का ना घाट का' अशी अवस्था माझी होऊ शकते. तिथे पण समस्या आहेतच. त्यामुळे आणि पाहुण्यासारखं राहण्याची फीलिंग येत असल्यामुळे, माझी येणारी पिढी कदाचित मलाच नावं ठेवेल.
मुवि काका इतकं छान लिहितात. त्यांच्या लेखणीची ताकद या देशाला अधिक चांगलं बनवायला नक्कीच मदत करू शकेल.
(मला कामानिमित्त देशात आणि देशाबाहेर राहावं लागत बरेचदा. हवेत बोलत नाही.
लिहिण्याची सवय नाही. चूकभूल माफ करावी.)
5 Aug 2016 - 3:02 pm | सुमेरिअन
वरील प्रतिसाद हा मुवि काकांच्या प्रतिसादासाठी होता.
5 Aug 2016 - 6:54 pm | गामा पैलवान
मुक्त विहारी,
>> पण, आज भारतातील जपानची आणि द.कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्यांची बाजारपेठ जवळपास सारखीच आहे.
गंमत बघा की आज भारत अवकाश क्षेत्रात प्रचंड अग्रेसर आहे. भारतात ग्राह्कोन्मुख (कन्झ्युमर) उत्पादने सुमार दर्जाची, तर अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) उत्पादने जागतिक दर्जाची का आहेत?
माझ्या मते याचं कारण म्हणजे मानके (स्टँडर्ड्स) आहेत. जागतिक स्पर्धेत अभियांत्रिकी उत्पादने खपवायची असतील तर उच्च दर्जाच्या मानकांनुसार उच्च गुणवत्तेची उत्पादने बनवावी लागतात. याउलट ग्राहकोन्मुख उत्पादने कशीही बनवलेली चालतात, कारण मानके सरकारी आहेत ना!
बाबूशाहीचा नि:पात केल्याविना गत्यंतर नाही.
आ.न.,
-गा.पै.
6 Aug 2016 - 12:07 pm | प्रकाश घाटपांडे
अशाच प्रकारच्या मुद्द्यांमुळे सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते, की 'माणूस अंधश्रद्ध असतो; कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते.’
6 Aug 2016 - 9:47 pm | गामा पैलवान
तिमा,
मिपावर यनावाला नामे एक प्राध्यापक होते. त्यांच्या लेखनावरून ते स्वत:ला विज्ञानवादी (अथवा विज्ञाननिष्ठ) समजत असावेत. श्रद्धाबिद्धा त्यांना मंजूर नसे. जेव्हा त्यांच्या लेखातून अधोरेखित होणारी श्रद्धेची बैठक मिपावाचकांनी दाखवून दिली, तेव्हापासनं हे सद्गृहस्थ पार गायब झालेत. बाकी काही म्हणा मिपावर विज्ञाननिष्ठ राहणे कठीण नव्हे तर अशक्यच आहे.
आ.न.,
-गा.पै.
7 Aug 2016 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनावाला वेळ मिळाला की येथे लिहितीलच. डोंटवरी.
-दिलीप बिरुटे
7 Aug 2016 - 12:38 pm | शाम भागवत
:))
8 Aug 2016 - 9:55 pm | मितभाषी
लै वेळा लिहीतील.
7 Aug 2016 - 3:10 am | अर्धवटराव
पण डेट्रोइटमधे समृद्धी भोगलेल्या आजोबांच्या नातवाला त्याच शहरात जन्म घेणे म्हणजे घोर पाप वाटते... त्याने कुठल्या देशात जावे बरे?
7 Aug 2016 - 12:55 pm | संदीप डांगे
जीवन दो दिसाची वस्ती। कोठे तरी करावी।
10 Aug 2016 - 9:16 am | गणामास्तर
संदीप शेठ , जर का दोनचं दिवसाची वस्ती आहे हे माहित आहे तर चांगल्या ठिकाणी का करू नये?
थोडाचं काळ तर काढायचाय म्हणून काढला कुठे तरी असे करणे बरोबर वाटत नाही.