अननसाला सद्गती!

इन्ना's picture
इन्ना in पाककृती
3 Aug 2016 - 2:59 pm

घरी, आमच्या परिचितांच्या शेतातून अननस आले. पहिले दोन दिवस दुर्लक्ष्य केल, कारण ते कापणे साफ करणे कधी करून माहित नाही. ;) टिनातल्या चकत्याच वापरल्या होत्या. दोन दिवसांनी अननसाचा घमघमाट सुटला स्वैपाकघरात. मग म्हटल ह्याला सद्गती द्यावीच. मास्टर शेफ चे सलग काही एपिसोड नुकतेच सलग पाहिल्याने काहितरी भरभक्कम नावाच , नाट्यपूर्ण कराव अस घाटत होतं ( मनातल्या मनातच हां ) पण मग नवर्‍याच्या बंगाली मित्राच्या घरी खाल्लेली एक चटणी / रायत आठवल. लगेच आंतर्जालावर साकड घातल. अन एक रेसिपी हाताला लागली.

करून पहायच ठरवल अन बरी झाल्यास फोटो टाकता यावेत म्हणून फोटो प्रपंच केला. प्रपंच म्हणजे ; आमच्या नेहेमीच्या हक्काच्या फोटोग्राफरनी साफ नकार दिल्यानी, करणे , अन फोटो काढणे आपापले. फोटोत इतर पसारा न येउ देण्याची दक्षता घेणे ;) वगैरे.

तर आता दोन वाक्याच्या रेसिपीला पुरेशी लांबड लाउन झाल्यानी पुढे, साहित्य फोटोतून कळेलच. माप अंदाजे.

अननस कापुन चकत्या बनवल्या. आल्याच्या लांब सळ्या कापून घेतल्या
1

मसाल्यासाठी लवंग , दालचिनी , बडीशेप, जिरं , सुक्या लाल मिरच्या अन मोहरीची डाळ

2

मग हे जरास भाजून भरड करून घेतल

3

अननसाचे सेंटिमिटर क्युब्स कापून घेतले

4
ह्याचा मधला भाग ( कोअर) काढणे अपेक्षित होते , पण माहित नसल्यानी तसेच तुकडे केले अन ते जरासे निबर लागतात रायत्यात.

मग तुपात पहिल्यांदा आल, मग भरड वाटलेला मसाला टाकला अन अननसाच्या फोडी पण.
जरास परतून घेतल .

5

पाणी घालून , पंधरा वीस मिनीट झाकण घालून शिजवल. मधेच आठवल् तेव्हा सहा सात चम्चे साखर टाकली . अननसाच्या चवी प्रमाणे ही अंदाजे घातली . फोडी मौ झाल्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळला.

limbo

अन झाल अस डिक्लेअर केल. गरम फुलक्यांबरोबर मस्त लागल.

final

पुढच्यास ठेच प्रशिक्षण ( सुगरणीनी/बल्लवांनी हे ऑप्शन ला टाकल तरी चालेल)

१) अननस कापायला येत नसेल तर टिनच बरा . किंवा तो नीट कापायला शिकल पाहिजे .
२) अननसाच्या फोडी अजून बारीक अथवा एकदा मिक्सर मधून फिरवून काढल्या असत्या तर कनिस्टन्सी रायत्या सारखी झाली असती.
३) तुपा ऐवजी सरसो च तेल बरं लागेल, मी खाल्लेल्या बंगाली पदार्थात असाव.
४) आंबट गोड तिखट अन मसाले ह्याची एक सुरेख चव तयार होते. मुळ बंगाली पदार्थाच्या ५-१० अंश सरकलेली असली तरी मस्त.

माहितीचा स्त्रोत- मैत्रीणीनी दिलेली लिंक , इतर आंतर्जालीय रेस्प्या , अन शेवटी हाताशी असलेली सामग्री.

मास्टर्शेफ टाइप कमेंट-
१) हिरो ऑफ द डिश इज पायनॅपल
२) अ‍ॅसिडिटी इज वेल बॅलन्स्ड विद जिंगर अ‍ॅन्ड अदर स्पाइसेस.
३) प्रेझेन्टेशन मॅटर्स , म्हणून अननसाच्या सगळ्या फोडी एकसारखे क्युब्स , आल्याचे ज्युलिअन्स, अन पिवळ्या अननसाला कॉन्ट्रास्ट लाल सुक्या मिरच्या

इती दोन वाक्याची रेसिपी पानभरात संपूर्ण :D

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

3 Aug 2016 - 3:17 pm | संजय पाटिल

व्वा मस्त एंजॉय केलं.. सद्ध्या लेखनशैली आणी करेन तेव्हा पदार्थ पण..

सूड's picture

3 Aug 2016 - 3:21 pm | सूड

सुंडर!!

मस्त पाककृती. मुख्य म्हणजे माझ्यासारख्या 'ढ' विद्यार्थ्याला जमेल अशी अशी असल्याने अजूनच आवडली.

इन्ना's picture

3 Aug 2016 - 3:39 pm | इन्ना

मीही ढ च आहे एस :)

अननस स्वस्तात कुठे मिळतात? चक्क १०० रुपये म्हणला ओ लक्ष्मी मार्केटात. आमच्या गुर्जीनी १०० मध्ये ३ का ५ वगैरे आणलेले.
मला आवडते खायला पण मिळतच नै ना. :(
अननसाच्या क्युब फोडींवर नुसते चाट मसाला आणि दही टाकून छान रायते होते.

पुण्यातील मार्केट यार्ड येथे फळांचा बाजार भरतो .. सकाळी ९ - ११ या वेळेत जा. खूप स्वस्त मिळतील अननस.
१२० रुपये डझन पासून ३०० रुपये डझन पर्यंत च्या भावाने मिळतात.

अभ्या, सोलापूर पुणे येऊन जाऊन केवढ्याला पडेल? ;)

इन्नाअण्णा पाकृ भारी ओ!

जगप्रवासी's picture

3 Aug 2016 - 3:47 pm | जगप्रवासी

फोटू दिसत नाहीयेत

वेदांत's picture

3 Aug 2016 - 3:53 pm | वेदांत

+१

कोणालाच नाही का दिसत फोटो?

पैसा's picture

3 Aug 2016 - 4:00 pm | पैसा

फोटो दिसत नाहीयेत. पब्लिक शेअर केलेत का?

रघुनाथ.केरकर's picture

3 Aug 2016 - 4:22 pm | रघुनाथ.केरकर

नै दीसत, गुगल वर पण लॉगिन करुन पाहीलं.

तरी पण नै

रुस्तम's picture

3 Aug 2016 - 11:04 pm | रुस्तम

फोटो दिसत नाहीत

अरेच्चा! मघाशी मला फोटो दिसत होते. आता दिसत नाहीत. कमालेय!

उद्गार चिन्हासकट असेच म्हणतोय

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2016 - 6:09 pm | अत्रुप्त आत्मा

माजा पण गणेशा झाला! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

वा, सोपी पाकृ. कधी येऊ खायला.

हा तर मेथांबा - कैय्रांच्या ऐवजी अननस.विनोदी फोडणी भारी पण कॅचवर्ड टाकला नाय मग शंभरी कशी गाठणार?

पगला गजोधर's picture

3 Aug 2016 - 4:18 pm | पगला गजोधर

मुळ बंगाली पदार्थाच्या ५-१० अंश सरकलेली असली तरी मस्त.

मूळ बंगाली मसाल्यामधे कदाचित कलौन्जी व मेथ्या सुद्धा असवा.. असा माझा एक गेस बर्का ...

रेसिपि हे वे सा न ल

लालगरूड's picture

3 Aug 2016 - 6:29 pm | लालगरूड

फोठू नाय दिसत

मोहनराव's picture

3 Aug 2016 - 6:39 pm | मोहनराव

मला पण फोटु दिसत नायत

अजया's picture

3 Aug 2016 - 6:42 pm | अजया

छान पाकृ इन्ना.
मास्टरशेफ आॅस्ट्रेलिया का! माझ्यावर पण सध्या त्याचंच गारुड आहे! उगाच आमटीवर नारळ कोथिंबीर सजावट करायला लागलेय;)

इन्ना's picture

3 Aug 2016 - 7:24 pm | इन्ना

हो , अजया!
एकदा त्या अन्लिमिटेड पॅन्ट्री अन बेस्ट ऑफ अप्लायन्सेस ! अश्या किचन मधे कैतरी खूड्बूड करायचीय. मी अजिबात फूडी नाही अन बनवायचा सोस /आवड ही नाही खरतर ;०

अजया's picture

3 Aug 2016 - 7:29 pm | अजया

शेम हिअर ;)
शिवाय उगाच जरा अर्दी, स्मोकी फ्लेव्हर वगैरे शब्द फेकायला मजा येते हल्ली!!

झेन's picture

3 Aug 2016 - 7:25 pm | झेन

सद्गती महटल्यावर आधि घाबरलो, मग वाटलं जास्त पिकलेल्या अननसाला वाईन बनवून सद्गती देणार की काय.
पण सासव/सासम चं हे भावंड पण करून बघणयात येईल.

मुक्त विहारि's picture

3 Aug 2016 - 7:34 pm | मुक्त विहारि

पण

फोटो दिसत नाहीत.

आमचा गणेशा झाला

तिमा's picture

3 Aug 2016 - 8:17 pm | तिमा

फटु च्या जागी एक मायनस खूण किंवा एक बुरखाधारी स्त्रीचा चेहेरा दिसतोय.

आनंदी गोपाळ's picture

3 Aug 2016 - 8:57 pm | आनंदी गोपाळ

फोटू नॉट दिसिंग.

फोटू वारले आहेत. ते जरा दाखवा..

स्नेहश्री's picture

4 Aug 2016 - 8:22 am | स्नेहश्री

अननस अतिशय आवड्तोच. इतकी सोप्पी रेसिपी नक्की करेन.

नाखु's picture

4 Aug 2016 - 9:35 am | नाखु

फोटो पळ्वलेत का रायता खलास झाला हे कळेना.

असो वर्णनावरून करून बघण्यासारखी (आणि जमण्यासारखी ) वाटत आहे. अननन्स आणावा काय?

अननसासाठी १/४ मतात असलेला संसारी नाखु

प्रीत-मोहर's picture

4 Aug 2016 - 9:53 am | प्रीत-मोहर

भारीच आहे रेसीपी. आमच्या ब्याचलर आयुक्षात आम्ही सेम अस कैरीच करुन भाताबरोबर खायचो. खर खडा मसाल्याऐवजी मातोश्रींनी दिलेला मसाला वापरायचो ज्यात हे सगळे इन्ग्रेडिएंट्स आहेत

स्वाती दिनेश's picture

5 Aug 2016 - 1:30 pm | स्वाती दिनेश

रेसिपी आणि ती लिहिण्याची स्टाइल दोन्ही छान!
स्वाती

पियुशा's picture

6 Aug 2016 - 11:35 am | पियुशा

मला फोटु दिसले नाहि :(

भाग्यश्री कुलकर्णी's picture

6 Aug 2016 - 2:42 pm | भाग्यश्री कुलकर्णी

छान पाकृ. लिहायची श्टाईल बी भारीये.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

6 Aug 2016 - 2:42 pm | भाग्यश्री कुलकर्णी

छान पाकृ. लिहायची श्टाईल बी भारीये.

चंपाबाई's picture

7 Aug 2016 - 7:08 am | चंपाबाई

कारवारी लोक अननसाची कढी करतात