एल ई डी प्रकारातला टी व्ही

सुनिल साळी's picture
सुनिल साळी in तंत्रजगत
25 Jun 2015 - 3:31 pm

राम राम मंडळी,

गेली 12 वर्षे ते आतापर्यंत माझा एल जी कंपनीचा सी आर टी टेलीव्हिजन संच काहीही बिघाड न होता खूप चांगल्या प्रकारे चालत होता. पण सध्या सुरुवातीला दणका दिल्या शिवाय टेलीव्हिजन संच चालू होत नाही :-(

असो आम्ही ह्या नीर्णयाप्रत आलो आहोत की नवीन एल ई डी प्रकारातला टी व्ही विकत घ्यावा.

आपल्या मिपा सदस्यापैकी बहुतेक लोक वेग वेगळ्या कंपन्याची एल सी डि, एल ए डी वापरत असणारच.

आपला बहुमोल सल्ला द्यावा.

अटी:
> 32 इंच ते 40 इंच
> कींमत: रु. 18000 ते 25000
> स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास

प्रतिक्रिया

कसा आहे ?

नाव आडनाव's picture

9 Sep 2015 - 5:50 pm | नाव आडनाव

माझ्या मित्राकडे आहे. गेले ३-४ वर्ष एकदम मस्तं चालू आहे. जेव्हढं मला आठवतं ४० इंच साईझ चा आहे त्याचा टीवी.

जे.जे.'s picture

9 Sep 2015 - 7:22 pm | जे.जे.

आज काल सर्वच कम्पन्या सर्व अप्लायन्स बनवतात.

हाएर हि एयर कन्डिशनर बनवण्यासाठि प्रसिध्ध आहे - अश्या कम्पन्या बहुतेक वेळेस स्वतः डिस्प्ले पेनेल न बनवता फक्त सर्किट पेनेल व बॉक्स बनवतात.

सुनिल साळी's picture

15 Feb 2016 - 10:26 am | सुनिल साळी

सॅमसंग मॉडेल - 40 एच 5100

- शॉपक्लूस ऑफर
- 40 इंच
- फुल्ल एच डी
- रेज़ल्यूशन - 1920 x 1080
- एच डी एम आय पोर्ट x 2
- यू एस बी x पोर्ट 2
- ध्वनी - डी टी एस 2
- किमत - रु. 23990
- इम्पोर्टेड टी व्ही

इंडिया सॅमसंग वारण्टी नाही. सेलर वारण्टी आहे.

गॅरी शोमन's picture

21 Mar 2016 - 5:12 pm | गॅरी शोमन

माझामते "लग(LG ) " च्या वस्तू भारतात मस्त चालतात. असा स्वानूभव पण आहे. माझा LCD TV मागील ५ वर्ष व्यवस्थित सुरु आहे. कदाचीत त्यांची Voltage रेंज भारतासाठी उपयुक्त आहे. माझा जुना LG मी विकुन मागील वर्षी ३२" नविन घेतला. ऑन लाईन खरेदी केल्यामुळे शोरुम किमती पेक्ष्क्षा १७०० रुपये स्वस्त पडला.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Apr 2016 - 11:25 am | प्रकाश घाटपांडे

माझ्याकडे एलजी एलसीडी ३२एलएच३ आहे.६ वर्षे झाली. व्यवस्थित आहे. त्याला ३ HDMI port and 1 USB आहे. त्याला संगणक व मोबाईल व टॅब साठी स्मार्ट बनवायचा असेल तर कुठले क्रोमकास्ट वा तत्सम गॅझेट कसे लावता येईल. संगणकाला वायफाय आहे

श्रीरंग_जोशी's picture

2 May 2016 - 9:00 am | श्रीरंग_जोशी

एचडीएमआय पोर्टला स्मार्ट टीव्ही डाँगल लावू शकता. माझ्या घरी एका टिव्हीला जो स्मार्ट नसल्याने अ‍ॅमेझॉन फायर टिव्ही स्टिक अन दुसरा स्मार्ट असुनही भारतीय चॅनेल्सचे अ‍ॅप (स्लिंग टिव्ही) त्यावर नसल्याने रोकू स्ट्रिमींग स्टीक वापरत आहे.

दोन्ही चांगल्या चालतात. रोकू स्टिकचा रिस्पॉन्स फायर टिव्ही स्टिक पेक्षा किंचीत हळू असला तरी कटांळा येण्याइतपत हळू नाही.

क्रोमकास्ट अजून वापरले नाही पण इतरांकडून चांगलेच ऐकले आहे. भारतात कदाचित आणखीही पर्याय असतील.

या सर्व स्टीक एचडीएमाआय पोर्टद्वारे टिव्हीला जोडता येतात तसेच त्यांना पॉवर सप्लाय युएसबी कॉर्डने द्यावा लागतो. त्यासाठी टिव्हीच्याच युएसबी पोर्टचा वापर करण्याचा पर्याय असतो.

बाबा योगीराज's picture

30 Apr 2016 - 12:06 pm | बाबा योगीराज

ह्ये vu काय भानगड हाय?
किमती लै म्हंजी लैच सस्त हायेत.
मले 32" घ्याचा हाय.
LG पायला, पण जरा म्हाग हाय.

कंचा टीव्ही घेऊ?
२५०००/- पेक्षा कमी वाला पायज्येल. ३२". HD हवा.

नाखु's picture

30 Apr 2016 - 2:26 pm | नाखु

ब्रवीया घेतला दि २७ फेब्रुवारी मस्त आहे.

रुपये २८९०० मात्र कुठं स्कीम इ असेल तर अजुन स्वस्त पडेल.

आवाज जबरा चित्र (गुणवत्ता) खतरा

नाखु

बाबा योगीराज's picture

30 Apr 2016 - 6:15 pm | बाबा योगीराज

कुठला माडिल घ्येतला? कुंकडून घ्येतला? किती विंची हाय.
हानलाईन घ्येतला आसन तर लिंक पेष्टवा कि...!

नाखु's picture

2 May 2016 - 8:25 am | नाखु

ब्रॅव्हीया ३२ इंच ५१२,रिलाय्न्स डिजीटलमधून (नाविलाजाने कारण गिफ्ट कुपन रू २००० चे मिळाले होते एका घरगुती स्मारंभात ते वसूल करणे होते)

थेट घेतला किमान ५-७ रिलायन्स पालथे घातल्यावर हिंजवडी रिलायन्स्मध्ये मिळाला नेमका त्यावर ही तिथे किमान दोन हजार सवलत होतीच लगे हाथ बार उडवून दिला...

सोनी ब्रॅव्हीया घ्यायचे आधिच मुक्रर केले होते, टीव्ही दुकानात गेल्यावर सोनी शेजारी दुसरा लावून पाहिला तर चित्राची गुणवत्ता,रंगसंगती कळते स्वतंत्र सगळेच छान मस्त दिसतात.

ता.क. नुकतीच वल्लींकडून ह ट्वीव्ही चांगला आहे अशी (ताजी) पावती मिळाली आहे (प्रत्यक्ष पाहून)

मैतर नाखु

सुबोध खरे's picture

2 May 2016 - 9:41 am | सुबोध खरे

ना खु साहेब
सोनीची सर्व उत्पादने "सर्वोत्तम" असतात हा एक "जाणून बुजून" पसरवलेला गैरसमज आहे. (याचा अर्थ असा नव्हे कि ती उत्तम नाहीत ती उत्तम आहेतच). महाग ते उत्तम हा आपल्या समाजाचा गैरसमज आहेच.
परंतु आपण जेथे जातो तेथील विक्रेता "सोनीच" घ्या असे का सांगतो तर सोनी विक्रेत्यांना सर्वात जास्त "दलाली" देतात. आपण दुकानात गेलात तर तेथे असलेले सोनी चे टीव्ही इतर टीव्ही च्या तुलनेत आपल्याला जास्त दैदिप्यमान दिसतात कारण चित्र "सुधारण्यासाठी" असलेली सर्व प्रणाली ( picture improvement systems) त्यात कामाला लावलेली असते तर बाजूच्या "इतर" टी व्ही मध्ये "जाणून बुजून" चित्र सपक ठेवले जाते. हीच वस्तुस्थिती आपल्याला "म्युझिक सिस्टीम" मध्ये दिसते.येथे सोनीची सिस्टीम sound enhanced असते तर इतर कंपन्यांची सिस्टीम plain असते.
कोणताही टीव्ही किंवा म्युझिक सिस्टीम घेताना त्यातील अशा सर्व "प्रणाल्या" मुद्दाम बंद ठेवून मूळ चित्र आणि आवाज कसा आहे हे प्रथम पाहावे नंतर या प्रणाल्या "ऑन" करून दोन्ही कंपन्यांचे टी व्ही किंवा म्युझिक सिस्टीम चा तुलनात्मक अभ्यास करावा. म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजेल. यानंतर आपल्याला जी सिस्टीम आवडेल ( आणि खिशाला परवडेल) ती विकत घ्यावी.
प्रत्येक माणसाची आवड आणि निवड हि वेगळी असते त्यामुळे यानंतर जी सिस्टीम आपल्याला "आवडेल? जे रंग आपल्या डोळ्यांना भावतील आणि ज्या सिस्टीमचा आवाज आपल्याला आवडेल अशीच सिस्टीम विकत घ्या मग ती महाग असो व स्वस्त. प्रत्येक सिस्टिमचे चित्र आणि आवाज वेगळा असतो आणि त्यातील आपल्याला कोणता आणि का आवडेल हे सांगता येत नाही.तेंव्हा तुमची आवड हि तज्ञांची निवड असेल असे नाही तरीही तुम्ही स्वतःच्या "आवडी"प्रमाणे निवड करणे आवश्यक आहे. (वैयक्तिक रित्या मला स्वतःला फिलिप्स उत्पादने त्यांच्या आवाज आणि नैसर्गिक रंगांसाठी आवडतात.)
परंतु जी सिस्टीम महाग तीच चांगली या मनोवृत्तीतून आपण बाहेर येणे पण आवश्यक आहे. बर्याच वेळेस आपली अभिरुची "उच्च" आहे हे दाखविण्यासाठी "नव" श्रीमंत लोक दुप्पट पैसा खर्च करून महागातील महाग उत्पादने विकत घेतात आणि तीच बाजारात सर्वात चांगली कशी हे हट्टाने आपल्याला सांगत असतात. या जाळ्यात न अडकण्यासाठी आपली "विचारांची बैठक" पक्की असणे आवश्यक आहे.
हा प्रतिसाद कृपया वैयक्तिकपणे घेऊ नये.

नाखु's picture

2 May 2016 - 9:55 am | नाखु

म्हटल्याबद्दल निषेध..
बाकी सविस्तर प्रतिसाद आवडलाही आणि पटलाही.. माझ्याकडील आधीची उप्करणे ठरावीक एका कंपनीची नव्हती नाहीतही, फ्रीज फक्त गोदरेज नवीन ४ स्टारवाला घेतला (आधीचा १२ वर्षे वापरून ) तेच टीव्हीचेही आधिचा ओनीडा केवाय रॉक होता.

मी आधी सरव तपशील आणि (माझा खिसा) पाहून ठरविले होते (आणि तिथे सॅमसुन्गची जोरदार भलामण करणारा इसम असूनही मी सोनी (आणि हेच मॉडेल घ्यायचे ठरविले होते )

हाल न होता हॉलला साजेसा म्हणून हा ३२ ईंच घेतला.

खरे प्रतिसाद वैयक्तिकपणे न घेणारा मिपा मित्र नाखु

मृत्युन्जय's picture

24 May 2016 - 12:09 pm | मृत्युन्जय

वैयक्तिक रित्या मला स्वतःला फिलिप्स उत्पादने त्यांच्या आवाज आणि नैसर्गिक रंगांसाठी आवडतात

मग तुम्हाल व्हिडीयोकोन देखील आवडायला हरकत नाही.

बाकी प्रतिसादाशी सहमत. सोनी व्हॅल्यु फॉर मनी या कॅटेगरीत येत नाही.

सोनी ही माझ्या माहीती प्रमाणे तोट्यात चालु आहे. सोनीच्याच म्हणण्याप्रमाणे ते २०१८ साली पुन्हा फायद्यात येतील. मार्केट शेअर प्रचंड घसरला आहे. सोनी चे टीव्ही बरासचा सॅमसंग च करुन देतो असे ऐकले आहे. फक्त ब्रँडच्या नावावर चालु आहे.

काही वर्ष अशीच गेली तर सोनी हा ब्रँड कोणी चीनी किंवा कोरीअन कंपनी विकत घेइल.

डिअर डॉक, मला घरगुती उपकरणाचा इतका अनुभव नाही पण डिस्प्ले च्या बाबतीत आम्ही (ग्राफिक आर्टिस्ट अनिमेटर) फार चुझी असतो. आमचा बराचसा भर दिसप्लेच्या त्रुमॅच true match quality वर असतो. आधी सीआर्टी असतांना पन आम्ही सोनी त्रिनिट्रॉन प्रेफर करायचो, आता पण एल इ डी असताना ब्राव्हिया. इतर सगळ्या डिस्प्ले मध्ये सोनीचा डिस्प्ले जास्त रिअलिस्टिक असतो. बाकी हे वैयक्तिक मत हा भाग आहेच. मोबाईल असो कि मॉनिटर सोनिशिवाय दुसरा डिस्प्ले पाहायलाच नको वाटतो.

कपिलमुनी's picture

24 May 2016 - 12:03 pm | कपिलमुनी

सोनी , एलजी , सँमसंग ( १२० hz)वगळता बर्याच टीव्हीचे रिफ्रेश रेट ६० Hz आहे.

याचा कितपत फरक पडतो??

आनंदी गोपाळ's picture

24 May 2016 - 11:00 pm | आनंदी गोपाळ

कंटीन्यूइटी ऑफ व्हिजन नावाचा एक प्रकार असतो. ज्यामुळे "मूव्ही" उर्फ चलत्चित्र तयार करता आले. वहीच्या पानाच्या कोपर्‍यावर स्टिक फिगर्स काढून मारामारीचा आभास तयार करता येतो, हे त्यामुळेच होते.

'रिफ्रेश रेट' हे एका सेकंदात किती वेळा स्क्रीन नव्याने 'चित्रित' केला जातो याबद्दल असावे असे वाटते.

स्क्रीनवर कितींदाही नवे चित्र काढलेत, तरी तुमचा डोळा १५ सेकंदांनी 'रेफ्रेश' होतो : उदा. https://www.theguardian.com/science/2014/apr/11/visual-perception-eyes-b...

-- हे मी नीटसं मांडलंय की नाही ठाउक नाही,

पण मी व्यक्तिशः इलेक्ट्रॉनिक करमणूकीच्या वस्तू, जसे टीव्ही मोबाईल इ. वर मोठा खर्च करण्याच्या विरोधात आहे. कारण कितीही लेटेस्ट प्रॉडक्ट घेतले, तरी सगळे ब्रँड्स महाग ते स्वस्त, सिमिलर फीचर्स देतात, अन कितीही भारी ब्रँड आणलात तरी रफली १४ महिन्यांत तो आउटडेटेड टेक्नॉलॉजी होतो..

जुन्या panasonic tvनी २० वर्ष सेवा दिल्यावर आता picture tube ख़राब झालीय.नवीन घ्यावा लागणार आहे.बजेट साधारण ४५हजाराच्या आसपास.स्क्रीन साधारण बेचाळीस/त्रेचाळीस इंच जे बैठकीच्या खोलीला अनुरुप.सध्या बाजारात या बजेटमधे काय लेटेस्ट features आहेत?शोरूम मधे बघायला गेल्यावर सगळे टीवी सारखेच वाटतात.सो तिथे एक्साक्ट्ली काय बघावं.काय विचारवं?
माझा बेसिक क्राइटेरिया पिक्चर/साउंड क्वालिटी चांगली हवी.usb/इन्टरनेट हवं.चांगली wifi कनेक्टिविटी हवी.लैपटॉप/कैमरा/मोबाइल टिवी ला जोड़ता यावं.
धागा जुना आहे सो आता अजुन नविन प्रकार आले आसतील.

प्रदीप's picture

1 Aug 2016 - 8:09 pm | प्रदीप

सो तिथे एक्साक्ट्ली काय बघावं.काय विचारवं?

सो आता अजुन नविन प्रकार आले आसतील.

हे 'सो, सो' काय आहे, नक्की?

साहेबचा शॉर्टफॉर्म असावा ;)

बाबासाहेब --> बाबासो. तसं. खरं तर त्यात एक जास्तीचा काना असतो, पण तो युनिकोडात कुठून देणार?

शाम भागवत's picture

1 Aug 2016 - 4:24 pm | शाम भागवत

सोनी ब्राविया केडीएल ४८डब्ल्यू७००सी ४८" फुल एचडी एलईडी टीव्ही घ्यायचा विचार करतोय. दुकानात ७८ ते ८० हजारात मिळतोय. पण फ्लिकआर्टला ८२९०० दर्शनी किमतीचा रू.७५२८९ ला मिळतोय. तर प्लिक आर्टमधून घ्यावा का? दुकानांपेक्षा ४-५ हजारांनी स्वस्त मिळतोय म्हणून उगीचच शंका आली की, यांना कसे बरे स्वस्त विकायला जमतय?
का ४८ इंचाचे सोनीचे एखादे नवीन मॉडेल येतेय? मला ४८ इंचापेक्षा मोठा नकोय.

किसन शिंदे's picture

1 Aug 2016 - 4:47 pm | किसन शिंदे

सोनीचे एलईडी खूप रिस्की आहेत. एलईडी पॅनेल कधी उडतील याचा भरवसा नसतो.

अरे बापरे.

मग कोणता चांगला आहे?
४८ इंची पाहीजे. बजेटचा मुद्दा नाहीय्ये.

किसन शिंदे's picture

1 Aug 2016 - 5:58 pm | किसन शिंदे

एलजी किंवा पॅनॉसोनिक पैकी निवडू शकता. त्याआधी गूगलवर सर्च करा दोन्हीपैकी कुठले चांगले पडेल.

सोनीवरचा भरवसा उडाल्याने गेल्याच महिन्यात मी एलजीचा ३२ इंची एलईडी विकत घेतला.

स्वप्क००७'s picture

1 Aug 2016 - 7:54 pm | स्वप्क००७

आम्ही आताच मायक्रोमॅक्स चा 40" LED टीव्ही घेतला अजून पर्यंत तरी चांगला आहे
किंमत 20000 rs फक्त !!!!

कंजूस's picture

1 Aug 2016 - 8:11 pm | कंजूस

Buying an LED TV? 8 things to remember - TOI Mobile | The Times of India Mobile Site:http://m.timesofindia.com/tech/Buying-an-LED-TV-8-things-remember/itslid...

शाम भागवत's picture

1 Aug 2016 - 9:34 pm | शाम भागवत

खरच खूप फायदा झाला तुम्ही दिलेल्या लिंकचा. पुष्कळ गोष्टी स्पष्ट झाल्या. आता निर्णय घेणे सोपे जाणार आहे.

संदीप डांगे's picture

1 Aug 2016 - 11:43 pm | संदीप डांगे

Tcl कंपनीचे टीव्ही अमेझॉन वर लॉन्च होत आहेत, कोणी उसगावकर ह्या कंपणीबद्दल माहिती देईल का, अमेरिकेतली नुंबर ओने कुंपनी आहे म्हणे,

इकडे सचिन तेंडुलकर पार्टनर झालाय ती कंपनी का?मोबाइल काढलेत.

श्रीरंग_जोशी's picture

2 Aug 2016 - 9:27 am | श्रीरंग_जोशी

ही टिसिएल कंपनी बजेट टिव्ही बनवणारी कंपनी दिसत आहे. माझ्या निरिक्षणाप्रमाणे टिव्हीबाबत उसगावात सॅमसंगच आघाडीची कंपनी आहे. एलजी अन सोनी यांच्यात दुसर्‍या क्रमांकासाठी चढाओढ असते. व्हिझिओ ही पण बजेट टिव्हीमध्ये आघाडीची कंपनी आहे.

२०००-२००१ साली टिसीएलच्या आपल्याकडच्या वृत्तपत्रात पानभर जाहिराती असायच्या. ओनिडाचा सर्वात स्वस्त टिव्ही ₹११,००० असल्यास टिसीएलचा ₹६९९० ला वगैरे असायचा. आयवा वगैरे पण याच किमतीला टिव्ही विकायची. या प्रतिसादामुळे आयवा, अकाई, शिवाकी, सॅनसुई या कंपन्या आठवल्या.

भटकंती अनलिमिटेड's picture

2 Aug 2016 - 4:24 pm | भटकंती अनलिमिटेड

टीसीएल ही OEM Manufacturer आहे. म्हणजे पूर्वी पिक्चर ट्युब बनवणारी ही एकमेव कंपनी होती. बाकी कंपन्या त्यांच्याकडून पॅनेल घेऊन बाकी असेंब्ली स्वतः बनवत असत. एखादा जुना बंद पडलेला टीव्ही उघडून पाहिल्यास टीसीएलची ट्य़ुब दिसून येईल. आताही ८०% फ्लॅटस्क्रीन (एलईडी/एलसीडी) टेलिव्हिजन्समध्ये पॅनेल सॅमसंगचे असतात.

DeepakMali's picture

2 Aug 2016 - 3:43 am | DeepakMali

स्कायवर्थ घ्या.. क्वालीटी आणि मस्त डिज़ाईन.. सोबत याचे मोडेल्स पण खिशाला परवडनारे आहेत .. 2 वर्ष झाली घेउन... फर्मास चालु आहे

DeepakMali's picture

2 Aug 2016 - 3:49 am | DeepakMali

Also available on amazon and snapdeal...

बय्राच टिव्ही स्क्रीनमध्ये spherical aberation (चित्रं/अक्षरे वाकडी होणे) असते.आरशातल्या प्रतिमा वाकड्या होतात तसे.आणखीही खोड्या असतात.फिलिप्स,सोनीमध्ये हे कमी केलेलं असतं.

स्वप्क००७'s picture

7 Aug 2016 - 10:37 pm | स्वप्क००७

LEECO चे नवीन TV बाजारात येणार आहेत. एकदा बघून घ्यावे.

http://in.lemall.com/in/index.html?ref=hp-head-home