हमखास हिट - दाल बाटी!

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in पाककृती
30 Jul 2016 - 7:10 am

कधी कधी माणसाला साधी सोपी पोळी-भाजी सोडून सुखाचा जीव भयानक कटकटीच्या गोष्टीत गुंतवायची हुक्की येते. आज तसाच एक दिवस होता.. दाल बाटीचा!

तर त्याचं असं झालंय की माझ्या आईच्या वडीलांकडुन, अण्णांकडुन, माझ्याकडे असंख्य गुण आलेत. त्यातला एक म्हणजे दाल बाटीची आवड! जगात अ‍ॅक्चुअली दालबाटी एका पद्धतीने करतात, माझी आई दुसर्‍या पद्धतीने करते, सासुबाई तिसर्‍या पद्धतीने करतात आणि मी... अंदाजपंचे करते!

लोक निखार्‍यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात. आपल्याला तसलं काही येत नाही. कारण आपल्याला एका लेकराला सांभाळून स्वयंपाक करायचा असेतो किनई.. मग असले टाईमपास परवडत नसतेत!

तर अंदाजपंचे थोडी कणिक, मक्याच पीठ आणि रवा घ्या. त्यात चवीपुरतं मीठ टाका आणि घ्या तिंबुन. तिंबलेल्या पीठाचे गोळे करुन घ्या. एका गोळ्याला तेल लावुन त्याची लंबुळक्या आकाराची पोळी लाटा. ह्या पोळीला तेल लावुन तिचा रोल करुन घ्या. रोलची दोन टोके एकत्र आणुन त्याची घडी घाला. ही झाली बाटी! (पहा फोटो!) ही बाटी करण्याची आमच्या माहेरची पद्धत. सासरी डायरेक्ट गोळाच बाटी म्हणुन घेतात. काही ठिकाणी बहुदा त्याला बाफले म्हणतात.

kanik bati 1

आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...!

हेल्दी रेसेपी आमच्या मातोश्रींची आहे. ह्यात बाट्यांना कुकरमध्ये उकडुन घ्या. आणि मग तुपात परतुन घ्या. कमी तेला/तुपात केलेली सात्विक डाएट बाटी!

सेक्सी रेसेपी आमच्या सासुबाईंची आहे. ह्यात काय करायचं की बाट्या डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकायच्या. नीट शिजल्या आहेत हे कसं कळणार? तर त्यात सुरी खुपसुन उचलुन पहायची. बाटी त्यावरुन निसटून खाली पडली आणि सुरीवरही बाटी लागलेली दिसली नाही तर शिजली म्हणायची. पण हा त्याचा सेक्सीनेस कोशंट नाहीये!!

cooking bathi cooling

ह्या बाट्यांना चांगलं निथळुन घ्यायचं. मग थंड करुन त्यांचे तुकडे करुन घ्यायचे. आणि हे तुकडे कुरकुरीत "तळुन" घ्यायचे. ही झाली सेक्सी बाटी!

frying

हा सगळा उद्योग चालु असताना बाजुला चिंच गुळाचं आंबट वरण करुन घ्यायचं. (आणि तळलेल्या बाट्या खायला आलेल्यांना हाकलुन लावायचं!)

ह्या बाट्या वडा सांबार सारख्या वरणात डुंबत टाकुन खायला मजा येते! माहेरी साध्या वरणासोबत खातात. किंवा गुळ तुपात कुस्करुनही खातात.

Daal Bati

कशाही खा, बाट्या कधीच चुकत नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं! ;)

प्रतिक्रिया

स्पा's picture

30 Jul 2016 - 7:22 am | स्पा

जबराट दिसतोय प्रकार

मुक्त विहारि's picture

30 Jul 2016 - 7:24 am | मुक्त विहारि

एक मिनिट उशीर झाला, अन.....

शेवटचा फोटो आकर्षक आहे.
हा प्रकार आमच्या बाजुला होत नाही. कधी खाल्ला ही नाही. कणकेचे गोळे बाफुन (आमच्यकडे बाफणे म्हणजे उकडणे) कसे लागतील याची कल्पना नाही. बोलव एकदा. :)

जाता जाता.. धागा वाचत असताना काही शब्द असे दाता खाली आले की क्षणभर चुकुन मी पल्याडच्या संस्थळावर तर नाही ना पोहोचलो असे वाटून गेले. ;)

चुकुन मी पल्याडच्या संस्थळावर

म्हणजे ३/१४ पिंपळझाड?

मुक्त विहारि's picture

30 Jul 2016 - 7:23 am | मुक्त विहारि

अगदी तळलेल्या बाटी सारखीच.

बादवे,

ह्या दाल-बाटी मेजवानीत पहिला पाट अडवून बसतो.

स्मिता_१३'s picture

30 Jul 2016 - 7:27 am | स्मिता_१३

मस्तच. करून बघणार !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 7:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा ! असं कनेक्शन आहे तर... चांगला प्रकार. सालं हा प्रकार आमच्या चिकुल्याच्या जवळचा वाटतो. पुपाशु.

-दिलीप बिरुटे

आदूबाळ's picture

30 Jul 2016 - 12:19 pm | आदूबाळ

हेच लिहायला आलो होतो. चि/चकुल्या उर्फ वरणफळं अशीच असतात.

सांगली कराडकडे चकोल्या आणि गुजरातकडे दालढोकली.

उडन खटोला's picture

30 Jul 2016 - 1:15 pm | उडन खटोला

चकोल्या म्हणजे लाटलेली पोळी शंकरपाळी सारखे किंवा अगदी छोट्या गोल बिस्किटाएवढे तुकडे करुन उकळत्या आमटीत टाकायचे आणि शिजवायचे.

बाटी किंवा बट्टी आक्खा कणकेचा गोळा उकडणे/भाजणे/ तळणे वगैरे ना???

चंपाबाई's picture

30 Jul 2016 - 1:29 pm | चंपाबाई

चकोल्या चौकोनी कापून वरणात शिजवतात.

बाटी चुलीत भाजतात.. शिजवुन फ्राय करणे हे त्याचे मॉडर्न वर्जन आहे. दाल वेगळी शिजवतात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 2:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>चकोल्या चौकोनी कापून वरणात शिजवतात
चंपाबै, चकोल्या नुस्त्या उकड़ून घेतात राव. वरण कुठून आलं यात......

-दिलीप बिरुटे

चंपाबाई's picture

30 Jul 2016 - 3:51 pm | चंपाबाई

चपातीच्या गोलाचे चकोल्या कापून घेतात.

तुरीचे वरण शिजत ठेवतात , घोटतात . त्यात चकोल्या सोडुन ते वरण शिजवुन त्यात ते तुकडे शिजवतात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 2:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थांबा ! आमच्याकडच्या चिकुल्या लवकरच टाकतो. कब है नाग पंचमी ? उस दिन हमारे पास चिकुल्या बनत्या है. इनके व्हर्जन में मक्याचं पीठ और रवा होता है हमारा पीव्वर गेहू के आटे के होते है.

आवं पाकृ लेखिकेचा अभ्यास कमी पड़तोय. उदा. शी सेज
"लोक निखार्‍यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात" अरे भाऊ त्याला वरिजनल शब्द आहे, रोडगा. त्याला बाफल्या (ळ) म्हणतात.

-दिलीप बिरुटे

सत्वर पावगे मला, मरीआई रोडगा वाहीन तुला. ह्येच्यातला रोडगा असा असतोय व्हय.
धन्यवाद मरीआई, धन्यवाद प्राडो सर.

किसन शिंदे's picture

30 Jul 2016 - 3:00 pm | किसन शिंदे

हो हे ऎकलंय आधी. बहुतेक एकनाथांचं भारूड ना?

बाकी भारूड प्रकार आपल्याला लय आवडतो. सर काय म्हणता? धागा येवूद्या यखादा भारूडावर..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 4:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवा, नाथांच्या गवळणी आणि भारुडावर कोणी तरी लिहिलं पाहिजे

सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडाफडा बोलति । बोडकी कर गं तिला ॥४॥
नणंदेचं पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥६॥
एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥७॥

सासु, सासरे,जाऊ, नंदेचं पोर, हे काम, क्रोध ,मोह, मत्सर आहेत या सर्वांना जाऊ दे, असा त्याचा अर्थ.

नाथांच्या काळात रोडगे होतेच तर....असो.

-दिलीप बिरुटे

वाह्ह्ह्ह्ह सरजी. भारीच आहे हे.
चंदाताई तिवाडींचे भारुड ऐकलेले. एक वारीत पारंपारिक ऐकलेले. जास्त नाही पण हा साहित्याचा प्रकार जब्बरदस्त आहे. भारुंड (केएसआर्टीसी चा लोगो वरचा दोन तोंडाचा पक्षी) वरुन आलेले ना भारुड?

बोका-ए-आझम's picture

1 Aug 2016 - 1:56 pm | बोका-ए-आझम

या शब्दांचा अपभ्रंश भारूड असा झालेला आहे. भारुंड पक्ष्याबद्दल माहित नाही.

चंपाबाई's picture

30 Jul 2016 - 3:46 pm | चंपाबाई

सत्वर पावगे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Jul 2016 - 3:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

त्यो रोडगा वायला, बाजरीच्या जाड भाकरीलापण रोडगा म्हणतेत, आमच्याकडे रोडगा म्हणजे इमू/शहामृग अंड्याचे आकाराचा असतो, गोवरीच्या आरात (विस्तुत) भाजलेला, जबरदस्त तिखट वांगे भाजी सोबत तुरीचे वरण सलाद अन भात असा बेत शेतांत झडतो हिवाळ्यात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 10:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>बाजरीच्या जाड भाकरीलापण रोडगा म्हणतेत...

बापू ही माहिती मात्र माझ्यासाठी नवीन आहे. पण बाजरीची भाकर खूप जाड नाय होऊ शकत, कारण ती जाड्सर भाकरी तव्यावर पोहोचायच्या आधी कोलमडून जाईल, असं वाटतं.माझी आज्जी परातीत धपं धपं थापायची. तव्यावर पाणी मारलं की तव्यावर टाकायची. तिथुन काढली की चुलीच्या तोंडाला ठेवायची. माय गॉड कसली कड़क भाकर अन तो पापड़ लागायचा माय गॉड.

आज्जी गेली अन तशा भाकरीही गेल्या. :(

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

1 Aug 2016 - 9:41 am | नाखु

जाडसर भाकरीसमान असतो आणि आकाराने अंमळ भाकरी पेक्षा लहानच असतो.

गजानन महाराजांचे जयंती निमित्त याचा प्रसाद वाटला जातो त्यामुळे माहीत आहे.

रोडगा, वरणफळे उर्फ चकोल्या उर्फ डाळफळे (हे सर्व घरी) आणि डालबाटी (बाबा राम्देव ढाब्यात,मिपा प्रभुतींसमवेत)

खाल्लेला रोकडा नाखु

Nitin Palkar's picture

1 Aug 2016 - 8:45 pm | Nitin Palkar

भवानी आइ रोडगा वाहीन तुला मुळ भारुडात मरि आई नसुन भवानि आई आहे. 'नन्डेचे कार्ट किर्किर कर्ते खरुज होउ दे त्याला भवानी आइ रोडगा वाहीन तुला' अशी त्यातली पुढ्चि ओळ आहे.

मप्र ,राजस्थान,जळगावकडचा भाग इकडे फार खातात थंडीत.तीनही प्रकार सेक्सी का काय दिसताहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 7:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काका, तुम्ही तरी बाट्यांना सेक्सी वगैरे शब्द नका हो वापरु, सेक्सी शब्दाची आपली एक खासियत आहे, आम्हा तरुणांना त्याचा त्रास होतो.

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2016 - 8:07 am | पिलीयन रायडर

बाट्यांना चिकुल्यांच्या जवळपास म्हणताय तर "सेक्सी"च्या आपल्या डेफिनिशन नक्कीच वेगवेगळ्या आहेत बिरुटे काका!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 8:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्रोबर गं काकू !

-दिलीप बिरुटे

सेक्सी या एका कल्पक शब्दाने पिरा काकुंची पाक्रु शतक गाठेल
कल्पकता हवी तर अशी ;)

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2016 - 9:11 am | पिलीयन रायडर

मग क्रेडिट नवर्‍याला द्यावं लागेल. मला हेल्दीवाल्या करायच्या होत्या.
"पण.... तळलेल्या "सेक्सी" लागतात!" ह्या त्याच्या अर्ग्युमेंटपुढे शब्द तोकडे पडल्याने अशा केल्या.

बाकी शतकाला आमची ना नाही! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 2:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाकृ हेल्दी आणि सेक्सी असेल तर मला हेल्दी पाकृ आवडते. मला कोणी विचारलं नै पण आपलं सांगून ठेवलेलं बरं...!

-दिलीप बिरुटे
(हेल्दी)

>>आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...!>>
या वाक्याला धरूनच मी प्रतिसाद दिलाय हो.काय म्हणतात ना ज्ञानेश्वरीतले शब्द कळले नाहीत तर पुढचा जन्म घ्यावा लागतो तसे आहे.
दुसरी एक शक्यता - पाहुणे लोक कधीकधी पाककृतीवरून गृहिणींची स्तुती करताना जन्क्शन उपमा देतात.मग त्याच नावाने प्रसिद्धी होते.आता आमच्या तब्येतीला धरून काल एक मिसळीची वानगी खफवर टाकली होती आणि तुम्ही खफ सोडायला एकच गाठ पडली.

त्रिवेणी's picture

30 Jul 2016 - 8:36 am | त्रिवेणी

एकदम खतरी ग पिरा. या बरोबर वांग्याची घोटलेली भाजी पण करत जा.

सप्तरंगी's picture

1 Aug 2016 - 9:42 pm | सप्तरंगी

कशी करतात वांग्याची घोटलेली भाजी??

डाळ-बाटी ओव्हन मध्ये बेक करून पहा, छान होते.

तुम्ही बाट्या तुपात भिजवत ठेवत नाही का?

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2016 - 8:51 am | पिलीयन रायडर

गुळासोबत कुस्करुन खायच्या असतील तर ठेवतो. फोडणीच्या वरणासोबत असतील तर वरणात भिजव्तो, वरुन तुप सोडतो.

चंपाबाई's picture

30 Jul 2016 - 9:01 am | चंपाबाई

चित्रात तीनपैकी एक पीठ पिवळे आहे. ते कोणते ?

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2016 - 9:03 am | पिलीयन रायडर

मका. पण त्याशिवाय नुसत्या कणिक आणि रव्याच्याही चांगल्या होतात.

चंपाबाई's picture

30 Jul 2016 - 9:58 am | चंपाबाई

मक्याचे पीठ इतके पिवळे असते? कॉर्न फ्लोअर म्हणजे हेच पीठ ना?

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2016 - 10:12 am | पिलीयन रायडर

ओ नाही.. ते म्हणजे मैद्यासारखे असते. मला वाटतं कॉर्न स्टार्च. (चु.भु.दे.घे.). ते चिकट असते. शिजवले की घट्ट होते. सुप वगैरे मध्ये वापरतात.
हे सरळ मक्याचे पीठ आहे. गिरणीतुन वाळवलेला मका दळुन आणता येतो किंवा सरळ मिळते बाजारात.

चंपाबाई's picture

30 Jul 2016 - 10:51 am | चंपाबाई

धन्यवाद.

अज्ञान दूर केल्याबद्दल धन्यवाद

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

30 Jul 2016 - 9:02 am | खालीमुंडी पाताळधुंडी

f

चान चान

आनन्दिता's picture

30 Jul 2016 - 9:10 am | आनन्दिता

अग्गायायाया!! पिराबाई तुम्ही हिते पाकॄ मधे कशाकाय कडमडलात?

आणि कं लिवलंय! मजा आली. तुझ्याइथे येऊन चव बघितल्यावर पुढचा प्रतिसाद लिहीण्यात येईल.

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2016 - 9:12 am | पिलीयन रायडर

मंग या की!! तुम्ही येऊ पण शकताल..

किसन शिंदे's picture

30 Jul 2016 - 10:10 am | किसन शिंदे

मस्त आहे

दिसण्यात तर नाही, कदाचित खाण्यात सेक्सी लागत असाव्यात.

करून पाहायला हवा हा प्रकार

खटपट्या's picture

30 Jul 2016 - 10:32 am | खटपट्या

सेक्सी!!

सस्नेह's picture

30 Jul 2016 - 10:47 am | सस्नेह

तशी सोपी दिसते. फक्त वेळखाऊ आहे !
बाकी ते सेक्सी बिक्सी आपल्याला काय समजत नाय. उचल की हाण्ण ....!

साती's picture

30 Jul 2016 - 1:34 pm | साती

सेक्सी म्हणजे तेच हो!
उचल की हाण्ण!
;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 9:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण ही पाककृती तशी दिसत नाही. ओढून ताडुन म्हणायचं असेल तर मग ठीक आहे.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

30 Jul 2016 - 10:33 pm | किसन शिंदे

याच्याशी मात्र सहमत हं

साती's picture

31 Jul 2016 - 9:38 am | साती

मी फक्त शब्दाचा अर्थ सांगितला!
;)

असं कसं म्हणता? सरळ गोळे न करता लांबुडकी पोळी,त्याची वळकटी,त्याचे मुटके करायचे म्हणजे सेक्स अपील वाढलाच की.

पैसा's picture

30 Jul 2016 - 11:32 am | पैसा

लै भारी!

उडन खटोला's picture

30 Jul 2016 - 12:13 pm | उडन खटोला

दालबाटी प्रकार मुदलात आवडत नाही त्यामुळे नो कमेंट पण लिखाणाची इस्टाईल आवडली.

नीलमोहर's picture

30 Jul 2016 - 12:42 pm | नीलमोहर

सकाळीच इच्छा झाली म्हणून वरणफळं (पुणेरी), चकोल्या, चिखोल्या (खानदेशी) ची तयारी करून ठेवली,
इथे येऊन पाहिलं तर हे, पण ते तळून बिळून काही करावसं वाटत नाहीये त्यामुळे नेहमीच्या पध्दतीने डाळीत
शिजवून करणार.

आमचे एक अकोलेकर मित्र आणि वहिनीने खास टेरेसवर चूल तयार करून चुलीवर भाजून बाट्या आणि दाल
केली होती त्याची आठवण झाली, सोबत वांग्याचा मसालेदार रस्सा, एक नंबर टेरेस पार्टी झाली होती ती !!

आनंदी गोपाळ's picture

30 Jul 2016 - 1:47 pm | आनंदी गोपाळ

सध्या इथेच हा झब्बू घ्या.

वर दिली आहे ती मारवाडी/राजस्थानी पद्धतीची 'बाटी' आहे.

खाली देतोय, ती आहे ऑथेंटिक खानदेशी बट्टी.

जाड दळलेली कणीक, नसेल तर घरातल्या कणकेत सुमारे एक पंचमांश प्रमाणात रवा मिक्स करून घट्ट भिजवणे. भिजवताना त्यात थोडं तेल, मीठ, हळद व ओवा टाकाव्यात. वर तयार केल्या तशाच बट्ट्या हातानेच तयार करून मग त्या गोवर्‍यांच्या निखार्‍यात भाजाव्यात.

भाजून बाहेर काढलेल्या बट्टीची राख झटकून तिला साजुक तुपात आंघोळ घालावी, व बट्टी कुस्करून घट्ट साधे वरण, व तिखटजाळ वांग्या-बटाट्याच्या रश्शासोबत बेत बसवावा.

(सोबत दिसताहेत त्यातला जास्त लालसर पापड नागलीचा आहे, पांढुरकी आहे ती ज्वारीची बिबडी. आयता निखारा तयार असल्यावर पापड भाजलेच पाहिजेत. नाही का?)

आनंदी गोपाळ's picture

30 Jul 2016 - 1:48 pm | आनंदी गोपाळ

वरच्या फोटोत बट्टी सोबत दिसताहेत त्यातला जास्त लालसर पापड नागलीचा आहे, पांढुरकी आहे ती ज्वारीची बिबडी. आयता निखारा तयार असल्यावर पापड भाजलेच पाहिजेत. नाही का?

नुसती जळजळ.

एस.योगी's picture

30 Jul 2016 - 4:29 pm | एस.योगी

बिबडी, खारोडी, निगाळन (नागलीचे कोंड्याचे) पापड म्हणजे निव्वळ दांगडो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 2:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्तय आवडेश.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

30 Jul 2016 - 3:02 pm | सस्नेह

तेवढा तुपातला पीस इकडे टाका !

किसन शिंदे's picture

30 Jul 2016 - 3:02 pm | किसन शिंदे

अहाहा!! कसली जबराट दिसतेय ही आॅथेन्टीक खानदेशी बाटी..शेक्शी एकदम.

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2016 - 6:09 pm | पिलीयन रायडर

अहो मरीन की मी असले फोटो पाहुन!!!!!!!!!!!!

राही's picture

31 Jul 2016 - 8:25 am | राही

ह्या बाट्या किती नाजुक, किती सुघड, कसा टॅन्ड गहू वर्ण, कशा सुस्नात. (तुपात) अति मेदक, अति मादक.
या पाहताच बाट्या कलिजा खलास झाला!.

टामोलीयन's picture

1 Aug 2016 - 9:08 am | टामोलीयन

हेच शोधत होतो राव ! आमच्या विदर्भातील पानगे ! डिट्टो हेच. फक्त शेवटी ते तुपाचे लाड पानग्यांवर नाही, तसाठी असते ते घट्ट तुरीच्या डाळीचे वरण. वर धो धो तुप. व सोबत मस्त तर्रीवाली वांग्याची भाजी ओरपायला.. अहाहा ... बाकी तूप येथे अनिवार्य आहे, नाहीतर दुस-या दिवशी जळजळ नुसती.. :)

पैसा's picture

1 Aug 2016 - 9:23 am | पैसा

अजून गोंधळ! आमचे पानगे म्हणजे पानात भाजलेली तांदुळाच्या पिठाची भाकरी. कधी गोड असते तर कधी तिखट.

1

हे पानगे खाल्लेत.शहाळ्याची चटणी.पचायला हलके.
पान कोणते केळी/कर्दळीचे?

सुबोध खरे's picture

2 Aug 2016 - 10:01 am | सुबोध खरे

आमची आई हळदीच्या पानात करते आणि तिला आम्ही पानगी म्हणतो. गरम गरम पानगी तूप आणि गुळाबरोबर लहानपणी नाश्त्याला खात असू. परत आईला सांगायला हवे पानगी कर म्हणून. ( बायको देशस्थ असल्याने तिला हा प्रकार माहित नाही).

केळ्याच्या पानात पानगी.

हळदीच्या पानात पातोळे.

असं आहे.

-(कोंकणी) गवि

पैसा's picture

2 Aug 2016 - 11:36 am | पैसा

पातोळे/पातोळ्या हे पानगीपेक्षा खंप्लीट वेगळे प्रकार आहेत. पानग्या हा अगदी सोपा साधा प्रकार. आणि हळदीची पाने उपलब्ध नसतील तर केळीची पाने वापरायची. फणसाच्या पानातही पातोळ्या, इडल्या वाफवतात. चिक्कार प्रकार आहेत.

गवि's picture

2 Aug 2016 - 11:56 am | गवि

पातोळे/पातोळ्या हे पानगीपेक्षा खंप्लीट वेगळे प्रकार आहेत.

हेच म्हणण्याचा उद्देश आहे. डो. साहेबांच्या प्रतिसादवरुन मला पातोळ्यालाच पानगी म्हटल्यासारखं वाटलं म्हणून.

पातोळे बरेच जास्त कॉम्प्लिकेटेड असतात. काकडीच्या रसात पीठ भिजवून वगैरे. पानगी केळ्याच्या / कर्दळीच्या पानातच पाहिली होती. हळदीच्या पानात पानगी पाहण्यात आली नव्हती. हळदीचं पान पातोळ्यासाठीच असं समीकरण होतं. शिवाय पातोळा फक्त वाफवतात आणि पानगी तव्यावर भाजतात हा मुख्य फरक माहिती होता.

पैसा's picture

2 Aug 2016 - 12:35 pm | पैसा

पण हळदीच्या पानाबद्दल ते म्हणाले ते बरोबर. पानगी करताना सुद्धा हळदीची पाने असतील तर त्यानाच प्रेफरन्स असतो.

सुबोध खरे's picture

2 Aug 2016 - 12:40 pm | सुबोध खरे

पातोळे बरेच जास्त कॉम्प्लिकेटेड असतात. काकडीच्या रसात पीठ भिजवून वगैरे. पानगी केळ्याच्या पानातच
यु आर "राईट्ट" गवि शेट
थोडा गोंधळ झाला होता. आता तुम्ही सांगितले तेंव्हा हा गोंधळ दूर झाला.
धन्यवाद

पैसा's picture

2 Aug 2016 - 10:39 am | पैसा

हे हळदीचे पान. डॉक्टर म्हणतात तसे हळदीच्या पानात किंवा केळीच्या पानात करतात. पानगी/पानगा दोन्ही ऐकले आहे.

एक वेगळा धागा होऊ दे सोवळा ( सेक्सीच्या शिक्क्याने पाचशे प्रतिसाद नाही झाले तरी चालतील) एक रेकॅार्ड होईल कोकणातल्या या वानग्यांचे.पुढची पिढी हे खाणार नाहीच अथवा फेसबुकातल्या पोस्टीपर्यंतच लाइक्स.
पातोळे,पानग्या,खांडस: काजू मनुका खोबरे ओली हळद घालून,पहिल्या पावसात वाडीला नेवेद्य करतात तो वाडुलं गोडुलं,कोळाचे पोहे- फोटो भरपूर टाका.

सामान्य वाचक's picture

3 Aug 2016 - 10:51 am | सामान्य वाचक

पैताई, प्रीमो, गवि।
आणि जे कुणी कोंकणी पदार्थ जाणत असतील ते
यांनी 1 मस्त धागा काढा त्यासाठी

आनंदी गोपाळ's picture

2 Aug 2016 - 1:21 pm | आनंदी गोपाळ

मास्टरशेफ़ इंडियाच्या एका एपिसोड्मध्ये स्वीटकॉर्नची पाने वापरून पानगी केलेली पाहिली. आयडिया आवडली होती.

आनंदी गोपाळ's picture

2 Aug 2016 - 1:21 pm | आनंदी गोपाळ

(स्वीट कॉर्नचे कणीस सोलून जी पाने निघतात ती. मक्याच्या झाडाचे पान नव्हे. )

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Aug 2016 - 1:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

तमाले नावाचे असे इथे समजले

ब़जरबट्टू's picture

2 Aug 2016 - 3:25 pm | ब़जरबट्टू

हो, पानगे शब्द ऐकलाय रोडग्यासाठी नागपूरला. अर्थात फक्त म्हणत असतील. यांचा आणि पानांचा तसा काही संबंध येत नाही..

राही's picture

1 Aug 2016 - 9:24 am | राही

नका हो अशा नाजुक, गोल वळणाच्या टुमटुमीत बाट्यांना असा मेदाचा शाप देऊ. 'मादक'च राहू दे. 'मेदक' नका करू!

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Aug 2016 - 11:27 am | कैलासवासी सोन्याबापु

बाट्यांवरील राख झाडायची गुजराती/राजस्थानी पद्धत

बाट्या झगरातून (विस्तवातून) काढल्या की एका स्वच्छ सुती कापडात ठेऊन त्याचे गाठोडे करावे अन ते खसाखस हलवावे, सगळ्या बाट्या स्वच्छ होऊन जातात पूर्ण राख निघून जाते

महासंग्राम's picture

3 Aug 2016 - 12:39 pm | महासंग्राम

बाप्पू गावची याद आली मले, गावाकडं हनुमान जयंतीच्या भंडारा असे तेव्हा मंदिरावर म्हणून रोडगे, वांग्याची रस्सा भाजी, वरण आणि गावरान तूप असायचं. त्या टायमाले बम्म खायचो रोडगे. आता हनुमान जयंती ले जाण होत नाही राजेहो गावाले. या सायच्या कामानं सगळी जिनगानी बर्बाद करून टाकली.

कंजूस's picture

30 Jul 2016 - 2:43 pm | कंजूस

कुरमा बाटीही असते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2016 - 2:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तपशील प्लीज.

-दिलीप बिरुटे

आनंदी गोपाळ's picture

30 Jul 2016 - 2:53 pm | आनंदी गोपाळ

त्यांना बहुतेक चुरमा म्हणायचाय. आमच्या मारवाडी मित्राकडे दाल बाटी चुरमा असा टिपिकल बेत असतो.

कुरमा नव्हे ते चुरमा हवे.
बाटीचे मोठे गोळे केले की आत कच्चे राहू शकतात म्हणून चुरमा प्रकार करत असावेत.सोळा सोमवारच्या व्रताला जो चुरमा करतात तो बाटीच्या आत भरतात.राजस्थान /मप्र कडे जेवण मागवले तर दोन प्रकारचे असते.एकात नेहमीच्या जेवणात दोन बाटी आणि पंचरत्न डाळ( पाच डाळींचं घट्ट वरण, माउंट अबू )देतात अथवा सहा बाट्यांची वेगळी थाळी मिळते.दोन बाटीवाली थाळीच घ्यावी,आवडल्यास आणखी बाटी घ्यायची.नवख्यांनी शक्यतो थंडीतच खावी.मप्रतल्या बाटींना बाफलेच म्हणतात त्यात चुरमा नसतो.

रोडगा: लहानपणी सांगलीत गेलेलो देवळात.तिथला हत्ती पाहाताना पो पडल्यावर एक माणूस ते गोळा करून ठेवत होता त्याला विचारले तर म्हणाला " हे वाळवून ठेवतो आणि ते जाळून त्यावर रोडगे भाजतो. ते जाड असतात आणि हत्तीला फार आवडतात.नुसत्या केळ्या, उसाने काम भागत नाही.

सुबोध खरे's picture

2 Aug 2016 - 10:16 am | सुबोध खरे

मी राजस्थानात मारवाड मध्ये ( जोधपुरला) असताना तेथे दाल बाटी बऱ्याच ठिकाणी खाल्ली आहे ती नीलकांत यांनी लुइहिलेल्या लेखातील असते तशीच आहे.
दाल बाटी खाण्याची पद्धत म्हणजे बाटी फोडायची त्यावर तुपाची धार धरायची. बाटी तुपात पूर्ण भिजली कि त्यात घट्ट डाळ ओतायची आणि मग ते मिश्रण खायचे. हीच पद्धत मेवाड मध्ये हि आहे( उदयपूर चित्तोड गढ कडे).
चुरमा हा गव्हाच्या जाड पिठाचा शिरा सारखा असतो किंवा त्याचे लाडू बांधले तर चुरमे के लड्डू हा प्रकार गोड असतो आणि त्यात भरपूर तूप घातलेले असते. लाडू पिळला तर तुपाची धार लागेल इतके. http://www.tarladalal.com/Churma-Ladoo-2045r
एकदा दोन दाल बाट्या आणि एक चुरमे का लड्डू मारवाडी पद्धतीने( भरपूर तूप घालून) खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत तुपाची ढेकर येत होती.
जोधपूरला मिरची वडे मिळतात आणि त्याबरोबर माव्याची कचोरी. हि कचोरी म्हणजे गुलाबजामचा खवा मैद्याच्या कचोरीत भरून शुद्ध तुपात तळलेली असते
एक मिरची वडा आणि अर्धी कचोरी संध्याकाळी खाल्ली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीही मला भूक लागली नव्हती. तरी बरं महिना डिसेंबरचा होता.
एकंदर मारवाडी लोक तुपकटच

सामान्य वाचक's picture

30 Jul 2016 - 3:14 pm | सामान्य वाचक

कधी केली नाही
बाहेरच खाल्ली आहे