या मंगळवारी मी काही कामानिमित्त बदलापूर ला गेलो होतो. तेव्हा रिमझिम पाऊस बरसत होता. सृष्टी हिरवेगार वस्त्र नेसून अतिशय सुंदर दिसत होती. मग काय? ठरवले बारवी धरण परिसर पाहण्याचे. त्याआधी काही मित्रांबरोबर गप्पा मारताना या मोसमात बदलापूर जवळील परिसर किती सुंदर असतो ही माहिती मिळाली.
तसेच बदलापूर हे नाव कसे पडले याची रंजक माहिती मिळाली ती अशी: शिवाजी महाराज रायगडावरून सुरत किंवा त्या दिशेला स्वारी करताना याच दिशेने येत. तेव्हा त्याचे घोडे अतिशय थकलेले असत. मग याठिकाणी घोडे बदलले जायचे आणि मग सुरत कडे प्रयाण सुरू. यावरून या ठिकाणाला बदलापूर असे नाव पडले. रंजक वाटले मला हे कळल्यावर!
सकाळी ११ च्या आसपास कंजूस काकांना फोन केला आणि १ वाजता आम्ही बदलापूर ला भेटलो. बदलापूर पश्चिमेला एस टी स्थानक आहे. तेथून मुरबाड ला बस आहेत. बारवी धारण मार्गे जाणारी बस पकडली आणि आमचा प्रवास सुरू! बदलापूर गावाबाहेर पडल्यानंतर बसमधून दिसणारा निसर्ग दृष्ट लागण्याजोगाच! जेमतेम १८ किमी वर बारवी धरण लागते. बारवी धरण हे कल्याण आणि नवी मुंबईला पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. सव्वीस जुलै च्या प्रलयंकारी पावसावेळी धरण पूर्ण भरले होते आणि पाणी कल्याण भिवंडीत खांद्यापर्यंत साचले होते. धरणाचा परिसर वृक्षवैविध्याने नटाला आहे. भोकर , मोह आणि इतर झाडे येथे भरभरून आहेत. धरण मोठे आहे. रिमझिम पावसामुळे या भागात फिरण्यास मजा आली . विशेष म्हणजे शनिवार रविवार न जाता आम्ही मंगळवारी भेट दिल्यामुळे गर्दी आणि हुल्लडबाजी टाळून निसर्ग जवळून बघता आला. तिथे एक स्थानिक रहिवासी आताच्या मोसमात येणाऱ्या भाज्या गोळा करत होते. कंकाकांनी या भाज्यांबद्दल लिहावे अशी विनंती. सध्या नुकताच पाऊस सुरू असलेने आजूबाजूला थोडे पाण्याचे झरे पाहिले.
एकंदरीतच सुट्टी नसलेल्या दिवशी संवड काढून अशी ठिकाणे पाहणे उत्तम! पण हे कर्णोपकर्णी करु नका हं!
फोटो देत आहे. बाकीचे फोटो कंकाकांनी द्यावेत अशी त्यांना विनंती करतो .
रस्ता:
धरण
कंकाकाका आणि मी
परिसर
रहिवासी आणि भाज्या
प्रतिक्रिया
1 Jul 2016 - 4:41 pm | यशोधरा
मस्त! फक्त फोटो रिसाईझ करुन घ्या, असं सुचवते.
1 Jul 2016 - 4:41 pm | अजया
छान भटकंती.लहानपणी बारवी धरणाला काकाचे बोट पकडून जात असू! कोंडेश्वर पण मधल्या दिवशी बघण्यासारखं ठिकाण आहे बदलापुरातलं.शनि रवि मात्र भयानक!
15 Jul 2016 - 9:36 am | चौकटराजा
म्हातारपणी मी " पांडूकाका" चे बोट धरून जाणार आहे !
15 Jul 2016 - 11:33 am | स्पा
:प
15 Jul 2016 - 3:10 pm | सूड
पांडूकाकाचं बोट धरुन जायला वेटिंग लिस्ट लागली आहे म्हणे?
1 Jul 2016 - 4:44 pm | टवाळ कार्टा
तो ओढा डुंबायला कस्ला मस्त आहे
14 Jul 2016 - 6:57 pm | सूड
आमच्या घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर असा ओढा होता, आता तिथे मोठा हायवे झाला आहे.
1 Jul 2016 - 5:48 pm | शान्तिप्रिय
सर्वांना मनापासुन धन्यवाद!
1 Jul 2016 - 5:56 pm | कंजूस
फोटो टाकतो नंतर.
डॅम नाक्यावर वडा चहा मस्त मिळतो.( वडा प्लेट दहा रुपये , मिरचीखरडा फुकट ).
1 Jul 2016 - 5:57 pm | प्रचेतस
कंंजूसकाकांबरोबर भटकायला जाम मजा येते. चालता बोलता बरीच माहिती मिळत जाते.
3 Jul 2016 - 9:24 am | बोका-ए-आझम
मला भटकायचा योग आला नाही पण शिवडीला फ्लेमिंगो महोत्सवाला ते, मी आणि नूलकरकाका होतो. एका तासात केवढी माहिती दिली दोघांनी! _/\_
1 Jul 2016 - 6:00 pm | पद्मावति
खूपच छान भटकंती.
1 Jul 2016 - 6:06 pm | मुक्त विहारि
डोंबिवली पासून बदलापूर, आम्हाला तरी जास्त दूर नाही.....इतक्या जवळच्या गावात येवून देखील, शांतिप्रिय ह्यांची भेट न झाल्याने खंत वाटत आहे.
असो,
नेक्स्ट टाइम परत एकदा शांतिप्रिय ह्यांच्या बरोबर कट्टा करू.
1 Jul 2016 - 6:49 pm | शान्तिप्रिय
धन्यवाद मुवि
आपण ऑगस्ट्मध्ये किंवा त्याआधी भेटुच! मी कळवितो तुम्हाला येथे येणे असल्यास!
2 Jul 2016 - 9:58 am | मुक्त विहारि
ऑगस्ट मध्ये नक्की भेटू.
2 Jul 2016 - 9:56 am | कंजूस
फोटो
१ ) नदी
२ )
३)
४)
५) data gprs
2 Jul 2016 - 10:24 am | प्रचेतस
मी वेगळंच काहीतरी ऐकलंय.
ब्रिटिशांनी जेव्हा रेल्वे सुरु केली तेव्हा इथे रेल्वे रुळांचे सांधे बदलले जाऊन गाडी ट्रॅक चेंज करायची त्यामुळे त्या ठिकाणाला बदलापूर म्हणायला लागले.
2 Jul 2016 - 10:38 am | नाखु
आप्ल्या (देशी) इतीहासावर विश्वास नाही हेच वाटायला लागले आहे. सगळ इंग्रजांवर विश्वास ठेऊन.
अधे मधे देशीही घेत जा (माहीती)
कंजूस काकांना बरीच आडवाटेवरची ठिकाणे (आजायच्या सोप्या आणि कमी खर्चीक वाटांसह माहीती आहेत असे दिसते.
चित्रे लांबवली गेलीत का मलाच दिसतात? .
ता.क.ही सर्व चित्रे दिसली याचा आनंद आहे.
2 Jul 2016 - 10:39 am | प्रचेतस
तो प्रश्न नाही.
'बदल' हा शब्द शिवकालीन महाराष्ट्रात प्रचलित होता (किंवा अस्तित्वात होता) असे मला वाटत नाही.
14 Jul 2016 - 2:28 pm | सूड
मग कोणता शब्द प्रचलित असावा 'असं तुम्हाला वाटतं?
14 Jul 2016 - 4:37 pm | स्पा
=))
15 Jul 2016 - 4:16 pm | चौकटराजा
अगदी बरोबर ! शिवकालात हा शब्द नव्हताच. तो अलिकडे पुण्यातील एका लग्न समारंभात जन्माला आला. आपण आता म्हणतोच ना बुवा 'बदल' लेत म्हणून.
2 Jul 2016 - 10:40 am | शान्तिप्रिय
नावाबद्दल आणखि ही काही आख्यायीका असतिल.
2 Jul 2016 - 11:55 am | गौतमी
ती चॉकलेटी कळीसारखी भाजी आहे तीच नाव 'शेवाळं' आहे. दुसरी माहीत नाही कोणती आहे ते.
3 Jul 2016 - 10:03 am | कंजूस
त्याच कंदातून( सुरणासारखा कंद कोणी खात नाहीत ) हा दुसरा तुरा पानांचा निघतो.पहिल्यातून फूल निघते.
2 Jul 2016 - 11:56 am | गौतमी
शेवळं
13 Jul 2016 - 10:34 pm | पीशिम्पी
डॅम चा फोटो नाहीये (जलाशयाचा)?
14 Jul 2016 - 2:35 pm | कंजूस
प्रतिसादातला तीन नंबरचा फोटो जलाशयाचा आहे.चार नंबरच्या फोटोतला रस्ता वळून धरणाच्या भिंतीच्या डाव्या टोकाजवळून जातो तिथून फोटो काढता येतो.तसं पाहिलं तर आता कोणत्याच धरणाच्या भिंतीवर जाता येत नाही.धरण बहुतेक सप्टेबरात भरते आणि ओवरफ्लो फार सुंदर असतो.सर्व बाजूने पाहता येते.
14 Jul 2016 - 5:42 pm | रघुनाथ.केरकर
यन्दा मात्र उशीरा भरेल, कारण उन्ची वाढवलीय धरणाची ,पण पाण्लोट क्षेत्रात असाच पाउस सुरु राहील्यास मात्र सप्टेबर च्या आधीसुद्धा भरु शकते.
14 Jul 2016 - 10:05 am | वेदांत
छान लेख..
14 Jul 2016 - 11:06 am | शान्तिप्रिय
जलाशयाचा जवळुन फोटो घेतला नाहि.
त्यावेळी नुकताच पाऊस सुरु झाल्यामुळे फार पाणी नव्हते.
14 Jul 2016 - 11:34 am | प्रमोद देर्देकर
खुप छान. पण धरणाजवळ जायला बंदी आहे ना.
14 Jul 2016 - 2:38 pm | कंजूस
तलावाच्या मागच्या बाजूने मुरबाड म्हसा कर्जत रस्ता जातो,रस्त्यापलिकडे सिद्धगड गोरख मच्छिन्द्र आहेत.
14 Jul 2016 - 5:55 pm | रघुनाथ.केरकर
14 Jul 2016 - 5:56 pm | रघुनाथ.केरकर
आता?
14 Jul 2016 - 6:31 pm | रघुनाथ.केरकर
14 Jul 2016 - 6:32 pm | रघुनाथ.केरकर
14 Jul 2016 - 6:36 pm | रघुनाथ.केरकर
14 Jul 2016 - 9:12 pm | कंजूस
फोटो मस्त, रघुनाथ .केरकर.
15 Jul 2016 - 10:48 am | रघुनाथ.केरकर
_()_
15 Jul 2016 - 12:23 pm | जागु
ती शेवळ आहेत आणि दुसरी भाजी पण शेवळ फुटल्यावर उगवतो तो पाला आहे.