पावसात भिजलेली बाईक चालू कशी करावी ?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
9 Jul 2016 - 12:30 am
गाभा: 

मंडळी....

आताच चांगला तासभर बाईकला किका मारून आलो आहे... गेले २ आठवडे तिला चालू केले नव्हते...पावसात स्पार्क प्लग भिजल्याने आता ती अजिबात चालू व्हायचे नाव घेत नाही.... कंपाउंडमध्ये तिला पळवलं...अगणित किका मारल्या पण जैसे थे !

अनुभवी मंडळींनी मार्गदर्शन करावे जेणेकरुन तिला सुरु करता येईल....

अवांतर- यात मी प्रचंड घाम गाळल्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम झाला आहे !

प्रतिक्रिया

माहितगार's picture

9 Jul 2016 - 12:47 am | माहितगार

आमचा वारा लागून गारवा वाटला का ? आपला ट्विट वाचून आम्ही आपला पंखा झालो आहोत :)

कवितानागेश's picture

9 Jul 2016 - 1:08 am | कवितानागेश

त्यानंतर खर्रर्रर्रर्र खट खट ब्रुममममममम्म...... अशी चालू करावी!
=))

धनंजय माने's picture

9 Jul 2016 - 1:17 am | धनंजय माने

आधी पिळायला लागेल का? की नुसतं झटकली तर चालेल?

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Jul 2016 - 10:10 am | माम्लेदारचा पन्खा

असं मार्गदर्शन मोदींना मिळालं तर मोदीसुध्दा आम्रविकेचे पंप्र होतील !

प्रचेतस's picture

9 Jul 2016 - 1:20 am | प्रचेतस

वाळू द्या तिला..आपोआप चालू होईल.

१)क्यारम बोर्डावर शंभरचा दिवा लावतात तसा बाइकवर लावा पण तेव्हा बाइकवर बसून राहू नका.
२)बाइकची काळजी कशी घ्यावी हा धागा काढा."बाइक मेंन्टेन करायचे फ्रस्ट्रेशन"
३)कोणत्याही फाट्यावरचे - शीळफाटा, अंजूर फाटा, भिवंडी फाटा इत्यादि पेट्रोल पंपावरचे पेट्रोल भरत जाऊ नका.
बाइक न वापरणाय्रा तिह्राइताचा सल्ला.

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Jul 2016 - 10:15 am | माम्लेदारचा पन्खा

पवारकाका व्हा...राघोबाकाका नको !

तारेवर वाळत घालुन पाहिली का?

अनिरुद्ध प्रभू's picture

9 Jul 2016 - 9:24 am | अनिरुद्ध प्रभू

+१११११

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Jul 2016 - 10:13 am | माम्लेदारचा पन्खा

तारेवरची कसरत काही जमली नाही.....असो

देव तारी त्याला कोण मारी !

स्पार्क प्लग साफ करुन प्रयत्न करा किंवा स्पार्क प्लग बदला.

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Jul 2016 - 10:04 am | माम्लेदारचा पन्खा

लाख लाख धन्यवाद !

टाकीत पुरेसे इंधन आहे का?
असेल तर टाकीची नळी काढून इंधन काढून घ्या, नळी साफ करा, नळीत कचरा गेल्याने बर्‍याचदा गाडी चालू होत नाही.

(अवांतर - शीर्षक बघून आधी किंचित दचलो...;) )

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Jul 2016 - 10:06 am | माम्लेदारचा पन्खा

न फिरवल्यामुळे असं सगळं होतंय....

बघतो..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2016 - 11:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:(

-दिलीप बिरुटे
(पावसात बाईकला किक मारायचा नाद असलेला)

इग्निशन आणि पेट्रोल कॉक ऑन करून किक मारा.

झेन's picture

9 Jul 2016 - 10:15 am | झेन

काही हरकत नाही वापरण्यासाठी नवी बाईक घ्या ही व्ययामासाठी ठेवा आणि सदा सर्वांगसुंदर रहा :-) असो जर फक्त प्लग वर पाणी असेल तर प्लग काढून कोरडा करुन परत लावा, पेट्रोल आणि बँटरी तुम्ही तपासलीच असेलच. बाईक चे डिटेल्स इथे देवून बघा, इथले एक्सपर्ट मार्गदर्शन करतील अथवा धागा शंभरी गाठेपर्यंत धांबा आणि बाईकला किक मारा

संजय पाटिल's picture

9 Jul 2016 - 10:18 am | संजय पाटिल

प्रथम पेट्रोल कॉक ऑफ करा, स्पार्क प्लग कढा, प्लग कापडाने स्वच्छ पुसुन कोरडा करा. आता प्लग कढलेला असतानाच ५-६ किक मारा. प्लग लावा.आता कॉक ऑन करा, चोक लावा आणि १-२ किक मारा. गाडी सुरू होइल.

अगागा धागा कहर आणि प्रतिसाद तर त्याहून कहर!
_/\_

amit_m's picture

9 Jul 2016 - 11:44 am | amit_m

कार्बोरेटर तपासा!!
त्यात पाणी जायची शक्यता असते.. तसे झाले असल्यास मेकॅनिक कडे जावे लागेल.
घरी प्रयोग करू नका.

धर्मराजमुटके's picture

9 Jul 2016 - 11:51 am | धर्मराजमुटके

एवढे सगळे करुन झालेच आहे. एक सोपा उपाय. पेट्रोल टाकीचे झाकण उघडा साधारण १ मिनिटासाठी उघदे राहू द्या.त्यावेळी त्यात पाणी जाणार नाही हे बघा. नंतर परत झाकण बंद करा. नंतर स्पार्क प्लग कोरडा करुन किक मारा. गाडी चालू व्हायला पाहिजे.
मी हा प्रयोग बर्‍याचवेळा केला आहे व गाडी खात्रीने चालू झालेली आहे.

आता शिरीयसली लिहितो...

आपल्या बायकांची एवढी सुध्दा काळजी घेता येत नसेल अशा नाजूक बायका का बर गळ्यात पाडून घेता? एखादी कळकट मळकट कामाला बळकट बघायची.

आणि जर माहीत आहे की ती नाजूक आहे तर तिला पावसात का बरे भिजू दिली?

तशा भिजलेल्या आवस्थेतच त्या बिचारीला पळवले आणि वर तिलाच अगणित किका मारल्या त्या सुध्दा घराबाहेर कंपाउंड मधे?

असे कसे वागु शकता तुम्ही? मला खात्री आहे त्या बिचारीने हे सगळे मुक पणे सहन केले असेल.

आणि हे सगळे कमी होते म्हणुन त्याचा धागा काढला? तिला हे समजले तर काय वाटेल याचा जराही विचार तुमच्या मनात आला नाही?

घाम गाळणारा सर्वांगसुंदर व्यायाम करण्यासाठी इतके उतावीळ व्हायची गरज नसते, थोडा संयम बाळगला की सर्व काही पदरात पाडून घेता येते.

कधी कधी छोटीशी चूकही आयुष्यभर निस्तरावी लागते याची जाणीव ठेवावी.

पैजारबुवा,

स्पार्क प्लग काढून कपड्याने पुसुन चांगला साफ करा . त्यात पाणी गेल्या मुले होतं असं.

गाडी न्यूट्रल वर ठेऊन क्लच धरून किक मारा 5-6 . ऑईल फिरेल .
त्यानंतर परत लाथा मारायला चालू करा नेहमी सारख्या . गरम होईल गाडी. चालू ही होईल .

आणि हो.. 7-8 दिवस स्वतः घरात असून ही गाडी काढली नसेल तर लै मोठा लोच्या है.

महासंग्राम's picture

9 Jul 2016 - 2:19 pm | महासंग्राम


त्यात पाणी गेल्या मुले होतं असं.

वारल्या गेलो आहे ......

अद्द्या's picture

10 Jul 2016 - 11:22 am | अद्द्या

"मुळे" हवं होतं ते .

मोबाईल वरून टाईप करण्यात घोळ झाला

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Jul 2016 - 7:41 pm | कैलासवासी सोन्याबापु

गाडी न्यूट्रल वर ठेऊन क्लच धरून किक मारा 5-6 . ऑईल फिरेल .

ते बरंय हो पण इतक्या किका क्लच धरून मारल्यावर ओव्हरफ्लो होईल carburetor असं वाटतं

अद्द्या's picture

10 Jul 2016 - 11:23 am | अद्द्या

=]]

बोका-ए-आझम's picture

9 Jul 2016 - 12:29 pm | बोका-ए-आझम

यापुढे दिवसाच्या सुरूवातीला बाईक किकस्टार्ट करा. नंतर भलेही आॅटो स्टार्ट केलीत तरी पहिला स्टार्ट किकस्टार्टच असायला हवा.

गाडी विका आणि आहे ती सायकल वापरायला लागा.

नाखु's picture

9 Jul 2016 - 4:42 pm | नाखु

धागा "सायकलवर" येणार आहे तर !!

पळालेला नाखु

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

9 Jul 2016 - 2:21 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

स्पार्कप्लगमध्ये पाणि गेले आहे,प्लग काढा आणि कापडाने चांगला पुसा,काम होऊन जाईल.

इरसाल's picture

9 Jul 2016 - 2:26 pm | इरसाल

गाडीत पेट्रोल टाका ..................

मार्मिक गोडसे's picture

9 Jul 2016 - 2:56 pm | मार्मिक गोडसे

प्रथम स्पार्क प्लग खोलुन बघा, त्यावर कार्बन साचले असेल तर साफ करा. स्पार्कप्लग कॅपमध्ये दाबून बसवा, व स्पार्कप्लग गाडीच्या मेटल भागाला लावा, इग्निशन ऑन करून गाडीला किक मारा. स्पार्कप्लगच्या गॅपमध्ये निळसर ठिणगी ठरावीक गतीत पडत असेल तर स्पार्कप्लग ओके आहे. ठिणगी पडत नसेल तर स्पार्कप्लग कॅप फिरवून वायरपासून वेगळी करा. ह्यावेळेस गाडीला किक मारताना वायरचे तोंड गाडीच्या मेटल भागापासून २-३ मीमी. अंतरावर ठेवा. वायरच्या टोकापासून निळी ठिणगी मेटलकडे धावताना दिसेल, जर ठिणगी क्षीण किंवा अजिबात दिसली नाही तर प्रॉब्लेम इग्निशन स्विच, वायरिंग (पावसाळ्यात उंदीर गाडीत आसरा घेताना वायरिंग कुरतडून टाकतो) किंवा इग्निशन कॉइलचाही असू शकतो.

इग्निशन ठिक असेल व कार्बोरेटर साफ करता येत नसेल तर कार्बोरेटरचा ड्रेन स्क्रु ढिला करून ड्रेन पाईपमधून पेट्रोल एका स्वछ भांड्यात गोळा करा. ह्यामुळे कार्बोरेटरमधील हवा निघून जाईल व पेट्रोलमध्ये कचरा आहे की नाही हेही कळेल. पेट्रोल स्वछ असेल तर पुन्हा टाकीत ओता व थोडं पेट्रोल स्पार्कप्लगवर ओता व लगेच स्पार्कप्लग फिट करा आणी गाडीला किक मारून बघा. स्पार्कप्लगवर पेट्रोल असल्यामुळे गाडी थंड असली तरी लवकर चालू होते. एवढे करुनही गाडी चालू झाली नाही तर नवीन स्पार्कप्लग बसवून बघा.

चांगली गरम करा ना...गरम करायला वेळ लागेल पण एकदा का गरम झाली कि स्वःताच हिसके मारून चालू होईल. ;)

भोळा भाबडा's picture

9 Jul 2016 - 5:34 pm | भोळा भाबडा

...गरम करायला वेळ लागेल पण एकदा का गरम झाली कि स्वःताच हिसके मारून चालू होईल. ;)

=))))=))) ठ्ठो
ओ

अजया's picture

9 Jul 2016 - 3:33 pm | अजया

झाली का सुरु?

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Jul 2016 - 7:02 pm | माम्लेदारचा पन्खा

अजून किमान २ दिवस तिथे फिरकणार नाही...

अनिता's picture

9 Jul 2016 - 9:42 pm | अनिता

पैसा's picture

9 Jul 2016 - 9:59 pm | पैसा

धाग्याचे शीर्षक बघून मी धसकले होते. त्यामानाने स्वस्तात सुटून गेलात.

जवळच्या मॅकेनीकला दाखवा गाडी. नाहीतर त्याला घेउन या.

मी काय म्हणतो पंखेराव, एखादी रात्र घेतले बाईकला ब्लँकेटमध्ये तर काही बिघडेल काय? मायेच्या उबेने चालू होईल हो कदाचित ;)

अद्द्या's picture

10 Jul 2016 - 11:24 am | अद्द्या

मायेच्या उबेने चालू होईल हो कदाचित

इत्ति ऊब देगा तो जल जाएंगी रे बाबा

लालगरूड's picture

9 Jul 2016 - 10:40 pm | लालगरूड

पावसात भिजलेली बायको 'चालू' कशी
करावी ?
मंडळी....
आताच चांगला तासभर बायकोला
मारून आलो आहे... गेले २ आठवडे तिला 'चालू'
केले नव्हते...पावसात ***
भिजल्याने आता ती अजिबात 'चालू'
व्हायचे नाव घेत नाही.... कंपाउंडमध्ये
तिला पळवलं...अगणित *** मारल्या
पण जैसे थे !
अनुभवी मंडळींनी मार्गदर्शन करावे
जेणेकरुन तिला 'सुरु' करता येईल....
अवांतर- यात मी प्रचंड "घाम" गाळल्यामुळे
सर्वांगसुंदर व्यायाम झाला आहे !

धनंजय माने's picture

9 Jul 2016 - 10:51 pm | धनंजय माने

ओ तुम्ही 'क'सकट च विचारताय ना????

हम्म. कुंडली बघावी लागेल. शेजारच्या बोक्याची महादशा चालू आहे तुमच्या (बाईकच्या) स्पार्कप्लगच्या मागे. दर रविवारी मामलेदाराला बाईकला नेऊन आणावी. एक ताईत पाठवू्न देतो. तो घाला. बाईकला. बोक्याला नाही. बोका हाती घावणारच नाही. फुकटच्या फाकट अजून सर्वांगसुंदर व्यायाम होईल. तुमचा आणि बोक्याचाही. तेव्हा हा उपाय नच्छ. एकदा का बोक्याचा बंदोबस्त झाला की बाईक कानात वारं भरलेल्या हूड गोऱ्ह्यासारखी जी चालू होईल, ती तुम्ही 'बाईक बंद कशी करायची' असा धागा काढेपर्यंत थांबणार नाही बघा. शंभर टक्के खातरीशीर उपाय. फी फकस्त साडेबत्तेचाळीस रुपये रोख. गुण न आल्यास पैशे परत. हमखास! हमखास! हमखास!

नमकिन's picture

10 Jul 2016 - 12:40 pm | नमकिन

मोघम माहीती.
उत्तर देण्यास असमर्थ, हल्ली डॅा वर हल्ले वाढलेत चुकीचे निदान झाले म्हणजे.
पेट्रोल टाकीत किंवा खुद्द पेट्रोल मध्ये पाणी भेसळ असण्याची शक्यता.

मराठी कथालेखक's picture

11 Jul 2016 - 5:24 pm | मराठी कथालेखक

पेट्रोल टाकीचे झाकण उघडून आत एक जिलबी टाका :)