व्हेज बार्बेक्यू - भरली वांगी आणि भरली भेंडी

मोदक's picture
मोदक in पाककृती
3 Jul 2016 - 12:37 am

गोपाळरावांनी खड्डा कोंबडीची लैच सोपी पाकृ दिल्याने घरच्या कोळशाच्या शेगडीवर सुरू असणारे कणीस, भरीत करण्यासाठीचे वांगे, कांदे, बटाटे, रताळी वगैरे भाजण्याचे प्रयोग पुढच्या श्रेणीला नेणे क्रमप्राप्त होते.

सकाळी एका हार / फुलेवाल्याकडून केळीची पाने मिळवली आणि तयारी सुरू केली.

साहित्य -

.

१) केळीची पाने आणि अ‍ॅक्युमिनीयम फॉईल
२) भाजीसाठी वांगी, बटाटे आणि भेंडी (नंतर चव बघण्यामध्ये निम्म्याहून जास्त संपतात त्यामुळे बटाटे आणि भेंडी त्या प्रमाणात.)
३) कांदा - बारीक चिरून
४) धणे पावडर
५) शेंगदाण्याचे कूट
६) जिरे पावडर
७) कांदा लसूण मसाला
८) मीठ
९) जिरावण / जिराळू पावडर
१०) खोवलेले खोबरे
११) कोथिंबीर
१२) गूळ / साखर
१३) तेल

सोबत भाजण्यासाठी

.

१) मक्याचे कणीस
२) कांदे
३) बटाटे
४) रता़ळी
५) तुम्हाला जे आवडे ते..

सर्वप्रथम आपण ज्या कशात बार्बेक्यू करणार आहोत त्यामध्ये लाकडे पेटवा. भरपूर जाळ झाला पाहिजे व नंतर भरपूर कोळसे तयार झाले पाहिजेत. मी मातीची कुंडी वापरली.

लाकडे पेटायला वेळ लागला. :(

.

वांगी धुवून घ्या.
वांग्यांचे देठ काढून टाका व त्याला देठाच्या दिशेने ३ / ४ उंचीच्या डॉक्टरांच्या चिन्हासारख्या चिरा द्या.
वरील सर्व जिन्नस वापरून भरली वांगी करताना आपण जसा मसाला तयार करतो तसा मसाला तयार करा व वांग्यांमध्ये भरा.

बटाटे धुवून व साल काढून घ्या.
बटाट्याला आरपार छिद्र करणे शक्य असेल तर तशी २ / ३ छिद्रे करा.

केळीची पाने स्वच्छ धुवून घ्या. हारवाल्याकडे शक्यतो खुंट मिळतात. त्यातला सर्वात आतला भाग एकदम कोवळा व स्वच्छ असतो. त्या भागावर भरलेली वांगी आणि बटाटे ठेवा. वरून राहिलेला मसाला थापा.

.

भेंडी साठी वरचे मसाले वापरा व भेंडी भरून घ्या. भेंडीच्या मसाल्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला.

.

केळीच्या पानांचे ३ थर करा व त्याची पोटली बांधून घ्या. या तयार पोटलीला ३ वेगवेगळ्या दिशांनी अ‍ॅल्युमिनीयम फॉईलने गुंडाळा.

.

मातीच्या कुंडीत तळाशी भरपूर धगधगीत कोळसे घाला.

त्यावर या पोटल्या आडव्या ठेवा. (उभ्या ठेवू नयेत, खालची भाजी जळते - स्वानुभव.)

वरून आणखी एक धगधगीत कोळशांचा थर द्या. वरच्या कोळशांच्या थरावरती कणीस, कांदे, बटाटे किंवा रताळी भाजा.

साधारणपणे पाऊण तासाने भेंडीची पोटली बाहेर काढा.
तासाभराने वांगी-बटाट्याची पोटली बाहेर काढा.

.

भाजी तयार आहे. हवे असल्यास सोबत पोळी / भात घ्या अन्यथा आहे असेच खाल्ले तरी चालेल. :)

.

.

**********************************

मी गोपाळरावांच्या प्रमाणे अ‍ॅल्युमिनीयमचे कंटेनर वापरले नाहीत म्हणून फॉईलचे ३ थर दिले
कोणत्याही परिस्थितीमध्ये एका तासापेक्षा जास्त वेळ कोळशाची धग लागून देवू नका - भाजी करपते / जळते.

**********************************

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

3 Jul 2016 - 12:42 am | माम्लेदारचा पन्खा

लै भारी मोदक राव !

सुबोध खरे's picture

4 Jul 2016 - 7:03 pm | सुबोध खरे

हायला
ही कुंडीत बार्बेक्यू करण्याची आयडिया लै म्हणजे लैच भारी आहे. आणि फोटोही भन्नाट आहेत.
"तोंपासु"

पद्मावति's picture

3 Jul 2016 - 12:45 am | पद्मावति

वाह!!

धनंजय माने's picture

3 Jul 2016 - 1:08 am | धनंजय माने

दु दु मोदक. जीभ खवळवली...
या विभागात(ही) दणक्यात पदार्पण!

पोपटी घरात ( ब्लॅाकमध्ये ) केल्याबद्दल कौतुक आहे.फार चांगलं जमलंय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Jul 2016 - 6:13 am | कैलासवासी सोन्याबापु

झकास भावा एक नंबर झकास!!!

केडी's picture

3 Jul 2016 - 7:07 am | केडी

आता लवकरच सामिष पाककृती येऊ द्या!

मोदक's picture

3 Jul 2016 - 7:14 am | मोदक

नक्की सर. :)

मस्तच जमलंय. घरी आमची गँग बोलावून बार्बेक्यु कट्टा करणार आता!

नूतन सावंत's picture

3 Jul 2016 - 7:48 am | नूतन सावंत

वा!मोदकभौ,रहाता कुठे तुम्ही?रविवार असूनही भाजी बघून तोंडात पूर आलाय.

चंपाबाई's picture

3 Jul 2016 - 9:20 am | चंपाबाई

छान

भरत्_पलुसकर's picture

3 Jul 2016 - 12:08 pm | भरत्_पलुसकर

तोंपासु.

मंदार कात्रे's picture

3 Jul 2016 - 12:24 pm | मंदार कात्रे

फार छान

लय भारी मोदक राव

लवकरच पाक्रु करुन बघणेत येइल

चाणक्य's picture

3 Jul 2016 - 3:22 pm | चाणक्य

भारी. करून बघणार नक्की.

जबरी आहे. च्यायला माझ्या घरात मला असे उपद्व्याप करायला वेळ मिळेल, देव जाणे..

पिंगूशेठ.. का फुलटॉस देता दर वेळी? :p

धनंजय माने's picture

4 Jul 2016 - 1:07 pm | धनंजय माने

=))

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2016 - 9:18 pm | अत्रुप्त आत्मा

@जिरावण / जिराळू पावडर ››› इ का है जी? कबी सुना नही है |

पिलीयन रायडर's picture

4 Jul 2016 - 4:11 am | पिलीयन रायडर

ओ कधी लोकांना तोंडदेखलं तरी बोलवत जा की...

बरं जमलय..

एस's picture

4 Jul 2016 - 5:01 am | एस

भालो आछे!

सूड's picture

4 Jul 2016 - 5:14 pm | सूड

भालोच भालो!!

नाखु's picture

4 Jul 2016 - 9:01 am | नाखु

आणि "पाक"सिद्धता

इती मोदकायन

पुभाप्र नाखु

उल्का's picture

4 Jul 2016 - 11:03 am | उल्का

मस्तय!
तों पा सु.

गणपा's picture

4 Jul 2016 - 11:15 am | गणपा

जेब्बात !
काहीभाज्या डायरेक्ट सळईत खुपसुन निखार्‍यावर भाजून चांगल्या लागतील असे वाटते.
केळीच्या पानाचा मस्त फ्लेवर आला असेल यात शंका नाही.

गणामास्तर's picture

4 Jul 2016 - 12:29 pm | गणामास्तर

जिराळू पावडर म्हणजे काय रे ? फटू च्या बाबतीत आमचा गणेशा झालाय त्यामुळे विशेष काही जळजळ वगैरे झाली नाही.

मास्तुरे आणि बुवा - जिराळू / जिरावण पावडर ही खास गुजराथी / इंदोरी खासीयत आहे.

गुजरातेत जिराळू असे म्हणतात तर इंदोरात जिरावण - दोन्हीच्या चवी साधारणपणे सारख्या आहेत. ..आणि थोडक्यात वर्णन करायचे असेल तर "चाट मसाल्याचा मोठा भाऊ" आहे. चाट मसाला वापरला तर फार फरक पडणार नाही. पण या मसाल्याची वेगळी चव येते.

माझी बडोदा ट्रीप होणार आहे, आणतो तुमच्यासाठी :)

गणामास्तर's picture

4 Jul 2016 - 1:45 pm | गणामास्तर

हापिसच्या बाहेर नुकतंच एक इंदोरी पोहेवाला चालू झालाय, तो पोह्यांवर एक कसलीशी मातकट रंगाची पावडर टाकून देतो. बरी असते चव त्याची पण नक्की पत्ता लागत नाही कसली असावी ते. बहुदा तू म्हणतोयस तीच पावडर असावी. विचारतो त्याला.

तेच असणार. औंध मध्ये कुठेतरी मिळते असे इंदोरी दोस्ताने आत्ताच सांगितले आहे.

नक्की माहिती काढून कळवतो.

प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे आभार..!!! :)

वेदांत's picture

4 Jul 2016 - 1:17 pm | वेदांत

फोटो दिसत नाहीत ..

माझीही शॅम्पेन's picture

4 Jul 2016 - 1:46 pm | माझीही शॅम्पेन

वाह मोदक एकदम भारी पा कृ , हेही क्षेत्र पादाक्रांत करायचं सोडलं नाहीस , फोटो बघून खतरनाक प्रकार वाटलं

पु पा शु (पुढील पाककृती साठी शुभेच्छा)

सस्नेह's picture

4 Jul 2016 - 2:35 pm | सस्नेह

आम्हाला कधी बोलावणार ?
बाकी, त्या कणसांचे, बटाट्यांचे आणि रताळ्याचे काय झाले पुढे ?

तुम्ही कुठे असता? कोण तुम्ही? तुम्हाला मी ओळखतो का?

;)

मोदक's picture

5 Jul 2016 - 9:57 am | मोदक

अ र्र र्र र्र...

पिराला द्यायचा प्रतिसाद चुकून तुला पडला. आता असूदे. तुला पण लागू आहेच. :p

केळीच्या पानाची छोटी टिप : पान थोडं त्या निखार्‍यावर किंवा गॅसवर भाजून घ्यायचं. अगदी जस्ट धग लावली, की नरम पडतं, मग त्याची पुरचुंडी वळण्याचं काम सोपं होतं.
*
"दवे का दिव्य जिरावण" या नावाने रेडिमेड मसाल्यांच्या सेक्शनमधे कोणत्याही सुपरमार्केटात जिरावण मिळायला हरकत नाही.
*

बाकी, त्या कणसांचे, बटाट्यांचे आणि रताळ्याचे काय झाले पुढे ?

खालच्या पोटल्या शिजेपर्यंत कणीस्/बटाट्या/रताळ्यांचं पुढे नाही, तर आधीच गट्टम झालं असावंसं दिसतंय. ;)

आमचा रेफरन्स दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!

देणार की राव रेफरन्स.. तुमची कोंबडीच तर आमची प्रेरणा होती..!!!

केळीच्या पानाची छोटी टिप : पान थोडं त्या निखार्‍यावर किंवा गॅसवर भाजून घ्यायचं. अगदी जस्ट धग लावली, की नरम पडतं, मग त्याची पुरचुंडी वळण्याचं काम सोपं होतं.

मला मिळालेली केळीची पाने खूपच कोवळी होती. सहज दुमडत होती आणि न फाटता पुरचुंडी बांधली गेली.

खालच्या पोटल्या शिजेपर्यंत कणीस्/बटाट्या/रताळ्यांचं पुढे नाही, तर आधीच गट्टम झालं असावंसं दिसतंय. ;)

सही जवाब. ते कणीस आणि रताळी, बटाटे पोटल्या तयार होईपर्यंत गट्टम झाले. :)

धनंजय माने's picture

5 Jul 2016 - 12:02 pm | धनंजय माने

त्या बाबा कणसा पेक्षा बेबी कॉर्न वापरायला पाहिजेत.
कं बोल्तो?

आहे आहे.. ते पण लिस्टावर आहे.

मुक्त विहारि's picture

5 Jul 2016 - 12:26 pm | मुक्त विहारि

कुंडीची आयडिया एकदम जबरदस्त.

विवेकपटाईत's picture

5 Jul 2016 - 7:58 pm | विवेकपटाईत

भारी पाककृती , आवडली.

झेन's picture

6 Jul 2016 - 12:11 pm | झेन

जुम्ही जे पण करता मनापासून, त्यावर इथे लिहिता ते पण अभ्यासपूर्ण, फोटोपण सुरेख. फक्त एकच वाटतं एवढी सगळी मेहनत वांगी आणि भेंडी यावर नॉट जस्टिफाईड, अश्याने कोंबडीच्या जीवाला काय वाटेल ? :-)

पैसा's picture

6 Jul 2016 - 2:56 pm | पैसा

मी धागा वाचला नाही. फटु बघितले नाहीत. मी मोदकाला ओळखतच नै.

बाब्बॉ जबरी, हे करायची इच्छा आहे पण फसन्ञाचे चान्सेस जास्त दिसताय माझ्याकडुन :(

प्रयत्न करा हो.. सहज जमेल.

तीन थर केळ्याच्या पानाचे, तीन थर अ‍ॅल्युमिनीयम फॉईलचे आणि एक तास धग. हे बेसीक गणित.

मी आज पुन्हा वांग्याची आणि भेंडीची भाजी केली होती. व्यवस्थीत जमली. :)

सतोश ताइतवाले's picture

6 Aug 2016 - 1:05 pm | सतोश ताइतवाले

मस्त् भाजी

क्या बात है ! मस्त पाक्क्रुति ! धन्यवाद !

जेम्स वांड's picture

5 Feb 2018 - 5:41 pm | जेम्स वांड

केळीची पाने हवी तशी वळायची असली (अगदी तिच्या विणे विरुद्ध) तरी एक सोपी शक्कल आहे, पाने धुवून स्वच्छ केली की तुम्ही पेटवलेल्या अगोटीवर अंदाजे अडीच फूट वर धरून दोन्ही बाजूने थोडी शेकून घ्यावीत (पान थोडे गरम करणे, पार धूर नाही) अशी गरम केलेली पाने वाटेल तशी पुरचुंडी बनवली तरी फाटत नाहीत, हा स्वानुभव :)

दोन वर्षं भट्टी चालूच ठेवली काय?
जिरावण = जिरे पावडर अधिक आमचूर पावडर.