गाभा:
नुकताच मला http://ghewoontaak.co.cc ह्या संकेतस्थळाचा शोध लागला. येथे घावूक प्रमाणात मराठी गाणी/कथाकथन इ. सर्रास उपल्ब्ध आहे (अर्थातच बेकायदेशीर)
ही हातभट्टी बंद करायला काही उपाय आहे काय?
- मराठी गाण्यांचा प्रेमी
नुकताच मला http://ghewoontaak.co.cc ह्या संकेतस्थळाचा शोध लागला. येथे घावूक प्रमाणात मराठी गाणी/कथाकथन इ. सर्रास उपल्ब्ध आहे (अर्थातच बेकायदेशीर)
ही हातभट्टी बंद करायला काही उपाय आहे काय?
- मराठी गाण्यांचा प्रेमी
प्रतिक्रिया
25 Jan 2009 - 8:05 pm | हेरंब
'हातभट्टी' चा अर्थ नाही समजला.
25 Jan 2009 - 8:28 pm | विंजिनेर
मी वरती दिलेल्या संकेतस्थळाच्या दुव्यावरून असंख्य मराठी गाणी कुणालाही संगणकावर साठविता येतील. अश्या प्रकारे मूळ कलाकाराला त्याच्या कष्टांचा मोबदला
न देता आणि गाण्याच्या प्रकाशकांच्या परवानगी शिवाय अशी सोय ही चोरीच नाही काय? ही कीडीला ती हाताबाहेर जाण्याअगोदरच आळा कसा घालता येईल हे विचारयचे होते. असो. हातभट्टी हा शब्द पु.लं. च्या एका लेखनात ह्याच संदर्भात वापरल्याचे आठवते. ("शब्द सूर्य" लेखक अगाथा ख्रिस्ती च्या पुस्तकाची हातभट्टी घालत असतात... - नाव आठवत नाही) तो "बेकायदेशीर" ह्या अर्थाने मी वापरला.
25 Jan 2009 - 8:52 pm | टारझन
प्रश्ण : ही हातभट्टी बंद करायला काही उपाय आहे काय?
उत्तर : णाही.
अवांतर :
विंजिनेर साहेब, आपण स्वतःला काही प्रश्नांची उत्तरे द्या आणि इकडे ही द्या (जर द्यावीशी वाटली तर)
१. आपण आजपर्यंत वापरलेल्या संगणका वरील ऑपरेटिंग सिस्टिम्स आणि सॉफ्टवेयर्स आपण खरेदी केले होते /आहेत काय ?
२. आजपर्यंत पाहिलेलेसर्व हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट थेटरात किंवा ओरिजिनल डिव्हीडी /सीडी घेउण पाहिलेले आहेत काय ?
ह्या दोन प्रश्णांची उत्तरे जर 'हो' अशी असतील तर हा प्रश्ण विचारण्याचा तुम्हाला आधिकार आहे , अण्यथा स्वतःहुण हा फडतुस धागा उडवावा .
फुकटात गाणी मिळण्याची साईट सांगितल्याबद्दल (आणि प्रचाराबद्दल) तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
- आजवर सगळं पायरेटेड वापरणारा कांपुटर विंजिणेर) टारझण
25 Jan 2009 - 10:57 pm | भडकमकर मास्तर
=)) =)) =)) ______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
25 Jan 2009 - 11:03 pm | विंजिनेर
लेखक, कवी आणि इतरांनी घाम गाळून केलेल्या कलाकृतींचा आदर राखण्याऐवजी अश्या लंगड्या सबबी देणे आणि "पायरेटेड" गोष्टी वापरण्याचे समर्थन करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. असो. ह्याबद्दल वाईट वाटणारा कदाचित मी एकटाच नसावा.
25 Jan 2009 - 11:19 pm | llपुण्याचे पेशवेll
माझ्या मते प्रश्न लंगड्या सबबींचा नाहीये. आपली कळकळ बरोबर आहे. पण आपण आपले हे आचरण(पायरसी बद्दलचे) सर्व बाबतीत समान आहे का? आपण कधीच पायरेटेड सॉफ्टवेअर वापरलं नाही का? तसे असेल तर ठीक आहे.
पुण्याचे पेशवे
Since 1984
26 Jan 2009 - 6:30 am | विंजिनेर
अर्थात! पेशवे. नाहीतर मी हा मुद्दा काढला नसता. मी GNU(http://www.gnu.org) आणि FSF(http://fsf.org) ह्यांचा भोक्ता आहे(इथे मिळणारे सॉफ्टवेअर उदा "गमभन" किंवा "ड्रुपल" हे नेहेमीच खात्रिशीर आणि मुक्त[फुकट नव्हे] असते).
आणि, दुसरे संकेतस्थळ कायदा पाळत नाही म्ह्णून "घेउन टाक" चा दोष नाही असे म्हणणे किंवा दुसरी व्यक्ती पायरसी करते म्हणुन मी सुद्धा करावी हे म्हणजे "सोयिस्कर सत्य" अधिक "कळपाची मनोवृत्ती" असेच झाले.
(अर्थात, ह्या पत्रप्रपंचाचा उद्देश सर्वांना पायरसीची जाणीव करून देणे हाच आहे. कुणालाही व्यक्तिगतरित्या दुखावणे हा नाही. तेव्हा, ह.घ्या. विशेष म्हणजे टारझन बुवा तुम्ही!! ...)
26 Jan 2009 - 10:44 pm | टारझन
मालक ... पायरसी सर्वांणा माहीत आहे .. दैणंदिण व्यवहारात ट्राफिक पोलिसांची अरेरावी पाहिलीये का ? असे बरेच प्रकार आहेत .. पण त्यांचे धागे काढण्यात काहीही हाशिल णाही.
आम्ही ही कोणाला व्यक्तिगत रित्या टार्गेट केलेलं णाही .. त्यामुळे मणाला लावुण घेऊ णये.
तिन चार लायनिंचे, लिंक्स देउन चर्चा करा म्हणणारे आणि निरर्थक कौल पाहिले की आम्ही तिथे स्वयंभू म्हणूण अवतरतोच .. त्यामुळे असं एक लिंक देऊन करा चर्चा .. असलं थांबवा .. त्यामुळे धागे उघडायचा मुड जातो.
तुमच्या माहिती करता , मला ८ व्यणि आले आणि त्यांनी हा धागा बिनकामाचा किंवा फडतुस आहे असेच म्हंटले आहे.
सुस्पष्ठ) टारलाडू
27 Jan 2009 - 11:24 am | विंजिनेर
टारझन भाउ, तुम्हाला व्यक्तिगत निरोप पाठवणार्या तुमच्या ८ व्यक्तिगत मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा(आणि एक तरीचा वाडगा यक्स्ट्रा).
माझ्या दृष्टीने ह्या धाग्यावरची ही चर्चा इथेच संपवणे योग्य.
अवांतर बोलून आणि शिळ्या कढीला उत आणल्याबद्दल संपादकांच्या शिव्या खाण्याअगोदर बाकी उरलेली "चर्चा" ख.व. वर सवडीने करीन एवढच सांगतो.
- (हळुह्ळू भांडणात तरबेज होणारा) मिपाकर विंजिनेर
28 Jan 2009 - 8:58 am | टारझन
ते सगळं जाऊण द्या भौ .. पण माझ्या दोण्ही प्रश्णांची उत्तरं मला भेटलेली णाहीत . .. .
(चर्चेला भांडण ण समजणारा अंमळ सज्ञान) टारू विंजिणेर
26 Jan 2009 - 1:25 am | टारझन
काय रे बाब्या .. वर विचारलेल्या दोण प्रष्णांची उत्तरे कुठं आहेत ? त्या प्रष्णांची उत्तरे ण दिल्या बद्दल
वाईट वाटणारा कदाचित मी एकटाच नसावा.
- टार्या
27 Jan 2009 - 12:47 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
25 Jan 2009 - 9:11 pm | बाकरवडी
फुकटात गाणी मिळण्याची साईट सांगितल्याबद्दल धन्यवाद !!
चांगली गाणी आहेत, घ्या डाउनलोड करुन..................
26 Jan 2009 - 12:44 am | विसोबा खेचर
अहो पण तसे पाहायला गेले तर आज अनेक संस्थळांवर अनेक गाणी उतरवून घेण्याकरता उपलब्ध असतात. ती सर्व स्थळे थोडाच कायदा पाळतात? मग एकट्या 'घेऊनटाक' लाच का दोष द्या?
मलाही आवडले हे संस्थळ, सध्या तेथून सौभद्रातले 'राधाधर मधुमिलिंद' उतरवून घेतो आहे.. :)
आपला,
(गाणीचोर) तात्या.
26 Jan 2009 - 1:43 am | आचरट कार्टा
झ्याक साईट आहे राव !
=)) =))
-------------------------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
26 Jan 2009 - 9:33 am | अवलिया
वा! छानच साईट आहे की...मस्त...
धन्यवाद बर का ह्या साईटचा पत्ता दिल्याबद्दल
गाणी उतरवुन घेतो... आणि गाणी ऐकता ऐकताच पायरसी कशी टाळावी यावर एक फक्कडसा लेख लिहितो :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Jan 2009 - 10:32 am | दशानन
येले !
जबरा !
बाकी जबरदस्त साईट आहे !
कोणाची आहे रे ... का येवढी चांगली साईट फुकटच्या सर्वर वर चालवत आहात.. संपर्क साधा !
बघू काय करता येतं का ते ;)
व्यनी करा अथवा मेल टाका !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
26 Jan 2009 - 10:38 am | सखाराम_गटणे™
Indian Copyright Law
http://www.indianmi.org/copyright.htm
26 Jan 2009 - 12:18 pm | नीलकांत
मूळात एखाद्या गोष्टीला शिव्या द्यायच्या म्हणजे त्यात दोन हेतू असू शकतात. एक तर त्याचा तिरस्कार व्हावा आणि दुसरं म्हणजे त्याचा प्रचार प्रसार आणि प्रसिध्दी व्हावी.
पहिल्या प्रकाराचा विचार करता जर तुमचं आंतरजालीय वय १ वर्षाहून अधीक असेल तर तुम्हाला आजपर्यंत अश्या अनेक साईट्स पाहण्यात आल्या असतील. ज्या कधीतरी कुणाला लहर येते तेव्हा सुरू होतात आणि तश्याच बंद होतात. मुळात अश्या साईट्स बनवून निर्मात्याला व्यक्तिशः काहीच प्रसिध्दी भेटत नाही. जो काही लाभ असतो तो येणार्या जाहिरातींचा असतो. तोही अत्यंत तोकडा असतो. त्यामुळे अश्या साईट्स जास्त काळ टिकत नाही.
मिसळपाव वर ह्या साईट्चा पत्ता देऊन त्याबद्दल लेख लिहीलेला पाहिल्याने मला शंका आली. पण तरी मी असे धरून चालतो की ही साईट विंजिनेर साहेबांची नसावी.
अहो साहेब मी ती साईट पाहिली आहे. मुळात ती एका फ्री सर्व्हरवर आहे. दुसरं म्हणजे डोमेन सुध्दा मोफत आहे आणि जी गाणी आहेत ना ती तिसर्याच म्हणजे मिडीयाफायर नावाच्या फाईल सर्व्हर वर आहे. हे सगळं असतांना तुम्ही ज्या प्रकारची कारवाई अपेक्षीत धरता आहात ती जरा कठीणच आहे. कारण त्या संकेतस्थळाच्या मालकाने (?) त्याच्या सर्व्हरवर ती गाणी ठेवलेलीच नाहीत.
आता असाच विचार केला तर रॅपीडशेअर, मेगाअपलोड, फाईलफॅक्टरी आणि मिडीयाफायर ह्या साईट्स बंद व्हायला हव्यात कारण जगातील सर्व सॉफ्टवेअर, गाणी, चित्रपट याच साईट्सवरून मोफत उतरवता येतात. अश्या वेळी या साईट्सचं ज्या प्रत्यक्ष फाईल सर्व्हर आहे त्यांचं काही बिघडवता येत नाही. तर ह्या निनावी संकेतस्थळाचं काय? मुळात हे संकेतस्थळ एवढं प्रसिध्द नव्हतंच. तुम्ही येथे दूवा देऊन चर्चा केली म्हणजे मला जरा शंका येतेच बघा ;) असो.
यावर सुध्दा तुम्हाला काही करायचे असेलच तर एक काम करू शकता की त्या प्रत्येक गाण्याचा दूवा घेऊन मिडीयाफायर ला विनंतीचा मेल पाठवत रहा. जमल्यास ती साईट ते गाणे समिक्षेसाठी घेईल. शक्यता आहे की काढून टाकेल.
जाता जाता एक सांगतो, संसदेत चर्चेसाठी ठेवण्या पर्यंत मजल गेलेली स**भाभी नावाची भारतीय भाषांतील पौढांसाठी सचित्र कथा प्रसिध्द करणारी एक साईट अजून म्हणजे तशी बातमी येऊन सुध्दा गेले वर्ष भर चालुच आहे की. यावरून या फ्रंट वर भारतात किती उजेड आहे ते दिसतो. बाहेरही खुप काही वेगळी परिस्थिती असेल तर मला माहिती नाही.
(पायरसी आणि अश्या अनेक बाबतीत कायम गोंधळात असलेला ) नीलकांत
26 Jan 2009 - 12:55 pm | विंजिनेर
नीलकांत, सगळे बारकावे खुबीने उलगडल्याबद्दल धन्यवाद.
मलाही तुमच्या (रास्त)शंकेचे निरसन करणे भाग आहे.
१. संकेतस्थळाची मालकी - ह्या संकेतस्थळाचा मी मालक नव्हे. (अर्थात ह्याला माझ्या सांगण्यापलिकडे काही पुरावा नाही कारण http://betterwhois.com च्या मदतीने सुद्धा ह्या संकेतस्थळाच्या मालकीची खात्री पटू शकत नाही)
२. संकेतस्थळाची प्रसिध्दी - ह्या संकेतस्थळाचा शोध लावणारा मी कोलंबस नव्हे :P मराठी अनुदिनींची यादी असणार्या http://marathiblogs.net/ वर ह्या स्थळाचा प्रर्कषाने उल्लेख आहे.
असो. पायरसी ही चोरीच. ह्या चोरीला सामोरा जाणारा/दखल घेणारा कोणी समविचारी भेटलातर बघावा म्ह्णून मी लिहीले होते. त्याचा (सवंग)प्रसिध्दी हा हेतू नव्हता.
26 Jan 2009 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या साईट विषयी आमचे मित्र आनंदयात्री ह्यांनी बर्याच काळापुर्वी आपल्या खव च्या स्वागत संदेशात लिहुन ठेवले होते असे आम्हाला वाटत आहे. ( चु.भु.द्या.घ्या.) त्यामुळे ह्या साईट विषयी आम्हाला पुर्विपासुनच माहीती आहे.
खरडवही संशोधक व अभ्यासक
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
26 Jan 2009 - 1:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंदयात्रीच्या खरडवहीतील दुव्यावरुन साइटची माहिती मिळाली होती.
-दिलीप बिरुटे
(लेख वाचणार नाही, पण खरडवह्या आवर्जून वाचणारा)
26 Jan 2009 - 2:06 pm | अवलिया
बरोबर
इथे तुम्ही प्रा डॉ ची झुल अत्यंत विनयाने उतरवलेली स्पष्ट दिसते आहे :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Jan 2009 - 2:16 pm | सर्किट (not verified)
नाना
अहो प्राडॉनी झूल पांघरली होती असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?
झूल कोण पांघरतात हे माहिती आहे ना ?
की तेच सुचवायचे आहे तुम्हाला ?
मिसळपावाच्या एका माननीय संपादकाला पोळ्याचा बैल अनुबोधणार्या नानाचा निषेध !
-- सर्किट
26 Jan 2009 - 2:20 pm | अवलिया
मिसळपावाच्या एका माननीय संपादकाच्या आणि आमच्या मैत्रीमधे फुट पाडण्याचा प्रयत्न करणा-या सरकिट महाशयांचा णिषेद
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
26 Jan 2009 - 2:22 pm | सर्किट (not verified)
वेलकम टु द क्लब, नाना !!!!
-- (रिसेंटली टर्ण्ड कम्युनिष्ट) सर्किट
26 Jan 2009 - 2:27 pm | दशानन
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
26 Jan 2009 - 4:02 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)
महाराष्ट्राबाहेर काहीही मिळत नाही..असल्...कोणीतरी उपकार केले माझ्यावर...
पत्त्याकरता धन्यवाद...
सूहास
26 Jan 2009 - 4:07 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)
फुकटात गाणी मिळण्याची साईट सांगितल्याबद्दल (आणि प्रचाराबद्दल) तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
माझ्यासारख्या नवख्याला हे काय गुपीत कळेल का ?
सुहास
26 Jan 2009 - 10:03 pm | वृषाली
हातभट्टी बंद का बरं?
साईट फार छान आहे.मी तर बरीच गाणी उतरवून घेतली सुद्धा.
>>लेखक, कवी आणि इतरांनी घाम गाळून केलेल्या कलाकृतींचा आदर राखण्याऐवजी अश्या लंगड्या सबबी देणे आणि "पायरेटेड" गोष्टी वापरण्याचे समर्थन करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे
आम्हाला त्यांच्याबद्दल (लेखक, कवी )आदर आहेच हो.पण तुम्ही स्वतः कधी पायरेटेड सॉफ्टवेयर्स वापरले नाही का?
तुमची कळ्कळ आम्ही जाणू शकतो.अशी कितीतरी गाणी आहेत जी आम्ही ऐकली नाहीत.अशा व इतर साईट मुळे तशी उपलब्धता प्राप्त होते.त्यामुळे मला नाही वाटत की आम्ही त्यांचा काही अनादर करत आहोत.
"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
27 Jan 2009 - 11:16 pm | १.५ शहाणा
मी नाही त्यातलि आन....................
27 Jan 2009 - 11:43 pm | अतुलजी
करंटे जाहले सर्वे |
जो तो बुधीच सागंतो ||
28 Jan 2009 - 8:37 am | मराठी_माणूस
वर काही ठीकाणि केलेली सॉफ्टवेअर आणि संगीताची तुलना अयोग्य वाटते