भाग पंधरावा -
टीप - या भागामध्ये मी खूप फोटो टाकलेले आहेत. कारण तिथे मे गेले होते तिथला निसर्ग आणि वातावरण इतका सुरेख होता की मला राहवलं नाही. आणि मी खूप सुंदर फुलं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली आणि वाटलं मिपाकरांना पण हिची सुंदर फुलं पाहायला मिळालीच पाहिजेत :) म्हणून तुम्हा सर्वांबरोबर हे फोटो शेअर करावेसे वाटले. तेंव्हा हा फोटोंचा रतीब गोड मानून घ्याल अशी अशा करते :)
आज मी जाणार होते क्यू गार्डन बघायला. ही बाग खूपच सुंदर आहे. इथे जाण्यासाठी सर्वात जवळचे ट्युब स्टेशन म्हणजे क्यू गार्डन्स. मुख्य सेन्ट्रल लंडन पेक्षा ही जागा लांब आहे. इथे जाण्यासाठी अजून एक कारण होतं ते असं की इथे ऑर्किड फुलांचे प्रदर्शन होते. ऑर्किड फुलांच्या अनेक जाती पहायला मिळणार होत्या आणि ही भाग अप्रतिम सुंदर आहे म्हणून सुद्धा मबघायला जायचेच होते
सकाळी लौकर उठून नाश्ता करून निघाले. क्यू गार्डन्स ला पोहोचायला मला १ तास लागला. इथे सुद्धा तिकीट आहे १५ पौंड. तिकीट काढून आत गेले. ही बाग प्रचंड मोठी आहे. तिकीट खिडकीवर त्यांनी नकाशा दिला. नकाशा पाहिल्यावर कळलं की काही झालं तरी पूर्ण बाग आपण पाहू शकत नाही. मग मी ठरवलं मुख्य जागा पहायच्या. ही बाग फिरण्यासाठी एक छोटी ट्रेन आहे ज्याचे ज्यादा शुल्क भरावे लागते. मी तर चालतच पाहणार होते सगळं. सर्वप्रथम आत गेल्यावर दिसलं एक मोठ्ठ तळ , तळ्यात हंस, बदकं , आजूबाजूला हिरवळ आणि झाडे होती. खूप मनमोहक दृश्य होते ते हे पहा.
आणि आता मोर्चा वळवला तो ओर्कीडच्या प्रदर्शनाकडे. प्रदर्शनाची सुरुवात ही निवडुंगाच्या झाडाने झाली. आणि यापुढे मी जी फुलं पाहिली त्या फुलांचे रंग आणि सौंदर्य शब्दात वर्णन करणे कठीणच आहे. एक से एक रंग आणि कित्ती प्रकारच्या एकाच फुलांच्या जाती. डोळ्याचं पारण फिटलं इतकी सुंदर फुलं पाहून. तुम्ही फोटो पाहून ठरवा तुम्हाला आवडत आहेत की नाही ते
काही फुलांच्या सजावटी केल्या होत्या त्यांचे काही फोटो
हे प्रदर्शन पाहून झाल्यावर मी क्यू Palace बघायला गेले. इथे आतमध्ये जायला परवानगी नव्हती त्यामुळे बाहेरूनच पहायला मिळाला.
इथून पुढे मी जाणार होते क्यू गार्डन्स मधल्या सगळ्यात उंच ठिकाणी जिथून बागेचा व्ह्यू छान दिसतो. साधारण ४ मजली उंच ट्री टॉप वॉकवे बांधला आहे इथे. इकडे लिफ्ट नाही त्यामुळे चढून जावं लागत. हा वॉकवे पूर्ण लोखंडी आहे.
इथून या बागेत असलेला पगोडा सुद्धा दिसतो. मी लांबूनच पाहिला. खाली उतरल्यावर तिथे जाण्याचा विचार केला पण गेले नाही कारण अजून काही गोष्टी पहायच्या राहिल्या होत्या.
आता मी जाणार होते पाम हाउस पहायला. इथे आतमध्ये विविध प्रकारची छोटी मोठी फळांची फुलांची झाडे जतन केलेली आहेत. आणि त्या झाडांबद्दल माहिती दिलेली आहे. ही झाडे एका बंदिस्त जागेमध्ये आहेत ज्या जागेचं नाव पाम हाउस आहे.
इथेच एक ग्लास हाउस पण आहे ज्यामध्ये छोटी छोटी झाडे दगडांमधून उगवलेली आहेत. हे ग्लास हाउस पाहून बाहेर पडले आणि समोर हा सुंदर मोर बसलेला दिसला
अजून थोडा वेळ बागेमध्ये भटकंती केली तिथले फोटो
माझ्या डोळ्यासमोर गेले ५ तास फक्त हिरवळ होती त्यामुळे डोळ्यांना खूप प्रसन्न वाटत होतं. सगळीकडे हिरवीगार झाडे, पिवळ्या जांभळ्या फुलांचे ताटवे , हिरवळ पाहून मन प्रसन्न झालं होतं. तिथून निघावस वाटत नव्हतं अजिबात पण बागेची वेळ संपत आली होती. संपूर्ण दिवस मी आज या बागेतच घालवला होता तरिही इथून जाऊ नये असं वाटत होतं. नाईलाजाने पाय घराकडे वळवले.
ट्रेन मध्ये बसल्यावर जरा उदासवाणं वाटत होतं कारण उद्याचा दिवस हा आमचा लंडन मधील शेवटचा दिवस होता. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की रात्रीच्या अंधारात आणि दिव्यांच्या झगमगाटात Bigben, Parliament House ani London Eye कसं दिसतं हे तर आपण पाहिलेच नाही आहे. आत्ता पर्यंत नेहमी सकाळच्या वेळीच या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्वरित नवऱ्याला फोन केला आणि त्याला वेस्टमिन्स्टर स्टेशन च्या इथे बोलावलं परस्पर ऑफिस सुटल्यावर. आणि मी सुद्धा डायरेक्ट तिकडेच गेले. रात्रीच्या वेळी सुद्धा तितक्याच सुरेख दिसतात या सगळ्याच जागा. हे पहा काही फोटो
हे बघून झाल्यावर घराकडे निघालो. उद्याची तयारी करायची होती. आमचे रात्रीचे विमान असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस हातात होता. लंडन मधील उद्याचे शेवटचे डेस्टिनेशन होते विम्बलडन :) ज्याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो.
क्रमशः
प्रतिक्रिया
26 Jun 2016 - 3:11 am | Jack_Bauer
तुम्ही तुमच्या लंडन ट्रीप चा अगदी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. लंडन तुमच्या नजरेतून share केल्याबद्दल धन्यवाद
28 Jun 2016 - 9:23 am | डॉ सुहास म्हात्रे
केवळ सुंदर !
28 Jun 2016 - 9:52 am | सिरुसेरि
छान प्रवासवर्णन . तेवढा कोहिनुर हिरा नक्की बघुन या . आणी लॉर्डसही .
28 Jun 2016 - 10:42 pm | मेघना मन्दार
धन्यवाद !!
29 Jun 2016 - 9:31 am | वटवट
सुरेखच....
1 Jul 2016 - 1:23 am | अभिजीत अवलिया
मस्त एन्जोय केलेय तुम्ही.