मसाले पोहे

उल्का's picture
उल्का in पाककृती
29 Jun 2016 - 7:35 pm

सर्वाना कांदा बटाटा पोहे परिचित असतीलच. त्याचंच हे भावंडं आहे.
माझी आई बेळगावची. आजोळी नाश्त्याच्या पदार्थांची खूप विविधता होती. तर हा खास बेळगावी पदार्थ म्हणायला हरकत नाही. माझ्या सासरी हे पोहे माहीत नव्हते. कदाचित इथेही बऱ्याच जणांना माहीत नसेल तर ही रेसिपी देते आहे.

b

१. मसाले पोहे ह्या नावावरून कळलंच असेल की ह्यात गोड/काळा मसाला वापरला आहे. चांगला घमघमीत २ चमचे मसाला लागणार आहे.
२. २-३ वाट्या (साधारण चौघांना पुरतील इतके) जाडे पोहे नेहमीप्रमाणे धुवून थोडावेळ भिजवून ठेवायाचे
३. आता बाकीची तयारी करायची. २ मोठे कांदे, १ बटाटा, १०-१२ तोंडली, १ वांगे चित्रात दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायचे. (कोणी ते नाक मुरडलं बरं? पोह्यात आणि तोंडली,वांग? छया बॉ आम्ही नाही घालणार. तर त्या सर्वाना सांगते की घालून बघाच. मग बोला आणि मुरडा तुमचे नाक.)

४. कढईत जरा नेहमीपेक्षा जास्तच तेल घ्यायचे. मी काय म्हणते जरा खाऊया की घमघमीत आणि चमचमीत.
५. मोहरी, हिंग, कढीपता याची दणदणीत फोडणी द्यायची. दणदणीत म्हणजे आजूबाजूला वास दरवळला पाहिजे.
६. त्यात कांदा घालायचा. थोडासा परतला की भाज्या घालायच्या. हलवून वर एक झाकण ठेवायचे. पाणी अजिबात वापरायचे नाही.
७. अंदाजे पाच एक मिनिटांनी झाकण काढून घ्यायचे. मग कढईत आणि पोह्यांवर एकाच वेळी पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट (जास्त तिखट हवे असल्यास प्रमाण वाढवू शकता), एक चमचा मसाला, अर्धा चमचा साखर आणि चवी प्रमाणे मीठ घालायचे. अर्धा चमचा चिंचेचा कोळ घालायचा.

cd

८. कढईतील भाज्यांना नीट परतवून पुन्हा झाकण ठेवायचे. पोह्यांना नीट सर्व मसाला लावून घ्यायचा. नंतर हात धुवून घ्यायचे हे सांगायला नकोच.
९. अंदाजे पाच मिनिटांनी झाकण काढून कढईत पोहे घालून नीट ढवळून परत झाकण ठेवून मस्त वाफ काढायची. झाले आपले पोहे तयार! वाढताना खोबरे आणि कोथिंबीर यांनी सजवायचे.

- उल्का कडले

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

29 Jun 2016 - 7:40 pm | किसन शिंदे

हा प्रकार कधी पाह्यला नव्हता. तोंडली आणि वांगे टाकल्यामुळे चवीला कसे लागतील कुणास ठाऊक, पण एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही. काळा/गोडा मसाला टाकण्याची आयडीया बेष्टच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2016 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असंच म्हणायचं आहे. पण प्रयोग करुन बघायला हरकत नाही.
बाकी, पाककृती फोटो भारीच आणि नव्या प्रकाराबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्स.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

29 Jun 2016 - 7:42 pm | यशोधरा

भा हा री ही ही!

प्रचेतस's picture

29 Jun 2016 - 7:48 pm | प्रचेतस

भारी.
मात्र तोंडली आणि वांगी वगळून हे पोहे खायला हवेत.

"वांगी पोहे" प्रकार हाच का?

एकदा करून बघायला हवा.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2016 - 8:23 pm | अत्रुप्त आत्मा

थोडे णविण...
पण करुण पहाण्यास प्रट्यवाय णाही. (ह्ही ह्ही! ;) ) अशे वाट्टे.

नीळा's picture

29 Jun 2016 - 8:58 pm | नीळा

कोलबी टाकून पण छान होतील

बोका-ए-आझम's picture

29 Jun 2016 - 11:53 pm | बोका-ए-आझम

सुका जवळा किंवा करंदी टाकून हे पोहे मस्त लागतील.

उल्का's picture

29 Jun 2016 - 9:03 pm | उल्का

काय हे? इतकं सान्गुन सुद्धा तुम्ही तोंडली, वांगी नाही घाल्णार का? :ड
एकदा बघाच खाउन. कळत पण नाही आपण ह्या भाज्या खातोय ते. :)
आणि हो ह्याला तोन्डली पोहे, वान्गी पोहे असेही म्हणतात जर फक्त त्याच खास भाज्य घातल्या असतील तर.
करुन बघितल्यास/आवडल्यास जरुर सांगा!

प्रचेतस's picture

29 Jun 2016 - 10:42 pm | प्रचेतस

तोंडली, वांगी आवडत नाहित हो.

राघवेंद्र's picture

1 Jul 2016 - 11:08 pm | राघवेंद्र

+१

तोंडलं वगळून करायला हरकत नाही.

खटपट्या's picture

29 Jun 2016 - 9:21 pm | खटपट्या

वा ! करुन बघायला पाहीजे.

अनन्न्या's picture

29 Jun 2016 - 9:53 pm | अनन्न्या

वांगी पोहे करते मी, पण त्यात तोंडली नाही घालत! आता असे करते एकदा

उल्कातैकडले पोहे मस्त दिसतायत. तोंडली घातलेले पोहे कधी खाल्ले नाहीयेत पण वांगी, फ्लॉवर वगैरे घालून केलेले खाल्लेयत. ही पाकृ व फोटू पाहून नेहमीच्या पोह्यांपेक्षा जे थोडेफार बदल आहेत ते करायला काहीच हरकत नाही असे वाटतेय.

पहिला फोटो एकदम मस्त दिसत आहे. पण नेहमीपेक्षा जरा काही वेगळे पोहे करायचे म्हटले तर एकटी असतानाच करावे लागतात, त्यामुळे तसा मुहुर्त केव्हा लागतो ते बघायचे!

त्रिवेणी's picture

30 Jun 2016 - 7:54 am | त्रिवेणी

ही पाककृती तीन चार दिवसापूर्वीच विष्णू मनोहर नी दाखवली कोल्हापुरी म्हणून मेजवानीत.

प्रीत-मोहर's picture

30 Jun 2016 - 8:06 am | प्रीत-मोहर

आमच्या साबा ह्याचीच एक वेगळचे वराईटी करतात. यल्लापूर स्टाईल ची. पण त्यात भाज्या नसतात.
मस्त लागणार ही पण रेशिपी हे वे सां न.

धनंजय माने's picture

30 Jun 2016 - 8:15 am | धनंजय माने

UK पाककृती बघितली. आवडेल का नाही माहिती नाही. थोडं मसालेभात प्रकरण लागेल असं वाटतंय.

त्रिवेणी, आमची ओरिजिनल रेसिपी आहे हो. ती बघून इथे नाही दिलीय मी. मी कोणताच रेसिपी शो नाही बघत. मला माहित पण नव्हतं. नाहीतर दिलीच नसती इथे.
हे मी जन्मापासून खात आलेय. :)

एकंदरीत घाटावरील जेवण मसालेदार असल्यामुळे कोल्हापूर, बेळगाव ह्या बाजूला बनवत असावेत.
आईच्या बाजूचे सर्व नातेवाईक हे पोहे कायम बनवतात म्हणून मला बेळगावी वाटले.

रुपी, आधीचा मेवा खाऊन तुमहाला तो आवडला ह्याचा आनंद वाटला. तिथे प्रतिसाद द्यायचा राहून गेला. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझ्या सासरी पण कोणी सुरवातीला तयारच होत नव्हते. आत्ता नवरा, मुलं याना खाऊन सवयीचे झाले आहेत. :)

ज्यांना तोंडली वांगी नको असतील त्यांनी ती खाताना बाजूला काढावीत. पण बनवताना घालावीत. एक वेगळा स्वाद येतो. आय इन्सिस्ट. :)

फोन जुना झाल्यामुळे फोटो नीट येत नाहीत तरी आवडल्याबद्दल धन्यवाद.

त्रिवेणी's picture

30 Jun 2016 - 8:35 am | त्रिवेणी

मी कुठ म्हंटल टी बघून दिली. मी फ़क्त सांगितल की परवाच मेजवानीत बघितली.
आणि कोण काय काय शो बघत याच्याशी मला काही घेणे देणे ही नाही.पाककृती वाचली बघितलेले होते म्हणून शेयर केले.
बाक़ी तुमच्या पाककृतील मी प्रतिसाद नाही दिला तर तुम्हाला ही काही फरक पडणार नाही.पण आता मी मला कळले काही लोकांशी इंटरैक्ट न केलेलेच बरे.

उल्का's picture

30 Jun 2016 - 9:45 am | उल्का

गैरसमज होतोय तुमचा. उगीच मनात कटुता नको म्हणून पुढील स्पष्टीकरण देतेय.

तुम्ही लिहिल्यामुळे कळलं म्हणून मी तुमचं नाव घेऊन लिहिलं इतकंच. ते सर्वानाच उद्देशून आहे कारण तुम्ही तसे लिहिल्यामुळे कोणालाही वाटू शकतं की मी ती रेसिपी बघून लगेच इथे दिली तर मी माझी बाजू मांडली इतकंच. त्याने तुम्ही दुखावला गेला असाल तर सॉरी.

मला प्रतिसाद दिला तर तो आवडतो की. कोणी द्यावा न द्यावा ही ज्याची त्याची मर्जी असते.

एक मिपाकर आणि एक अनाहिता ह्या दुहेरी नात्याने मी इतकेच सांगू शकते की आपण झालं गेलं विसरून जाउया. :)

उल्काताई, मसाला पोहे एकदा बनवायला पाहिजेत. काही अनवट बेळगावी पदार्थ माहित असतील, तर त्यांचीही पाककृती येऊ द्या.

अजया's picture

30 Jun 2016 - 9:12 am | अजया

करुन बघणार नक्की.

नीलमोहर's picture

30 Jun 2016 - 10:03 am | नीलमोहर

ही रेसिपी बघून काल पोहे खायची खूप इच्छा झाली मग रात्री कांदा-बटाटा पोहे करून खाल्ले :)
पाकॄ वेगळी आहे पण केली जाईल असे वाटत नाही.

पाककृती आवडली.जेवण ऐवजी करता येईल.

छान प्रकार आहे. एक वेळच्या जेवणालाही हरकत नाही पुलाव सारखेच.

पद्मावति's picture

30 Jun 2016 - 1:57 pm | पद्मावति

छान वेगळाच प्रकार आहे. करून पाहीन नक्की.

पैसा's picture

30 Jun 2016 - 10:39 pm | पैसा

वेगळाच प्रकार! मस्त!

इरसाल's picture

1 Jul 2016 - 1:11 pm | इरसाल

असं करा, त्या झालेल्या पोह्यात रात्रीचा उरलेला चिकन किंवा मटण रस्सा टाका नी मग बघा काय शॉल्लेट चव लागते ती !

माहितगार's picture

1 Jul 2016 - 4:42 pm | माहितगार

पोह्यांची बिर्‍याणी आयडीया वाईट नाही करून पहावी लागेल. बाकी लेखातील मसाले वांगे-तोंडली पोहे नक्कीच खमंग होत असणार

विशाखा राऊत's picture

1 Jul 2016 - 4:44 pm | विशाखा राऊत

हे कॉम्बो मस्तच लागते.

विशाखा राऊत's picture

1 Jul 2016 - 4:08 pm | विशाखा राऊत

बराचसा पुलाव्/मसालेभाताच्या जवळपास जाणारा प्रकार दिसतोय. करुन बघावा लागेल.

उद्याच्या कट्ट्याला याचे पार्सल येणार असं दिसतंय.

उल्का's picture

2 Jul 2016 - 9:35 pm | उल्का

का घाबरवताय सगळ्यांना?
तोंडली-वांगी विरोधक समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि त्यांचे भाऊबंध कट्ट्याला हजेरी लावत असताना माझी तर बुवा हिम्मत नाही हे पार्सल न्यायची. :प :द

माम्लेदारचा पन्खा's picture

3 Jul 2016 - 12:39 am | माम्लेदारचा पन्खा

म्हणजेच चिकन पोहे..... भारी लागतात अशी खात्रीलायक माहिती आहे

माम्लेदारचा पन्खा's picture

3 Jul 2016 - 12:40 am | माम्लेदारचा पन्खा

म्हणजेच चिकन पोहे..... भारी लागतात अशी खात्रीलायक माहिती आहे