मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
22 Jun 2016 - 11:22 pm

णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!
च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!

*****************************************
तारीख - ३ जुलै,रविवार

कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी

वेळ- दुपारी बारा वाजता

जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल.
रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.
निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती!
NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.

हे ठिकाणमांडणीसमाजजीवनमानमौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

मितभाषी's picture

22 Jun 2016 - 11:28 pm | मितभाषी

वाशीला का
ठाण्यात का नको.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2016 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा

आंSssssssss
दू दू दू .

विवेकपटाईत's picture

23 Jun 2016 - 7:23 pm | विवेकपटाईत

पक्के मुंबईकर दिसता राव

रातराणी's picture

22 Jun 2016 - 11:32 pm | रातराणी

हा ना ठाण्यात घेतला तर सोपं पडेल.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:40 am | टवाळ कार्टा

तू येणार?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2016 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा

@कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!››› http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-060.gif

अभ्या..'s picture

22 Jun 2016 - 11:30 pm | अभ्या..

त्या दिव्य आयडीला हा व्हीव्हीआयपी आयडी कुणी दिला?

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:42 am | टवाळ कार्टा

कोण दिव्य आयडी?

अभ्या..'s picture

25 Jun 2016 - 4:13 pm | अभ्या..

होता एक, ण णळाचा वाला. पुणेकरांनी एका कट्टयाचे तीन धागे काढून गाजवला.

मितभाषी's picture

22 Jun 2016 - 11:30 pm | मितभाषी

बुवा मीच पैला =))

बाकी कट्ट्याला टक्या हाय मग मी नाही.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:42 am | टवाळ कार्टा

बस्स का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2016 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

कट्ट्याला शुभेच्छा !

जव्हेरगंज's picture

22 Jun 2016 - 11:42 pm | जव्हेरगंज

महाकट्टा?

वढ!

निसर्गरम्य ठिकाणी करा की राव!
काय ठिवलय त्या मॉलात!

आमच्याकडून शुभेच्छा !

पगला गजोधर's picture

23 Jun 2016 - 1:27 pm | पगला गजोधर

फक्त पुणे प्रांतात होणाऱ्या कट्ट्याला महाकट्टा असे संबोधतात .....
;)

रेवती's picture

22 Jun 2016 - 11:47 pm | रेवती

वाचतिये.

सोनुली's picture

22 Jun 2016 - 11:49 pm | सोनुली

सेंटर वन बरे वाशीमधले.

हेमन्त वाघे's picture

23 Jun 2016 - 5:41 am | हेमन्त वाघे

ते आता बहुदा पडत aahet

सेंटर वन बंद झाले कधीचे.म्हणून इनाॅर्बिट

धनंजय माने's picture

22 Jun 2016 - 11:57 pm | धनंजय माने

करा कट्टे, खा मटार उसळ शिकरण!

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:43 am | टवाळ कार्टा

तंगड्यापण आहेत

जुइ's picture

23 Jun 2016 - 12:02 am | जुइ

सचित्र वृत्तांत येऊद्यात.

१) मॅालमधली जागा - फुड कोर्ट म्हणजे हाटिलच.फक्त बरराच वेळ बसू देत असतील.तुझं तू माझं मी अशा जाहिराती केलेल्या कट्ट्यात बिल समानच वाटतात मग उगाच जैरात कशाला? इतक्या लोकांचा हिशोब ठेवणार कसा? वेगवेगळ्या टेबलावंवर वेगळे ग्रुप बसले तर पुन्हा महाकट्ट््यांत मिनीकट्टे असं होईल.
२) ३जुलै रविवार आहे नेहमीप्रमाणे वाशीकडे जाणारी हार्बर लाईन दहा ते चार मेगाब्लाकात जाते.बसेसना तुडुंब गर्दी होते
ही दोन खुसपटं काढ ल्याबद्दल आयोजक चिडतील हे समजून आहे.( न येणारे फारच करतात ).

स्पा's picture

23 Jun 2016 - 8:19 am | स्पा

खिक्क

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jun 2016 - 8:38 am | अत्रुप्त आत्मा

पांडू
तू येणार का? सांग ना?

प्रचेतस's picture

23 Jun 2016 - 8:41 am | प्रचेतस

पांडू आला तर तुम्ही जाणार आहात काय?

स्पा's picture

23 Jun 2016 - 8:48 am | स्पा

मन:पूर्वक शुभेच्छा !!!

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:43 am | टवाळ कार्टा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2016 - 6:53 pm | अत्रुप्त आत्मा

@पांडू आला तरच तुम्ही जाणार आहात काय? >>> ल्लुल्लुल्लुल्लु :-/ तू गप आगोबा! दुष्ष्ष्ष्ष्ट!

सूड's picture

24 Jun 2016 - 6:58 pm | सूड

पांडू जातोय अशी गुप्तहेरांकडूण खबर आहे बरं!!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2016 - 8:23 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/dancing-happy-star-smiley-emoticon.gif

प्रचेतस's picture

25 Jun 2016 - 8:26 am | प्रचेतस

तुम्ही येताय म्हणजे.

सतिश गावडे's picture

25 Jun 2016 - 9:41 am | सतिश गावडे

तुम्ही जाताय म्हणजे.

टवाळ कार्टा's picture

25 Jun 2016 - 10:46 am | टवाळ कार्टा

तुम्हालासुध्धा आणणार म्हणजे

सतिश गावडे's picture

25 Jun 2016 - 11:02 am | सतिश गावडे

मी शक्यतो येईन.
कामानिमित्त ज्या चार शहरात आजवर राहीलो त्यापैकी नवी मुंबई एक आहे. त्यामुळे वाशीशी जुना ऋणानुबंध आहे. :)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2016 - 10:49 am | अत्रुप्त आत्मा

अ सो च्च!

सोनुली's picture

23 Jun 2016 - 11:23 am | सोनुली

अगदी खरे आहे. ह्या माॅलला रविवारी अतिशय गर्दी असते. टेबल मिळणे ही अवघड होते. इनाॅर्बिट च्या बाजूला रघुलीला हा बर्यापैकी मोठा माॅल आहे. न जमल्यास वाशीला भगत ताराचंद छान. निदान निवांत बसायला मिळेल.

अत्रन्गि पाउस's picture

23 Jun 2016 - 8:03 am | अत्रन्गि पाउस

टिकुजीनी वाडी, woodland असे पर्याय सुचवतो ...
बाकी कट्टा करू, कट्ट्याला येतो असे म्हणायचा धसकाच घेतलाय मी ...त्यामुळे येण्याची प्रचंड इच्छा आहे एवढेच म्हणून थांबतो ....
बाकी त्या मोसादचे जरा बघा कि बोकाभाऊ

त्रिवेणी's picture

23 Jun 2016 - 8:07 am | त्रिवेणी

पुण्यात करावा असे सुचवते.

शित्रेउमेश's picture

23 Jun 2016 - 8:48 am | शित्रेउमेश

पुण्यातच करावा... उगच ठाणे-वाशी असा वाद नको.. ;)

भुमी's picture

23 Jun 2016 - 9:00 am | भुमी

अनुमोदन. :)

अजया's picture

23 Jun 2016 - 9:09 am | अजया

नाही जा =)))
पुण्याच्या दोन किमी परिघातून बाहेर पडा.जरा नवी मुंबई बघाच ;)

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:44 am | टवाळ कार्टा

=))
बाकी आळशी पुणेकर पिंचीकट्ट्यालाही येत नाहीत

दोन किमी परिघापलीकडे पुणेहि नवच दिसेल ना! नवी मुंबई काय बघायची वेगळी.शिवाय सध्या पुण्यात पावसाच्या शिडकाव्याने (तेच तीन दिवसात साडेचार सरी) सुखद गारवा का कायसस पडलाय.तर पुणच बर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2016 - 8:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कट्टयाला शुभेच्छा...! इनऑर्बिट मॉल मस्त आहे, बाहेरच्या बाजूला असलेल्या हॉटेल मधे बराच वेळ घातला चार महिण्यापूर्वी. :)

तुम्हारी यादों की खुशबू आती है ऐसे...!
फूल कोई पुराना किताबों में रखा हो जैसे...!

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

23 Jun 2016 - 8:41 am | चौकटराजा

राजमाची व्हाया लोणावळे असा पदभ्रमण कट्टा करावा. टी टी एम एम म्हण्जे ज्याचे त्याने चालायचे व हादडायचे !! क्वचित एखादी बाकरवडी आम्ही मित्रास देउ. कस्सां ?

नाखु's picture

23 Jun 2016 - 8:48 am | नाखु

आणि जोरदार अनुमोदन.

हि.पा.कंपनी

महासंग्राम's picture

23 Jun 2016 - 2:30 pm | महासंग्राम

बाब्बो लोणावळा स्टेशन ते उधेवाडी असे १४.१ किमी एव्हढे चालायचे म्हणजे लोकांना चौपट करायचा बेत दिसतोय तुमचा चौकट राजा ...

प्रचेतस's picture

23 Jun 2016 - 8:41 am | प्रचेतस

इकडून कोणी जाणारे असल्यास कट्ट्याला येईन.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:44 am | टवाळ कार्टा

नक्की का? का इकडच्या कुठल्या रस्त्यावर यायला भीती वाटते? =))

गणामास्तर's picture

23 Jun 2016 - 3:52 pm | गणामास्तर

मी येतो..नाखुन अंकलना पण घेऊन जाऊ.

प्रचेतस's picture

23 Jun 2016 - 3:54 pm | प्रचेतस

चालेल.
मग ३ चं फिक्स करु.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 4:36 pm | टवाळ कार्टा

हा पर्याय चालणार नव्हता काय? =))

मुंबईला बरं लगेच जाऊ वाटतंय ऑ.
मानानं धा येळेला बोलावलं सोलापूरला. हजार कारणं सांगून टाळतेत पुणेकर.
भुरटे कुठले. या आता सोलापूराला मग सांगतो.

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 5:12 pm | बोका-ए-आझम

तुमची एक शीट पकडलेली आहे बरं का! यायचंय!

ओ आम्हाला परवडत नाही. कामात काम काढून येऊ. नुसते कट्टयासाठी नाही जमणार मुंबई ट्रिप. पुण्यात असता तर इचार करता आला असता. पुणेकर असा विचार करत नाहीत हे दुःख आहेच.

अद्द्या's picture

24 Jun 2016 - 4:57 pm | अद्द्या

हे लावतंय टेपा =]]

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2016 - 5:00 pm | टवाळ कार्टा

पुणेकर तुल हिंग लावून विचारत नाहीत (तसे पुणेकर पिंचिकट्ट्यालाही ठिकाण लांब वाटते म्हणून जात नाहीत)

सोलापूरला नुसतं एक दिवसासाठी यायचं नाहिये.
दोन तीन दिवस मनमुराद राहायचं आहे, भटकायचं आहे. येणार हे नक्की.

अजया's picture

23 Jun 2016 - 8:49 am | अजया

कट्टयाला येणार.
इनाॅर्बिटला लवकर जाऊन जागा पकडण्यात येईल.कल्जी क्रु नये.अकरा वाजेपर्यंत जमल्यास गप्पागोष्टी करुन ज्यांना हवे ते इनाॅर्बिट किंवा बाहेर जाऊन जेऊ शकतील.शक्य तितक्या लवकर यावे ही विणंती.
पुण्याहून काही अनाहिता नक्की येत आहेत.

त्रिवेणी's picture

23 Jun 2016 - 9:28 am | त्रिवेणी

आम्ही येणार आहोत.बहुतेक गाड़ी करुन.वल्ली दा तसेच इतर दा मंडळी चालणार असेल तर सगळे बरोबरच जावूया.

किसन शिंदे's picture

23 Jun 2016 - 9:40 am | किसन शिंदे

येऊरला करा की राव कट्टा.

त्रिवेणी's picture

23 Jun 2016 - 9:54 am | त्रिवेणी

येवूर कुठ आहे?

शान्तिप्रिय's picture

23 Jun 2016 - 10:36 am | शान्तिप्रिय

येवूर उपवन च्या जवळ आहे,
उपवन हा येवुर चा पायथा.
येवूर पाटोणा पाडा ही बस स्तेशन वरुन आहे.
या दिवसात आणखी तीन चार पाऊस झाल्यानंतर येवूर मस्तच! निसर्ग रम्य!
येथुन संजय गांधी उद्यान सुरु होते.

येवूरला रणगाडापण जाणार नाही संजय गांधी उद्यानात अशी भिंत घातली आहे. वाटेत जे काही रिझॅार्ट /आहेत ते म्हणता का?तिथे जातात काही लोक.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:45 am | टवाळ कार्टा

येउर भन्नाट आहे ;)

किसन शिंदे's picture

23 Jun 2016 - 9:46 am | किसन शिंदे

३-४ जुलै ट्रेकचा प्लान नाही झाल्यास कट्ट्याला हजेरी लावण्यात येईल.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:53 am | टवाळ कार्टा

म्हणजे प्लान अज्जून झाला नाहीये ना...मग ये की

नूतन सावंत's picture

23 Jun 2016 - 5:56 pm | नूतन सावंत

हायला!मिपा कट्टा नं.दोनवर?हर, हर!तेसुद्धा एक नं ठरलेला नसताना?ह.घ्या.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 6:09 pm | टवाळ कार्टा

आणि ते सुध्धा माजी संपादकांकडून =))

रे मेल्या, सुध्धा नाही, सुद्धा! लिही आता दहा वेळा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jun 2016 - 9:58 am | कैलासवासी सोन्याबापु

कट्टयास अन कट्टेकरी मंडळीस हार्दिक शुभेच्छा !!

निराकार गाढव's picture

23 Jun 2016 - 10:01 am | निराकार गाढव

म्या म्हन्तो, पुन्न्याला का न्हाई?
... हं... अखेर नीर क्षीर विवेक कमीच असतो बगा मिपावर...
.

किसन शिंदे's picture

23 Jun 2016 - 7:27 pm | किसन शिंदे

सरांनंतर माझा आवडता आयडी. होतात कुठे इतके दिवस?? :)

गॅरी ट्रुमन's picture

23 Jun 2016 - 10:24 am | गॅरी ट्रुमन

कट्टा रविवारी संध्याकाळी करता आल्यास बरे होईल.माझा रविवारी दुपारी ३ पर्यंत क्लास असतो त्यामुळे लंचचा कार्यक्रम असल्यास मला येता येणार नाही. कट्ट्याचे ठिकाण माझ्यापासून अगदीच जवळ आहे त्यामुळे मला यायचेच आहे. पण सकाळी कट्टा असल्यास मात्र नेहमीप्रमाणे 'कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. फोटो आणि वृत्तांत टाका. वाट बघत आहे' असे म्हणावे लागेल :(

अजया's picture

23 Jun 2016 - 10:45 am | अजया

गॅरी भौ जमवा की काहीतरी. पुणेवाले परत कसे जाणार संध्याकाळी येऊन.तासभर आधी येता येईल का बघा.वाशी कट्टा ठरवतानाच तुम्ही आठवले होतात.

गॅरी ट्रुमन's picture

23 Jun 2016 - 11:26 am | गॅरी ट्रुमन

मी क्लासवरून डायरेक्ट कट्ट्याच्या ठिकाणीच येईन. कधीपर्यंत सगळे असणार आहेत? निदान स्थानिक मिपाकरांना थोडावेळ तरी भेटायला मिळाले तर चांगले होईल.

हेमन्त वाघे's picture

23 Jun 2016 - 11:42 am | हेमन्त वाघे

आपणही नवी मुंबईत राहता का ? कोठे ? मी सानपाडा येथे राहतो .

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:53 am | टवाळ कार्टा

कितीला पोचाल...जमल्यास थांबू

माॅलात कोणी हाकलत नाही :) थांबु तुमच्यासाठी!

प्रचेतस's picture

23 Jun 2016 - 10:40 am | प्रचेतस

मुंबैकर नुसतंच हे ठिकाण-ते ठिकाण, ही वेळ-ती वेळ असं करायला लागलेत.
काही मुंबैकर तर विषयाला भलतेच फाटे फ़ोडायला लागलेत.

कंजूस's picture

23 Jun 2016 - 11:49 am | कंजूस

पुण्याचं वारं लागलं.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 11:54 am | टवाळ कार्टा

पुरावा द्या? ३-३ धागे तरी नाही निघत...बाकी तुम्ही कधीपासून पुणेकर झालात =))

प्रचेतस's picture

23 Jun 2016 - 11:56 am | प्रचेतस

वरचेच प्रतिसाद बघा काही.
बाकी माझ्या प्रतिसादात पुणेकरांविषयी काहीतरी उल्लेख तरी आहे का?

महासंग्राम's picture

23 Jun 2016 - 2:36 pm | महासंग्राम

चला आपण तो पर्यंत एखादा पिंची कट्टा करू नेवाळे मिसळ खाता खाता :)

प्रचेतस's picture

23 Jun 2016 - 2:38 pm | प्रचेतस

नेवाळे नको, तो तिखटाचे डबेच्या डबे ओतत असतो. मयुरला जाऊ.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 2:45 pm | टवाळ कार्टा

जिथे रहातो तिथेच नुस्ती मिसळ खायची तरी...पिंचीकर नुसतंच हे ठिकाण नको-ते तिखट बनवतात असं करायला लागलेत
=))

प्रचेतस's picture

23 Jun 2016 - 2:47 pm | प्रचेतस

ते चोखंदळ असतात.

महासंग्राम's picture

23 Jun 2016 - 2:52 pm | महासंग्राम

आता गाडी पुणेकरांवरून पिंचि वर वळली काय दुत्त दुत्त लोक्स

निराकार गाढव's picture

23 Jun 2016 - 10:45 am | निराकार गाढव

स्रां ना बो ला व ला ना य त र क ट्ट्या ला क ट्टी.