भाग - नउवा
आज जरा तब्येत डाऊन असल्याने सकाळी कुठेच गेले नाही. दुपारनंतर घरात बसून कंटाळा आला होता. सकाळी औषध घेतल्याने आता जरा बरं वाटत होतं म्हणून जवळच्या जवळ एका पार्क मध्ये जायचं ठरवलं. रीजण्टस पार्क. ४ रॉयल पार्क पैकी एक आहे हे पार्क. सगळ्याच पार्क प्रमाणे अतीव सुंदर. या पार्क मध्ये जाण्यासाठी रीजण्टस पार्क ट्युब स्टेशन ला उतरावं लागतं. इथून ५ मिन चालत जाण्याच्या अंतरावर आहे हे पार्क. इतर पार्क प्रमाणे रॉयल या उक्तीला साजेसं. ४ पार्क पैकी मला सगळ्यात जास्त आवडलं ते हेच पार्क. या पार्क मध्ये आत शिरल्या शिरल्या माझं स्वागत केलं ते खारुतैंनी :) मला प्राण्यांची खूप आवड आहे त्यामुळे कुतूहल वाटत. आपल्या इथे खारुताई किती घाबरतात !! इथल्या म्हणजे अगदी धीट बरेच लोकं त्यांना खारे दाणे खायला घालत होते आणि बघता बघता ८/१० खारी गोळा झाल्या तिथे. पटपट फोटो काढून घेतले आणि पुढे निघाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भरपूर हिरवळ आणि झाडे. काही झाडांच्या बाजूने पिवळ्या फुलांचे ताटवे. हे सगळ्याच बागांमध्ये बघायला मिळाले. ते बघत पुढे गेले तर एक लांब रस्ता दोन्ही बाजूनी झाडं आणि मध्ये छोटी कारंजी आणि त्याचबरोबर झाडांची सजावट. हा फोटो पहा कारण याला नक्की काय म्हणतात ते मला ठाऊक नाही.
खारुताई :)
ही अशी सजावट दिसली सगळीकडे
अजून पुढे गेल्यावर अजून एक मोठा रस्ता लागला त्याच्या दुतर्फा पानं नसलेली झाडं आणि बाजूला हिरवळ आणि त्या झाडांवर पडलेलं उंन. इतकं सुरेख दिसत होतं ते दृश्य. हा पहा फोटो.
थोडं पुढे गेल्यावर एक छोटंसं तळ होतं त्या तळ्यात छोटी बदकं आणि त्या तळ्यावर छोटासा लाकडी पूल. मोबाईल क्यामेरा मध्ये ते मनमोहक दृश्य साठवून मी पुढे निघाले.
अंधार पडत असताना !!
आता एक मोठ्ठा तलाव होता त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी बदकं , हंस, सीगल पक्षी होते. तलावाच्या आजूबाजूला सगळीकडे नुसती हिरवळ आणि झाडं आणि त्या हिरवळीवर बसायला बाकं. तिथे बसून या सगळ्या दृश्याचा आस्वाद घेतला. आता पावसाची लक्षण दिसत होती.संध्याकाळ असल्याने थंडी खूप वाजत होती आणि आधीच जर बर वाटत नसल्याने घराकडे जायचा रस्ता गाठला.
क्रमश :
प्रतिक्रिया
9 Jun 2016 - 7:37 am | यशोधरा
फोटो ३ आणि ४ आवडले, उन्हं छान दिसतायत.
9 Jun 2016 - 8:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो आवडले. शेवटचा आणि शेवटून चार लंबर लैच ख़ास.
-दिलीप बिरुटे
13 Jun 2016 - 10:29 pm | मेघना मन्दार
धन्यवाद !!