गाभा:
माझ्या ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी सांगितले होते.
http://www.misalpav.com/node/25737
याच उपक्रमातला आणखीन एक यशस्वी विद्यार्थी जॉन ! जॉन हा लंडनचा पीएचडीचा विद्यार्थी माझ्या ब्लॉगवरून मराठी शिकला आहे. आता किती आत्मविश्वासपूर्वक मराठी बोलतो ते पहा.
या आधी माझ्या ब्लॉगवरून मराठी शिकलेल्या एका चायनिज अमेरिकन व्यक्तीबद्दलही मी मिपा वर लिहिले होते
http://www.misalpav.com/node/33911
तरी व्हिडिओ बघून आपला अभिप्राय नक्की द्या.
व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा जेणेकरून इतरांना मराठी शिकायला हुरूप येईल आणि जे आधीपासून शिकत आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
धन्यवाद,
कौशिक लेले
प्रतिक्रिया
6 Jun 2016 - 7:42 pm | पद्मावति
वीडियो दिसत नाहीये :(
10 Jun 2016 - 11:46 am | कौशिक लेले
थेट यूट्यूब वर जाऊन बघता का ?
6 Jun 2016 - 10:55 pm | एस
अभिमानास्पद. फार छान काम करताय तुम्ही.
10 Jun 2016 - 11:50 am | कौशिक लेले
धन्यवाद. इतर समाज माध्यमांतून आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या बद्दल माहिती पोचवल का ? काद्दचीत अजून काही नवीन विद्यार्थी तयार होतील
-कौशिक
6 Jun 2016 - 11:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्पृहणिय काम करत आहात तुम्ही !
मिपावर व्हिडिओ प्रकाशित करताना मिपाचा कोणताही कोड / कोड टाकण्याचे बटण वापरायची गरज नाही.
मिपामध्ये व्हिडिओ क्लिप टाकण्यासाठी वापरायच्या पायर्या...
१. युट्युबमध्ये व्हिडिओ सुरु करून त्यावर राईटक्लिक करा व "copy embed code" निवडा.
२. मिपाच्या टेक्ट्बॉक्समध्ये तुमच्या लेखनात हवे असेल तेथे पेस्ट ( ctrl+v )करा.
३. लेखातले इतर लिखाण, फोटो, इ मनासारखे झाल्यावर प्रकाशित करा.
काम फत्ते ! :)
10 Jun 2016 - 12:16 pm | कौशिक लेले
मनःपूर्वक धन्यवाद
- कौशिक
6 Jun 2016 - 11:14 pm | उल्का
अरे व्वा! अभिनन्दन!
10 Jun 2016 - 11:52 am | कौशिक लेले
धन्यवाद. इतर समाज माध्यमांतून आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या बद्दल माहिती पोचवल का ? कदाचि त अजून काही नवीन विद्यार्थी तयार होतील.
आपल्या इतर काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्याही जरूर कळवा
-कौशिक
6 Jun 2016 - 11:36 pm | वेल्लाभट
जबराट काम ! ! ! !
काहीच्या काही
आणि या मुलाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे ! ! ! सहीच.
10 Jun 2016 - 11:52 am | कौशिक लेले
खरंय कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
धन्यवाद. इतर समाज माध्यमांतून आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या बद्दल माहिती पोचवल का ? कदाचि त अजून काही नवीन विद्यार्थी तयार होतील.
आपल्या इतर काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्याही जरूर कळवा
-कौशिक
6 Jun 2016 - 11:43 pm | पद्मावति
ग्रेट काम करताय तुम्ही.
तुमचा आधिचाही विडीयो मला खूप आवडला होता.
10 Jun 2016 - 11:53 am | कौशिक लेले
धन्यवाद. आपल्या इतर काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्याही जरूर कळवा
-कौशिक
7 Jun 2016 - 9:22 am | नाखु
त्या सहभागी विद्यार्थ्याचे विशेष कौतुक आणि तुम्हा दोघांचेही अभिनंदन.
मला जाणवलेली ठळक बाब म्हणजे त्या (जॉन हा लंडनचा पीएचडीचा विद्यार्थी) ने उत्तरे देताना कटाक्षाने मराठीचाच आधार घेतला (भले त्यासाठी काही वेळ घेतला/अडखळला). इथे जालावर दर दोन वाक्यान (अकारण) हिंदी/इंग्रजीचे ठिगळे जोडण्याच्या पार्श्वभुमीवर हे स्पृहणीय वाटले.
अनिवार्य असेल तर हिंदी/इंग्रजी वापरावे पण उठ्सुट "क्ञुट्,ऑसम" बोलताना ठीक असेलही (फेस्बुकी विश्वात) लिहिताना किमान वाचलेले शब्द आठवावेत तरी.
हे माझे मत आहे आणि सगळयांना आवडेलच असे नाही.पण याचा जरूर विचार करावा. मराठी भाषा समृद्ध आहे आणि ती प्रवाही+निर्भेळ रहावी म्हणून (जव्हेरगंज्,बॅट्टमण्,बोकेश ई लेखकांनी चपखल नवनवीन मराठी शब्दवापर आणि उपमांचा उपयोग जसा केला तसा अल्पसा का होईना प्रयत्न करावा ही आग्रही विनंती)
मराठीवर प्रेम करताना इतर भाषांचा दु:स्वास न करणारा नाखु
7 Jun 2016 - 10:57 am | वेल्लाभट
+१ जे बात
7 Jun 2016 - 9:34 am | पिंगू
हा जॉन तर अस्सल मराठी प्रेमी निघाला. त्याचा आदर्श मुंबईत असणार्या माजुरड्या परप्रांंतियांनी घ्यायला हवाच.
7 Jun 2016 - 10:56 am | वेल्लाभट
आदर्श????
हे साले शिरजोर होऊन आपल्यालाच हिंदीत बोलायला दटावणार... आदर्श वगैरे संकल्पना यांना ठाऊकही नसतील. उठता लाथ बसता बुक्की शिवाय व्हायचं नाही हे असंच वाटतं अनेकदा.
7 Jun 2016 - 9:48 am | स्पा
एक नंबर रे काैशिका, इतर अवेंजर्स ना पण मराठी शिकव आता तु
10 Jun 2016 - 11:54 am | कौशिक लेले
खूप खूप आभार !! हो मी तर सगळ्यांना शिकवायला तयारच आहे. जितके जास्त विद्यार्थी तेवढा मला आनंद जास्त
- कौशिक
7 Jun 2016 - 10:04 am | राजाभाउ
मस्त उपक्रम मनापासुन अभीनंदन. हित हापीसात विडियो दिसत नाही, घरी जाउन बघतो.
10 Jun 2016 - 11:55 am | कौशिक लेले
धन्यवाद. बघा आणि नक्की प्रतिक्रिया कळवा
7 Jun 2016 - 12:04 pm | मराठी कथालेखक
छान उपक्रम.
महाराष्ट्र शासनाने या उपक्रमाची दखल घेवून कौशिकरावंचा योग्य तो गौरव करावा असे मला वाटते.
(मी ट्विटर वापरत नाही. ट्विटर वापरणार्यांपैकी कुणी मा. मुख्यमंत्र्यांना याबद्दल ट्विट करावे असे मी सुचवतो)
10 Jun 2016 - 11:58 am | कौशिक लेले
खूप खूप आभार.
गौरव नाही केला तरी चालेल पण या उपक्रमाला जर शासनमान्यता मिळाली (उदा. शासकीय मराठी विभागाच्या संकेतस्थळावर याचा दुवा दिला गेला, विद्यापीठांम्धून याची महिती दिली गेली ) तरी पुष्कळ झाले.
मी ट्वीटर वरून मुख्यमंत्री, शिक्षण/मराठी मंत्री यांना ट्वीट केलंय पण प्रतिसाद नाही.
7 Jun 2016 - 12:25 pm | भक्त प्रल्हाद
मस्तच उपक्रम!!!
अवांतरः
असाच एक विडीओ जालावर सापडला. मजेशीर आहे.
खाली दिलेल्या दुव्यावर टिचकि मारुन पहा.
चिउ काउ माउ
10 Jun 2016 - 11:59 am | कौशिक लेले
धन्यवाद. इतर समाज माध्यमांतून आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या बद्दल माहिती पोचवल का ? कदाचि त अजून काही नवीन विद्यार्थी तयार होतील.
आपल्या इतर काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्याही जरूर कळवा
-कौशिक
7 Jun 2016 - 12:46 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
जॉन अडखळतोय बोलताना ,पण त्याचा प्रयत्न खूप छान आहे ,विषेश म्ह्ण्जे त्याला मराठी बोललेलं सगळं समजतय व्यवस्थीत,कौशिक ,तुला पुढील कामासाठी शुभेच्छा.
10 Jun 2016 - 12:00 pm | कौशिक लेले
धन्यवाद. हो अजून बराच सराव लागेल. पण त्याचा शिकण्याचा वेग आणि सातत्य खूपच स्तुत्य आहे.
-कौशिक
7 Jun 2016 - 1:53 pm | जगप्रवासी
खूप छान काम
10 Jun 2016 - 12:01 pm | कौशिक लेले
धन्यवाद. इतर समाज माध्यमांतून आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या बद्दल माहिती पोचवल का ? कदाचि त अजून काही नवीन विद्यार्थी तयार होतील.
आपल्या इतर काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्याही जरूर कळवा
-कौशिक
7 Jun 2016 - 2:51 pm | समीरसूर
जबरदस्त!! जॉन तो इंग्रज आहे हे लक्षात घेता खूपच छान मराठी बोलतोय. त्याच्या बोलण्यात 'कदाचित', 'अवघड', 'दोन-अडीच वर्षे', 'शिकेन' वगैरे उस्फुर्त वाटतात. याचाच अर्थ तो नुसती मराठी वाक्ये बोलायला शिकत नाहीये तर खरोखर मराठी भाषा शिकतोय.
आपलं काम जबरदस्त आहे. अभिनंदन!
10 Jun 2016 - 12:02 pm | कौशिक लेले
बरोबर. तो अगदी मनापासून भाषा शिकतोय .
आपल्या कौतुकाबद्दल खूप खूप आभार
- कौशिक
7 Jun 2016 - 2:53 pm | समीरसूर
ही मिसळपावची किंवा व्हिडीओची लिंक माझ्या फेसबुकवर शेअर केली तर चालेल का? आपली परवानगी असेल तर करतो.
10 Jun 2016 - 12:02 pm | कौशिक लेले
अवश्य. उलट मी सर्वांना सांगतो आहे की इतर समाज माध्यमांतून आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या बद्दल माहिती पोचवा कदाचित अजून काही नवीन विद्यार्थी तयार होतील.
आपल्या इतर काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्याही जरूर कळवा
धन्यवाद,
कौशिक
7 Jun 2016 - 6:11 pm | मदनबाण
परत एकदा अभिनंदन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काला रे सैईया काला रे, तन काला रे मन काला रे ,काली जबां की काली गारी, काले दिन की काली शामे,सैया करते जी कोल बजारी :- Gangs of Wasseypur 2
10 Jun 2016 - 12:05 pm | कौशिक लेले
मनःपूर्वक धन्यवाद
9 Jun 2016 - 2:06 pm | ज्ञानराम
खूपच छान प्रयत्न करतोय जॉन ! अभिनंदन कौशिक तुमच ! आणि कौतुकही वाटतंय ! उत्तम कामगिरी बजावलीत
10 Jun 2016 - 12:06 pm | कौशिक लेले
धन्यवाद.
इतर समाज माध्यमांतून आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या बद्दल माहिती पोचवल का ? कदाचि त अजून काही नवीन विद्यार्थी तयार होतील.
आपल्या इतर काही सूचना प्रतिक्रिया असतील तर त्याही जरूर कळवा
-कौशिक
9 Jun 2016 - 2:50 pm | अप्पा जोगळेकर
कौशिक,
खरोखरच तुझा शासनातर्फे सत्कार झाला पाहिजे. कॄतिशीलता कौतुकास्पद.
10 Jun 2016 - 12:07 pm | कौशिक लेले
खूप खूप आभार.
सत्कार नाही केला तरी चालेल पण या उपक्रमाला जर शासनमान्यता मिळाली (उदा. शासकीय मराठी विभागाच्या संकेतस्थळावर याचा दुवा दिला गेला, विद्यापीठांम्धून याची महिती दिली गेली ) तरी पुष्कळ झाले.
मी ट्वीटर वरून मुख्यमंत्री, शिक्षण/मराठी मंत्री यांना ट्वीट केलंय पण प्रतिसाद नाही.
9 Jun 2016 - 3:02 pm | स्पा
काल हा जॉन मला ITC हॉटेल जवळ फिरताना दिसला, मी कटिंग मारत उभा होतो ऑफिस बाहेर, म्हटलं आयला हा काय करतोय इथे, पकडला म त्याला
भरपूर गप्पा मारल्या (मराठीत ) लालबाग परळ भागात फिरत होता
त्याला मिसळपाव बद्दल पण सांगितल.
कौशिक साहेबांना ह्यात्स ऑफ, चांगला विद्यार्थी तयार केलायत
10 Jun 2016 - 12:08 pm | कौशिक लेले
खरं की काय ? का थट्टा करताय ?
10 Jun 2016 - 12:24 pm | स्पा
नाही खरच
त्यातही मी डोंबिवली कर म्हणून तो जास्तच भाराऊन गेला :)
10 Jun 2016 - 9:48 pm | कौशिक लेले
वा !! काय खरं नाव तुमचं
10 Jun 2016 - 12:33 pm | प्रसाद गोडबोले
एक विचारु का?
जर मातृभाषा मराठी नसेल तर आवर्जुन मराठी शिकावी असे मराठीत काय आहे ?
11 Jun 2016 - 7:35 am | यशोधरा
गाथा, दासबोध आणि पसायदान :)
10 Jun 2016 - 12:58 pm | मैत्र
मूळ लेख दिसत नाहिये. http://www.misalpav.com/node/25737 - पेज नॉट फाऊंड येतंय
तुमच्या ब्लॉगची लिंक इथे द्याल का?
10 Jun 2016 - 9:32 pm | कौशिक लेले
धान्यवाद !!
माझ्या ब्लॉगच्या लिंक्स
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.com
(To Learn Marathi from English)
http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.com (To Learn Marathi from Hindi)
जमेल तेव्हा मिपा ची लिंक उघडत्ये का बघा(मला दिसली नीट) ..त्यात उपक्रमाबद्दल अधिक माहिती आहे
10 Jun 2016 - 1:19 pm | सिरुसेरि
तुम्ही आणी जॉनराव असे गुरु शिष्य यांचे अभिनंदन
10 Jun 2016 - 9:26 pm | कौशिक लेले
धन्यवाद !!!
10 Jun 2016 - 10:58 pm | बॅटमॅन
गोरा मस्त मराठी बोलतोय की एकदम!!!!!
कौशिकराव, त्याचे आणि तुमचे अशा दोघांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तुमच्यासारख्यांमुळे मराठी अधिक वर्धिष्णू होईल यात वट्ट संशय नाही बघा. मानाचा मुजरा तुम्हांला. _/\_
11 Jun 2016 - 10:40 am | कौशिक लेले
मनःपूर्वक धन्यवाद !! हो आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि सहभागाने मराठी नक्कीच अधिक वर्धिष्णू होईल. तुम्ही सुद्धा अधिकाधिक अमराठी लोकांपर्यंत या ब्लॉग बद्दलची माहिती पोचावा. ब्लॉग अधिक सक्षम होण्यासाठी सूचनाही करू शकता
- कौशिक
11 Jun 2016 - 8:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कौशिकसेठ, आपल्या भाषाप्रेमाचं आणि शिकवणीचं कौतुक आहे. अभिनंदन.
खुपच आनंद वाटला. जियो.
-दिलीप बिरुटे
11 Jun 2016 - 10:34 am | कौशिक लेले
"सेठ" :) :) दिलीप भाई "તમારો આભાર" :)
तुमच्या सूचना/प्रतिक्रिया असतील तर सांगा. शक्य तितक्या अमराठी लोकांपर्यंत या वेबसाईट पोचवा
- धन्यवाद,
कौशिक
11 Jun 2016 - 9:54 am | पैसा
हा उपक्रम असाच चालू ठेवा आणि इतर काही मराठीसाठी करता येईल ते करत रहा! शुभेच्छा!
11 Jun 2016 - 10:31 am | कौशिक लेले
हो नक्कीच. तुमच्या सूचना/प्रतिक्रिया असतील तर सांगा. शक्य तितक्या अमराठी लोकांपर्यंत या वेबसाईट पोचवा
- धन्यवाद,
कौशिक
26 Jun 2016 - 5:36 pm | बंड्याभाय
वीडियो आवडला. तुमचा ब्लॉग ही जरूर वाचीन. मराठी भाषा हा जिव्हाळ्याचा विषय आहे.
तुम्हा दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन.