माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -८

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
2 Jun 2016 - 11:17 pm

भाग आठवा -

आज माझा पहिला थांबा होता कोवेण्ट गार्डन. हे गार्डन नाहीये. हे एक शॉपिंग सेंटर म्हणता येईल अशी जागा आहे. कोवेण्ट गार्डन हे ट्युब स्टेशन आहे इथून उतरून चालत जाता येतं या छोट्याश्या मॉल मध्ये. इथे सगळ्या आंतरराष्ट्रीय ब्रांड ची छोटी दुकाने आहेत त्याचबरोबर लोकल ब्रांड ची सुद्धा दुकानं आहेत. सौंदर्य प्रसाधने , कपडे , दागिने , गृहोपयोगी वस्तू सुवेनिअर्स असं बरच काय काय मिळतं इथे. तसं स्वस्त इथे काहीच नाही पण इथे जरा किमती एकंदरीतच कमी वाटल्या मला. तुम्हाला खरेदी करायची असेल तर ही एक चांगली जागा आहे अजूनही काही जागा आहेत पण हा लेख जसा जसा पुढे जाईल तसं सांगत जाईन.

मागे सांगितल्याप्रमाणे लंडन मध्ये स्टेशन मधील अंतर कमी आहेत त्यामुळे इथून पुढे चालतच मी लायस्टर स्क्वेअर नावाच्या जागी आले. लायस्टर स्क्वेअर हे ट्युब स्टेशन सुद्धा आहेच. हे म्हणजे लंडन मधील चायना टाऊन असंही ओळखलं जातं. सगळीकडे चीनी पद्धतीच्या कमानी बांधल्या होत्या आणि चायनिज नवीन वर्ष हे काही दिवसांवर येउन ठेपलं होतं त्यामुळे सगळीकडे लाल रंगाचे चायनिज कंदिलाच्या माळा लावत होते. त्याचप्रमाणे चायनिस हॉटेल चा सुळसुळाट होता.सगळ्या हॉटेल्स च्या बाहेर वेगवेगळे प्राणी लावले होते अर्थातच मेलेले, ते पाहूनच इथे मला फार वेळ थांबता नाही आल

इथे फेरफटका मारत असताना समोर मला दिसला कुन्फू पांडा. या animated चित्रपटाची मी अत्यंत चाहती आहे आणि समोर माझं आवडतं पात्र होतं त्यामुळे अजिबात संधी न दवडता त्याच्याबरोबर फोटो काढून घेतले. अत्यंत लोभस आणि गोड पांडा होता. या चित्रपटाचं प्रमोशन चालू होतं तिथे. हा परिसर पाहून मी चालत चालत पोहोचले पुन्हा trafalgar sqare ला. पुन्हा तिथे थोडा वेळ बसून फोटो काढले थोडं खाऊन घेतलं आणि आणि निघाले.

पुढचं ठिकाण होतं Harrods!! लंडन मधील सगळ्यात जुनं आणि प्रतिष्ठित असं डिपार्टमेंटल स्टोर. इथे जाण्यासाठी Knightbridge नावाच्या ट्युब स्टेशनला उतरावं लागतं. Harrods ची इमारत सुद्धा खूप सुंदर आहे. उभ्या आयुष्यात ऐकली नसतील असे आंतरराष्ट्रीय ब्रान्डस इथे पहायला मिळतात. कपडे , सौंदर्य प्रसाधने, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, दागदागिने , लहान मुलांच्या वस्तू, खाद्यपदार्थ , केक्स चोकलेटस आणि बरंच काही. चोकलेटचं एक अख्खं दालन होतं तिथे. वेगवेगळ्या देशातल्या Specialities होत्या चोकलेटस मध्ये. Harrods खिशाला जरी नाही परवडलं तरी एकदा बघावं असं आहे. शॉपिंग मध्ये मला तसाही फार रस नसतो कधी पण Harrods बद्दल खूप ऐकलं होतं त्यामुळे माझ्या बघण्याच्या यादी मध्ये मी हे नक्की केलं होतं. विंडो शॉपिंग भरपूर करून झाली होती माझी ;) आता मी जाणार होते Hamelys मध्ये. हे लंडन मधील सगळ्यात मोठं खेळण्यांचा दुकान. आपल्या इथेही आहेत यांची दुकानं पण इथलं म्हणजे ५ मजली. मला कार्टून्स ची आणि animated पात्रांची खूप आवड आहे त्यामुळे मला पहायला जायचं होतं. लहान मुलं अर्धा दिवस घालवतील इथे इतकं मोठं आहे हे. तुम्ही कधी गेलात तर लहान मुलांना आवर्जून घेऊन जा. याची बरीच दुकानं आहेत लंडन मध्ये. इथे माझा तास दीड तास कसा गेला कळलंच नाही. दुकानाची वेळ संपल्यावर मी बाहेर आले. आता अंधार पडायला लागला होता आणि खूप फिरणं झाल्यामुळे पायही दुखत होते त्यामुळे पावलं घराकडेच वळली आणि आजची भटकंती सुफळ संपूर्ण ;)

हा फोटो आंतरजालावरून साभार. ही इमारत मुळातच खूप मोठी आल्याने मला फोटो नीट काढता आले नाहीत.

क्रमश:

प्रतिक्रिया

ही भटकंती खूप छान रंगत चाललीय. मस्तं. पु.भा.प्र.

रेवती's picture

3 Jun 2016 - 4:39 am | रेवती

वाचतिये.

सिरुसेरि's picture

3 Jun 2016 - 12:39 pm | सिरुसेरि

छान माहिती . Harrods , सेल्फ्रिजेस हि दुकाने प्रसिद्ध आहेत.

स्वाती राजेश's picture

3 Jun 2016 - 12:57 pm | स्वाती राजेश

मसाला झोन..... .. :) मस्त आहे... indian food sathi..thali system pan aahe...unddiyo pasun papad paryant sarv kahi... :) Ambiance pan chhan aahe...

अरे व्हेर यू स्वातीताई? कट्टा ठरला का?