भारताचा नकाशा
भारताचा नकाशा कसा असावा या संदर्भात अनेक वादविवाद आहेत. त्यातील सगळ्यात महत्वाचा वाद हा मुख्यत्वे काश्मीर कसे दाखवले आहे यावरून होतो. इशान्येकडील राज्यांच्या संदर्भात देखील आंतर्राष्ट्रीय सीमा दाखवताना वाद घडत असतो. अरूणाचल प्रदेश हे त्याचे एक उदाहरण झाले. अरूणाचल प्रदेशाला चीन स्वत:चा भाग समजतो आणि कुरघोडी करत असतो. जगात आंतर्राष्ट्रीय सीमावाद सगळ्यात जास्त कुठे असतील तर ते भारतीय उपखंडात आणि भारत-चीन सीमांतर्गत आहेत असे म्हणल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
चीन ने २००२ साली कायद्यात बदल करून नकाशा कसा प्रकाशीत करावा, तो करताना कुणाच्या परवानग्या घ्याव्यात आदीवरून अनेक अटी घातलेल्या आहेत आणि सज्जड दंड देखील ठेवलेला आहे. आता भारत सरकारने देखील त्याच मार्गाने जाऊन भारताचा नकाशा हा भारतीय सीमाक्षेत्रात आणि भारतीय आयपी क्षेत्रात (अर्थात इंटरनेटवर) कसा दिसेल यावरून कडक निर्बंध आणलेले आहेत. पाकीस्तानने त्यावर आरडाओरड करायचा प्रयत्न केला, पण तो चालणार नाही. कारण उदाहरणादाखल भारत google.com वर कसा नकाशा दिसावा यावर बंधन आणत नसून google.co.in वर कसा दिसावा यावर आणत आहे.
बहुतांशी किमान अमेरीकेतले भारतीय हे भारताचा नकाशा दाखवताना भारत सरकार मान्य नकाशाच दाखवतात. यावरून एक उदाहरण आठवले (डीटेल्स चुभुद्याघ्या, पण मुळ मुद्दा नक्की बरोबर आहे). नव्वदच्या दशकात एटी अँड टी ही अमेरीकन फोन कंपनी प्रचंड जोमात होती. खूप चांगली कस्टमर्स सर्विस असायची आणि भाव देखील. त्या काळात आंतर्राष्ट्रीय कॉल्स खूपच महाग होते... अशा काळात, १५ ऑगस्ट का २६ जानेवारीच्या दरम्यान एकदा त्यांनी भारतीयांना भारतात विशेष स्वस्त दरात फोन करता यावा म्हणून एक योजना काढली आणि त्यासाठीची वर्तमानपत्रात जाहीरात दिली. गडबड एकच झाली - जाहीरातीत(dotted lines ने) काश्मीर वादग्रस्त भाग दाखवला गेला होता. तेंव्हा तमाम भारतीयांनी फोन करून त्यांची सर्विस रद्द करण्याची धमकी दिली. पुढे एटी अँड टी ने भारतासाठीच्या जाहीरातीच्या वेळेस तो नकाशा बदलला होता. अर्थात नंतरच्या काळात इंटरनेटच्या जमान्यात या गोष्टी अवघड झाल्या - कंपन्यांना पण रेग्यूलेशन्स पाळताना - देशातले, परदेशातले का आंतर्राष्ट्रीय हे समजेनासे झाले. अशा वेळेस एकीकडे एक तर दुसरीकडे अजून वेगळे असे जास्त होऊ लागले.
आज हा विषय निघण्याचे कारण म्हणजे, आपण बर्याचदा लिहीत असताना संदर्भ म्हणून जगाचा, भारताचा नकाशा मिपा अथवा इतरत्र ठेवत असतो. अशा वेळेस तो जर भारताने अधिककृत ठरवलेला नकाशा नसेल तर काय करावे? नकाशा न दाखवता लेख लिहीणे उचीत ठरू शकेल का? कारण चुकीचा नकाशा दाखवणे केवळ कायद्यानेच नव्हे तर मला व्यक्तीगत तत्व म्हणून देखील पटत नाही.
ह्या चर्चेनिमित्त इथल्या सभासदांची मते आणि अधिक काही वाचनातून इतरत्र चर्चेतून समजले असले तर माहिती आणि अर्थातच ;) स्वतःची मते म्हणून येथे सांगावीत. जेणे करून "अवघे दाखवू सुनकाशा" असे वर्तमानात म्हणता येईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लोकसत्तेतला हा: http://www
अग्रलेखातली मते
इतर देशात काश्मिरला शक्यतो
असल्या आचरट
चांगली माहिती
...पण कोणीही भारतीय माणूस असे