मिसळपाव वरील दुव्यावरुन प्रेरणा घेऊन राजमाची बाईक ट्रीप करू करू म्हणता योग काही येत नव्हता. अखेर सुटी मिळाली आणि मारली टांग २ व्हीलरवर सकाळी ९ वाजता निघायचं नियोजन पण Indian Standard Time चे संस्कार झाल्याने निघालो १० – १०:३० वाजता पुण्यावरून .
तासा दिड तासात पोहोचलो लोणावळा एण्ट्री पोइन्टला आणि सुरू केली राजमाचीकडे कूच
वाटेत जागोजागी फोटूचा मोह काही आवरत नाही
१०० cc च्या बाईक असल्या म्हणून काय झाले फक्त राजमाची गाठायची आहे हेच ध्येय असल्यावर
काय दगड अन काय धोन्डे
लोणावळ्याहून १७ ते १८ किमीचा प्रवास पण लागला तास दीड तास. दगड धोंड्यांचा रस्ता पण अखेर पुण्याच्या गल्ली बोळाचा , खडड्याचा अनुभव असल्याने इथे किरकोळ वाटला .
अखेर पोहचलो उधेवाडी गावात राजमाची पायथ्याशी, गावातील हॉटेलमध्ये न्याहरी करताना दिसला किल्ल्याचा नकाशा. पहिला फोटू काढला. गेलाच कधी तर पहिले हे काम करा किल्ल्यावर फिरताना फार उपयुक्त आहे .
न्याहरी करून धरला किल्ल्याचा रस्ता
किल्ल्यावर जातानाच भैरवनाथ मन्दिर लागते पण पुण्यातील शाळेचे ट्रेककरी मुक्कामी असल्याने मंदीर आतून बंद होते. आत जाता आले नाही. भैरवनाथची माफी मागून किल्ल्यावर चढाई सुरु केली .
आधुनिक मावळे तेच भैरवनाथ मन्दिर मुक्कामीचे
निम्म्या किल्ल्यावर गेलेवर दिसणारे उधेवाडी गावचे विहंगम दृश्य
किल्ला चढताना लागणारे गुहा कोठार. काही वासू सपना वाल्यांची नावे पाहून वाईट वाटले
अखेर ध्येयाच्या समिप
उंचावर गेल्यावर अजूनही किती वर जायचे आहे का ??
राजमाचीच्या सर्वात उंच ठिकाणी आमच्या हुश्शार दुरभाषकाने दाखविलेले अक्षांश - रेखांश व Altitude आणि काय काय पण अक्षांश - रेखांश तेवढे कळाले Altitude म्हणजे काय माहित नाही . समुद्रसपाटीपासून उंची असावी बहुतेक. मात्र दुरभाषकाने दाखविलेले अक्षांश – रेखांश हॉटेलमध्ये काढलेल्या नकाशाशी मिळते जुळते पाहून हुश्शार दुरभाषकावर जाम खूष झालो .
राजमाची वरून दिसणारा मनरंजन किल्ला
किल्ला फिरून झाल्यावर पोटात काव काव सुरु झाली पण पारले जी ने जीवात जीव आणला सोबतीला शेंगदाणा पोळी , मिरचीचा खर्डा काय ती चव आहा.
चिलखती बुरुज. एका वेळी एकच माणूस जावू किंवा येवू शकतो असा अरूंद मार्ग.
राजमाची उतरून आल्यावर अर्धा एक किलोमीटरवर गोधनेश्वर मन्दिर लागते. सपूर्ण दगडात हेमाडपंथी पुरातन मन्दिर अतिशय प्रसन्नता
गोधनेश्वर मन्दिरासमोर बारमाही वाहणारे गोमुख.
सर्व परिसर पाहून उधेवढी गावातील शेणाणे सारवलेले घर पाहून एकदम मूळ गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या.
अखेर ५ वाजता निघावे लागले पण येता येता कॅमेरा काही बंद करायचा मोह होत नव्हता .
एकूण ट्रीप तर झकास झाली माझ्याकडे शब्द संग्रह फार नसल्याने काही लय भारी नाही लिहता येत.
पण हो पुढील ट्रेक तोरणा गडाची करू असा संकल्प मात्र केलाय बघतो मिपावर काही दुवे आहेत का ? किंवा कोणी जाऊन आले असेल तर जरूर कळवा या मिपाकराला.
प्रतिक्रिया
28 May 2016 - 7:33 pm | कंजूस
फार छान सफर.आमचा लोणावळाकडून जायचा योग येत नाही.नेहमी कर्जत कोंदिवडे कडूनच जातो.पण एकदा एका गाववाल्याने डबलसीट एमएटीवरून वीस मिनिटात लोणावळा पायवाटेला सोडलेले. येताना तो टिप्पलसिट आलेला बायको आणि सासय्राला उधेवाडीत सोडायला." कसंय माझं ड्राइविंग?"
28 May 2016 - 7:40 pm | कंजूस
फोटो आवडले हे राहिलं. ते गुहा कोठार खरं टाकं आहे.चांगलं असतं पाणी.भैरवनाथाच्या मागे डावीकडे थोडंवरती तीन टाकी आहेत.त्यांचं पाणीच ते देवळात राहिलेले ट्रेकर वापरतात.
#तोरणा : वेल्हा गावची स्वारगेट -वेल्हा बस असते तोच मार्ग.त्याच गावातून वरती मार्ग आहे.
28 May 2016 - 7:59 pm | राजकुमार१२३४५६
मस्त झाली भटकंती. लोणावळाला बरेच वेळा गेलो असेल पण अजून राजमाची ला गेलो नाही. फोटो पण सुंदर आलेत. जरा फोटोची साईज दुरुस्थ करा. height="506" width="675" ठेवा.
29 May 2016 - 9:42 am | सत्याचे प्रयोग
मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे. दुरुस्ती केली आहे.
30 May 2016 - 4:03 pm | खुशि
लेख छान आहे फोटोही सुंदर आहेत.प्रेरणा मिळाली आहे राजदर्शनासाठी आता योग कधी येतो ते पहायचे.
30 May 2016 - 4:06 pm | प्रचेतस
लिहित रहा.
लेखनात हळूहळू सफाई येत जाईलच.
30 May 2016 - 6:16 pm | एस
उधेवाडी पार बदललीय असं दिसतंय. बरीच वर्षे होऊन गेली राजमाचीला जाऊन. आता पावसाळ्यात तिथे दारुड्यांची गर्दी होण्यापूर्वी एकदा राजमाची आणि कोंडाणे लेण्यांना जाऊन आलं पाहिजे.
तोरण्यावर तुम्ही ते असे कुठे चढूनबिढून फोटो काढणार नसाल तर इत्यंभूत माहिती देतो. बादवे, तिथे चढाईचा खराखुरा षौक असेल तर बुधला माचीचा सुळका आहे. त्यावर चढाई करा आणि फोटो काढा. नक्कीच दाद दिल्या जाईल. ;-) निदान अर्ध्या उंचीपर्यंत चिमनी-क्लाइंबिंग आहे. तेवढे तरी कराच.
पुलेशु.
4 Jun 2016 - 2:45 pm | अभ्या..
हीहीहीहीहीही
4 Jun 2016 - 2:27 pm | राजेंद्र मेहेंदळे
तोरणाला जायला कात्रजहून सातारा रसता घ्या न 20 किमीवर नसरापूर फाट्याला उजविकडे वळा पुढं जीपवाल्याना विचारा
4 Jun 2016 - 2:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
तोरणाला जायला कात्रजहून सातारा रसता घ्या न 20 किमीवर नसरापूर फाट्याला उजविकडे वळा पुढं जीपवाल्याना विचारा