हे राम ! हे शाम !!

JAGOMOHANPYARE's picture
JAGOMOHANPYARE in काथ्याकूट
19 Jan 2009 - 11:46 am
गाभा: 

स्लम डॉग मिलेनिअर पाहिला.... नेहमीसारखाच मसाला भरलेला आहे.. काही मसाला मात्र मुद्दाम घुसडल्याप्रमाणे वाटतो.

१. चित्रपटामध्ये हिन्दु समुदायाने मुस्लीम मुहल्ल्यावर हल्ला केलेला आहे, असे चित्रण आहे..'ये मुस्लीम है , इनको मारो.. ' असा उघड उघड उल्लेख आहे. लोकांच्या हल्ल्याच्या वेळेला प्रभू रामाच्या वेशभूषेत एक छोटा मुलगा दाखवला आहे, त्याची नजर इतकी विखारी आणि दुष्ट दाखवली आहे , की हे सर्व जाणीव पुर्वक केलेले आहे, असे जाणवत रहाते..... हिंदुनी केलेले आक्रमण कथेची गरज म्हणून कदाचित सुसंगत असेलही, पण रामाच्या प्रतिमेचे मात्र उघड उघड विकृतीकरण केलेले आहे... तेही कारण नसताना ...
२. 'दर्शन दो घनशाम नाथ मोरे अखिया प्यासी रे' हे गाणे सूरदासाने लिहिले आहे, असा उल्लेख चित्रपटात आहे, असे उत्तर देऊन कथानायक कौन बनेगा करोडपती मधील एक बक्षीस जिन्कतो असा उल्लेख आहे. पण माझ्या माहिती नुसार हे गीत संत नरसी मेहता यानी लिहिलेले आहे, " नरसी की ये बिनती सुनलो भक्ती विलासी रे.. " असा एका कडव्यात उल्लेख आहे..

लहान मुलांचे डोळे फोडून त्याना भीक मागायला लावणार्‍यांचे एक उपकथानक यात आहे, त्या प्रसंगी घेतलेले हे गाणेदेखील हिन्दु आणि हिन्दुस्थान यान्ची बदनामी करण्यासाठीच निवडलेले आहे... चित्रपट अगदी वास्तवाप्रमाणे चित्रीत केल्याचा धिंडोरा माध्यमांमधून आता वाजवायला सुरुवात झालेली आहेच, पण या कथानकाला धारावीची पार्श्वभूमी आहे, या भागात खुदाच्या आणि परवरदिगारच्या नावाने भिक्षा मागणारी मुले जास्त दिसतात, हे वास्तव आहे... अशी मुले ' बेकस पे करम कीजीये ... ' हे गाणे आळवताना दाखवले असते तर ते जास्ती वास्तव दिसले असते !

प्रतिक्रिया

कशिद's picture

19 Jan 2009 - 2:45 pm | कशिद

वा सुंदर सुक्ष्मदुर्ष्टि आहे ..!!!!

मयुरा गुप्ते's picture

21 Jan 2009 - 3:30 am | मयुरा गुप्ते

आम्हिही कालच सिनेमा बघितला. तेथे मी आणि माझा नवरा सोड्ल्यास बाकी सगळे 'गोरे अमेरीकन' होते. हिन्दि भजनाचे डिटेल्स आम्हि सोडल्यास बाकी सगळ्यान च्या डोक्यावरुन गेले. असे बरेच प्रसंग आजुबाजुच्या प्रेक्षकंना कळ्त नव्हते . बाकी चित्रपट किती सिरीअस्ली बघायचा हे ज्याने त्याने ठरवावे.

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jan 2009 - 3:56 am | llपुण्याचे पेशवेll

छान विषय, पहीला मुद्दा पटला. दुसराही मुद्दा पटला पण इथे तर 'गोपालसिंग नेपाली' या गाण्याचे लेखक आहेत असे म्हटले आहे. असो आपल्या सूक्षनिरीक्षणाचे कौतुक वाटले.
पुण्याचे पेशवे
Since 1984

विकास's picture

21 Jan 2009 - 4:42 am | विकास

मी अजून हा चित्रपट पाहू शकलेलो नाही, पहाणार तर नक्की आहे. मात्र आपली निरीक्षणे मला अयोग्य वाटत नाहीत. यात अजून एक न बघता बघितलेल्यांच्या संदर्भात निरीक्षण सांगतो:

विविध प्रांतातील भारतीयांबरोबर एका कामानिमित्त मिटींगला भेटलो होतो - त्यात जरा जास्तच भडक आणि हिंसक दाखवले आहे हे मान्य करत असूनही सर्वांना तो आवडला. त्यात विशेष काही गैर वाटले नाही. किंबहूना वास्तव वाटले...

आमच्या घरी काही अमेरिकन्स जेवायला आले होते. त्यांनी देखील हा चित्रपट पाहीला होता आणि भारावले होते. मात्र मला पहीला प्रश्न विचारला की खरेच हिंदू असे मारतात का? (त्या प्रश्नाचा सूर हा कायदा हातात घेणे हे एकतर्फी चालते अशा पद्धतीत होता).

या संदर्भात पण थोडे अवांतर आठवले: फारूख शेख आणि शबाना आझमीचा "तुम्हारी अमृता" म्हणून दोनपात्री केवळ पत्रवाचनावरून पुढे जाणारी प्रभावी एकांकीका होती. अमेरिकेत पण त्याचे ९३-९४ साली प्रयोग गाजले. मला ती बघता आली नाही पण परत चांगले रिपोर्ट्स ऐकल्याने हुरहुर लागली... त्याचे थोडक्यात कथानक असे:

अमृता ही हिंदू मुलगी, फारुख शेख (नाटकातील नावावरून) मुसलमान मुलाची बालमैत्रीण. मला वाटते त्यांचे एकमेकांवर प्रेम असते. मात्र नंतर घरचे हलल्यामुळे का कशाने, पण ते लांब जातात तरी मैत्री पत्रातून राहते. हा मुलगा एकदम सुसंस्कृत/खानदानी होतो. मात्र अमृता बिघडते, व्यसनी होते आणि मला वाटते शेवटी मरते देखील...

दोन समर्थ कलाकारांमुळे हे नाटक गाजले आणि आवडले. मला देखील कथा ऐकल्यावर काही गैर वाटले नाही. मात्र त्यातील हा हिंदू मुलीचे वाया जाणे आणि मुसलमान मुलाचे खानदानी वागणे वगैरे, न्युयॉर्क मधील एका भारतीय वृत्तपत्राच्या पत्रकाराच्या नजरेत आले, आणि त्याने शबानाला प्रश्न विचारला की जर हे उलटे असते (वाया गेलेली मुलगी मुसलमान आणि ससंस्कृत मुलगा हिंदू) तर तू यात काम केले असते का? तर तीने नाही असे उत्तर दिले...

असो.

सर्किट's picture

21 Jan 2009 - 4:10 pm | सर्किट (not verified)

मात्र मला पहीला प्रश्न विचारला की खरेच हिंदू असे मारतात का? (त्या प्रश्नाचा सूर हा कायदा हातात घेणे हे एकतर्फी चालते अशा पद्धतीत होता).

होय, डोळ्यावर झापड ठेवून हिंदूंचे गुणगौरव करणार्‍या सगळयांना एक महत्वाची माहिती: हिंदू देखील असेच मारतात.

मारण्याची विद्या हिंदूंनी देखील कधीच आत्मसात केलेली आहे. कारंण हिंदू कुठलीही विद्या आत्मसात करण्यात मागे नाहीत.

ह्या एका कलेत हिंदूंना मागे ढकलण्यात इतर धर्मियांची साजिश आहे हे नक्की !!

-- सर्किट

विकास's picture

21 Jan 2009 - 5:36 pm | विकास

होय, डोळ्यावर झापड ठेवून हिंदूंचे गुणगौरव करणार्‍या सगळयांना एक महत्वाची माहिती: हिंदू देखील असेच मारतात.

अहो साहेब, मी कधी नाही म्हणले?

डोळ्यावर झापड ठेवून फक्त हिंदूंवर टिका करण्यासंबंधात मी म्हणले होते/आहे. म्हणूनच माझे वाक्य परत एकदा खाली वाचा...

मात्र मला पहीला प्रश्न विचारला की खरेच हिंदू असे मारतात का? (त्या प्रश्नाचा सूर हा कायदा हातात घेणे हे एकतर्फी चालते अशा पद्धतीत होता).

माझे त्यावरचे माझ्या अमेरिकन मित्र-मैत्रिणींस उत्तर असेच होते की, "असे हिंसक हिंदूपण असू शकतात. मात्र, ज्या पद्धतीत त्यांनी चित्रपटात दाखवले आहे असे मला तुझ्या (त्यांच्या) बोलण्यातून समजतयं, तसे ते एकतर्फी नाही. आणि अशा हिंसेला जर कोणी जबाबदार असेल तर ते या संबंधातील राजकारण आणि असमतोल वागणूक आहे." अजून याचा अर्थ समजून हवा असल्यास अवश्य नवीन धागा सुरू करा अथवा खरड पाठवा, म्हणजे येथे अवांतर नको. (अथवा, माझे या संबंधातील येथेल्या विकीबरोबरचे संवाद शोधून वाचा.)

असो.

कोलबेर's picture

21 Jan 2009 - 9:05 pm | कोलबेर

कायदा हातात घेणे हे एकतर्फी चालते

मी तरी तुमच्या मित्राला हा प्रश्न विचारला असता,

"बाबारे काल्पनिक कथेवर आधारीत मसाला पटातल्या एका अर्ध्या मिनिटाच्या सीन वरुन इतका मोठा निष्कर्ष कसा काय काढलास ?"

पुढच्या वेळेस हा मित्र भेटेल तेव्हा त्याला 'साऊथ पार्क' नावाच्या मालिकेत जे दाखवतात ते पाहून, 'अमेरिकेतील प्राथमिक शाळेतील मुले अशी असतात ?' असा प्रश्न विचारा.

बाकी चित्रपटातुन धार्मिक भावना दुखावलेल्यांनो,

चित्रपटातील हीरो लहानपणी अमिताभला भेटण्यासाठी संडासातुन उडी मारुन बाहेर येतो असे दाखवले आहे आणि तो मुसलमान देखिल आहे, ह्यावरुन तुम्ही मुसलमानांची पोरं अमिताभला पहाण्यासाठी संडासात उड्या मारतात असा निष्कर्ष काढून टाका.

विकास's picture

21 Jan 2009 - 9:41 pm | विकास

"बाबारे काल्पनिक कथेवर आधारीत मसाला पटातल्या एका अर्ध्या मिनिटाच्या सीन वरुन इतका मोठा निष्कर्ष कसा काय काढलास ?"

अहो कसा म्हणून काय विचारता? "...कायदा हातात घेणे हे एकतर्फी चालते.." इतके स्पष्टपणे लिहीलेले असून देखील, "धर्म आणि जाती विषयक चर्चात आम्ही सहभागी होत नाही.." असे म्हणणारे पण, "डोळ्यावर झापड ठेवून हिंदूंचे गुणगौरव करणार्‍या सगळयांना एक महत्वाची माहिती.." ताबडतोब माहीती देऊ लागतात आणि ती तितकीच झापड लावून इतर सहमत देखील होतात. तिथे इतरांचे काय घेऊन बसता? :-)

बाकी ज्या अमेरिकन्सना हा प्रश्न पडला आणि ज्यांनी विचारला त्यांना ते दृश्य एकांगीच वाटले होते म्हणून तसे विचारले आणि खात्री करून घेतली. बाकी मी सुरवातीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, या चित्रपटाच्या मी काही विरोधात नाही, कारण असे समाजातील वाईट गोष्टी दाखवणारे चित्रपट सर्वत्र सर्वांवरच काढतात, तसा तो मुंबईतील वाईट गोष्टींवर काढला म्हणून काही गैर नाही, गैर काय असू शकते तर ज्यातून चुकीची एकांगी मते तयारहोऊ शकतात अशी दृश्ये!

असो.

कोलबेर's picture

21 Jan 2009 - 7:56 pm | कोलबेर

डोळ्यावर झापड ठेवून हिंदूंचे गुणगौरव करणार्‍या सगळयांना एक महत्वाची माहिती: हिंदू देखील असेच मारतात.

सहमत!!

भास्कर केन्डे's picture

21 Jan 2009 - 9:28 pm | भास्कर केन्डे

कोलबेर पंत व सर्किट महाशय, अभिनंदन!

आम्ही वाटच पहात होतो की अजून कसे कोणी आले नाही. तशी हुरहुर येथे व्यक्त पण केली होती. येथे निराश नाही केलेत याबद्दल अभिनंदन!

बाकी मुहंमदाचे व्यंगचित्र काढल्याने भावना दुखवतात... रामाला कृर/विकृत वगैरे दाखवल्याने काही फरक पडत नाही हा जागतिक दृष्टिकोन का बनत आहे याचे एक उदाहरण दखवलेत हे ही बरे केलेत. आता "कोणी काही दाखवल्याने कमीपण येणारा हा आपला धर्म नाही, राम नाही" वगैरे वकीली पद्धतीची वाक्ये सुद्धा येऊ द्यात.

आपला,
(नेभळटांच्या सहवासाला व करंटेपणाला फाट्यावर मारणारा दुखावलेला रामभक्त) भास्कर

कोलबेर's picture

21 Jan 2009 - 9:31 pm | कोलबेर

नेभळटांच्या सहवासाला व करंटेपणाला फाट्यावर मारणारा दुखावलेला रामभक्त

भास्कर महोदय,

फाट्यावर मारणारे लोक दुखावत वगैरे नसतात! ही विसंगती झाली.

भावनांना आवर घाला... वरती तुम्हाला एक उपाय देखिल सांगीतला आहे.

(भास्कररावांच्या व्याखेने नेभळट) कोलबेर

Namaste Dr Kagalkar ji,

We have already posted the news at

http://www.hindujagruti.org/news/6162.html

And a protest letter is sent.(see below)

You can send your protest letter also

Shubhkamnaye

Narendra

www.hindujagruti.org

महेंद्र's picture

23 Jan 2009 - 4:05 pm | महेंद्र

खरंच फार सुंदर चरचा सुरु आहे.
मला काल पासुन ह्या विशयावर लिहायचं होत, म्हणुन आजच माझ्या बलोग वर एक पोस्ट टाकलंय..आपण भारतिय ह्या ऑस्कर ला देशा पेक्शा जास्त महत्व देतोय असं वाटतं काय? दुसरी गोश्ट म्हणजे, आपलं सुप्रिम कोर्ट सुध्दा हुसेन च्या भारतमाते च्या नंग्या चित्राला जेंव्हा कला अभिव्यक्ती म्हणते तेंव्हा इतरांकडउन काय अपेक्शा करायची? शुध्द लेखनाच्या चुंकांबद्दल क्शमस्व.

http://kayvatelte.wordpress.com/