एक वर्षानंतर . . .

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
25 May 2015 - 12:31 pm
गाभा: 

१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.

परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.

मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.

एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.

आर्थिक

विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील.

२०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली.

औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे.

आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे

भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे.

२०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले.

वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली.

थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली.

ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे.

मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे.

थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे.

जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे.

प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे.

५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.

मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.

जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.

महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.

आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.

संरक्षण व परराष्ट्र धोरण

आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता.

त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती.

मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला.

काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला.

येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली.

गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती.

मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे.

गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे.

मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता.

जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत.

ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला.

मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye".

याच लेखात पुढील वाक्ये आहेत.

Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing.

चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत.

२ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे.

२००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली.

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे.

"संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.

भ्रष्टाचार निर्मूलन

गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे.

मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे.

कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे.

देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे.

"भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.

राजकीय

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल.

महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय.

दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित.

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल.

नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते.

नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते.

मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल.

एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे.

राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.

सामाजिक

गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते.

काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती.

मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे.

एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे.

"सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.

विरोधी पक्षांची कामगिरी

संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही.

लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित.

महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत.

एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे.

विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण.

_________________________________________________________________________________

मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे.

मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते.

_________________________________________________________________________________

एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण.

_________________________________________________________________________________

अच्छे दिन

माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की!

_________________________________________________________________________________

तळटीप

विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो.

वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन.

जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल.

Now shoot

_________________________________________________________________________________

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 May 2016 - 3:59 pm | कपिलमुनी

एप्लाय केला की कागदपत्रे दाखवून क्वालिफाय आहे हे उमेदवाराचे काम आहे.
भाजपेयी बहुधा कंपनीला सांगत असतील, मी IIT an आहे , नसेल तर तुम्ही प्रूव करा

प्रदीप's picture

7 May 2016 - 4:16 pm | प्रदीप

मंत्रीपद ही नोकरी नव्हे. तेव्हा हे लॉजिक इथे गैरलागू आहे.

इथे मुद्दा आहे तो सदर व्यक्तिंनी निवडणूका लढवतांना त्यांच्या उमेदवारी- अर्जात (शपथेवर) कायकाय लिहून दिले होते त्याची. त्याविषयी जर काही प्रस्न उपस्थित झालाच, तर प्रमाणपत्रे मागण्याची जबाबदारी न्यायालये अथवा तत्सम आयोगांची असते, व ती ज्यांच्याकडे मागितली आहेत, त्यांच्यावर ती असते. ज्या व्यक्तिच्या संबंधात हे आहे, तिला न्यायालय अथवा तत्सम आयोगाने सांगिल्याशिवाय ती देण्याची सदर व्यक्तिची जबाबदारी नाही. असे नसल्यास कुणीही उठून, कुणाविषयीयी, कुठल्याही भल्याबुर्‍या कारणाने आरोप करू लागतील, व ते फेटाळून लावण्यासाठी संबंधित व्यक्तिंना आपली माहिती जाहीर करण्याचे कार्य करत बसावे लागेल.

मी मुग्धगोडे ह्यांना प्रश्न विचारला होता, त्यांनी अजून प्रतिवाद केलेला नाही. कारण उघड आहे.

mugdhagode's picture

7 May 2016 - 4:59 pm | mugdhagode

नोकरीत पगार असतो.
मंत्रीपदात भत्ते असतात.

खोटे बोलल्यास नोकरी जाते

पदही जायला हवे

प्रदीप's picture

7 May 2016 - 10:39 pm | प्रदीप

खोटे बोलल्यास नोकरी जाते

पदही जायला हवे

खोटे कुणीतरी बोलले आहे, हे प्रूव्ह झाले का? कधी? कुठे?

पण तो मुद्द्दा नाही. तुम्ही मूळ मुद्दा बगल देत बाजूस सारत आहात. तेव्हा अधिक न भरकटता, पुनः मूळ मुद्द्यावर येऊयात.

तुम्हीच विचारलेतः

पदवी नाही हे इतरानी सिद्ध करायचं की पदवी आहे हे इराणीबैनी सर्टिफिकिट दाखवुन सिद्ध करायचं ?

त्यावर मी प्रतिप्रश्न केला:

तुम्हाला काय वाटते?

तेव्हा ह्याचे कृपया सरळ उत्तर द्यावे. दोनच पर्याय आहेत (जे तुम्ही स्वतःच उल्लेखिलेले आहेत)

[इराणीबाईंनी त्यांच्या निवडणूक- अर्जात लिहीलेली पदवी त्यांनी खरेच मिळवली आहे अथवा नाही हे]:

(अ) इतरांनी सिद्ध करायचे, अथवा

(ब) इराणीबाईंनी सर्टिफेकेट दाखवून सिद्ध करायचे.

आपले क्वालिफिकेशन आपणच दाखवुन द्यायचे असते.

कोणत्याही फॉर्मबरोबर सर्टिफिकेटची कॉपी जोडावी लागते.

ती दुसर्‍या योग्य व्यक्तीकडुन किंवा सेल्फ अटेस्टेड लागते.

इरानीबैनी अशी कॉपी निवडणुक आयोगाला दिली असती तर आयोगाने ते कोर्टात दिले असते की !

म्हणजॅ बैनी कॉपे दिलेलीच नाही की काञ ?

इतके गंभीर आरोप होउन इराणी बै गप्प का आहे ?

न्यायालयाने युनिवर्सिटीकडुनही

प्रदीप's picture

7 May 2016 - 11:07 pm | प्रदीप

कोणत्याही फॉर्मबरोबर सर्टिफिकेटची कॉपी जोडावी लागते.

ती दुसर्‍या योग्य व्यक्तीकडुन किंवा सेल्फ अटेस्टेड लागते.

हे जर त्यांनी केले नसेल तर निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज नाकारला नसता का? तसे झालेले नाही. त्यामुळे तुमचे पुढील सर्व आर्ग्युमेंट बाद ठरते.

पण आता तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर

[इराणीबाईंनी त्यांच्या निवडणूक- अर्जात लिहीलेली पदवी त्यांनी खरेच मिळवली आहे अथवा नाही हे]:

(ब) इराणीबाईंनी सर्टिफेकेट दाखवून सिद्ध करायचे.

असे दिलेले आहे.

तेव्हा आता हेच लॉजिक तुम्हालाच इथे लागू केले तर,

समजा इथे कुणीही तुमच्यावरच, तुम्ही हितेश, ग्रेटथिंकर, मोगा, एल्जीगोडबोले, मुग्धागोडे अशा अनेकानेक नावने येत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही एकच व्यक्ति आहात, असा आरोप केला, तर ते तसे नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर रहाते. अन्यथा तुम्ही तो आरोप मान्य करताहात असे म्हणायचे का?

mugdhagode's picture

7 May 2016 - 11:23 pm | mugdhagode

॑वालिफिकेशनचे सर्टिफिकेट निवडणुक अर्जात जोडणे अनिवार्य आहे का ?

mugdhagode's picture

7 May 2016 - 11:44 pm | mugdhagode

In another affidavit to contest the Rajya Sabha election from Gujarat, she stated that her highest educational qualification was B.Com Part-I.

http://indianexpress.com/article/india/politics/fake-degree-row-delhi-co...

मै तुलशी तेरे आंगण की !

तर्राट जोकर's picture

8 May 2016 - 12:20 am | तर्राट जोकर

माझ्यामते मुद्दा कॉपी जोडली आहे की नाही हा नै. अफिडेविटमधे जे डिक्लेअर केलंय ते खरं आहे अशी स्वतः ग्वाही दिलेली असते व ते खरे न आढळल्यास होणार्‍या कारवाईस समोर जाण्याची तयारी असल्याचे कबूल केलेले असते. त्यामुळे इराणींनी जर कोणत्याही प्रमाणपत्रात कोणतीही माहिती दिली असेल तर ती सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची स्वतःची आहे . याऊप्पर याचिकाकर्त्याने काय केले, कोर्टाने काय म्हटले, विद्यापिठाने काय म्हटले ह्यापेक्षा इराणीबाईंनी स्वतः जे प्रतिज्ञापत्रात नोंदवले ते खरे आहे की नाही हे महत्त्वाचे नाही काय?

mugdhagode's picture

8 May 2016 - 3:50 am | mugdhagode

सहमत ...

प्रदीप's picture

8 May 2016 - 7:09 am | प्रदीप

प्रकरण न्यायप्रविष्ट आहे; तेव्हा त्याच्या चालीनुसार जर त्यांना पुढे जाऊन तसे सिद्ध करावे लागले, तर त्यांनी तसे केले पाहिजेच. तेव्हा कोर्टाने काय म्हटले ह्याचा विचार करणे अगत्याचे आहे ना?

श्रीगुरुजी's picture

8 May 2016 - 3:08 pm | श्रीगुरुजी

याऊप्पर याचिकाकर्त्याने काय केले, कोर्टाने काय म्हटले, विद्यापिठाने काय म्हटले ह्यापेक्षा इराणीबाईंनी स्वतः जे प्रतिज्ञापत्रात नोंदवले ते खरे आहे की नाही हे महत्त्वाचे नाही काय?

इराणीबाईंनी प्रतिज्ञापत्रात जे नोंदविले आहे ते खरे नाही हे सिद्ध करा. जो आरोप करतो त्यानेच ते सिद्ध करायचे असतात. तुम्ही माझे पैसे बुडविले असा मी आरोप केला तर तो आरोप सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. म्हणून तर फिर्यादी पक्ष व बचाव पक्ष हे वेगळे असतात. फिर्यादी पक्षावर आरोपाच्या समर्थनार्थ पुरावे द्यायचे असतात व बचाव पक्षाने ते पुरावे खोटे आहेत असा स्वतःचा बचाव करायचा असतो. इराणीबाईंच्या प्रकरणात फिर्यादी पक्ष आरोप करून मोकळा झाला आहे व आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी सामाजिक माध्यमातून बचाव पक्षावर ढकलली जात आहे. परंतु न्यायालय असे चालत नाही. काँग्रेसचा प्लेबॉय तिवारीच्या प्रकरणात, हे माझे जन्मदाते आहेत असा रोहीत शेखरने दावा केला होता. आपण त्याचा जन्मदाता नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी तिवारीवर नव्हती. तिवारीच आपला पिता आहे याच्या समर्थनार्थ रोहीत शेखरने बरेच पुरावे व कागदपत्रे दिल्यानंतर न्यायालयाला त्याच्या दाव्यात तथ्य आहे असे वाटले व त्यानंतर न्यायालयाने तिवारीची डीएनए चाचणी करण्याचा आदेश दिला. इराणीबाईंच्या प्रकरणात जर फिर्यादीच्या दाव्यात तथ्य आहे असे वाटले तरच न्यायालय इराणीबाईंना कागदपत्रांची मागणी करेल. न्यायालयाने अजूनपर्यंत इराणीबाईंकडे कोणतीही कागदपत्रे मागितलेली नाहीत. तोपर्यंत आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा आपल्या आरोपात तथ्य आहे हे न्यायालयाला पटवून देण्याची जबाबदारी फिर्यादीचीच आहे.

जर प्रत्येक आरोपासंदर्भात, ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी बचाव पक्षावर टाकली व आरोप खरे आहेत हे सिद्ध करण्याच्या जबाबदारीतून आरोप करणार्‍या फिर्यादी पक्षाला मुक्त केले तर संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडेल. अशा परिस्थितील केजरीवालांसारखे रिकामटेकडे टोळभैरव ट्विटरच्या माध्यमातून रोज एक नवीन आरोप करून मजा बघतील व ज्यांच्यावर आरोप झालेत ते मात्र आपल्यावरचे आरोप खरे नाहीत हे सिद्ध करण्याकरिता आयुष्यभर धावपळ करीत बसतील.

तर्राट जोकर's picture

8 May 2016 - 5:34 pm | तर्राट जोकर

१. बाकीचा सर्व अनावश्यक थयथयाट.
२. थेट डिग्री दाखवून सत्य पुढे मांडण्यात प्रोब्लेम काय?

श्रीगुरुजी's picture

8 May 2016 - 6:29 pm | श्रीगुरुजी

१. बाकीचा सर्व अनावश्यक थयथयाट.

अजिबात नाही. न्यायप्रकिया कशी चालते त्याचा जरा अभ्यास करा. भारतीय न्यायव्यवस्थेनुसार बलात्काराचा आरोप वगळता इतर सर्व आरोपांसाठी आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप करणार्‍याची असते. ज्याच्यावर आरोप होत आहेत तो बचाव करू शकतो.

२. थेट डिग्री दाखवून सत्य पुढे मांडण्यात प्रोब्लेम काय?

का दाखवायची? एखाद्या रिकामटेकड्याने वाटेल ते बिनबुडाचे आरोप केले म्हणून इराणीबाईंनी कागदपत्रे दाखवायची? आज पदवी प्रमाणपत्र खोटे आहे असा आरोप करताहेत. तो आरोप न्यायालयात खोटा सिद्ध झाला तर उद्या त्या मॅट्रिक नाहीत असा नवीन आरोप होईल. त्यांनी मॅट्रिकची गुणपत्रिका दाखविली तर परवा त्या ९ वी उत्तीर्ण नसताना सुद्धा मॅट्रिकला बसल्या असा आरोप होईल. मग त्यांना ९ वी उत्तीर्ण झाल्याचे सिद्ध करावे लागेल. नंतर त्यांचे लग्न झालेच नसून प्रतिज्ञापत्रात विवाहीत अशी खोटी नोंद केल्याचा आरोप होईल. मग त्यांना विवाह झाल्याचे सिद्ध करावे लागेल. रिकामटेकड्यांना आरोप करण्यासाठी कोणतीच मर्यादा नाही. पण म्हणून ज्यांच्यावर आरोप होताहेत त्यांनीच या रिकामटेकड्यांचा खोडसाळपणा सिद्ध करण्यात सगळे आयुष्य घालवायचे का?

mugdhagode's picture

8 May 2016 - 7:29 pm | mugdhagode

In another affidavit to contest the Rajya Sabha election from Gujarat, she stated that her highest educational qualification was B.Com Part-I

हे स्वतः इराणीबाईनी शपथेवार सांगितले आहे. म्हणजे त्या पदवीधारक नाहीत असेच मानायचे ना ?

श्रीगुरुजी's picture

7 May 2016 - 6:51 pm | श्रीगुरुजी

सहमत

श्रीगुरुजी's picture

7 May 2016 - 6:51 pm | श्रीगुरुजी

प्रतिसाद चुकुन इथे पडला. सहमत प्रदीपच्या प्रतिसादाशी आहे.

mugdhagode's picture

7 May 2016 - 8:02 pm | mugdhagode

गुर्जींची सहमती वाचुन मी तर पार चकीतच !

नक्कीच योग्य काय ते करत असणार, पण उधोजी नेहेमीप्रमाणे बडबड करत सुटले आहेत जणु.

श्रीगुरुजी's picture

4 May 2016 - 6:13 pm | श्रीगुरुजी

उधोजींच्या बरळण्याकडे भाजपचा कोणताही नेता लक्ष देत नाही. कोणी प्रतिक्रिया सुद्धा देत नाही. मोठा भाऊ असल्याचे पितळ जनतेने उघडे पाडले व सरकारमध्ये लाचारी पत्करून दुय्यम भूमिका घ्यावी लागल्याने निर्माण झालेल्या चडफटामुळे सेना नेते रोज काहीतरी प्रक्षोभक बरळत असतात.

श्रीगुरुजी's picture

5 May 2016 - 2:51 pm | श्रीगुरुजी
तर्राट जोकर's picture

5 May 2016 - 3:06 pm | तर्राट जोकर

बरोबर, पण तुम्ही असल्या एकांगी बाजू घेणार्‍या संकेतस्थळांचे दुवे देत नसता म्हणे. ओह्ह. जी आवडती बाजू ती इथे मांडायची मग ती किती क्षुल्लक स्रोतातून आलेली असो.

श्रीगुरुजी's picture

5 May 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

तो एकांगी लेख नाही. जे राज्यसभेत घडत आहे त्याचेच यथोचित चित्रण या लेखात आलेले आहे.

तो एकमेव स्त्रोत नाही. अनेक लेखात साधारणपणे तेच लिहिले आहे.

http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/AgustaWestland-deal-Swamy-...

http://www.rediff.com/news/report/gandhis-can-expect-more-fire-in-parlia...

http://www.dailyo.in/politics/subramanian-swamy-agustawestland-sonia-gan...

https://www.pgurus.com/bjp-outsmarted-congress-agusta-debate/

http://www.pressreader.com/

तर्राट जोकर's picture

5 May 2016 - 3:39 pm | तर्राट जोकर

पुढे काय? स्वामींची बडबड हवेत विरुन तर नाही ना जाणार इराणींच्या हक्कभंग प्रस्तावासारखी?

श्रीगुरुजी's picture

5 May 2016 - 3:42 pm | श्रीगुरुजी

स्वामी एखाद्याच्या मागे लागले की अगदी हात धुवून मागे लागतात. त्यांनी अत्यंत चिकाटीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा पाठपुरावा करून मायलेकरांना न्यायालयात खेचले आहे. या प्रकरणात ते किती चिकाटी दाखवितात ते कळेलच.

तर्राट जोकर's picture

5 May 2016 - 3:45 pm | तर्राट जोकर

काय झालं मग मायलेकरांचे, झाली का शिक्षा?

श्रीगुरुजी's picture

5 May 2016 - 8:17 pm | श्रीगुरुजी

धन्य आहे!

मार्मिक गोडसे's picture

6 May 2016 - 12:35 pm | मार्मिक गोडसे

हा लेखही भारी आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/editorial/sugar/articleshow/...

हे सरकार नेमके कोणाचे हित बघतेय. माझी शंका.

श्रीगुरुजी's picture

6 May 2016 - 2:41 pm | श्रीगुरुजी

हा पण लेख वाचा.

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/editorial/government-to-purc...

भाव वाढले तरी आरडाओरडा, भाव कमी झाले तरी आरडाओरडा, निर्यातबंदी केली तरी आरडाओरडा, निर्यातबंदी उठविली तरी आरडाओरडा, आयात केली तरी आरडाओरडा, आयात नाही केली तरी आरडाओरडा ...

मार्मिक गोडसे's picture

6 May 2016 - 3:33 pm | मार्मिक गोडसे

कशाला आरडाओरडा करत आहात. ले़खातील खालील मुद्दे वाचले नाही का?

१) यंदा कांद्याचे देशांतर्गत उत्पादन तब्बल २०३ लाख टन झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तेरा लाख टनांनी जास्त आहे. एकट्या नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत एक वा दोन दिवसाची आवकच पंधरा हजार मे. टन असल्याने केंद्राचा निर्णय किती फसवा आहे हे लक्षात यावे.

२)कांदा खरेदीसोबतच आशियाई देशांसह युरोपमध्येही कांदा निर्यात करण्याचे सरकारने ठरविले आहे. खरेतर परदेशातील बाजारपेठ भारताने केव्हाच गमावली असून, तेथे आता पाकिस्तान व श्रीलंकेने मक्तेदारी निर्माण केली आहे

३)काही महिन्यांपूर्वीच कांदा दर कडाडले म्हणून निर्यातमूल्य वाढविण्यात आले. पाकिस्तानहून कांदा आयातही केला गेला. पण काही दिवसांतच कांदादर कोसळले. लागलीच निर्यात मूल्य कमी करीत शून्यावर आणले गेले. तरीही कांदा दराने मान टाकली ती टाकलीच. त्याचवेळी महिनाभरात नवा कांदा येणार असल्याने आयातीची घाई करु नये असा इशारा दिला गेला होता. परंतु, नोकरशाहीला खरेदीत इंटरेस्ट असतो

४) कांद्याचे उत्पादन यंदा भरपूर होणार याचा अंदाज असतांनाही सरकारने काहीही हालचाल केली नाही. आता कांदा मातीमोल भावात जाऊ लागताच सरकारी खरेदीचा देखावा केला जात असल्याने त्याविरोधात आवाज उठणारच! मुळात धोरणकर्त्यांना हा विषय कधी कळलाच नाही.

साखरेबाबतही विद्यमान सरकारचे धोरण हे व्यापारी धार्जीणेच आहे.

श्रीगुरुजी's picture

6 May 2016 - 6:59 pm | श्रीगुरुजी

कोणत्याही वस्तूचे भाव मागणी व पुरवठा यावर अवलंबून असतात. सरकार त्याबाबत फार काही करू शकत नाही. सरकारने काहीही पावले टाकली तरी आरडाओरडा होतोच.

कपिलमुनी's picture

6 May 2016 - 11:00 pm | कपिलमुनी

महागाईच्या मुद्द्यावर भारत बंद करताना भाजपाचा हे लॉजिक कुठे गेला होता ?

मार्मिक गोडसे's picture

6 May 2016 - 11:42 pm | मार्मिक गोडसे

बरोबर आहे, ठरावीक व्यापार्‍यांनी साखरेची साठेबाजी करुन कृत्रिमपणे पुरवठा कमी करायचा व अधिक भावाने खुल्या बाजारात विकून नफा कमवायचा, वायदे बाजारातही हेच व्यापारी साखरेचे दर नियंत्रित करतात व प्रचंड नफा कमवतात. हे सर्व सरकारच्या मदतीने होते. सरकारने आंतरराष्ट्रिय बाजारातील साखरेवर ४०% आयातकर लावल्यामुळे देशातील साखरेचे भाव वाढले. ह्यात फायदा हा साठेबाजांचाच झाला. व्यापार्‍यांनी प्रचंड नफा कमावल्यावर आता सरकारने साखरेच्या खरेदी कोट्यावर नियंत्रन आणले, आता खुल्या बाजारतही साखरेचे भाव कमी व्हायला सुरुवात होईल, अन तेही बाजारात नवीन साखरेचा एकही कण वाढलेला नसताना व मागणीही कमी झालेली नसताना.

श्रीगुरुजी's picture

7 May 2016 - 2:21 pm | श्रीगुरुजी

भाव वाढले हे वाईट झालं का भाव कमी झाले हे वाईट झालं का भाव वाढले हे चांगलं झालं का भाव कमी झाले हे चांगलं झालं?

मार्मिक गोडसे's picture

8 May 2016 - 12:49 pm | मार्मिक गोडसे

भाव वाढले हे वाईट झालं का भाव कमी झाले हे वाईट झालं का भाव वाढले हे चांगलं झालं का भाव कमी झाले हे चांगलं झालं?

कशाला चेष्टा करता गरीबाची. वरील प्रश्न कांद्यासंदर्भात केला असेल तर त्याचे उत्तर तुम्हीच दिलेल्या लिंक मधील लेखात आहे.

साखरेच्या दराबाबतीत विद्यमान सरकार व्यापार्‍यांचेच हित बघते हे स्पष्ट दिसतेच आहे.
मागे मी गावसेना प्रमुखांना हे प्रश्न विचारले होते, ह्यातील १-४ प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता आली तर साखरेचे भाव कमी/जास्त झल्यास कोणाला आनंद होतो हे ही समजेल. नाही समजले तर समजावून देण्यात येईल.

श्रीगुरुजी's picture

8 May 2016 - 2:53 pm | श्रीगुरुजी

द्या समजावून

मार्मिक गोडसे's picture

8 May 2016 - 4:19 pm | मार्मिक गोडसे

नकी काय समजले नाही?

mugdhagode's picture

6 May 2016 - 1:51 pm | mugdhagode

माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल.e

गुरुजी !

mugdhagode's picture

6 May 2016 - 1:51 pm | mugdhagode

माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल.e

गुरुजी !

गॅरी ट्रुमन's picture

7 May 2016 - 8:21 pm | गॅरी ट्रुमन

मोदी सरकारने सत्तेवर आल्यावर काय केले किंवा काय केले नाही याविषयी बरेच चर्वितचर्वण याच धाग्यात झाले आहे. तेव्हा आधीच चर्चा झालेल्या मुद्द्यांविषयी आणखी काही लिहित नाही. पण मोदी सरकारने एक काम मात्र करायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसत आहे. त्याला अजून म्हणावे तेवढे यश आलेले दिसत नाही. विविध ठिकाणी चाटूगिरी करून आलेल्या आणि वर्षानुवर्षे सरकारी सोयीसुविधा (बंगले, विविध समित्यांचे सदस्यत्व, परदेश दौऱ्यांमध्ये पंतप्रधानांबरोबर सरकारी खर्चाने जायला मिळणे इत्यादी) बांडगुळांना (बहुसंख्य लाल रंगाच्या) हाकलून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न मोदी सरकारने नक्कीच केला आहे. मागच्या वर्षी जी पुरस्कारवापसी आणि असहिष्णुता वगैरे कोल्हेकुई चालू होती त्यामागे आपले स्थान गमाविलेल्या या बांडगुळांचे नैराश्यच जबाबदार होते ही तर अगदी उघड गोष्ट आहे. या बांडगुळांना जिथे जिथे आहेत तिथून हाकलून लावायला हवे. ही गोष्ट अजून साध्य झालेली नाही पण त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न मात्र मोदी सरकारने नक्कीच केलेले आहेत. २०१९ पर्यंत या बांडगुळांचा नायनाट करण्यात मोदी सरकारला यश यावे ही इच्छा आणि अपेक्षाही.

श्रीगुरुजी's picture

8 May 2016 - 2:27 pm | श्रीगुरुजी

सहमत. पुरस्कार परतीच्या निमित्ताने ज्यांची नावे आयुष्यात कधीही ऐकली नाहीत अशी मंडळी पुरस्कार परत करून असहिष्णुता, जातीयवाद, फॅसिझम इ. विषयी तावातावाने बोलायला लागल्यावर प्रचंड विस्मय वाटला. आणिबाणी, आणिबाणीतील अत्याचार, शिखांचे वांशिक हत्याकांड, असंख्य दंगली, आझाद मैदानातील हिंसाचार, खैरलांजी, नितीन आगेची हत्या इ. प्रसंगी ही मंडळी उत्तर ध्रुवावरील अस्वलाप्रमाणे निद्रिस्त असावीत आणि म्हणूनच २०१५ पूर्वी अशा कोणत्याही प्रसंगी त्यांची दातखिळ उचकटलेली कधीच ऐकायला मिळाली नव्हती. मोदी सत्तेवर आल्याक्षणी यांची निद्रा पूर्ण झाली आणि एकमेकांच्या तोंडात उलथने घालून त्यांनी आपली दातखिळ पण उचकटून घेतली.

अफझल गुरूचा महापरीनिर्वाणदिन उत्सव साजरा करून न्यायसंस्थेला शिव्या हासडणे, कालीमाता/देवी इ. बद्दल बीभस्त लिहिलेली पत्रके काढून महिषासुर दिन साजरा करणे, भारताविरूद्ध व पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणे असे संतापजनक कार्यक्रम भविष्यात जेएनयुत होणे आता अवघड आहे. निदान उघडउघड तरी असे कार्यक्रम होणार नाहीत. माध्यमांची व पोलिसांची अशा कार्यक्रमावर करडी नजर असेल. पोलिसांच्या कडक कारवाईमुळे तिथल्या देशद्रोह्यांना चांगलाच हिसका बसला आहे. मोदी राजवटीचे हे अजून एक यश आहे.

mugdhagode's picture

8 May 2016 - 2:45 pm | mugdhagode

मोदींबरोबर पतंग उडवला अन भाईजान बाहेर आले.

ते दुसरे मदर इंडियाचे सुपुत्र भाजप्यानी चक्क महाराष्ट्र दिनाला बोलावले .... तीच बंदूक बाळगण्याचा तोच गुन्हा असलेली झेबुन्निसा की कुणी औरत मात्र आतच आहे.

काँग्रेसच्या काळात हे घडले असते तर भाजपा गँगने पार सिनेमा व दाऊद यावर राजस्तानी रुदालीला लाजवेल असा आक्रोश केला असता .

....

असो. गुर्जींचा युक्तिवाद आधीच झालेला आहे.

खोटी डिग्री लावली पण तिचा वापर केला नसेल तर तो गुन्हा नव्हे.

अआता सं. द . बंदूक प्रकर्णातही गुर्जी तोच युक्तिवाद करतील ... नुसती बंदूक घरात आणून ठेवली पण तिने गोळी कुठे उडवली ? म्हणुन तो गुन्हा नव्हे.

श्री गावसेना प्रमुख's picture

8 May 2016 - 4:27 pm | श्री गावसेना प्रमुख

गोड़े, मुम्बई मध्ये ज्या फोटो जर्नलिस्ट वर बलात्कार झाला होता त्यातले आरोपी तेव्हाचे एनसीपी मंत्री सचिन आहिर ह्यांचा स्वागताला असल्याचे फ़ोटो तेव्हा प्रसिद्ध झाले होते।मग काय सचिन अहीर ह्यांचा त्यांना सपोर्ट असल्याचा निष्कर्ष काढायचा का आपण।

mugdhagode's picture

11 May 2016 - 9:19 am | mugdhagode

http://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/re...

बुरे दिन येणार. ? भाकीत

mugdhagode's picture

11 May 2016 - 9:25 am | mugdhagode

http://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/re...

बुरे दिन येणार. ? भाकीत

सुबोध खरे's picture

11 May 2016 - 9:27 am | सुबोध खरे

तुमच्या "काडी"ला कोणी "काडीचीही" किंमत देत नाही म्हणून तोच प्रतिसाद परत टाकलाय का?

mugdhagode's picture

11 May 2016 - 11:26 am | mugdhagode

डिग्री प्रकरण , उतराखंड प्रकरण झाल्यापासुन दातखीळ बसली वाटतं !

सुबोध खरे's picture

11 May 2016 - 1:33 pm | सुबोध खरे

तुमच्या "काडी"ला कोणी "काडीचीही" किंमत देत नाही

lakhu risbud's picture

11 May 2016 - 3:36 pm | lakhu risbud

जंत बरे झाले का ?
मांजरीचे ?

mugdhagode's picture

11 May 2016 - 3:44 pm | mugdhagode

जंत पुन्हा पुन्हा होउ शकतात.

वर्षातुन दोनदा झेंटेलच्या गोळ्या चघळाव्यात

mugdhagode's picture

13 May 2016 - 7:26 pm | mugdhagode

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/subjects-listed-in-narendr...

मोदीजींच्या गुणपत्रिकेतील विषय त्या वेळी त्या युनिवर्सिटीत नव्हतेच म्हणे !

प्रदीप's picture

13 May 2016 - 8:08 pm | प्रदीप

ती युनिव्हर्सिटीही तेव्हा नव्हतीच. ती नंतर दिग्विजय सिंगांनी सुरू केली.

(हितेश, हे तुमच्या कानात सांगतोय, उगाच इथे- तिथे सांगत फिरू नका).

सुबोध खरे's picture

14 May 2016 - 1:23 pm | सुबोध खरे

हितेस राव
तुमच्या दुव्यात हे पण सापडले.
http://www.deccanchronicle.com/nation/current-affairs/140516/navy-deal-w...

श्रीगुरुजी's picture

1 Jun 2016 - 2:39 pm | श्रीगुरुजी

संपादक मंडळ,

हा लेख लिहून १ वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. १२५० हून अधिक प्रतिसाद झालेले आहेत. परंतु धागा अजून जिवंत आहे व अधूनमधून प्रतिसाद येत आहेत. या धाग्याला कुलुप लावावे ही नम्र विनंती. कुलुप नाही लावले तरी यापुढे या धाग्यावर कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देणार नाही असे ठरविले आहे.

कपिलमुनी's picture

1 Jun 2016 - 10:36 pm | कपिलमुनी
कपिलमुनी's picture

1 Jun 2016 - 10:37 pm | कपिलमुनी

काळा पैसा परत आला की लॉक लावू या

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

1 Jun 2016 - 10:56 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

#

चंपाबाई's picture

2 Jul 2016 - 12:35 pm | चंपाबाई

The Union environment ministry has withdrawn its demand for a Rs 200 crore restoration fund from Adani Ports & SEZ for damage to the environment imposed during the United Progressive Alliance (UPA) government, the biggest penalty for green violations. The ministry also extended the environmental clearance issued in 2009 to the company’s waterfront development project at Mundra in Gujarat. Several stringent conditions the ministry had earlier issued notice for to Adani have been withdrawn as well.

संपादकांनी धागालेखाचे शीर्षक अद्ययावत करावे.

मोहनदासांच्या समतेच्या वाटेवर मोदींचे पाऊल...

http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/...

ज्या रेल्वेत गांधींना वर्णवर्चस्वाचे चटके मिळाले, त्याच रेल्वेतून मोदींनी प्रवास केला. मोदीनी या दौर्‍याचे वर्णन तीर्थयात्रा असे केले आहे.

babubobade's picture

5 Aug 2017 - 4:29 pm | babubobade

श्रीगुरुजी , ३ वर्षे झाली . पुढचं उत्तर रामायण कधी लिहिणार ?

babubobade's picture

5 Aug 2017 - 4:34 pm | babubobade

श्रीगुरुजी , ३ वर्षे झाली . पुढचं उत्तर रामायण कधी लिहिणार ?

लिहिण्या सारखे फार काही नाहीए. देशा कडे फक्त १० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा !! पेट्रोल मध्ये इतका पैसे कमावला मोदी सरकारने . गेला कुठे सगळं ? गस्त वगैरे तर राहू द्या. तिथून पण जोरदार कामे आहेच. नक्की केले काय सरकारने ? रस्ते पण तेच ते .. बकवास. इतक्या पैशाचे केले काय ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

6 Aug 2017 - 6:49 pm | हतोळकरांचा प्रसाद

एवढे जुने धागे उकरून काढले पण मध्ये मोदी सरकारची तीन चार वर्षे असे दोन तीन धागे येऊन गेले ते नाही वाचले?