साहित्य
६ मोठे बटाटे
६ अंडी
१/२ कप बारीक चिरलेली ढोबळी मिरची (हिरवी, लाल, पिवळी)
१/२ कप किसलेले processed चीज (अमूल किंवा गोवर्धन)
१ टे स्पून मिक्ड हर्ब्स (पिझ्झा बरोबर आलेली पाकिटे वापरू शकता )
१ टे स्पून कुटलेली काळीमिरी पावडर
१ ते २ टे स्पून बटर (वितळवून)
मीठ चवीनुसार
तेल लागेल तेवढे
कृती
बटाटे स्वच्छ धुऊन घ्या. घाण आणि वाळूचे कण काढण्यासाठी ब्रशने हलके घासून घ्या. ओवन १८० डिग्री अंश से. ला प्रि-हिट करून घ्या. बटाट्यांना फोर्क किंवा टाचणीने सगळीकडून टोच्या मारून (फक्त सालीवर टोच्या मारा, ह्याने स्किन मध्ये अडकलेली हवा बाहेर पडेल आणि स्किन फुगणार नाही), हलक्या हाताने (बोटाने), सगळीकडून तेल लावून घ्या. ओवन मध्ये बटाटे तासभर बेक करा. बटाटा शिजला याची खात्री करण्यासाठी मध्यभागी एक toothpick ने टोचून बघा.
बटाटे बाहेर काढून गार करायला ठेवा. बटाटे थंड होत असताना सारणाची तयारी करून घ्या.
बटाटे गार झाले कि एका सुरीने बटाट्च्याचा एक layer कापून घ्या. एका चमच्याने, आतील शिजलेला बटाटा काढून, बटाट्यात एक पोकळी तयार करा. हे काम जरां काळजीपूर्वक करा. बटाट्याला कुठेही भोक पडता कामा नये. थोडा पांढरा मासल भाग आत राहिला तरी चालेल. सर्व बटाटे अश्या रीतीने पोकळ करून घ्या.
ब्रशने सगळ्या बटाट्यांच्या आतील पोकळ बाजूंना बटर लाऊन घ्या.
आता बटाट्याच्या आत थोडं किसलेले चीज, एक चमचा थंड झालेला सारण भरा. [जास्ती भरू नका, कारण अजून ह्यात अंडा फोडून घ्यायचा आहे]. प्रत्येक बटाट्यात एक अंड फोडून घाला. वरून चिमुटभर मीठ आणि थोडी काळीमिरी भुरभुरा.
हे असे भरलेले बटाटे पुन्हा oven मध्ये १८० डिग्री अंश से. ला १५ ते २० मिनिटे बेक करा. बाहेर काढून, थोडं चीज भुरभुरून, अजून २ मिनिटे ओवेन मध्ये ठेवा
गरमागरम सर्व करावे.
सारणासाठी
एका पँन मध्ये १ मोठा चमचा बटर टाका. त्यात ढोबळी मिरच्या टाकून मध्यम आचेवर परतून घ्या. त्यात mixed herbs टाकून अजून २ ते ३ मिनिटे शिजवा. चव घेऊन त्याप्रमाणे मीठ व काळीमिरी पावडर टाका. मिश्रण ताटात काढून थंड करून घ्या. सारण जास्ती शिजवायचा नाही.
टिप
सुटीच्या दिवशी हे बनवून खाऊ शकता. आदल्या दिवशी तयारी करून फ्रीज मध्ये ठेऊ शकता. ऎन वेळेस अंडी फोडून बटाट्यात टाकून बेक करू शकता.
चिकन किंवा पोर्क खात असल्यास, बाजारात मिळणारे sausages चे बारीक तुकडे करून सारणात टाकू शकता, किंवा बेकन तव्यावर फ्राय करून त्याचे बारीक तुकडे देखील टाकू शकता.
अगदी अस्सल देशी ऑमलेट (मिरची, कांदा, कोथिंबीर , हळद, तिखट, मीठ ) करून देखील ह्यात टाकून बेक केले तरी चांगल लागेल.
प्रतिक्रिया
13 Apr 2016 - 7:34 pm | सूड
फारच खटाटोप केलेला दिसतोय. ह्यात अंड घालताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का?
15 Apr 2016 - 2:29 pm | टवाळ कार्टा
अंडे कच्चे असावे
15 Apr 2016 - 5:27 pm | सूड
चान चान!! प्रश्न पुन्हा एकदा वाचा आणि काय कळतंय का बघा. =))
16 Apr 2016 - 2:50 pm | ज्ञानोबाचे पैजार
अंड घालताना बटाट्यावर बसू नये इतकी काळजी घेतली तरी चालेल असे वाटते.
अंड घालण्याच्या कृतीचे लेखकाने फोटो दिले असते तर ब्रे झाले असते.
पैजाराबुवा,
13 Apr 2016 - 7:41 pm | केडी
13 Apr 2016 - 8:38 pm | उल्का
छान दिसते आहे.
13 Apr 2016 - 11:38 pm | उगा काहितरीच
खटाटोप करायला लावणारा पदार्थ ... चवीला चांगला असेल . कुणी आयता दिला तरच खाण्यात येईल. ;-)
14 Apr 2016 - 7:30 am | केडी
चमचमीत खायचं असेल तर कष्ट करायला हवे ना थोडे? ☺
आणि वाटतात तेवढे कष्ट नाहीयेत। पूर्वतयारी करून ठेवली तर ऐन वेळेस बनवू शकतो।
14 Apr 2016 - 8:15 am | बाबा योगिराज
स्वतः च्या हॉटेल चा विचार सुरु करा आता.
14 Apr 2016 - 8:37 am | अरिंजय
सही है केडी भाऊ.
15 Apr 2016 - 2:23 pm | पैसा
मस्त पाकृ!
15 Apr 2016 - 3:05 pm | पद्मावति
मस्तं!
15 Apr 2016 - 3:10 pm | विशाखा राऊत
मस्त रेसेपी. असेच सेम अॅव्होकडो मध्ये अंड बेक करतात
15 Apr 2016 - 5:28 pm | वेल्लाभट
तो पहिलाच फोटो असला जीवघेणा आलाय...
पदार्थ तर कातिल असेलच नक्की. करून बघतो.
15 Apr 2016 - 8:21 pm | शलभ
मस्त वाटतय. :)
15 Apr 2016 - 8:31 pm | sagarpdy
ओवन विकत घ्यायला जात आहे.
16 Apr 2016 - 2:24 pm | नावातकायआहे
अंडी शोधतो आहे....
16 Apr 2016 - 3:01 pm | ज्ञानोबाचे पैजार
नीट खिसेबीसे तपासा, एखादवेळी बुट काढताना बुटातहि पडली असतील.
शोधलं की सापडतच असे टीव्हीवरच्या एका बाई म्हणतात, नाही सापडली तर त्यांची मदत घ्या.
(अंड्यांची पिशवी जपुन हाताळ हो शाम...आमच्या आगामी श्यामची सुपर मॉम या कादंबरी मधला ड्व्यायळॉक ) पैजारबुवा,
27 Apr 2016 - 11:55 pm | sagarpdy
__/\__
16 Apr 2016 - 3:34 pm | अजया
छान पाकृ
16 Apr 2016 - 3:43 pm | त्रिवेणी
मस्त दिस्तेय पाककृती. पण अंड खात नसल्याने पास.
27 Apr 2016 - 9:42 pm | आनंदी गोपाळ
स्टफ केला नाही, पण सगळे इनग्रेडीयंट्स प्लस टोमॅटो डिशमधे बेक केलेत. बटाटे छोटे होते म्हणून काप करून बेक केलेत.
मस्त टेस्ट!
28 Apr 2016 - 5:44 am | केडी
फोटो सुद्धा मस्त आलाय.
28 Apr 2016 - 2:35 pm | निशांत_खाडे
या महान विडीओची आठवण झाली.
28 Apr 2016 - 2:54 pm | इशा१२३
मस्त पाकृ. !
28 Apr 2016 - 2:57 pm | इशा१२३
मस्त पाकृ. !
29 Apr 2016 - 12:00 am | एस
अनुस्वार फार महत्त्वाचा असतो पाककृतीत. बाकी पाकृ छान. विकांताला करून पाहिली जाईल.
12 Feb 2017 - 9:24 am | फेदरवेट साहेब
आज मुहूर्त लागला,
धागा बुकमार्क करणे सार्थकी लागले एकदाचे.
28 Feb 2017 - 6:19 am | केडी
....मस्त!
28 Feb 2017 - 6:32 pm | फेदरवेट साहेब
बटाटा जरा चांबट अन कोरडा वाटत होता,
हे कशामुळे झाले असावे? ह्याला इलाज काय?
3 Mar 2017 - 4:26 pm | केडी
बहुदा बटाटा जून असेल किंवा खराब व्हायच्या मार्गावर असेल. आंबटपणा त्यामुळे असू शकेल. बटाट्याच्या आकारमानानुसार ओव्हन ची वेळ कमी जास्ती करून बघा. कदाचित जास्ती वेळ बेक केल्यामुळे कोरडा पडला असेल (त्यात परत आपण अंड टाकून पुन्हा थोडा वेळ बेक करतोच त्यामुळे बटाटा कोरडा पडला असेल).
अश्या वेळेस दुसरा चमचमीत उपाय म्हणजे बटाटा अर्धा कच्चा उकडून घेणे, मग तो थंड झाल्यावर आतून कोरून तेलात फ्राय करून घेणे. नंतर त्यात अंड वैगेरे घालून ओव्हन मध्ये थोडा वेळ बेक करणे. (तेलात तळल्यामुळे बटाटा मऊ राहील....)
4 Mar 2017 - 8:04 am | पिलीयन रायडर
हा पदार्थ करुन पहाण्याची फार इच्छा आहे. पण उकडलेला बटाटा टाळावा म्हणतेय.. तरीही एखाद्या दिवशी खुपच व्यायाम केला तर स्वतःला ट्रिट देईन!
फारच सुंदर फोटो काढता हो तुम्ही!
6 Mar 2017 - 12:50 pm | केडी
एकदा कधीतरी करायला हरकत नाही, आणि तसं पहिला तर बेक केलेला बटाटा हा वाईट नाही! इन फॅक्ट, सायकलिंग किंवा रनिंग ला निघण्यापूर्वी एक तास आधी असा बेक केलेला बटाटा खाऊन निघालो कि त्याने एनर्जी लेवल अप राहते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Potatoes rank high on the glycemic index--higher than pasta--which means their carbs get into the bloodstream fast. So quickly, in fact, that some ultramarathoners and Ironman athletes reach for boiled, skinless white potatoes during long endurance events. If snacking on a plain spud midrun is a little too odd for your tastes, tap into longer-lasting energy by topping a potato with low-fat cottage cheese or serving it alongside four ounces of chicken or fish. "You lower potatoes' GI profile by eating them with fat or protein," says Leslie Bonci, R.D., director of sports medicine nutrition at the University of Pittsburgh Medical Center. Eating foods low on the glycemic index--which means the sugars are processed more slowly, delivering a steadier stream of energy--improves endurance, according to a 2006 study published in the International Journal of Sport Nutrition and Exercise Metabolism.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
source :- Potato the Perfect Carb