नमस्कार मंडळी! सदस्यांकडून आलेल्या अभिप्रायांनुसार सध्याची गमभन प्रणाली काही जणांना गैरसोयीची वाटते. विशेषतः गूगल क्रोम आणि गूगल Input Method वापरणार्या आणि विशेषतः मोबाईलवरून लॉग इन करणार्या मंडळींना गमभनशी जुळवून घेणे जरा त्रासाचे वाटते. याव्यतिरिक्त गूगल क्रोम वापरताना अक्षरे सरमिसळ होणे अशाही काही अडचणी अनेकांना येतात.
काही जणांना inscript कीबोर्ड वापरणे सोयीचे वाटते. अशा सर्व लोकांच्या सोयीसाठी आम्ही आता आपल्याला या तीनही लिहिण्याच्या पद्धतीतून आपल्याला सोयीस्कर वाटेल ती पद्धत निवडण्याची सोय आता देत आहोत.
ही Input Method कशा प्रकारे निवडता येईल? अगदी सोपे आहे.
१) मिपावर लॉग इन केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला "आवागमन" विभाग दिसतो. यामध्ये सर्वात वर आपले सदस्यनाम दिसते. या सदस्य नामावर क्लिक केल्यानंतर आपल्या खात्याचे संपादन करता येते. यासाठी सर्वप्रथम आपले सदस्यनाम क्लिक करा.
२) यानंतर आपल्या खात्यातील द्रश्य, वाचनखुणा, संपादन, यांचे सर्व लेखन असे ऑप्शन्स दिसतील. यापैकी "संपादन" वर क्लिक करा.
३) यानंतर खात्यात प्रवेश केल्यानंतर User "Input Method Settings" हे शीर्षक दिसेल. त्याखाली "Select your choice for Input Method Editor" हे उपशीर्षक आणि त्याखाली एक छोटा चौकोन दिसेल. या चौकोनात Gamabhana आणि त्याच्या उजव्या बाजूला निवडीसाठी एक बाण दिसेल.
हा बाण क्लिक केल्यानंतर त्या चौकोनात ३ ऑप्शन्स दिसतील. Gamabhana, Google Input, Inscript.
४) या तीनपैकी तुम्हाला पाहिजे ती लिहिण्याची पद्धत निवडा.
५) सर्वात शेवट खात्याच्या तळाच्या भागात "प्रकाशित करा" या लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्ही मिपावर Gamabhana, Google Input, Inscript यापैकी तुम्हाला जी सोयीची वाटत असेल अशा पाहिजे त्या पद्धतीने लिहू शकता. हि सुविधा केवळ मिपावर लॉग इन झाल्यावरच वापरता येईल.
उत्तमोत्तम लेखनासाठी शुभेच्छा!
प्रतिक्रिया
11 Apr 2016 - 6:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या लेखन प्रकाशित करतांना अडचणी येत आहेत. काम सुरु आहे.
-दिलीप बिरुटे
11 Apr 2016 - 6:26 pm | अजय देशपांडे
हे छान झाले आता मराठी टाइप करता येईल
26 Aug 2016 - 12:49 pm | अनिलअहिरे
मला तरी गुगल इनपुट सहज आणि सोपे वाटते टाईप केल्यावर शब्दांचे पर्याय येतात आणि हवा असलेला शब्द पण सापडतो
26 Aug 2016 - 2:50 pm | शाम भागवत
अरे बापरे, काय सोपे व कुठल्या पध्दतीने जलद टाईप करता येते या विषयावर इथे बराच काथ्याकूट झालेला आहे.:-))
तरी पण...
आपल्याला बॉ इन्स्क्रिप्टच आवडत.
:))
शब्दांचे पर्याय येणार.... , मग ते बघायचे..., त्यानंतर त्यातला एक निवडायचा....,
तोपर्यंत माझे टाईप करून झालेले असते.
हाकानाका