गाभा:
`स्लमडॉग मिलेनिअर' ला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. रेहमानलाही. हा भारतीय संगीतकाराचा पहिला बहुमान.
पण गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी आधी कुणी भारतीय चित्रपट पाठविल्याचं किंवा स्पर्धेत असल्याचं ऐकिवात नाही. `स्लमडॉग' भारतीय चित्रपट नाही. त्याला म्हणूनच तिथे प्रवेश मिळाला का?
कारण आत्तापर्यंत कुठलाही भारतीय चित्रपट गोल्डन ग्लोब साठी स्पर्धेत असल्याचं ऐकलेलं नाही. या पुरस्कारासाठीचे निकष कोणते, भारतीय चित्रपट त्या स्पर्धेत आधी होते का, नसले तर का नाही, याबाबत कुणी अधिक माहिती देऊ शकेल काय?
प्रतिक्रिया
15 Jan 2009 - 11:30 am | नीधप
गोल्डन ग्लोब मधे जाण्यासाठी एलिजिबिलिटी वेगळी आहे. त्यासाठी अमेरीकन नसलेला चित्रपट (निर्मिती) हा अमेरिकेत काही ठराविक काउंटीज मधे काही ठराविक काळ रिलीज झालेला असावा लागतो.
हे सगळं पाठ होतं ४ वर्षांपूर्वी पण आत्ता सगळे तपशील आठवत नाहीयेत.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 Jan 2009 - 12:27 pm | नीधप
http://www.goldenglobes.org/entryforms/
या ठिकाणी नियमावल्या आहेत. अत्यंत ढोबळ आहेत. तपशीलातले नियम हे इमेलवर संपर्क साधल्यानंतर कळतात.
हे लोक लगेच प्रतिसाद देतात अश्या चौकश्यांना. अगदी ऑस्कर वाले सुद्धा.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 Jan 2009 - 11:04 pm | कशिद
सिनेमा खुप छान अणि प्रभावी पने मंडला आही..अणि मधून मधूनजे मुंबई चे अणि ईथल्या जीवनाचे दर्शन घडवले आहे ते खुप छान आहे .
बक्की सिनेमात संगीत कुठे वापरला आहे हे काही काला नाही...
15 Jan 2009 - 11:19 pm | अनामिक
बक्की सिनेमात संगीत कुठे वापरला आहे हे काही काला नाही...
चित्रपटात संगीत वापरताना नट्-नट्यांनी त्यावर नाचणे गरजेचे नाही.... म्हणूनच त्याला "पार्श्वसंगीत" म्हणत असावे. लक्ष देउन पाहिल्यास तुम्हाला जाणवेल..
१) सुरवातीला जमाल क्रिकेट खेळत असताना, त्या मुलांच्या मागे पोलीस लागतात - पार्श्वसंगीत ऐकायला येते
२) दंगलीच्या वेळी -पार्श्वसंगीत ऐकायला येते
३) लतिकाचा शोध घेताना "रिंग रिंग रिंगा" - पार्श्वसंगीत ऐकायला येते
४) सगळ्यात शेवटी, क्रेडिट्स रोल होताना "जय हो" - पार्श्वसंगीत ऐकायला येते
आता एवढेच लक्षात येतेय...
अनामिक
16 Jan 2009 - 6:29 am | जृंभणश्वान
अनामिक यांनी सांगितलेली आणि अजुनपण तीन-चार चांगली गाणी आहेत स्लमडॉगमधे.
पूर्ण OST इथे ऐकायला मिळेल
http://www.youtube.com/watch?v=bBZEhmDOHOw&feature=related
15 Jan 2009 - 11:13 pm | आपला अभिजित
वेगळा होता, कशिदराव!
15 Jan 2009 - 11:16 pm | अवलिया
हो पण त्यातुन काही माहिती मिळालीच नाही असे तर म्हणता येणार नाहि, असु द्या. काहि होत नाही असंबंद्ध प्रतिसाद असला तरी. काय म्हणता?
(अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे )
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
16 Jan 2009 - 9:36 am | नीधप
अभिजित,
तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली आहे आणि इतरांना त्या माहितीत रस नाही तर धागा उडवायची विनंती करायला काय हरकत आहे?
चित्रपटाच्या संगीतासाठी वेगळा धागा उघडला जाउ शकतो.
ही केवळ एक सूचना आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home