कुठल्याही टिव्ही मधील सेटिंग्स मेनुमध्ये अनेक पर्याय दिलेले असतात . त्यांच्या योग्य व्हॅल्युज काय असाव्यात ?
जसे की , कलर - कलर , शार्पनेस , कॉन्ट्रास्ट , बॅकलाईट , ब्राईटनेस .
ऑडिओ - ट्रिबल, ब्रास , पीसीम , ऑटो , स्टिरीओ
चित्राकरीता प्रिसेट वापरूनही समाधान होत नसेल तर कस्ट्ममध्ये जाऊन आपल्या पसंतीनुसार व्हॅल्युज सेट करू शकता.
१) कॉन्ट्रास्ट कमीत कमी पातळीवर आणा.
२) स्क्रिन पुर्ण काळा होइल इतका ब्राइटनेस कमी करा.
३) आता ह्ळूहळू ब्राइटनेस वाढवा, स्क्रिनवर थोडा प्रकाश दिसू लागल्यावर ब्राइटनेस वाढवणे थांबवा.
४) आपल्या डोळ्यांना सुसह्य होइल इतपत कॉन्ट्रास्ट वाढवा.
५) रंग व शार्पनेस आपल्या पसंतीनुसार सेट करा व सेव्ह करा.
पातळी ठरवताना खोलीमध्ये [जेथे दुरचित्रवाणी संच आहे] प्रकाश व्यवस्था किती आहे हा पण महत्त्वाचा निकष आहे. पुर्णपणे अंधार ते प्रखर उजेड यामधील फरकामुळे वेगवेगळ्या पातळ्या निवडणे भाग पडू शकते. शक्यतोवर एकाच प्रकाशमानतेवर दुरचित्रवाणी बघण्याचा प्रयत्न करा, निदान रात्रीच्या वेळी तरी. तरच तुम्ही निवडत असलेल्या किंमतींचा पुर्ण क्षमतेने उपयोग [उ.दा. डोळ्यांवरील ताण कमीत कमी करणे] होऊ शकेल.
प्रतिक्रिया
6 Apr 2016 - 12:35 pm | मराठी कथालेखक
तुम्ही काही Presets वापरुन बघा
Picture साठी - Theater, Vivid, standard ई
Audio साठी - Dolby/Stereo , Jazz, Rock ई.
6 Apr 2016 - 5:31 pm | विजय पुरोहित
हेच्च म्हणतो...
6 Apr 2016 - 12:38 pm | विजय पुरोहित
तुमचं नाव पाहून गूढकथा वाचायला मिळेल असं वाटलं होतं. इथे तुम्हालाच गूढ पडलेलं दिसतेय कशाचे तरी. :)
6 Apr 2016 - 12:44 pm | सिरुसेरि
------ "तुमचं नाव पाहून गूढकथा वाचायला मिळेल असं वाटलं होतं. इथे तुम्हालाच गूढ पडलेलं दिसतेय कशाचे तरी. :)" ----------
धन्यवाद . सध्या लॉ़जिकल ब्रेक घेतला आहे .
6 Apr 2016 - 7:50 pm | मार्मिक गोडसे
चित्राकरीता प्रिसेट वापरूनही समाधान होत नसेल तर कस्ट्ममध्ये जाऊन आपल्या पसंतीनुसार व्हॅल्युज सेट करू शकता.
१) कॉन्ट्रास्ट कमीत कमी पातळीवर आणा.
२) स्क्रिन पुर्ण काळा होइल इतका ब्राइटनेस कमी करा.
३) आता ह्ळूहळू ब्राइटनेस वाढवा, स्क्रिनवर थोडा प्रकाश दिसू लागल्यावर ब्राइटनेस वाढवणे थांबवा.
४) आपल्या डोळ्यांना सुसह्य होइल इतपत कॉन्ट्रास्ट वाढवा.
५) रंग व शार्पनेस आपल्या पसंतीनुसार सेट करा व सेव्ह करा.
6 Apr 2016 - 8:32 pm | gogglya