आडवाटेची भ्रमंती - जांभे धरण

स्पा's picture
स्पा in भटकंती
25 Mar 2016 - 11:08 am

धुळवडीला दर वर्षी ट्रेक होतोच, पण या वर्षी अति उन्हाळा असल्याने ट्रेक न करता नुसतेच कुठे फिरून येत येईल का या विचारात होतो, ठिकाण पण हटके हवे, म्हणून कंजूष काकांशी बोलणे झाले, त्यांनी सुचवलेला जांभे धरणाचा प्रस्ताव आवडला.यावेळी बाईक ने जायचे नाही असे ठरवले होते.
मध्य रेल्वेच्या आसनगाव स्टेशन पासून शहापूर,तिथून नेरवली गावापर्यंत बस(२०किमी),पुढे दीड दोन किमी चालत असा मार्ग होता. पहाटे ६.१४ ची आसनगाव पकडली,काका,मी आणि माझा एक मित्र असे तिघेच होतो.आसनगाव ते शहापूर रिक्षा मिळाली (१० रुपये सीट).तोथून शहापूर डेपो ला पोचलो.लगेचच ७.२० ची बस मिळाली.साधारण अर्ध्या तासात नेरवणे गावात पोचलो.वातावरण मस्त गार होते.बसमधून उतरल्यावरच मन एकदम प्रसन्न झाले.अशा चेंज ची खूप गरज असते.
फ्स्दफ्स
गाव जेमतेम २०-३० घरांचे असावे.एक माणसाला धरणाचा रस्ता विचारून पुढे निघालो.सगळीकडे पक्षांची किलबिल सुरु होती.धरण क्षेत्राखालचा परिसर असल्याने सगळीकडे छान हिरवेगार होते.मार्च महिना सुरुये असे अजिबात वाटत नव्हते.

rfesf

xc

ddasd

वाटेत काका बरीच पक्षांची माहिती देत होते.पाणी भरपूर असल्याने शेते चांगलीच डवरलेली होती.असेच पाणी सर्वांनी वाचवले तर मराठवाडा, विदर्भ देखील असाच हिरवागार दिसेल असे वाटून गेले.या शेतकर्यांनी केलेली एक चांगली गोष्ट म्हणजे झाडे अजिबात न तोडता आजूबाजूने शेती केलेली होती.मध्येच वाट वाकडी करून एका शेतात घुसलो.

सडसड

ds

एका बाजूला ज्वारी आणि दुसर्या भागात भरपूर भाजी लावलेली होती, एका आंब्याखाली दोन गायी एक म्हैस बांधलेली होती,चिकूची दहा बारा झाडे लगडलेली होती.एकूण एकदम पिक्चर परफेक्ट दृश्य होतं

gg

फड

मग पुढे धरणाकडे कडे निघालो,मध्येच मोहाचा सुगंध आला.बाजूलाच मोहाचे झाड होते,त्याची टपोरी फुले खाली पडत होती.हि खायला भारी लागतात, गोडसर आणि एक स्पेसिफिक सुगंध.

मोहाचे झाड
स्फ्दफ्द

फुले
qssd

काही वेळातच धरणावर पोचलो,इथे जर झाडी जास्तच दाट झालेली होती.सगळी कडे धुक्याची चादर लपेटली गेली होती.भरपूर पाणी होते.महत्वाची गोष्ट म्हणजे "शांतता". पक्षांचा सोडला तर अजिबातच कसला आवाज नव्हता.इथे बराच वेळ बसलो.

सडसड

दावड

wdd

खाली मासे पकडणाऱ्यांचे एक घर होते, कसलेसे ऑफिस सुद्धा होते.तिकडे चहा मिळेल का म्हणून चौकशी केली पण नाही मिळाला.

sds

धरणातले पाणी वरून खाली येत होते.

क्फ्द्फ

ddsads

ds

थोड्यावेळाने निघालो, आता पोटपूजेची सोय बघायची होती.येताना परत त्याच शेतात आंब्याखाली पसरलो.बांधावर मस्त हातपाय तोंड धुवून फ्रेश झालो. वेज चिज सॅन्ड्विच,लसून चटणी-पोळ्या,द्राक्ष, केळी, लाडू,आणि अजून काय काय असा भारी बेत होता.खाऊन झाल्यावर मस्त पैकी तिथेच आडवे झालो, आता करण्यासारखे काहीही नव्हतेच.शांतता ऐकत कसा वेळ गेला समजला नाही, काका त्यांच्या भटकंतीचे भरपूर किस्से सांगत होते, त्या मानाने आपण काहीच फिरलो नाही याचीची खंत वाटत होती.थोड्यावेळाने सगळे आवरून परतीला लागलो. आता भयंकर उन्ह तापलेले होते.सकाळचा गारवा कुठच्या कुठे गेलेला होता.बस येते त्या जागी आलो.अजून एक तास वेळ असल्याने तसेच उगाच बसून राहिलो. गावात धुळवड असल्याने सोंग नाचत आली.फुल तर्राट.
आमच्या सोबतच्या एका गावकर्याने मग "अरे ए पावन हैती, जा गावात हिगडे नगा त्रास देऊ" म्हणत त्यांना पळवून लावले. बस येईस्तोवर मग उगाच गप्पा मारत बसलो.बरोबर एक ला बस आली. आणि परतीचा प्रवास सुरु झाला.

ffg

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

25 Mar 2016 - 11:13 am | प्रचेतस

मस्त छोटेखानी भटकंती.
कंजूसकाका, नूलकरकाका ह्यांसारख्या दर्दी माणसांसोबत भटकायला खूप मस्त वाटतं. ह्यांच अनुभवविश्व समृद्ध आहे. सतत काहीनाकाही माहिती आपसूकच मिळत जाते.

कंजूस's picture

26 Mar 2016 - 11:26 am | कंजूस

एक प्रयत्न;
पक्षांचा आवाज फोन रेकॅार्डिंग
http://vocaroo.com/i/s0LkkV39XG6o

FILE SIZE : 1.9 MB

स्पा's picture

26 Mar 2016 - 11:39 am | स्पा

जबरदस्त काका

कवितानागेश's picture

25 Mar 2016 - 11:14 am | कवितानागेश

ऑं! अच्चं जाल तल! ;)

फोटो लोड होण्याआधीच नुसते वर्णन वाचूनच चित्त प्रसन्न झाले. इथे पुण्याहून कसे जाता येईल?

पुण्याहून यायचे म्हणजे गाडी असेल तर पुणे- नगरमार्गे मुरबाड तिथून शहापुर
.

किंवा मग ट्रेन ने कल्याणला येऊन पुढे लोकल

नाव आडनाव's picture

25 Mar 2016 - 9:25 pm | नाव आडनाव

पुणे- नगरमार्गे मुरबाड
कल्याण - नगर रोड वर आळेफाटा आहे. पुण्याहून आळेफाटा आणि तिथून कल्याणला एस.टी. ने जातांना कल्याणच्या (नक्की आठवत नाही पण) ~ अर्धा तास आधी आहे मुरबाड.

शैलेन्द्र's picture

27 Mar 2016 - 6:52 pm | शैलेन्द्र

Pune- Nashik phata- Ale phata- MAlshej- saralgaon- Naravane

It will be 6 hours journey.

Better is by train. Pune- Kalyan- asangaon- shahapur- naravane

मस्त ठिकाण आहे.छान झालेली दिसते निवांत भटकंती.
आमच्या भागातल्या धरणांना चक्कर मारायला हवी वाटायला लागलं ही भटकंती वाचून.
कंजूस काकांना तीही ठिकाणं माहित असणार यात संदेह नाही!

अप्पा जोगळेकर's picture

25 Mar 2016 - 11:46 am | अप्पा जोगळेकर

मस्त. डोळे निवले.

पैसा's picture

25 Mar 2016 - 11:52 am | पैसा

वाचून अन फोटो बघून एकदम मस्त वाटलं!

मस्त फोटो काढतो स्पा.मला तो दृष्यातला फोटो कसा शोधतो ते आवडलं.
नेरवली नाही ने ह रो ली.
मुंबई ठाणेकरांनी पावसाळ्यात नक्की जावे.हे धरण लगेच वाहते आणि भिंतीवरून वाहणारे शुभ्र पाणी मस्तच.

पुण्याहून येण्यासाठी : मागे कशेळेलेला आलात तोच रस्ता परंतू कशेळे येथे उजवीकडे आत वळायचं नाही पुढे मुरबाडला जायचं.(वाटेत म्हसा येथेही उजवीकडे सहा किमिवर एक जांभुरडे तलाव सिद्धगडाच्या पायथ्याशी आहे.) मुरबाडवरून शहापुर रस्ता आहे त्या रस्त्याने लेणारखुर्द येथे उजवीकडे नेहरोली गाव आहे.पुण्याकडून तसं बरंच दूर आहे.

#रसायनीपासून जवळ जांभिवली/सवणे गावचा पाटबंधारे तलाव आहे.रम्य ठिकाण रिलाअन्स पेट्रो जवळ आहे.याविषयी मागे एकदा लिहिलं होतं.

शहापुर ( आसनगाव स्टेशनहून ३ किमी ) ते नेहरोली ( १९ किमी ) रूट ट्रेस.

सकाळी ( video तला स्क्रीन शॅाट )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2016 - 1:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटेखानी वृत्तांत आवडला. फोटो स्पाटच. मोहाची फुलं पाहून वृत्तांतात काही तपशील वगळले असतील का असे उगाच वाटले. ;)

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

स्पा's picture

25 Mar 2016 - 1:07 pm | स्पा

सही पहचाना डाॅक :D

जगप्रवासी's picture

25 Mar 2016 - 2:50 pm | जगप्रवासी

मस्त भटकंती

सूड's picture

25 Mar 2016 - 2:52 pm | सूड

ह्म्म !!

बोका-ए-आझम's picture

25 Mar 2016 - 3:55 pm | बोका-ए-आझम

मस्तच फोटो. शेवटी पाणी आहे तर सगळं आहे!

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Mar 2016 - 4:04 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुंदर फोटो.
शेवटचा तर फारच आवडला.
पैजारबुवा,

अभ्या..'s picture

25 Mar 2016 - 5:25 pm | अभ्या..

भारी रे स्पावड्या.

महिन्द्रा कमांडरचा दुसरा फोटो लै आवडला. त्यांची अ‍ॅड कॅम्पेन अशीच असायची. जीप हिरवी/खाकी असायची फक्त. ;)

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2016 - 6:30 pm | चौथा कोनाडा

वाह,किती सुंदर प्रचि अन सुरेख वर्णन !

स्पावडुभाऊ, तुमच्या bबरोबर जाम्भे धरणाची सहल करtताना मजा आली.

मस्तच !

सूड's picture

25 Mar 2016 - 8:27 pm | सूड

सिद्धु??

अनुप ढेरे's picture

25 Mar 2016 - 6:56 pm | अनुप ढेरे

मस्त आहेत फटू!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Mar 2016 - 7:08 pm | निनाद मुक्काम प...

अजून एका अनवट पर्यटन स्थळाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
ही जागा सुनियोजित पद्धतीने विकसित झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळू शकतो सरकार ला कर आणि पर्यटकांना एक अजून पर्याय

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2016 - 7:13 pm | अत्रुप्त आत्मा

पांSsssssssssडूSsssssssss ऊऊऊऊ http://www.freesmileys.org/smileys/smiley-hug001.gif
वाईट्ट काडलीव फोटू तू पांडू! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif आत्ताच्या आत्ता तिकडं जाऊ वाटायलय! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif
दुत्त दुत्त ! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

प्रचेतस's picture

26 Mar 2016 - 9:23 am | प्रचेतस

'पांSsssssssssडूSsssssssss ऊऊऊऊ' च्या पुढची ही a स्मायली लैच भावनोत्कट आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2016 - 11:48 am | अत्रुप्त आत्मा

बरं मग!? http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-023.gif

स्वामी संकेतानंद's picture

25 Mar 2016 - 9:47 pm | स्वामी संकेतानंद

मस्त फोटो आणि वर्णन!

यशोधरा's picture

25 Mar 2016 - 10:02 pm | यशोधरा

स्पा, फोटो आवडले.
कंजूसकाकांनी दिलेले फोटो दिसत नाहीयेत मला.

स्पांडोबा, एक नंबर फटू, डॉळे निवले शीर्यसलि.

अप्रतिम! सगळे फोटो एकसे बढकर एक!

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2016 - 12:13 am | श्रीरंग_जोशी

शांततापूर्ण भटकंतीचे वर्णन आवडले.
फोटोज छानच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Mar 2016 - 9:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं रे. बरेचं दिवसात अश्या भटकंतीला जायला नाही मिळालं :(!!!!!!!!!

तो वठलेल्या झाडाचा फोटो एक नंबर आलाय.

स्वाती दिनेश's picture

26 Mar 2016 - 1:12 pm | स्वाती दिनेश

फोटो आणि वर्णन दोन्ही छान!
स्वाती

चाणक्य's picture

27 Mar 2016 - 3:00 pm | चाणक्य

या जागी जाणं आलं आता.

स्रुजा's picture

27 Mar 2016 - 4:25 pm | स्रुजा

क्या बात हे ! किती सुंदर जागा.. अशा अपरिचित जागांवर जायला हवं. कंजुस काकांचे लेख शोधुन वाचायला हवेत.

तुमचे फोटोज पण झकास !

स्रुजा's picture

27 Mar 2016 - 4:25 pm | स्रुजा

क्या बात हे ! किती सुंदर जागा.. अशा अपरिचित जागांवर जायला हवं. कंजुस काकांचे लेख शोधुन वाचायला हवेत.

तुमचे फोटोज पण झकास !

शैलेन्द्र's picture

27 Mar 2016 - 6:57 pm | शैलेन्द्र

मस्त फोटो , मजा आलि बघायला

फोटो आणि छोटेखाणी भटकंती आवडली.

आदूबाळ's picture

28 Mar 2016 - 11:26 am | आदूबाळ

एक नंबर!

सविता००१'s picture

28 Mar 2016 - 12:55 pm | सविता००१

सुंदर भटकंती आणि अफाट मस्त फोटो.
छानच ठिकाण निवडलंय रे..
आवडली भ्रमंती

पियुशा's picture

28 Mar 2016 - 1:17 pm | पियुशा

मस्त गार गार वाटल बघुन :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Mar 2016 - 3:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त भटकंती...धरणात डुंबला नाही वाटते?

किसन शिंदे's picture

29 Mar 2016 - 7:57 pm | किसन शिंदे

चान चान!! ;)

खटपट्या's picture

29 Mar 2016 - 9:43 pm | खटपट्या

अप्रतिम फोटो

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Mar 2016 - 12:59 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त सफर, अप्रतिम फोटो !

रुपी's picture

30 Mar 2016 - 1:29 am | रुपी

सुंदर!

प्रसाद गोडबोले's picture

30 Mar 2016 - 5:18 pm | प्रसाद गोडबोले

खुपच सुंदर फोटो !

ॐ किल्कक्लिकफोटोकाढनाथाय पांडुब्बाय नमः !

ते 'हस्तमध्येघट्टपकडकॅमकलश' राह्यलं ... ;)

निश's picture

30 Mar 2016 - 7:58 pm | निश

मस्त सफर, सुंदर फोटो !