ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही.
जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे.
कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे.
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.
माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे.
उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.
प्रतिक्रिया
17 Mar 2016 - 3:27 pm | DEADPOOL
कहना क्या चाहते हो भई ?
17 Mar 2016 - 3:33 pm | पिलीयन रायडर
तुम्हीच लिहीला होता ना तो RTE वरचा लेख? एक लेख इतका मुद्देसुद.. आणि एक हा असा? एका वाक्याचा दुसर्याला अर्थ लागेना..
17 Mar 2016 - 3:33 pm | तर्राट जोकर
कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती
>> ह्या विधानाला काही आधार आहे का?
17 Mar 2016 - 3:43 pm | चिनार
विधानाला आधार !!!
काहीही हं तजो भाऊ !
मी तर लेखाला काही आधार आहे का हे शोधतोय ! मलाच आधाराची गरज वाटते आहे हा लेख वाचून...
17 Mar 2016 - 3:45 pm | तर्राट जोकर
आधार मिले ना मिले, कार्ड मिलेगा जरुर... वो भी फ्री.
17 Mar 2016 - 3:34 pm | प्रकाश घाटपांडे
मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करुन घेतले पाहिजे या मताशी अनेक सहमत होतील. फक्त कसे? हा वादाचा विषय आहे. या धर्मात कट्टरता गरीबी गुन्हेगारी बेरोजगारी असे घटक तळाशी मोठे आहेत. जे सुसंस्कृत सुजाण मुस्लिम आहेत त्यांना आपण भारताशी एकनिष्ठ आहोत हे पदोपदी सिद्ध करावे लागते.
17 Mar 2016 - 3:44 pm | तर्राट जोकर
हे जे २५ % आरक्षण गरिबांना द्या म्हणते ना सरकार, त्यापेक्षा ह्या १३ टक्क्यांच्या मुलांना इतर मुलांसोबत जबरदस्तीने शिकायला पाठवा. सर्व धर्माचे विद्यार्थी एकमेकांसोबत लहानपणापासून शिकतील तर धार्मिक तेढ राहणार नाही. संघ, एम आय एम, भाजपा, काँग्रेस सारख्यांची दुकाने बंद होतील हे वेगळे.
17 Mar 2016 - 3:54 pm | चिनार
बाप्पा असं केलं तर मुस्लिम समाजाला जबरदस्तीने भगवाकरण केल्याचा आरोप होईन ना ..तुमचा विचार स्तुत्य आहे पण करायचं कसं ? इथं दहशतवाद्याला फाशी द्यायची चोरी अन तुम्ही राजेहो कैच्याकै बोलता...
17 Mar 2016 - 4:04 pm | नाना स्कॉच
मेमन च्या फाशी नंतर गर्दी करणारे मुसलमान आपल्याला अस्वस्थ करतात पण कसाब ला गाडायला एक इंच जमीन देणार नाही म्हणाणारे दिसत नाहीत , का आपल्याला ते दाखवले जात नाहियेत?? काय वाटते???
17 Mar 2016 - 4:37 pm | चिनार
नाना स्कॉच भाऊ,
मी मुस्लिम विरोधी नाही.
सविस्तर उत्तर देण्याची तीव्र इच्छा आहे. पण जाउद्या..नको !
राम राम घ्यावा ..
17 Mar 2016 - 5:32 pm | नाना स्कॉच
अहो मी तुम्हाला वैयक्तिक म्हणालो नाहीये दादा "आपल्याला" म्हणालोय :)
असो ! राग नसावा
17 Mar 2016 - 3:57 pm | माहितगार
अल्पसंख्यांक असोत अथवा गरीब सर्वच मुलांना इतर मुलांसोबत एकत्र शिक्षण दिले गेले पाहीजे, -आपापले धार्मीक शिक्षण सुट्टीच्या दिवशी वेगळे क्लास लावून देता येऊ शकते-. विशेषतः किमान भाषांच्या स्तरावर संबंधित राज्याची भाषा संवादासाठी तीन वर्षात शिकणे तसेच स्थानिक भाषेतील लिपीत लिखीत संवाद साधता येणे गरजेचे असावे. संवाद नसेल तर अविश्वास वाढतात आणि लिपी साधर्म्य विश्वास निर्मितीस पोषक असते म्हणून उर्दू असो का तमिळ देवनागरी लिपीस प्राधान्य द्यावयास हवे असे वाटते.
17 Mar 2016 - 4:15 pm | तर्राट जोकर
दोन्ही धर्माच्या लोकांमधे साहचर्य, सहवास नसल्यामुळे निर्माण होणारी अढी काढण्यासाठी एकत्र शिक्षणपद्धती आवश्यक आहे.
भाषेचा मुद्दा योग्य असला तरी अप्रस्तुत वाटतो. नगर, पुणे, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या एखाद्या मोहल्ल्यात चार घरं मुस्लिम आणि पन्नास घरं हिंदु असतील तरी सर्वांची भाषा मराठीच असते. आता आपआपल्या मातृभाषेप्रमाणे घरात प्रत्येक जण वेगवेगळी भाषा बोलतो, पण समाजात वावरतांना मात्र तिथली लोकल भाषा सर्वांकडून वापरली जाते.
दोन्ही समाजातील विसंवादाचे कारण भाषेचा फरक नाही हे नमूद करावे वाटते.
17 Mar 2016 - 4:47 pm | माहितगार
स्थानिक माती आणि भाषेशी जोडलेले असले की एपिजे अब्दुल कलाम मिळतात ना. त्याच वेळी फकस्त मराठी बोलून काय उपयोग, तुमच्या आमच्या सोबत मराठी संस्थळांवर सहभागाच्या अभावामागचे कारण मग ती आपली इंग्लिश मिडीयमची मुले असोत का उर्दू माध्यमातली लिपी हे कारण नाही का ? किती मराठी साहित्यिकांचे लेखन उर्दूत अनुवादीत करुन उर्दू वर्तमान पत्रातून दिले जाते ? खास करुन त्यांच्या मुल्ला मौलवींनासुद्धा इतर स्थानिक संत साहित्याची माहिती असते का ? साहित्य दिले तर वाचता येते का ? सर्वच मराठी संत मुर्ती पुजक नाहीत हे त्यांना मराठी संतसाहीत्याचा अभ्यास केल्या शिवाय, अथवा मुर्ती पुजकांचीही काही एक बाजू आहे हे खुल्या संवादा शिवाय कसे काय समजू शकेल, अविश्वास आणि वैचारीक दरीस भाषा एकमेव कारण नाही पण अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण असावे किंवा कसे.
भारत माता म्हणजे केवळ देश एवढाही विचार करता येतो, भारत माता की जय म्हणणारा प्रत्येक जण मुर्ती पुजा करत नसतो. भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टी हिंदू करतात म्हणून आम्ही करणार नाही या मानसिकतेतील संकुचितता त्यांना कुणी दाखवून देणार आहे की नाही- हिंदू कराग्रेवसते लक्ष्मी म्हणतात तीन देवांची नावे घेऊन कराग्रेवसते केवळ हाताने मेहनत करण्याचा संदेश देतो हिंदू हाताची प्रार्थना करतात म्हणून हिंदूंशिवाय इतर लोक त्यांचे हात वापरणे थांबवणार आहेत का ? - जशी मेंदीचा मुर्ती पुजेशी संबंध नाही तसा रांगोळीचाही संबंध नाही. नुसता दिवा लावला म्हणजे मुर्ती पुजाच होते असेही नसावे. संस्कृती आणि धर्म यांची गल्लत हिंदूत्व वादी करतात म्हणून इतर धर्मीयांनी केलीच पाहीजे असे नसावे पण अशाच छोट्या छोट्या मुद्यांचे भांडवल वाढवत नेऊन सांस्कृतिक साम्या पेक्षा संस्कृती विलग कशा आहेत हे दाखवण्यावर भर दिला जातो आणि मग परस्पर अविश्वासाचा खेळ रंगवला जातो.
17 Mar 2016 - 5:09 pm | तर्राट जोकर
तुम्ही उद्विग्न झाल्यासारखे वाटत आहात.
17 Mar 2016 - 5:30 pm | चेक आणि मेट
छान प्रतिसाद
मला तुम्ही उद्विग्न झाल्यासारखे वाटत नाही आहात.
20 Mar 2016 - 11:11 pm | अनिरुद्ध.वैद्य
प्रचंड सहमती :)
17 Mar 2016 - 4:14 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे
ओवेसी आणि RSS ला एकच न्याय?
17 Mar 2016 - 6:13 pm | निशांत_खाडे
येउद्या याच्यावर पण एक खास कविता.. कृ.ह.घ्या.
17 Mar 2016 - 8:05 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे
तुम्हाला नेहमीच हलक्यात घेतले जाते.
17 Mar 2016 - 4:16 pm | महासंग्राम
पहिल्या परीच्छेदात अत्यंत शुद्धलेखन आणि नंतरच्या बाकी संपूर्ण लेखात किती त्या चुका
पहिला परीच्छेद कुठून चोप्यपेस्त केला काय
वायीत -संसंद शब्दाच्या शोधात असलेला :)
17 Mar 2016 - 4:22 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
हे ओवेसी बरे आहेत,कायदा-संविधान याचं नाॅलेज तरी आहे यांना.पण ते धाकटे बंधू नकोत रे बाबा!!!
17 Mar 2016 - 4:29 pm | त्रिवेणी
17 Mar 2016 - 4:38 pm | सामान्य वाचक
त्रिवेणीजी आ गई है
17 Mar 2016 - 5:47 pm | त्रिवेणी
अरे काय हे?
बाकी लिहिलेले आलेच नाही.प्रकाशित करताना एरर दाखवत होते.
17 Mar 2016 - 4:52 pm | बोका-ए-आझम
बॅरिस्टर आहेत, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे. त्यांच्या AIMIM या पक्षाला हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या रझाकारांची परंपरा आहे, जे तेव्हा लोकांवरच्या अत्याचारांमध्ये सहभागी होते. मुंबईत AIMIM कडे विधानसभेची भायखळ्याची जागा आहे. काल सर्वपक्षीय एकमताने निलंबित करण्यात आलेले वारिस पठाण हे AIMIM चेच आहेत.
मला असं वाटतं की साहनाजींना असं म्हणायचंय - कट्टरवादी लोक जर मुख्यधारेच्या राजकारणात आले आणि हिंसाचाराऐवजी आपला काही अजेंडा घेऊन लोकांसमोर गेले तर ती चांगली गोष्ट आहे, कारण असं जर आपण होऊ दिलं नाही तर अशा माणसापुढे system शी चार हात करण्याशिवाय पर्याय राहात नाही आणि system त्याच्याशी लढण्यात गुंतते.
नक्कीच वेगळा विचार आहे.
17 Mar 2016 - 4:57 pm | महासंग्राम
मास्तर जवा भेट्सान तवा कोपरापासून दंडवत घालीन तुम्हाले
मूळ धागालेखकापेक्षा जास्त चांगल्या आणि थोडक्यात समजावलेला इषय
17 Mar 2016 - 5:00 pm | सस्नेह
लेखापेक्षा सारांश उत्तम आणि नेमका !! __/\__
17 Mar 2016 - 5:39 pm | तर्राट जोकर
संघ आणि ओवेसी यांच्या आयडॉलॉजी बघितल्या तर वाद कुठे आहे ते ध्यानात येईल. संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत, दिला ना त्यांना पाकिस्तान मग इथं का राहून घाण करतात. बरं राहयचं असलं तर आमची हरकत नाही पण दुय्यम नागरिक, आश्रित म्हणून राहा. आम्ही म्हणू ते करा. आम्ही म्हणू ते करणार नाही तर तुमचे देशावर प्रेम नाही.
ओवेसी आधी भारतीय मुस्लिम फार पेचात पडले होते. त्यांना कळत नव्हतं काय कराव. कारण इथले हिंदू असे बघतात म्हणून पाकिस्तान प्यारा म्हणावा तर ते पाकडे साले मुहाजिर का काय म्हणून हिणवतात. भंजाळलं होतं मुस्लिम पब्लिक, बाकी यांचे सर्व नेते या ना त्या पक्षाच्या दावणीला बांधलेले. मतपेट्यांपेक्षा जास्त किंमत नाही. त्यासाठी मुस्लिमांना सतत भीतीच्या सावटाखाली ठेवणे, त्यांचा विकास होऊ न देणे ही षडयंत्र काँग्रेसने खेळली, देशांतर्गत मुस्लिमांमधून देशविरोधी कारवाया करणारे सहज मिळून जातात त्याचे कारण हेच. ते खुश नाही त्यांना जसे वागवले जाते ते बघून. मग लगेच मुल्ला सांगतो तसे नाचतात. हे चक्र चालूच राहतं.
मुस्लिम हे देशाचे हिंदूंइतकेच स्वतंत्र, जबाबदार नागरिक व तेवढेच अधिकारी आहेत हे बहुतेक पहिल्यांदा ओवेसीनेच राज्यघटनेचा आधार घेउन पुढे येऊन स्पष्ट सांगितले असावे. हा देश हिंदूंसारखा आपलाही आहे हे त्याने मुस्लिमांच्या मनात बिंबवणे सुरु केले. आपण का मागे राहिलो ह्याची मुस्लिमांसमोर त्याने कारणे मांडायला सुरुवात केली. त्याला उगाच पाठिंबा मिळत नाही आहे. त्याला पाठिंबा मिळतोय यात मुस्लिमांचा दोष नाही तर काँग्रेस चा आहे.
ह्याचा लहान भाऊ येडा आहे. पण दोघांकडे मौलवी स्टाइलच्या ओरॅटरी स्किल्स जबरदस्त आहेत. असदची अभ्यासू वृत्ती आणि टु द प्वाइंट राहण्याचा स्वभाव बघता, मुस्लिम त्याच्या झेंड्याखाली एकवटतील त्यात नवल नाही.
ओवेसीकडे दुर्लक्ष करणे, त्यला गद्दार ठरवणे घातक ठरेल. त्याच्या माध्यमातून मुस्लिमांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. फालतू जिंगोइ़जम भडकवून दोन धर्मातली तेढ वाढते, बाकी काय होतं?
- आमची धाव हिथवरच. ह्याबद्दल दिग्गज लोक जास्त अभ्यासू माहीती सांगतील. बारमधे बसल्यावर जेवढं कानावर येतं तेवढं इथं लिहिलंय.
17 Mar 2016 - 6:03 pm | sagarpdy
बाकी ओके
विदा ?
17 Mar 2016 - 7:08 pm | विकास
या बाबतीत विदा मागितला की अलविदाच मिळतो... :( ;)
17 Mar 2016 - 7:36 pm | तर्राट जोकर
बडी जालिम है बेशहादत कत्ल करनेकी अदा
सुर्याला सुर्य न म्हणणाराला काय द्यावा विदा?
17 Mar 2016 - 7:44 pm | विकास
संघाला सुर्य म्हणत आहात का? ;)
बाकी असली शायरी ही बदनामी सिद्ध करताना चालत नाही. सिद्ध करा नाही तर संघाची बदनामी करत आहात असे म्हणा..
17 Mar 2016 - 8:34 pm | तर्राट जोकर
बदनामी? हा हा हा. सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. शब्दांचे खेळ करण्यात संघ पटाईत आहे. प्रत्येक गोष्टीपुढे राष्ट्र जोडून दिले की झाले. सध्या मुद्दा ओवेसीचा आहे. संघाबद्दल नंतर कधीतरी.
17 Mar 2016 - 8:39 pm | विकास
जो पर्यंत तुमच्या, "संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत, दिला ना त्यांना पाकिस्तान...." या वाक्याला संदर्भ देणारे तुम्ही काही पुरावे दाखवू शकत नाही तो पर्यंत तुम्ही बदनामीच करत आहात असे मी म्हणेन. आणि या पुढे सतत तसे लिहून आठवणही करून देईन. :)
17 Mar 2016 - 8:55 pm | तर्राट जोकर
असे बोलणारे अनेक संघी मला भेटलेत, अशा अर्थाची अनेक संभाषणे-चर्चा ऐकल्या आहेत. स्पष्ट शब्द हेच नसले तरी आशय आणि आविर्भाव हाच असतो. तुम्ही अधिकृतच पाहिजे म्हणून अडून बसाल तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची मते बनतात पण तुम्ही बोट ठेवून पॉईंट आउट करु शकत नाही. संघांच्या अधिकृत वेबसाईटवर तर शब्दांचे खेळ आहेत.
बाकी गोळवलकरांची ही काही विधाने बोलकी आहेत. http://www.countercurrents.org/comm-guha281106.htm
तुम्ही निश्चितच हे मान्य करणार नाही. तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.
17 Mar 2016 - 9:12 pm | विकास
जेंव्हा बदनामी केली जाते तेंव्हा त्याचे पुरावे दिलेले बरे.... संघाने नक्की कुठे "संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत,..." असे म्हणले आहे? कोण कुठले संघी काय बोलतात याला महत्व नाही तर संघाची अधिकृत भुमिका काय आहे याला महत्व आहे. म्हणून तुम्ही बदनामी करत आहात असे माझे म्हणणे आहे.
संघांच्या अधिकृत वेबसाईटवर तर शब्दांचे खेळ आहेत.
खेळ आहेत का प्रामाणिक विचार आहेत हे कसे ठरवले? कदाचीत रामचंद्र गुहांना माहीत असावे...
17 Mar 2016 - 9:20 pm | तर्राट जोकर
गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय मत आहे? का तीही रामचंद्र गुहांनी ठरवली आहे?
17 Mar 2016 - 10:10 pm | बोका-ए-आझम
त्यांची पुस्तकं अप्रतिम आहेत. भारतीय इतिहास संशोधनात ज्याला Subaltern Studies म्हणतात ती विद्याशाखा सुरु करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. पण त्यांच्या डाव्या विचारांमुळे संघाबद्दलची त्यांची मतं मी ग्राह्य धरु शकत नाही. उद्या कम्युनिस्टांबद्दल तुमचं काय मत आहे हे मोहन भागवतांना विचारण्यात जसा काही अर्थ नाही किंवा भारतातल्या गरिबीबद्दल मुकेश अंबानींना किंवा अल्कोहोलिक अॅनाॅनिमसबद्दल विजय मल्ल्यांना विचारण्यात जसा अर्थ नाही तसंच संघाबद्दल रामचंद्र गुहांना विचारण्यात काहीही अर्थ नाही. ते पुरेसे नि:पक्षपाती नाहीत.
17 Mar 2016 - 10:11 pm | बोका-ए-आझम
असे वाचावे.
17 Mar 2016 - 10:11 pm | साहना
तुम्ही गोळवल करांच्या पुस्तकाच्या बाबतीत म्हणत असाल तर ते पुस्तक त्यांनी विद्यार्थी असताना लिहिले असून संघ कार्यात सहभागी होण्या आधीच आपले विचार बदलले म्हणून मागे घेतले होते. आस ते पुस्तक मिळणे सुद्धा मुश्किल आहे. मी अलाहबाद मधील एक संशोधका कडून पुस्तकाची xerox मिळवली होती.
गुहा type लोक हे पुस्तक घेवून "हि संघाची अधिकृत भूमिका" असा दुष्प्रचार कधीपासून चालवत आहेत. सत्यापासून हे गृहीतक फार दूर असून आपली पोळी भजते म्हणून काहीही ह्या न्यायाने हे लोक अश्या खोट्या गोष्टीना पुढे पुढे नाचवत असतात.
17 Mar 2016 - 11:44 pm | नाना स्कॉच
गुहा ह्यांच्याबद्दल तुम्ही म्हणता तसे असेलही, बोका ह्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांची मते ग्राह्य नसतीलही, गोळवलकरांचे पुस्तक (बंच ऑफ़ थॉट्स) हे त्यांनी विद्यार्थी दशेत लिहिले असेलही,
पण, ते पुस्तक दुर्मिळ अजिबात नाही, तर हे पुस्तक संघाचे आधिकारिक संस्थळ म्हणजेच आरएसएस डॉट ऑर्ग इथे ई-बुक स्वरुपात विनाशुल्क डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे, त्याचा इंग्रजी मधे केलेला अनुवाद ह्या स्वरुपात पीडीएफ फॉरमॅट मधे हे पुस्तक डाउनलोड केले जाऊ शकते, (इच्छुकांनी वरती उल्लेखलेल्या संस्थळावर "ई बुक्स" विभागात शोध घ्यावा ही विनंती)
काही प्रश्न उद्भवत आहेत ते खालील प्रमाणे
1. हे पुस्तक जर संघाच्या आधिकारिक संस्थळावर उपलब्ध आहे, तर ते संघाच्या आधिकारिक विचारांचा एक मोठा भाग का मानला जाऊ नये?
2. सदरहु पुस्तक संघाच्या आधिकारिक संस्थळावर उपलब्ध असण्यामागे तर गुहांचा टाइप लोकांचा हात नसेल न? का कसे?
3. तुमच्या म्हणण्याप्रमाणे , गुरुजींनी ते पुस्तक संघ कार्यात पडायच्या अगोदर विद्यार्थीदशेत लिहिले अन संघ कार्यात उडी घेताना ते त्यागले होते तर ते पुस्तक संघाच्या आधिकारिक संस्थळावर कसे काय उपलब्ध झाले? कोणी कुठले विचार त्यागले अन कोणी कुठले विचार आत्मसात केले असे समजायचे मग???
नोट :- माझे संघाशी काहीच वाकडे नाही, किंबहुना कुठल्याच विचाराशी माझे वाकडे नाही , फ़क्त एक पथ्य मी पाळतो ते म्हणजे उत्तम ते अन नेमके तितकेच घेणे, मला वाचन आवडते अन संघ साहित्य मला त्याज्य नाही, योगायोगाने पंधरवडा अगोदरच बंच ऑफ़ थॉट्स वाचायला घेतले आहे, त्यातुन जे चांगले मिळेल ते मी नमूद करेलच अन केलेच पाहिजे पण जे मला पटणार नाही किंवा जे चुक वाटते त्यावर मी टिका निश्चितच करेल , कारण आवडत्या विचारांचे कौतिक करणे जर माझे कर्तव्य असेल तर नावडत्याचा विरोध अन टिका करणे हा माझा हक्क आहेच. धन्यवाद
18 Mar 2016 - 7:40 am | साहना
विचारधन नाही तर "We The Nationhood" ह्या पुस्तकाबद्दल मी बोलत आहे.
18 Mar 2016 - 12:02 pm | नाना स्कॉच
तजो ह्यांनी दिलेल्या लिंक मधे (काउंटर करंट्स) तुम्ही उल्लेखलेल्या "we the nationhood" वर उहापोह कुठेच दिसुन आला नाही, त्यात रेपेटिटिवली "बंच ऑफ़ थॉट्स" चेच उल्लेख अन त्यातल्या विचारांची चर्चा आहे. मग मधेच "we the nationhood" चा विषय कुठून कसा अन का आला?? आपण लिंक वाचली नव्हती असे गृहीत धरावे काय?? इतकेच नाही तर आपण आपल्या मुद्द्यावरुन (बंच ऑफ़ थॉट्सच्या जागी वी द नेशनहुड) "गुहांसारखे" वगैरे एक ठोकळेबद्ध सरसकटीकरण सुद्धा केलेत , हे कसे काय???
18 Mar 2016 - 12:47 am | विकास
तुम्ही गोळवल करांच्या पुस्तकाच्या बाबतीत म्हणत असाल तर ते पुस्तक त्यांनी विद्यार्थी असताना लिहिले असून संघ कार्यात सहभागी होण्या आधीच आपले विचार बदलले म्हणून मागे घेतले होते.
कदाचीत तुम्हाला, "We - Our Nationhood Defined" हे पुस्तक म्हणायचे असेल. ते त्यांनी विद्यार्थीदशेत नाही पण संघात येण्याआधी बाबाराव सावरकरांच्या पुस्तकाचा अनुवाद म्हणून केले होते. संघाने ते पुस्तक संघसाहीत्यात धरलेले नाही. तसेच त्याची शेवटची प्रत ही मला वाटते १९४७ साली निघाली. त्यानंतर म्हणजे गुरूजींच्या हयातीत देखील ते परत छापले नव्हते.
अर्थात पुढे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गुहांचे माहीत नाही पण अनेक डाव्यांनी (उदा राम पुनियानी) अपप्रचारासाठी वापरले आहे. पण भारतीय डाव्यांचा तो (दुर्)गुणच आहे! असो.
17 Mar 2016 - 11:18 pm | sagarpdy
माझा गोळवलकर गुरुजींबद्दल काहीही अभ्यास नाही. गुहांबद्दल देखील नाही. सबब दिलेल्या विदा आणि खालील प्रतिसाद वाचून वरील आपले विधान मान्य करणे कठीण वाटते. परंतु आपण म्हणल्याप्रमाणे अनेक मुस्लिमद्वेष्टे संघी दिसतात हे सत्य. पण त्याचा अर्थ संघाची हि अधिकृत भूमिका आहे असा होत नाही.
याखेरीज माणसे आणि संस्था यांच्या भूमिका कालानुरूप बदलतात असं माझं मत / अनुभव आहे. उदा. सावरकरांची जन्मठेपेच्या आधी आणि नंतरची भूमिका. त्यामुळे एखादवेळ संघाची स्वातंत्र्या नजीकच्या कालची भूमिका आपण म्हणता तशी होती असे मानले तरी मागील १०-२० वर्षात तशीच आहे का ?
माझ्या मते "संघटन" यापलीकडे संघाची काहीच स्पष्ट भूमिका नाही.
18 Mar 2016 - 2:20 am | तर्राट जोकर
मी कुठे हे म्हटलं की संघाची अमूक एक अधिकृत भुमिका अशी अशी आहे ते. मी बघितले ते संघी यांच्यात एक टिपिकल साम्य आहे. त्यांचे विचार छापखान्यातल्या खिळ्यांसारखे फिक्स आहेत. महाराष्ट्राच्या एका टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंत अनेक संघी संपर्कात आले. अशा संघींच्या समावेशाने संघ बनतो की नाही? जे असे मुस्लिमद्वेष्टे संघी आहेत त्यांचा संघांशी संबंध नाही असे म्हणायला संघ नेहमीच तयार असतो. संघाच्या कुटुंबात अनेक हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्यातल्या अनेक कट्टर मुस्लिमद्वेषी संघटनांच्या कृत्यांचा संघाने विरोध केलेला आढळला नाही. सबब मूक राहणे ही संघाची अधिकृत भूमिका असू शकते. त्याकडे बोट दाखवून विकासजींसारखे सदस्य म्हणू शकतात की संघाने तर काहीच म्हटले नाही. स्वयंसेवकांशिवाय संघ अशी काही कल्पना असेल किम्वा राष्ट्रीय आपत्तीत मदत कार्य करणारे तेच खरे संघी, संचलन कवायत करणारे तेच संघी, तीच संघाची अधिकृत भुमिका असे असेल तर असो बापडे. श्रीगुरुजींनी म्हटल्याप्रमाणे संघ वृक्ष आहे, अनेक संघटना त्याच्या फांद्या आहेत. गोड फळे आली ती संघाची असतात, कडु फळांचा वृक्षाशी संबंध नसतो. ती बाहेरच्या पक्षांनी कुठूनतरी आणून टाकलेली असतात.
18 Mar 2016 - 2:34 am | विकास
आपण असे म्हणले आहे: "संघाचं म्हणणं आहे का ब्वा हा देश हिंदुंचा आहे, मुसलमान इथं उपरे आहेत,..." अशी बदनामी दिसण्यासारखे संघाची कुठली भुमिका दिसली? तुम्हाला गुरूजींचे बंच ऑफ थॉट्स मधले म्हणणे खाली दाखवले आहे. त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे का अजूनही रामचंद्र गुहांचाच रामबाण वाटतो ते सांगितले तर बरे होईल. अर्थात जर बदनामीतच इंटरेस्ट असला तर इतर काही मान्य होणार नाही हे देखील लक्षात येईलच. असो.
18 Mar 2016 - 2:54 am | तर्राट जोकर
प्रस्तुत प्रतिसाद माझ्या संघी लोकांच्या अनुभव व निरिक्षणांवर आधारित आहे हे आपणास मान्य करायचे नाही ह्यात माझा दोष नाही. तुम्हाला एका वाक्यात उत्तर अपेक्षित आहे. मला गेगाबायटीचा कंटाळा आलाय. तेव्हा असो.
18 Mar 2016 - 3:15 am | विकास
गोळवलकरांच्या भूमिकेबद्दल काय मत आहे? का तीही रामचंद्र गुहांनी ठरवली आहे?
असा प्रश्न विचारायचा आणि उत्तर मिळाले की दुर्लक्ष करायचे! चालायचच! कारण विद्वत्ता फक्त गुहांकडेच आहे - खोट कस बोलायच त्याची आणि पब्लीकला गंडवायची... अर्थात गंडवून घेयचेच असले तर ती तुमची आवड झाली!
प्रस्तुत प्रतिसाद माझ्या संघी लोकांच्या अनुभव व निरिक्षणांवर आधारित आहे हे आपणास मान्य करायचे नाही
संघी लोक म्हणजे कोण? त्यातले कोण नक्की संघाचे पदाधिकारी आहेत? नसले तर जे कोण गोमेसोमे असतील त्यांनी नक्की त्यांच्या "(दुष)कर्तुत्वाने" नक्की काय गुन्हे केले आहेत? हे सांगू शकाल का? कुठलाही पुरावा देयचा नाही आणि विश्वास ठेवायला सांगायचे म्हणजे अगदी ट्रंप सारखे झाले... तो नुसता सारखं पब्लीकला "believe me" इतकेच म्हणतो आणि पब्लीकला तितके चालते. पण आम्ही तसे नाही. तुम्ही एका संघटनेची बदनामीच करत आहात आणि ती देखील सार्वजनिक संस्थळावर आणि ती निषेधार्ह आहे.
18 Mar 2016 - 3:17 am | अर्धवटराव
यात 'हेतुपुरस्सर' हा शब्द टाकायचा राहिला का? :ड
18 Mar 2016 - 3:42 am | तर्राट जोकर
गुहा काय खोटं बोललेत? जरा आम्हाला पण कळू द्या कोण कोणाला गंडवतंय ते?
18 Mar 2016 - 4:11 am | विकास
अहो बदनामी करणारे जोकर ;) आधी गोळवलकरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्याबद्दल आपले मत सांगा. नुसते प्रश्न विचारू नका. मान्य करा काही मिळत नाही म्हणून.
18 Mar 2016 - 4:27 am | तर्राट जोकर
कसली घाई आहे तुम्हाला? दबाव आणण्याचा तर अजिबात प्रयत्न करु नका. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वेळेत द्यायला मी इथे येत नाही. इथे प्रतिसाद आल्या आल्या उत्तर नाही दिले तर कुणाचा तडफडून जीव जाणार नाही. तसेच गोळवलकरांच्या भूमिकेच्या प्रश्नावर तुम्हीच उलट प्रश्न विचारला. गुहांची लिंक दिली होती, त्यातल्या भूमिकेवर प्रश्न होता. तो चुकवून तुम्ही तुमच्या सोयिस्कर तुकडा आणून पिवळे करुन दाखवुन हेच का ते असे विचारले. त्यामुळे माझा मूळ प्रश्न तर बाकीच आहे. त्याचे आधी बघा कसे जमते ते?
बाकी, निसर्गाची हाक दबावाच्या घाईस कारण असेल तर सावकाश जाऊन या. मला वेळ मिळाला की स्वतंत्र धागा टंकेन. भाजपबद्दल टंकायचाच आहे, संघाशिवाय कसा होइल? घाबरु नका, सगळं नीट होइल. देवाकडे प्रार्थना करा.
18 Mar 2016 - 10:07 am | बोका-ए-आझम
ही तुमची नेहमीची style झालीय आता. सनसनाटी, वाट्टेल ती विधानं करायची; पुरावे मागितले की मागे सरायचं; विरोधासाठी विरोध करायचा आणि सगळी चर्चा गढूळ करुन टाकायची. मराठी आणि हिंदी सीरियल्समधल्या ज्या नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा असतात त्यांचं वागणं आणि तुमचं वागणं याच्यात मला तरी काहीच फरक दिसत नाहीये. खुसपटं काढणं आणि अंगाशी आलं की ' मला असं म्हणायचंच नव्हतं, मला वेळ नाही, तुम्हाला उत्तरं देण्याची मला काही गरज भासत नाही वगैरे थुकरट स्पष्टीकरणं द्यायची. आता यावर तुमचं उत्तर काय असणार आहे तेही सांगतो - मी आमंत्रण दिलं नव्हतं तुम्हाला वाद घालायला वगैरे वगैरे. एवढं मुद्दे सोडून वाद घालण्याचं तुमचं कौशल्य बघून माझी तर खात्री पटलेलीच आहे की....
18 Mar 2016 - 12:15 pm | तर्राट जोकर
असु देत. कधी कधी एका विधानामागे एक ग्रंथभर स्पष्टीकरण आवश्यक असतं. तुमची इच्छा असेल पण माझी ताकत नाही ग्रंथभर लिहित बसायची. हिंदु म्हणजे काय याची व्याख्या लोक एका वाक्यात करतात पण ती तशी नाही हे तुम्हाला माहित आहे. तसेच संघाचे वागने मी एका वाक्यात बसवले, त्याला पुरावे हवे असतील तर जरा धीर धरावा लागेल. बाकी इथे काहीही सांगितलं तरी उडवून लावण्याचे, मान्यच न करण्याचं स्वातंत्र्य उपभोगायचे, वरुन इतरांना दोष द्यायचे हेही कौशल्य परिचयाचे झाले आहे. बाबरी मस्जिद ही मस्जिदच नव्हती असे ठोकून देणारे सदस्यही इथे बघितलेत. त्यामुळे असो. तुमचे विचार तुमच्याजवळ, माझे माझ्याजवळ.
18 Mar 2016 - 1:02 pm | पैसा
भाषा अजिबात आवडली नाही. लोक राजकीय चर्चांना का कंटाळतात याचे उत्कृष्ट उदाहरण इथेच दिल्याबद्दल धन्यवाद!
19 Mar 2016 - 4:17 pm | जयंत कुलकर्णी
पैसा,
वाईट ! अत्यंत वाईट !
18 Mar 2016 - 1:46 pm | तर्राट जोकर
प्रतिसाद उड्वावा.
संपादकमहोदय, http://www.misalpav.com/comment/818633#comment-818633 प्रतिसाद उड्वावा.
20 Mar 2016 - 2:31 pm | DEADPOOL
इथे प्रतिसाद आल्या आल्या उत्तर नाही दिले तर
कुणाचा तडफडून जीव जाणार नाही.>>>>>>>.
हे टायपिंग करताना तुमची लईच तड्फड होत होती वाटत!
20 Mar 2016 - 2:43 pm | तर्राट जोकर
इथली तडफड दिसली नाही वाटतं तुम्हाला
अहो बदनामी करणारे जोकर ;) आधी गोळवलकरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्याबद्दल आपले मत सांगा. नुसते प्रश्न विचारू नका. मान्य करा काही मिळत नाही म्हणून.
23 Mar 2016 - 4:36 pm | DEADPOOL
इथली तडफड दिसली नाही
वाटतं तुम्हाला
अहो बदनामी करणारे जोकर ;) आधी
गोळवलकरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले त्याबद्दल
आपले मत सांगा. नुसते प्रश्न विचारू नका. मान्य करा
काही मिळत नाही म्हणून.
मग बरोबर आहे ना,समोरचा उत्तर मागतोय आणि आपण नुसते प्रश्न विचारल्यावर तड्फड होईलच!
23 Mar 2016 - 4:39 pm | तर्राट जोकर
सोयिस्कर तेवढे बघायचे आणि समजायचे. ह्याला तोडगा नाही.
18 Mar 2016 - 10:03 am | sagarpdy
तथाकथित विदा पोचला. आपण जी भूमिका मांडताय ते उघड सत्य आहे असे तरी नक्की वाटत नाही.
सबब
हे वाक्य मागे घ्यावं हि अपेक्षा आहे.
यापलीकडे, आपला दृष्टीकोन बाळगण्यास आपण स्वतंत्र आहात, धाग्यावर अती विषयांतर नको.
18 Mar 2016 - 12:39 pm | सुबोध खरे
मी बघितले ते संघी यांच्यात एक टिपिकल साम्य आहे. त्यांचे विचार छापखान्यातल्या खिळ्यांसारखे फिक्स आहेत. महाराष्ट्राच्या एका टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंत अनेक संघी संपर्कात आले. अशा संघींच्या समावेशाने संघ बनतो की नाही?
काय विधान आहे?
जोकर बुवा
मग मी चांद्या पासून बांद्यापर्यंत( इतकेच कशाला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत) बरेच मुसलमान पहिले त्यात बरेच पाकिस्तानचे समर्थक होते आणी त्यांच्या विचारसरणीचा इतर मुसलमान निषेध करत नाहीत म्हणजे आपल्याच विचारसरणी प्रमाणे "सगळेच" मुसलमान पाकिस्तानचे समर्थक आहेत असेच म्हणावे लागेल.
आपल्या मुद्द्याचे समर्थन करण्यासाठी आपण कोणत्या थराला जाता ते स्वच्छ दिसते आहे. संघ (किंवा मोदी) द्वेष इतका पराकोटीचा?
याला आपला परत मेगाबायती प्रतिसाद येईलच परंतु मला त्यात काडीचा रस नाही.
असो.
18 Mar 2016 - 12:52 am | विकास
खालील भुमिकेबद्दल बोलत आहात का? नक्की काय वाटते आपल्याला?
"... We are not so mean as to say that with a mere change in the method of worship, an individual ceases to be a son of the soil. We have no objection to God being called by any name whatever. We, in the Sangh, are Hindus to the core. That is why we have respect for all faiths and religious beliefs. He cannot be a Hindu at all who is intolerant of other faith..." (संदर्भः Bunch of Thoughts)
18 Mar 2016 - 8:52 pm | आजानुकर्ण
माझ्याकडे ज्येष्ठ संघ स्वयंसेवक दामूआण्णा दाते आणि वि.रा. करंदीकर यांची 'स्मरणशिल्पे' अाणि 'तीन सरसंघचालक' ही पुस्तके आहेत. त्यात संघाची किंवा सरसंघचालकांची विचारसरणी दाखवणारी खालील वाक्ये आहेत.
१. गोळवलकर गुरुजी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्यातील संवादः "मुसलमान हे अराष्ट्रीय आहेत व अशा अराष्ट्रीय मुसलमानांना जे आपल्यात सामावून घेतात, ते राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे एक आदेश काढा व अशा सर्वांनाच बाहेर घालवा"
२. ज्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका असेल त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करा. ते जर या राष्ट्राचे नाहीत, तर या देशात त्यांना मत नाही, हे प्रस्थापित करा.
३. मुसलमान मनोवृत्ती नेहमी सत्कार्यात विघ्न आणणारी असते, हे आपण जाणताच आहात.
असो हे नोट्स काढून ठेवलेले मुद्दे असल्याने चटकन आठवले. पुस्तके मुळातूनच वाचली तर आणखी विदा निश्चितच मिळेल.
18 Mar 2016 - 8:55 pm | आजानुकर्ण
वरील मुद्दा १ मधील संवादातील वाक्य हे गोळवकर यांचे आहे. शास्त्री यांचे नाही. गैरसमज नसावा!
18 Mar 2016 - 10:13 pm | गामा पैलवान
आजानुकर्ण,
मुस्लिम अराष्ट्रीय आहेत या विधानात काय चुकीचं आहे? इस्लाम मध्ये राष्ट्र ही संकल्पनाच नाही. मिल्लत नावाची एक संकल्पना आहे, पण तिचा राष्ट्राशी संबंध नाही. पाकिस्तानाकडे पाहून हे कळतं की. वेगळं उदाहरण कशाला पाहिजे?
शिवाय जगभरच्या मुस्लिमांना सर्वात जास्त धोका आहे तो स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेणाऱ्या दहशतवाद्यांचा. हिंदूंचा नाही.
आ.न.,
-गा.पै.
18 Mar 2016 - 11:13 pm | आजानुकर्ण
'संघ मुस्लिम विरोधात आहे असं कुठं म्हटलंय' पासून आता 'मुस्लीम अराष्ट्रीय आहेत या विधानात चुकीचं काय आहे' इथपर्यंत स्वयंसेवकांची गाडी आली याचं समाधान वाटतंय. हळूहळू सगळंच मान्य कराल.
मुसलमानांचं जाऊद्या. आधी हिंदूंकडं पाहू. हिंदूंमध्ये आहे का राष्ट्र ही संकल्पना? असल्यास ती कुठं धर्मग्रंथात, भगवद्गीतेत, पुराणात, उपनिषदात, वेदात लिहिली आहे ते सांगा. की हिंदुत्त्व म्हणजेच राष्ट्रीयत्व? म्हणजे आपोआप बाकीचे सगळे अराष्ट्रीय ठरतात?
मुस्लीमांना कसला धोका आहे तो असेल पण त्यापेक्षा हिंदूंना कसला धोका आहे हे तुमचे प्रतिसाद पाहून स्पष्ट कळतंय.
19 Mar 2016 - 8:18 am | बोका-ए-आझम
की गा.पै.यांच्या ' अराष्ट्रीय ' या शब्दाचा अर्थ आपण नकारात्मक दृष्टीने घेतलेला आहे. इस्लाममध्ये धर्माला राष्ट्रापेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं ही वस्तुस्थिती आहे. हिंदूंचा धर्मग्रंथ नसल्यामुळे आणि हे सगळे ग्रंथ ज्या काळात लिहिले गेले तेव्हा राष्ट्र ही संकल्पनाच नव्हती. पण इस्लामचे पाठीराखे अजूनही जे कुराणात आहे त्याच्यापुढे काहीही असूच शकत नाही असं मानतात. जे मानत नाहीत त्यांची संख्या नगण्य आहे. हिंदूंनी राष्ट्र ही संकल्पना काळाप्रमाणे स्वीकारली, तशी ती मुस्लिमांनी स्वीकारली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि पुस्तकात कोणीही काहीही म्हणू दे - प्रत्यक्ष वागणूक हा त्याहून मोठा पुरावा आहे. भारतात पाकिस्तानपेक्षा किंवा सौदी अरेबियापेक्षा जास्त मुस्लिम आहेत. त्यांना राज्यघटनेने समान मानलेलं आहे आणि संघाने राज्यघटनेपेक्षा आपलं वाङ्मय मोठं आहे असं म्हटलेलं नाही. इस्लामिक देशांत अशी परिस्थिती आहे का? प्रत्येक देश आपला धर्म जाहीर करतो तिथे. Islamic Republic of Pakistan असं पाकिस्तानचं अधिकृत नाव आहे. धर्म हा republic च्या आधी येतो. याहून अराष्ट्रीयत्वाचा मोठा पुरावा काय असू शकतो?
21 Mar 2016 - 7:26 pm | आजानुकर्ण
'अराष्ट्रीय' या शब्दाचा सकारात्मक अर्थ काय घ्यायचा?
वस्तुस्थिती अशीही आहे की धर्माला राष्ट्रापेक्षा तथाकथित प्राधान्य देऊनही वेगवेगळे अनेक मुस्लिम देश जगात आहेत. धर्माला राष्ट्रापेक्षा जास्त प्राधान्य देऊनही पाकिस्तान-बांगलादेश वेगवेगळे होतात आणि भारतासारख्या देशाला त्यात हस्तक्षेप करावा लागतो. धर्माला राष्ट्रापेक्षा जास्त प्राधान्य देऊनही इराण-इराक-कुवेत एकमेकांच्या उरावर बसतात आणि या सर्व गोंधळात सौदी अरेबियाला अमेरिकेची मदत घ्यावीशी वाटते. मग वस्तुस्थिती वेगळी असू शकते याचा किमान विचार सूज्ञ सदस्यांनी करायला काय हरकत आहे?
मुस्लिम धर्मग्रंथ ज्या काळात लिहिला गेला तेव्हा राष्ट्र ही संकल्पना नव्हती.
वर वेगवेगळ्या देशांतील मुस्लिम एकमेकांशी कसे वागतात याची किंचित माहिती दिली आहे. जर राष्ट्र ही संकल्पना स्वीकारली नसती तर जगात एकमेव मुस्लिम राष्ट्र हवे होते.
तेच मी ही म्हणतोय.
पाकिस्तानात धर्म रिपब्लिकच्या आधी येऊनही बलुचिस्तानाला स्वातंत्र्याची चळवळ करावी वाटते. बांगलादेशानेही काडीमोड घेतलाच आहे हा काही वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.
आता समारोपाचे भाषणः
मुळात या संघाबाबतच्या उपचर्चेला सुरुवात झाल्यावर अपेक्षित मार्गानेच चर्चा झाली आहे. 'संघ मुसलमान विरोधी आहे' हा तर्राट जोकर यांचा दावा खोडून काढण्यासाठी संघसमर्थकांनी आधी विदा मागितला. तो विदा (सरसंघचालकांची खाजगीतील वक्तव्ये व पुस्तकातील लेख) दिल्यावर - बरं तो विदा कुणी स्वयंघोषित श्रीगुरुजींचा नसून संघाच्या गुरुजींचाच आहे - तर तो विदा दिल्यावर मुसलमान देशविरोधी आहेत किंवा संघाचे विचार आता बदलले आहेत असा गोंधळ घालायला सुरुवात झाली. संघाचा हा पवित्रा नेहमीचाच आहे. सतत बुद्धीभेद करुन स्पष्ट भूमिका न घेता केवळ वैचारिक गोंधळ उडवून देणे आणि समाजात फूट पाडणे या कारणांसाठी तरी डोळस विचाराच्या नागरिकांनी संघापासून सावध राहिले पाहिजे.
मला कोणत्याच धर्माविषयी विशेष ममत्व नाही. असलीच तर हिंदू धर्माविषयी थोडी आपुलकी आहे. मात्र आमचा हिंदू धर्म हा 'जय श्रीराम'वाल्यांचा नाही
एवढे बोलून मी खाली बसतो. भारतमाता की जय!
21 Mar 2016 - 9:01 pm | sagarpdy
आपले संघाबद्दलचे मत नकारात्मक असेल तर त्याबद्दल पूर्ण आदर आहे, पण विदा मागणे आणि समर्थक असणे याचा काडीमात्रही संबंध नाही. काही चर्चेत लिहिलेली संदिग्ध माहिती अथवा मते यांस आधार मागणे एवढीच इच्छा त्यामागे असू शकते. आपण दिलेल्या विदा चा पूर्ण आदर आहे, वाचण्यात येईल.
आजच्या काळात हि मते कितपत जशीच्या तशी स्वयंसेवक वापरतात यावर आपण कोणत्याही प्रकारचा विदा दिलेला नाही, तो द्यावा अशी अपेक्षा नाही. एवढेच सांगतो कि काँग्रेस, MIM , हिंदू महासभा इ. संस्थांचे देखील विचार/तत्त्वे काळानुसार बदलत आलेले आहेत (मध्यंतरी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनी काळा दिवस कि काहीसा पाळला होता).
याखेरीज जसे लेखात मांडले आहे कि MIM हा मुस्लिमांसाठी लोकशाही/अधिक शांतीपूर्ण माध्यम देतो, त्याच तर्काने संघ हिंदूंसाठी अधिक विधायक माध्यम देतो हे मान्य आहे का ?
अवांतर : तुम्ही दिलेल्या मुस्लिम राष्ट्रातील मारामाऱ्या आणि असंतोषाबद्दल पुढील चर्चा दार-उल-हरब, दार-उल-इस्लाम, इस्लामोफोबिया ई. कडे जाण्याची शक्यता वर्तवतो (संदर्भ : शेषराव मोरे, राजघराण), तोच विषय उगाळण्याची इच्छा नाही. (पुराण कालच्या पुस्तकांतील माहितीवर भांडणे निरर्थक आणि सोपे दोन्ही एकाच वेळी आहे)
अधिक माहिती मिळेपर्यंत खाली बसतो. जय हिंद!
21 Mar 2016 - 10:35 pm | आजानुकर्ण
मग हे विचार बदलले आहेत का? याबाबत माहिती कुठे मिळेल? अजूनही 'आपला नम्र गामा पैलवान' सारखे सदस्य 'मुसलमानांना हाकला' म्हणणारे गोळवलकर हे द्रष्टे होते असे म्हणतात तेव्हा त्यांना नक्की कुठले विचार अभिप्रेत आहेत?
हे मान्य नाही. एमआयएम हा पक्ष लोकशाही प्रक्रियेत भाग घेणारा आहे. लोकसभा-विधानसभा-नगरपालिका अशा विविध निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करुन प्रतिनिधींना निवडून आणून जनतेचे प्रश्न विधायक मार्गाने योग्य त्या ठिकाणी मांडण्याची जी पद्धत असते तिचे पालन करणारा आहे. संघाची कार्यपद्धती याउलट आहे. संघात निवडणुकांमध्ये भाग घेण्याचे धैर्य नाही. बरं, संघ-भाजपा एकमेकांशी संबंधित आहे असे म्हटले तर लगेच संघी मंडळी तावातावाने आमचा काही संबंध नाही असे म्हणत धावून येतात. मग संघाचे विधायक माध्यम कुठल्या स्वरुपाचे आहे? बजरंग दल, विहिंप किंवा दुर्गा वाहिनी यांना मी विधायक माध्यम मानत नाही. वनवासी कल्याण आश्रम हे एकमेव उदाहरण दिसते. पण अशा स्वरुपाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रात अनेक संघटना आहेत. शिवाय हे विधायक कार्य करण्यासाठी त्यांना हिंदू-मुस्लिम अशा ध्रुवीकरणाची गरजही भासत नाही.
हो या मुद्द्यांवर चर्चा करण्यात मला रस नाही. संघ मुसलमान विरोधी आहे का या उपचर्चेत माहिती देण्याचा माझा प्रयत्न होता.
भारत माता की जय!
21 Mar 2016 - 10:50 pm | sagarpdy
विविध नैसर्गिक आपत्तिंच्या काळात संघ स्वयंसेवकांनी केलेली मदत विसरणे अयोग्य ठरेल.
21 Mar 2016 - 11:29 pm | आजानुकर्ण
विविध नैसर्गिक आपत्तीच्या काळात हाफिज सैय्यदही पाकिस्तानात मदत करतो.
24 Mar 2016 - 1:02 am | विकास
'मुसलमानांना हाकला' म्हणणारे गोळवलकर हे द्रष्टे होते असे म्हणतात
नक्की कुठे म्हणले आहे?
"... We are not so mean as to say that with a mere change in the method of worship, an individual ceases to be a son of the soil. We have no objection to God being called by any name whatever. We, in the Sangh, are Hindus to the core. That is why we have respect for all faiths and religious beliefs. He cannot be a Hindu at all who is intolerant of other faith..." (संदर्भः Bunch of Thoughts)
22 Mar 2016 - 8:32 am | बोका-ए-आझम
असा साधा सरळ अर्थ आहे. मला वाटतं आपण तो राष्ट्रद्रोही या नकारात्मक अर्थाने घेतला असावा.
तुम्ही माझाच मुद्दा मांडताय, आणि हे बरोबर आहे कारण केवळ धर्म समान आहे म्हणून हे भाग एकत्र आणले गेले आणि त्यांना लष्कराच्या जोरावर एकत्र ठेवायचा प्रयत्न केला गेला. भौगोलिक अंतर (पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमधलं) हाही एक मुद्दा होताच. शेख मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीगने लोकशाही मार्गाने जिंकलेल्या बहुमताला नाकारण्यात आलं आणि त्यावरून बांगलादेश मुक्तिसंग्राम सुरु झाला. त्याच वेळी भारतात असं काही झालं नाही - कारण लोकशाही आणि स्वतःची भाषा बोलण्याचं आणि तिचं संवर्धन करण्याचं स्वातंत्र्य.
देश - एक भूभाग. राष्ट्र - एक सामायिक संस्कृती. त्या अर्थाने मुस्लिम अराष्ट्रीय आहेत. त्यामुळे लोकशाहीशिवाय
दुस-या कोणत्याही राज्यव्यवस्थेत ते सुरक्षित राहू शकणार नाहीत. त्यामुळेच ज्या मुस्लिम देशांमध्ये एकतंत्री राज्यसत्ता आहे (बहुतेक सगळेच) ते यादवी युद्धाला बळी पडले किंवा अस्थिर झाले. तुर्कस्तान आणि इराणसारखे देश तरीही ब-यापैकी प्रगती करु शकले कारण थोडीफार लोकशाही तिथे आहे.
23 Mar 2016 - 4:43 pm | DEADPOOL
'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा'
असे म्हणणारे छत्रपती हिंदूच होते ना!
आणि त्यांच्या स्वराज्यात सगळ्याना सारखीच वागणूक मिळाली!
18 Mar 2016 - 10:48 pm | sagarpdy
धन्स. पुस्तके मीळवायचे बघतो. हे मुद्दे कधी मांडले गेले होते, त्यांचा आजच्या संघकार्यावर कितपत आणि कशा प्रकारचा प्रभाव आहे याबद्दल माहिती असल्यास जाणून घेण्यास आवडेल.
18 Mar 2016 - 11:25 pm | आजानुकर्ण
या विचारांचा आजच्या संघकार्यावर कितपत प्रभाव आहे याविषयी सद्यकालीन स्वयंसेवकांनीच लिहावे.
उदा.
हे मत खाली 'आपला नम्र गा.पै.' यांनी मांडले आहे. त्यावरुन सद्यस्वयंसेवकांना अजूनही हे विचार योग्य वाटतात असे प्रथमदर्शनी मत होते आहे.
17 Mar 2016 - 9:20 pm | पिलीयन रायडर
कै च्या कै! मुस्लिमांचे नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत माहित नाही, पण घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. संघ काय म्हणतो ह्याचा काही संबंधच नाही.
देशविघातक कारवायांमध्ये दहशतवादी म्हणुन असणारे मुसल्मानांचे लक्षणीय प्रमाण मुस्लिम द्वेषाचा फार मोठे कारण असावे. हा धर्म माणसाच्या मतांवर फार मोठा पगडा ठेवुन आहे. इतर धर्मियांशी सामोपचाराने घेणे ह्यांच्या धर्मात मान्य नाही. मौलवीच फतवे काढुन समाजाची दिशाभुल करताना दिसतात. ह्या फतव्यांना फारसा विरोध होताना दिसत नाही. चार बायका, खंडीभर पोरं हा ह्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. हिंदु मुले शक्यतो सर्वसाधारण शाळांमध्येच शिकताना दिसतात, मदरसे हा प्रकार मुस्लिमांमध्येच आहे.
अता ह्या परिस्थिती मध्ये इतरांनी काय प्रयत्न कराय्चेत मुख्य प्रवाहात आणायला हे समजले नाही.
हिंदुंची मेजोरिटी असुनही जिथे अल्पसंख्याकांना महत्व दिले जाते, कायदे वेगळे बनवले जातात, ज्या झपाट्याने संख्या वाढवली जातेय, ते बघता मुस्लिमांना इथे उपरे समजले जाते हा जोक आहे. बहुसंख्य हिंदु असुनही त्याचा निधर्मी देशात काय फायदा आहे? अल्पसंख्याक म्हणुन किमान फायदे तरी आहेत.
17 Mar 2016 - 9:29 pm | तर्राट जोकर
वरील प्रतिसादात भारतीय मुस्लिमांबद्दलचे नेहमीचे गैरसमज आहेत.
17 Mar 2016 - 9:37 pm | पिलीयन रायडर
आणि तुम्ही जे लिहीलय ते मात्र संशोधन करुन मांडलेले सत्य आहे ना?
बाकी मी माझी निरीक्षणेच मांडली आहेत. फतवे, मदरसे, चार लग्नं आणि त्यातुन खुप अपत्ये, धर्माचा पगडा हे गैरसमज कसे ते ही सांगा. आणि संघ गेला चुलीत, घटनेने कधी मुस्लिमांना उपरे वागवले तेही सांगा.
18 Mar 2016 - 2:08 am | तर्राट जोकर
१. चार बायका.
एकापेक्षा अधिक बायका असण्याचे प्रमाण
१९६१ च्या सर्वे नुसार (सर्व आकडे %)
मुस्लिमः ५.७ | हिंदु: ५.८ | बुद्धीस्ट: ७.९ | जैनः ६.७ | आदीवासी: १५.२५
तृतीय राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, २००६
मुस्लिमः २.५५ | हिंदु: १.७७ | बुद्धीस्टः ३.४१ | क्रिश्चनः २.३५
संदर्भः
http://scroll.in/article/669083/muslim-women-and-the-surprising-facts-ab...
http://paa2010.princeton.edu/papers/100754
२. ढिगभर मुले:
मुस्लिमांमधला एकूण प्रजजनदर हिंदूंच्या प्रजननदरापेक्षा वेगाने कमी होत आहे.
(NFHS) 1 (1992-93): मुस्लिमः ४.४ | हिंदू: ३.३
NFHS 2 (1998-99): मुस्लिमः ३.५९ | हिंदु: २.७८
NFHS 3 (2005-06): मुस्लिमः ३.१ | हिंदू: २.७
संदर्भः
http://indianexpress.com/article/explained/population-growth-slowing-for...
http://factchecker.in/the-myth-of-indias-muslim-population-rise/
मुस्लिमांमधे स्त्री-पुरुष गुणोत्तर >> २००१: ९३६ | २०११: ९५१
हिंदूंमधे स्त्री-पुरुष गुणोत्तर>> २००१: ९३१ | २०११: ९३९
(हिंदूंप्रमाणे मुस्लिमांमधे मुलीला गर्भातच मारण्याचे प्रकार नाहीत. तसेच मुस्लिमांमधे जास्त मुले होण्याचे कारण एकापेक्षा जास्त बायका नसून मुलींचे लवकर लग्न करणे, गर्भनिरोधके न वापरणे हे आहे. )
संदर्भः
http://indianexpress.com/article/explained/population-growth-slowing-for...
http://factchecker.in/the-myth-of-indias-muslim-population-rise/
३. शिक्षण
मदरसात शिक्षण घेणारे विद्यार्थी >> एकूण मुस्लिम विद्यार्थ्यांपैकी फक्त ३%
उच्चशिक्षण घेण्याचे प्रमाण>> मुस्लिम ११% | हिंदू २०% | क्रिस्चन ३१%
साक्षरतेचे प्रमाण, २००१ >>
पुरुषः मुस्लिम ५५% | गैरमुस्लिम ६४.५ %
स्त्रिया: मुस्लिम ४१% | गैरमुस्लिम ४६%
पदवीधर होण्याचे प्रमाण >> मुस्लिम ४% | सार्वत्रिक ६%
४. फतवा
मिडीयामधून नेहमी वाईट बातम्या येत राहिल्याने फतवा म्हणजे विकृत घोषणा असावी असा समज होत राहिला आहे. प्रत्यक्षात फतवा म्हणजे मुस्लिम धर्मगुरुंचे एखाद्या विषयावरचे धार्मिक ग्रंथाधारित मत. असे कोणत्याही बाबतीत धार्मिक व्यक्त करण्याचा अधिकार धर्मगुरूंना असला तरी सर्व मुस्लिमांनी हे फतवे मानलेच पाहिजेत असे बंधनकारक नसते. कैक फतवे तर मजेदाररित्या एकमेकांच्या प्रचंड विरोधातही असतात.
फतवा टैपचे हिंदू जातपंचायतींचेही निर्णय असतात. पण ते बंधनकारक असतातच. ह्यात काही गंभिर बातम्या एवढ्यात माध्यमांमधून येऊ लागल्या आहेत. विद्यमान भाजप सरकार त्याविरोधात कायदा करण्याच्या तयारीत आहे ह्यावरुन प्रश्न गंभीर व खरा आहे हे समजण्यास हरकत नसावी.
७०,००० मौलवींनी आयसिस व इतर दहशतवादी संघटनांविरुद्ध फतवा जाहीर केला आहे. सुमारे पंधरा लाख मुस्लिमांनी ह्या फतव्याला आपले समर्थन दिले आहे.
५. धार्मिक पगडा तर सर्वच धर्मांमधे आहे. आपल्या धर्माच्या बाहेरचं दुसर्याचं वर्तन आपल्याला धार्मिक पगडा वाटतं. बरेच मुस्लिम दाढी ठेवतात, धार्मिक पारंपरिक वेश करतात, सण-उत्सव साजरे करतात. असंच भारतातले इतर धार्मिकही करतात. भारतात सगळेच धार्मिक पगड्याचे शिकार आहेत. काही कॉस्मोपोलिटन शहरे, नागरी वस्त्या सोडल्या तर ८० टक्क्याच्यावर देशात धार्मिक, पारंपारिक प्रथांचा पगडा आहे. ह्यात बालविवाह, जातपंचायती, इत्यादी प्रकार सर्व जातीधर्मात होतात. मंदिरांमधे वाढत चाललेली सुशिक्षितांची गर्दी हे धार्मिक पगड्याचेच लक्षण आहे.
मुस्लिमांबद्दल बर्याच गोष्टी फुगवून रंगवून सांगितल्या जातात. त्यातून समजूती घट्ट बनत जातात. मुस्लिमांमधे अगदी सगळे ऑल्वेल, खाऊन पिऊन मजा करतायत असं काहीही नाही. पण प्रत्येक मुस्लिम घरात कुराणावर हात ठेवून जिहादच्या शपथा रोज घेतल्या जातात, पोटाला बाँब लावायची प्रेक्टीस केली जाते, निव्वळ पोरांची पैदास करण्याचे कार्यक्रम अव्याहत चालू असतात असे नव्हे. समस्या आहेत पण त्या इतक्या भयावह नाहीत जेवढ्या प्रोजेक्ट केल्या जातात. मुस्लिम अगदी तुमच्या कल्पनेतल्या प्रमाणे असते तर वरच्या आकडेवारीत दिसलेच नसते. माझ्यालेखी भले नॉर्मलपेक्षा १०-२० टक्क्यांनी मुस्लिम मागे असतील पण मागे असले तरी चालत आहेत हे चित्र जास्त आशादायक वाटते.
18 Mar 2016 - 7:38 am | साहना
ह्या आकड्यांत सुद्धा नेहमीचा गोंधळ आहे. बहुपत्नी लोकांचे पाहूया. बहुपत्नी असेलेले लोक हिंदू समाजांत जास्त आहेत हा गैर समाज आणि धांदात खोत आकडा मुस्लिम लोक पसरवत आहेत. ह्या आकड्याचा उगम "Conversion to Islam" ह्या मुहाजिद ह्यांच्या पुस्तकाने पोपुलर केला आहे. पण त्याच पुस्तकांत लेखकाने हे स्पष्ट केले आहे कि ह्या आकड्या साठी हिंदूमध्ये आदिवासी, बौद्ध आणि जैन लोकांचा समावेश केला असून बहुपत्नी लोकांचे प्रमाण ह्या तीन घटकांत कित्येक पटींनी जास्त आहे. तसेच हे आकडे १९६१ च्या सेन्सस मधील असून ह्यात लग्ने त्या पेक्षा सुद्धा जुनी आहेत. मुस्लिम लोकांना ४ बायका कायद्याने ठेवता येतात पण हिंदुना नाही हा माझ्या मते प्रमुख मुद्दा आहे.
18 Mar 2016 - 11:23 am | पिलीयन रायडर
१. चार बायका.
The Hindu Marriage Act of 1955 It is illegal for a man to have more than one wife.
असा कायदा मुस्लिमांसाठी नाही. तसेच घटस्फोटाचेही कायदे वेगळे आहेत. मला वाटते की नवर्याने नुसते तलाक म्हणणे पुरेसे आहे. तसा काही हक्क बायकांना नाही. त्यामुळे बायकांची परिस्थिती मुस्लिमांअम्ध्ये जास्त बिकट आहे. मुद्दा इतकाच आहे.
२. ढिगभर मुले:
घ्या माझी पण एक लिंक - मुद्दामच मी वर्तमानपत्रांच्या लिंक्स घेत नाही. कारण माझा त्यांच्या बातमीवर विश्वास नसतो. चांगली असो वा वाईट.
https://en.wikipedia.org/wiki/Muslim_population_growth#India
Islam is the fastest-growing religion in India.[14] The ratio of young children (age 0–6) to the total population is also significantly higher among Muslims than Hindus in India.[15][16] Demographers have put forward several factors behind high birthrates among Muslims in India. Sociologists point out that religious factors can explain high Muslim birthrates. Surveys indicate that Muslims in India have been relatively far less willing to adopt family planning measures and that Indian Muslim girls get married at a much younger age compared to non-Muslim girls.[17] According to Paul Kurtz, Muslims in India are much more resistant to modern contraceptive measures compared to other Indians and, as a consequence, the decline in fertility rate among non-Muslim women is much higher compared to that of Muslim women.[18][19] According to a 2006 committee appointed by the Indian Prime Minister Manmohan Singh, if the current trend continues, by the end of the 21st century India's Muslim population will reach 320 to 340 million people (or 18–19% of India's total projected population).[20] Islam is the second-largest religion in India, making up 14.9% of the country's population with about 180 million adherents (2011 census).[21][22] India has the second largest population of Muslims, after Indonesia.[23]
३. मदरसे
मला ह्यात % मध्ये पडायचं नाहीये कारण मी म्हणतच नाहीये की "सर्व" मुलं मदरशांमध्ये जातात. माझा मुद्दा हा मुस्लिमांकडे मुलांना शिक्षणासाठी मदरशांमध्ये पाठवायची पद्धत आहे. ३% लोक जातातही. मग उरलेले जर सर्वसाधारण शाळांमध्ये शिकत असतील तर "इतर मुलांसोबत" शाळेत पाठवायचा मुद्दा उद्भवायला नाही पाहिजे.
४. फतवा
मी तरी अनेक फतवे वाचत असते बायकांविरुद्ध. ते असे काढु शकतात ह्याचे मला नवल वाटते. माझा खाप पंचायतीलाही विरोधच आहे. त्यांचे ऐकणार्यांचेही मला नवलच वाटते. मला फारशी % वारी सापडली नाही की साधारण किती लोक ह्यांच्यानुसार (खाप / फतवे) वागतात. जर लोक ऐकत नसतील आणि जे योग्य आहे तेच होत असेल तर आनंदच आहे.
५. हओ अर्थातच कट्टर हिंदु आहेतच. पण हिंदु धर्मात अर्थातच खुप स्वातंत्र्य आहे. देव मानणे न मानणे पासुन ते रुढी/प्रथांपर्यंत. इतर धर्मांसोबत कसे वागावे ह्या बद्दल हिंदुचे धोरण सहिष्णुच आहे. कधी कुणाची प्रार्थनास्थळे / ग्रंथ इ हिंदु धर्मियांनी उद्ध्वस्त केल्याचे ऐकिवात नाही. आहेच हिंदु धर्म जास्त लिबरल. त्याचे क्रेडिट द्यायला हरकत नसावी.
पण मी अनेकदा हे वाचलेले आहे की कुराणात इतरांना काफिर का काय म्हणणे इ आहे. भले मुठवर लोक असतील पण त्यांच्या समजुतींचे उपद्रवमुल्य खुप आहेच. ते ही मान्य करायला हरकत नसावी.
मुळात मला मुस्लिम किती वाईट आहे हे म्हणायचे नाहीच. मी सरसकटीकरणाच्या विरोधातच आहे. मी ओवेसी बद्दलही चार शब्द चांगलेच बोलले आहे. संघाला प्रसंगी २ वाईटही बोललेले आहे.
माझा आक्षेप हा तुम्ही संघाच्या नावाने वर केलेल्या विधानांना होता. मुळात संघ असे काही म्हणतच नाही. तुम्हाला चार दोन माणसे भेटली म्हणजे ती संघाची अधिकॄत भुमिका होत नाही. शिवाय घटनेने मुस्लिमांना तेवढेच हक्क दिले आहेत जेवढे हिंदुंना. त्यांची धार्मिक मते जपण्याचा तर आटोकाट प्रयत्न राजकीय पक्ष करतात. त्यांच्या समाजात जे दोष आहेत तयंचे खापर हिंदुंच्या माथी का?
आपल्याला समान अधिकार आहेत हे सांगावे लागते??? कमाल आहे. जो देश मेजोरिटी हिंदु असुनही स्वत:ला निधर्मी घोषित करतो तो देश मुस्लिमांचाही आहे हे सांगावे लागते?? अहो लोक काय म्हणतात सोडा हो.. संविधान काय म्हणते हे समजायला ओवेसी का लागतो?
तेढ कमी व्हावी ही सर्वांचीच इच्छा असेल. पण तुम्ही संघाविषयी बिनबुडाची विधाने करुन फार काही वेगळे करत नाही आहात.
18 Mar 2016 - 12:56 pm | यमगर्निकर
अगदि माझ्या मनातले बोललत, ह्या लोकांच्या अश्या भंगार चालिरिति व मानसिकतेमुळे भारतच काय सर्व जगातिल लोक ह्यांच्यवर थुंकतात, आणि इथे येउन त्याचे खापर संघाच्या डोक्यावर फोडु पहाताहेत, खरोखरच कमाल आहे ह्यालोकांचि.
18 Mar 2016 - 2:09 pm | बोका-ए-आझम
१००% सहमत!
18 Mar 2016 - 4:21 pm | तर्राट जोकर
मी तुमच्या प्रतिसादातल्या मुस्लिमांबद्दलच्या गैरसमजांबद्दल पुरावे दिले तर ते आपण सपशेल नाकारत आहात.
१. चार बायका, खंडीभर पोरं हा ह्यांच्या संस्कृतीचा भाग आहे हे तुमच्या प्रतिसादातलं वाक्य आहे. ह्या बद्दल पुरावा दिला तर तुम्ही नेहमीचं बायका करण्याची कायद्याने परवानगी आहे हे बोललात. 'कायद्याने परवानगी आहे' हे 'संस्कृतीच्या भागा'त कसं बसतं ते कळलं नाही. एकापेक्षा जास्त बायका असणार्या पुरुषांचे प्रमाण सरकारी आकड्यानुसार दिले आहे. कुठल्या वृत्तपत्राची बातमी नाही. 'चार बायका करतात' हे सरसकटीकरण करण्यासाठी किमान ५१ टक्के मुस्लिम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त किंवा चार बायका असने आवश्यक आहे. खरेतर सरसकटीकरण करु शकत नाही, फारतर बहुसंख्य म्हणू शकाल. पण तीही सवलत आकडेवारी देत नाही. इथे कायद्याने परवानगी नसून हिंदूंमधेही एकापेक्षा जास्त बायका असण्याचे पुरावे आहेत. तोही संस्कृतीचा भाग म्हणायला हरकत नसावी. खंडीभर पोरं ह्याबद्दल तुम्ही विकिवरचा लेखातलं गरजेपुरतं पेस्ट केलंत. आकडेवारी जास्त बोलकी आणि स्पष्ट आहे. ही आकडेवारीही सरकारी आहे. वृत्तपत्रातली बातमी नाही. मुस्लिमांचा प्रजननदर हिंदूंपेक्षा जास्त असण्याचे कारणही मीच माझ्या प्रतिसादात दिले आहे. तेच वेगळ्या शब्दात इंग्रजीत बोल्ड करुन तुम्ही पेस्ट केलंत.
साहना यांनी २००६ चे आकडे जाणीवपूर्वक बघितले नाहीत तेही आहेच.
२. हिंदु मुले शक्यतो सर्वसाधारण शाळांमध्येच शिकताना दिसतात, मदरसे हा प्रकार मुस्लिमांमध्येच आहे.
मला ह्यात % मध्ये पडायचं नाहीये कारण मी म्हणतच नाहीये की "सर्व" मुलं मदरशांमध्ये जातात. माझा मुद्दा हा मुस्लिमांकडे मुलांना शिक्षणासाठी मदरशांमध्ये पाठवायची पद्धत आहे. ३% लोक जातातही. मग उरलेले जर सर्वसाधारण शाळांमध्ये शिकत असतील तर "इतर मुलांसोबत" शाळेत पाठवायचा मुद्दा उद्भवायला नाही पाहिजे.
>> मदरसे हा प्रकार मुस्लिमांमधे नाहीच असे मी कुठे म्हणालो, पण तुमच्या विधानाचा अर्थ सर्वसाधारणपणे मुस्लिम मुले मदरश्यात जाता असा निघतो. शब्दांची आलटपालट करुन आपण असे म्हणलोच नाही असे तुम्ही म्हणू शकता. ३ टक्के प्रमाण ही पद्धत म्हणू शकता येईल काय? उरलेले सगळे कुठे आणि काय शिकतायत ते आकडेवारीत आहे. अल्पसख्यांकाच्या स्वत:च्या शाळा आहेत. मुस्लिमांच्याही आहेत. त्या शासकिय मान्यताप्राप्त आहेत. त्या मुस्लिमांच्या शाळा असल्या म्हणून मदरसे म्हणायचे नसते. मदरसे वेगळे, शाळा वेगळ्या. मदरसे हे पाठशाळांप्रमाणे आहेत, त्यांना कायदेशीर शैक्षणिक मान्यता नाही. तुम्ही इथे पद्धत शब्द वापरुन जणू सर्व मुस्लिम मदरशांमधे धाडले जातात अशा अर्थाचे विधान केले.
इतर मुलांसोबत पाठवण्याचा मुद्दा फार सरळ आहे. मुस्लिम मुले अल्पसंख्यांकाच्या शाळांमधे शिकतात. त्यांना सर्वसामान्य शाळांमधे इतर मुलांसोबत शिकावे असे माझे मत आहे. अल्पसंख्यांकाच्या शाळा हा प्रकारच घटनेद्वारे असला तरी अतिशय चुकीचा आहे हे माझे मत आहे. सकल समाजाच्या एकजिनसीपनाला घातक आहे.
३. मौलवीच फतवे काढुन समाजाची दिशाभुल करताना दिसतात. ह्या फतव्यांना फारसा विरोध होताना दिसत नाही.
फतवे आणि त्यामागचे सत्य सांगितल्यावर इथेही तुम्ही घुमजाव करत आहात. तुम्ही बायकांविरुद्धचे फतवे नेहमी वाचता, विरोध होत नाही हेही म्हणता परत वृत्तपत्रातल्या बातम्यांवर खर्या खोट्या असल्यातरी विश्वास ठेवत नाही असे म्हणता. तुमचेही फतव्यांबद्दलचे मत हे वृत्तपत्रांतून येणार्या बातम्याम्वर आधारलेले आहे असे दिसते.
४. बर्याच भारतीयांचे भारतीय मुस्लिमांबद्दलचे मत हे जागतिक माध्यमांतून येणार्या बातम्यांवर आधारलेले आहे असे दिसते. भारतीय मुस्लिमांमधे समस्या नाहीतच असे मी म्हनत नाही. पण दहशतवाद, कट्टरता, धार्मिक दंगे ह्यातुन एकांगी चित्र मनात बसवलं जाते व तेच तुमच्या मुळ प्रतिसादात दिसून येते.
माझा आक्षेप हा तुम्ही संघाच्या नावाने वर केलेल्या विधानांना होता. मुळात संघ असे काही म्हणतच नाही. तुम्हाला चार दोन माणसे भेटली म्हणजे ती संघाची अधिकॄत भुमिका होत नाही. शिवाय घटनेने मुस्लिमांना तेवढेच हक्क दिले आहेत जेवढे हिंदुंना. त्यांची धार्मिक मते जपण्याचा तर आटोकाट प्रयत्न राजकीय पक्ष करतात. त्यांच्या समाजात जे दोष आहेत तयंचे खापर हिंदुंच्या माथी का?
>> चला, एक मान्य करु की मी संघाच्या नावाने खोटी, बिनबुडाची विधाने केली. ठिक आहे. पण त्यांच्या समाजात जे दोष आहेत त्यांचे खापर हिंदूंच्या माथी फोडल्याचं माझ्या प्रतिसादात मी लिहिलेलं नाही. असे कुठे दिसले?
आपल्याला समान अधिकार आहेत हे सांगावे लागते??? कमाल आहे. जो देश मेजोरिटी हिंदु असुनही स्वत:ला निधर्मी घोषित करतो तो देश मुस्लिमांचाही आहे हे सांगावे लागते?? अहो लोक काय म्हणतात सोडा हो.. संविधान काय म्हणते हे समजायला ओवेसी का लागतो?
>> असे का सांगावे लागते हे आधीच्या प्रतिसादात आले आहे.
तुम्ही दोन-तीन वेगवेगळ्या मुद्यांची सरमिसळ करत आहात. मुस्लिमांची स्वतःची सामाजिक अवस्था, कायद्याने दिलेले अधिकार, सामाजिक ओळख ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकमेकांवर आधरलेल्या असल्या तरी.
जर कायद्याने मुस्लिमांना चार बायकांची खुली परवानगी दिली आहे तर प्रत्येक मुस्लिम पुरुषाला चार बायका असायला हव्या, ढिगभर मुले असायला हवी, ते शिकत नाहीत तर त्यांच्यातून डॉक्टर, इन्जिनियर, इत्यादी उच्चशिक्षित यायलाच नको. लाखो मुस्लिम मुली रितसर शाळांमधे जाऊन शिक्षण घेत आहेत ते दिसायलाच नको. कायद्याने तर भरपुर दिले आहे, हिंदू पण अजिबात त्रास देत नाहीत. तरी मुस्लिम हे कट्टर धार्मिक असल्यामुळे ठार वाया गेलेले आहेत असा एक सूर तुमच्या प्रतिसादात दिसला. तो चुकीचा आहे ह्यासाठी आकडेवारी दिली. बाकी तुमची इच्छा.
ओवेसी आणि संघ यांचे नेहमीचे वाद हे सगळे मुस्लिम विरूद्ध सगळे हिंदू असे नाहीयेत. माझ्या प्रतिसादातुन तुमचा असा समज झाला असेल तर तो चूक आहे असे समजावे.
18 Mar 2016 - 6:32 pm | भंकस बाबा
चुकीचे विधान आहे हे,
इथे मदर्शात जातात हे धार्मिक शिक्षण घ्यायला जातात असे घेतले पाहिजे.
मुस्लिमबहुल वस्तीत मदरशे पावलापावलावर असतात अशा ठिकाणी जाण्याचे प्रमाण पुष्कळ असते.
जेव्हा मदरसा घराजवळ नसतो तेव्हा मुस्लिम मौलवीना आपल्या घरी बोलवतो.
यात कुराणाचा अर्थ, अरबी, हदिसचि तत्वे शिकवली जातात. यातून पण कट्टरता जोपासलि जाते.
जन्नत मधे फ़क्त अरबी बोलली जाते त्यामुळे अरबी येणे आवश्यक आहे हे मुस्लिम जनतेच्या मनावर ठसवले जाते.
मुस्लिम वस्तीत जनगणना करणार्याचे अनुभव भयानक असतात. एकतर फक्त स्त्री कर्मचारीला प्रवेश मिळतो. शिवाय घरातील कर्ता पुरुष सांगेल तसच सांगायचे बंधन असते. यात मग मदरशातले शिक्षण लपवले जाते. हिन्दुबहुल वस्तीत मुस्लिम धार्मिक शिक्षण घेतात ही बाब लपवतात.
ओवेसी बद्दल काय लिहायचे? शब्दाचे अलंकार वापरून कोणी आपला मूळ उद्देश् लपवत असेल आणि आपले विद्वान मिपाकर(काही) त्याला बुद्धिमान मानत असतील तर मग त्याने फ़क्त संसदेत वा बहुसंख्यक समाजापुढे केलेल्या भाषणावर जाऊ नका. त्याची यू ट्यूब वर बरीच भाषणे मुस्लिम समाजापुढे केलेली आहेत ती उपलब्ध आहेत. ती बघा आणि विचार मांडा. हा माणूस सरडयासारखा आहे, परिस्थिति बघुन रंग बदलतो. इशरत जहां व् हिमायत बेगचे समर्थन त्याचे बेगडी संविधान प्रेम उघड करते.
मुस्लिमाचा द्वेष इथे मला करायचा नाही आहे पण त्यांची धर्मांधता एक दिवस या देशाला यादवी दाखवणार.
तेव्हा हे सेक्युलर नेते जे आज मुस्लिम लांगुलचालन करत आहेत ते बिळात लपून बसतील.
18 Mar 2016 - 7:17 pm | तर्राट जोकर
काही काळजी करु नका. तुमच्या कुठल्याच विधानाला इथे कोणी कसलाच पुरावा मागणार नाही. होउ दे खर्च!
18 Mar 2016 - 9:00 pm | भंकस बाबा
बीफ खायचे असेल तर आम्हाला मत द्या,
तुम्ही एक बाबरी पाडलित आम्ही शंभर उभारु,
कसली राम जन्मभूमि , कोण गेले होते बघायला,
अशी विद्वत्ता ओसन्डून वाहत आहे. तजो आंघोळ करून घ्या.
बाकी तुम्ही वकील बनायला पाहिजे. जीत पक्की, फ़क्त प्रतिपक्षाचा वकील श्रीगुरुजी नको, नाहीतर होईल काय की तुम्ही अर्धवट केस सोडाल, आणि तुमच अशील राहील बोम्बलत.
मी लिंक जोडू शकत नाही कारण मला ते येत नाही, शिवाय मी हे सर्व मोबाइल वर टायपत आहे. माझा जॉबच असा आहे की फावला वेळ मिळतं नाही. ज्या दिवशी तो मिळेल त्या दिवशी लिंक कशा पेस्टवायच्या शिकुन घेइन. तुमचा आशीर्वाद असावा.
19 Mar 2016 - 2:16 pm | तर्राट जोकर
वकिल बनायला हरकत नाही. प्रतिपक्षाचा वकिल स्वतःची मते हेच कायदे असे मानणारा नसला म्हणजे झालं.
23 Mar 2016 - 4:48 pm | DEADPOOL
कारण आपणांस भीती वाटते की पुरावा दिल्यास आपण उघडे पडू!
23 Mar 2016 - 4:50 pm | तर्राट जोकर
द्या की पुरावा. कोण भीतो?
18 Mar 2016 - 8:34 pm | lakhu risbud
तजो शेठ,तारेक फ़तह यांच्या या काही मुलाखती शांतपणे बघा आणि त्यानंतर आपण तुमच्या मतांवर चर्चा करू.
18 Mar 2016 - 8:36 pm | lakhu risbud
18 Mar 2016 - 8:40 pm | lakhu risbud
या लिंक्स
https://www.youtube.com/watch?v=z5WBceo0bIg
https://www.youtube.com/watch?v=pgvRdybVOcc
https://www.youtube.com/watch?v=qO_ArwyeB6w
18 Mar 2016 - 8:45 pm | lakhu risbud
https://www.youtube.com/watch?v=SK5IYU-fkRo
20 Mar 2016 - 12:06 am | Rahul D
प्रचंड अनुमोदन...
17 Mar 2016 - 6:01 pm | सुबोध खरे
पण दुय्यम नागरिक, आश्रित म्हणून राहा
असं संघाचं म्हणणं आहे हे तुम्ही कुठं वाचलं?
का असंच बार मध्ये ऐकलं?
त्याच्या माध्यमातून मुस्लिमांना योग्य मार्गदर्शन करणे
दुसरं कोणी नाही का मुसलमानाचा तारणहार?
हा धूर्त वकील माणूस मुसलमानांच्या मानसिक असुरक्षिततेचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो आहे. याला महत्त्व देणे हि हाराकिरी होईल. त्यापेक्षा मुसलमानांना तुम्ही इथलेच नागरिक आहात तेंव्हा मुल्ला मौलवींच्या नादाला न लागता आधुनिक शिक्षणाची कास धारा हे पटवले तर नक्कीच फायदा होईल. या दृष्टीने मदरशामध्ये आधुनिक शिक्षण देणे चालू केले पाहिजे.
17 Mar 2016 - 6:53 pm | नाना स्कॉच
असद ओवैसी ने सेम हेच मत दिले होते, मुस्लिम शिक्षण ह्याच विषयावर. प्रसंग होता कोर्टाने 10 वर्षात हज सब्सिडी बंद करायचा दिलेला निवाडा. त्याने कोर्टच्या निर्णयाचेही स्वागत केले होते.
17 Mar 2016 - 7:15 pm | अनुप ढेरे
हेच बोल्तो. मला त्याची काही मतं पटतात. काँग्रेस/ समाजवादी पार्ट्या ज्या विषयांना कधीही हात घालत नाहीत त्याला हा हात घालतो. हज सबसिडी बंद करून त्या पैशात मुस्लिम मुलींना स्कॉलरशिप सुरू करा असं मत व्यक्त केलेली मुलाखत पाहिली होती. काल लोकसभेत केलेलं भाषणपण आवडलं.
17 Mar 2016 - 7:21 pm | नाना स्कॉच
अहो काँग्रेस समाजवादी तर आहेतच पण साक्षात् बीजेपी चे मुख़्तार अब्बास नक्वी सुद्धा म्हणाले होते की
"आम्ही कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो , तरीही हज यात्रेकरु मंडळीला "बेसिक सर्विसेज" दिल्या जाव्यात असे आम्हाला वाटते"
17 Mar 2016 - 6:12 pm | श्री गावसेना प्रमुख
बारमधे बसल्यावर जेवढं कानावर येतं तेवढं इथं लिहिलंय.तुम्हाला बार असोसिऍशन म्हणायचं आहे काय,
17 Mar 2016 - 6:32 pm | तिमा
कुठलीही घोषणा देण्याची सक्ती करणे, चुकीचे आहे. असले बालिश हट्ट कोर्टात टिकणार नाहीत. 'भारतमाताकी जय' असं तोंडाने म्हणून तिच्यावर वाईट नजर ठेवणारे, या देशांत काही कमी नाहीत. वाद घालायचा तर योग्य मुद्द्यांवरच घातला पाहिजे.
17 Mar 2016 - 7:04 pm | तर्राट जोकर
शंभर टक्के सहमत.
17 Mar 2016 - 7:20 pm | बोका-ए-आझम
न म्हणताही देशासाठी चांगलं काम करता येतं असं ओवेसींनी म्हणायला पाहिजे होतं. भारतमाता की जय म्हणणार नाही असं म्हणून त्यांनी एक चुकीची खेळी केली आहे. अशाने फक्त कटुता आणि तणाव वाढणार आहे.
उत्तर प्रदेश आणि तेलंगण इथलं सांगता येत नाही पण मुंबईत वांद्रे पूर्व मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत MIM ने शिवसेना-भाजप युतीच्या तृप्ती सावंत आणि काँग्रेसचे नारायण राणे यांच्याविरूद्ध उमेदवार दिला होता. त्याच्यासाठी अत्यंत आक्रमक आणि विखारी म्हणावं अशा भाषेत प्रचार केला गेला होता. वांद्रे पूर्व म्हणजे मुस्लिम वस्ती भरपूर. तरीही MIM ला फारशी मतं मिळाली नाहीत, किंवा ती राण्यांनाही मिळाली नाहीत. शिवसेनेने राण्यांविरुद्ध राड्याचीच भाषा वापरली होती तरीही त्याची फारशी चर्चा झाली नाही, पण MIM च्या कट्टर भाषेमुळे मुस्लिम मतदारांनी त्यांना नाकारलं. त्यानंतर ओवेसी शांत होते. आपण बिहारमधील निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा त्यांनी केली होती पण बिहारमध्ये भाजपचाच काही निभाव लागला नाही, त्यामुळे MIM चं अपेक्षित अपयश झाकलं गेलं. आता ओवेसी परत सक्रीय होऊ बघताहेत पण अशा अतिआक्रमक आणि टोकाच्या भूमिकेने त्यांना फार मतदार मिळतील असं वाटत नाही.
17 Mar 2016 - 7:28 pm | तर्राट जोकर
माध्यमातल्या अर्धवट विधानांवर बेतुन मत देत नाही आहात ना?
बाकी हा कलगीतुरा संगनमताने आहे असे निरिक्षण नोंदवतो.
17 Mar 2016 - 9:49 pm | बोका-ए-आझम
पण म्हणून मी किती वेळा ऐकून घ्यायचं त्याला लिमिट आहे! ;)
18 Mar 2016 - 4:36 am | तर्राट जोकर
=)) =)) =))
17 Mar 2016 - 7:43 pm | विकास
सहमत...
"भारतमाता की जय" असे ज्यांना म्हणायचे त्यांना तसे म्हणूंदेत, पण तसे न म्हणता देखील आमचे इमान भारताशी आहे, असे ज्यांना कुणाला "भारतमाता की जय" म्हणायचे नसेल त्यांनी बोलणे महत्वाचे आहे. त्यात केवळ ओवेसी अथवा मुस्लीमच आहेत असे नाही. एखाद्याने (म्हणजे बिगर मुस्लीम व्यक्तीने/विचारवंताने) पुर्णपणे तत्व म्हणून असे मत प्रदर्शिले म्हणून काहीच बिघडत नाही. किंबहूना चांगली चर्चा घडू शकेल... एका अर्थी जावेद अख्तर यांनी ते त्यांच्या राज्यसभेतील शेवटच्या भाषणात करून दाखवले.
जे एन यु मधे ज्या पद्धतीने "तुकडे करण्याची" भाषा केली गेली, त्यात एकप्रकारचे नुसतेच सरकारला नाही तर एकूणच घटनात्मक पद्धतीस आव्हान होते. त्या पाठोपाठ म्हणूनच जादवपूरला पण ते चालू झाले. आणि सरकार बधत नाही आणि उलट प्रतिक्रीया जनतेकडून येऊ शकते हे ध्यानात आल्यावर त्यांनी माघार घेतली आहे असे वाटते. हे काही अचानक उचलली जिभ लावली टाळ्याला अशा पद्धतीने झाले नव्हते... असले आव्हान कुठलेही राष्ट्र खपवून घेणार नाही. मला १००% म्हणणार नाही पण अगदी ९०% नक्की वाटते की आत्ता काँग्रेसचे सरकार असते तरी देखील या बाबतीत त्यांनी देखील कन्हैय्याच्या विरोधात काहीतरी कारवाई केली असती.
बाकी ओवेसी जर, वर काही प्रतिसादात आल्याप्रमाणे काही चांगले बोलले असले अथवा मुस्लीम समाजासाठी चांगले करू इच्छीत असले तर ते स्वागतार्हच आहे. पण धर्माच्या नावाने कुठलाच राजकीय पक्ष असू नये अशा मताचा मी आहे. मला वाटते घटनेनुसार धर्माच्या नावाने मते मागता येत नाही. मग धर्माचे नाव पक्षाच्या नावात असले की ते देखील तसेच धरले जावे...जो पर्यंत ते The All India Majlis-e-Ittehad-ul Muslimeen or AIMIM translation: All India Council of the Union of Muslims) अशा नावाच्या पक्षाने राजकारण करत आहेत तो पर्यंत कितीही स्वागतार्ह बोलले तरी सगळे संशयास्पदच असेल असे म्हणावे लागेल. (जेंव्हा www.aimim.in बघायचा प्रयत्न केला तेंव्हा व्हायरसवरून लाल अक्षरात मोठ्ठी वॉर्निंग आली. कदाचीत त्यांना देखील हे माहीत नसेल... पण माहीती करता येथे सांगत आहे. असो.)
17 Mar 2016 - 7:46 pm | तर्राट जोकर
पक्षात तसे नाव न घेता पण हिंदूंच्या नावाने मत मागणारा पक्ष संशयातीत आहे का विकासभाऊ?
17 Mar 2016 - 7:47 pm | विकास
सिद्ध करा नक्की काय म्हणायचे आहे ते?
17 Mar 2016 - 7:53 pm | तर्राट जोकर
इथेच ह्या संस्थळावर भाजप हिंदूंच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे असे म्हटले गेले. ते खोटे आहे काय?
17 Mar 2016 - 7:56 pm | विकास
तुम्ही पुरावे नसताना या संस्थळावर संघाबद्दल काही लिहीता, म्हणून उद्या त्याला पण खरे मानायचे का?
अधिकृत काय आहे याला महत्व आहे. बाकी बोंब ठोकायला कन्हैय्या सारखे आहेतच की!
17 Mar 2016 - 8:12 pm | नाना स्कॉच
बरोबर आहे तुमचे! एकटे कैलास विजयवर्गीय आहेत खरे!!!
17 Mar 2016 - 8:26 pm | विकास
ते देखील मी वर म्हणल्याप्रमाणे. "कन्हैय्यासारखे" च्या सदरात मोडतात..
17 Mar 2016 - 8:26 pm | तर्राट जोकर
अधिकृतला महत्त्व आहे का? बरं. मग त्याच्या पक्षात, धोरणात तुम्हाला संशयास्पद काय वाटले आणि कोणत्या आधारावर वाटले तेही सांगण्याची कृपा करा.
तसेच जेव्हा इथले सदस्य भाजपाला, संघाला हिंदुंचे रक्षणकर्ते, पाठिराखे, कैवार घेणारे म्हणतात तेव्हाही विदा मागायला येत जावा. फक्त माझीच विधानं स्कॅन करायची आणि सिद्ध करुन घ्यायची, त्याला दांभिकपणा म्हणतात.
एक राहिलंच, ते बाबरी मस्जिद पाडली ते कोणत्या पक्षाचे अधिकृत राष्ट्रकार्य होते आणी मंदिर वहीं बनायेंगे असे नारे देत देशभर रथयात्रा करत कोणता पक्ष फिरत होता? अजून बरेच प्रश्न आहेत. पण ते स्वतंत्र धाग्यात. तेव्हाचे तेव्हा बघू.
17 Mar 2016 - 8:32 pm | विकास
जेंव्हा बदनामी केली जाते तेंव्हा अधिकृत महत्वाचे धरले जावे. तुम्ही एका संघटनेबाबत खोटे लिहून बदनामी करत आहात जी आक्षेपार्ह आहे.
मग त्याच्या पक्षात, धोरणात तुम्हाला संशयास्पद काय वाटले आणि कोणत्या आधारावर वाटले तेही सांगण्याची कृपा करा.
आधी म्हणल्याप्रमाणे, धर्माच्या नावाने पक्षच नसावा. त्यामुळे तसा कुठल्याही धर्माच्या नावाने असला तर ते मला मान्य नाही. पक्षाचे धोरण बघायला म्हणूनच तर त्यांच्या संस्थळावर जायचा प्रयत्न केला. पण व्हायरस अॅ़टॅक होईल म्हणून मोठ्ठा अॅलर्ट आला... मग जर कुठेच अधिकृत धोरण बघता येत नसेल तर ते संशयास्पद आहे असे मी कुणाच्याही बाबतीत म्हणेन.
पण ते स्वतंत्र धाग्यात. तेव्हाचे तेव्हा बघू.
अवश्य. मात्र त्याच्या आधी इथे आधी झालेल्या चर्चांचा अभ्यास देखील करावात ही विनंती.
17 Mar 2016 - 8:39 pm | तर्राट जोकर
https://en.wikipedia.org/wiki/All_India_Majlis-e-Ittehadul_Muslimeen#Par...
त्यांच्याच साइटवरुन रीट्रीव केलेले आहे.
17 Mar 2016 - 9:47 pm | सुबोध खरे
विकास राव
त जो साहेबांनी एक चुकीचे किंवा बिनबुडाचे विधान केले. ते लक्षात आले तरीही आता ते त्याचे प्राण पणाला लावून समर्थन करीत राहतील कारण तो त्यांचा स्वभाव आहे. तेंव्हा तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका.
18 Mar 2016 - 2:07 am | तर्राट जोकर
तुम्ही वैयक्तिक, स्वभाव इत्यादीवर घसरता आहात तेव्हा ते योग्य व अनुकरणीय वर्तन असेल असे समजून चालतो व असे म्हणतो की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सर, माझ्या प्रतिसादात 'मी लष्करात असतांना' इत्यादी शब्दरचना नसल्याने माझी विधाने बिनबुडाची व चुकीचीच असतात. आम्ही आताच मातेच्या गर्भातून बाहेर आलो आणि थेट लॅप्टॉपवर बसून वातानुकूलित खोलीतून जगाला शानपन शिकवायला लागलो आहोत. त्यामुळे आमची विधाने अजिबात गांभिर्याने घेण्याची गरज नाही असे सांगणे आहे. बाकी, तुमच्याएवढे सुज्ञ, सर्वज्ञ तर पृथ्वीतलावर कोणीच नाही. आमच्यासारख्या अज्ञ बालकांवर कृपादृष्टी ठेवावी.
17 Mar 2016 - 9:56 pm | बोका-ए-आझम
असं धरून चालू. पण हिंदूंचं हित म्हणजे मुस्लिमांचं अहित किंवा त्यांच्यावर अन्याय असा निष्कर्ष का काढायचा? तुम्ही काढतात असं म्हणत नाहीये. मला माझ्या धर्माचा असलेला अभिमान हा दुस-या धर्माच्या अवहेलनेशिवाय आणि दुस-या धर्माच्या माणसाला नैसर्गिकपणे वाटणाऱ्या त्याच्या धर्माच्या अभिमानाबरोबर co-exist करु शकतो असं मला वाटतं. तुम्हाला तसं वाटत नाही का?
17 Mar 2016 - 10:56 pm | तर्राट जोकर
मला वाटतं आपण इथे आपल्या वैयक्तिक भूमिकांबद्दल चर्चा करत नसून संघाच्या, एम आय एम च्या भूमिकांबद्दल चर्चा करत आहोत. मला वा तुम्हाला काय वाटतं हे आता इथं महत्त्वाचं नाही.
17 Mar 2016 - 11:50 pm | बोका-ए-आझम
असहमत. आपण इथे आपल्या मते संघ आणि MIM यांची काय भूमिका आहे त्यावर चर्चा करतोय. त्यामुळे आपल्या मतांना महत्व आहेच.
18 Mar 2016 - 12:48 am | तर्राट जोकर
मला माझ्या धर्माचा असलेला अभिमान हा दुस-या धर्माच्या अवहेलनेशिवाय आणि दुस-या धर्माच्या माणसाला नैसर्गिकपणे वाटणाऱ्या त्याच्या धर्माच्या अभिमानाबरोबर co-exist करु शकतो असं मला वाटतं. तुम्हाला तसं वाटत नाही का?
>> उपरोक्त विधानातली भूमिका ही तुमची आहे की संघ-एमायम पैकी कोणाची आहे? इथे माझ्या, मला हे शब्द बोका-ए-आझम ह्या सदस्याने स्वतःला उद्देशून म्हटले आहे की संघ-एमायम ला उद्देशून म्हटले आहे?
तुम्हाला तसं वाटत नाही का हा प्रश्न संघ-एमायम ह्यांना विचारला आहे की तर्राट जोकर ह्या सदस्याला विचारला आहे?
19 Mar 2016 - 3:39 pm | बोका-ए-आझम
अर्थात तुम्हाला!
19 Mar 2016 - 3:48 pm | तर्राट जोकर
आता हे विषयांतर नाही का?
23 Mar 2016 - 4:52 pm | DEADPOOL
मग जाऊ द्या ना, सगळे हिंदूंना त्रास देत असताना एक पक्ष बाजू घेतोय त्यात काय वाईट?
23 Mar 2016 - 5:00 pm | तर्राट जोकर
सगळे कोण?
24 Mar 2016 - 10:14 pm | भंकस बाबा
संसदेत स्मृति इराणी दुर्गा देवी बद्दल जेएनयूमधे आलेली पत्रके वाचून दाखवत असताना कॉंग्रेसचे काही खासदार त्यास विरोध करत होते. त्यांचे म्हणणे असे होते की इराणी बाईनीं हा मजकूर संसदेत वाचायलाच नाही पाहिजे होता. त्यांच्यामुळेच दुर्गा मातेचा पर्यायाने हिन्दू देवतांचा अपमान झाला. आता हे तर्कट कशाला? तर पप्पूने आधीच जाऊन जेएनयू मधे अभिव्यक्तिस्वातंत्रयावर येणाऱ्या घाल्याविषयी तारे तोडले होते. आता ही अशी सूट तेथील विद्यार्थयाना पाहिजे होती तर पप्पूचे वस्त्रहरण झाले असते. मग काय ईमानी कुत्री भूंकली थोड़ी!
बाकी पुष्कळ वेळा सिद्ध झाले आहे की इतर पक्ष म्हणजे राजद, बसपा, सीपीएम, राष्ट्रवादी हे सर्व सर्वधर्मसम्भावच्या आड़ हिन्दुवरच संधान साधतात. खरे म्हणजे ते हिंदुना गृहीत धरतात.
तुमच्या संघाच्या विधानाबाबत, मी स्वतः शाखेत दोन वर्षे गेलो आहे, तेव्हा मला कुठेही हिंदू एजेंडा दिसला नाही. उलट त्यांच्या त्या लाठीकाठि चालवण्याच्या प्रकाराची गंमत वाटायची. कारण मुंबईत कुठे दंगे झाले की शाखा सुट्टीवर जायची.
25 Mar 2016 - 2:01 pm | तर्राट जोकर
पुष्कळ वेळा सिद्ध झाले आहे की इतर पक्ष म्हणजे राजद, बसपा, सीपीएम, राष्ट्रवादी हे सर्व सर्वधर्मसम्भावच्या आड़ हिन्दुवरच संधान साधतात. खरे म्हणजे ते हिंदुना गृहीत धरतात.
>> जसे की? उदाहरणार्थ?
4 Apr 2016 - 6:16 am | भंकस बाबा
इशरत जहां केस मधे अहमहिका लागली होती तिला शहीद बनवायची!
जे काही बेसिक प्रश्न उदभवत होते तिथे हे सर्व राजकीय पक्ष दुर्लक्ष करत होते.
आता जेव्हा तिचे कनेक्शन उघड होत आहे तेव्हा तिला खोटया चकमकीत मारले हे कारण पुढे केले जात आहे. एकतर या माणसांना पोलिस कारवाई कशी होते ह्याची कल्पना नसावी तसेच केसेस कशा चालतात ह्याची माहिती नसावी. आपले पोलिस काय सार्वजनिक जागेतिल बोराचे झाड़ आहे जे कोणीही यावे आणि दगड मारून पाडावे? वा त्यांनी काय कास्टडीतून या टीनपाट दहश्तवाद्याची वाहतूक करण्यात आपला वेळ घालवावा?
बाटला हाउस चकमकीत देखिल वरील काही पक्षाच्या प्रतिक्रिया चीड़ आणणाऱ्या होत्या. तरिही या पक्षाणा इथे मत मिळतात व् ते देणारे हिंदुच असतात.
अशा प्रकारची वक्तव्य मुस्लिम समाजाच्या विरोधात हे कधीच करत नाही उदा. भगवा दहशतवाद हां कोंग्रेस, राजद, कमुनिस्ट यांचा आवडता शब्द आहे पण यांच्या तोंडी हिरवा दहश्तवाद हां शब्द कधी येत नाही, तेव्हा मात्र दहशतवादाला रंग नसतो अशी नाटकछाप विधाने येतात. पहल्यान्दा चीड़ यायची पण आता हसु फूटते हे बघुन. आता सत्तेत आल्यावर भाजपा देखिल असे बोलायला लागली आहे. अलीकडेच राजनाथ सिंगानि असेच काहीसे विधान केले होते आणि त्यानंतर मुंबईत इसिसचे काही कनेक्शन उघड झाले होते. अशा पुष्कळ कनेक्शनवर गुप्तहेरखाते नजर ठेउन आहे व् ते वारंवार सांगत देखिल आहे की हे देशाला विघातक आहे. तरिही हे नेते ऐकायला तयार नाहीत.
4 Apr 2016 - 8:09 am | तर्राट जोकर
इशरत जहां व बाटला हाऊसबद्दल तुमच्याशी सहमत.
भगवा दहशतवाद हा शब्द ज्यांचा आवडता आहे ते समस्त हिंदूबद्दल तो वापरत नाहीत हे लक्षात घ्यावे लागेल. ते हिंदुत्ववादी संघटनांबद्दल वापरतात, कारण त्यांच्या (काँग्रेस व इतर) आयडॉलॉजीप्रमाणे ह्या संघटना भारताची धार्मिक हुकूमशाही बनवतील असे त्यांना वाटते. जेव्हा जेव्हा ते असं काही बोलतात तेव्हा ते समस्त हिंदु नव्हे तर कट्टर हिंदुत्ववादी पक्षांबद्दल बोलत असतात, त्यांच्या विचारपद्धतीबद्दल बोलत असतात. हे केवळ राजकारण आहे. नीच पद्धतीचे.
ते हिरवा दहशतवाद बोलणार नाहीत कारण राजकारनात त्यांनी मुस्लिमांना गृहित धरलेले आहे. जेव्हा मुस्लिमांचे स्वतःचे राजकिय पक्ष हिंदुत्ववादी पक्षांसारख्या तुल्यबळ लढती देऊ लागतील तेव्हा एका पायावर हे सगळे हिरवा दहशतवादाचा शंखनाद करायला सुरुवात करतील. ह्याची चुणूक महाराष्ट्र विधानसभेत एम आय एमच्या आमदारास निलंबीत करण्यामधे दिसून आली.
सो इट्स ऑल पॉलिट्क्स. डोन्ट टेक इट पर्सनल. ह्या सगळ्या पक्षांमधेही हिंदू कार्यकर्ते आहेत. पुजा, पाठ कर्मकांडे, मंदिर इत्यादी करणारे. ते सगळे काही मुस्लिम नाहीत. आता त्यांचे हिंदू कार्यकर्ते ते गुलाम आणि हिंदुत्ववाद्यांचे कार्यकर्ते हेच खरे देशप्रेमी, हिंदुप्रेमी अशी व्याख्या होत असेल तर हा वाद अनाठायी असेल, त्यावर बोलणे मला शक्य नाही.
17 Mar 2016 - 7:07 pm | विजुभाऊ
हे वाक्य अजून किती वर्षे वापरायचं?
कोणी अडवलंय? शिक्षणाची दारे नाकारायची; मग दुसरे काय होणार
17 Mar 2016 - 7:10 pm | तर्राट जोकर
शिक्षणाची दारे नाकारायची;
>> कुणी नाकारलीत?
17 Mar 2016 - 7:11 pm | नाना स्कॉच
हे वाक्य गेली किती वर्षे "गुळगुळीत" केले जाते आहे आपल्या मता/अनुभवानुसार???
18 Mar 2016 - 7:22 am | साहना
हा राष्ट्रीय प्रवाह नक्की काय प्रकरण आहे ? आम्ही कधी ह्या प्रवाहांत डुबकी लावल्याचे आठवत नाही, उच्च शिक्षण घ्यायचे, चांगली नोकरी करायची, धंदा करायचा शक्य असेल तर विदेशांत जावून स्थायिक व्हायचे अशीच लिमिटेड स्वप्ने होती. मुसलमान लोकांची स्वप्ने वेगळी असतात का ?
18 Mar 2016 - 7:56 am | नाना स्कॉच
फ़क्त मार्ग खडतर असतो, स्वप्ने पुर्ण करायला पैसा पण लागतो अन ही बातमी काहीतरी वेगळेच सांगते. माझ्या आकलना प्रमाणे प्रॉब्लम खालील प्रमाणे असावे (मी फाइनेंस एक्सपर्ट नाही फ़क्त सामान्य निरिक्षण आधारित तर्क देतोय चुक असल्यास संबंधित तज्ञ लोकांनी मला दुरुस्त करावे
बँक्सच्या बाजुने :-
1. ओवरऑल इस्लामोफोबियाचा असर असणे
2. मुस्लिमांस डिसबर्स केलेली सगळी लोन्स एनपीए होतीलच ही अनाठाई भीती
मुस्लिमांच्या बाजुने
1. मुळात परिवार हे यूनिट मोठे असल्याकारणे मॉर्गेज करण्यालायक हिश्श्यात आलेले एसेट छोटे / अंडरवैल्यू असणे
2. नॉर्म्स कंप्लाय करण्यात अनकम्फ़र्टेबल असणे (उदा स्त्रियांच्या नावे लोन असता बुरका वर करून फ़ोटो काढणे वगैरे)
एक सकारात्मक चित्र अन संभाव्य उपाय
- मुद्रा लोन्स उपयोगी ठरू शकतात, ही लोन्स योजना हा एक अतिशय सकारात्मक भाग आहे.
-बँक ला सरकारी स्तरावरुन प्रोत्साहन देणे तसेच हुशार मुस्लिम विद्यार्थी उद्योजक ह्यांचे सार्वजनिक कौतुक अन encouragement.
- सेल्फ हेल्प गृप उर्फ़ स्वयं सहाय्यता गट हा माइक्रो फाइनेंस मधला एक उत्तम पर्याय आहे सुदैवाने मुस्लिम लोकांत त्याला चांगला प्रतिसाद आहे तो पुढे कंटिन्यू राहील अश्या स्टेप्स घेणे , त्याच्यासाठी गरजेचे वोकेशनल कोर्सेज उदा शिवण क्लास, शेळी पालन, पत्रावळी द्रोण तयार करणे, एमएमसीजी मधले डिप्लोमा वगैरे प्रोत्साहित करणे, एग्रो वन मार्केट किंवा खाद्य महोत्सव वगैरे आपण आयोजित करतो तसे त्यांना कस्टमर एक्सपोज़र देणारे मेळावे आयोजित करणे पण करता येईल, वरील सगळे वोकेशनल कोर्सेज स्किल इंडिया अंतर्गत सुरु करता येतील
-नोबेल पारितोषिक विजेते बांग्लादेशचे महंमद युनुस अन त्यांच्या ग्रामीण बँक ह्या माइक्रोफाइनेंस मधल्या कार्याचा अभ्यास अन त्यात लोकल भारतीय कंडीशन नुसार मॉडिफिकेशन करून वापर करणे (हे आमचे स्वगत झाले सरकार ने असे काही केलेही असेल, असल्यास स्तुत्य आहे)
19 Mar 2016 - 4:53 pm | बोका-ए-आझम
यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी याबद्दल बोलणं करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. २००७ च्या मार्च महिन्यात मुंबई विद्यापीठात त्यांचं भाषण झालं होतं. तेव्हा त्यांनी आपल्या ग्रामीण बँकेची तत्वं ऐकवली होती. ग्रामीण बँक फक्त स्त्रियांना कर्ज देते आणि त्यासाठी त्या स्त्रीचं राहतं घर तिच्या नावे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे पुरूषांनी दारु पिऊन बायकांना मारणं खूप कमी झालेलं आहे कारण घर हे आता त्या स्त्रीच्या नावाने असल्यामुळे ती नव-याला घराबाहेर काढू शकते. परतफेडीचा काळ एक महिन्याचा आहे आणि गावातलं पोस्ट आॅफिस किंवा पानवाला हे पैसे स्वीकारणारे बँकेचे एजंट्स आहेत. कर्जाची रक्कम जी वस्तू विकत घ्यायची आहे त्या वस्तूपेक्षा जास्त नसते, जेणेकरून कर्ज घेणाऱ्याला पैसे दुस-या एखाद्या गोष्टीवर उडवायचा मोह होऊ नये.
आपल्याकडे जेव्हा ही पद्धत राबवली गेली तेव्हा यातली सगळी थ्वं पूर्णपणे अंमलात आणली गेली नाहीत. विशेषतः घर स्त्रीच्या नावे असणे. त्यामुळे त्याचा म्हणावा तेवढा प्रभाव दिसला नाही. हे स्वतः युनुस यांच्याकडून ऐकलेलं आहे.
18 Mar 2016 - 2:25 pm | आबा
..नाही, उच्च शिक्षण घ्यायचे, चांगली नोकरी करायची, धंदा करायचा शक्य असेल तर विदेशांत जावून स्थायिक व्हायचे अशीच लिमिटेड स्वप्ने होती
बोला, भारत माता की जय :)
18 Mar 2016 - 2:36 pm | नाना स्कॉच
ठ्ठो sssssssss :D :D :D :D
18 Mar 2016 - 8:41 pm | आजानुकर्ण
वंदे मातरम्!
17 Mar 2016 - 7:09 pm | तर्राट जोकर
हिंदूंच्या मानसिक असुरक्षिततेचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न काही धूर्त संघटनाही करत आहेत.
18 Mar 2016 - 12:05 am | ट्रेड मार्क
चला हिंदू असुरक्षित आहेत हे तरी मान्य केलं, मग ते मानसिकरीत्या का होईना.
बाकी मुसलमानांच्या तथाकथित असुरक्षिततेचा फायदा तर घेतला गेलाय बऱ्याच अतिधूर्त व्यक्ती, संघटना आणि राजकीय पक्षांकडून. अजूनही घेतला जातोय.
17 Mar 2016 - 8:51 pm | सर्वसाक्षी
काय सांगता! माती कधी चारली? १९६६ साली? १९७० साली? सेना अजूनही महाराष्ट् राज्यात स्वबळावर एकदाही सत्तेवर आलेली नाही. आपण महाराष्ट्र राज्याचे विधानसभा/ लोकसभा निकाल पाहा, अनेकदा कॉन्ग्रेसला आसराच मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत कॉन्ग्रेसला हाग्या मार खावा लागला तो मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा कडुन.
सेनेने कधी कायद्याबाहेर जाऊन ठोकशाही केली नाही असे आपले मत आहे का?
सेनेने स्विकारलेला खडतर मार्ग कोणता ते सांगा.
सेनेने सुरुवातीच्या मराठी माणसांना नोकर्या मिळवुन देण्यात पुढाकार घेतला हे निश्चित पण मराठी प्रेमामुळे कुणी कॉन्ग्रेस सोडुन सेनेत गेल्याचे ऐकिवात नाही. हिंदू मुस्लिम दंगलीत मुंबईकर हिंदुंना सेनेचा खूप मोठा आधार वाटायचा हे निर्विवाद सत्य आहे.
मात्र महापालिका ताब्यात असताना, भरपूर नगरसेवक असताना मुंबईत अमराठी लोकांच्या दाट वसाहती कशा काय उभ्या राहिल्या?
मी सेना जवळपास स्थापनेपासून पाहत आहे आणि एकेकाळी सेनेचे समर्थनही करायचो. पण 'तारतम्य' वाली सेना कधीच संपली. प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, दत्ता नलावडे, गजानन किर्तिकर, मनोहर जोशी, रमेश प्रभु, सुधीर जोशी, वामनराव महाडिक हे कधीच इतिहास जमा झाले.
17 Mar 2016 - 9:58 pm | श्रीगुरुजी
+९९९९९९९९९९९....
सेनेने स्वतःच्या ताकदीबद्दल अनेक गैरसमज पसरविले होते/आहेत. भाजप म्हणे सेनेमुळे महाराष्ट्रात वाढला. वस्तुस्थिती याच्या बरोब्बर उलट आहे. एप्रिल १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यावर महाराष्ट्रात मे १९८० मध्ये पूर्णपणे स्वतंत्र लढून भाजपने महाराष्ट्राच्या जवळपास सर्व भागातून आपले १२ आमदार निवडून आणले होते. त्यावेळी शिवसेनेचे शून्य आमदार निवडून आले होते. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात इंदिरा कॉंग्रेसची लाट होती. इंदिरा काँग्रेसला देशात ५४३ पैकी तब्बल ३५५ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसने शिवसेनेबरोबर युती करून निवडणुक लढविली होती. त्यात शिवसेनेने मुंबईत २ जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे होते. उर्वरीत ४६ जागांवर इंदिरा काँग्रेसचे उमेदवार होते. इंदिरा काँग्रेसने ४६ पैकी तब्बल ३९ जागा जिंकल्या. परंतु आपला बालेकिल्ला समजला जाणार्या मुंबईत, प्रचंड लाट असलेल्या इंदिरा काँग्रेसबरोबर युती करूनसुद्धा शिवसेनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नव्हता. आणि म्हणे मुंबई आमचा बालेकिल्ला आणि भाजप आमच्यामुळे वाढला!
शिवसेना १९६६ साली स्थापन झाली. त्यानंतर १९६९ मध्ये एका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा १ आमदार निवडून आला आणि नंतर १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत १ आमदार निवडून आला. १९८५ च्या निवडणुकीत भाजपचे १६ आमदार निवडून आले होते. म्हणजे १९६६-१९८९ या २३ वर्षात शिवसेनेला फक्त २ आमदार निवडून आणता आले होते. १९९० साली भाजपबरोबर युती केल्यावर शिवसेनेने दांडगाई करून भाजपचा बालेकिल्ला असलेले अनेक मतदारसंघ (उदा. शिवाजीनगर) हिसकावून घेऊन स्वत:च्या घशात घातले आणि २८८ पैकी तब्बल १८३ जागा लढविल्या. तरी फक्त ५२ आमदार निवडून आले (म्हणजे ५१ आमदार वाढले). भाजपने फक्त १०५ जागा लढवून ४२ आमदार निवडून आणले (म्हणजे २६ आमदार वाढले). म्हणजे भाजपबरोबर युती करून भाजपला जेवढा फायदा झाला त्याच्या दुप्पट फायदा शिवसेनेला झाला.
ठाणे व मुंबईतील काही ठराविक भाग सोडले तर सेनेला महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते. भाजपने मराठवाड्यातून गोपीनाथ मुंडे, मुंबईतून राम नाईक व हशू अडवाणी, ठाण्यातून राम कापसे, कोकणातून डॉ. नातू, पुण्यातून अरविंद लेले, अण्णा जोशी असे वेगवेगळ्या भागातून १-२ का होईना पण स्वबळावर आमदार निवडून आणले होते. भाजपमुळेच महाराष्ट्रात शिवसेनेची वाढ झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोण मोठा भाऊ याच स्पष्ट उत्तर जनेतेने दिले आहे.
२००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत सेना १०० + भाजप ३२ अशी स्थिती होती. २००७ मध्ये सेना ८४ + भाजप २८ व २०१२ मध्ये सेना ७५ + भाजप २९ अशी स्थिती होती. भाजपने आपल्या नगरसेवकांची संख्या फारशी कमी होऊन दिलेली नाही. परंतु सेनेची सातत्याने घसरण सुरू आहे. २०१७ मध्ये जर सेना स्वबळावर लढली तर सेनेचे ५० पेक्षा कमी नगरसेवक असतील.
मराठी, मराठी गजर करताना शिवसेनेने अनेक अमराठी लोकांना राज्यसभेचे खासदार केले. सेनेने खडतर मार्ग वगैरे कधीही स्वीकारलेला नाही. वाटेल ते प्रक्षोभक बोलणे एवढेच सेनेचे व्यवच्छेदक लक्षण.
तसं पाहिलं तर शिवसेनेत तारतम्य कधीच नव्हतं. १९९२ साली बाबरी मशीद प्रकरणानंतर बाळासाहेब कसे शूर होते असे चघळले जाते. त्यावेळचे त्यांचे उद्गार हे सावध व जरतर शब्द वापरून काढलेले आहेत हे सोयिस्कररित्या दुर्लक्षिले जाते. २०१४ मध्ये बाळासाहेब असते तर त्यांनी भाजपने युती तोडल्यावर अशी भाषा वापरली असती की त्यापुढे उद्धव, राऊत इ. ची भाषा सुसंस्कृत वाटली असती.
18 Mar 2016 - 1:32 am | आजानुकर्ण
+४२०
श्रीगुरुजी आणि सर्वसाक्षी यांच्याशी एकाच वेळी सहमत होण्याची वेळ कधी येईल असे वाटले नव्हते. मात्र आमचा येथे अपेक्षाभंग झाला आहे हे या ठिकाणी या माध्यमातून जाहीर करत आहोत.