प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
16 Mar 2016 - 9:37 pm
गाभा: 

दररोज पेपरात प्रेमभंगातून नैराश्य आल्याने अथवा विरुद्धलिंगी व्यक्तीने योग्य प्रतिसाद न दिल्याने अथवा आपल्या प्रेमास समाजाने /कुटुंबाने मान्यता न दिल्याने आत्मघात केल्याच्या बातम्या येत असतात ....

आम्ही स्वत: प्रेमात तसे अपयशीच , आमची व्यथा इथे पहा ... http://www.misalpav.com/node/27748
तर प्रेम म्हणजे नक्की काय असते ? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केयास अनेक उत्तरे समोर आली ...
विकीबाबा म्हणतात... Love is a variety of different feelings, states, and attitudes that ranges from interpersonal affection to pleasure It can refer to an emotion of a strong attraction and personal attachment.[1] It can also be a virtue representing human kindness, compassion, and affection—"the unselfish loyal and benevolent concern for the good of another".[2] It may also describe compassionate and affectionate actions towards other humans, one's self or animals.[3]

पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रेम भावना ही विशिष्ट वयात ( पौगंडावस्था ते युवा -तरुण अवस्था ) पुनरुत्पादन /प्रजोत्पादना साठी निसर्गात:मानवी मेंदुमध्ये जे हार्मोनिक बदल होतात त्यास भिन्नलिंगी आकर्षक व्यक्ति दिसल्यानंतर मेंदूने दिलेले प्रतिसाद व त्याचे अभिव्यक्तीकरण असे असावे असे वाटते ... प्रेमात माणसे खरोखर वेडी होतात ,आंधळी देखील होतात याचा अनुभव मला स्वत:ला तर आलाच ,पण इतर अनेकांमध्येही तशी लक्षणे कॉमन आढळली ....

आपणास काय वाटते ? प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

16 Mar 2016 - 9:43 pm | टवाळ कार्टा

धाग्याचे शीर्षक वाचून सग्ळ्यात पहिले डोक्यात हे आले :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2016 - 6:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=)) =)) =))

अभ्या..'s picture

16 Mar 2016 - 9:44 pm | अभ्या..

लै भारी असतं.
मज्जा मज्जा असती. ;)

गौरी लेले's picture

17 Mar 2016 - 9:47 am | गौरी लेले

असे का बोलता अभ्या ? प्रेमभंगाच्या दुःखाची आपल्याला जाणीव आहे का ?
उगाच अनुभव नसताना असे काही तरी बोलणे योग्य नव्हे

अभ्या..'s picture

17 Mar 2016 - 11:07 am | अभ्या..

सॉरी गौरीताई काळे.
मी प्रेमाचे साईड इफेक्ट विसरलोच. :(
आपल्या अनुभवी बोलानी या धोक्याची जाणीव करुन दिली. धन्यवाद.

विवेक ठाकूर's picture

17 Mar 2016 - 12:25 pm | विवेक ठाकूर

यावरनं आठवलं, माझी एक क्लायंट म्हणायची, विमानाला अपघात होतात म्हणून विमानात बसायचाच नाही का ?

अभ्या..'s picture

17 Mar 2016 - 12:40 pm | अभ्या..

अर्र अगेन सॉरी.
मला आशा काळे ताई म्हणायचे होते. ;)

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

16 Mar 2016 - 10:13 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

हे प्रेम कि वासना?

गरिब चिमणा's picture

16 Mar 2016 - 10:31 pm | गरिब चिमणा

प्रेम बीम सगळं खोटं असतं, पुरुषाच्या स्त्री विषयक वासनेला दिलेला शाब्दीक मुलामा आहे तो.

विवेक ठाकूर's picture

16 Mar 2016 - 10:46 pm | विवेक ठाकूर

.

उच्च विचार सरणीचे कौतुक वाटले.
कालच ८५ वर्षाचे आजोबा (रुग्ण म्हणून) आले असताना त्यांच्या ८२ वर्षाच्या बायकोने त्यांच्या प्यान्टची बटणे लावायला ज्या तर्हेने मदत केली ते पाहून
आणि आज तुमचा हा उच्च प्रतिसाद पाहून
गोंधळात पडलेला.
सुबोध

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2016 - 11:20 am | प्रसाद गोडबोले

प्यान्ट ची बटने लावणे म्हणजे प्रेम असे असेल तर माझे माझ्यावर देखील प्रेम नाही ... कारण माझ्या सर्वच प्यान्टना चेन आहे =))

अबे खाली चेन असली तरी वर बटन नायतर हूक असतेच की. डेनिमला पण चांगले मज्बूत बटन असते मेटलचे.
येडी हळद.

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2016 - 11:33 am | प्रसाद गोडबोले

अर्र्र ... ते त्यांनी बटणे असा उल्लेख केल्याने मला चेन च्या जागी असणारी बटणे आठवली, पुर्वी चेन च्या ऐवजी बटणे असायची ती !

असो. बाकी ते डेनिमचे बटन लावले की आजकाल पोटावर कच कडतो म्हणुन बटन लावणे मी तसेही बन्द केले आहे , डायरेक्ट वरुन बेल्ट घालायचा . शिवाय आपल्यावर असे प्रेम करणारी कोणी भेटली तर तिला बटन काढायचा\लावायचा त्रास कशाला ? उगाच वेळेचा अपव्यय =))))

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2016 - 4:48 pm | टवाळ कार्टा

इलॅस्टिकवाली पँट घे... =))

अर्धवटराव's picture

17 Mar 2016 - 11:21 am | अर्धवटराव

खरच गोंधळात पडण्यालायक सिच्युएशन आहे =))

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2016 - 11:22 am | प्रसाद गोडबोले

होय ना राव , त्या ८५ वर्षांच्या आजोबांचे नाव "एन . डी. तिवारी" असु शकते ;) =))

सुबोध खरे's picture

17 Mar 2016 - 12:56 pm | सुबोध खरे

बायको "८२" वर्षाची आहे

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2016 - 1:14 pm | प्रसाद गोडबोले

बायको "८२" वर्षाची आहे
>>>>
आत्ता इथे एन.डी असते तर म्हणाले असते की "त्याने काय फरक पडतो , ना उम्र की सीमा हो , ना जन्म का हो बंधन , जब प्यार करे कोई तो देखे केवल मन "

nd

=))))

सुबोध खरे's picture

17 Mar 2016 - 6:08 pm | सुबोध खरे

trong>ना उम्र की सीमा हो , ना जन्म का हो बंधन , जब प्यार करे कोई तो देखे केवल मन "
हंगाश्शी
"प्रेम बीम सगळं खोटं असतं, पुरुषाच्या स्त्री विषयक वासनेला दिलेला शाब्दीक मुलामा आहे तो."
हे दरिद्री चिमणा यांना तुम्ही च उत्तर दिले ते बरं.

बोका-ए-आझम's picture

16 Mar 2016 - 10:59 pm | बोका-ए-आझम

मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है आणि प्रेम रतन धन पायो या चारही चित्रपटांमध्ये.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2016 - 7:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अंदाज अपना अपना सारखा एपिक पिच्चर कसा इसरलात बोकोबा.

झालचं तर पार्टनर, जुडवा आणि अन्य कैक पिच्चरं तुमच्या पर्तिसादामधे णाहीत.

बोका-ए-आझम's picture

17 Mar 2016 - 9:30 am | बोका-ए-आझम

पार्टनर पाहिला नाही. जुडवा आणि अंदाज अपना अपना विसरलो. तसं मै प्रेम की दीवानी हूं मध्ये हृतिक आणि अभिषेक असे दोन प्रेम आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Mar 2016 - 11:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं :)

सुबोध खरे's picture

17 Mar 2016 - 9:42 am | सुबोध खरे

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2016 - 1:32 am | डॉ सुहास म्हात्रे

इति, कविवर्य मंगेश पाडगावकर. हे लिहायचं राहिलंच की !

निशांत_खाडे's picture

17 Mar 2016 - 1:02 am | निशांत_खाडे

मनापासून धन्यवाद,या विषयावर धागा काढल्याबद्दल. बऱ्याच दिवसांपासून हे घोळत होते मनात. योग्य शब्दात सांगता येईल का नाही हे माहित नाही पण प्रयत्न करतो.

सांगायचेच झाले तर, एखादी आपल्याला 'उत्तेजित' करण्याइतकी चांगली शारीरिक ठेवण असणारी आणि आपल्यासारख्या आवडीनिवडीची व्यक्ती भेटली की हे "प्रेम" होते, अशी व्याख्या प्रेमाची करता येईल.

तरीही आपल्याला नेमके "प्रेम म्हणजे काय आहे ब्वा?" हा प्रश्न सतत पडत असतो, त्याचे मूळ कारण म्हणजे 'प्रेम' हा शब्दच आहे.
माणूस हा भावनिक आणि सामाजिक प्राणी आहे, म्हणून ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीची निवड करतो तिथपासूनच तिच्याशी आपले एक भावनिक व सामाजिक नाते तयार होणे स्वाभाविक आहे, त्यात चढउतार हि तितकेच स्वाभाविक आहेत. राग, आनंद, आकर्षण, सहानुभूती अशा सर्वच मानवी भावना त्यात आल्या. सामाजिक अडचणी, दबाव हाही आलाच. काहीजण यातून मार्ग काढून नाते टिकवतात, तर काही लोकांना ते जमत नाही.
याचेच एक उदाहरण म्हणून बाजीराव आणि मस्तानीचे प्रकरण घ्या ना. त्यांच्या संबंधाला शारीरिक आणि भावानिकते पेक्षा जास्त सामाजिकते मुळे अडचणीत येत होत्या, त्यांच्या परीने त्यांनी ते नाते टिकवण्याचा प्रयत्न केला. रोमीओ-जुलियेट, लैला-मजनू, हीर-रांझा, सलीम-अनारकली हे हि सामाजिक अडचणींमध्ये अडकलेले परंतु परस्परांना कंपटीबल असणारे स्त्री पुरुष. म्हणजे ही जी काही 'प्रेम' ही भानगड आहे, ती सुरु होते शरीर व भावनेतून पण टिकते दोघांच्या निष्ठेतून. निष्ठा सर्वात महत्वाची. निष्ठा असेल तर नाते टिकेल, निष्ठा नसली तर ते प्रेम 'खरे' प्रेम नाही (ही आणखी एक भानगड). प्रेम हा शब्द थोतांड आहे, असे म्हणायला हरकत नाही.

खरेतर आपण हे सगळेच एका शब्दात बसवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच माती खातो. वरून कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, चित्रपट हे आपल्याला या प्रेमासंबंधी बाष्कळ सल्ले देत चलतात, आणि प्रेमाची संपूर्ण नियमावली व आचारसंहिता बनवून टाकतात. प्रेमाचा अर्थ प्रत्येक व्यक्ती साठी वेगवेगळा असू शकेल, एक ठराविक व अचूक उत्तर असायला ती काही एखादी वैज्ञानिक संकल्पना नाही.
प्रेमात माणसे आंधळी आणि वेडी होतात हा ही भावना व निष्ठेचाच एक भाग असेल असे ढोबळमानाने म्हटले तर वावगे ठरणार नाही. समाजाने मान्यता न दिल्याने आत्मघात करणे हे शक्यतो एका ठराविक वयातच होते, त्यावेळी भावना आणि आकर्षण दोन्हीही खूप तीव्र असतात म्हणू होत असावे.
एकतर्फी प्रेमात जीव देणेही जवळपास त्याच वयात होते, पण यात नकार न पचवता येणे व हळवेपणा कारणीभूत असेल, असे वाटते, कारण याच वयात मार्क कमी पडल्याने, एखाद्या स्पर्धेत हरल्यामुळेही जीव दिल्याची उदाहरणे आहेतच.

एकंदरीत काय, तर प्रेम अशी काही एक ठराविक भावना नसतेच. दोन विरुद्धलिंगी (आणि आता समलिंगी सुद्धा) व्यक्तींच्या एकमेकांविषयीचा शेकडो भावनांना दिलेला तो एक ढोबळ शब्द आहे. त्यामुळे, प्रेम असे असते, प्रेमात अमुक झाले पाहिजे, प्रेमात मनातले ओळखता आले पाहिजे, प्रेम म्हणजे यातना, प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहणे, खरे प्रेम एकदाच होते, पहिले प्रेम विसरता येत नाही, हे सर्वांच्या बाबतीत खरे असते असे नाही. प्रेम या शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या परीने शोधावा, जो तुम्हाला योग्य वाटेल, तोच प्रेमाचा खरा अर्थ.

निशांत_खाडे's picture

17 Mar 2016 - 3:07 am | निशांत_खाडे

अवांतर: प्रेत्यक प्रियकराने आपापल्या प्रेयसीला मारून टाकून तिच्या कातडीचा डफ करून त्यावर प्रेमगीतं म्हटली पाहिजेत, एरवी नुसते प्रेम ठीक आहे.
(नेमाडेंच्या कोसला मधून)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2016 - 7:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जो तुमकु सामनेवाले पे होना और सामनेवालेका किसी और पे होणा मिया.

रच्याकने अश्या वेळी वपुंची नरकाची व्याख्या पटते.

नाखु's picture

17 Mar 2016 - 8:54 am | नाखु

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांचं जरी सेम असतं, तरी त्याच वेगळं, स्वतःच नेम असतं !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांचं जरी सेम असतं, तरी कधी-कधी घरच्यांसाठी शेम असतं !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांचं जरी सेम असतं, तरी कधी-काळी फसलेली गेम असतं !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांचं जरी सेम असतं, तरी आपलं ते उद्दात आणि दुसर्याचं ते लफडं असतं !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांच जरी सेम असतं, तरी फसलेल्या प्रेमाचंही हक्काचं एक होम असतं !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांचं जरी सेम असतं, तरी अ‍ॅरेंज प्रेमाचं नक्की मॅरेज होत नसतं !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांचं जरी सेम असतं, तरी झालेल्या लग्नाचं नक्की क्लेम होत नसतं !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांचं जरी सेम असतं, तरी त्या गद्धेपंचविशीतल्या घोडचुकांनाही एक "सेफनेम"असतं !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांचं जरी सेम असतं, तरी ते वेळच्या वेळी विचारण्यातही एक खरं "जेम" असतं !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांचं जरी सेम असतं, तरी ते वेळच्या वेळी नाही विचारलं तर मात्र फक्त "ब्लेम-गेम" असतं !


अखिल मिपा भाव विश्व चक्री पारायणी वाचक संघ आणि अखिल मिपा होतकरू, कर्तव्यदक्ष युवक चळवळ यांचे तर्फे उडन खटोला यांचे ज्ञान-तृष्णा-शांती हितार्थ प्रसारीत.

कठीण शब्दांचे "काम"चलाऊ अर्थ.

नेम्=नाव (निशाणा नव्हे)
शेम = लज्जा (सेम सारखे नव्हे)
गेम = फज्जा (एक्षेक्षेक्ष नव्हे)
होम = घर (होम हवन मधला नव्हे)
क्लेम =यशस्वी (हक्क्/दावा नव्हे)
सेफनेम= गुपीत (जास्ती भाष्य जरूरी नाही)
जेम्=धाडस (खायच्या गोळ्या नव्हे)
ब्लेम-गेम्=लोच्या (कुणी आधी विचारायला पाहिजे होतं हा)

प्रचेतस's picture

17 Mar 2016 - 8:59 am | प्रचेतस

गुटर्रघूम...गुटर्रघूम...

प्रचेतस's picture

17 Mar 2016 - 9:37 am | प्रचेतस

:)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2016 - 9:36 am | अत्रुप्त आत्मा

धडामधूम... धडामधूम...

टवाळ कार्टा's picture

18 Mar 2016 - 11:49 pm | टवाळ कार्टा

ह्म्म्म तुम्हाला कबुतरांची ब्रेच माहिती आहे म्हणे

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2016 - 1:37 am | डॉ सुहास म्हात्रे

हे राहिलंच...

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळयांचं जरी सेम असतं, शेवटी सगळा हॉर्मोन्सचा गेम असतं ! :)

याॅर्कर's picture

17 Mar 2016 - 10:32 am | याॅर्कर

आजकालचं प्रेम ना?
नुस्ता टाईमपास आहे.

मराठी कथालेखक's picture

17 Mar 2016 - 11:32 am | मराठी कथालेखक

एखाद्या बालकाने (मुलगा/मुलगी) आयुष्यात कधीच कोणत्याही प्रकरची प्रेमकथा/मैत्रीकथा ऐकली पाहिली नाही (कोणतेही पुस्तक, सिनेमा, ऐकीव कथा , दूरचित्रवाणी मालिका ई सगळ्यांपासून दूर, तसेच त्याने/तिने वास्तव आयुष्यातही कुणाला प्रेम करताना म्हणजे "हात हातात घेणे, मिठीत घेणे, प्रेमाची/मैत्रीची कबुली देणे" पाहिले नाही) पण भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास मुद्दाम घडवलाही नाही वा मुद्दाम टाळलाही नाही तर या मुलाचे/मुलीचे भावविष्व कसे घडेल ? मैत्री (समलिंगी/भिन्नलिंगी) वा प्रेम (भिन्नलिंगी) या भावना कशा आकार घेतील ? बर्‍यापैकी कठीण पण तरी करुन पाहण्यासारखा प्रयोग आहे असे वाटते का ? अनेक बालकांवर असा प्रयोग केला तर मानवात प्रेमाची असंस्कारित भावना नेमकी कशी विकसित होते हे समजू शकेल असे वाटते का ?

आज आपले प्रत्येकाचे मैत्री/प्रेम याबद्दल जे काही विचार असतील त्यावर पुस्तक, सिनेमा ई ई चा बराच प्रभाव असेल वाटते का ?

हाच प्रश्न मलाही पडलेला आहे.. पण त्याचे उत्तर तसे कठीण नाही.. एकदा ही गोष्ट हार्मोनल आहे हे मान्य केले, की मग --- तुमची ब्याकग्राऊंड काहीहा असो, हार्मोनापले काम करणार म्हणजे करणारच..

मराठी कथालेखक's picture

17 Mar 2016 - 3:46 pm | मराठी कथालेखक

बरोबर आहे तुमच पण हार्मोन्स अगदी स्वतंत्रपणे नेमके कसे काम करतात ते बघायला हवे ? कदाचित आदिमानवाच्या काळातले प्रेम कसे होते त्याचा शोध लागेल ? In fact मग त्याला प्रेम म्हणावे का हा ही प्रश्न पडेल.
प्रेम, निष्ठा , मनाचे प्रेम ई सगळ्या कल्पना हार्मोन्सपेक्षा बुध्दीच्या आहेत.
मी फक्त प्रेमाबद्दलच नाहीतर मैत्रीबद्दलही बोलत आहे. जय-वीरु वा दिल चाहता है वाल्या मैत्रीच्या कथा पाहून आपल्याला आपले "अमूक हा/ही बेस्ट फ्रेंड" बगैरे फिक्स करायचा मोह होतो ठराविक वयात.
नाटक, कथा , सिनेमातली तत्वज्ञानांनी भरलेली वाक्य आपल्यावर प्रभाव टाकत असतात
उदा: सच्ची मोहब्बत बस एक बार होती है.
हसी तो फसी
प्यार मे ना का मतलब हा होता है
एक दिल दुसरे दिल की आवाज सुनही लेता है ई ई.
काही नकारात्मक वाक्य पण असतात जसे "ये औरत होती ही बेईमान है.."

मग अशा वेळी निव्वळ हार्मोन्सचा प्रभाव कळतो का ?

फक्त भिन्नलिंगी आकर्षणातून उत्पन्न झालेल प्रेम वा समवयस्क तरुणांचि मैत्री इतकच नव्हे तर हे चित्रपट इतरही नात्यात किती प्रेम, घट्टपणा असावा याचा एक तक्ताच जणू आपल्यासमोर ठेवतं की काय अस मला वाटत
उदा: आई-मुलगा, वडील-मुलगा /मुलगी, बहीण-भाऊ ई मध्ये किती प्रेम असावं याचे नियमच बनवले गेले आहेत जणू

बेकार तरुण's picture

17 Mar 2016 - 11:49 am | बेकार तरुण

माझ प्रेमाबद्दल मत (शिरीष कणेकरांची माफी मागुन)
आपण करतो ते प्रेम असतं, दुसरे करतात तो खुळचटपणा असतो
आपली गर्लफ्रेंड नेहमीच सालस, सोज्वळ वगैरे वगैरे असते, दुसर्‍याची फारच लफडेबाज असते
आपला होतो तो प्रेमभंग असतो, दुसरा कायम नाही तो आचरटपणा केल्याचा परिणाम भोगत असतो
असो... शेवटी प्रेम म्हणजे बॉलीवूड वाल्या अनेक पिढ्यांनी जगाव म्हणुन बनविलेले काहीतरि प्रकरण असते

गामा पैलवान's picture

17 Mar 2016 - 12:31 pm | गामा पैलवान

मी पुरूष असून माझं एका पुरुषावर प्रेम आहे. तरीही मी होमो नाही. ओळखा पाहू मी कोण!
-गा.पै.

आदूबाळ's picture

17 Mar 2016 - 12:36 pm | आदूबाळ

स्वची ओळख पटलेल्या "मी"पाकरांबद्दल बोलताय का?

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 1:08 pm | गामा पैलवान

नाही हो, आदूबाळ! ते स्वत:संबंधी आहे. :-) प्रत्येकजण स्वत:च्या प्रेमात असतोच/तेच. म्हणून तो/ती काही होमो/लेस्बो होत नाही! ;-)
आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

17 Mar 2016 - 12:37 pm | मराठी कथालेखक

मुलाचा बाप :)

नाव आडनाव's picture

17 Mar 2016 - 1:34 pm | नाव आडनाव

ओळखा पाहू मी कोण!
गामा पैलवान. आयडी दिसतोय ना.

बाकी सहितलं आ.न. काढून टाकलं. काय इशेश ?

अभ्या..'s picture

17 Mar 2016 - 1:37 pm | अभ्या..

अब वो बाय डिफॉल्ट विनम्रताकेसाथ हो गये.
गापै = विनम्रता

गामा पैलवान's picture

18 Mar 2016 - 1:06 pm | गामा पैलवान

नाव आडनाव,

एखाद्याला उद्देशून प्रतिसाद असेल तर आ.न. ची पुस्ती जोडायची. अन्यथा गरज नाही. :-)

आ.न.,
-गा.पै.

सस्नेह's picture

17 Mar 2016 - 3:05 pm | सस्नेह

प्रेम ना ?
ते एक आईस्क्रीम असतं बघा !
लग्नाआधी कोनात टाईट फिट्ट बसलेलं असतं. लग्नानंतर ड्रीमकोन फाटतो. प्रेम-आईस्क्रीम पाघळू लागतं...
..काही वर्षांनी ना कोन, ना आईस्क्रीम...नुसती झिनझिन !

नीलमोहर's picture

17 Mar 2016 - 4:03 pm | नीलमोहर

ताई फुल्ल chill mode मध्ये आहेत :)

पण प्रेम म्हणजे आग का दरिया पण असतं ना.. मग आईस्क्रिम.. आग.. नक्की थंड घ्यायचं का गरम ?

सस्नेह's picture

17 Mar 2016 - 4:54 pm | सस्नेह

असफल असेल तर आग का दरिया ! सफल म्हणजे थंडगार आईस्क्रीम !!

प्रसाद गोडबोले's picture

17 Mar 2016 - 5:15 pm | प्रसाद गोडबोले

मग आईस्क्रिम.. आग..नक्की थंड घ्यायचं का गरम ?

मागे एका होटेलात चक्क चिली आयस्क्रीम पहायला मिळाले ते घ्यावे ... म्हणजे पोटा बाहेर थंड पोटात गेले की गरम =))))

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2016 - 4:51 pm | टवाळ कार्टा

आयडी आणि प्रतिसाद यांचा कोसो दूर तक संबंध नय हय =))

पांदीत भेटलंस अंगाक खेटलंस काळोख किनाट!
हातात हात धरलास अकस्मात झालो झिनझिनाट!!

उडन खटोला's picture

18 Mar 2016 - 9:20 am | उडन खटोला

ज ब र द स्त

पिलीयन रायडर's picture

17 Mar 2016 - 3:54 pm | पिलीयन रायडर

सवय

मदनबाण's picture

17 Mar 2016 - 10:50 pm | मदनबाण

प्रेम म्हणजे... पाखर्‍याला इलु इलु म्हणण्याची इच्छा होणे ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू तू तू तू मेरी री री री मे तेरा रा रा होने लगा, में में में में तेरा रा रा रा तू मेरी री री होने लगी... :- BANG BANG

भरत्_पलुसकर's picture

18 Mar 2016 - 12:53 am | भरत्_पलुसकर

मानसिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असणे .

हेमंत लाटकर's picture

18 Mar 2016 - 9:40 pm | हेमंत लाटकर

"कामा" पुरतं असतं.

तर्राट जोकर's picture

18 Mar 2016 - 10:37 pm | तर्राट जोकर

सिक्सर!

सिक्सर म्हणजे काय? नवीन बॉल आणा आता.
एकच मारा लेकिन शॉलेट मारा.

नाखु's picture

21 Mar 2016 - 9:00 am | नाखु

प्रतिसाद हा प्रतिसाद ऑफ इयर यात गणला जावा !!!

टोपी काढली आहे कुर्नीसात !!!!

नाव आडनाव's picture

19 Mar 2016 - 12:03 pm | नाव आडनाव

औ$$$$$$$$$$$$र ये रहा सही जवाब !
लाटकर सर, तुम्हाला अर्ध राज्य बक्षीस !

सरल मान's picture

19 Mar 2016 - 5:10 pm | सरल मान

अहो अर्ध काय? इसपे आख्खा राज्य बनता हय.........

पॉसीबल नाही हो. अर्धे आधीच दिलेले आहे. ;)