अमेरिकानुभव : एका भारतीय आईच्या नजरेतून

पलाश's picture
पलाश in विशेष
8 Mar 2016 - 12:00 am

LekhHeader

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}

गेली काही वर्षे अमेरिकेत असलेल्या मुलाचा, तो तिथे असेपर्यंत आम्ही दोघांनी म्हणजे त्याच्या आईवडिलांनी अमेरिका बघावी असा आग्रह चालू होता. मनमोहक निसर्ग, स्वच्छता, वाहतुकीतील शिस्त, मोठमोठे झुळझुळीत रस्ते आणि त्यावर भर वेगात सुळसुळणार्‍या तरीही पोटातलं पाणीही हलत नाही अशा मोटारगाड्या, वगैरे वगैरे अनेक प्रलोभने दाखवून झाली होती. आम्ही 'काय घाई आहे' असे म्हणत वेळ काढूपणा करत होतो. एवढ्या मोठ्या विमानप्रवासाचा ताण, वेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाचे भय अशी कित्येक कारणे त्यामागे होती. मुलांना उघडपणे सांगायची सोय नसतेच, कारण मुले अशा कारणांना "अगदीच अवास्तव अशी काल्पनिक भीती" या सदरात विनाविलंब टाकतात. ;) अखेर या वर्षी तिकडे जाण्याचा योग आला. मुलगी ऑगस्टमध्ये तिथे शिकायला जाणार असल्याने आग्रह वाढला. परिणामी ऑगस्ट महिन्यात तिच्याबरोबर आम्ही उभयता (एकदाचे) तिथे गेलो.

जाताना नशीबात लुफ्तान्झाचे तिकीट फ्रँकफर्ट पासून बिझिनेस क्लासला अपग्रेड होणं हा सुयोग होता. त्याला समतोल करण्यासाठी येताना युनायटेड एअरलाइन्सचा कुयोग पुरेसा झाला. ;) दोन्ही प्रवास मिळून सरासरी काढायची तर हा आंतरराष्ट्रीय विमानप्रवास मध्यम चांगला झाला. सुनेने आणि मुलाने तिथल्या स्थळदर्शनाचे नियोजन पण उत्तम केलेले होते. ते स्थळवर्णन पण जसे ऐकले होते त्याला साजेसेच म्हणजे स्वच्छ, सुंदर, इ.इ.असे करता येईल. तात्पर्य म्हणजे मजा आली. आता इथे मी "अहाहा! काय ती अमेरिका!" असं गोग्गोड वर्णन करणार नाही. मला बोलायचं आहे ते तिथल्या काही अनुभवांबद्दल. यातून मला सर्व अमेरिकन्सबद्दल वा त्या देशाबद्दल काही सरसकट मत मांडायचे नाही. त्या त्या वेळी मला जे जे वाटले ते ते मी लिहिते आहे इतका सीमित अर्थ घ्यावा ही विनंती.

पहिला अनुभव आहे आम्ही युटा राज्यात एका निसर्गसुंदर रस्त्यावरून गाडीने चाललो होतो तेव्हाचा. ऑगस्ट महिना होता. प्रवासाचा पहिला टप्पा होता. एका बाजूला डोंगर व दुसर्‍या बाजूला सतत सोबत करणारी एक छोटी नदी. कुठे शक्य असेल तिथे गाडी थांबवून नदी जवळून बघुया असे ठरले. तसे एका ठिकाणी थांबलो. खळखळणारी नदी, त्या नदीकाठी फुललेली छोटीछोटी फुले असे छान वातावरण होते. फोटो काढणे जोरात चालू होते तेवढ्यात रस्त्याच्या पलीकडे एक गोर्‍या आज्जीबाई हात उंचावताना दिसल्या. आजींचा पन्नाशीतला लेकसुद्धा त्यांच्याबरोबर होता. आम्ही काय पहातो आहोत ते विचारून त्या पंचाहत्तरी उलटलेल्या आजी इकडे या बाजूला पोचल्या. त्यांच्या हाताशी पट्टा अडकवलेला एक कुत्रा होता.

.

"हा बॅरन, माझा सर्व्हिस डॉग. तो माझी काळजी घेतो. माझा मुलगा घरी नसताना मी एकटी असते तेव्हा हा असतो ना माझ्याबरोबर. मला फार आधार आहे याचा. तो एक गुड बॉय आहे." असं सगळं अमेरिकन इंग्रजीतून अगदी कौतुकभरल्या स्वरात सून आणि मुलगी या दोघींना सांगून झालं. अजूनपण कायकाय प्रेमळ स्वरात सांगत होती.
"मी याच राज्यात जन्मले आणि माझं सगळं आयुष्य इथेच गेलं. माझा मुलगा त्याच्या सुट्टीच्या दिवशी फिरायला आणतो मला. मुलगा खूप करतो माझ्यासाठी." इतकं वय होऊनसुद्धा अजिबात कुरकुर करत नव्हती. फार गोड होती. मी चेहेर्‍यावर आपसूकच आलेले स्मितहास्य लेऊन त्या तिघींकडे चार पाच फूट अंतर राखून पहात होते. अमेरिकन इंग्रजी उच्चारांची सवय नसल्याने अर्थ लावत लावत गपगुमान श्रवणभक्ती करत होते. तेवढ्यात मध्येच एकदम माझ्याविषयी प्रश्न आला, "डज शी नो इंग्लीश?" माझ्या पंजाबी ड्रेसमुळे आजींना प्रश्न पडला होता बहुतेक. जीन्समधल्या दोघीजणी पेहरावाने तिला जास्त ओळखीच्या होत्या. त्या तिची भाषा जाणणार्‍या असणार हे तिने गृहित धरले होते. ;) दोघीही मुली म्हणाल्या, "येस." हे "येस" ऐकून माझा जीव भांड्यात पडला की निदान या आपल्या पोरींना तरी वाटतंय की मला ही परभाषा येतेय. ;) बाईंचा मोर्चा माझ्याकडे वळला. माझ्या ड्रेसवरच्या भरतकामाचे कौतुक केले. एका मैत्रिणीने भारतातून त्यांना एक असेच सुंदर जॅकेट आणले होते ते सांगून झाले. यावर उत्तर म्हणून माझे बिचारीचे गरज वाटेल तेथे सुहास्य, गरजेप्रमाणे थँक्स, इ. पेरणे चालू होते. तितक्यात आज्जी अचानक म्हणाल्या, "कॅन आय ह्ग यू?" मी आश्चर्याने थक्कच झाले. मला आज्जी आवडली होतीच. तिला उद्धटपणे नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हताच. पण कातडीच्या रंगातला ढळढळीत फरक विसरून इथे प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात असे काही ऐकू येईल असे वाटलेच नव्हते. मग काय!! इकडे भारतात शेकहँडसुद्धा क्वचित करणारी, नमस्कारी मी त्या आज्जीला "येस, शुअरली!!" असं म्हणाले. तिला भेटल्यावर माझी स्वतःची आई भेटावी तसं काहीसं वाटलं मला. :) हे सगळं फार विशेष वाटलं. माणसं सगळीकडेच सारखीच हेच खरं. सख्खे नातेवाईक कधी मनाने दूरदूर असतात तर ना नात्याचं ना गोत्याचं असं कोणी तुम्हाला कधी मायेने तर कधी मैत्रीने तर कधी अशाच काही धाग्याने जवळचे होऊन जातात. हे वास्तव हजारो मैल अंतर पार केल्यावर परक्या देशात पुन्हा एकदा भेटलं. खरं सांगू, या अशा ओळखीनं त्या दूरदेशात खूप हायसं वाटलं.

आता दुसरा अनुभव म्हणजे प्रवासात आवश्यक अशा स्वच्छतागृहांचा. तिथे रस्त्यांवर अगदी जवळचे स्वच्छतागृह किती अंतरावर आहे आणि त्याच्या लगेच पुढचे किती अंतरावर आहे असे बोर्ड सतत दिसत. पुढच्या थांब्याचे अंतर कळल्याने लगेच थांबावे किंवा नाही हा निर्णय सोपा होई. ही गृहे नावाप्रमाणे स्वच्छ होती. यलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये असलेली अगदी पोर्टा पॉटी़ज सुद्धा बरी होती. या पोर्टा पॉटीजमध्ये पाणी नव्हते पण तिथे सगळीकडे हँड सॅनिटायझर होतेच. आपल्याकडच्या या बाबतीतल्या सोयींची खरं म्हणजे त्रुटींची आठवण आली. तीस - चाळीस वर्षांपूर्वीच्या प्रवासातल्या अनुभवाच्या मानाने आपल्याकडे सध्या सोयी खूप आहेत. पण कितीतरी करणं बाकी आहे हे खरंच. स्त्रियांसाठी या सोयी आजही फार अपुर्‍या आहेत. भटकंती करायला बाहेर पडलं की निदान बायामाणसांना तरी या त्रुटींचा त्रास फार होतो.

या संदर्भात सरताज ठरेल असा अनुभव आला "द ग्राइंड कॉफीहाऊस, सिडार सिटी" इथे. या कॉफीहाऊसची जास्त माहिती तुम्हाला हवी असेल तर येल्प वर ६१ रिव्ह्यूज आहेतच. पण मी सांगते तो अनुभव तिथे येल्पवर नसेल. या कॉफीहाऊसमध्ये भिंतींवर खुसखुशित अवतरणे आणि चित्रांच्या मस्त फ्रेम्स होत्या. त्या बघतबघत कॉफीची वाट पहात असताना आणि कॉफी पिताना छान वेळ गेला. ह्या अशा फ्रेम्स याआधीपण पाहिल्या होत्या. इथे नवलविशेष म्हणजे स्त्रियांच्या विश्रांतीगृहात भिंतीवर तीन सुरेख डिश आर्ट म्हणता येतील अशी चित्रे व दोन रस्त्यांचे चित्र असलेल्या चिमुकल्या फोटोफ्रेम्स होत्या. इतकेच नव्हे तर तिथे एका फुलदाणीत एक पिवळ्या फुलांचा सुंदरसा गुच्छही सजलेला होता. या जन्मी स्वच्छतागृहात असे पुन्हा कधी पहायला मिळेल की नाही कोण जाणे!! असे वाटल्याने मोबाईलवर लगेच त्या भिंतीचा जो फोटो काढला तो खाली देते आहे.

.

हे कॉफीहाऊस जिथे आहे तो सिडार सिटीचा मेन स्ट्रीट आणि एकूणच हे गाव ऑगस्ट महिन्याच्या म्हणजेच तिथल्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जसं दिसलं तसं मला फार आवडून गेलं. इथे घेतलेले सगळे पदार्थ पण चांगले होते. तेव्हा उन्हाळ्यात जवळपास गेलात तर हे ठिकाण चुकवू नकाच. :)

तिसरा अनुभव आहे ज्या गावात मुलाचे घर आहे त्या गावातल्या प्राणीसंग्रहालयातला. जिराफ, रेड पांडा, मादागास्करचा लेमूर, बाल्ड ईगल, महाकाय कासव, व इतरही कित्येक प्राणी आणि पक्षी बर्‍याच मोठ्या मोकळ्या जागेत वावरताना पाहायला मिळाले. त्यांची चांगली काळजीही घेतली जात होती त्यामुळे अशा ठिकाणी माणसाने त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्याच्या मानसिक टोचणीने नेहेमीइतके त्रस्त केले नाही.

.

.

.

.

.

प्रेअरी डॉग्ज पहात होतो तेव्हा तिथे एक रेंजर भेटली. प्राण्यांच्या शीतनिद्रेविषयी बोलता बोलता त्या भागातील थंडी आणि हिवाळ्यात पडणारं बर्फ आणि नव्या माणसाला या हवामानाची वाटणारी भीती यावर गप्पा गेल्या. "या वातावरणाची अजिबात सवय नसलेली माझी मुलगी याच वर्षी इथे शिक्षण चालू करणार असल्याने एक आई म्हणून मला फार भय वाटतंय." अस मी म्हणाले. यावर तिने मुलीला फार छान समजावून सांगितलं. ती म्हणाली, "इथे आमच्या या भागात सगळे चारही ॠतू (seasons) वेगवेगळे स्पष्ट जाणवतात. प्रत्येक ॠतूतली वेगवेगळी मजा असते. त्या त्या ऋतूंमधली वेगवेगळी मजा असं या हवामानातल्या फरकांकडे बघ तू!! थंडीची सवय नसलेल्या तुला सुद्धा मग हे हवामानातले बदल नक्की आवडतील व मानवतील". "Sunshine is delicious, rain is refreshing, wind braces us up, snow is exhilarating; there is really no such thing as bad weather, only different kinds of good weather." हे जॉन रस्किनचं अवतरण जणू ती मुलगी वेगळ्या शब्दात सांगत होती. "त्या मुलीच्या" सगळ्या फरकांकडे/अनुभवांकडे बघण्याच्या या नवीन कोनामुळे परिस्थितीकडे बघण्याचा आमचा चष्मा थोडा साफ झाला. आता हा नवीन दृष्टिकोन सगळ्या बदलांकडे बघताना वापरावा हे पहाणं ओघानेच आलं !! :)

आता इतर काही ठळक आठवणी.
गेल्या गेल्या जाणवलं की आपल्या नेहेमीच्या चालण्याने देखील या दुसर्‍या मजल्यावरच्या घराची जमीन कंप पावते आहे. वजन एवढं पण वाढलं नव्हतं की पायातळीची जमीन हादरावी. ;) म्हणून चौकशी केली तर कळलं की लाकडी जमीन कार्पेटने झाकली आहे. आता हे काय नवीन आणि कशासाठी ही लाकडी घरं? जबरदस्त वैतागले. मग वैतागून डोकं फिरवून घेण्यापेक्षा आता दबक्या पावलांनी अगदी हळुवारपणे चालायला लवकरात लवकर शिकले पाहिजे ही खूणगाठ मनोमनी बांधली. खाली रहाणार्‍या बाई चार दिवसांनंतर भेटल्या तरी हसून बोलल्या म्हणजे ही दबक्या पावलांनी चालण्याची कला अवगत झाली होती. मोठंच संकट दूर झालं. नाहीतर शेजार्‍यांना त्रास होतो म्हणून अपार्ट्मेंटवाले लेकाला आणि सुनेला घर सोडायला लावतील अशी एक शक्यता, जरी बाकी कोणी बोललं नाही तरी माझी मलाच छळायला लागली होती. ;)

बहुतांशी रोज लागणार्‍या वस्तू विकणारी मोठी मोठी व्यापारी दुकानं अर्थात सुपर मार्केट्स ही आता भारतातही गेली दहाएक वर्षे तरी आहेत. पण त्याशिवाय जगणं अशक्य होईल इतकी महत्वपूर्ण ती नाहीत. अमेरिकेत प्रत्येक वीकांताला (weekend) सहसा काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सुपर मार्केटमध्ये चारचा़कीने जाऊन साधारण पुढच्या आठवड्यात लागणार्‍या वस्तू नीट यादी करून आणून व्यवस्थित साठवाव्या लागतात. घरात मोठ्ठा फ्रीज हा देखाव्याचा नाही तर अगदी गरजेचा आहे. चुकून काही आणायचे विसरले तर दोनच पर्याय: पहिला म्हणजे पुन्हा सुपरमार्केटपर्यंत जाऊन ती वस्तू आणणे नाहीतर दुसरा म्हणजे पुढच्या सुपर मार्केट फेरीपर्यंत त्या वस्तूशिवाय काम निभावून नेणे. भारतात कोपर्‍याकोपर्‍यावर छोटे व्यावसायिक व दुकानदारमंडळी अगदी कमी अंतरावर रोजच्या रोज ताजी भाजी/फळे/दूध आणि इतर अनेक वस्तू उपलब्ध करून देतात. हे अगणित पर्याय तिथे नाहीत. या इथल्या पर्यायांची किंमत तिथे कळली.

आपण राहतो त्या भागावर सूर्यनारायणाची किती कृपा आहे, हे तिथे लोकांचे सूर्यप्रकाशाचा आनंद घेणे पाहिले तेव्हा उमगले. सूर्यप्रकाश असलेल्या महिन्यांत चार चाकी गाड्यांच्या मागे दुचाक्या लाऊन तसेच गाड्यांवर छोट्या बोटी लादून सहलीला निघालेले कितीतरी लोक आम्हाला वाटेत सतत दिसत होते. अनेक ठिकाणी लोक मासेमारीचा आनंद घेत होते. कुटुंबे सहलीला निघालेली होती. काही दिवसांनी उबदारपणा आणि स्वच्छ प्रकाश कमीकमी होऊन त्याची जागा कमालीची थंडी आणि प्रकाशाची कमतरता घेणार आहेच, पण आता असलेलं हे प्रसन्न वातावरण होतो होईल तो अंगी भिनवून घेण्याची वृत्ती या लोकांच्या अंगी बाणलेली आहे असं ते पाहून प्रत्येक वेळी वाटत होतं. मी माझ्या देशात असलेला सुंदर उबदार सूर्यप्रकाश "अतिपरिचयात् अवज्ञा" या न्यायाने दुर्लक्षित होते हे तिथे लक्षात आलं.

मला आवडलेले एक खास दुकान म्हणजे फार्म मार्केट. इथे फक्त भाज्या, फळे, फुले, मसाले, चीज इत्यादी उत्पादने व फुलझाडे, कुंड्या, बागेत ठेवण्यासाठी बर्ड-फीडर अशा बागेशी संबंधित गोष्टी मिळत होत्या. त्या दुकानात गेलो होतो. फक्त मिरच्यांचे तेही सुक्या व ओल्या दोन्हीतले खूप आकार, प्रकार, व रंग तिथे पाहिले. तिथे भूत जलोकिआ किंवा घोस्ट चिली ही अतितिखट मिरची पहायला मिळाली. असे फक्त मिरच्यांचे नव्हे तर बहुतेक सर्व वस्तूंचे अनेकविध प्रकार होते. त्या राज्यात पिकलेली स्थानिक उत्पादने खास फलक लावून वेगळी दिसतील अशी विक्रीला ठेवली होती. आत चालत जाऊन वस्तू पहाण्यासाठी भलीमोठी फ्रीज रूम होती. त्यात कुडकुडत का होईना पण गेले. अनेक चीजचे प्रकार याची देही याची डोळा पाहिले. आपल्याकडे सहजी बघायला न मिळणारे काही चीजचे प्रकार विकत आणले. एक अविस्मरणीय अनुभव होता तो. तिथून अगदी कोवळी आणि भरपूर पाने असलेली बिटांच्या कंदांची जुडी आणली. तिची डॉलरमधली किंमत गुणिले ६५ मनातल्या मनात केलं. त्या जडभारी किंमतीमुळे का होईना मुळ्याच्या पानांसारखी ही बिटांची पानेपण खाण्यायोग्य आहेत का व त्याची भाजी होते का हे जालावर पाहिले. खाण्यायोग्य अशा एका अप्रतिम चवीच्या, थोडा रवा व बेसन पेरून केलेल्या नवीन भाजीचा शोध लागला व ती सगळ्यांनाच आवडली. यापुढे इथेसुद्धा निदान मी तरी अशी खाण्याजोगी पाने वाया घालवणार नाही.

तर साधारण अशी होती एका लहान गावात लहानाची मोठी झालेल्या, तालुक्याच्या ठिकाणी काही वर्षे नोकरी करून स्वेच्छानिवृत्ती घेऊन महानगरात रहायला आलेल्या, एकूणात जुन्या पिढीतली असूनही थोडे नवे जगही माहीत असलेल्या, नव्याजुन्याचे मिश्रण अशा एका भारतीय आईला जाणवलेली तिच्या पहिल्यावहिल्या वारीतली अमेरिका.

(चित्र- किलमाऊस्की)
https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

7 Mar 2016 - 11:33 pm | भिंगरी

खूप छान लिहिलय पलाश.

बाबा योगिराज's picture

7 Mar 2016 - 11:45 pm | बाबा योगिराज

अमेरिकेबाबत काही वेगळ्या नजरेतून बघायला मिळाल. सुंदर आहे लेख.

आपणास शुभेच्छा.

बाबा योगिराज's picture

7 Mar 2016 - 11:45 pm | बाबा योगिराज

अमेरिकेबाबत काही वेगळ्या नजरेतून बघायला मिळाल. सुंदर आहे लेख.

आपणास शुभेच्छा.

नूतन सावंत's picture

7 Mar 2016 - 11:49 pm | नूतन सावंत

पलाश,शब्द्चित्र सुरेख आहे.

रेवती's picture

8 Mar 2016 - 3:22 am | रेवती

लेखन आवडलं, पलाशताई!

खटपट्या's picture

8 Mar 2016 - 4:28 am | खटपट्या

चांगला आहे अनुभव !!

मृत्युन्जय's picture

8 Mar 2016 - 11:54 am | मृत्युन्जय

खुप सुंदर झालाय लेख. वेगळ्या नजरेतुन पाहिलेली अमेरिका आवडली :)

सुंदर लेखन. अनुभव आवडले.

वेल्लाभट's picture

8 Mar 2016 - 3:40 pm | वेल्लाभट

सुरेख!

सुंदर व साधंसरळ लिहिलेलं आवडलं.

खूप छान लेख. अनुभव आवडले. त्या आजीबाईचे चित्र डोळ्यासमोर तयार झाले.

रंगासेठ's picture

8 Mar 2016 - 5:45 pm | रंगासेठ

खूप छान लेख आहे. मनातील भाव योग्य उतरलेत लेखात. माझी पण अमेरिकावारी झाली या लेखामुळे. :-)

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2016 - 6:56 pm | प्रीत-मोहर

मस्तच

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Mar 2016 - 9:18 am | भाग्यश्री कुलकर्णी

पलाश तुम्ही खूप छान लिहलयं. वर रंगासेठ म्हणतात तसे आमचीही अमेरिकावारी झाली.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Mar 2016 - 9:18 am | भाग्यश्री कुलकर्णी

पलाश तुम्ही खूप छान लिहलयं. वर रंगासेठ म्हणतात तसे आमचीही अमेरिकावारी झाली.

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2016 - 9:33 am | पूर्वाविवेक

खूप सुंदर लिहिलंय तुम्ही पलाश ताई. मला तर वाटायचं की अमेरिकन लोक तुटक, माणूसघाणी असतात. पण इथे त्याचं वेगळंच रूप पाहायला मिळाल.

सर्व वाचकांना व प्रतिसाद देणार्‍या मिपापरिवारातील सदस्यांना धन्यवाद!!! :)

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2016 - 10:03 am | श्रीरंग_जोशी

गेल्या काही वर्षांपासून आम्ही अमेरिकेत राहत आहोत. सुरुवातीला इथे आल्यावर ज्या भावना मनात येत असत त्यांचा पुनर्प्रत्यय तुमचा हा लेख वाचून आला. एकूणच हे लेखन खूप भावलं.

जिन्गल बेल's picture

9 Mar 2016 - 10:04 am | जिन्गल बेल

आवडलं....

सविता००१'s picture

9 Mar 2016 - 10:22 am | सविता००१

मस्त लिहिलंय पलाश ताई. आवडलं.

साधे आणि प्रभावी शब्दांकन !

विवेक ठाकूर's picture

9 Mar 2016 - 5:41 pm | विवेक ठाकूर

तरीही लक्षात रहावं असं सुरेख लेखन . भारताच्या सूर्याशी असलेल्या अँगलची कळायला लागल्यापासून जाम कृतज्ञता आहे .

प्रश्नलंका's picture

9 Mar 2016 - 5:50 pm | प्रश्नलंका

मस्तं पलाशताई छान लिहिलय. लेखन आणि अनुभव दोन्ही खुप आवडले.

मस्त लेख पलाश ताई. आता मला पण बिटाच्या पानांची भाजी करुन बघायला पाहिजे.

आईच्या नजरेतून पाहिलेली आणि अनुभवलेली अपूर्वाई आवडली!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2016 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लिहीलं आहे. कोणताही आवेश न आणता एक साधं सरळ वर्णन आहे, आणि म्हणूनच ते मनाला भिडलं !

साधं सरळ अभिनिवेशरहित कथन.आवडला लेख.

सही रे सई's picture

10 Mar 2016 - 9:38 pm | सही रे सई

छानच लिहिल आहेत पलाश ताई. अमेरिकेतील चांगल्या गोष्टींबरोबरच इथल्या(भारतातील ) चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता दाखवलेली आवडली.
लेखाच्या मागच चित्र कस सेट केलत?

श्रीरंग_जोशी's picture

11 Mar 2016 - 1:54 am | श्रीरंग_जोशी

लेखाच्या मागच चित्र कस सेट केलत?

तुम्हाला बॅकग्राउंड इमेज अभिप्रेत असल्यास या अंकातील सर्व लेखांसाठी तसे करण्यात आले आहे.

मुक्त विहारि's picture

11 Mar 2016 - 7:17 am | मुक्त विहारि

प्रामाणिक अनुभव-कथन आवडले...

मधुरा देशपांडे's picture

11 Mar 2016 - 3:12 pm | मधुरा देशपांडे

पलाश ताई, तुम्ही नेहमीच छान लिहिता हे अनाहितात अनेक प्रतिसादातून पाहिलं आहे. या अंकाच्या निमित्ताने इथेही हा अनुभव लिहिलात, तोही इतक्या सहज भाषेत, प्रामाणिक अगदी. खूप आवडलं लिखाण. :)

खुप सुरेख झालाय लेख!आईच्या नजरेतुन पाहिलेली अमेरिका समजली.

पैसा's picture

12 Mar 2016 - 7:32 pm | पैसा

खूप सुरेख! साधं सरळ, अकृत्रिम!

किलमाऊस्की's picture

14 Mar 2016 - 6:31 am | किलमाऊस्की

खूप छान लिहिलंय पलाशताई, साधं , सरळ. आवडेश.

पद्मावति's picture

14 Mar 2016 - 2:33 pm | पद्मावति

सहज सुंदर लिहिलंय.

विशाखा पाटील's picture

14 Mar 2016 - 3:41 pm | विशाखा पाटील

आवडलं! कुठलाही चष्मा न लावता अनुभव लिहिलेय. साधे आणि सुंदर...

पिलीयन रायडर's picture

14 Mar 2016 - 4:28 pm | पिलीयन रायडर

खुप आवडला लेख. माझ्या वारीची आठवण झाली. (मी पण लिहीणारच्चे.. सोडणार नाहीये!!)

विनटूविन's picture

15 Mar 2016 - 2:50 pm | विनटूविन

छान लेख!!

जुइ's picture

1 Apr 2016 - 2:02 am | जुइ

पलाशतै लेखने खूप आवडले अगदी साधे सोपे. इथे आल्यानंतरच्या भावनांना पुन्हा उजाळा मिळाला. rainbow

सर्व वाचकांचे व प्रतिसाद देणार्‍या मंडळींचे मनःपूर्वक आभार.
" जसं आहे तसं व त्यामुळे फार सरळसोपं, साहित्यगुणरहित असं लिहिणारी मी, भटकंती विशेषांकात काय लिहिणार?" या माझ्या प्रश्नावर "प्रामाणिक कथन हा एक मोठा गुण आहे" असं सांगून प्रोत्साहन देणार्‍या स्वाती दिनेश व मधुरा देशपांडे या दोघींमुळे हा लेखनाचा प्रयत्न करू शकले त्यांचे खास आभार!!! :)

लेखन आवडला पलाशताई..छानच लिहीता.