body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
काय हे, अजून काहीच तयारी झाली नाहीये का? चला चला, आवरा पटापट...केव्हाचं सांगून ठेवलेलं आज निघायचं आहे म्हणून. चला चला बॅगा भरा...
कुठून घेतल्या बॅगा विचारताय...ती किनई मजाच्च झाली. अनाहिता गेलेल्या ना 'सरस' ला तिथूनच आणल्यात. काय बाई, नुस्ता धुडगूस घातला एकेकीने प्रदर्शनात. तुम्हाला म्हणून सांगते, बोलू नका कुणाला...कुठे न्यायची म्हणून सोय नाही हो या बायकांना. वात आणला नुसता. हिरवे, काळे, नि़ळे मिळतील त्या रंगाचे मसाले उचलत होत्या, पीठं काय नि चहा काय एक वस्तू सोडली नाही. एकीने तर सहा कानातली उचलली. आहात कुठे? आता काय भा़जी करणार का सहा कानातल्यांची. पण ऐकणार नाहीत...जाऊदेत, तुम्ही आटपा लवकर...आधीच उशीर झालाय.
कपडे अजून वाळतायतचं का दोरीवर....
हम्म, काय म्हणता, घालतच होतात का घड्या. बरं...बरं...
छत्र्या घ्या हो आठवणीने, पाऊस असला तर उगाच तारांबळ नको.
टोपी पण घ्या, काय उन्हं वाढलीत आजकाल.. तुम्हाला सांगते मागच्या वर्षी आम्ही त्या तिकडे गेलेलो ना... ऊन काय मी म्हणत होतं. आमचे हे...काय म्हणता, आमच्या ह्यांच्या गोष्टी नंतर सांगूका?, बर्र...
आणि ते गॉगल काय आणून ठेवलेत ना काल.. ह्म्म्म भरले का ते?
तिकिटं?
अय्या पिकनिक बास्केट राहिलंच की....काय बाई इतकं हौसेने घेतलेलं या दिवसासाठी..
पाकिट कशाला घेताय... फुकट तर आहे सहल
चपला घाला आठवणीने.
कसं जायचं म्हणता...होडी आहे की तयार कधीपासून..
कुठे निघालोय विचारताय? अर्रर्र...मेन मुद्द्याचं राहिलंच..सॉरी, सॉरी बरं का, अहो अनाहिताचा भटकंती अंक आलाय ना! त्याच्याच सफरीवर निघालोय. चला, निघायचं का?
प्रतिक्रिया
7 Mar 2016 - 10:59 pm | अनन्न्या
माझी बॅग कुठे ठेवू? चला सरका पटापट, मला पण बघुद्या! आलात का सगळे? चला चला
8 Mar 2016 - 11:47 am | प्रीत-मोहर
माझ्यासाठी पण जागा ठेव ग. आलेच
7 Mar 2016 - 10:59 pm | अनन्न्या
माझी बॅग कुठे ठेवू? चला सरका पटापट, मला पण बघुद्या! आलात का सगळे? चला चला
8 Mar 2016 - 12:36 am | नूतन सावंत
किलमाउस्की,झकास तयारी.आलेच बॅग भरून.
8 Mar 2016 - 12:42 am | पलाश
वा, अगदी जय्यत तयारी झाली आहे की!! :)
8 Mar 2016 - 2:47 am | जुइ
अभिनव प्रकारे केलेली सफरीची तयारी आवडली

8 Mar 2016 - 3:07 am | रेवती
अगदी क्यूट वस्तू आहेत. तू फारच ग्रेट आहेस.
8 Mar 2016 - 10:03 am | सविता००१
कसली क्यूट तयारी आहे गं प्रवासाची.....
बेष्टम बेष्ट :)
खूपच अभिनव कल्पना
8 Mar 2016 - 10:40 am | सस्नेह
झालीच माझी तयारी, चला...
8 Mar 2016 - 11:16 am | कंजूस
चपला,छत्री मस्तच.
8 Mar 2016 - 11:28 am | पिलीयन रायडर
अगं कसलं क्युट ग!! बाई तुम्हाला जमत नाही अशी एखादी गोष्ट आहे का?!!
8 Mar 2016 - 11:33 am | अजया
_/\_
-सहा कानातल्यांच्या भाजीवालीचा किलमाउस्की माऊलीला दंडवत ;)
9 Mar 2016 - 10:30 pm | किलमाऊस्की
खिक्क!
8 Mar 2016 - 11:45 am | गिरकी
अगं कसलं मस्त :) या ब्यागा आणि ते चप्पल पाठवून द्या आता मला कुणीतरी.
8 Mar 2016 - 1:02 pm | वैदेहिश्री
तो वाळत घातलेला निळा कलर चा ड्रेस घालून येते म्हणजे चप्पल म्याचिंग होईल.
8 Mar 2016 - 1:13 pm | पिशी अबोली
अति-अप्रतिम!
8 Mar 2016 - 3:45 pm | Mrunalini
सोssssss स्वीट. त्यातली ती चप्पल तर खुपच आवडली. किती क्युट आहे ती. मला पण पाठवुन दे. :)
9 Mar 2016 - 10:24 pm | किलमाऊस्की
देते पाठवून. क्रोशाची आहे. त्यामुळे वापरायला हरकत नाही. (ती किचेन आहे :-) )
8 Mar 2016 - 3:49 pm | मोदक
ओरिगामीची एखादी लेखमाला लिहावी असे सुचवतो.
सुंदर वस्तू. :)
9 Mar 2016 - 3:13 pm | नीलमोहर
+१
बेस्टच !!
8 Mar 2016 - 3:59 pm | इशा१२३
अप्रतिम वस्तु !फारच गोड आहेत.
मी पण निघतेच आता !! पण विमान का नाहिये? जरा विमानाची सोय कर ना...
8 Mar 2016 - 4:16 pm | प्रश्नलंका
अगदी हेच म्हणणार होते. माझी पन बॅग झाली भरून. जरा सरका जागा द्या मला पण.
मला इथुन तरी विमान पाहिजे. ;) तिथे आल्यावर बोटीत बशीन म्हणते. ;)
9 Mar 2016 - 10:01 am | पूर्वाविवेक
काय क्युट आहेत ग! माझ्या छोट्या मुलीने पाहिलं हे आणि हट्ट करून बसलीय, असंच करून दे मला. आता हेमांगी मावशीला मस्का मारावा लागेल.
9 Mar 2016 - 10:25 pm | किलमाऊस्की
देईन की करुन. बनवायला शिकवेन ही. :-)
9 Mar 2016 - 1:10 pm | पैसा
कसल्या सुंदर वस्तू आहेत!
9 Mar 2016 - 2:07 pm | मधुरा देशपांडे
आपली अनेक डिस्कशन्स आठवताहेत मला यावरची. वस्तू किती छान झाल्यात हे तर सांगितलेच आहे. पण त्या निव्वळ वस्तू न राहता, या सहलीच्या तयारीच्या लेखाच्या माध्यमातून अजूनच खुलल्या आहेत.
9 Mar 2016 - 10:27 pm | किलमाऊस्की
आपली एकूणच सगळी डिस्कशन सेव्ह करुन ठेवायला हवीत. मस्त 'बिहाइंड द सीन' एपिसोड होऊ शकतो.
9 Mar 2016 - 3:07 pm | पद्मावति
फारच गोड आहेत सगळ्याच वस्तू. ही एकदम हटके कल्पना खूप आवडली.
9 Mar 2016 - 7:17 pm | तर्राट जोकर
सुंदर कल्पना !!!
9 Mar 2016 - 7:55 pm | मितान
Bhannat !!!!!!!
9 Mar 2016 - 10:29 pm | किलमाऊस्की
कल्पना तसंच वस्तू आवडल्याचं आवर्जून कळवल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार! :-)
9 Mar 2016 - 10:59 pm | कविता१९७८
मस्त कल्पना
10 Mar 2016 - 2:49 pm | पियुशा
अतिशय गोड न सुरेख सफर ओळख आवडली .
10 Mar 2016 - 7:03 pm | विशाल चंदाले
एकदम भारी आहे हो.
11 Mar 2016 - 1:50 am | श्रीरंग_जोशी
ओरिगामी कलाकृती खूप आवडल्या. अन त्यांचा या अंकातला कल्पक उपयोगही.
11 Mar 2016 - 12:59 pm | स्नेहल महेश
कसल्या सुंदर वस्तू आहेत!
19 Mar 2016 - 4:46 pm | Maharani
क्यूट वस्तु.. भन्नाट एकदम..
19 Mar 2016 - 8:57 pm | सामान्य वाचक
फारच कल्पक
20 Mar 2016 - 1:07 pm | सानिकास्वप्निल
खूप गोड कलाकृती आहेत, छत्र्या,बॅग्ज, फ्राॅक्स खूप क्युट आहेत :)
20 Mar 2016 - 2:53 pm | स्वाती दिनेश
सगळ्याच वस्तू तर क्यूट आहेतच पण ही कल्पना जेव्हा तू मांडलीस तेव्हा ती फारच आवडली होती.
स्वाती
20 Mar 2016 - 7:11 pm | दिवाना हु
सुन्दर,गोड कलाकृती आहेत
21 Mar 2016 - 1:00 pm | मीता
खूप गोड आहे