गाभा:
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
प्रतिक्रिया
6 Mar 2016 - 1:47 pm | स्वामी संकेतानंद
हाहाहा
6 Mar 2016 - 1:54 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे
भले!
6 Mar 2016 - 1:54 pm | श्री गावसेना प्रमुख
6 Mar 2016 - 2:18 pm | विवेक ठाकूर
मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!). आणि नेमकं हेच तर कन्हैया सांगतोयं, `सत्ताद्रोह आणि देशद्रोह यात फरक आहे. आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य नको तर भारतात स्वातंत्र्य हवंय'.
तुम्ही तर इथले आद्यभक्त आहात. त्यामुळे तुमची मतं म्हणजे बिजेपीची विचारसरणीचं एकदम सहीसही प्रदर्शन आहे. कन्हैयाचा मुद्दा तुम्ही ही पोस्ट टाकून बरोब्बर पटवून दिलायं.
6 Mar 2016 - 2:40 pm | श्रीगुरुजी
अफझल गुरूला मोदींना विरोध केल्याबद्दल फाशी झाली आणि मोदींना विरोध केल्यामुळे त्याला मोदीभक्त देशद्रोही म्हणतात हा नवीन शोध लावल्याबद्दल धन्यवाद! मला मोदीद्वेष्ट्यांचं कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी.
तुम्ही इथले आद्यमोदीद्वेषी आहात. त्यामुळे तुमची मतं म्हणजे बिजेपीविरोधी विचारसरणीचं एकदम सहीसही प्रदर्शन आहे. कन्हैयाच्या समर्थनार्थ धागा काढून तुम्ही ते बरोब्बर पटवून दिलायं.
हे तो तुरूंगात २० दिवस राहून आल्यावर सांगतोय. त्याच्याआधी तो काय सांगत होता तेही जरा सांगा. आणि जर त्याला भारतात स्वातंत्र्य नसतं तर असे देशद्रोही कार्यक्रम करणे, देशद्रोही घोषणा देणे, इ. गोष्टी करता आल्या असत्या का?
6 Mar 2016 - 2:50 pm | विवेक ठाकूर
हेच तो पहिल्यापासून सांगतोयं.
अफझल गुरूला मोदींना विरोध केल्याबद्दल फाशी झाली आणि मोदींना विरोध केल्यामुळे त्याला मोदीभक्त देशद्रोही म्हणतात हा नवीन शोध लावल्याबद्दल धन्यवाद!
पहिला शोध तुमचा आहे आणि दुसरी वस्तुस्थिती आहे, ती तुम्हीच हा धागा काढून दाखवून दिली आहे.
आता दोन गोष्ट करा. भाषा स्वतःची वापरा नाही तर सतत प्रॉब्लममधे याल आणि लगबगीनं हा धागा काढायची विनंती संपादकांना करु नका. बिजेपीचे भक्त देशद्रोह आणि सत्ताद्रोह कसा एक करतात हे लोकांना कळू द्या. तुम्ही एकदम भारी काम केलंय.
6 Mar 2016 - 3:01 pm | श्रीगुरुजी
मी असले अतर्क्य शोध लावत नसतो. हा शोध तुमचाच आहे. "मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!)." म्हणजे अफझल गुरू मोदीभक्तांना देशद्रोही वाटतो कारण तो त्यांच्या विरोधात होता, असा स्पष्ट अर्थ तुमच्या वरील वाक्यातून आहे. न्यायालयाने मात्र त्याला दहशतवादी हल्ल्याबद्दल शिक्षा दिली होती. पण तुमचा अतर्क्य शोध वेगळेच सांगतो.
मी कुठल्या प्रॉब्लेममध्ये आलोय? याचाही काही अतर्क्य शोध लागला असेल तर मला सांगा. आणि धागा काढायला मी कशाला संपादकांना विनंती करू? कशासाठी धागा काढायचा? उगाच स्वप्नरंजन करू नका. बीजेपीद्वेष्टे बीजेपीविरोधाकरीता कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि देशद्रोह्यांच्या कसे पाठीशी उभे राहतात हे लोकांना दिसत आहेच (अफझल गुरूच्या खटल्यावर संशय, इशरत जहांला निष्पाप ठरविणे, जेएनयूमधील देशद्रोही घोषणांना पाठिंबा, अफझल गुरू/हफिझ सईद्/लादेन इ. चा आदरार्थी उल्लेख इ.). तुमाच्यासारख्या बीजेपीद्वेष्ट्यांनी देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा धागा काढून तुम्ही पण एकदम भारी काम केलंय.
6 Mar 2016 - 3:15 pm | विवेक ठाकूर
आणि अफजल आणि कन्हैयाच्या प्राजंळपणाचा आगाध संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. किमान आपण काय लिहीतो याचं तरी भान ठेवा म्हणजे पुन्हा हसं होणार नाही.
मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!)
याचा `अफजल गुरु देशद्रोही नाही' इतका विद्वत्तापूर्ण अर्थ तुम्हीच काढू शकता.
आणि शेवटी पुन्हा लाईनवर येऊन अंतस्थ हेतू स्पष्ट केलायं! पाहा :
बीजेपीद्वेष्टे बीजेपीविरोधाकरीता कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि देशद्रोह्यांच्या कसे पाठीशी उभे राहतात हे लोकांना दिसत आहेच (अफझल गुरूच्या खटल्यावर संशय, इशरत जहांला निष्पाप ठरविणे, जेएनयूमधील देशद्रोही घोषणांना पाठिंबा, अफझल गुरू/हफिझ सईद्/लादेन इ. चा आदरार्थी उल्लेख इ.).
माझ्या कोणत्याही धाग्यात किंवा प्रतिसादात मी असं काहीही म्हटलेलं नाही. पण तुमचे विचार इतके एकांगी झालेत की तुमच्या डोक्यात सतत तेच घोळत असतात आणि मग ते कुठेही पुन्हा चिटकवले की झाली भक्तीपूर्ण !
6 Mar 2016 - 5:27 pm | आनन्दा
मी श्रीगुरुजींना विनंती करतो की त्यांनी या महावाक्यावर एक धागा काढून विवेचन करावे. एकाच वेळी पूरक आणि विरोधी अर्थ वाक्य निघणारे हे वाक्य "तत्वमसि" या महावाक्यापेक्षा काकणभरदेखील कमी भरणार नाही. तस्मात या वाक्याचे धागामूल्य लक्षात घेऊन एक लेख लिहिण्यात यावा.
खरी ही विनंती विठांना करायला हवी होती, पण ते पूर्वजन्मीचे निराकार असल्यामुळे या जन्मात ते अशी वाक्ये किती गांभीर्याने घेत असतील याची कल्पना नाही
6 Mar 2016 - 5:28 pm | आनन्दा
हे ते वाक्य -
6 Mar 2016 - 8:20 pm | श्रीगुरुजी
प्रांजळपणा! हहपुवा. तुमचंच सर्वत्र हसं होतंय. मोदी व भाजपद्वेषाने अंध झाल्यामुळे आपण काय लिहितोय तेच तुम्हाला समजत नाहीय्ये.
तुमच्या पहिल्या प्रतिसादातले हे वाक्य सोयिस्कररित्या विसरलात की काय.
"मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!). "
अगदी बालवाडीतल्या मुलाला सुद्धा या वाक्याचा अर्थ विचारला तरी 'अफझल गुरू मोदींच्या विरोधी असल्याने तो मोदीभक्तांना देशद्रोही वाटतो' ते हाच अर्थ काढतील.
पुन्हा तेच. आधीच्या प्रतिसादातील वाक्ये विसरलात की काय? माझे विचार जर एकांगी असतील तर तुमचे विचारही तसेच आहेत. सतत मोदीद्वेष, भाजपद्वेष मस्तिष्कात भिनल्यामुळे तुम्हाला आता देशद्रोह्यांचंही कौतुक वाटायला लागलंय. तुम्ही पूर्वी मोदीद्वेषपूर्तीसाठी केजरीवाल नावाचं झाड धरलं होतं. पण ते वठलेलं निघालं. म्हणून आता कन्हैय्या नावाचं नवीन झाड धरलंत. झाड कितीही विषारी असलं तरी तुम्हाला ते चालतं कारण ते पकडून मोदीद्वेषाची तल्लफ भागते.
6 Mar 2016 - 10:57 pm | विवेक ठाकूर
हेच जर तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या विचारांचा आणि लेखनाचा संबंध संपलायं .
7 Mar 2016 - 7:36 am | बोका-ए-आझम
आणि स्वाभिमानाचा संबंध संपलाय तसंच ना? अजून किती अपमान करुन घेणार तुम्ही? कुणीतरी चपला द्या रे यांना! बघवत नाही यांची ही दयनीय अवस्था!
6 Mar 2016 - 2:28 pm | श्री गावसेना प्रमुख
अफजल गुरू ला संसदेवरच हल्ला केल्या बद्दल शिक्षा झाली होती ना
6 Mar 2016 - 2:43 pm | विवेक ठाकूर
म्हणजे आतापर्यंतचे तुमचे प्रतिसाद आणि एकूण विचारसरणी किती सखोल आहे याची कल्पना आली.
6 Mar 2016 - 3:06 pm | श्री गावसेना प्रमुख
ब्वा आम्ही सरळ सरळ मोदींची बाजू घेतो आणि त्यात बिलकुल लाज बाळगत नाही, मोदींनी काही घातक निर्णय घेतले असतील भ्रष्टाचारी असतील तर ते सांगा नुसते मोदी मोदी कराल तर त्यात त्यांचा प्रचारच होणार आहे।
6 Mar 2016 - 3:08 pm | श्रीगुरुजी
अफझल गुरूला संसदेवरील हल्ल्यातील सहभागामुळे शिक्षा झालेली नसून मोदींना व भाजपला विरोध केल्यामुळे शिक्षा झाली हा जावईशोध अजून तुमच्यापर्यंत आला नाही का?
6 Mar 2016 - 3:12 pm | श्री गावसेना प्रमुख
म्हणजे काँग्रेस सरकार ने मोदींचे ऐकून त्याला फाशी दिली होय।
6 Mar 2016 - 4:30 pm | viraj thale
काय विवेक ठाकूर तुम्ही एवढेच सांगा की अफजल गुरु देशद्रोही आहे की नाही .
6 Mar 2016 - 4:44 pm | विवेक ठाकूर
आणि खरं तर तो मुद्दाच नाही.
पण लेखकानं माझी सगळी पोस्ट जशीच्या तशी कॉपी-पेस्ट मारुन, त्याच्या विडिओचा संबंध कन्हैयाच्या प्रांजळपणाशी जोडलायं हे तुमच्या लक्षात आलं की नाही हा मुद्दा आहे !
7 Mar 2016 - 12:28 pm | पक्षी
अफजल गुरु ने संसदे वर हल्ला केला हा तितकासा महत्वाचा मुद्दा नाही किंबहुना हा काही गंभीर गुन्हा नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे कि धागा कर्त्याने कॉपी-पेस्ट मारुन धागा काढला...हा गंभीर गुन्हा आणि देशद्रोह आहे... ह्या गुन्ह्या बद्दल धागा कर्त्याला फाशी देण्यात यावी. अशी नम्र इनंती !!!
6 Mar 2016 - 5:00 pm | viraj thale
ते माझ्या कधीच लक्षात आले .
6 Mar 2016 - 5:06 pm | गरिब चिमणा
विवेक ठाकुरांचा कन्हैया वरचा लेख फार झोंबलेला दिसतोय
6 Mar 2016 - 5:20 pm | नन्द्या
((वरील सर्व वाचून मी मा़हे आपले मत मांडतो. कुणालाहि आवडणार नाही, त्यामुळे कुणीच प्रतिसाद देणार नाहीत, नि भांडणे होणार नाहीत. फक्त एक दोन दिवस मला शिव्या घालाल नि परत आपले मोदी वगैरेंच्या मागे लागाल.
जरा गंभीरपणा कमी करायला थोडी गंमत. लहान मुले पाहिली की त्यांच्यात खेळावेसे वाटते. ))
पण मी म्हणतो इथल्या वादाला मुद्दाच असायला पहिजे असे थोडेच आहे?
शिवाय जे ऐकले, वाचले ते खरेच असायला पाहिजे असेहि नाही.
आपण आपले नुसते एकाने अरे म्हंटले की आपण का रे म्हणायचे नि शेवटी एकमेकांना मोदीभक्त किंवा मोदीविरुधी ठरवायचे.
मा़झ्यासारखे निरुद्योगी लोक जगात अनेक! येतीलच दोन्ही बा़जूंनी भांडायला, नि आणखी काहीतरी खरे खोटे पुढे आणायला.
मागे एकदा सोहिरा नावाचे संत म्हणून गेले होते (ऐका यू ट्यूबवर - जितेंद्र आभिषेकी) -
विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे बोल
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे
पण काय, वय नि शरीर वाढले तरी अक्कल दोन वर्षाच्या मुलाइतकी - काय फरक पडतो, चिखल असला तरी? त्यातहि खेळण्यात गंमतच वाटते.
रामदास स्वामी म्हणून गेले आहेत -
उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करायला
मग काय चिखलात यथेच्छ खेळावे, स्नान करावे, नि संध्येला इतर द्र्व्याची आचमने घेत बसावे. म्हणजे पाण्याची बचत केली असे म्हणता येते, मग दुसर्या दिवशी पुन्हा वाद!
असे म्हणतात - Argument is exchange of ignorance, discussion is exchange of information.
पण यार, Argument मधे जो मझा है, लुत्फ का असले काहीतरी आहे वो discussion मे कहां!
ऐ कंबख्त, तूने Argument कियाहि नही!
जियो मेरे लाल!
6 Mar 2016 - 5:43 pm | जेपी
मला दहशतवादी किंवा गेला बाजारी नक्षलवादी व्हायच होत.
पण बापुस पेकाडात लाथ घालील"पोट्या या साठी जलम दिला का ?,गप मिळतय ते गिळा"
अश्यातरेने एक दहशतवादी जन्मायच्या आधी गेला..
(विडंबन आहे)
7 Mar 2016 - 12:29 pm | पक्षी
हा हा हा ......
6 Mar 2016 - 6:19 pm | मोदक
मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!).
यूह नीड अ सायकिअॅट्रीस्ट.
6 Mar 2016 - 10:53 pm | विवेक ठाकूर
विषयाशी असंबद्ध प्रतिसाद देणं हे मनोरूग्णाचं लक्षण आहे.
7 Mar 2016 - 7:40 am | बोका-ए-आझम
अशाने फालतू लोकांना जरूरीपेक्षा जास्त महत्व मिळतं असं नाही वाटत?
7 Mar 2016 - 12:32 pm | पक्षी
बोका साहेब, हे राहू द्या ... मोसाद वर cocentrate कर, पढील भागाच्या प्रतीक्षेत.
7 Mar 2016 - 12:55 pm | मोदक
बरोबर आहे बोकासाहेब. तुम्ही मोसादकडे बघा.
..आणि दुर्लक्ष करण्याबाबत सहमत आहे, प्रयत्न करेन.
6 Mar 2016 - 7:14 pm | प्रचेतस
अरे हे असले धागे बंद करा राव. भक्त आणि अभक्त दोघेही वात आणतेत.
6 Mar 2016 - 9:05 pm | प्रसाद गोडबोले
का का
आता का ? मागे आम्ही यानावालां चे धागे वात आणतात असे म्हणालो होतो तर 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' किव्वा 'धर्म हि वैयक्तिक बाब नसून सार्वजनिक बाब असल्याने त्यावर यथेच्छ टीका करता येते' वगैरे किती समर्थन केले होते। इथेही तोच तर्क वापरा कि।
देश ही देखील सार्वजनिक बाब आहे , वैयक्तिक नव्हे, त्यामुळे कन्हैय्या कुमार ला अफजल ना मांडू द्या की त्यांचे मत। अन मिपावरही होऊद्या काथ्याकूट !!
गुरुजी , संक्षी तुम आज बढो , हम तुम्हारे साथ (नही) है।
हमे चाहिये आजादी , मिसळपाव में आजादी दुहेरी तर्क वापरानारोंे से आजादी ।
लल्लल्लल्लऊऊऊ
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
7 Mar 2016 - 9:20 am | नाखु
कुणालाही कशावरही, कसेही आणि कुठेही अभिव्यक्त होण्याचा अधिकार "मिपा"सदस्यत्व मिळाल्याबरोबरच प्राप्त होतो तस्मात अता "गाळगळचेपी" करू नये अन्यथा आम्ही निषेध व्यक्त करू.
सगळ्या अज्ञ मिपाकरांना ज्ञानाम्रुत पाजण्याचे पुण्यकर्म करणार्या यना ते गुणा (व्हाया विठा) यांचा असा संकोच कसा करवतो याचे आम्हाला फार फार आशचर्य वाटते आणि तेही माजी संपादकाकडून !!!
हन्त हन्त अता पुन्हा भांडे वाचन करावे लागणार तुम्हाला प्रायश्चेत्त म्हणून.
अखिल मिपा सुटक तुटक मटक चटक घटक वाचक संघ
7 Mar 2016 - 11:29 am | डॉ सुहास म्हात्रे
ज्ञानाम्रुत नीट लिहा हो नाखुसाहेब... त्यातला र् चुकीचा आहे त्याबद्दल तक्रार नाही (तो तुमचा प्रकटीकरण हक्क आहे) पण सहजपणे दिसत नाहीय त्याचे काय ?!
6 Mar 2016 - 7:39 pm | आनन्दा
धाग्याचे शीर्षक "अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ फारकत! " से हवे होते..
6 Mar 2016 - 11:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
वास्तविक अफझल गुरु लेखातल्या मुलाखतीत प्रांजळपणे खरं तेच (त्याचा अतिरेकी कारवायांत असलेला सहभाग) स्पष्टपणे सांगत आहे ! मात्र त्याचे पाठीराखे त्याचेच बोलणे खोटे आहे असे म्हणत आहेत ! =)) =)) =))
खरं बघायचं तर कम्युनिस्ट व इस्लामिक टेररिस्ट यांची युती (भारतात आणि जगात इतर कोठेही) प्रचंड विरोधाभासी आणि स्वार्थी ढोंगीपणा आहे. कारण, कम्युनिझम "धर्म ही अफूची गोळी आहे" असे ठासून म्हणतो आणि इस्लाममधे धर्माबाबत असे काही म्हणणे हा मृत्युदंडयोग्य गुन्हा आहे !!!
थोडक्यात, निदान या मुलाखतीत अफझल गुरु प्रांजळ आहे आणि त्याकडे डोळेझाक करणारे त्याचे समर्थक तद्दन ढोंगी आहेत !
7 Mar 2016 - 12:13 am | भंकस बाबा
च्यामारि हेच सकाळपासून शोधत होतो.
डावे आणि मुस्लिम युति यासारखा विनोद नसेल दुनियेत!
मकबूल बट, अफझल गुरु आणि मार्क्स वर डोक्यावर हात मारून घेत असतील.
इथे मुस्लिम काश्मिरिना बोलत आहे नाहीतर ठाकुर साहेब डोक्यावर हात मारून घेतील.
काश्मीरमधील मुस्लिमच आझादी मागत आहेत ना वो ठाकुरजी? का काश्मिरी पंडित यामागे आहेत?
कोंग्रेस आणि डावे, लालू आणि नितिशकुमार , लय भारी बाबा.
आईशप्पथ तो खालिद उमर सच्चा म्हटला पाहिजे , आपण बोललो हे कबुल करतो तो, कन्हैया सारखा टोप्या नाही फिरवत तो!
7 Mar 2016 - 12:57 am | तर्राट जोकर
डावे आणि मुस्लिमच कशाला, आता आंबेडकरवादीही ओढल्या जात आहेत. ह्या तिघांची युती म्हणजे आत्मघात आहे. हे फक्त हिंदुत्ववादी विचार रोखण्यासाठी असेल तर हजार टक्के आत्मघात असेल. संघाविरुद्धची ही मोर्चेबांधणी देशासाठी घातक आहे. भारतीयांनी वेळीच सावरले पाहिजे. गरिबी, भुखमरी, जातिवाद इत्यादी समस्या आहेत हे खरे असले तरी त्यांच्या नावाने बासरी वाजवत सगळे उंदीर भलतीकडेच नेले जातील.
आत्ताच सावध होणे आवश्यक.
- (देशप्रेम ही सर्वोच्च नशा मानणारा) तर्राट जोकर.
7 Mar 2016 - 12:04 pm | गॅरी ट्रुमन
प्रचंड सहमत आहे.
7 Mar 2016 - 12:15 pm | विवेक ठाकूर
यात फरक करता येत नसेल तर तो वैचारिक दुष्काळाचा परिपाक म्हणायला लागेल !
7 Mar 2016 - 12:57 pm | श्रीगुरुजी
अफजलचा देशद्रोहीपणा आणि कन्हैयाचा देशद्रोहीपणा यातील साम्य लक्षात येत नसेल तर ती वैचारिक दिवाळखोरी म्हणायला लागेल !
7 Mar 2016 - 3:25 pm | बेकार तरुण
एकुण प्रकार अंतु बर्वा स्टाईलचाच आहे
आपण सोडुन कोणी विचार करायला लागला की (वैचारीक) दिवाळखोरीचा अर्ज मागवुन ठेव म्हणावं !! (कृपया ह घे)
:)
7 Mar 2016 - 12:27 am | अभ्या..
सोलापूरात कामगारांचे गांव असल्याने आधीपासून कम्युनिस्ट पक्षाचा जोर आहे. एक आमदार पण होता. त्यामुळे गावात लालबावट्याचे काहीनाकाही सतत चालू असते. रोहीत वेमुला प्रकरणावेळी (त्यावेळी कन्हैया प्रकरण नव्हते उद्भवलेले) त्यांचे धरणे सभा चालू होत्या. काही विचित्र कारणाने मला ती भाषणे तासभर ऐकावी लागली. जी वेगवेगळी कारणे सांगून देशाची अराजक परिस्थिती सांगितली जात होती ते सारेच हास्यास्पद वाटत होते. समोर बसलेल्या तीस चाळीस भाडोत्री श्रोत्यांना काही कळत होते का नाही कुणास ठौक. आंबेडकर, मुस्लीम अन कम्युनिस्ट असा त्रिवेणी संगमाचे विचार ऐकून त्याच वेळी धन्य झालो. आता त्याची सुधारीत आवृत्ती कन्हैय्या प्रकरणात दिसतेय.
7 Mar 2016 - 12:45 am | राजेश घासकडवी
पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज. म्हणजे आता तुम्हाला हे कळतंय हे ठीक आहे. पण आम व्होटरला हे समजलं पाहिजे ना! त्यांना ही कडबोळी आवडली तर? आता १९७७ च्या निवडणुकीच्या वेळी जनसंघ आणि समाजवादी आणि इतर कोणकोण एकत्र आलेले होते. तेव्हा काय झालं? दिलंन निवडून लोकांनी जनता पार्टी म्हणून. बिहारमध्ये लालू आणि नितीश एकत्र आले. काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपी. पॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं शत्रू नसतं. आपल्या विरुद्धपक्षांना एकत्र येण्याची संधी देणं हीच राजकारणातली हार असते. नंतर 'आमची भरपूर शक्ती होती, पण ते हरामखोर शत्रू एकत्र आले म्हणून हरलो' या रडगाण्याला फारसा अर्थ नसतो.
7 Mar 2016 - 12:50 am | अभ्या..
हम्म...बरेचसे पटतेय.
पाहू काय होतेय ते.
7 Mar 2016 - 1:35 am | विकास
पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज.... आता १९७७ च्या निवडणुकीच्या वेळी जनसंघ आणि समाजवादी आणि इतर कोणकोण एकत्र आलेले होते. बिहारमध्ये लालू आणि नितीश एकत्र आले. काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपी.
विरोधी असून आदर ठेवत किमान ध्येयात समानता ठेवत एकमेकांबद्दल आदर असणे आणि त्याउल्ट केवळ स्वतःच्या वैयक्तीक स्वार्थासाठी एकत्र येत राजकीय शैय्यासोबत करणे, यात फरक आहे.
यातील लालू आणि नितीश यांचे एकत्र येणे अथवा अगदी भाजपालाच नावे ठेवायची असतील तर, नितीश आणि भाजपाचे आधी एकत्र येणे हे एकवेळ स्ट्रेंज बेडफेलोजची उदाहरणे आहेत असे म्हणता येईल. १९७७ साली आणिबाणी नंतर "इंदिरा इज इंडीया" या मानसिकतेपासून जर देशाला बाहेर काढायचे असले तर त्याला सर्व विरोधकांनी पर्याय नव्हता. तेच आत्ता भाजपा आणि पीडीपी संदर्भात... कोणत्याच एका पक्षाचे सरकार येणे शक्य नव्हते. एकतर काँग्रेस + पिडीपी + नॅशनल कॉन्फरन्स असा पर्याय होता. पण त्याला दोन्ही प्रमुख काश्मिरी पक्षांचा विरोध असल्याने ते शक्य नव्हते. दुसरा पर्याय हा पिडीपी + भाजपा इतकाच होता. तो जर मान्य नसता तर परत निवडणुका होई पर्यंत राष्ट्रपती राजवट आणावी लागली असती, जी कुणालाच नको होती. त्यात परत जम्मू०काश्मीरच्या निवडणुका या दर सहा वर्षांनी होतात. त्यामुळे अधिकच पेच होता. अशा वेळेस समान कार्यक्रम मान्य करत, इतर मुद्यांना बाजूला सारत प्रशासन देण्यात काही चुकलेच नाही. किंबहूना मेहबुबा मुफ्तींनी पण हाच मार्ग मान्य केला तर त्यातून एक चांगलाच इतिहास घडू शकेल...
पॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं शत्रू नसतं. आपल्या विरुद्धपक्षांना एकत्र येण्याची संधी देणं हीच राजकारणातली हार असते.
यातील दुसर्या वाक्याशी पूर्ण सहमत! मात्र "पॉलिटिक्समध्ये कोणीच कोणाचं शत्रू नसतं" या संदर्भात, म्हणावेसे वाटते की भारताच्या बाबतीत, पॉलीटीकल पार्टीज् नी विरुध्द टोके गाठलेली आहेत - एकतर विचारसरणींमुळे (भाजपा - कम्युनिस्ट) अथवा आचारसरणींमुळे (काँग्रेस आणि त्यातून निघालेले इतर पक्ष).
मोदी आवडोत अथवा न आवडोत, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वास्तवीक मला व्यक्तीगत अशा पद्धतीने कुठल्याच राजकीय व्यक्तीबद्दल १००% बाजू घेऊन अथवा विरोधात बोलायला आवडत नाही. सगळे समविचारी नसावेत असे माझे मत आहे. पण द्वेष नसावा हे देखील महत्वाचे आहे. जे सध्याच्या भारतीय विरोधीपक्षातील राजकारण्यांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, अथवा किबोर्डपासून ते प्रत्यक्षात जमत नाही, हे दुर्दैव.. पण मोदींच्या बाबतीत अथवा गुजरात दंगल आणि त्यावरून मोदींचा वापर करत आधी मोदी आणि नंतर मोदींची विचारसरणी असलेला पक्ष "भाजपा" आणि संघटना "संघ" यांना गेल्या दहावर्षात टोकाचे बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. बरं तो करत असताना त्याला पर्याय काहीच दिला नाही... फक्त द्वेष एके द्वेष! परीणामी लोकसभेत मार खाल्ला.
यातील सगळ्यात गंमत अशी आहे की याचा पुरस्कार करणारे सर्वाधीक कोण आहेत तर ते काँग्रेसी नाहीत तर डावे आहेत ज्यांना जनमत हा प्रकार काहीच नाही! तरी आरडा-ओरडा कसा करायचा, इन्किलाब चे नारे कसे देयचे ह्याच्या जीवावर सगळा खेळ चालला आहे.
असो.
7 Mar 2016 - 4:50 am | राजेश घासकडवी
फक्त
'अमुक मानसिकतेतून देशाला बाहेर काढणं' वगैरे फारच उच्च, मूल्याधिष्ठित वगैरे वाटतं. माझ्या मते 'आत्ता, या परिस्थितीत मला/आपल्या पक्षाला सत्ता मिळवण्यासाठी काय करावं लागेल?' ते सर्व लोक करतात. मग त्यात भलत्याशी हातमिळवणी करण्याची गरज पडली तरी हरकत नाही. असं तुकड्यातुकड्यांनी बनलेलं सरकार फार टिकणार नाही, याची बहुतेकांना कल्पना असते. पण जितका काळ टिकेल तितक्या काळात आपल्याला पोलिटिकल बेस जास्त घट्ट करून घेता येईल का? त्याचं उत्तर हो असेल तर बऱ्याच तडजोडी करायला लोक तयार होतात.
कोणीच कोणाचंच शत्रू नसतं हे वाक्य थोडं नाइव्ह आणि सरधोपट आहे हे खरं आहे. मला म्हणायचं होतं की सगळे ऑप्शन उपलब्ध असतात, काही तडजोडी करणं पोलिटिकल बेसला इतकं मारक असतं, की तो पर्याय प्रचंड तोट्याचा असतो. त्या अर्थाने हो, काही टोकं जोडली जाऊ शकत नाहीत.
असो. व्यक्तीद्वेषपेक्षाही 'व्यक्तींबद्दल चर्चा' ही राजकीय चर्चेचा आधारस्तंभ बनलेली आहे. कधी कधी ती वाचताना टीनेजर ड्रामा पाहिल्यासारखं वाटतं. कोण कोणाबरोबर फिरतंय, कोणी कोणाशी ब्रेकअप केला, कोणी कोणाचा अपमान केला... याच पातळीवर ते राहातं.
दशकानुदशकं चालणारे, थोडे बदलणारे विचारप्रवाह; राजवटी बदलल्या तरी कायम राहाणाऱ्या योजना - त्यांचं यश, अपयश; त्यांतून जनतेचा होणारा फायदा याबद्दल स्थिर, गंभीर चर्चा होत नाही. काहीही साधक बाधक चर्चा सुरू झाली की ती डायरेक्ट 'तू भक्त - तू मोदीद्वेष्टा' या तूतू मैमै वर उतरते.
एक उदाहरण सांगतो. यूपीएने पुढच्या काही वर्षात २० गिगावॉट सोलर पॅनेल्स बसवायचं ठरवलं होतं. ते उद्दिष्ट सद्य सरकारने बदलून १०० गिगावॉट केलं. हे प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि उत्तम पाऊल आहे. आता यात अमेरिकेने खोडा घालून भारतीय उत्पादकांना सबसिडी दिल्याबद्दल तक्रार केली आहे. आणि त्याचे काही दूरगामी परिणाम दिसतीलही. पण हा विषय मांडला रे मांडला की 'लेखक नक्की कोण आहे, मोदीभक्त आहे का? मोदीद्वेष्टा आहे का? त्याला राळ उडवायची आहे का? सध्याच्या सरकारचं काहीच चुकत नाही हे कसं सिद्ध करायचं? सगळंच चुकतं हे कसं सिद्ध करायचं?' असे विचार बाळगून मतप्रदर्शन होतं. त्यामुळे अशा गंभीर चर्चा सध्याच्या परिस्थितीत आंतरजालावर घडणं मला फार कठीण वाटतं.
7 Mar 2016 - 5:42 am | निनाद मुक्काम प...
आजच्या काळात संतुलित किंवा तटस्थ वृत्तीने लिखाण करण्याची वृत्ती अभावाने दिसते .
तुम्ही दिलेल्या उदाहरणात अमेरिकेने भारताच्या पाठीत खंजीर किंवा शुद्ध हलकट पणा किंवा व्यापार आणि आपले व्यापारी त्यांची हित महत्वाचे मग नैतिकता जगाचे पर्यावरण इतर गोष्टी ह्यांचे दर्शन घडवले आहे. हे उद्या कोणी संधर्भ देऊन मांडले तर त्यात आक्षेप घेण्याचे कारण नाही.
किंबहुना हे उदाहरण अमेरिकन अध्यक्ष पदाच्या धाग्यावर अचूक आहे.
खुपजण ट्रम निवडणून आला तर ह्या कल्पनेने ग्रस्त आहेत त्यासाठी ते उदाहरणे देतात त्याची विधाने व धोरणे
पण एकदा सत्तेचा काटेरी मुकुट घातला कि तिला चालवणारे भांडवलदार व त्यांचे हित जपतांना अनेक तडजोडी कराव्या लागतात.
प्रदूषण विरहित उर्जेचा पुरस्कार हे ओबामाचे धोरण मात्र जाताजाता ज्या पद्धतीने यातसरकारने खोडा घातला ते पाहता
बिबीसी मध्ये चक्क भारताची तळी उचलणारा अमेरिकेच्या धोरणाविरुद्ध लेख छापून आला.
बीबीसी ने भारताच्या बाजूने लिहिणे व त्यासाठी अमेरिकन धोरणावर टीका
काही हि हा बी बी सी असेच म्हणावेसे वाटते.
आंजा वर जेटली वर अनेक जण मध्यमवर्गीय त्यांच्या निवृत्ती वेतन त्यावर कर ह्या अनुषंगाने मनस्वी टीका करत आहे तेव्हा जेटली ह्यांचे बरोबर अशी मल्लीनाथी करणारे मी तरी अजून पाहीले नाही.
दुर्दीवाने ह्या मुद्यांचा राजकीय लाभ प्रसार माध्यमे व राजकीय पक्ष न घेत संजय दत्त ची सुटका
नव्या विद्यार्थी नेत्याचा जन्म अश्या फुटकळ गोष्टीत अडकून पडत आहे.
खुद केजू सुद्धा ह्या जाळ्यात अडकला इतरांची काय व्यथा
7 Mar 2016 - 10:53 am | राजाभाउ
१००% सहमत.
7 Mar 2016 - 11:22 am | अर्धवटराव
अहो, म्हणुनच अशा चर्चा जास्त जोरकसपणे मांडायच्या ना.
इन फॅक्ट, मिपावर जे अनेक उपक्रम चालतात, त्यात गेल्या काहि वर्षातल्या सर्वात सफल/असफल योजनांवर चर्चा घडवुन आणण्याचा उपक्रम झाला पाहिजे.
7 Mar 2016 - 12:47 pm | श्रीगुरुजी
सहमत. ज्या राज्यात खांग्रेस वि. भाजप असा सरळ सामना आहे (म.प्र., छत्तीसगड, राजस्थान, हि.प्र., उत्तराखंड, गुजरात), तिथे भाजपला फारशी भीति नाही. परंतु इतर राज्यातील पूर्णपणे परस्परविरोधी असलेले पक्ष आपले अस्तित्व गमाविण्याच्या भीतिने एकत्र येत आहेत (उदा. बिहार) आणि तिथे भाजपला जड जाणार आहे.
7 Mar 2016 - 5:23 pm | राजेश घासकडवी
इतक्या साध्या प्रतिसादातही इतकं तुच्छतेने थुंकल्यासारखं 'खांग्रेस' म्हणणं आवश्यक आहे का? मिपाच्या बिल्डिंगीबाहेर उगीच पचाक्कन पिंक टाकल्यासारखं वाटतं. मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही. अशा उल्लेखांमुळे चर्चा खालच्या पातळीवर गेली तर त्यात नवल ते काय?
7 Mar 2016 - 5:47 pm | तर्राट जोकर
शब्दाशब्दांतून दिसणारा किळसवाणा द्वेष ही काँग्रेस/आप/विचारवंत/पुरोगामी/डावे यांच्या विरोधकांची स्पष्ट ओळख आहे.
7 Mar 2016 - 6:07 pm | अनुप ढेरे
कमॉन! एवढं सेन्सिटिव का व्हायचं? थोडी थट्टा केली तर किळसवाणा द्वेष डायरेक्ट?
भक्त, नमोरुग्ण, इंटरनेट हिंदू आदी शब्दांची रेलचेल असते की बर्याच ठिकाणी. ती लोक स्पोर्टिंगली घेतात. मौत का सौदागर वगैरे बाजूला ठेऊ.
7 Mar 2016 - 6:30 pm | तर्राट जोकर
सेन्सिटीव तर खांग्रेस म्हणणारे असतात. साध्या शब्दांतून व्यक्त होण्यापेक्षा कैक अधिक विखार भरलेला असतो तेव्हा असे होते. तसेच थट्टा माझी थोडीच करतंय कोणी जे मी सेन्सिटीव होऊ.
बाकी भक्त, नमोरुग्ण, इण्टरनेट हिंदू हे शब्द बिन्डोक भाजपसमर्थकांसाठी आहेत. भाजपला नव्हे.
बाकी, 'मौत का सौदागर' एवढी टिप्पणी हाताशी असायला बरी असते.
7 Mar 2016 - 6:49 pm | राजेश घासकडवी
अहो ही थोडी थट्टा नाही. मला वाटतं हे भाषेला लागलेलं वळण आहे. जेव्हा थट्टा करताना म्हटलं जातं तेव्हा कोणी आक्षेप घेताना दिसत नाही. पण 'कॉंग्रेस विरुद्ध भाजपा' असा साधा सरळ उल्लेख येण्याऐवजी असलं का येतं? ती इतकी भिनलेली सवय आहे की आपोआपच कॉंग्रेसऐवजी खांग्रेस असंच टंकलं जातं. त्यामुळे ती सवय बदला असं सांगावंसं वाटतं. काही जणांना नाकात बोटं घालण्याची सवय असते, ते लोकांना गलिच्छ वाटू शकतं. म्हणून आपलं असं प्रतिक्षिप्त क्रियेने काही झालेलं दिसलं की सांगावं लागतं. अशा अनावश्यक पिचकाऱ्यांनी उगीच भिंती घाण होण्यापलिकडे काहीही साध्य होत नाही.
आता त्यांनी जर अत्यंत विचार करून मुद्दाम खांग्रेस असं लिहिलं असलं तर गोष्ट वेगळी. पण या विचारपूर्वक तुच्छतेमागची त्यांची नक्की कारणं काय आहेत हे जाणून घ्यायला आवडेल.
7 Mar 2016 - 6:35 pm | बोका-ए-आझम
यातून काय सिद्ध होतं? उत्सुकता म्हणून विचारतोय.
7 Mar 2016 - 6:44 pm | तर्राट जोकर
१. विद्यमान पंतप्रधानांना सेल्फी घेण्याची सवय आहे.
१. सेल्फी घेणे हा मनोविकार आहे
ह्यातलं कोणतं विधान चूक वा खोटं वा ताणलेलं आहे का?
7 Mar 2016 - 6:50 pm | बोका-ए-आझम
हेच तुम्हालाही लागू पडतं. असो.
7 Mar 2016 - 6:56 pm | तर्राट जोकर
आता इथला साधासा उपरोध तुम्हाला कळत नाही असा प्रश्न विचारु का?
बाकी, किळस ह्या शब्दाबद्दलची तुमची समज वेगळी असण्याची शक्यता मान्य करतो.
7 Mar 2016 - 7:06 pm | बोका-ए-आझम
बरं!
7 Mar 2016 - 7:40 pm | सुबोध खरे
बोका सेठ
आपला तो उपरोध
दुसर्याची ती किळस
हे हि समजू नये तुम्हाला?
7 Mar 2016 - 9:38 pm | तर्राट जोकर
हेच विधान तुम्हालाही लागू पडतं हे बोकाशेठचं विधान तुम्हाला मान्य आहे का?
7 Mar 2016 - 7:13 pm | शलभ
दोन्ही.
आपले पंतप्रधान फक्त कुणी बाहेरचे त्यांच्या बरोबरीचे असतील तर सेल्फी काढताना दिसतात.
कधीतरी सेल्फी घेणे मनोविकार नाही.
उगाच ओढूनताणून संबध जोडायचा.
7 Mar 2016 - 7:15 pm | बोका-ए-आझम
आणि दाखवून दिलं की why so serious असं म्हणायचं. असो. चालायचंच.
7 Mar 2016 - 11:15 pm | विकास
कदाचीत तुमच्या म्हणण्यानुसार हे मनोविकाराचे बळी असावेत...
7 Mar 2016 - 7:57 pm | धनावडे
मनावर नका घेऊ कॅाग्रेस हा शब्द आमच्याकडे शिवी
म्हणून पण वापरायला लागलेत लोक आणि तरीसुद्धा
सगळे लोकप्रतिनीधी कॅाग्रेस किंवा राकॅाचेच असतातत
7 Mar 2016 - 8:33 pm | श्रीगुरुजी
(१) खांग्रेस म्हणणे म्हणजे काँग्रेसचा तुच्छ उल्लेख कशावरून?
(२) याच संकेतस्थळावर भाजपचा उल्लेख अनेकवेळा "भारतीय जुमला पार्टी", "शेटजी भटजींचा पक्ष" असा उल्लेख झालेला आहे. असे उल्लेख तुच्छ समजावे का?
7 Mar 2016 - 8:57 pm | श्रीगुरुजी
(३) डाव्या पक्षांचा उल्लेख याच संकेतस्थळावर "वाममार्गी" असा द्व्यर्थी करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही उल्लेख भ्रष्टवादी काँग्रेस असा झालेला आहे. याबद्दल आपले काय मत आहे? भाजप, डावे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस इ. चा उल्लेख वर लिहिल्याप्रमाणे केल्यावर आजतगायत कोणीही (तुम्ही सुद्धा), काहीही आणि कधीही आक्षेप घेतलेला नाही. मग आजच खांग्रेस हा उल्लेख का खटकला?
7 Mar 2016 - 9:05 pm | राजेश घासकडवी
भारतीय जुमला पार्टी हा उल्लेख एका अर्थाने टिप्पणी आणि एका अर्थाने टीकानिदर्शकच आहे. पण तो इतक्या सहज येताना दिसत नाही मिपावर.
असो. मी तुम्हाला सांगून बघितलं. तुम्हाला चूक स्वीकारायची नसेलच तर मी काय बापडा करणार? चालू द्यात तुमचं. कोणाला नाकात बोटं घालू नकोस रे प्लीज. असं म्हटल्यावर त्याने जर नाक वर करून म्हटलं, 'यात काय घाण आहे?' किंवा 'तो घालतो ते' तर आपण काय बोलणार?
7 Mar 2016 - 9:14 pm | श्रीगुरुजी
मला वाटलंच असंच उत्तर येणार म्हणून. खांग्रेस हा शब्द 'तुच्छ' कसा यावर काहीही भाष्य न करता, खांग्रेस असा उल्लेख करणे ही माझी चूक झालेली आहे असा निर्णय घेऊन मोकळे पण झालात! आणि नाकात बोट घालण्याबद्दल म्हणायचं तर, तुम्ही ज्याला नाकात बोट घालणे असे समजत आहात, अगदी तशीच भूतकाळातील ३ उदाहरणे दिली. तेव्हाही आणि आताही तुम्हाला त्यात वावगे वाटले नाही. पण 'खांग्रेस' असा उल्लेख वाचल्यावर मात्र लगेच त्याची तुलना नाकात बोट घालण्याशी केलीत. चालायचंच. सिलेक्टिव्ह ओपिनिअन हे व्यवच्छेदक लक्षण असल्यावर दुसरं काय होणार?
8 Mar 2016 - 6:10 am | राजेश घासकडवी
'खान-्ग्रेस म्हणजे मुस्लिमांची दाढी कुरवाळणारा पक्ष' असा अर्थ तुम्हाला अपेक्षितच नव्हता असं तुम्ही म्हणू शकाल. माझा मुद्दा असा आहे की जिथे सर्वसामान्य नामाचा वापर अपेक्षित असतो तिथेही असले तिरकस उल्लेख करण्याची प्रवृत्ती चर्चेची पातळी खाली नेणारी आहे. संघाच्या शिबिरात अशी भाषा वापरणं कदाचित सर्वमान्य असेल, पण मिपासारख्या फोरमवर ती रूढ आहे असं समजून तो शब्द सतत वापरणं योग्य नाही. इतकंच.
तुम्ही याबाबत आत्मपरीक्षण कराल, वा न कराल. या विषयावर मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केल्यामुळे माझी लेखनसीमा.
8 Mar 2016 - 3:17 pm | श्रीगुरुजी
तिरकस उल्लेख फक्त खांग्रेसचा होत नाही, इतरही पक्षांचाही असा उल्लेख अनेकवेळा झालेला आहे. आजतगायत त्यावर कोणीही आक्षेप घेतलेला नव्हता. तुम्हीही आजतगायत इतर कोणत्याही पक्षांचा असा तिरकस उल्लेख पाहून आक्षेप घेतलेला नव्हता. काल मात्र खांग्रेस असा उल्लेख वाचून तुमचं पित्त खवळलं. तुम्ही कदाचित सर्व पक्षांच्या तिरकस उल्लेखाला आक्षेप घेतला असता तर त्यात काहीतरी अर्थ होता. परंतु फक्त खांग्रेस या उल्लेखाबाबत तुमचा आक्षेप दिसतो. इतर पक्षांबद्दल असे लिहिले तर तुमचा विरोध दिसत नाही. इतर पक्षांबद्दल जेव्हा असा उल्लेख झाला तेव्हा मात्र चर्चेची पातळी खाली गेल्याचा भास तुम्हाला झाला नाही. अर्थात तुमचे खांग्रेसबद्दलचे ममत्व आणि भाजप/संघ/हिंदू संघटना इ. बद्दलचा राग माहित आहे. त्यामुळेच असे सिलेक्टिव्ह आक्षेप येतात.
आता इथे संघ कोठून आला? संघाच्या शिबिरात कधी आणि किती वेळा गेला होतात? तिथली भाषा माहिती आहे का? विषय कोणताही असला तरी त्यात संघाला आणणे हे काही महाभागांना व्यवस्थित जमते. पुण्यात कुमार सप्तर्षी नावाचे एक "निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत" (म्हणजे नक्की कसे आहेत ते लक्षात आलं असेलच) आहेत. ते अनेकवेळा बर्याच मराठी वाहिन्यांच्या चर्चासत्रात असतात. चर्चेसाठी कोणताही विषय असला तरी ते तो विषय नथुराम, संघ आणि गांधीजी या दिशेने नेतातच. इथेही तसेच झालेले दिसतेय.
आणि अजून एक. मिपासारख्या फोरमवर काय रूढ आहे आणि काय नाही हे मिपाचे संपादक ठरवतील. आपण ते कष्ट घेऊ नयेत.
बापरे! खांग्रेस शब्दावर इतका पराकोटीचा संताप? आणि मला थेट आत्मपरीक्षणाचा सल्ला? खरं तर आपल्या दुटप्पी भूमिकेबद्दल आत्मपरीक्षणाची खरी गरज तुम्हालाच आहे.
बादवे, तुम्ही मुद्दा अजिबात स्पष्ट केलेला नाही. "खांग्रेस" या शब्दात नक्की काय तुच्छतापूर्ण आहे याचे तुम्ही अजूनही उत्तर दिलेले नाही (आणि तरीसुद्धा आक्षेप घेणे सुरूच आहे). आणि इतर पक्षांच्या अशाच उल्लेखाबद्दल तुम्ही आजतगायत का मौन पाळले त्याचेही उत्तर नाही. या गोष्टी स्पष्ट न करता असे निघून जाऊ नका. या गोष्टी स्पष्ट करा आणि मग जायचे तिकडे जा.
8 Mar 2016 - 6:28 pm | राजेश घासकडवी
एवढं मोठ्ठं लिहिलं आहे म्हणजे तुमचंच बरोबर असणार.
8 Mar 2016 - 8:23 pm | श्रीगुरुजी
तुमच्याकडे आता काही मुद्देच नसल्याने असा प्रतिसाद येणारच होता.
एनीवे, स्पष्टीकरणाची अजूनही वाट पहात आहे.
8 Mar 2016 - 8:56 pm | प्रचेतस
तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू एंटरटेनर आहात मिपावर.
पडलो तरी नाक वर.
माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय.
8 Mar 2016 - 9:05 pm | मोदक
माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय.
ऑ..?? भक्तांमुळे थेट नेत्यावर आणि विचारधारेशी फाटाफुट?
8 Mar 2016 - 9:17 pm | प्रचेतस
असे नमुनेदार भक्त असल्यावर इतर काय होणार?
जसा राजा तशी प्रजा.
मी तशा प्रजेचा भाग बनू इच्छित नाही.
8 Mar 2016 - 9:49 pm | अनुप ढेरे
गुरुजींसारखे लोक पाहिले की च्यायला, यासारख्या लोकांबरोबर आपण गृप होतोय याची लाज वाटते. पण माझं मूळ समर्थन श्रीगुरुजींमुळे नव्हतं हे आठवतं. मग मूग गिळून बसतो. श्रीगुर्जींवरून सगळ्यांबद्दल मत बनवू नये ही इतर लोकांना विनंती.
इथेच वेगळ्या धाग्यावर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे शिवसेनेवरून शिवाजीबद्दल मत नका बनवू.
8 Mar 2016 - 11:01 pm | श्रीगुरुजी
तुम्हाला कशामुळे लाज वाटावी आणि कशाचा अभिमान वाटावा हा तुमचा प्रश्न आहे. माझ्यामुळे तुम्हाला लाज वाटत असली तर असू देत. मला फरक पडत नाही.
9 Mar 2016 - 12:20 pm | मोदक
मी येथे गुरूजींचे समर्थन करत नाहीये किंबहुना त्यांच्या व कपिलमुनींच्या जुगलबंदीच्यावेळी गुरूजींना बहुतांश वेळा कानपिचक्याही दिल्या आहेत. परंतु, येथे गुरूजींना "कानफाट्या" ठरवले जात आहे हे माझे निरीक्षण आहे.
सुरूवात कशी झाली ते बघा. गुरूजींनी नेहमीप्रमाणे "खांग्रेस" असा उल्लेख केला. त्यावर घासकडवींनी तो मुद्दा पकडून असे का होत असावे असे विचारले. तसेच "मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही" (फेकू, भाजपेयी, नमोरूग्ण, भक्त वगैरे शब्द त्यांच्या चष्म्यातून नेहमीच्या सवयीप्रमाणे गाळले गेले असावेत*) येथे त्यांनी नेहमीप्रमाणे संदिग्ध विधान करत गुरूजींवर टीकास्त्र सोडून सरसकट भाजपविरोधींची पाठराखण केली.
नंतर पुढच्या प्रतिसादांमध्ये घासकडवींनी सल्ले देताना पुन्हा "संघाच्या शिबिरात अशी भाषा वापरणं कदाचित सर्वमान्य असेल" असे लिहिणे हे अकारण विषयांतरच आहेच. त्यावरही "तुम्ही याबाबत आत्मपरीक्षण कराल, वा न कराल. या विषयावर मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केल्यामुळे माझी लेखनसीमा." असेही लिहिले. (या प्रतिसादामध्ये त्यांनी हिंदू धर्माचा ओढून ताणून संबंध जोडून हिंदूंना शिव्या न दिल्याबद्दल थोडे आश्चर्य वाटले*)
येथे व्हिक्टीम गुरूजी असो अथवा कोणीही असो सुरूवातीला (योग्य) आरोप करताना सिलेक्टिव्ह आरोप करायचे आणि त्याने उत्तर दिले की मानभावीपणा करत सल्ले देण्याच्या नावाखाली पुन्हा नवीन नवीन आरोप करत शेवटी त्यांना आरोपी ठरवायचेच्च आणि हे सर्व प्रकार करताना दुसर्या (किंवा विरूद्ध) पार्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे. त्यावर कोणी काही बोललेच तर "ते तसलेच आहेत मग तुम्ही तसले का होता" अशी समर्थने तयात असतातच. हे समर्थन वरकरणी योग्य वाटेल परंतु एका बाजुने सगळे नियम धाब्यावर बसवून विखारी टीका होत असताना दुसर्या बाजुने सर्व नियम पाळावेत व एखादाही शब्द चुकू नये ही अपेक्षा चुकीची वाटते (..आणि गुरूजींसारख्यांकडून अशी अपेक्षा करणे किंवा असे नियम पाळले जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.)
त्यामुळे या प्रकरणात गुरूजींना संपूर्ण दोष देता येणार नाही. खांग्रेस हा उल्लेख नको होता हे ही मान्य परंतु असे सल्ले देतानाही मूळ अजेंडा राबवला जातोच जातो*
**********************************************************
हे झाले या मुद्द्याबद्दल. आता माझे थोडेसे..
भारतात २०१४ साली भाजपाचे सरकार आले. मोदींनी सुरूवातीपासून विविध देशांना भेटी देण्याचा आणि अनेक नवीन नवीन योजनांच्या अंमलबजावणीचा धडाका लावला आहे. वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री अपेक्षेपेक्षा चांगले काम करत आहेत आणि ट्वीटर / फेसबुक मुळे त्याचा प्रसारही होत आहे, मात्र "अच्छे दिन" हे निवडणूकीआधीचे अॅग्रेसीव्ह मार्केटिंग मोदी सरकारवर थोड्याफार प्रमाणावर उलटले आहे हे ही खरे आहे. (याचीही कारणे आहेत त्याबद्दल दुसरीकडे कोठेतरी चर्चा करूया) तर अशा परिस्थितीमध्ये सिलेक्टीव्ह गोष्टींचे भांडवल करून देशामध्ये असहिष्णुता पसरत आहे, अल्पसंख्यांकांची गळचेपी होत आहे, अशा हाकाट्या उठणे, सवंग पत्रकारिता, बिनबुडाचे आरोप होणे वगैरे गोष्टी नियमीतपणे होत आहेत. मोदी सरकारच्या विरोधासाठी पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्राची मदत मागणे वगैरे निंद्य गोष्टीही होत आहेतच.
मात्र सध्या एकंदर मराठी संस्थळांवरती जे सुरू आहे तेही निंद्यच आहे. नियमीतपणे मोदी सरकार, भाजपा यांच्यावर प्रछन्न आरोप करणारे लेख लिहिले जात आहेत. कोणताही विषय ओढून ताणून मोदी, भाजपावर आणला जात आहे आणि हे करणार्यांचा प्रतिवाद केला की मुद्दे मांडणारे पळ काढतात. अशा परिस्थितीमध्ये हा बुद्धीभेद करणारे एखादा विशिष्ट अजेंडा राबवण्यासाठी विशेष करार करत असावेत* ही शंका आल्याशिवायही रहात नाही.
..आणि या सगळ्याला वैतागलेले, न्यूट्रल राहणारे किंवा माझ्यासारखे राजकारणी विषयांपासून लांब रहाणारे लोकही प्रतिसाद देत आहेत कारण हे सो कॉल्ड विचारवंत "प्रतिवाद झाले नाही तर आम्ही जिंकलो, आणि प्रतिवाद झालाच तर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी" अशी सोयीस्कर दुटप्पी भुमीका निलाजरेपणाने घेत आहेत. मोदी सरकार म्हणजे जणू फॅसीस्ट सरकार अवतरले आहे आणि आता भारताचे काही खरे नाही असे गैरसमज पसरवण्यातही यांचा मोठा सहभाग आहे. झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करण्यासाठी योग्य मुद्दे मांडून प्रतिवाद केला की "बघा बघा आम्हाला बोलू दिले जात नाही" किंवा "भक्त टोळीने धावून आले" असा कांगावा केला जातो.
त्यामुळे केवळ एका आयडीवरून किंवा त्यांच्या भूमीकेवरून सरसकटीकरण न करता सर्व बाजूंचा विचार करावा इतकेच!
**********************************************************************
*ही सर्व माझी निरीक्षणे आहेत. कोणी अभ्यासपूर्वक लेख लिहून चुका दाखवल्यास मी त्या निरीक्षणांवर विचार करण्यास तयार आहे.**
**असे लिहिणे म्हणजेच "मी पुराव्याशिवाय आरोप करतो, तुम्ही निर्दोष असाल तर पुरावे देवून सिद्ध करा" हे ही बुद्धीभेदाचे आणखी एक लक्षण. येथे फक्त उदाहरणादाखल लिहिले आहे. तेही बुद्धिभेदाच्या प्रतिसादमॉडेल नुसार.
(या प्रतिसादाचा उद्देश "कसेहीकरून माझा मुद्दा तुम्हाला पटवून देणे" हा नाहीये तर मला आकलन झालेली परिस्थिती विषद करणे हा आहे - काही चुकत असल्यास अवश्य प्रतिसादावे)
9 Mar 2016 - 1:08 pm | शलभ
+१११११११११
शतप्रतिशत सहमत..:)
9 Mar 2016 - 3:29 pm | नाना स्कॉच
त्यामुळे केवळ एका आयडीवरून किंवा त्यांच्या भूमीकेवरून सरसकटीकरण न करता सर्व बाजूंचा विचार करावा इतकेच!
हे आपण सर्व आयडी साठी म्हणत आहात का फ़क्त श्रीगुरुजी ह्यांचे सरसकटीकरण होऊ नये असे सुचवता आहात??
(genuniely विचारतोय कृपया गैरसमज करून घेऊ नका ही विनंती)
दोन पैसे माझे ही,
श्रीगुरुजींचे नाव "कानफाट्या" ठेवले असेलही काही आयडी ने पण ते का ठेवले गेले हे मुळ शोधणे गरजेचे नसेल का?? हा विचार प्लीज एकदा कराल मोदक दादा, बुलेट ट्रेन सुटल्यागत गुरूजी एकच बाजुने बोलतात , नाही राजकीय निष्ठां असावी जरूर अन त्यांनी ती ठेवली म्हणून त्यांचा राग करायचे कारण नाही किंवा त्यांचे सरसकटीकरण सुद्धा होऊ नये हा मुद्दा मान्य, पण मुळात वेगळेच होते. ते एखादा मुद्दा मांडतात अन तोच यूनिवर्सल सत्य असल्यासारखे खिंड लढवत बसतात. उदाहरण द्यायचे झालेच तर अगदी काल मी डॉक्टर खरे ह्यांच्याशी एका मुद्द्यावर बोलत होतो, दोघांनी आपापली बाजु मांडली अन एकमत होऊ शकत नाही हे जाणल्यावर "बघा विचार करा काही उणे अधिक बोललो असलो तर क्षमा करा" म्हणून रजा घेतली. खरे सांगतो डॉक्टरांबद्दल अगोदरच असलेला टन भर आदर 10 हजार टन झाला देवा. असो, तर त्या मुद्द्यात् मी "एका वर्षांनंतर" ह्या धाग्यात सोन्याबापु नामक आयडी ने दिलेली तुरीच्या डाळी संबंधी माहीती वाचा असा सल्ला डॉक्टरांना दिला होता, तेच उदाहरण इथेही लागु होते आहे, त्या धाग्यावर "तुर तुटवड़ा हा निसर्गनिर्मित नसुन मानव निर्मित" आहे हे सिद्ध झाल्यावर सुद्धा गुरुजींनी चकार शब्दाने सुद्धा आपला मुद्दा करेक्ट करण्याबद्दल बोलले नाहीत, उलटपक्षी , जमाखोरी करणारे व्यापारीच कसे "चतुर" आहेत ही चक्क सारवासारव केली, ह्यातून काय दिसते?? तर आपली बाजु जर कोणी तांत्रिक अन शास्त्रशुद्ध रीतीने खोडली (वैयक्तिक ण होता) तरीही आपण लिहिलेले तेच ब्रह्मवाक्य ही वृत्ती दिसते, दूसरे उदाहरण सुद्धा त्याच धाग्यात सापड़ते जिथे मार्मिक गोडसे ह्या आयडी ने तेल उद्योग वगैरे वर उत्तम प्रतिसाद दिले होते (गोडसे मोदी/भाजप विरोधी आहेत का हे मला माहीती नाही पण मला वाचताना त्यांचा तर्क पटला होता) त्याला सुद्धा शेवटपर्यंत गोलगोल उत्तरे दिली गेली. कपिलमुनी वाला एपिसोड आपण स्वतः उल्लेखला आहे तरीही आपणाला त्याचे डिटेल्स माहीती आहेत म्हणून मी त्याची लांबड लावणे टाळतो इथे.
ढेरे अन प्रचेतस ह्यांची वकिली करायचे मला कारण नाही अजिबात आपली बाजु मांडायला त्यांचे ते किंवा श्रीगुरुजी सुद्धा समर्थ आहेतच, फ़क्त तुमच्या डिटेल प्रतिसादात एक समतोल सकारात्मकता दिसली म्हणून बोलु धजावलो, गुरुजींचे सरसकटीकरण होते हे मान्य, ते गुरुजींचेच काय कुठल्याही आयडीचे होऊ नये हे तर 10000 वेळा मान्य करतो मी. पण जर ते त्यांचेच कर्मफल असेल (फ़क्त गुरुजीच् नाही तर इतरही काही आयडी) अन त्यांना जाणतेपणी कोर्टात म्हणतात तसे पुरे होशोहवास में ते चालत असेल हवे असेल तर त्याचा प्रतिवाद करणे किंवा ते झेलणे हे ही त्यांचेच प्राक्तन होय , त्यात तुम्ही आम्ही किंवा इतर कोणी काही करू शकणार नाही असे वाटते.
शेवटी म्हणायचे झाले तर एकच म्हणेल, एखादा मुद्दा मांडला अन कोणी तो शास्त्रोक्तरीत्या खोडला तर तो मान्य करायची दिलदारी हवी , हे गुरुजीच नाही तर समर्थक विरोधक , भक्त द्वेष्टे , तुम्ही मी सगळ्यांना लागु असेल असे ही नोंदवतो. अन माझे अप्रस्तुत 4 चे 400 झालेले शब्द संपवतो
विनंती विशेष :- आता माझे सरसकटीकरण होणार नाही अशी अपेक्षा अन प्रार्थना करतोय :D
9 Mar 2016 - 3:57 pm | मोदक
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा थोडा गैरसमज झाला आहे (बहुदा मी पुरेसे स्पष्ट लिहिले नाही त्यामुळे.)
हे मी प्रचेतस यांच्या "माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय." या वाक्याला उद्देशून लिहिले आहे.
गुरूजींचे नांव कानफाट्या पडले आहे किंवा त्यांना तसे ठरवले जाते आणि त्याला ते स्वतः कारणीभूत आहेत हे माझेही मत आहे किंबहुना मिपावरच कोठेतरी "एखाद्या मुद्द्यामध्ये किंवा पक्षाची बाजू घेताना योग्य ठिकाणी थांबायचे मनावर घ्या" असा सल्लाही मी कुठेतरी दिला आहे - आत्ता ती लिंक सापडत नाहीये. (आणि तसे नसल्यास हा सल्ला मनावर घ्या हो गुरूजी)
शेवटी म्हणायचे झाले तर एकच म्हणेल, एखादा मुद्दा मांडला अन कोणी तो शास्त्रोक्तरीत्या खोडला तर तो मान्य करायची दिलदारी हवी , हे गुरुजीच नाही तर समर्थक विरोधक , भक्त द्वेष्टे , तुम्ही मी सगळ्यांना लागु असेल असे ही नोंदवतो
+१११
अशी सकारात्मकता यापूर्वीही अनेक आयडींकडून दिसली आहे आणि गुरूजींना या मुद्द्यावर सुधारणा करणे आवश्यक आहे हे ही खरेच!
9 Mar 2016 - 7:03 pm | कपिलमुनी
भक्त आणि समर्थक यांत हाच तो फरक !
एका क्ष आयडी सोबत बराच काळ डोक फोडल्या वर मला कळाला , की यांच्यामागे बाँब फुटला तरी हे मी नाही पाहिला त्यामुळे फुटलाच नाही अशी भूमिका घेतात. त्यामुळे तिथे थांबलो .
संवाद किंवा चर्चेमधून विचारांची देवाण घेवाण अपेक्षित असते. समोरच्याचा तर्कशुद्ध बोलण मान्य करणे हे विवेकबुद्धी शाबूत असण्याचा लक्षण आहे. हा चिखल फक्त "दोन्ही" बाजूकडून रेटून बोला यामुळे झाला आहे. हे त्या टीव्हीवरच्या वांझोट्या चर्चेसारखा झालाय. त्यामुळे समोरचा समजूनच घेत नाही तर व्यर्थ चर्चेचा उपयोग नाही.
बाकी अशा चर्चा काही प्रमाणात ठीक पण सध्या मिपा उघडला की तेवढच दिसता . सध्या राजकीय व्यासपीठ झालाय.
10 Mar 2016 - 12:10 am | कपिलमुनी
बेक्कार हसलो राव !!
10 Mar 2016 - 7:11 pm | श्रीगुरुजी
बापरे! "तुर तुटवड़ा हा निसर्गनिर्मित नसुन मानव निर्मित" हे केव्हा सिद्ध झाले? गेली २-३ वर्षे खूप कमी पडलेला पाऊस आणि त्यामुळे कमी झालेले डाळींचे उत्पादन यांचा डाळीचे भाव वाढण्यामागे काहीच संबंध नव्हता का? त्या धाग्यावर मी अनेक प्रतिसादातून सविस्तर उत्तरे दिली होती. अर्थात डाळीच्या भाववाढीमागे निसर्गनिर्मित कारणे नसून फक्त मानवनिर्मित कारणे आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर माझा नाईलाज आहे.
मी काय गोलगोल उत्तरे दिली? गोलगोल उदाहरणांची उदाहरणे देता का?
जरा तो धागा नीट वाचा. मी अनेक सविस्तर प्रतिसादातून अनेक संदर्भ व आकडेवारी दिलेली आहे. हे सर्व गोलगोल वाटत असेल तर माझा नाईलाज आहे.
बादवे, मी प्रतिसाद देताना प्रतिसादात जिथेजिथे शक्य आहे तिथे संदर्भ, आकडेवारी व लिंक्स द्यायचा प्रयत्न करतो.
12 Mar 2016 - 3:07 pm | मार्मिक गोडसे
अजिबात गोलगोल वाटत नाही, उलट तुम्ही दिलेली ही आकडेवारी सरकार पेट्रोलियम उत्पादनांवर अनुदान देते हा तुमचा दावा फोल ठरवतेय. अनुदान देतेय,परंतू ते 'निगेटिव्ह' प्रकारात मोडते. तुम्हीच दिलेले उदाहरण बघू.
Following is an example of diesel price build up in Delhi.
Import Crude basket price : Rs 42.67/Lit
Refinery Gate Price : Rs 43.73/Lit
OMC’s DESIRED selling price : Rs 46.07/Lit
UNDER- RECOVERIES : Rs 6.31/Lit (हेच सरकारने दिलेले अनुदान)
Price charged to dealers by OMC : Rs 46.07 -6.31 = Rs 39.76/Lit
Dealer commision : Rs 1.09
Following is an example of diesel price build up in Delhi.
Import Crude basket price : Rs 42.67/Lit
Refinery Gate Price : Rs 43.73/Lit
OMC’s DESIRED selling price : Rs 46.07/Lit
UNDER- RECOVERIES : Rs 6.31/Lit (हेच सरकारने दिलेले अनुदान)
Price charged to dealers by OMC : Rs 46.07 -6.31 = Rs 39.76/Lit
Dealer commision : Rs 1.09
Add TAXES : Rs 9.40/Lit
FINAL Price WE pay : Rs 50.25/Lit
FINAL Price WE pay : Rs 50.25/Lit
इथे सरळसरळ पेट्रोलवर दिलेले अनुदान हे पेट्रोलवर लावलेल्या करापेक्षा अधिक आहे, ह्यालाच निगेटिव्ह अनुदान म्हणतात.
त्या धाग्यावर बापूसाहेबांच्या विनंतीला मान देवून ह्या विषयावर चर्चा मी तेथेच थांबवली होती. इथे विषय निघाला म्हणून खुलासा केला.
12 Mar 2016 - 4:56 pm | श्रीगुरुजी
मी त्या धाग्यावर अनेक सविस्तर प्रतिसाद देऊन अनेक वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती दिली होती. वर चोप्य केलेला भाग एका सविस्तर प्रतिसादाचा मधलाच थोडासा भाग आहे. पूर्ण प्रतिसाद खूप मोठा आहे. त्या मोठ्या प्रतिसादाच्या आधी आणि नंतरही अनेक प्रतिसाद दिले आहेत. ते सर्व वाचले तर जास्त स्पष्ट होईल. एनीवे, सर्वच प्रतिसाद तुम्हाला गोलगोल वाटत असतील तर माझा नाईलाज आहे.
12 Mar 2016 - 5:11 pm | मार्मिक गोडसे
हे तुम्ही वाचले नाही का?
12 Mar 2016 - 5:33 pm | श्रीगुरुजी
ओके ओके. सॉरी. गोलगोल उत्तरे हा शब्द नानासाहेबांचा होता, तुमचा नव्हता.
12 Mar 2016 - 5:42 pm | मोदक
ओ गुरूजी.. नवीन मुद्द्यांकडे वळा प्लीज. एखादा नवीन लेख लिहा.
9 Mar 2016 - 4:08 pm | प्रचेतस
तुझे म्हणणे पूर्णतया मान्य.
मला राजकीय चर्चांत अजिबात रस नसतो आणि राजकारणाबद्दल माझे ज्ञान पण अगाध आहे हे तुलाही माहीतच आहे पण हा जो सरळसरळ गदारोळ चाललाय तो कुठेतरी थांबावा असे मनापासून वाटते. मिपा म्हणजे जणू राजकीय आखाडाच झालाय.
विरोधकांचेही चुकत असेल, नव्हे चुकते आहेच पण त्यांचे तर कामच आहे टीका करुन स्वतःची पोळी भाजून घेणे. पण ह्या सापळ्यात मोदीसमर्थकांनी का अडकावे? बाकी श्रीगुरुजींसारख्या अजेंडावादी (अंध)भक्तांमुळे मी स्वतः भाजपपासून दूर जातोय हे मात्र खरे.
इति लेखनसीमा.
9 Mar 2016 - 4:31 pm | मोदक
मोदी समर्थकांबाबत माझे असे निरीक्षण आहे की, २००२ पासून झालेला अन्याय. पैशाच्या मोहाने विकले गेलेले न्यूज चॅनल, पत्रकार यांनी सतत केलेली अनाठायी टीका वगैरे गोष्टींचा राग असणे साहजिक आहे. २०१४ मध्ये तो राग मतपेटीतून व्यक्त झालाही आहे. काँग्रेसवरचा राग ओसरू नये याची सोय काँग्रेसवालेच करत आहेत. त्यामुळे ती आग विझत नाहीये.
एकंदर असे आहे की विरोधक प्रछन्न आरोप करत आहेत आणि मोदीभक्त त्यांच्या पातळीवर उतरून उत्तरे देत आहेत. हे सगळीकडेच सुरू आहे.
..आणि सापळा असला तरी हा सापळा काँग्रेस व डाव्यांनाच नक्की भोवणार आहे.
रच्याकने - राजकारणाच्या धाग्यामध्ये मीही उतरत नाही. पण मोदी सरकार मध्ये फॅसीझमची लक्षणे दिसणे, येताजाता हिंदू धर्माला शिव्या देणे, मोदी सरकार काम करत असतानाही कै च्या कै आकडे मांडून सरकारच्या कार्यक्षमतेवर फालतू प्रश्न करून अजेंडा राबवणारे निष्कर्ष काढणे वगैरे प्रकार न पटल्याने मी प्रत्युत्तरे देत आहे. :)
9 Mar 2016 - 6:56 pm | राजेश घासकडवी
हा समंजसपणा बाळगल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
या व्हॉटअबाउट्रीची गरज नव्हती. हे शब्द पक्षाचा साधा उल्लेख करताना नाही, तर मोदीसमर्थकांवर टिप्पणी करताना वापरले जातात. माझा आक्षेप 'टिप्पणी करायची नसतानाही, केवळ कॉंग्रेस वि. भाजपा असा उल्लेख करतानाही शब्दाचं विकृतीकरण करण्याची गरज नव्हती.' इतकाच होता.
कानफाट्या ठरवू नये असं सांगताना वरील विधान किती पूर्वग्रहदूषित, कानफाट्या ठरवणारं आहे हे तुमच्या लक्षात आलं का? मी हिंदू धर्माला शिव्या दिल्या आहेत असं किती वेळा झालं आहे? मिपावर मी सव्वाशे लेख लिहिलेले आहेत. ती यादी तपासून पाहा. त्यात काही ठिकाणी अनेकांची टिंगल केलेली आहे. माझ्या पंच्याण्णव टक्के लिखाणात धर्माचा काहीही संंबंध नसतो. तसंच मी बायबलला अनेक वेळा शिव्या घातलेल्या आहेत. असं असूनही मला अप्रत्यक्षपणे हिंदुद्वेष्टा म्हणणं चुकीचं आहे. याबद्दल तुमच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्याची अपेक्षा आहे.
10 Mar 2016 - 4:13 am | निनाद मुक्काम प...
मोदी समर्थक जे मिपाकर आहेत त्यांना वाट्टेल ती विशेषण लावा
हरकत नाही
हरकत आहे पक्षाला नावे ठेवली तर ती विकृती ठरते.
असा प्रकार आहे तर
पण पक्ष हा शेवटी कार्यकर्ते नेते व समर्थक ह्या हाडामासाच्या माणसांचा बनला आहे , त्यांच्या शिवाय पक्षाला अस्तित्व नाही
त्यांची मुल्ये विचारधारा माणसेच बनवतात व पायदळी सुद्धा माणसेच बनवतात
खान्ग्रेज हा उल्लेख जेव्हा पक्षाचा झाला तो ह्या पक्षातील सध्याचे नेतृत्व कार्यकर्ते नेते ह्यांच्या कार्यशैलीवर आघात होता.
गुरुजींचा येथे टार्गेट केले गेले.
माझे त्यांच्याशी वाजपेयी ह्यांच्या कंदाहर असो किंवा इतर प्रसंगी चुका झाल्या ह्या मुद्यावरून मतभेद झाले होते, पण एरवी एखादा आयडी नेहमी पुरावे संधर्भ देऊन विस्तृत लेख व प्रतिसाद देतो अश्या आयडी ला जाणीवपूर्वक कॉर्नर केलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली
11 Mar 2016 - 6:44 pm | मोदक
दांभीकपणा आणि कांगावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद आहे.
राजकीय पक्षावर टिप्पणी करताना असो अथवा साधा उल्लेख करताना असो, पक्षनामाचा असा उल्लेख करणे हे चूकच आहे. येथे तुम्ही नुसते निरीक्षण नोंदवले असते किंवा थेट सल्ला दिला असता तरीही ठीक मात्र "मिपावर भाजपावर टीका होत असली तरी इतक्या सहजपणे इतक्या खालच्या पातळीवर कोणी जाताना दिसत नाही" हे सर्टिफिकेट कोणत्या आधारावर दिले? (येथे एखादा धागा वाचून आणि एक दोन आयडींचे वरवरचे प्रतिसाद वाचून निष्कर्ष काढला असल्यास तसे सांगावे)
तुम्हाला अप्रत्यक्षपणे हिंदुद्वेष्टा म्हणण्याबद्दल..
"मी फक्त माझे निरीक्षण नोंदवले, ते वास्तविकतेला धरून असेलच असे नाही आणि ते सर्वसाधारण निरीक्षणांवर अवलंबून आहे" या प्रकारचा हा प्रतिसाद होता आणि स्पष्ट शब्दात तो "उदाहरणार्थ आहे" असेही नोंदवले आहे. अगदी असाच प्रतिसाद तुम्ही इतरत्र दिला आहे. मग हा प्रतिसाद तुमच्या बाबतीत आल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया अकारण आक्रस्ताळी आणि विनाकारण आकांडतांडव करणारी का आहे..?
तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत काहीही अभ्यास न करता व्यक्त होणार आणि कैच्याकै निष्कर्ष काढणार, पण आणखी कोणीतरी त्याच प्रकारे व्यक्त होत एखादी शक्यता वर्तवली तर तुम्ही थेट दिलगिरीची अपेक्षा करणार हा सोयीस्कर दुटप्पीपणा आहे हे तुमच्या लक्षात येते आहे का?
मी केवळ उदाहरण देण्यासाठी असे पहिल्यांदा केले तर तुमची इतकी टोकाची प्रतिक्रिया आली. मग इतरांच्या भावनांच्या बाबतीत तुम्ही तितकेच संवेदनशील असावे ही अपेक्षा अगदीच अवास्तव आहे का?
..आणि दिलगिरी संदर्भातच,
"सध्याच्या भारत सरकारच्या कारकिर्दीत फॅसीस्ट सरकारच्या विविध लक्षणांपैकी अनेक लक्षणांची तीव्रता वाढली आहे" हा चुकीचा निष्कर्ष कोणताही अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसताना सार्वजनिकरीत्या व्यक्त करून वाचकांची दिशाभूल करण्याबद्दल तुम्ही सर्व वाचकांची माफी का मागू नये?
किंवा
"एखाद्या चर्चेची पातळी खाली नेणारी तिरकस भाषा वापरणे ही संघस्वयंसेवकांची सर्वमान्य प्रवृत्ती आहे" या वाक्याबद्दल तुम्ही येथील संघस्वयंसेवकांची माफी का मागू नये?
सव्वाशे लेख आहेत. अशी अनेक उदाहरणे सापडतील. तुम्हाला आणखी हवी असली तर आणखी शोधून देतो. तुमची चूक झाली असेल तर विनाशर्त दिलगिरी व्यक्त कराल अशी अपेक्षा आहे.
11 Mar 2016 - 8:01 pm | राजेश घासकडवी
माझी निरीक्षणं विरुद्ध तुमची निरीक्षणं या पातळीवरच शेवटी येतंय तर. कशानेच काहीच सिद्ध होत नाही. मी म्हणतो तुमचं चुकीचं आहे, तुम्ही म्हणता माझं चुकीचं आहे. इथेच थांबू. तूतूमैमैवर जाण्याऐवजी दुसऱ्या काहीतरी गमतीदार विषयावर बोलू.
11 Mar 2016 - 8:30 pm | मोदक
इथेच थांबू.
सहमत. :)
8 Mar 2016 - 10:59 pm | श्रीगुरुजी
मी पडलो?
कमाल आहे. अहो, जे पडलेत तेच काहीही स्पष्टीकरण न देता निघून गेलेत कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही. आधी विषय त्यांनी स्वत:हून उकरून काढला. खांग्रेस हा शब्द म्हणे तुच्छतापूर्वक आहे आणि असा शब्द वापरणे म्हणजे नाकात बोट घालण्यासारखं घाण आहे म्हणे. मी २-३ वेळा त्यांना विचारलं की या शब्दात नक्की काय तुच्छतापूर्ण आहे, तर त्यावर उत्तर नाही. उलट मलाच आत्मपरीक्षण करायचा सल्ला दिला. हेही विचारलं की इतर पक्षांचा असा तिरकस उल्लेख झाल्यावर तो का तुम्हाला नाकात बोट घातल्यासारखा वाटला नाही असा दुटप्पीपणा का? त्यावरही उत्तर न देता काढता पाय घेतला. त्यांचे खांग्रेसविषयीचे ममत्व आणि विशेषतः भाजप/मोदी/संघ इ. विषयीचा राग यातून असा दुटप्पीपणा येतो. चालायचंच.
9 Mar 2016 - 10:04 am | प्रचेतस
अहो गुर्जी ते तुच्छतादर्शक कसं नाही ते सांगा ना जरा, अता उद्या कोणी तुमच्या आयडीचं विडंबन 'शीगुरुजी' असं केलं तर तुम्हाला ते तुच्छतादर्शक वाटेल का आनंदाने मिरवून घ्यावेसे वाटेल?
(व्यक्तिगत घेऊ नका, मी केवळ उदाहरण म्हणून दिलंय)
दुसऱ्याने दगड मारला म्हणून तुम्हीही दगडच मारणार का त्यांनी दगड मारू नये म्हणून प्रयत्न करणार?
सांगा ना प्लीजच...
9 Mar 2016 - 2:40 pm | श्रीगुरुजी
कमाल आहे. खांग्रेस हा शब्द तुच्छतापूर्वक आहे असा जावईशोध घासकडवींनी लावला. तो कसा तुच्छतापूर्वक आहे ते सांगा असे २-३ वेळा विचारल्यावर त्यावर एक अक्षरही उत्तर न देता "आत्मपरीक्षण करा", "संघाच्या शिबिरात अशी भाषा चालत असेल" असे पूर्णपणे विषयांतर करून त्यांनी काढता पाय घेतला. आणि आता हा शब्द कसा तुच्छतापूर्वक आहे हे तसा जावईशोध लावणार्यांना न विचारता उलट तुम्ही मलाच विचारत आहात हा शब्द कसा तुच्छतादर्शक नाही हे सांगा. हा जावईशोध घासकडवींचा आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडेच या प्रश्नाचे उत्तर आहे.
मला काहीही वाटणार नाही.
ज्यांना कायम विनाकारण इतरांना दगड मारून पळून जायची सवय असते त्यांना शेवटी दगडानेच उत्तर द्यावे लागते.
9 Mar 2016 - 2:52 pm | मोदक
खांग्रेस हा शब्द तुच्छतापूर्वक नसेल तर तुम्ही सरळ सरळ काँग्रेस का लिहित नाही?
हे असे लिहिण्यामुळे मेन हिरो नाचत असताना बाजुचा एक्स्ट्रॉ भाव खाऊन गेल्यासारखे होते. तुमचा मुख्य मुद्दा कितीही योग्य असला तरी अशा उल्लेखामुळे तो बाजुला पडतो आहे. (उदा.) आता खांग्रेसची तुमच्या लेखी व्युत्पत्ती (पैसे) खाणारे ते खांग्रेस अशी असली तरी वरती हिंदू-मुसलमान वाद असल्यासारखी मोडतोड केली गेलीच ना?
आता तरी प्रचेतस सरांचा मुद्दा लक्षात येतो आहे का?
9 Mar 2016 - 6:42 pm | राजेश घासकडवी
घासकडवी हे नाव सारखं सारखं येतं आहे म्हणून नाईलाजाने लेखनसीमा आवरती घ्यावी लागलेली आहे.
हे विधान म्हणजे सिलेक्टिव्ह रीडिंग की दाबून खोटेपणा करणं हे कळत नाही. त्यांना मी ताबडतोब उत्तर दिलं होतं.
या वाक्यात मी खांग्रेस किंवा खान्ग्रेस हा शब्द तुच्छेतेने कसा वापरला जातो हे दाखवलं होतं. आता हा वापर तुच्छतेचा नाहीच असंही कोणी म्हणेल. पण मला तो तुच्छतेचा कसा वाटतो हे मी लिहिलेलं होतं.
9 Mar 2016 - 8:22 pm | रमेश भिडे
काँग्रेस पक्ष विशिष्ट लोकांचे लांगूलचालन करतो हे वारंवार सिद्ध झालेले आहे. बाकी आपण निवडणूक आयोगाचे (काँग्रेस सरकारच्या राजवटीत नेमणूक झाल्याने पक्षनिष्ठ असे) निरीक्षक असावेत व मिपावर कोण काय बोलतंय याबाबत अहवाल तयार करणारे कारकून असावेत अशी शंका निर्माण होते आहे. आपल्याला वाटली तर वाटू दे की. खांग्रेस म्हणायला कुणाला बंदी आहे का?
9 Mar 2016 - 11:32 pm | श्रीगुरुजी
घासकडवी,
तुमची खरोखरच कमाल आहे. तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नाला अजूनही उत्तर दिलेले नाही. खांग्रेस हा शब्द का तुच्छतापूर्ण आहे हे तुम्हाला २-३ वेळा विचारले तेव्हा त्याचे कोणतेही सरळ व स्पष्ट उत्तर न देता "खान-्ग्रेस म्हणजे मुस्लिमांची दाढी कुरवाळणारा पक्ष' असा अर्थ तुम्हाला अपेक्षितच नव्हता असं तुम्ही म्हणू शकाल." असे स्वत:च ठरवून मोकळे झालात.
म्हणजे मला काय म्हणायचे हे मी अजिबात सांगितले नाही तरी ते तुम्हीच स्वतःच्या मनाने ठरविणार, हा अर्थ मी नाकारणार असेही तुम्ही स्वतःच गृहीत धरणार, विचारले नसतानाही शहाजोगपणे दुसर्यांना आत्मपरीक्षण करण्याचे सल्ले देणार, विषयाचा दुरूनही संबंध नसताना संघाला विषयात आणून मनातील मळमळ ओकून टाकणार आणि कोणी काही विचारण्याचा आतच लेखनसीमा म्हणून निघून जाणार. वा!
7 Mar 2016 - 11:18 pm | विकास
मिपावर असलेले भाषण्/लेखन स्वातंत्र्य हे मिपाचे एक वैशिष्ठ्य आहे. इथे राजकारण-समाजकारणाच्या बद्दलच्या चर्चेत भाजपा, काँग्रेस, संघ, समाजवाद, आणि अर्थातच कम्युनिस्ट या सर्वांच्या बाजूने लिहीणारे दिसतील.
8 Mar 2016 - 8:55 am | आनन्दा
असहमत.. भाजपावाल्यांना भाजपाई म्हणणारे इथेच आहेत..
10 Mar 2016 - 1:02 pm | बाळ सप्रे
अतिवापरामुळे खांग्रेस शब्द युजर डिक्शनरीत साठवला गेला आणि ऑटोकरेक्ट झालं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही :-)
7 Mar 2016 - 12:39 am | गामा पैलवान
विवेक ठाकूर,
>> जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!).
तुम्हाला काय म्हणायचंय ते मला साधारणत: कळतंय. संसदेवर हल्ला केला म्हणून त्याला फाशी द्यायला तुमची हरकत नाही. मात्र त्याच्या विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा असा तुमचा आग्रह आहे. बरोबर?
आ.न.,
-गा.पै.
7 Mar 2016 - 11:29 am | अर्धवटराव
इतकी लांबलचक न्यायीक प्रक्रीया झाली ति विचारांची फाईट नव्हती काय ? काश्मीरमधे निवडणुका, वेगवेगळ्या मंचावर चर्चा, मिडीयाबाजी, संयुक्त राष्ट्राच्या सभांमधले दाखले हे सर्व वैचारीक संघर्षच आहेत ना ?
7 Mar 2016 - 11:33 am | विवेक ठाकूर
तुम्हाला काय म्हणायचंय ते मला साधारणत: कळतंय. संसदेवर हल्ला केला म्हणून त्याला फाशी द्यायला तुमची हरकत नाही. मात्र त्याच्या विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा असा तुमचा आग्रह आहे. बरोबर?
अफजलनं उघड देशद्रोह केला होता त्यामुळे त्याला झालेली सजा निर्विवादपणे योग्य आहे. तिथे विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याचा प्रश्नच येत नाही.
माझा आक्षेप अफजल आणि कन्हैयाला एकाच लाईनीत बसवण्याला आहे. प्रिंट मिडीया आणि व्यक्तीची मुलाखत यात कमालीचा फरक आहे. मुलाखतीतून त्या व्यक्तीचं नेमकं म्हणणं सरळ तुमच्यासमोर येतं आणि तुम्ही तुमचं मत बनवू शकता. या हेतूनं मी कन्हैयाच्या मुलाखतीचा धागा दिला होता. कन्हैयानं राजद्रोह म्हणजे देशद्रोह नाही असं म्हटलंय आणि त्या अनुषंगानं सध्या जे सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह असं चित्रं रंगवलं जातंय त्या विरोधात आवाज उठवला आहे.
लेखकानं हा धागा काढून बिजेपीच्या मानसिकतेतचंच (सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह) उत्तम प्रदर्शन केलंय.
इतक्या उघड गोष्टीवर इथे स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याप्रमाणे `चपला घाला' असा तद्दन निर्बुद्ध प्रतिसाद आलायं तो ही बिजेपीच्या `देश सोडा' इतक्याच लायकीचा आहे. पण हे कळायला किमान समज असण्याची गरज आहे.
तद्वत, आपल्याकडे काहीही मटेरियल नसलं की इथे `सायकॅट्रीस्ट' हा तितकाच निर्बुद्ध पण आवडीचा प्रतिसाद दिला जातो. त्यातून प्रतिसादक स्वतःची झालेली मानसिक कोंडी दर्शवतोयं आणि ते त्याच्या मनोरूग्णतेचं दर्शक आहे ही त्याच्या आकलनापलिकडची गोष्ट असते. बहुदा असे प्रतिसाद देणारे मनोरुग्ण स्वतःच्या अनुभवातून असा सल्ला देत असावेत. अर्थात, त्यांचे प्रतिसाद पाहिले की त्यांचा वकूब कळतो. अशा प्रतिसादांना उत्तर देण्यात अर्थ नसतो. तरीही असा प्रतिसाद कुणाला पुन्हा आला तर त्याला प्रतिसादकाच्या रूग्ण मानसिकतेची कल्पना यावी म्हणून हा प्रपंच!
7 Mar 2016 - 12:51 pm | श्रीगुरुजी
मुळात कन्हैय्याला भाजपला विरोध केला म्हणून अटक झालेली नाहीय्ये. जेएनयु मध्ये अफझल गुरूच्या फाशीच्या विरोधात जो कार्यक्रम केला व त्यात वेगवेगळ्या २९ भारतविरोधी घोषणा दिल्या म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे सर्व माहिती असूनसुद्धा त्याने भाजपला विरोध केला म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न अखंड सुरू आहे.
सध्याच्या सत्तेला विरोध म्हणजे देशद्रोह असे कोणीही म्हणत नाही. विनाकारण खोटेनाटे उठवू नका.
10 Mar 2016 - 7:31 pm | विवेक ठाकूर
त्यानं देशद्रोह केला किंवा नाही हे न्यायप्रविष्ट आहे पण तो मोदीविरोधी बोलतो म्हणून तुम्ही असला भंपक धागा काढून त्याला अफजलशी इक्वेट केलायं . त्याच्या प्रतिमा हननाचा प्रयत्न आता अंगाशी आल्यावर तुम्ही विषय बेअर चार्जेसवर नेतायं .
10 Mar 2016 - 7:38 pm | श्रीगुरुजी
परत तेच! मूळच्या प्रतिसादावर तब्बल ७८ तासानंतर प्रतिसाद! आणि तेच तुणतुणं परत.
त्याच्या प्रतिमा हननाचा प्रयत्न माझ्या अंगाशी आला? किती गोड गैरसमज आहे तुमचा!
जरा स्वतः काढलेला धागा आणि या धाग्यावरील स्वतःचे प्रतिसाद व त्यावर इतरांनी दिलेली सडेतोड उत्तरे नीट वाचा. कन्हैय्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न तुमच्याच अंगाशी आला आहे.
10 Mar 2016 - 9:30 pm | विवेक ठाकूर
तुम्ही किती प्राणपणानं सत्ताधाऱ्यांचा फसलेल्या गाडा एखाद्या नोकरदारानी मालकाची खिदमत करावी तसा रात्रंदिवस ओढतायं ते पाहा . त्यानं त्यांचं तर काही भलं होणार नाही पण तुम्ही एकांगी आहात हे नक्की झालंय त्यामुळे यापुढे तुमचे प्रतिसाद सुद्धा कोण आणि कितपत वाचेल याची शंका आहे
11 Mar 2016 - 2:03 pm | श्रीगुरुजी
एकांगी तर तुम्हीच आहात. प्रत्येक धाग्यावर (कन्हैय्याचा उदो उदो करणारा धागा, स्त्रियांच्या ऑर्गॅझमवर तुम्ही उधळलेली मुक्ताफळे आणि त्यावर अनेक स्त्री सभासदांनीच तुमचा घेतलेला सडेतोड समाचार, हा धागा, पूर्वीचे तुमचे केजरीवालांचा उदोउदो करणारे धागे इ.) तुमचा सर्वांनी मनसोक्त समाचार घेतलाय. तरीही तुमचा अट्टाहास कायम आहे. कन्हैय्याचे भूतकाळातील सर्व प्रताप आता सार्वजनिक होत आहेत व अशा विकृत व्यक्तीचे समर्थन करण्याबद्दल खंत वाटण्याऐवजी अजूनही हिरीरीने त्याचे समर्थन सुरूच आहे.
माझे प्रतिसाद वाचा असे मी तुम्हाला चांदीच्या वाटीत अक्षता घेऊन आमंत्रण दिलेले नाही. वाचायचे का नाहीत हे इतरांनी ठरवावे. त्यांच्या वतीने तुम्ही वकिली करून नका. तुम्हाला वाचायचे नसतील तर नका वाचू. हू केअर्स?
7 Mar 2016 - 12:49 am | आरोह
ते जर असे म्हणत असतील तर त्यांना असे विचारावेसे वाटते कि,कसे करणार ते विचारांचा मुकाबला विचाराने???
म्हणजे काही योजना आहे का त्यांच्याकडे ???
त्या योजना उपयोगात आणता येतील काय??
7 Mar 2016 - 9:04 am | मूकवाचक
7 Mar 2016 - 3:03 pm | मोदक
अरे व्वा...
ही घ्या ब्रेकिंग न्युज
सनसनीखेज खुलासा..!!!
गुजरात २००२ हत्याकांडानंतर वाजपेयींनी मोदींना फटकारले. मोदींनी हात पकडून आणि मान झुकवून माफी मागितली.
7 Mar 2016 - 11:34 am | पिलीयन रायडर
विठा..
तुम्हाला कन्हैया (पुर्वी केजरीवाल) प्रांजळ आणि अजुन काय न काय वाटतो तिथेवर ठिक आहे.
पण
इथे अफजल गुरु --> मोदींना विरोध
मोदीभक्तासाठी मोदींना विरोध --> देशद्रोह
म्हणुन मोदीभक्तासाठी अफजल गुरु --> देशद्रोही ??????
मी कितीदाही हे वाचलं तरी तुम्ही इतका डोक्यावर पडल्यासारखा युक्तिवाद कराल ह्यावर विश्वास बसत नाही. तुम्हीच म्हणताय की अफजल देशद्रोही होताच. काय होतंय काय नक्की तुम्हाला?
7 Mar 2016 - 12:11 pm | विवेक ठाकूर
किंवा मग लेखकाचा चष्मा घालून वाचतायं.
अफजल आणि कन्हैया ही तुलना गैर आहे हे अनेकदा सांगून झालंय. आणि असली फडतूस विडबनं टाकून कन्हैयाला देशद्रोही ठरवणं चूक आहे इतकाच माझा मुद्दा आहे.
7 Mar 2016 - 12:54 pm | श्रीगुरुजी
हो का? मग "कन्हैय्या कुमार: वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!" असले फालतू धागे काढून देशद्रोह्यांचा उदोउदो करणे बरोबर आहे का?
7 Mar 2016 - 1:01 pm | विवेक ठाकूर
मग "कन्हैय्या कुमार: वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!" असले फालतू धागे काढून देशद्रोह्यांचा उदोउदो करणे बरोबर आहे का?
आता हा प्रतिसाद समस्त सदस्यांनी वाचा म्हणजे लेखकाचा धागा काढण्याचा उद्देश कळेल. आणि मी म्हणतोयं ते बरोबर आहे याची प्रचिती मनोरुग्ण आणि निर्बुद्ध चपलावाल्यांना येईल.
जो मोदी विरोधी तो देशद्रोही!
7 Mar 2016 - 1:13 pm | श्रीगुरुजी
धागा काढण्याचा उद्देश संबंधितांना बरोब्बर समजला आही. म्हणून तर असे बिथरल्यासारखे प्रतिसाद येत आहेत.
गोबेल्सच्या शिकवणु़कीला अनुसरून असत्याचा प्रोपागंडा सुरू आहे.
7 Mar 2016 - 10:35 pm | माहितगार
व्यक्तिगत टिकेने मुद्याचे समर्थन होते का या बद्दल साशंकता वाटते.
7 Mar 2016 - 1:07 pm | lakhu risbud
अनुल्लेखाने मारणे /दुर्लक्ष करणे हा प्रकार माहित आहे काय तुम्हाला क्षीरसागर ?
तुमच्या दृष्टीने हे विडंबन फडतूस आहे ना ?
मग प्रतिवाद का करत बसला आहात ?
तुच्या दृष्टीने जे फडतूस बोलणे आहे,अशा बोलण्याचा प्रतिवाद करताना तुम्ही सुद्धा तसेच बोलता आहात हे ध्यानात येत नाही का तुमच्या ?
शांततेचे,मौनाचे महत्व कर्कश्य पणे ओरडून सांगण्याचा प्रकार वाटतो हा.
धाग्याच्या संदर्भात अवांतर होईल पण आध्यात्माच्या क्षेत्रात पहिली पायरी असते … let it go.
तुम्ही स्वतःला एक अध्यात्मिक अधिकारी व्यक्ती म्हणून दर्शविता आणि या क्षुल्लक गोष्टींवर वितंडवाद घालत बसता.
हा विरोधाभास तुमच्या लक्षात येत नाही का ?
10 Mar 2016 - 7:45 pm | होबासराव
तुम्ही स्वतःला एक अध्यात्मिक अधिकारी व्यक्ती म्हणून दर्शविता आणि या क्षुल्लक गोष्टींवर वितंडवाद घालत बसता.
हा विरोधाभास तुमच्या लक्षात येत नाही का ?
लगता है लखुभाई रिसबुड जी नये आये है.
11 Mar 2016 - 11:37 pm | lakhu risbud
नक्की काय म्हणायचे आहे हे सविस्तरपणे सांगाल का ?
7 Mar 2016 - 1:09 pm | भंकस बाबा
आम्ही राव गाढ़वच राहिलो. ठाकुर साहेब कधिपासून सांगून राहिले, या धाग्यावर, कान्हा देशद्रोही नाय नाय त्रिवार नाय. आम्ही लेकाचे ऐकतच नाय.
कोर्टाने जामिन देताना पण सांगितले की जामिन मिळाला म्हणजे निर्दोष सुटका न्हाय.
विवेक ठाकुर म्हणजे रामशास्त्री, त्यांनी निक्काल लावला म्हणजे लावला.
ते येडं अनुपम खेर काय बरळुण गेलं टीवीवर, सालं टचिंग होत पण आता काय फायदा, कन्हैया निर्दोष हाय ना.
7 Mar 2016 - 1:17 pm | तर्राट जोकर
देशात नवीन कायदा झालाय का भंकसबाबा?
आजवर आम्ही समजत होतो की गुन्हा सिद्ध होईस्तोवर आरोपीस निर्दोष समजावे असं न्यायाचं तत्त्व आहे. अभी उल्टा हुई गवा का? ऐसा कैसा हुवा च्यामारी??
7 Mar 2016 - 5:13 pm | भंकस बाबा
@ तजो ,कन्हैयाला जेएनयू मधे काय चालले आहे याची पूर्ण कल्पना होती. जर हे अघटित घडणार होते तर मग त्याने तसा व्यवस्थापनाला रिपोर्ट करायचा होता. ते न करता तो त्याला माहीत असलेल्या देशद्रोह्याबरोबर उठत बसत होता. कायद्याने चोरीला मदत करणारा देखिल गुन्हेगारच!
साहेब तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे, जिथे जेएनयूच्या बाहेर बसलेल्या चनेवाल्याला खबर लागते तिथे हां काय चने खायला गेला होता?
माझी मुख्य चीड़ आहे ती जेएनयू मधे झालेल्या महिषासुर शहीद दिवसाची, हां फ़क्त भगवा रंग आहे म्हणुन त्याची कोणी टिनपाटाने टिंगल करावी काय? अशीच टिंगल निळ्या, पांढऱ्या वा हिरव्या रंगाची झाली असती तर या रंगाच्या समर्थकानी खपवून घेतली असती काय?
बाकी या धाग्याला इतके प्रतिसाद बघुन खरच गंमत वाटली. आमच्या विठाना अभिव्यक्तिस्वातंत्र कन्हैयासाठी अभिप्रेत आहे, पण विडंबन करण्याचा दुसर्याचा हक्क् ते त्यांच्या सोयींने डावलत आहेत.
आता त्या भटकल बन्धुचे, अबू जुन्दालचे, फोटो पण टाका मिपावर देसभक्त म्हणुन, अजुन आरोप कुठे सिद्ध झाले आहेत.
तजो हीच अककल जर नमोच्या तोंडाला रक्त लागले आहे ही भाषा बोलण्यार्याना शिकवलित तर भले होईल देशाचे!
7 Mar 2016 - 5:37 pm | तर्राट जोकर
कन्हैयाला जेएनयू मधे काय चालले आहे याची पूर्ण कल्पना होती. जर हे अघटित घडणार होते तर मग त्याने तसा व्यवस्थापनाला रिपोर्ट करायचा होता. ते न करता तो त्याला माहीत असलेल्या देशद्रोह्याबरोबर उठत बसत होता. कायद्याने चोरीला मदत करणारा देखिल गुन्हेगारच!
>> हौ डू यु नो दॅट?
साहेब तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे, जिथे जेएनयूच्या बाहेर बसलेल्या चनेवाल्याला खबर लागते तिथे हां काय चने खायला गेला होता?
>> तुम्ही तो रवीशकुमारच्या मुलाखतीत जे बोलला त्यावर विश्वास ठेवत नसाल तर तो तुमचा प्रश्न. तुम्ही विश्वास न ठेवल्याने सत्य बदलत नाही. अर्थात सत्य समोर येईलच असेही नाही. अगदी न्यायालयात सुद्धा.
माझी मुख्य चीड़ आहे ती जेएनयू मधे झालेल्या महिषासुर शहीद दिवसाची,
>> ह्याच्यासाठी त्याला उचलून आत टाकावे, वकिलांनी त्याल मनसोक्त धुवावे, त्याच्यावर देशद्रोह्याची केस चालावी हे तुम्हाला मान्य आहे तर.
आता त्या भटकल बन्धुचे, अबू जुन्दालचे, फोटो पण टाका मिपावर देसभक्त म्हणुन, अजुन आरोप कुठे सिद्ध झाले आहेत.
>> करिम टुंडा माहित आहे का? आज बाइज्जत बरी केलंय त्याला कोर्टाने. तुम्ही कोर्टाच्या निकालाचा याबाबतीत आदर कराल काय? करिम टूंडाला निकालाआधीच गुन्हेगार ठरवले गेल्याने ज्या मानहानीला आतापर्यंत सामोरे जावे लागले त्याची भरपाई कशी करु शकाल ते सांगाल काय? मुद्दा आरोप सिद्ध होइस्तोवर आरोपीस निष्पाप मानले पाहिजे ह्या न्यायाच्या तत्त्वाचा आहे. तुम्ही भटकल, अबु बद्दल म्हणताय मी तर साध्वी प्रज्ञा, पुरोहित, समीर गायकवाड ह्यांना न्यायालयाने निकाल देईपर्यंत निष्पापच मानेल. तुम्ही तुमच्या लॉजिकने त्यांना देशद्रोही मानणार का?
तजो हीच अककल जर नमोच्या तोंडाला रक्त लागले आहे ही भाषा बोलण्यार्याना शिकवलित तर भले होईल देशाचे!
>> नमोच्या तोंडाला रक्त लागले आहे असे बोलणारे मिपावर दिसले नाहीत अजूनतरी. दिसले तर शिकवेन हो. आधी ज्यांना गरज आहे त्यांना शिकवू कि नको? समतापूर्ण उपदेश असावा.
7 Mar 2016 - 8:33 pm | सुबोध खरे
त जो साहेब
दहशतवादी मग तो कोणत्याही रंगाचा असो तो देशद्रोहीच असतो. आज केवळ अब्दुल करीम टुंडा सुटला तो सज्जड पूर्व नाही म्हणून याचे कारण आपली न्यायालाये निष्पक्षपाती आहेत म्हणून. वातानुकुलीत खुर्चीत बसून दहशत वाद्यांबद्दल सहानुभूती दाखवणे सोपे आहे.प्रत्यक्ष एखाद्या दहशतवाद्याला गुन्हा करताना पहिले तरीही त्याच्या विरुद्ध प्रत्यक्ष साक्ष द्यायला कोणीही माणूस जीवाच्या भीतीने पुढे येत नाही. त्यामुळे उपलब्ध असलेला केवळ परिस्थितीजन्य पुरावा गोळा करण्यात तुमच्या पोलिसांची इतकी उर्जा खर्च होते.शिवाय या दहशतवाद्यांना खटला लढायला आपला शेजारी देश भरपूर पैसे पुरवायला तयार असतोच. त्यातून १९९०-२००० च्या दशकात नक्की माहिती असलेल्या दहशतवाद्याला ठार केले तरीही लष्करातील अधिकार्यांना आज खोट्या चकमकीत मारले म्हणून प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची सर्व समान्य माणसाना कल्पना नसते. दहशतवाद्याला पकडले तरीही पूरावा नाही म्हणून तो लगेच जामिनावर सुटतो आणि ताबडतोब लष्करी सैनिकांचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. मारले तर खोट्या चकमकीची चौकशी
आणि आज आपण वातानुकुलीत खोलीत बसून अब्दुल करिम तुन्दाच्या निर्दोषीपणाची ग्वाही देत आहात. त्याचा इतिहास वाचा.
रवींद्र पाटील नावाचा एक पोलिस केवळ सत्याला चिकटून आपले विधान न बदलल्यामुळे कफल्लक आणि बेवारस अवस्थेत मेला याची आपल्याला जाण आहे का?
ती जर असेल तर मला अधिक काही सांगायची गरज नाही आणि ती नसेल तर बोलणेच खुंटले.
7 Mar 2016 - 8:36 pm | सुबोध खरे
न्यायालये अशी निष्पक्ष असली तरीही अफझल गुरूची फाशी हि न्यायालयीन हत्या आहे अशा घोषणा जनेवि मध्ये दिल्या जातात आणि त्याला व्यक्तीस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य अशी गोंडस नावे दिली जातात हे संतापजनक आहे.
7 Mar 2016 - 8:42 pm | श्री गावसेना प्रमुख
अहो ह्यांची चित भी मेरी और पट भी मेरी अशी वृत्ती आहे,सोडलं नाही तर न्यायालयीन हत्या आणि सोडलं तर बघा आम्ही म्हणत नव्हतो कि निर्दोष आहोत।
7 Mar 2016 - 9:42 pm | तर्राट जोकर
ओ साहेब, उगा ताणू नका. मी कधी म्हटलं की अफझलगुरुची फाशी न्यायालयीन हत्या आहे?
चितभीमेरी पटभीमेरी चे पेटंट मिपावरचे एक सन्माननीय सदस्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही.
8 Mar 2016 - 6:53 am | श्री गावसेना प्रमुख
माझा प्रतिसाद हा कन्हैय्या नावाच्या बाहुलीला नाचवणाऱ्या लोकांना उद्देशून होता,म्हणजे खांग्रेसी कम्युनिस्ट वैगरे वैगरे,
पण तो तुम्ही अंगावर घेतला 'कन्हैय्या ला सपोर्ट करण्याच्या नादात तुम्ही आता एक से एक अतिरेक्यांच समर्थन करू ऱ्हायले ब्वा।
:अब्दुल करीम टूंडा हा तोच ना ज्याने आल्या आल्या दुखणं काढून सरकारी रुग्णालयातून पेस मेकर ची शस्त्रक्रिया केली होती तेही फुकटात.आता काही दिवसात दाऊद येईल त्यालाही इथेच मरायचं आहे तेव्हा तुम्ही त्याचंही असंच समर्थनं करणार का।
8 Mar 2016 - 7:29 am | तर्राट जोकर
तुम्ही बंदूक ताणलेली आहे, डोळ्यात शिकारीची नशा आहे, हात ट्रीगर दाबायला शिवशिवतायत. अशावेळेस काहीही हललं तरी हरिण समजून मारायची तुमची तयारी आहे. शिकारीसाठी शुभेच्छा!
न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.
8 Mar 2016 - 9:49 am | सुबोध खरे
जोकर बुवा
मी कायद्याचे तत्वच सांगितले आहे आणी ते न्यायालयाला पूर्ण मान्य असतेच. तेंव्हा "तुम्ही ते न्यायालयाला का सांगत नाही" या म्हणण्याला काय अर्थ आहे? न्यायालयाने टूण्डाला सज्जड पुरावा नसल्याने संशयाचा फायदा देऊन सोडले आहे. आपल्याला टूण्डाचा एवढा पुळका आहे ("करिम टूंडाला निकालाआधीच गुन्हेगार ठरवले गेल्याने ज्या मानहानीला आतापर्यंत सामोरे जावे लागले त्याची भरपाई कशी करु शकाल ते सांगाल काय?") तर टूण्डाने एवढे बॉम्ब स्फोट केले त्यात दगावलेल्या माणसांच्या निष्पाप कुटुंबियांना वा आयुष्यभरासाठी जायबंदी झालेल्या निष्पाप माणसाना झालेल्या कष्टाची किंमत काहीच नाही? ते तर कुठल्याही संशयाच्या भोवर्यात नव्हते किंवा नाहीत. टूण्डा चार केसेस मध्ये "पुरेशा"पुराव्याभावी सुटला पण अजून अनेक केसेस बाकी आहेत. आपण फक्त कायद्याच्या तत्वांचा कीस पाडला आहे त्याला फारसे कष्ट लागत नाहित. हे मी लष्करात असताना तस्कर किंवा दहशतवादी यांच्या विरुद्ध खटला दाखल करण्यासाठी काय काय करावे लागते ते स्वतः पाहिलेले आहे म्हणून फक्त बोलत नाहीये तर त्यात हुतात्मा झालेल्यानच्या कुटुंबाची आणि बळी पडलेल्या निष्पाप माणसांची आणी त्यांच्या कुटुंबियांची काय वाताहत होते हे स्वतः पाहत आलो आहे.
आपले विधान म्हणजे सलमान खानला केवढी मानहानी आणी कष्ट भोगायला लागले असे आहे पण त्याच्या गाडीखाली मेलेल्या माणसानचे काय या बद्दल आपले काहीच म्हणणे नाही.
ARMCHAIR ACTIVIST म्हणजे मला हेच म्हणायचे आहे. सलमानला न्याय "मिळालाच" पाहिजे पण त्याच्या गाडीखाली आलेल्या लोकांचे काय किंवा रवींद्र पाटील यांन न्याय मिळण्याबाबत काय तर ते "सरकारचे काम" आहे.
असो आपण चष्मा लाव्लेलाच आहे तेंव्हा माझ्या कडून तुमच्या विचारसरणीमध्ये काही बदल होईल अशी अपेक्षा नाहीच.
7 Mar 2016 - 9:52 pm | तर्राट जोकर
आणि आज आपण वातानुकुलीत खोलीत बसून अब्दुल करिम तुन्दाच्या निर्दोषीपणाची ग्वाही देत आहात. त्याचा इतिहास वाचा.
>> खरेसाहेब, निर्दोषपणाची ग्वाही मी नाही भारतीय न्यायालय देत आहे. मी न्यायालयाचा निर्णय इथे सांगितला, माझ्या मनचं नाही. आता बरोब्बर ह्याच खटल्यातला न्यायालयाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही हेच ना? पण कन्हयाच्या जामिनावरचं न्यायालयाचं भाष्य उड्या मार मारुन इथं लोक टाकतायत ते कसं मान्य होतं? एक काहीतरी ठरवा की.
राहता राहिला वातानुकुलीत खोलीचा प्रश्न. तो असेल तर इथे बाकी कोणी काहीच मत देऊ नये असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? तुम्हीही वातानुकुलीत खोलीत बसूनच लो़कांना जाण आहे की नाही ह्याचे सर्टीफिकेट मागत आहात.
बाकी, माझी जाण वैगरे काढायची तुम्हाला गरज नाही हो.
8 Mar 2016 - 12:04 am | सुबोध खरे
अब्दुल टुंडा चा इतिहास एकदा वाचा अशी विनंती आहे.नैदान त्याला कन्हैयाच्या रांगेत बसवण्याच्या अगोदर
8 Mar 2016 - 12:08 am | सुबोध खरे
Absence of proof is not proof of absence याचा अर्थ ही जाणून घ्या
8 Mar 2016 - 7:36 am | तर्राट जोकर
हेच न्यायालयाला सांगत का नाही खरे साहेब? एक भारतीय नागरिक म्हणून तुमची जबाबदारी नाही का? बिचार्या न्यायालयाला हे तत्त्व माहितच नाही बघा. वातानुकुलित खोलीत बसून हे जाणून घ्या ते जाणून घ्याचे उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा हे आवश्यक आहे, नै का?
8 Mar 2016 - 7:32 am | तर्राट जोकर
टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला न्यायालयाच्या निर्णयाशी असहमत व्हायचं नाही. कारण मला काय वाटतं ह्याने त्याला कोर्ट काय शिक्षा देईल हे ठरत नसतं.
न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.
8 Mar 2016 - 12:15 am | विकास
मी न्यायालयाचा निर्णय इथे सांगितला, माझ्या मनचं नाही.
एकदाचं ठरवून टाका बरं, न्यायालयांचे निर्णय म्हणजे न्याय असतो का ज्युडीशिअल किलींग ते!
आणि हो, अब्दुल तुंदा वरील फक्त दिल्ली पोलीसांनी केलेली फिर्याद रद्द झाली आहे. अजून त्याच्यावरील हरीयाणा, गाझियाबाद, अजमेर आणि हैदराबाद मधे खटले चालूच असल्याने, त्याला सोडलेले नाही.
8 Mar 2016 - 7:29 am | तर्राट जोकर
न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.
8 Mar 2016 - 9:06 am | आनन्दा
अब्दुल करीम टुंडा - स्त्त्रोत विकि -
He came under the police radar after the Mumbai serial bombings in 1993. He got the moniker Tunda – Hindi/ Bengali (Bangla) for without a hand or physically handicapped- after his left hand got severed in an accident while preparing a bomb in 1985 in Mumbai. His younger brother Abdul Malik, who still is a carpenter, is reportedly the only immediate family member alive in India. He also stayed in Pakistan where he is known to have imparted training on fabrication of IED and other explosives to mujahids who were sent to India from Pakistan for jehad.[6] During his stay in Pakistan, he had been in touch with organisations like ISI, LeT, Jaish-e-Mohammed, Indian Mujahideen and Babbar Khalsa and had been meeting people like Hafiz Saeed, Maulana Masood Azhar, Zaki-ur-Rehman Lakhvi, Dawood Ibrahim and several others wanted by India. He was using an elaborate network of human traffickers and fake currency suppliers active in Bangladesh. Tunda was also been associated with Rohingya operatives in the past. His association with LeT commanders Rehan alias Zafar and Azam Cheema alias Babajee is well known.[7][not in citation given]
8 Mar 2016 - 12:35 am | भंकस बाबा
महिषासुर शहीद दिवस साजरा करताना जी पत्रक छापुन वाटली होती त्यातील एक ईराणी बाईंनी संसदेत वाचून दाखवले होते. जी भाषा त्यात होती ती मी इथे लिहित नाही. तुम्हीच गुगलुन वाचा. मी 100% नास्तिक आहे पण जी भाषा त्या पत्रकात होती त्या भाषेला प्रत्युत्तर म्हणुन कन्हैयाचे चपलेने तोंड फोडले पाहिजे या मताचा मी आहे. याला बाळासाहेबच पाहिजे होते. जे डावे याला समर्थन करत आहेत त्यांनी कम्युनिस्ट असलेला सर्वात मोठा देश रशिया, इथे असे केले तर काय होईल याचा विचार करावा. कदाचित् कान्हा सायबेरियात बर्फ फोडत असता आणि पप्पू घमेंले भरत असता.
साला कुटुंबाचे मासिक उत्प्नन 3000 आहे सांगतो मग गाढ़वा अभ्यास कर ना, त्या गरीबीत रुतलेल्या आईबापाला बाहेर काढ ना. या लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजतो आहे? हे असले थेरं पप्पूने करावी , त्याच्या बापजाद्यानि तोंडाच्या तोफा चालवून बक्कळ पैसा कमवला आहे