मिपा रंगभूषा मंडळ

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
2 Mar 2016 - 9:14 pm

.

नमस्कार,

मिसळपाव.कॉम वर येणार्‍या साहित्यासोबतच मिपाला सजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रेखांकनांची, चित्रांची तसेच वेगवेगळ्या प्रसंगी विशेष फलकांची गरज पडते. अश्यावेळी मिपाकरांपैकी ज्यांना शक्य असेल ते लोक असे काम करतात. आता मिपाला या प्रकारच्या कामाची वारंवार गरज पडत असल्यामुळे अश्या मिपाकरांचे एक मंडळ असावे जे या ग्राफिक्सच्या क्षेत्रात काम करतात किंवा हौशी आहेत. अश्या लोकांचे मिळूण एक मिपा रंगभूषा मंडळ आजपासून कार्यरत होतेय.

आज या मंडळात अभ्या... (अभिजीत) असतील, सोबतच काही अन्य लोक जे सातत्याने मिपावर आपले योगदान देत आहेत असे लोक या मंडळात सहभागी होतील.

यापुढे मिपाच्या सजावटीची जवाबदारी या मंडळाकडे असेल. तुम्हाला मिपा सजवायचं असेल आणि तुम्हाला ग्राफिक्स क्षेत्रात काम करायला आवडत असेल तर तुम्ही सुध्दा या मंडळात सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्ही प्रशांतशी संपर्क साधावा.

- सरपंच

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Mar 2016 - 5:11 pm | बिपिन कार्यकर्ते

स्वभाव छानच आहे हो प्राडॉ! कायपण लफडा नाय! मस्त माणूस. :)

अभ्या..'s picture

7 Mar 2016 - 5:31 pm | अभ्या..

ओयहोय, साक्षात प्राडॉ., रामदास काका, नंदन मालक अन शेवटी दस्तुरखुद्द बिकामालकांनी सर्टिफाईड केलेला असा मी सर्वांना वंदन करतो. (ह्याचे एक संस्कृत सुभाषित बॅट्याकडे करायला टाकणारे ;) )

ऋषिकेश's picture

3 Mar 2016 - 1:54 pm | ऋषिकेश

खरोखरच उत्तम कल्पना आहे! शुभेच्छा!

मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा

मस्तच कल्पना..अभ्यानंदन..:)

सुमीत भातखंडे's picture

3 Mar 2016 - 2:20 pm | सुमीत भातखंडे

अभिनंदन आणि शुभेच्छा!

इशा१२३'s picture

3 Mar 2016 - 3:10 pm | इशा१२३

छान कल्पना!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!

इशा१२३'s picture

3 Mar 2016 - 3:11 pm | इशा१२३

छान कल्पना!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!

बॅटमॅन's picture

3 Mar 2016 - 3:21 pm | बॅटमॅन

अभ्या, अभिनंदन मर्दा!!!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Mar 2016 - 3:50 pm | निनाद मुक्काम प...

लय भारी
मस्त रे भावा
मिपाचे कवर तुम्ही सजवा
एक मिपाकर म्हणून त्यांचे अंतरंग आम्ही लेखांनी ,प्रतिसादांनी आम्ही सजवू.

मंडळाचे अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा !!
(रंगभूषा म्हटले की नाटके आणि मेकअप आठवतो पटकन ;)
अभिजित यांना डब्बल शुभेच्छा, हे कधीपासून ड्यू होतं आता मुहूर्त आला, उत्तमच.
आमचे सहकार्य आहे, नेहमीच राहील, एक आवाज द्या फक्त, मिपासाठी काहीपण :)

तुषार काळभोर's picture

3 Mar 2016 - 4:16 pm | तुषार काळभोर

हा धागा ५५ प्रतिसादातच (जे जास्त लांबलचक सुद्धा नाहीत) दुसर्‍या पानावर कसा पोचला?

आतिवास's picture

3 Mar 2016 - 5:08 pm | आतिवास

माझ्यासारख्यांना रेषा-साक्षर व्हायला अधिक मदत होईल.

जव्हेरगंज's picture

3 Mar 2016 - 7:27 pm | जव्हेरगंज

जिंदाबाद !!!

कपिलमुनी's picture

3 Mar 2016 - 7:52 pm | कपिलमुनी

स्क्रीप्ट मधे काही मदत लागल्यास सांगा .

नूतन सावंत's picture

3 Mar 2016 - 8:14 pm | नूतन सावंत

मिपाचं अजून एक दमदार पाऊल.अभिनंदन.अभ्या,पुढील वाटचालीला शुभेच्छा.

भीमराव's picture

3 Mar 2016 - 10:41 pm | भीमराव

अभ्यादादा, संदीपभाऊ आणि सर्वांचे आभिणणदण, झक्कास नाविन्यपुर्ण आयड्याबाजीबद्दल मालकांचे आभार, आता युद्या भारी भारी पोष्टरं मिसळपावाबर तोंडी लावाय.

आनन्दिता's picture

4 Mar 2016 - 1:45 am | आनन्दिता

अभ्याभाय.. खुप चांगला उपक्रम.. जमेल तो हातभार लावयला मिळाला तर आनंदच होईल.

जियो अभ्या ड्ब्या टब्या.... :)

नीलमोहर's picture

4 Mar 2016 - 5:16 pm | नीलमोहर

वर प्रतिसादात अभिजीत मला प्रोफेशनल कलाकार म्हणालेत म्हणून थोडे स्पष्टीकरण.
मी कलेचे शिक्षण घेतलेले नाही वा प्रशिक्षित कलाकार नाही, त्यामुळे स्वतःला कलाकार म्हणवून घेणे मला नेहमीच अवघड वाटते. आता कामानिमित्ताने या क्षेत्रात स्थिरावलेय तरी कलेचे शिक्षण घेतले नाही ही खंत नेहमीच राहील.

काही व्यावासायिक प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात प्रवेश केला, त्यानंतर कल्पकता आणि बुध्दि वापरून आजवर टिकून आहे एवढेच. तरीही माझे या क्षेत्रातील काम तसे मर्यादित आहे, अभिजीत सारखे विविध मिडीया हाताळण्याचा अनुभव नाही, प्रिंट मिडीया, वेबमध्येही काम केलेले नाही, कामाचे क्षेत्र पूर्णपणे वेगळे आहे.

असो. या निमित्ताने स्वतःला आजमावून पाहता येतेय ही खूपच आनंदाची गोष्ट !!

मी-सौरभ's picture

4 Mar 2016 - 6:14 pm | मी-सौरभ

हाबिणंदन अभ्या भौ

स्वाती दिनेश's picture

5 Mar 2016 - 12:59 pm | स्वाती दिनेश

रंगभूषा मंडळाची कल्पना छान आहे. अभ्या व मंडळातील सहकार्‍यांना शुभेच्छा!
स्वाती

चौकटराजा's picture

6 Mar 2016 - 3:36 pm | चौकटराजा

फोटोशॉप हे एक म्हटले तर सोपे पण व्यावसायिक सफाई साठी अवघड साधन आहे. यात मुख्यत्वाने जे काम होते त्यासाठी इथे एक सहकारी चळवळ निर्मायची असल्यास( व पर्यायाने अभ्या वरील ताण कमी करायचा असल्यास ) तर खालील प्रमाणे ज्ञान दान होणे गरजेचे आहे.
१. बिटमॅप व व्हेक्टर इमेजमधील फरक कळणे.
२. हयु ,सॅचुरेशन व लाईटनेस मधील फरक कळणे.
३.आर जी बी व सी एम वाय के या कलर मॉडेल मधील फरक कळणे.
४.पेन टूल वापरून रेखाटन करता येणे.
५.पाथ ही संकल्पना समजणे.
६.ब्रश व पेंट मोडस , ब्रश डायानामिक्स समजणे.
७. अत्यंत उपयुक्त अशी लेअर व इरेझर की कल्पना समजणे.
८. ग्रेडिअन्ट, पॅटर्न व स्टाईल यांचे सामर्थ्य ओळखणे.
९. कलर बॅलन्स ने चित्र दुरुस्त करता येणे.
१०.फिल्टर वापरून मूळ फोटोला कॅन्व्हास हाफटोन पोस्टर अशी चित्रशैली लावून देता येणे.
या केवळ वानगीदाखल गोष्टी आहेत. पण एवढे बेसिक आले की मग नन्तर. स्काय इज द लिमिट .

आता परिणाम पातळीवर काय करता येऊ शकते हे पाहू.
१. चित्रातील रंग घालवून चित्र कृश्णधवल, सेपिया, द्विरंगी करता येणे .चित्र मोठे करता येणे ( मर्यादेत) लहान करता येणे.
२. चित्रात फोरग्राउन्ड व बॅकग्राउन्ड निर्मिती करता येऊन त्यात हवी तशी पारदर्शकता निर्माण करता येते.( लेअरचा वापर)
३. टाईप टूल वापरून त्यात लेअर स्टाईल नावाचे टूल मिसळून अचाट लेटरिंग करता येतात. उदा निऑन साईन इफेक्ट.
४. ब्रश डायनामिक वापरून फुलांचा रम्गीबेरंगी सडाच पाडता येतो.
५. पाथ वापरून फुलांच्या पानांच्या माळा, पाना भोवतालची रांगोळी , पैठणीचे काठ , बुट्या काय वाटेल ते करता येते.
६. एखाद्या चित्रातील एखादीच गोष्ट गायब करता येते. व नसलेली आणताही येते.
७.आपल्याला आपली स्वतंत्र पेन्टीग बनविता येतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Mar 2016 - 9:28 am | ज्ञानोबाचे पैजार

ही घोषणा थोडीशी उशीराच पाहिली . वाचल्यावर अतिशय आनंद झाला.

मिपा मालकांनी अभ्या ची केलेली निवड एकदम सार्थ आहे. त्याचे काम आपण सगळे जण मागची काही वर्षे पहात आहोत. आता या घोषाने मुळे इतके दिवस पडद्या आडून चाललेल्या कामाला आता एक अधिकृत मान्यता मिळाली.

अभ्या सारखे मनस्वी कलावंत मिपावर आहेत म्हणुनच मिपा वर आवर्जून यावेसे वाटते.

मिपा परिवार असाच वाढत राहो ही सदिच्छा.

पैजारबुवा,