नुकतेच सामनाने एक वादळ उठवले. हेमन्त करकरे यान्च्या पत्नीने असे विधान केले की त्यान्च्या कन्येला (जी लन्डनला रहाते) असे वाटते की कसाबाला फाशी देऊ नये. त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊ द्या (कशी बुवा?).
याउलट ज्या वीराने आपले बलिदान करून त्या कसाब नामक नराधमाला जिवन्त पकडून दिले तो हुतात्मा तुकाराम ओम्बळे, त्याची कन्या वैशाली हिने ठासून सान्गितले की ज्याने तिच्या वडिलान्ना आणि अनेक निरपराधाना निष्कारण ठार मारले त्या नीचाला गेटवे वर जाहीर फाशी द्या. हीच एक योग्य शिक्षा आहे.
सामनाने करकरे कुटुम्बाशी आपण सहमत नाही असे अत्यन्त सुसन्स्कृतपणे एका अग्रलेखात लिहिले. उलट वैशाली ओम्बळेशी आम्ही १०१ टक्के सहमत आहोत असेही अन्य अग्रलेखात लिहिले. त्यावरून इन्ग्रजी प्रेसने ठाकर्यान्वर बरीच राळ उडवली.
पण मलाही सामनाचेच पटते. नको तिथे गान्धीवाद आणू नये. शरीरावर जेव्हा रोगजन्तू आक्रमण करतात तेव्हा त्याना जालीम औषध देऊन नष्ट करावे. दया वगैरे नको. कसाब हाही देशाला लागलेला जन्तु आहे. त्याचे उचित हाल करुन पुरेशी माहिती काढून घ्यावी आणि त्याला फासावर लटकवावे हेच ठीक. खरेतर जाहीर शिरच्छेद करता आला तर किती बरे झाले असते?
तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
10 Jan 2009 - 8:42 am | एकलव्य
करकरे आणि ओम्बळे कन्यकांच्या व्यक्तिगत भावनांचा आदर आहे. दोन्ही कुटुंबीयांनी केलेल्या बलिदानाला तुलना नाही आणि त्यांच्या मताला इतरांपेक्षा वेगळे वलय, महत्त्व आणि अर्थही आहे. उगाच फुकाची बडबड म्हणून कचर्याच्या कुंडीत त्यांच्या भावनांना फेकणे कोणाही राजकारण्यांना शक्य होणार नाही.
पण तरीही हा प्रश्न निव्वळ या दोन घराण्यांपुरता नाही. दोन घराण्यांपुरता असता तरीही कायदाच काय ते शिक्षा ठरवितो ही गोष्ट वेगळी. कसाब आणि टोळीने इतरही अनेक जीवांचा बळी घेतला आहे... कुटुंबे उध्वस्त केली आहेत. ही कुटुंबे करकरे आणि ओळम्बे यांच्याइतकी प्रसिध्द नसतील पण त्यांचे अस्तित्व असे अमानुषपणे चिरडून टाकणार्याला (कायद्याने हीच शिक्षा असेल ह्या गृहितकानुसार) फाशीच व्हायला हवी.
गेलेल्या जीवांसाठी नाही तर मागे राहिलेल्या पिढ्यांसाठी, नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण आणि न्यायाची भावना निर्माण करण्यासाठी सरकारने अपराध्यांना कडक शासन दिलेच पाहिजे. असे जर झाले नाही तर जीवाची घुसमट होऊन कोणी कायदा हातात घेऊ लागले तर परिस्थिती चिघळू शकते.
- एकलव्य
10 Jan 2009 - 8:51 am | प्राजु
एकलव्य, सुंदर प्रतिसाद.
आपल्या मताशी १००% सहमत आहे मी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Jan 2009 - 12:41 pm | चापलूस
खरंच किति सुंदर प्रतीसाद आहे. मी प्रजूशी सहमत आहे. तुमच्याशी सहमत आहेच.
10 Jan 2009 - 9:00 am | सुनील
आपली न्यायदानाची पद्धत अत्यंत वेळखाऊ आहे, त्यात बदल व्हायला हवा. न्याय त्वरीत मिळाला नाही, तर त्यास अर्थ रहात नाही. माझ्या अर्धवट कायद्याच्या ज्ञानानुसार कसाबला फाशीच होईल, असे वाटते.
अवांतर - फाशीची शिक्षा असू नये, हे माझे वैयक्तिक मत. पण जोवर ती शिक्षा भारतात कायद्याने आहे, तोवर ती देण्यास प्रत्यवाय नसावा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Jan 2009 - 10:44 am | अनंत छंदी
मला तर वाटते त्याला आधी फाशी देऊन नंतर चौकशी करावी :)
10 Jan 2009 - 1:16 pm | चंबा मुतनाळ
'तात्काळ' फाशी??
10 Jan 2009 - 1:17 pm | प्रभाकर पेठकर
फाशीची शिक्षाच योग्य.
ज्याने पुढचा मागचा विचार न करता अनेकांना मृत्यूच्या दारी ढकलले त्याच्या स्वतःच्या बाबतीत मवाळ भूमिका कशाकरिता घ्यायची? आणि घ्यायचीच असेल तर भारतातील तुरूंगांमधून खितपत पडलेल्या सर्वच गुन्हेगारांबाबत का घेऊ नये? सर्व तुरूंगांना 'तुरूंग' न म्हणता 'मत परिवर्तन आश्रम' असे संबोधावे.
सर्वांसाठी एकच न्याय असावा.
मी व्यक्तीशः, फाशीच्या शिक्षेचे समर्थन करतो.
10 Jan 2009 - 1:30 pm | मॅन्ड्रेक
खरंच किति सुंदर प्रतीसाद आहे. मी प्रजूशी सहमत आहे. तुमच्याशी सहमत आहेच.
सहमत
10 Jan 2009 - 6:30 pm | स॑क्या
मी पण सहमत आहे.
अरे अजुन किति दिवस सहन करायचे. पुरे आता.
हिच खरि वेळ आहे, आता " करा ईरादा पका.........आणि दे धक्का............"
अमेरिका जर त्याचे टोवर पाड्ले कि शॠ शहर खलास करते......माग आपण तर् बरेच शा॑त आहोत..... पण आता खरच पुरे...........
10 Jan 2009 - 7:41 pm | विकास
वरील बहुतांशी प्रतिक्रीयेशी सहमत आहेच. फक्त अजून एक लिहावेसे वाटले:
भारत हे कायद्याचे राज्य आहे आणि एखाद्याने कायदा हातात घेतला तर त्याला कायद्याने न्याय मिळतो. असे असताना केवळ दोन सन्माननीय हुतात्मा पोलीस अधिकार्यांच्या कन्या / कुटूंबिय म्हणून त्यांना मते विचारणे ठिक असले तरी त्यांची मते विचारात घेणे योग्य आहे का? हाच प्रकार काही महीन्यांपुर्वी प्रियांका गांधींनी राजीव गांधींच्या हत्याप्रकरणातील शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना (आरोपी नाही) भेटून केला होता. त्याला प्रसिद्धी देणार्यांना देऊंदेत पण तिथेच थांबणे योग्य वाटते.
आता बाकी उरले फाशीच्या शिक्षेसंदर्भात - मी देखील एकंदरीत फाशीच्या शिक्षेच्या बाजूने नाही. मात्र त्याच वेळेस असे ही वाटते की भारतात जे फाशीच्या शिक्षेचे स्थान आहे, ते असावे - "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" अर्थात "अपवादात्मक गुन्ह्यांसाठी". मला नाही वाटत की भारतात उठसूठ फाशीची शि़क्षा केली जाते आणि केली तरी अमलात आणायला वेळ लागतो, तो वेगळाच मुद्दा (अफझल चे काय चालले आहे ते पहा).
कसाबच्या बाबतीत तर तो नुसता गुन्हेगार नाही तर शत्रू आहे आणि त्याने केले तो गुन्हा नव्हता तर सार्वभौम राष्ट्राशी केलेले युद्ध होते. तसेच त्यात ज्याप्रकारे निरपराध व्यक्तींना मारले गेले ते पहाता ते "माणूसकी / संस्कृती (सिव्हीलीझेशन या अर्थी) विरुद्धचे" पण युद्ध होते असे म्हणले तर नाटकी वाक्य वाटू नये. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षाच योग्य आहे.
शिवाय परत रुबिया सईद अथवा इंडीयन एअरलाईन सारखा किस्सा होऊन जर सुटला तर नुसताच "खायला काळ आणि भूईला भार" ठरणार नाही तर परत "स्वतःच काळ होऊन आपल्याला/अथवा त्यांना जे शत्रू वाटतात त्यांना खायला येईल" हे वेगळेच. (आत्ता दुवा मिळाला नाही, 'पण ९/११च्या नंतर कधीतरी वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे, मसूदला आपण सोडले आणि त्यानेच नंतर ९/११ दहशतवाद्यांना यानेच पैसे पाठवायची व्यवस्था केली होती.' कुणाला माहीत असल्यास कळवा.)
10 Jan 2009 - 8:14 pm | बट्टू
काय बोललात? तूमचे प्रतिसाद नेहमी वाचतो. राजकारणाची समज तुमच्याएवढी कोणालाच नाही. मस्त प्रतिसाद!
6 Dec 2010 - 3:49 am | शिल्पा ब
+१
10 Jan 2009 - 9:55 pm | कलंत्री
सामनाचा अग्रलेख सुंदरच आहे. त्यात धीर धरा, संयम बाळगा इत्यादी साठी दम मारो दम असा वाक्प्रचार वापरला आहे. संपादकाच्या अशा छोट्या वाक्याला दाद द्यायलाच हवी.
आता मूळ विषयाला, आपल्या देशात कायदा आणि त्याला अनुषंगुन अशी न्यायपद्धती आहे. ती यासर्व बाबीचा फैसला ( निकाल ) द्यायला समर्थ आहे.
आता मसुद आणि कसाब यांच्या तुलनेबद्दल. मसुद हा नेता होता आणि कसाब हा अतिरेक्यांच्या हातातील प्यादे आहे. उद्या चुकुन कसाब जिवंत सुटला तर त्याची हत्या हे २६/११ च्या कटामागचे सुत्रधारच करतील.
26 Nov 2010 - 6:12 pm | गांधीवादी
>>आता मसुद आणि कसाब यांच्या तुलनेबद्दल. मसुद हा नेता होता आणि कसाब हा अतिरेक्यांच्या हातातील प्यादे आहे.
आज (२६/११/२०१०) पर्यंत कसाब सुद्धा त्यांचा नेता झालेला असेल तर ?
10 Jan 2009 - 11:42 pm | मयुरा गुप्ते
आज एका कसाबला शिक्षा न दिल्यास्..उद्या असे अनेक कसाब येऊ घालतील हे नक्कि.हा केवळ करकरे आणि ओम्बळे याचं नाही तर सगळ्यानचा अपमान आहे. हे तर जाहिरपणे सान्गितल्या सारखा आहे...आमची सुरक्षा तर ढीसाळ आहेच शिवाय आम्ही शिक्षा हि करत नाही.
26 Nov 2010 - 6:09 pm | गांधीवादी
खरेतर जाहीर शिरच्छेद करता आला तर किती बरे झाले असते?
तुम्हाला काय वाटते?
'कायदा' नावाच्या व्यवस्थेने हाथ बांधून ठेवलेले आहेत, नाहीतर.......................................
26 Nov 2010 - 6:50 pm | वेताळ
परवा माझा एक शाळामित्र मला भेटला. तो एका खुनाबद्दल तुरुंगात जन्मठेपेची सजा भोगत आहे. त्याला सत्र न्यायालयात व उच्चन्यायालयात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.आता त्याने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.
त्याने आपल्या चुलत्याचा जमीनीच्या वादा वरुन खुन केला होता.त्याला पॅरोल वर ५ दिवसांकरिता तुरुंगात सुट्टी मिळाली होती. पण त्याला आता इतका त्रास होतोय कि त्याला फाशीची शिक्षा योग्य वाटते. निदान सगळे सहन होण्या आधी मरण येणे कधीही सोयिस्कर असे त्याला वाटते. कुटुंबापासुन दुर राहणे आता त्याला असह्य होत आहे. माझ्याजवळ चक्क तो रडला.खुन करुन खुप मोठी चुक केली असे त्याला आता वाटते.
परवा कसाबला आबा व खडसे भेटले त्यावेळी त्याचे हेच बोल होते. ही घुसमट आता त्याला मरणापेक्षा भयानक वाटत आहे.त्यामुळे कोणती शिक्षा योग्य कि अयोग्य ते आपणच ठरवावे लागते.
26 Nov 2010 - 7:26 pm | गांधीवादी
एकदाच फाशी देणे आणि मरेपर्यंत जिवंत ठेवणे, प्रश्न फक्त इतपतच नाही.
(फाशीपेक्षा जरी जन्मठेप जास्त भयानक असली तरीहि..) कसाबाला फाशी हीच शिक्षा योग्य आहे.
कारण, त्यला जिवंत ठेवणे म्हणजे समस्त भारतीयांच्या मनात खालील प्रश्न घोळत ठेवणे.
तो जिवंत असे पर्यंत
१) त्याला सोडविण्यासाठी कोण एखादे विमान अपहरण करेल काय ?
२) त्याला आयुष्यभर जिवंत ठेवायला दरवर्षी ३१ कोटी खर्च येईल काय ?
३) त्याचे संरक्षण करायला असेच ३०-४० अधिकारी कायमस्वरूपी नेमावे लागेतील का ?
त्याला जिवंत ठेवणे हे अत्यंत धोकादायक आहे. कसाबाच्या मनाचा विचार न करता, जनतेला भविष्यात त्याच्या जिवंत राहण्यामुळे किती त्रास होऊ शकतो ह्यासाठी तरी लवकरात लवकर फाशी दिली जावी.
26 Nov 2010 - 7:25 pm | अविनाशकुलकर्णी
गेट वे वर मेणबत्या लावण्या ऐवजी त्या मेणबत्त्यान कसाबला चटके द्यावे..हवे तर त्या साठी घटना दुरुस्ति करावि
27 Nov 2010 - 7:31 am | सुधीर काळे
गुन्हा केलेल्याला भीती असलीच पाहिजे व खुनासारख्या गुन्हेगाराला तर फाशीची भीती असलीच पाहिजे व ती दिलीही गेली पाहिजे. पण जिथे अद्याप अफझलला फाशी सर्वोच्च न्यायालयाने नक्की केल्यावरही दिली जात नाहीं, त्याची फाईल कुठे धूळ खात पडली आहे याबद्दल follow up करायची आठवण कुणालाच रहात नाहीं, असे कसे? मीडियाने खरं तर अफझलच्या फाशीचा ती दिली जाईपर्यंत पाठपुरावा करायला हवा पण त्यांना चघळायला महाफालतू विषयसुद्धा चालतात पण महत्वाच्या विषयांचे वावडे.
सणसणीखेज बातम्यांचे आयुष्य एक आठवड्याचे! मग ती आदर्श कॉलनीची असो किंवा कॉमनवेल्थ गेममधील भ्रष्टाचाराची असो! कालच वाचले कीं CBI ने दाखल केलेल्या FIR मध्ये कलमाडीचे नावही नाहीं! आता बोला!
मागे मी भारतात असताना "सलमानखानच्या दाऊदबरोबर झालेल्या संभाषणाची टेप पोलिसांकडे आहे" अशी (पोलिसांच्या सूत्रांकडून बाहेर आलेली) बातमी मी स्वतः वाचली आहे. पुढे काय? चार माणसांच्या अंगावरून (शेजारी बसलेल्या पोलिसाच्या साक्षीने) गाडी चालवून त्यांना जिवे मारलेला व हरणे मारल्यामुळे रीतसर शिक्षापात्र ठरलेला सलमान आरामात फिरतोय् आणि आपण अशा माणसाच्या "दबंग"सह प्रत्येक चित्रपटावर बहिष्कार घालायचे सोडून ते बघतो तरी कसे याचेच मला आश्चर्य वाटते. असल्या अभिनेत्यांच्या चित्रपटांवर खरं तर 'जनताकर्फ्यू' घालायला हवा. तीच गत संजय दत्तची. शिक्षा होऊनही हे गुन्हेगार मोकळे कसे?
आपल्याला कांहींच स्वाभिमान-देशाभिमान उरला नाहीं आहे कां?
खरंच हा देशाची या नालायक नेत्यांमुळे-काँग्रेसचे काय किंवा भाजपाचे काय-वाट लागत आहे! या सर्वसामान्य उदासीनतेमुळे शेवटी who cares? या टप्प्यावर सामान्य माणूस येऊन पोचला आहे. कसाबचे उदाहरण याचीच पुष्टी करते.
जय हो? कुणाचा? भारताचा कीं सलमानचा कीं कसाबचा?
27 Nov 2010 - 7:53 am | गांधीवादी
who cares? असे तर आहेच पण
जे care करतात त्यांचे काय हाल होतात ते ह्या उघड्या डोळ्यांनी बघितले आहे.
एक खूप छोटे उदाहरण देतो,
एकदा आमच्या इथे एका सदगृहस्थाने आजूबाजूला थुंकू नये म्हणून काही टवाळ खोरांना दम भरला,
पुढे काय ?
दुसर्या दिवशी त्यांचीच गाडी खराब करून ठेवलेली, वर परत घरातून आजू बाजूनी उपदेश... तुम्हाला काय पडलं होतं ! जे काय ते बाकीच्यांनी बघून घेतलं असतं ना ! (हे 'बघून घेणारी बाकीची लोकं' कोण असतात ते माहित नसते, पण प्रत्येकाला 'मी नाही' असे नक्की माहित असते)
लोकांनी एकत्र येऊन काही करायचे म्हणाले तर काही समस्या चुटकी सरशी सुटतील, पण आज 'एकत्र येण्याची' हिम्मत कोणातही नाही.
27 Nov 2010 - 8:40 am | नितिन थत्ते
असाच अनुभव महात्मा फुले, र धों कर्वे इत्यादींनाही आला होता. पण त्यांनी आपले कार्य सोडले नाही. (टीप : दोघांनही हा अनुभव स्वकीयांकडूनच आला होता).
27 Nov 2010 - 9:56 am | सुधीर काळे
नितिन,
अगदी खरे आहे. कांहीं लोक "More loyal to throne than King" असल्याचे नाटक करतात!