मराठी दिनः बोलीभाषा सप्ताह समारोप

पैसा's picture
पैसा in लेखमाला
27 Feb 2016 - 7:00 am

नमस्कार करत्ये हो सर्वांना. आज मराठी भाषा दिन आहे ना, आपल्या कुसुमाग्रजांचा १०४ वा जन्मदिवस. त्या निमित्तान बोलीभाषा सप्ताह साजरा करूया अशी सूचना येताच सगळे साहित्य संपादक खुशीन कामास लागले. सप्ताहाचा धागा विणला तेवां मिपाकरांस ही कल्पना इतकी आवडेल आणि त्यांस इतका उदंड प्रतिसाद मिळेल असें वाटले न्हवते हो! पण हौसेनी असं कायतरी सुरू केलंनी तर मिपाकर कुणाला ऐकायचे नैत.

मिपाकरांनी अगदी भरभरून लेख, कथा, कविता आपाअपल्या बोलीभाषांतल्या लिहिलेनी, मग दर दिवशी दोन दोन प्रकाशित करूया असा विचार साहित्य संपादक मंडळीनी केलंनी. पुढे तं काय, मिपाकर कुठचे ऐकायला! आपणहून जास्त जास्तच लेख पाठवलेनी. म्हटले बेस झालें. बघता बघता, झाडी, वर्‍हाडी, मावळी, मालवणी, कोल्लापुरी, बाणकोटी, चित्पावनी, पद्ये, घिसाडी, शेष वंशी क्षत्रिय भंडारी, नगरी, खान्देशी, पुणेरी शहरी, पुणेरी ग्रामीण इतक्या सगळ्या बोलीभाषातले लिखाण आम्हास घरबसल्या वाचायस मिळालेंं. त्यासाठी सर्व लेखक वाचक मिपाकरांस पुष्कळ धन्यवाद!

पैकी चित्पावनी, पद्ये, घिसाडी या बोली आहेत हेच बहुतकरून कोणास ठाऊक नसेल. त्यांची कुठे फार नोंदही नसेल. हा बोलीभाषा सप्ताह म्हंजे भाषांच्या अभ्यासकांना पर्वणीच म्हटली पायजे. इतक्या विविध बोली एकाच जागी वाचायस मिळणे म्हंजे अहो भाग्य! त्यातच कोंकणीची शिखवणी म्हंजे दुधात साखरच हो! हो, तो मधल्या आळीतला झंप्या जोशी मेला बोललाच, "कशास हवीत ही खुळं? दुसर्‍या बोली नाय शिखलो तर कोणाचें काय बिघडेल का?" त्यांस म्हटले, अण्णा पटवर्धनाकडे पूजा सांगायास तू हाप प्यांट घालून गेलास तर काय बिघडेल का? प्रतेक गोष्टीचे आपापले म्हत्व आपापल्या जागी अस्तेंच. द्रिष्ट लागू ने, म्हणून गालबोट लावलंन, दुसरं काय!

बोली भाषा वेगळाल्या अस्तात हे अगदी ल्हान होत्यें तेवांच कळ्ळं. आम्ही रत्नांग्रीकर. मधल्या आळीतले नसलो तरी वरच्या आळीतले. जाज्ज्वल्य का काय तें पुणेकरांस आम्ही शिखवलेले. पण माझी आजी, मावशी वगैरे मंडळी आमच्या चुका काढत हो! "काय तुम्ही रत्नांग्रीकर, बसायचं, करायचं असं लांऽब कशाला म्हणता? बसाच्चं, कराच्चं असं बोलावं." आम्ही कुठले ऐकायला? मग तुम्ही रायगड जिल्ह्यातली लोकं "खाच्चं, जाच्चं असं का बोलत नाईत?" म्हटले की पुढे कोण कसला उत्तर देतोय! असा प्रतेकाला आपल्या बोलीचा अभिमान असतोच ना! रत्नांग्रीत तिथल्या तिथे वेगळाल्या जातीच्या आणि दाल्दी, खारवी अशा कित्तेक बोली ऐकल्यायत. त्यांचा पुढे दुसर्‍या भाषा मुळापस्नं शिखताना उपेग झालाच झाला.

आता सगळ्या मिपाकरांना हात जोडून विनंती करत्ये, बोलीभाषा सप्ताह संपला, मराठी दिनही साजरा झाला, मात्र बोलीभाषांत लिहणे थांबवू नका. नकळे कधी कोणाला कसला अभ्यास करताना यातला एखादा लेख म्हत्त्वाचासा वाटेल. आपल्याच मुलाबाळांना, नातवंडांना बोलीभाषा म्ह़ंजे काय हे शिखावयस लागले तर हा सगळा अमूल्य ठेवा आहे. बोलीभाषा म्हणजे नुस्ती बोलाची कढी आणि बोलाचा भात अशातली गत होता नये, लिहायची भाषा जरी प्रमाणाभाषा मराठी असली तरी आपली संस्कृती जपायची आणि मुलाबाळापर्यंत न्हेयची असेल (हा हा, अजिबात बुडवायची नाय्ये. मी बघत्याय हां) तर बोलीभाषा जिवंत ठेवा. त्याकरता ती शक्य तितकी लिहून ठेवा, इतके सांगत्ये आणि माझे भाषण संपवत्ये. माझं मेलीचं भाषण शांतपणांनी ऐकून घेतलंत आणि सगळ्या लेखकांचंही पुष्कळ कवतिक केलंत त्याबद्दल तुम्हा सर्व वाचक, प्रतिसादकांना पुनश्च धन्यवाद म्हणत्यें. असाच कृपालोभ असूंदेत!

प्रतिक्रिया

सुधांशुनूलकर's picture

27 Feb 2016 - 7:02 am | सुधांशुनूलकर

अप्रतिम लेखमालेचा तितकाच अप्रतिम समारोप.

प्रदीप's picture

28 Feb 2016 - 8:53 pm | प्रदीप

.

श्रीरंग_जोशी's picture

27 Feb 2016 - 7:06 am | श्रीरंग_जोशी

समारोपाच्या धाग्यात मांडलेलं मनोगत आवडलं.

महत्वाचं म्हणजे अकृत्रिम वाटलं.

अजया's picture

27 Feb 2016 - 7:13 am | अजया

मराठी दिन बोलीभाषा सप्ताहात भाग घेतलेल्या सर्व लेखक वाचकांचे मनापासून आभार.

बोलीभाषा सप्ताहा साठी सांस आणी इतरांचे आभार.
लेखाकांचे अभिनंदन
.

भुमी's picture

27 Feb 2016 - 7:49 am | भुमी

विवीध बोलीभाषांमधल्या लेखांची मेजवानी, सा सं चे आभार . चांगली संकल्पना राबवली.लेखकांचे अभिनंदन.

भुमी's picture

27 Feb 2016 - 7:49 am | भुमी

विवीध बोलीभाषांमधल्या लेखांची मेजवानी, सा सं चे आभार . चांगली संकल्पना राबवली.लेखकांचे अभिनंदन.

किसन शिंदे's picture

27 Feb 2016 - 8:44 am | किसन शिंदे

एक आगळावेगळा उपक्रम राबवल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन!

वेल्लाभट's picture

27 Feb 2016 - 8:52 am | वेल्लाभट

मिपाच्या अनेक भारी उपक्रमांसारखाच हा सुद्धा एक भारी उपक्रम झाला. सगळ्या लेखक वाचक प्रतिसादकांचे अनेक आभार, कौतुक आणि अभिनंदन :) मेजवानीच होती ही बोलीभाषांची. वाह.

स्वामी संकेतानंद's picture

27 Feb 2016 - 9:04 am | स्वामी संकेतानंद

असा उपक्रम हरसाल राबवल्या पायजे न बाप्पा! अखिन अखिन बोल्याइत लेख याले पायजेन.. का मन्ता? अभिनंदन!

पैसा's picture

27 Feb 2016 - 3:01 pm | पैसा

सगल्या ४२ बोलीतून लेख येऊक व्हयें.

मस्तच उपक्रम झाला हा मजा आली

सर्व लेखकांचे आणि साहित्य संपादकांचे मन:पूर्वक आभार

माहितगार's picture

27 Feb 2016 - 9:38 am | माहितगार

खूप चांगला उपक्रम. कोणतीही भाषा एकटी नसेल वेगवेगळ्या बोलींची मिळून होत असेल. हा उपक्रम बोली भाषा वापरणार्‍यांना आपण भाषेच्या मुख्य धारेतलेच आहोत हा एक आत्मविश्वास देऊ शकेल असे वाटते आणि पै तै म्हणतात तसे नित्य वापरास प्रोत्साहन मिळेल हे छानच.

अर्थात केवळ एवढ्यावर न थांबता किमानपक्षी या आपल्या आपल्या लेखांचे ऑडीओ रेकॉर्डींगही आंजावर उपलब्ध केले पाहीजे. आणि शक्यतोवर शब्दार्थ सूची बनवण्यात सक्रीय सहभाग घ्यावयास हवा असे वाटते.

मुक्त विहारि's picture

27 Feb 2016 - 9:55 am | मुक्त विहारि

ह्या उपक्रमाचे यश वाचक-लेखक आणि साहित्य संपादकांचे. असे माझे मत.

हा सोहळा तर संपला.

आता पुढील उपक्रमाची वाट बघणे आले.

प्राची अश्विनी's picture

27 Feb 2016 - 10:07 am | प्राची अश्विनी

खूप चांगला उपक्रम झाला. अभिनंदन!
ती ती बोली, त्या त्या लहेजासकट ऐकता आली असती तर अजून मजा आली असती.

प्राची अश्विनी's picture

27 Feb 2016 - 10:08 am | प्राची अश्विनी

खूप चांगला उपक्रम झाला. अभिनंदन!
ती ती बोली, त्या त्या लहेजासकट ऐकता आली असती तर अजून मजा आली असती.

सस्नेह's picture

27 Feb 2016 - 10:13 am | सस्नेह

आणि छोटेसेच साधेसे पण समर्पक समारोप लेखन.
उपक्रम सुरू करताना प्रतिसादाबद्दल साशंकता होती. पण इतका भरघोस प्रतिसाद आणि लेख मिळाले की भारावल्या गेले आहे !
या यशस्वी उपक्रमासाठी सासं, पैसाताई आणि सूत्रधार अजयाचे अभिनंदन आणि सर्व लेखक प्रतिसादकांचे विशेष आभार !

मिपावर दर्जेदार लेखनाला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो.

अजया's picture

27 Feb 2016 - 10:37 am | अजया

.

स्वामी संकेतानंद's picture

28 Feb 2016 - 11:00 am | स्वामी संकेतानंद

वाह!

चौथा कोनाडा's picture

28 Feb 2016 - 2:03 pm | चौथा कोनाडा

लै भारी ! अभिनन्द न अन इथे टाक ल्या ब द्दल धन्यु !

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Feb 2016 - 2:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

टाळ्यांचा कडकडाट !

एस's picture

28 Feb 2016 - 2:51 pm | एस

ढोलताशे वाजवले आहेत! उगीच कसला हुच्चभ्रूपणाचा आव न आणताही अगदी साधेपणा राखूनही फार काही करता येतं हे आपल्या संस्थळानं दाखवून दिलं आहे. आपल्या मिपाचं व आपल्या सर्व मिपापरिवाराचं दणकून अभिनंदन..!

नाखु's picture

29 Feb 2016 - 11:35 am | नाखु

कुठल्या वर्तमानप्त्रात आलाय, आमचा गणेशा झालाय म्हणून विचारणा !!!

अजया's picture

29 Feb 2016 - 11:42 am | अजया

दै. लोकमत

मित्रहो's picture

27 Feb 2016 - 12:25 pm | मित्रहो

तुम्ही लिहा म्हणूनशान सांगतल आम्ही जे सुचल, जस सुचल ते लिवल. आता अभिमानान 'काहून बे पोट्टेहो' म्हणू शकतो.
मराठीची इतकी रुपे आहेत हे या निम्मित्त्याने कळले. खरच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.

प्रीत-मोहर's picture

27 Feb 2016 - 5:27 pm | प्रीत-मोहर

Best!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2016 - 6:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावरच्या सर्वोत्तम उपक्रमांमध्ये या उपक्रमाची नोंद व्हावी ! आजतागायत, जालावर तरी, असा प्रकल्प झाल्याचे ऐकले नव्हते. मराठीबद्दलच्या मायेने सुरू झालेल्या मिपाच्या फेट्यात अजून एका तुर्‍याची भर पडली आहे !

या निमित्ताने वाचकांना आपल्याच मायबोलीच्या नावेही माहित नसलेल्या अनेक बोलीभाषा समजल्या, वाचायला मिळाल्या !!

ही कल्पना प्रत्यक्षात आणणार्‍या साहित्य संपादक मंडळाचे आणि त्यांना भरभरून साथ देणार्‍या मिपाकर लेखकांचे मनःपूर्वक हार्दीक अभिनंदन आणि धन्यवाद !

प्रचेतस's picture

27 Feb 2016 - 11:00 pm | प्रचेतस

पूर्णपणे सहमत

अभ्या..'s picture

27 Feb 2016 - 11:05 pm | अभ्या..

+२
हावो

सुहास झेले's picture

28 Feb 2016 - 1:13 pm | सुहास झेले

ह्येच बोलतो.. सर्व लेखक आणि संपादकांचे आभार :) :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2016 - 1:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेम टू सेम भावना आहेत.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

29 Feb 2016 - 11:31 am | नाखु

सर्व सहभागींचे आणि वाचकांचे विशेष कौतुक.

काय्प्पा पलिकडे लिखाण-वाचन जिवंत आहे याचा सज्जड पुरावा आहे ही लेख्माला+प्रतीसाद

शलभ's picture

1 Mar 2016 - 3:41 pm | शलभ

+६
खूपच मजा आली सगळे लेख वाचताना..

मनीषा's picture

27 Feb 2016 - 11:06 pm | मनीषा

अतिशय स्तुत्य उपक्रम !
सर्व लेखक आणि साहित्य संपादकांचे आभार !
एक एक लेख वाचते आहे .. निराळ्या भाषारुपामुळे जरा वेळ लागतोय इतकच .

मितभाषी's picture

28 Feb 2016 - 12:10 am | मितभाषी

हेच बोल्तो

ग्रेट उपक्रम व तितकाच ग्रेट समारोपाचा लेख वाचला. हळूहळू सगळे लेखन वाचीन. पेप्रात आपल्या उपक्रमाची दखल घेतलिये म्हणून बरे वाटले. सर्व साहित्य संपादकांचे आभार. लेखकांनी आम्हाला मेजवानी दिल्याबद्दल त्यांचेही आभार.

किलमाऊस्की's picture

28 Feb 2016 - 9:06 am | किलमाऊस्की

झाडी, घिसाडी या बोली अजिबात माहित नव्ह्तया. सासंच अभिनंदन! या उपक्रमात न आलेल्या बोली ज्यांना येत असतील त्यांनी अगदी कथा लिहीता आली नाही तरी वर्तमानपत्र, पुस्तकातला एखादा उतारा आपल्या बोलीत लिहावा अशी विनंती. फक्त शहरी मराठी बोली बोलणार्या माझ्यासारख्या अनेकांना नविन बोली समजतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Feb 2016 - 1:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

अजया's picture

28 Feb 2016 - 10:42 am | अजया

उत्तम सूचना.

एस's picture

28 Feb 2016 - 11:01 am | एस

वरील सर्व प्रतिसादांशी मनःपूर्वक सहमत. काय मेजवानी आणि कसले एकेक पक्वान्न चाखायला मिळालं! जियो!

यानिमित्ताने मराठीच्या बोलीभाषांचा भौगोलिक नकाशा उपलब्ध होऊ शकल्यास आनंद वाटेल.

चौथा कोनाडा's picture

28 Feb 2016 - 2:01 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख ! समारोपाचे हे शब्द म्हणजे आणखी एक सुंदर लेख झालाय. अभिनंदन !
या लेख माले साठी झटलेल्या, संपादक, चित्रकार, कार्यकर्ते व लेखांकांचे चे मनापासुन हार्दिक अभिनंदन !
तुमच्या मुळे आम्हाला या बोलीभाषा व त्या तले सौंदर्य दाखवणारे सर्वांग सुंदर साहित्य वाचण्यास मिळाले.

पेप्रात फुटु व कोतुकाचा लेख छापुन आल्या बद्दल सर्व मिपाकरांचे अभिनंदन !!

मिपावरील बहुधा सर्वोत्तम उपक्रम असेल हा. त्या निमित्ताने फक्त भाषाशास्त्राच्या पुस्तकातच बघावयास मिळणार्‍या कैक बोलीभाषांचे प्रत्यक्ष सँपल बघावयास मिळाले. खूप आवडले. समारोपही एकदम समर्पक आहे.

स्वाती दिनेश's picture

28 Feb 2016 - 2:26 pm | स्वाती दिनेश

एका उत्तम उपक्रमाचे समारोपाचे मनोगतही तितकेच छान.. सगळे लेख अजून वाचले नाहीत, एकेक वाचते जसा वेळ मिळेल तसे..
स्वाती

मिपाकर लेखकांच आणि वाचकांच अभिनंदन.
उत्तम उपक्रमाची दखल घेतली जातेच हे सिद्ध झाले,

माहितगार's picture

28 Feb 2016 - 8:34 pm | माहितगार

ज्या बोली भाषा लेखकांना त्यांच्या बोली भाषेचे सँपलची/उदाहरणार्थ परिच्छेदाची मराठी विकिपीडिया लेखात दखल घेऊन हवी आहे त्यांनी '४००० बाईटस किंवा दोन परिच्छेद जे कमी असेल ते' प्रताधिकार मुक्त करत असल्याचे त्यांच्या धागा लेखाच्या प्रतिसादात लिहावे. धन्यवाद

मधुरा देशपांडे's picture

28 Feb 2016 - 10:39 pm | मधुरा देशपांडे

बोलीभाषांचा हा उपक्रम खूप आवडला. अजून सगळे लेख वाचले नाहीत, सावकाशीने वाचेन पण एवढ्या विविध बोली भाषांमधलं लिखाण एकत्रितपणे मिळालं हे विशेष आहे. सर्व लेखक-लेखिकांचे आभार.

सगळेच लेख छान आहेत

नीलमोहर's picture

29 Feb 2016 - 11:05 am | नीलमोहर

बोलीभाषा उपक्रम प्रचंड आवडला, कितीतरी माहीत नसलेल्या बोलीभाषा या निमित्ताने वाचनात आल्या.
एक आगळावेगळा उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संमं, लेखक, सा.सं चे आभार.

मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी आणि वृध्दिंगत करण्यासाठी मिपावर सातत्याने होत असलेले प्रयत्न पाहून एक मिपाकर असल्याचा मनापासून अभिमान वाटतो.