खेळे
कणकवलेच्या बाजाराक जावच्यासाटी वाडीतसून फुडे हायवेक मेळणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या तिठ्यावर गावकरी झादाबुडी बसची वाट बघीत हुबे होते. मोहन नि बाबल, मोहन्याच्या कोऱ्या मोटरसायकलीवरून फेरे मारीत होते.भावबंदांच्या झगड्यात एका घराची दोन घरा झाली नि एकत्र वाढलेले चुलतभाव वेगवेगळ्या घरात ऱ्हवाक लागले.मोहन बाबलपेक्षा दोन वरसान व्हडलो.त्याचो बाबल्यावर लय जीव. दोघांच्या आवशीच काय पण बापाशींमधूनय विस्तू जात नसायचो.
हे दोघय त्या भांडणापासून लांब,वाडीपासून लांब भेटून गजाली,गमती करीत.घरी समाजला की शिव्या खात.पण पैले पाढे पंचावन्न. नुकतोच मोहन गवर्मेणच्या नोकरेत रुजू झालो होतो.टायमार हापिसात जावच्यासाठी मोटारसायकल घेवन इलो.
आता तर काय मोहन्याची मोटारसायकल इल्यापास्ना ते आणीच सुटलेले.चार पाच फेऱ्या झाल्यावर, बाबल मोहनाक विनवू लागलो,”दादा, आता मका चालवक दी ना गाडी.मिया सावकास चालवीन.मका सवय असा,मिया चालवतंय मितराची गाडी कॉलेजात.”
”बघ हां,सावकास चालवशित ना?न्हायतर एक करता दुसराच होवचा”असे विचारत मोहन गाडी थांबवन उतरलो.”तू आपलो आपल्या आतल्या रस्त्यवर चालय. म्हंजे कच्च्या रस्त्यार जरा सावकास चालयशित.”असे म्हणत त्याने मोटारसायकल वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणून ,मग बाबलाक गाड्येवर बसूक मदत केली.दोन फेरे सावकास घेतल्यावर तिसऱ्या फेरीला वाडीकडून हायवेक येत असताना मोहन दचाकलो.नाइकांच्या मळ्यातून त्यांचो कुतरो झेपा घेत रस्त्यावर येय होतो.
“अरे मेल्या,कुतरो येताहा बघ, ब्रेक मार, ब्रेक मार.” मोहन्या आराडलो.
खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र,खच्याक आवाज करीत बाबलो अवचित ब्रेक मारूच्या प्रयत्नात,अजूनच जोरात चालवत मोटारसायकलीचो बॅलंस घालवत,तिका उरावर घेवन मोहन्यासकट रसत्यावर कोसळलो.क्यॅव, क्यॅव, क्यॅव,करीत कुतरो पण थंयसरच आडवो झालो नि निपचित पडलो.
नशिबान रस्त्यावर बसची वाट बघत असलेले गावकरी धावन इले.मोटारसायकल बाजूक करून ह्या दोघांका उटवक लागले.दोघांचा जरा जरा खरचटलेला ,पण मुको मार मात्र भरपूर लागलेलो.कशेबशे उटान बसत दोघाय ह्ंय थंय बघूक लागले. बाबलो,”कुतरो,कुतरो” बडबडत लोकांका हातांनी बाजूक सारत बघूक लागलो.आता गावकरीही कुतरो सोदूक लागले.तो उडान रस्त्याच्या एका बाजूकच पडलो होतो.बाबलो नि मोह्न दोघय धडपडत त्याच्याकडे गेले.कुतरो अजून निपचीतच पडलेलो बघून दोघांच्याही काळजात धस्स झाला.खाली पडलेली मोटारसायकल कोणीतरी हे दोघी नि कुतरो ह्यांच्यामध्ये आणून हुबी केल्यान.
मोटारसायकलच्या एका बाजूक कुतरो नि दुसऱ्या बाजूक हे दोघय अशी स्थिती. “अरे देवा! ह्ये काय केलास?” मोहन रडवेलो झालो.”तरी तुका सांगी व्हतंय,ब्रेक मार म्हणान.कुतरो मेलो मरे.”बाबलो तर हतबुद्धच होवन बसलेलो .
“मेल्या,तुमचा कुळदैवत ना रे काळभैरव? आणि तू कुतरो मारलंस?”गावकऱ्यात असलेल्या मसुरेकर तात्या चमकूनच बोलले.जमलेले बाकीचे गावकरी कुजबुजाक लागले.
”असा कसा केल्यान मेल्या बाबल्यान?”;पेडणेकर काका
“समज नाय आजकालच्या पोरांका,कायव करतंत मस्तीत.घातल्यांनी गोंधळ?”; माडखोलकर मास्तर.
“अरे देवा! काळभैरवाचा व्हान(वाहन) ना ता.”कदमीन काकू .
”प्रायश्चित घेवचा लागतला आता.” अणावकर भाई.
”पण घेतलो कोण? मोहन की बाबल?” राणे नाना.
”होयहो, बाबलो चालवी होतो खरो,पण गाडी मोहन्याची मा?”कदम अण्णा.
“आणि नायकाक कोण समजवतला?तेचो शिकवलेलो कुतरो?”पेडणेकर काकांच्या प्रश्नावर तर बाबलो थरथर कापूकच लागलो. नाईक सैनयातालो माणूस.उटल्या सुटल्या बंदुकीकच हात घालणारो.
इतक्यात एश्टीची बस इली.कदम अण्णा गडबडीन कदमीनकाकूक शोधूक लागले.पण ती कधीच वाडीत पोचली होती खबर देवक.मसुरेकर तात्या कदम अण्णांना हलक्या आवाजात सांगाक लागले, ”कदमानु,कनकवलेचो बाजार उद्यापन आसतलो,पण ह्ये खेळे काय उद्या बगूक गावायचे न्हायत.आणि वैनी गेली मा बातमी देवक,आता आणखी कलाकार येतले बगा हंयसर.”डब्बल बेल मारून एष्टी सुटली.
वाडीच्या बाजूने आरड ऐकू येवक लागली.मोहन नि बाबलचे आवस बापूस धावत पळत आणि एकमेकावांगडा भांडतच येवक लागले.
“पैशाचो माज दाकव नुको,दादा.”बाबलचो बापूस शंकर धापा टाकत मोहन्याच्या बापाशीक गणपतीक सांगी होतो.गणपतीसुद्धा धापा टाकतच उत्तर देत होतो,”मी कुटून तुका माज दाकवणार?माज्याकडे पोटापुर्तेच..”
दोघांच्याय बायकापण त्याच्या मागून होत्याच. एकमेकींकडे रागान बगत, धावतच भांडत येत होत्या.त्यांचे शब्द समजाक जरा कठीण असले तरी, त्या एकमेकीक गाळी घालण्याशिवाय दुसरा काय बोलत असतीत असा वाटत नव्हता.
मसुरेकर तात्यांनी कदमांका डोळो घातलो.”काय सांगललंय मी तुमका?”त्यांचो हात दाबत वर मल्लीनाथी करुक लागले.
बाबल्याजवळ पोचताच शंकरान त्याका टपली मारली,मोह्न्याकडे बोट दाखवन जाब विचारूक लागलो, ”कोणाक इचारून ह्येच्या गाड्येवर बसलंस?”त्याचीच परतफेड करत गणपतीन प्रश्न बदलत मोहनाक प्रश्न टाकलो,”कोणाक विचारून ह्येका गाड्येवर बसवलंस?”
हा वेळेपावेतो दोघांच्या आवशी थंय पावत्या झाल्या.बाबल्याची आये बाबल्याची अवस्था बघून मोहनाक गाळ्ये घालू लागली,”मेल्या,शिरा पडली तुझ्या तोंडार,माज्या बाबल्याच्या जीवावर उटलंस?बरे न्हय हे धंदे.”
मोहन्याची आऊस गप्प कशी गप ऱ्हवतली?”पार्वती,, माज्या मोहनाक गाळ्ये कित्या घालतास?बिचारो माजो मोहन न्हान भावावर माया करता म्हणान घेवन गेलो तर तुमी त्याकाच बोल लावतास?”तिचो पलटवार. त्यांच्या वांगडा ईलेली वाडीतली इतर बायल माणसा नि पोराटोरा गम्मत बघूक लागली.
बाबल्याजवळ बसून त्याका जवळ घेत,त्याची आये,नवऱ्यावर खेकसान बोलली,”अवो,तुमका काय समाजता की न्हय?माज्या झिलाची अवस्ता तर बागा.”
तोय वैतागून करवादलो.”कुळदैवताचो अपमान केल्यान खुळ्यान,ता बग आदी.आता आदी भटाक विचारुक लागतला ता बग.आदीच दिस बरे न्हयत.वैरी जीवावर उठलेत.”हे बोलताना त्याची नजर मोहन नि त्याच्या बापाशीकडे होती.
तसो गणपती पिसाटलोच,”तर तर, तेवढीच कामा ऱ्हवली आता आमका.”
“भाव स्क्के नि वैरी पक्के म्हंटत त काय खोटा नाय हां,वाडवडलांचे बोल ते, खोटे कशे जातीत.”मसुरेकर तात्यांनी आगीत तेल घातल्याची संधी घेतल्यानी..
त्याका हातानी थोपवत अणावकरभाई सरसावत बोलले,”भट काय संगतलो? सोन्याचो कुतरो करून,भटाक शिधो,दक्षिणा देवन,त्याकाच दान कर.”
त्यांका बाजूक सारत राणेनाना पाजळूक लागले.‘’तुमका काय म्हायती नाय त तुमी वगीच बसा. सोन्याचो कुतरो करून भटाक न्हाय देवचो. काशीक सोडून देवक लागता.मांजर मारल्यावर तसाच करत्तंत.”
“अरे देवा आता,ही माया कितक्यात पडतली आमका?”शंकर कळवळलो.
तितक्यात सगळ्या घोळक्याभुतूर घुसत नायकाचो गडी आरड घालूक लागलो.”जर्मल शेफळ जातीचो कुतरो.मालकांनी मुद्दाम राखाणेक आणललो,पाच हजाराक,तेपण भरून देवक लागतले,आधीच सांगतंय.”
“हो बघा,मालकाच्या वर उडताहा.”,गणपतीक राग काढूसाठी जागा गावली.शंकरय सरसावलो पण परस्पर पावणेतेरा होतातसा बघून गप रवलो.गणपतीन नायकाच्या गड्याच्या मुस्काटीत भडकावली.”आमी काय ता बोलू नायकावांगडा.तू मदी फौजादारकी करूची गरज न्हाय.”
आरड घालूची सोडून गडी रडाक लागलो.परत धाव घेत निघूनपण गेलो.
“काकानु,तुमी काय्येक काळजी करू नका,मी सगळो खर्च करीन.”मोहनान संधी साधली. तसो शंकर नि त्याच्या बायलेचो जीव भांड्यात पडलो.पार्वतीने मोहांच्या कानशिलावरुन अलाबला घेत बोटा मोडली.
तितक्यात ,”टॉमी,टॉमी,” करत नाईक गड्यावांगडा इलो.तो आल्यावर वातावरण परत तंग झाला.सगळ्यांचा ध्यान कुतऱ्याकडे गेला.कुतरो अजून निपचित पडलेलो बघून नाईकान हातातली बंदूक गड्याकडे देत त्याच्याजवळ धाव घेत घेतल्यान.अंगावरून हात फिरवताच तो उटलो आणि नायकाचो हात चाटूक लागलो.
मसुरेकर तात्यांनी कदम काकांच्या कानात कानगोष्ट केल्यानी,चला,घराकडे,खेळे संपले.”
प्रतिक्रिया
26 Feb 2016 - 7:46 am | अजया
मस्तच कथा.
26 Feb 2016 - 7:51 am | यशोधरा
मस्तच असा कथा पण डब्बल कित्या पोस्टली? सासं, लक्ष द्या जरा! :)
26 Feb 2016 - 7:58 am | विजुभाऊ
डब्बल नाय गो मामे. तिब्बल चौबल
26 Feb 2016 - 8:00 am | एस
खेळे मस्त आसां. पर टिब्बल पोस्टली!
26 Feb 2016 - 8:10 am | सस्नेह
मजा आली खेळे पाहून.
26 Feb 2016 - 9:10 am | नाखु
गेल्या महिनापंधरादिवसातील चर्चा पाहता अश्या लेखमालेचा उतारा आवश्यक होता..
शतशः धन्य्वाद सहभागींना आणि ज्यांनी ही संकल्पना मांडली त्या सा.सं.लाही !!!
प्रेक्षक नाखु
बाकडा १०१५
26 Feb 2016 - 9:22 am | प्रचेतस
क्या बात है....जबरीच.
26 Feb 2016 - 10:20 am | भुमी
मजा आली वाचताना!:)
26 Feb 2016 - 10:29 am | प्रीत-मोहर
हा हा हा सुरंगीताय तुज्या गावाक येवचा पडलां गो!!!
26 Feb 2016 - 10:35 am | कविता१९७८
वाह , मस्त कथा
26 Feb 2016 - 10:51 am | पियुशा
भारी !
26 Feb 2016 - 10:59 am | प्रमोद देर्देकर
कथा लय भारी गो तै. जल्ला वाईच अजुन हवी होती. इलुशीच लिवलीस.
26 Feb 2016 - 11:13 am | मितान
भारी लिहिताव तुमी =))
26 Feb 2016 - 11:44 am | प्राची अश्विनी
मजा आली. पुलंची म्हैस आठवली. :)
29 Feb 2016 - 3:33 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो, मस्तच!
26 Feb 2016 - 12:00 pm | एकनाथ जाधव
मज्जा इली खेळे वचुन.
26 Feb 2016 - 12:12 pm | पॉइंट ब्लँक
छान :)
26 Feb 2016 - 12:52 pm | पैसा
खेळे मस्तच!
26 Feb 2016 - 2:18 pm | Maharani
हहपुवा.मस्तच गं ताई..
26 Feb 2016 - 3:03 pm | विशाखा राऊत
वाह मस्तच
26 Feb 2016 - 3:10 pm | कौशिकी०२५
-
26 Feb 2016 - 5:10 pm | सूड
माका वाटला आता शेवटी चुलतभावंडा आपल्या आयशीबापसाक लेक्चर देतंत का काय!! पण शेवट भारीच महो!
26 Feb 2016 - 9:15 pm | जेपी
कथा आवडली.
27 Feb 2016 - 12:47 pm | भीडस्त
तुम्ह्या तं मप्लीच श्टोरी लिव्हलि न क्काय ह्ये.
मप्ल्या गाडमाटाखालि बि ईस सालामाघं आसंच येक कुत्रु घावलिलं. बरं मप्ल्या डोक्याला हेलम्येट लावलिलं व्हतं नाह्य तं नारळ फुटलाच व्हता थोड्या कमि..
गोष्ट आवाडलिली ह्ये बर्का.
27 Feb 2016 - 12:58 pm | जगप्रवासी
गावची आठवान इली
27 Feb 2016 - 7:12 pm | अनन्न्या
मालवणी बोलता नाही येत, पण वाचायला आवडते.
29 Feb 2016 - 12:29 pm | मित्रहो
खेळे मस्त असा
कुतरो बरो निपचित पडलेलो
29 Feb 2016 - 3:27 pm | पद्मावति
मस्तं!
29 Feb 2016 - 8:30 pm | किलमाऊस्की
कथा आवडली.
29 Mar 2016 - 8:35 pm | हकु
वाचायला जाम मजा आली.
पुलंच्या 'म्हैस' ची आठवण झाली.