साहित्यः
गव्हाचे पिठ : १ १/२ कप
नाचणी पिठ : १/२ कप
साखर : १ कप
दुध : १ कप
दहि : १ कप
तुप : १/४ कप
बेकिंग पावडर : १/२ चमचा
केळ : २
व्हॅनिला इसेन्स : १/२ चमचा
ट्रुटिफ्रुटि,सुकामेवा : २ चमचे
कृती : प्रथम गव्हाचे पीठ आणि नाचणी पीठ थोडे भाजुन घ्यावे.साखर दुधात विरघळुन घ्यावे.एका भांड्यात गहु पीठ,नाचणी पीठ,बेकिंग पावडर एकत्र करावे.त्यात तुप,दुध साखरेचे मिश्रण घालावे.हे सगळे साहित्य नीट एकत्र करून छान फेटुन घेणे.यात केळ बारिक कुस्करून नीट एकत्र करावे.
या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स व सुकामेवा मिसळुन छान एकत्र करावे.आता हे मिश्रण कपकेकच्या साच्यात वा तुप लावलेल्या केक भांड्यात ओतुन १८० डिग्री वर प्रिहिट केलेल्या ओवन मधे ३५ मि. ठेवावे.
सुई केकमधे टोचुन पहावी.स्वच्छ सुई बाहेर आल्यास केक तयार!मस्त सुवास घरभर पसरलेला असेल.
आता हे कप केप खायला तयार.हवे असल्यास त्यावर क्रिम,चोकोचिप्स ई.लावुन सजवावे.मुलांना अतिशय आवडतात.
* या केकमधे मैदा नाहि.कणिक,नाचणी अशी पौष्टिक पीठ असल्याने मनसोक्त खायला हरकत नाहि.
*अंडे नाहि.त्यामुळे शाकाहारी लोक खावु शकतात.
*दहि,दुध,तुप,केळ असे घरी सहजी उपलब्ध असणारे पौष्टीक पदार्थ वापरलेत.
*सुकामेवा हवा तो वापरू शकता.
न्याहारीसाठीहि असे गरमागरम कपकेक्स नक्किच आवडतात.
प्रतिक्रिया
25 Feb 2016 - 3:48 pm | अजया
अरे वा मस्त आहे पाकृ.
25 Feb 2016 - 3:50 pm | Maharani
Aha....sahaj soppi kruti.....aakarshak photo.....paushtik ekadum....
29 Feb 2016 - 4:08 am | जुइ
करून बघेन.
25 Feb 2016 - 3:51 pm | पियुशा
वॉव !!! यम्मी दिसतय :)
25 Feb 2016 - 4:47 pm | पिलीयन रायडर
अ हा हा!!!!! भेटशील तेव्हा करुन आणशीलच.. वेगळं सांगायची गरज नसेलच!
25 Feb 2016 - 9:37 pm | प्रीत-मोहर
+१००
25 Feb 2016 - 4:50 pm | विजय पुरोहित
मस्तच दिसताहेत केक्स...
25 Feb 2016 - 4:51 pm | मधुरा देशपांडे
चला, मैद्याशिवायच्या केक ची पाकृ मिळाली, शिवाय नाचणीपीठ सुद्धा, सगळं हेल्दी. विकांताला करतेच.
25 Feb 2016 - 4:58 pm | कविता१९७८
वाह सुगरण ईशा
25 Feb 2016 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा
केकू सजविलेकू मस्तकू!
25 Feb 2016 - 5:17 pm | अनन्न्या
अंदे नसल्याने लगेच करून पाहीन. फोटोही सुरेख!
25 Feb 2016 - 5:18 pm | अनन्न्या
अंडे लिहिता पण येईना
25 Feb 2016 - 6:26 pm | मृत्युन्जय
जबरा आहे पाकृ आणि पौष्टिक. सुंदर दिसताहेत केक्स
25 Feb 2016 - 6:30 pm | यशोधरा
यम्मी!
25 Feb 2016 - 9:55 pm | प्रचेतस
हायक्लास...!!!
25 Feb 2016 - 10:12 pm | भुमी
पहिल्या फोटोनेच गारद केलं. तुझ्या हातची रेसेपी चविष्ट असणारच,यात शंकाच नाही. मस्त!
26 Feb 2016 - 12:20 am | रातराणी
मस्त!
26 Feb 2016 - 3:23 am | विशाखा राऊत
क्लासी वन... मस्तच. आले की करुन देशीलच. ;)
26 Feb 2016 - 5:40 am | रेवती
पाकृ व फोटू आवडले.
26 Feb 2016 - 12:25 pm | वैदेहिश्री
रेसिपी आवडली. फोटो पण मस्त.
27 Feb 2016 - 5:43 pm | मनिमौ
पाहून तोंडाला पाणी सुटले
28 Feb 2016 - 9:52 am | सुहास झेले
मस्तच... सोप्पी आहे पाककृती. नक्की करून बघणार :) :)
29 Feb 2016 - 1:05 am | पद्मावति
फारच मस्तं आहे पाककृती.
1 Mar 2016 - 3:13 am | अन्नू
काय गोग्गोड रेशीपींचा पाऊसच पडलाय कि काय मिपावर?
आता माणसानं किती ते जळायचं नुसतंच असं बघून? :(
1 Mar 2016 - 3:19 am | श्रीरंग_जोशी
पाकृ एकदम उपयुक्त आहे.
सादरीकरण आवडले.
1 Mar 2016 - 9:38 am | सुचेता
मस्तच... सोप्पी आहे पाककृती. नक्की करून बघेण आत्ता
1 Mar 2016 - 10:49 pm | स्वाती दिनेश
नाचणी + कणकेचे कपकेक्स फार मस्त दिसत आहेत,
स्वाती
2 Mar 2016 - 10:13 am | सस्नेह
पौष्टिक आहे एकदम !
3 Mar 2016 - 3:35 am | रुपी
मस्त.. सुंदर सजावट केली आहे.
ही पाकृ केळी न घालता कशी करावी? ;)
बाकी, कपकेकला ३५ मिनिटे फार जास्त नाही होत का?
3 Mar 2016 - 4:20 pm | इशा१२३
साधारण कपकेकला २५-३० मि.लागतात.पण यात कणिक असल्याने मी ५ मि.जास्त ठेवते.आणि छान होतात.(साधारण २५ मि. नी चेक करावे.आणि त्यानुसार ठरवावे.)केळ नसेल बापरायचे तर सुकामेवा जास्त घालुन करता येइल.वॅनिला इसेन्स आहेच.केळाची चव मात्र छान लागते.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
3 Mar 2016 - 9:00 am | पैसा
जबरदस्त सुंदर पाकृ!
3 Mar 2016 - 4:22 pm | इशा१२३
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार!!
4 Mar 2016 - 1:24 pm | शर्वरी
नक्कि करुन पहिन, बिना मैद्या च्या केक पाकक्रुती साथि धन्यवाद!
4 Mar 2016 - 2:32 pm | सुमीत भातखंडे
यम्मी पाक्रु.
5 Mar 2016 - 7:17 pm | प्रसाद गोडबोले
ओव्हन किती वेळ प्री हीट करायचा असा प्रश्ण गृहमंत्रालयाकडुन विचारण्यात आलेला आहे.
6 Mar 2016 - 10:27 pm | इशा१२३
साधारण ५-७ मि .प्रिहिट करावा.
10 Mar 2016 - 1:41 pm | दिपक.कुवेत
हे मी नक्किच करणार. मफिन्स मोल्ड नाहियेत पण नुसता केक करीन....फोटो फारच तोंपासू आले आहेत.
10 Mar 2016 - 11:22 pm | इशा१२३
धन्यवादच_/\_
तुम्हाला काय अवघड!