चिच्च्या वीस रुपियानी बे सांडश्या करीन राख. गिर्हाईक दुपारी आवशे.
सुक्कीने मुलाला साम्गितले.
हमणा तर जाळ पेटाड्यो. ईमा तु हवा मार. मग रुडो जाळ थशे. एकदा जाळ पेट्यो की मग लोखंड टाक. उप्परती जोरमा मार. नीट धर रे. सांडश्यो आगळथी चप्पटी पायजे. लोकोन हातमा सांडश्यो धरवा गोल करजे.
चिच्च्या ने जाण पेटवला. सुक्की भाता हलवून कोळसे फुलवू लागली.
ए सुक्क्ये . तीन चोरीली सळ्ळी क्या राखी सं? काले हितं हती सळ्ळी कुठे गयी?
नीट जो की रे..... तारा मागेच पडी सं. डोळा फुट्या का रे तारा? का सवारे सवारे भाड झोकीने आयो? नीट काम कर आन पैसो मळाव. घरमा धान लाव आन पसं जे करवु व्हय ते कर.
धान विकात लावु पडंसं...... हामज्यू का रं.
सुक्कीनं पोराला उगाचच दम भरला. पोरगा सळी आगीवर तापवू लागला. चांगली लालभडक तापल्यावर त्यानं सळई बाहेर काढली आणि चिमट्यात धरून लाल सळईवर घणाचे घाव घालू लागला.
आ जो गं नीट आकार आयो का? वीस रुपयानं बे सांडश्यो.... आटला कमी पैशामा बापनी दारू आवसे फकत. ए बी नौटाक. बार दारु पिशे आन आमे उपाशी बेसशु. व्हय ना? मन नाय करवू आवु काम? दिवसभर काम आन रीकामी शाम.... सगळू आवूच स.
चिच्च्या खरु बोलंस मा.चिच्च्याची बहीण "लकसुमी" म्हणाली. तीही बिचारी दिवसभर भात्याची काठी हलवून वैतागली होती.
तीच्या बरोबरीच्या मुली शाळेत तरी जायच्या नाहीतर खाउ तरी खायच्या.
मी कै करू? आपण घिसाडी लोखंडनु काम करवा हितं आया. बीजू कायीच जमतु नाय. शिकवानू आपणु काम नय. तनं शाळामा जावूसं? शिकवा माटे पैसा लागसं. रडी नखं ( नको) लकसुमी. काले मी घणी सळ्ळी चोरीन लावस . मग सळ्ळीनं ठोकीन सांडश्या बनाव बजारमा विकीन पैसा लाव . मगच शाळमा जावानु.
वीस रुपयात दोन सांडश्या विकून कितीसा पैसा मिळणार होता. पण पैसा मिळेल आणि आपल्याला शाळेत जायला मिळेल या विचाराने लकसुमी आनंदली. तिच्या डोळ्यात पुस्तकं वाचायचे स्वप्न मावत नव्हते.
हो रे भई तू घडी सांडश्या बनव , कोयता बनव. मी सगळी सांडश्या आन कोयता विकीस गामना बजारमा. आन घणा पैशा लाईस. मग पुसतक वाचवा शाळामा जाईस.
लकसुमीचे डोळे आनंदले ती जोरजोरात भाता मारू लागली.
घिसाड्याचे पाल हलू लागले. भाता हवा फुंकु लागला .विस्तवावर सळई तापू लागली. जळत्या विस्तवासोबत लकसुमीची स्वप्ने सुद्धा जळू लागली.
प्रतिक्रिया
24 Feb 2016 - 6:31 pm | भीडस्त
प्रत्ययकारी लेखन आहे.
24 Feb 2016 - 6:39 pm | नाव आडनाव
थोडी अहिराणी सारखी आहे का भाषा?
25 Feb 2016 - 4:14 pm | Anand More
मला पण तसेच वाटले वाचताना
24 Feb 2016 - 6:39 pm | चांदणे संदीप
बरेचशे शब्द कळत होते आणि बर्याच ठिकाणी अडखळायला पण झाल मला...त्यामुळेच की काय तेवढी परिणामकारक नाही वाटली. शिवाय, चटकन आटोपली पण!
फक्त एकच...'लकसुमी' शाळेत जाव्या असे मनापासून वाटते अशा कथा वाचल्यानंतर!
Sandy
24 Feb 2016 - 6:59 pm | अजया
+१
सहमत
24 Feb 2016 - 6:51 pm | बोका-ए-आझम
कथाही छान आहे. कुठल्या भागात बोलली जाते ही भाषा?
24 Feb 2016 - 7:02 pm | भुमी
शेवटच्या वाक्यानं गलबललं.
24 Feb 2016 - 7:05 pm | बॅटमॅन
एक नंबर लिहिलंय राव!!!!!!
24 Feb 2016 - 7:13 pm | नूतन सावंत
कथा आवडली न् समजलीही.भटक्या विमुक्तांच्या वेदना न् कष्ट सहीच उतरलीत पण अजून मोठी हवी होती कथा.
सगळ्या लहान मुलांना न् मुलींना शाळेत जायला मात्र मिळाले पाहिजे.
24 Feb 2016 - 7:41 pm | एस
कथा मनाला भिडली! अशी कितीतरी शालाबाह्य मुले आपल्या आजूबाजूला असतात आणि सरकारी सर्वेक्षणात मात्र ती सापडत नाहीत!
24 Feb 2016 - 7:44 pm | राही
कथा आवडली. तापत्या सळीच्या डागण्या बसाव्यात तसं वाटलं.
पण ही मराठीपेक्षा गुजरातीचीच बोली जास्त वाटली. क्रियापदं सगळी गुजरातीच. मध्ये मध्ये एखाददुसरा शब्द मराठी.
पण आवडली. त्या चिमुरडीचा भ्रमनिरास न होवो, तिला शाळेत जायला मिळो.
25 Feb 2016 - 7:21 am | सस्नेह
गुजरातीचा प्रभाव जाणवतो.
छोटीशी कथा छान.
25 Feb 2016 - 10:43 pm | मित्रहो
भाषेवर गुजराथीचा प्रभाव जास्त आहे वाटत.
मुले शाळेत जायलाच हवी हे मात्र खरे.
24 Feb 2016 - 7:48 pm | पैसा
कथा आवडली. लकसुमी चे स्वप्न आणि घणाचे घाव यातला विरोधाभास उत्तम पकडलाय. नीट वाचले तर कळते आहे.
25 Feb 2016 - 10:50 am | विजुभाऊ
घीसाडी म्हणजे लोहार ( हे बहुतेक राणा प्रतापा बरोबर वनवासात होते) राणाप्रतापा सोबत त्यानी चितोड जोपर्यन्त स्वतन्त्र होत नाही तोपर्यन्त उलटी खाट करून झोपेन आणि तीन दिवसांपेक्षा एका जागी रहाणार नाही अशी शपथ घेतली होती. स्वातन्त्र्य मिळाल्या नंतरही हे लोक असेच रहायचे. पंडीत नेहरुनी या जमातीला चितोड स्वतन्त्र झाले आहे आणि तुमची शपथ पूर्ण झाली असे सांगितल्या नंतरच हा समाज घर करून राहू लागला.
मूळ मेवाडात रहाणारा हा समाज असाच भटकत महाराष्ट्रात आला. गावाबाहेर पाल टाकून रहाणे . भिल्ल असल्यामुळे घिसाडीकाम( लोहार काम ) करून विशेषतः अवजारे बनवणे हे यांचे काम मूळात हे भिल्ल लोक तलवारी ,बाणाची टोके वगैरे बनवायचे आता शेती अवजारे ( विळा , कोयता, नांगराचा फाळ वगैरे ) बनवतात.
या पैके काही शेळी पालन सुद्धा करतात. गुजरात मधे शेती पाल्न करत हिंडणाराना "रबारी" म्हणतात.
त्यांच्या बोलीवर गुजराती आणि मराठीचाही प्रभाव आहे.
भटक्या जगण्यामुळे यांचे कित्येक वर्षे जनगणेतही नोंद नसायची.
25 Feb 2016 - 4:33 pm | प्राची अश्विनी
कथा आवडली. ही माहिती पण नवीन होती.
25 Feb 2016 - 11:33 am | विजुभाऊ
याना गड्डा लोहार / गडिया लोहार असेही म्हणतात.
https://en.wikipedia.org/wiki/Gadia_Lohar
25 Feb 2016 - 1:08 pm | पैसा
छान माहिती. ते चाकू सुर्यांना धार लावणारे पण यातलेच का?
25 Feb 2016 - 3:21 pm | विजुभाऊ
नाही ते लमाणी.
गडिया लोहार ( घिसाडी) हे शुद्ध देशी आहेत. लमाण अफगाणीस्थानातून इकडे आले आणि राजस्थानातुन सर्वत्र पसरले त्यांची भाषा "गौर".
त्यांचा मूळ व्यवसाय गुरे विकण्याचा.आपल्याकडे त्याना बंजारा सुद्धा म्हणतात.
25 Feb 2016 - 3:55 pm | कंजूस
डुंगरपुर ,कोटा भागातले.
25 Feb 2016 - 4:11 pm | बबन ताम्बे
आवडली.
लहानपणी गावाकडे ही घिसाडी (लोहार) कुटंबे पाहीलेली आहेत. कोयता, विळे, खुरपे, पहार, कु-हाड, पकड (सांडशी), बैलगाडीच्या चाकाची धाव (रिम) वगैरे बनवत. अजूनही पुण्यात कुठेकुठे फूटपाथवर भाता लवून पालाखाली काहीतरी बनवताना दिसतात.
25 Feb 2016 - 5:25 pm | स्वामी संकेतानंद
गुजरातीची बोली म्हणता येईल. मराठीचा प्रभाव पडला आहे पण फार कमी. नवी बोली वाचून आनंद झाला. इंटरेस्टिंग आहे.
कथेची फार्मेटिंग व्यवस्थित पाहिजे होती.
25 Feb 2016 - 6:27 pm | विजुभाऊ
हे लोक महाराष्ट्रात रहातात. स्वतःची बोली फक्त स्वतःच्याच समाजात बोलतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या भाषेला स्वतःची लीपी नाही. गुजराती ची बोली भाषा "पावरी" च्या जवळ जाणारी आहे
25 Feb 2016 - 6:57 pm | सुमीत भातखंडे
आवडली.
25 Feb 2016 - 10:57 pm | सूड
वेगळी बोली!! क्रियापदं वाचताना गुजरातीच वाचतोय असं वाटलं.
26 Feb 2016 - 12:27 pm | जेपी
वेगळ्या बोली भाषेतील कथा आवडली.