चटपटीत कोलंबी

नाटक्या's picture
नाटक्या in पाककृती
9 Jan 2009 - 4:06 am

मागच्या आठवड्यात एका केरळी मित्राकडे जेवायला गेलो होतो. तेव्हा त्याच्या आईने एक प्रकारची चटपटीत कोलंबी केली होती. मला ती प्रचंड आवडली आणि मी एकट्याने १५-१७ कोलंब्या फस्त केल्या. एव्हढे कमी म्हणून कि काय पण दुसर्‍या दिवशी घरी दोन पौंड आणुन (रम बरोबर) हादडल्या. त्या कोलंबीची चित्रमय कॄती येथे देत आहे. (चित्रात कोलंब्या कमी दिसतील कारण मिपासाठी पुन्हा खास फोटोसेशन करण्यात आले. (बाकीच्या कोलंब्या मी हादडल्या) )

साहित्य :
कोळंबी - अर्धा किलो (शक्यतो खार्‍या पाण्यातील पांढर्‍या कोलंब्या मिळतात, त्या वापराव्या)
मीठ - १ चमचा
लाल तिखट - २-३ चमचा (किती तिखट हव्या आहेत त्यावर)
हळद - चिमुटभर
तेल - ३ चमचे

कृती :

साधारणतः अर्धा किलो कोलंबी निट धुवून घ्यावी.
From Prawns

कोळंबी व्यवस्थीत साफ करुन घ्यावी. साफ करताना त्यातील मधला धागा काढ्ण्याची काळजी घ्यावी.

From Prawns

From Prawns

त्यानंतर त्यात मीठ हळद तिखट निट लावुन कमीतकमी १ तास मुरू द्यावे.

From Prawns

From Prawns

त्यानंतर एक मोठा तवा मंद आचेवर ठेवावा. त्यात तेल टाकून तेल गरम झाल्यावर कोलंबी निट पसरून ठेवावी आणि मंद आचेवरच १०-१२ मिनिटे होवू द्यावी.
त्यानंतर एका बाजुने खरपुस भाजुन झाल्यावर चिमट्याने दुसरी बाजु पलटावी आणि परत १०-१२ मिनिटे खरपूस भाजावी.

From Prawns

दोन्हीकडुन भाजुन झाल्यावर डिश मध्ये काढुन सजवावी. ही आहे सजवलेली चट्पटीत कोळंबी...

From Prawns

प्रतिक्रिया

सहज's picture

9 Jan 2009 - 6:22 am | सहज

इन्स्टंट स्नॅक्स! चखणा म्हणुन सही.

कधी संपतात ते कळतच नाही :-)

सुनील's picture

9 Jan 2009 - 9:46 am | सुनील

कधी संपतात ते कळतच नाही
तोच तर प्रॉब्लेम आहे!!

नाटक्या, पाकृ देण्याची पांथस्थांनी रूढ केलेली नवीन पद्धत वापरल्याबद्दल धन्यवाद. पाकृ उत्तमच पण कोलबेररावाम्च्या पाकृप्रमाणे थोडा रवा लावला तर कोलंबी कुरकुरीत होतील, असे वाटते.

अवांतर - आणि हो, कोलंबीचा मधाला धागा अहिंसक पद्धतीने (हाताने) काढता येतो की त्यासाठी सशस्त्र पद्धत कशाला?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वेताळ's picture

9 Jan 2009 - 9:56 am | वेताळ

कोलंबी साफ करणे खुप जिकिरीचे काम आहे. आमच्या इकडे त्या साफ करुनच देतात.पण साफ करायचे फोटो दिल्याबद्दल नाटक्याचे धन्यवाद.

वेताळ

विसोबा खेचर's picture

10 Jan 2009 - 12:11 am | विसोबा खेचर

वारलो..!

लवंगी's picture

10 Jan 2009 - 7:56 am | लवंगी

असच म्हणते

खादाड's picture

11 Jan 2009 - 2:59 pm | खादाड

मे काल करुन पाहिल हे ! पण वातड झाली कोणी सान्गु शकेल का काय झाल असेल !

लवंगी's picture

11 Jan 2009 - 11:38 pm | लवंगी

तर वातड होते.

खादाड's picture

17 Jan 2009 - 5:19 pm | खादाड

पण फार त फार १० मिन. तेवढ्यात काय वातड होइल ? :?

सुनील's picture

17 Jan 2009 - 5:21 pm | सुनील

कोलंबी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

खादाड's picture

22 Jan 2009 - 12:59 pm | खादाड

कोलंबी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड! =))
हे खर आहे ! आहो पण पोपट झाला न माझा ! त्याच काय ? ;)

पाककृती आहे.

तिकडे आलो की तुझ्याकडे चक्कर टाकतो.

A1April's picture

22 Jan 2009 - 5:49 pm | A1April

padartha pahun tondala pani sutaley.......pudhalya velela 4-5 kg. aan.......aamhi sagale yeu

AJIT

नाटक्या's picture

22 Jan 2009 - 10:40 pm | नाटक्या

> padartha pahun tondala pani sutaley.......pudhalya velela 4-5 kg. aan.......aamhi sagale yeu

हो नक्कीच. ईथे बे एरिया मध्ये पुढचा कट्टा केला कि हा पदार्थ नक्की. च्या मारी ४-५ किलो कशाला १० किलो आणतो कि फक्त त्या बरोबर रम/व्हिस्कीची सोय तुम्ही करायची. खायला आणि खिलवायला (हे प्यायला आणी पिलवायला वाचले तरी चालेल) आपली कधीच ना नसते.

ही पाककृती मिळाल्या पासुन ३-४ वेळा करून झाली.

स्वगतः साला कितीही खाल्ली (आणि प्यायलो) तरी समाधानच होत नाही.

- नाटक्या..