गजाल खरी काय? (बाणकोटी) (मराठी भाषा दिन २०१६)

सूड's picture
सूड in लेखमाला
23 Feb 2016 - 6:15 am

गजाल खरी काय?'
कोकणी माणसाचा आवडता स्वभाव म्हणजे गप्पा छाटत बसणे. त्यात कोणी पळून वैगरे गेलं असेल तर मग काय सांगता! अशाच पळून गेलेल्या गुरवाच्या मुलीबद्दल गावातल्या घरात जी काही चर्चा रंगते त्याची थोडीशी झलक. चर्चा इतकी रंगते की मूळ कथानक अजूनही सुरु व्हायचंच आहे.
बरेच दिवस, खरंतर बरीच वर्ष ही भाषा कानावर न पडल्याने लिखाणात लहेजा तितकासा नीट उचलता आलेला नाहीये.
=======
''रं म्हाद्या… "
"ऊंssssssss"
"हाईस कुटं? कालपासना कुटं पायरव नाय तां?"
"कुटं मंजे? आमान्ला कामा हायत, तुमच्यासारं गावभर छकन्या मारीत फिराय येल नाय.. "
"तं !! आला मोटा कामा करनारा…. ता जाव दे, बातमी समाजली काय?"
"कंची ?"
"कंची? आरं गावातच -हाताईव ना? हिकडं सगला गाव ताच बोलतोय नि तुमान्ला म्हायत नाय ?"
"आता नाय म्हायत…. सांगताय्स? का जाव ?"
"ताच ता, ती गुरवाची पोर? ती पलून गेली !!"
"अरे कर्मा !!"
"तं… !! सांगताय काय मी !! "

"तरीच सकाल-सकाल गुरवाच्या घरातना कंदाल आयकू येयीत व्हती. मना वाटला ह्यांची रोजचीच नाटका आसतील. गुरवाची बायको, मेली, वस्साडी तशीव सासवंला डोल्याफ़ुडं धरीत नाय. मना वाटला दोगींचा रोजचाच काय चालला आसंल."

"रोजचा त्यांचा नाय, गुरवीनीच्या प्वोरीचा चालल्याला. काय म्येली फ़्याशनी करं !! म्हयन्या दीड म्हयन्यापासना रोज फ़ाटं फ़ाटं देवलाफ़ुडल्या बावीवं पानी आनाय जायाची. गो बाय जाव नुको, पानी व्हंड हाय म्हनंस्तवर बाय हांडं कलश्या घेऊन पसार…. ! कार्टी येयाची ती दीड दोन तासान. आयशीला काय, तेवडाच बरा… येक काम कमी व्हयीत व्हता. . सासवंन येक-दोन येलं गुरवीनीला सांगून बगतलान.. पर गुरवीन कशी ती म्हायत हाय ना? सासवंन सांगतल्याला आईकलान तं कान झडतील नाय तिजं? नि आयता मिलताय तं सोडील कशाला? येकदम कंडम बाई !! उंद्या न्हव-याला न्हेयाला यम आला तं जल्ली यमासंगाती कवड्या खेलीत बसंल. आशी आईस म्हनल्याव काय पोरीला रानंच मोकला मिल्ला. तं झाला काय !! गुरवीनीच्या भयनीच्या पोरीचा हाय फुडल्या म्हयन्यात लगीन!!"

"काय सांगतास? आमच्या पोरांसंगाती खेलाय येयाची, ही अशी नकावडी पोर…लगीन पन ठरला!!"

"ता -हाव दे, काय सांगताय ता आईक. तं ही गुरवीन म्हनली वायच काय बाय करु. कंदी नाय ती सासवंला हाताशी घ्येतलान, सासू सुना लाडू बांदीत बसलंल्या. रव्याचं लाडू काय जमताईत काय! उब्या जिंदगीत गुरवीनीन असला काय केलंला नाय. सासवंला आयता कारन मिल्ला सुनंला अद्दल घडवाय. सासू जरा लकाटतो सांगून ग्येली ती झोपली…. मंग हिनं ल्येकीला सांगतलान…बाय जरा सामनी जा नि कदमीनीला आवाज देस… "

"मंग ? म्होरं काय झाला? तिकडच्या तिकडं पलाली का काय?"

"च्च, मांगारी आली, आयशीला म्हनं, काकूस जेवाय बसली. ज्येवान झाला का मंग येयील. गुरवीन वाट बगत बसली ती तितच वायच लकाटली, तं तिचा लागला डोला!! मेली निजते पन अशी कुंभकरनासारी का ढोल वाजावलं तरी उटायची नाय. तं ही अशी आत लकाटल्याली. तेवड्यात झाला काय, दावनीला बांदल्याला रेडकू सुटला नि आला माजघरात. त्या लाडवाच्या टोपात घातलान तोंड!! सगला टोप खाली केलान तरी बायला सूद नाय"

"गुरवीनीच्या पोरीचा काय झाला?"

"ताच सांगताय… आईक !… "
-------
मूळ कथानक अजूनही सुरु व्हायचंच आहे!!

प्रतिक्रिया

अजया's picture

23 Feb 2016 - 7:06 am | अजया

गजालीचा पुढचा भाग !?

नाखु's picture

23 Feb 2016 - 8:36 am | नाखु

मस्त...

दुसरा भाग आलाच पाहिजे अगदी जत्रा-आवाजची आठवण करून देणारं अस्सल लिखाण

यशोधरा's picture

23 Feb 2016 - 7:11 am | यशोधरा

LOL!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2016 - 7:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओह, तरं अश्या असतात गजाली तरं.

आवडलं रे. पुढचे भाग नक्की लिहि.

बोका-ए-आझम's picture

23 Feb 2016 - 7:36 am | बोका-ए-आझम

हो सूड्राव!

किसन शिंदे's picture

23 Feb 2016 - 7:37 am | किसन शिंदे

=)) =))

एकदम भारी रे सुडक्या

चेक आणि मेट's picture

23 Feb 2016 - 7:49 am | चेक आणि मेट

ताच सांगताय… आईक !… आमच्या कोकणातली भुतं लै ड्यांजर.

=))
पुडचा भाग पण येऊ द्या..

प्राची अश्विनी's picture

23 Feb 2016 - 8:21 am | प्राची अश्विनी

:):):)
भारी!

प्राची अश्विनी's picture

23 Feb 2016 - 8:29 am | प्राची अश्विनी

:):):)
भारी!

एस's picture

23 Feb 2016 - 8:29 am | एस

खी: खी: खी:!

प्राची अश्विनी's picture

23 Feb 2016 - 8:30 am | प्राची अश्विनी

:):):)
भारी! गजालीन् घो खाल्लो असा म्हणत.

प्रचेतस's picture

23 Feb 2016 - 8:46 am | प्रचेतस

मस्त रे.

खेडूत's picture

23 Feb 2016 - 8:46 am | खेडूत

:)
एकदम भारी! अजून य़ेऊदे …
वैभव मांगलेची आठवण झाली.

स्पा's picture

23 Feb 2016 - 9:03 am | स्पा

ओके

सतिश गावडे's picture

23 Feb 2016 - 9:52 am | सतिश गावडे

बेक्कार हसतोय. :)

बरेच दिवस, खरंतर बरीच वर्ष ही भाषा कानावर न पडल्याने लिखाणात लहेजा तितकासा नीट उचलता आलेला नाहीये.

मी जन्माने बाणकोटी भाषिक असल्याने हे लगेच लक्षात आले. बाणकोटीबरोबर बहुतेक मालवणी मिसळली आहे असं वाटते.

प्रीत-मोहर's picture

23 Feb 2016 - 10:35 am | प्रीत-मोहर

मग तुमी बी लिवा की

पैसा's picture

23 Feb 2016 - 10:40 am | पैसा

मालवणीपेक्षा रत्नागिरी संगमेश्वर भागात कुळवाडी लोक आहेत ते अशा प्रकारची बोली बोलतात.

स्वच्छंदी_मनोज's picture

23 Feb 2016 - 12:58 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच रे सुडभावा. बरेच दिवसानी ही भाषा वाचायला मिळाली..अगदी गावाला गेल्या सारखे वाटले

मालवणीपेक्षा रत्नागिरी संगमेश्वर भागात कुळवाडी लोक आहेत ते अशा प्रकारची बोली बोलतात >>> पैताई..साधारणपणे चिपळूण पासून ही भाषा कानावर पडायला सुरुवात होते ते पार रत्नागिरी जिल्हा संपून खारेपाटण पर्यंत. पुढे मालवणीचा प्रभाव जास्त आहे.
आमच्या गावातही (ता. राजापूर) कुळवाडी समाजात ही बोली अजून सर्रास बोलली जाते. तरूण पिढीत थोडी शहरी झांकंआहे पण म्हातारी लोक अस्सल बोलतात.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2016 - 10:18 am | टवाळ कार्टा

आग्ग्गाआग्गाआ....फुटलो हसून हसून

भीडस्त's picture

23 Feb 2016 - 10:35 am | भीडस्त

आन्द्येव आन्द्येव हौर आण्देव जल्दि जल्दि

सस्नेह's picture

23 Feb 2016 - 10:37 am | सस्नेह

गजाली ऐकून मजा आली !
पुभाप्र.

पैसा's picture

23 Feb 2016 - 10:38 am | पैसा

=)) =)) जल्लां सग्लां घात या गजालीनंच केलां.

पिलीयन रायडर's picture

23 Feb 2016 - 11:14 am | पिलीयन रायडर

मस्तच लिहीलय!!

ह्या लेखमालेतील सर्व लेख एकत्र दिसत नाहीत का? जसे विज्ञान लेखमालेत एका लिंक वर टिचकी मारली की सर्व प्रकाशित लेख एकत्र दिसत होते. इथे वेल्लाभटांच्या मुखपॄष्ठाखाली दिलेली लिंक फक्त आवाहनाच्या धाग्यावर नेत आहे. सर्व लेख एकत्र दिसतील असं काही तरी करा प्लिझ.

प्रीत-मोहर's picture

23 Feb 2016 - 11:28 am | प्रीत-मोहर

पिरे हेडर मधे दिलय

प्रीत-मोहर's picture

23 Feb 2016 - 11:28 am | प्रीत-मोहर

पिरे हेडर मधे दिलय

रातराणी's picture

23 Feb 2016 - 11:21 am | रातराणी

कहर! पुढचे सगळे भाग लिहा. गजाली करूक मागे पुढे नाय बघायचा.

संजय पाटिल's picture

23 Feb 2016 - 12:58 pm | संजय पाटिल

भारी....... एकदम गोड भाषा!!

बॅटमॅन's picture

23 Feb 2016 - 12:59 pm | बॅटमॅन

हाण्ण तेजायला. =)) =)) =)) सूडरावांना "गजालिश्रेष्ठ" हा खिताब या ठिकाणी बहाल करण्यात येत आहे होऽऽऽ!!!!

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2016 - 1:02 pm | टवाळ कार्टा

त्यापेक्षा "गजालीसम्राट" कसे वाट्टे

नाखु's picture

23 Feb 2016 - 5:07 pm | नाखु

जालीय कुमार यावर विचार करणेत यावा.

एका दगडात दोन पक्षी कसें

याचकांची पत्रेवाला नाखु

सही रे सई's picture

24 Feb 2016 - 11:56 pm | सही रे सई

व्वा कोटी चांगली केलीत की

स्वच्छंदी_मनोज's picture

23 Feb 2016 - 12:59 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच.. छान जमले आहे.

आता गुरवीणीचा चेडवां खय आनीक कुनाबरूबर पलून गेलां त्याचीव एक गजाल येवदे.

बबन ताम्बे's picture

23 Feb 2016 - 1:02 pm | बबन ताम्बे

मस्त सुडराव.

जगप्रवासी's picture

23 Feb 2016 - 1:43 pm | जगप्रवासी

सूड भाऊ : मस्त खुमासदार लेख. मजा आली वाचायला. एखाद्या गोष्टीला मीठ-मसाला लावून सांगण्यात कोकणी माणूस एकदम तरबेज. म्हणजे मेन गोष्ट राहिली बाजूला आणि बारा गावच्या भानगडी त्यात ओवून मोकळा. कोकणी भाषा थोडी वेगळी आहे, दोन भाषा एकत्र झाल्यात अस वाटतंय.

स्वच्छंदी_मनोज : मी पण राजापूरचो, तुमचो गाव कुठचो??? खयल्या गावचे तुमी???

सहज सुचल म्हणून
"तरी माका वाटलाच हुता, त्या गुरवांच्या चेडवाचा काय खरा नाय. आईशीक ह्याच्यातला काय ठावक नसा. ती बाजुच्या कदमीनी वांगडान बसली की चार चार तास उठत नाय. म ह्येका गाव उन्डरोक बरा."
"व्हय रे … त्यादिवशी सड्यार गोरवा घेऊन गेली तर ती गोरवा फिरतत पुऱ्या सड्याभर आणि या बसला त्या सरपंचाच्या झिलासोबत."
"तो मुंबैचो पाव्ह्नो इलो तेवापास्ना तेच्या गाडीरना फिरता हा. पण माका वाटला नव्हता की असा काय होइत ता"

भुमी's picture

23 Feb 2016 - 2:12 pm | भुमी

:)

मीता's picture

23 Feb 2016 - 2:24 pm | मीता

मस्त...

प्रीत-मोहर's picture

23 Feb 2016 - 2:32 pm | प्रीत-मोहर

मस्त रंगल्यो हा गजाली...

नाव आडनाव's picture

23 Feb 2016 - 2:43 pm | नाव आडनाव

मस्त :)

स्वाती दिनेश's picture

23 Feb 2016 - 3:15 pm | स्वाती दिनेश

मस्त!
पुढचा भाग वाचायला आवडेल.
स्वाती

सहीच सुड्शेठ
पुढचा भाग लिहाच

मित्रहो's picture

23 Feb 2016 - 4:15 pm | मित्रहो

मजा आली वाचताना
पुढील भाग लिहा लवकरच

आदूबाळ's picture

23 Feb 2016 - 7:06 pm | आदूबाळ

जबरदस्त!

नूतन सावंत's picture

24 Feb 2016 - 9:07 pm | नूतन सावंत

जल्ला सूडभौ,गजाल अर्दीच ठेव्लीव,असा काय केलाव.लौकर पुरी करून टाका.

विजय पुरोहित's picture

24 Feb 2016 - 9:21 pm | विजय पुरोहित

सूडबोवा... ही बाणकोटी म्हणजे मंडणगडची बाणकोटी काय?

होय, मंडणगड आणि आसपासचे तालुके!!

विजय पुरोहित's picture

24 Feb 2016 - 11:02 pm | विजय पुरोहित

सूडबोवा...
मी पाहिलंय मंडणगड, बाणकोट, वेळास...

विजय पुरोहित's picture

24 Feb 2016 - 11:04 pm | विजय पुरोहित

वेशवी, आतले, नायणे, नारगोली, देव्हारे वगैरे वगैरे...

सूड's picture

24 Feb 2016 - 11:14 pm | सूड

बरं मग?

खटपट्या's picture

4 Mar 2016 - 10:29 pm | खटपट्या

हा खरा कोकणी सवाल... :)