" झाडीपट्टी चंबल लागते" (झाडी बोली)-(मराठी भाषा दिन २०१६)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in लेखमाला
22 Feb 2016 - 7:44 am

" झाडीपट्टी चंबल लागते"

खेती करावले बी मन मोठा बख्खल लागते
मिरगात बी तऱ्याच्या पारीले सब्बल लागते

जंगल अना जरा नक्सलवादाची आली खबर
बाहेरच्याइले झाडीपट्टी चंबल लागते

लोकाइच्या मनाले फुटते पाझर येती असा
मारा कुराड कोटी बी पानी भलभल लागते

स्ययरात ते कईचेे गेले वापस आले नहीं!
तुमची जमीन बाप्पा आमाले दलदल लागते

आला घरी तई पोट्टा लडुलडु सांगे मायले
झोपावले मले वो चिमन्याइचि कलकल लागते

------------
शब्दार्थ

बख्खल = (शब्दशः) जाड़ेभरडे,
मिरगात= मृग नक्षत्रात
तऱ्याची पार= तळ्याचा बाँध
सब्बल= पहार
कईचे= कधीचे
कोटी बी = कोठे पण
भलभल= धो-धो वाहणारे
लडुलडु= रडत रडत

--- स्वामी संकेतानंद

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

22 Feb 2016 - 9:11 am | प्रीत-मोहर

Vegalich boli vachayla chaan vatla

झाडी बोलीत असूनही खाली दिलेल्या शब्दार्थांमुळे कविता नीटच कळली.आवडलीच.

लोकाइच्या मनाले फुटते पाझर येती असा
मारा कुराड कोटी बी पानी भलभल लागते

..

आतिवास's picture

22 Feb 2016 - 10:35 am | आतिवास

अगदी हेच लिहायला आले होते.
रचना आवडली.

जेपी's picture

22 Feb 2016 - 9:18 am | जेपी

थोड समजल..थोड नाही..
तरिही आवडल..

प्राची अश्विनी's picture

22 Feb 2016 - 10:02 am | प्राची अश्विनी

+११

नाखु's picture

22 Feb 2016 - 10:54 am | नाखु

सुशेगाद सम्जवून सांगील रसग्रहण वगैरे सारखं तर अजून बरे !

सातवी फ शेवटून दुस्रा बाकडा

भीडस्त's picture

22 Feb 2016 - 9:29 am | भीडस्त

बोलीभाषेतील गझलेचा प्रयोग आवडला स्वामीजी.

राही's picture

22 Feb 2016 - 9:31 am | राही

कविता आवडली. सुट्या चरणांचा अर्थ समजला. पण एकत्र विचार करता काही कडवी विरुद्ध अर्थ सांगतात का? ऐन मृग म्हणजे पावसाच्या नक्षत्रात बांध फोडताना, तोही तळ्याकाठचा, पहार लागते म्हणजे जमीन किती रखरखीत कोरडीठाक असावी; असाच अर्थ ना? पण पुढच्या कडव्यांत 'पानी भलभल लागते' तुमची जमीन आम्हांला दलदल लागते' यात जमिनीत पाणी भरपूर आहे असा अर्थ मला लागला. माझे अज्ञान दूर कराल का? माझी अत्यंत आवडीची भाषा आहे ही, पण पुरेशी माहिती नाही तिच्याविषयी.

स्वामी संकेतानंद's picture

22 Feb 2016 - 9:47 am | स्वामी संकेतानंद

गैरमुसल्सल गझलेत प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. त्यामुळे दोन शेरांत परस्परसंबंध असेलच असे नाही. इथे म्हणायला झाडीपट्टी हा एक विषय धरून शेर आहे, पण स्वतंत्र वाचायला गेले तरी प्रत्येक शेर परिपूर्ण आहे. थेट झाडीपट्टीबद्दल एकच शेर आहे. दुसरे म्हणजे पहिल्या शेरात म्हणजे मतल्यात असलेला कोरडेपणा शेतीबद्दल आहे, दलदल शहरासाठी आहे आणि भलभल पाणी लोकांच्या अंतरीच्या ओलाव्याबद्दल आहे.म्हणजे तसा विरोधाभास नाहीच.

राही's picture

22 Feb 2016 - 10:36 am | राही

दलदल शब्द शहरासाठी आहे तर. मला वाटत होते की शहरात गेलेले लोक मागे उरलेल्यांना 'तुमची जमीन आम्हांला दलदल लागते' असे सांगताहेत.
गज़ल आवडलीच होती, फक्त माझा गोंधळ दूर करायचा होता.

मला तो शेर झाडीपट्टीतल्या लोकांच्या मनातला आंतरिक ओलावा अशा अर्थाने आवडला.

यशोधरा's picture

22 Feb 2016 - 10:08 am | यशोधरा

आला घरी तई पोट्टा लडुलडु सांगे मायले
झोपावले मले वो चिमन्याइचि कलकल लागते

!!

मित्रहो's picture

22 Feb 2016 - 10:28 am | मित्रहो

झाडीपट्टी म्हणजे चंद्रपूर (चिमुूर, सिंदेवाही) , गोंदिया, भंडारा, गडचिरोली(वडसा वगेरे) या भागातली बोली का?
बरेच शब्द ऐकलेले वाटले जसे सब्बल, कुराड(असेच कुऱ्हाड असे नाही), कलकल वगेरे. सब्बलला समानार्थी शब्द पहार आहे हे कित्येक वर्षे माहीत नव्हते. परंतु भलभल, बख्खल हे शब्द नवीन होते.
झाडीपट्टीत गझल ही कल्पना आवडली, गझलही आवडली.

स्वामी संकेतानंद's picture

25 Feb 2016 - 10:52 pm | स्वामी संकेतानंद

हो, हीच ती बोली.
सब्बलला पहार म्हणतात हे मलातर तो शेर लिहेपर्यंत माहीत नव्हते. हा शेर लिहील्यावर शब्दार्थ द्यायचे म्हणून एका मैत्रिणीला सब्बलचे वर्णन करून तिला प्रमाण मराठी शब्द विचारला होता.

तुषार काळभोर's picture

22 Feb 2016 - 10:30 am | तुषार काळभोर

.

पैसा's picture

22 Feb 2016 - 11:21 am | पैसा

झाडी बोलीत असे वेगवेगळे लिखाण फार झाले नसावे. अजून येऊ द्या स्वामीजी! या बोलीची सगळ्यांना नीट ओळख होऊ दे. गझल आवडली!

एस's picture

22 Feb 2016 - 11:58 am | एस

या व अशा इतरही बोलीभाषांमध्ये अजून लेखन होणे आणि ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या प्रकरणी मिपासारख्या आंतरजालीय व्यासपीठाचा उपयोग अजून जास्त प्रमाणात करून घ्यायला हवा.

सस्नेह's picture

22 Feb 2016 - 11:56 am | सस्नेह

झाडी ही बोलीभाषा थोडी अवघड वाटते. तीत कविता रचणे दमदार काम आहे !

पिलीयन रायडर's picture

22 Feb 2016 - 12:11 pm | पिलीयन रायडर

खुप आवडली.. फक्त शेवटच्या ओळीचा अर्थ कुणी सांगेल का?

शहरातून परत आलेला मुलगा आईला त्याला चिमण्याच्या आवाजाशिवाय झोप येत नाही अस सांगतोय बहुतेक. गावातल साध जगणं मिस करतोय असं काही असाव असं मला वाटतोय. जाणकार लोकांनी इकडे टोर्च मारा जरा.

स्वामी संकेतानंद's picture

25 Feb 2016 - 10:54 pm | स्वामी संकेतानंद

बरोबर. शहरातल्या गाड्यांच्या गोंगाटात झोप लागत नाही, त्याला चिमण्यांचा कलरव पाहिजे असतो.गावतलं जगणं मिस करतोय..

रातराणी's picture

22 Feb 2016 - 12:14 pm | रातराणी

पूर्ण नाही समजली पण वाचायला छान वाटली!

बॅटमॅन's picture

22 Feb 2016 - 12:23 pm | बॅटमॅन

असेच म्हणतो.

भारी लिहीलंय स्वामीजी, आणखी लिहा!!

सुंदर लिखाण! बख्खल आधी ऐकला होता पण तो बक्कळ (भरपूर) असा असेल असे वाटले होते. वरचा अर्थ छान आहे!

जव्हेरगंज's picture

22 Feb 2016 - 7:14 pm | जव्हेरगंज

बेस्ट!!

बोका-ए-आझम's picture

22 Feb 2016 - 10:28 pm | बोका-ए-आझम

आहे स्वामीजी. पण तो नक्षलवादाचा संदर्भ समजला नाही.

होबासराव's picture

22 Feb 2016 - 10:31 pm | होबासराव

जंगल अना जरा नक्सलवादाची आली खबर
बाहेरच्याइले झाडीपट्टी चंबल लागते

जंगल आणि नक्षल्यांचि बातमि वाचुन उर्वरित महराष्ट्राला पुर्ण विदर्भ नक्षलग्रस्त वाटतो.
मला हि पुष्कळ लोकांनि हा प्रश्न केलाय 'काय मग अकोल्यात नक्षलवादि असतात काय ?'
अरे अकोला कुठे गडचिरोलि कुठे ?

बोका-ए-आझम's picture

22 Feb 2016 - 10:47 pm | बोका-ए-आझम

अशा लोकांना अगदी कोपरापासून!

सतिश गावडे's picture

22 Feb 2016 - 10:49 pm | सतिश गावडे

कविता पुर्णपणे कळली असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. मात्र जो काही अर्थ लागला त्यावरून आवडली.

फारशी समजली नाही.