~X( ( ६४ कलेत पारंगत )
अविनाश साहेबांनी दिलेल्या पारंपारिक ६४ कलांची माहिती मिळाली.
आणि आधुनिक कला काय असाव्यात याबाबत विचार केला. कृ. ह. घ्या.
आपल्याला काही यात बदल वाटल्यास अवश्य सुचवा .
१ लिटिल असतानाच चॅम्पस होण्याची कला (गायन कला ) =D>
२ गाड्यांचे हॉर्न वाजवण्याची कला (वाद्य वाजवण्याची कला,)
३ मिरवणूकीत / वरातीत अंगविक्षेप करण्याची कला ( नृत्यकला )
४ महागुरुंना प्रसन्न करुन घेण्याची कला ( गात, वाद्य वाजवत नृत्य करण्याची कला ) ~X(
५ ब्लॉगिंग/ हुसेन स्टाईल कला ( लेखन व चित्रकला )
६ गझनी स्टाईल कला (गोंदण कला [ टॅटु काढण्याची कला ] )
७ सर्व कामांसाठी कॉन्ट्रॅक्ट देण्याची कला (बिछाने,घालणे, फुलानि सजवणे, व फुलांच्या रांगोळ्या चि कला )
८ रानडे रोड/ तुळशीबाग्/फॅशन स्ट्रीटवर जाण्याची कला (दांत, कपडे,शरीर, नखें रंगवण्याची कला )
९ वास्तुशास्त्राच्या नावने विनाकरण घराची डागडुजी करण्याची कला (भिंतित, व घरातल्या जमीनी वर रंगीत आरसे, काचा फिक्स करण्याची कला )
१० जर्बेरा पुष्प लावण्यासाठी प्लॉवर पॉट निवडण्याची कला (पुष्प रचना करण्याची कला )
११ गालिचा, दिवाणखान्याचे चित्र वॉलपेपर म्हणून सिलेक्ट करण्याची कला . (गालिचे दिवाणखान्यात पसरणे, साफ करणे, इ कला )
१२ मोबाईल रिंग टोन सेट करण्याची कला (जलतरंग वाजवण्याची कला )
१३ वेगवेगळे फिल्टर / फ्रिज घरी आणण्याची कला (पाणी भरुन, त्याचे साठवण , व वापर करण्याची कला )
१४ गृह सजावटीसाठी घरात थांबण्याची कला (चित्रे काढुन, गृह सजावट करणे.) :)
१५ अवांतर प्रतिसाद देऊन प्रतिसाद वाढवण्याची कला (दो~यात फुले ओवुन, पुष्प माला, गजरे, माळा तयार करण्याची कला )
१६ नालायक पुरुषांना फाट्यावर मारण्याची कला (पुरुषांच्या फेट्यावर, फुलांची सजावट, व तुरे करण्याची कला) =P~
१७ आय पॉड ची वायर कानात बरोबर अडकवण्याची कला (कर्ण दागीनें [फुले] करण्याची कला )
१८ पदोपदी आपली भुमिका बदलण्याची कला (नाटकात, एखादे पात्र सादर करण्याची कला)
१९ प्रदुषणापासून वाचण्यासाठी मास्क वापरण्याची कला (अत्तरे, सुगंध तयार करण्याची कला )
२० वस्त्र नेसून फॅशन शो मध्ये भाग घेण्याची कला (वस्त्र प्रावरणे, घातल्यावर, त्यावर योग्य दागिने, घालुन नटवण्याची कला.)
२१ आयते मिळवण्याची कला (जादु करण्याची कला )
२२ ह्स्तालोंदन करुन स्वागत करण्याची कला / हात धुण्याची कला (हस्त लाघव )
२३ दर आठवड्याला नवीन हॉटेलात जाण्याची कला (सॅलद,कोशिंबिरी,चपात्या, अन्न बनवण्याची कला ) :|
२४ सासू सून मालिका चालू असताना ध्यानस्त रहाण्याची कला ( ---- )
२५ कॉक्टेल ट्राय करण्याची कला (पेय, सरबत ई..बनवण्याची कला )
२६ भरत जाधवचे चित्रपट सहन करण्याची कला (विणकाम, भरत काम... ) =D>
२७ सुत्र क्रिडा
२८ विणा पाटील यांच्या केसरी टुर्स च्या जहिरातीपासून वचण्याची कला (विणा डमरु वाजवण्याची कला२९ कोडे,[पहेली] घालुन सोडवण्याची कला)
३० कॉपी पेस्ट मारण्याची कला (पाठांतर कला )
३१ ग्रंथालया सारख्या ऐतिहासिक वास्तुला महिन्यातून एकदा भेट देण्याची कला (पुस्तक वाचण्याची कला )
३२ गृह संस्थेचा सभासद होण्याची कला (लहान नाटुकल्यात काम करण्याची कला)
३३ मला माहित नाही हे न समजुन द्यायची कला (काव्य समास, आणि विग्रह कला )
३४ रस्त्यावरच्या लाकडी वस्तूंनी घर सजवण्याची कला (वेत/बाम्बु पासुन बाण, ढाल ईत्यादि करण्याची कला )
३५ नेटवर्क मार्कॅटिंग पासून दूर रहाण्याची कला ( पिंजण कला )
३६ सुसाट गाडी चालवण्याची कला ( सुतार कला )
३७ फेंगशुई ( वास्तु विद्या )
३८ गेट, सेट , सिईटी इ. परीक्षा (रुप/रत्न परीक्षा..ची कला)
३९ चाटु विद्या ( धातु विद्या )
४० दागिने घेण्याची कला (दागिने रंगवण्याची कला )
४१ जीम जॉइन करण्याबद्दल विचार (आकार ज्ञान )
४२ प्रोटीन पावडर, हॉर्लिक्स , शक्तीवर्धक गोळ्या ज्ञान (जडि बुटी औषध विज्ञान )
४३ गल्लीतल्या कुत्र्यांशी रात्री ९ नंतर मुकाबला करायची कला ( कोंबड्या,बकरी,पक्षी यांच्या शी फाईट करण्याची कला ) B)
४४ ब्रेकिंग न्यूज दुर्लक्षीत करण्याची कला (पोपट व मैनेचे संभाषण जाणुन घेण्याची कला)
४५ रामदेव बाबांची आसने आचरणात आणण्याची कला (पुष्पौषधी नी हिलिंग करण्याची कला )
४६ ब्युटी पार्लर शोध कला (केश रचना कला )
४७ मोबाईलवर कॉन्फरन्स आणि इंतरनेटवर चॅटिंग करण्याची कला (अक्षर आणि मुद्रानि संभाषण करण्याची कला) :)]
४८ लोड शेडिंग मधे टि.व्ही शिवाय बसण्याची कला ( -------- )
४९ मराठी भाषा शुध्द लेखनासहीत शिकण्याची कला (देश भाषा ज्ञान)
५० फुलां पासुन खेळणी बनवण्याच ज्ञान
५१ पत्र लिहिण्याची कला ( यंत्र ज्ञान )
५२ वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्याची कला (शुभेछ्या देण्याचे ज्ञान)
५३ लोकलची ३-४ थी सिट मिळाल्यावर करावयाचे संभाषण ( संभाषण कला )
५४ बर्याच गोष्टी मनोमनीच करण्याची कला (मनातल्या मनांत काव्य करण्याची कला ) :))
५५ कौल लावण्याची कला (क्रिया विकल्प ज्ञान )
५६ अलिबागला जाऊन पर्यटनाची हौस भागवण्याची कला (चलितका योग)
५७ माहिती मिळण्यासाठी गुगलून काढण्याची कला (अभिदन कोश विद्या )
५८ वस्त्र घालण्याची कला (वस्त्राने झाकुन [कव्हर] ठेवण्याची कला) 8|
५९ शेअर मार्केट ज्ञान ( द्युत क्रिडा ज्ञान )
६० लॅटो/ लॉटरी खेळावयाचे ज्ञान (फसे टाकुन सोंगट्या खेळावयाचे ज्ञान )
६१ लहान मुलांकडून कॉम्प्युटर / मोबाईल गेम शिकण्याची कला (लहान मुलांच्या खेळण्या विषयीचे ज्ञान )
६२ पुण्यात वाहन चालवण्याची कला (विनायकि विद्या..शिस्त लावण्याची कला )
६३ मीच शहाणा/शहाणी हे सांगण्याची कला (जिंकण्याची कला ) =D>
६४ सततच्या आरडओरड करुन नवर्याला काबुत ठेवण्याची कला (मधुर संगीताने आपल्या मालकाला जागे करण्याची कला ) O:)
प्रतिक्रिया
8 Jan 2009 - 2:45 pm | मैत्र
ह. ह. पु. वा. =))
8 Jan 2009 - 3:32 pm | अविनाशकुलकर्णी
अरे झकास मित्रा..लई भन्नाट ...पटल आपल्याला..
अविनाश...
कले पासुन फारकत घ्यायच्या विचारात असलेला
8 Jan 2009 - 4:37 pm | मनस्वी
शाब्बास अमोल.
8 Jan 2009 - 6:07 pm | अमोल केळकर
मैत्र , अविनाश , मनस्वी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.
कला नं २७ ला कोण पर्याय सुचवू शकेल का ?
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
8 Jan 2009 - 6:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कला नं २७ ला कोण पर्याय सुचवू शकेल का ?
रस्सीखेच? (गॉसिप, भांडणं, चहाड्या?)
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
8 Jan 2009 - 7:21 pm | अमोल केळकर
सहमत
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
8 Jan 2009 - 6:17 pm | मनस्वी
असंभव मधी मागील जन्मातील व्यक्ती आणि चालू जन्मातील व्यक्ती या असंभव जोड्या जुळवायची कला.
'टारझन पाककृती' बनविण्याची कला (२० किलो भेळ, १० किलो बोंबील इ.)
8 Jan 2009 - 6:19 pm | हेरंब
लिटिल असतानाच चॅम्पस होण्याची कला (गायन कला ) -यावरुन सुचले
जजच्या भूमिकेत राहूनही माकडचेष्टा करण्याची कला(विकला)
बेसूर सुरांना फिल्टर करुन फक्त सुरेल गाणे ऐकून अवाजवी स्तुती करण्याची कला
भरत जाधवचे चित्रपट सहन करण्याची कला
विनोद म्हणजेच अंगविक्षेप, माकडचेष्टा, ज्यादाअभिनय असे समजण्याची कला
घराबाहेर, सोय नसलेल्या ठिकाणी, कुठल्याही तर्हेचे (शरीर)वेग आवरुन धरण्याची कला
8 Jan 2009 - 8:17 pm | संदीप चित्रे
अमोल,
आधुनिक कला भन्नाट ... जियो :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
10 Jan 2009 - 12:16 am | विसोबा खेचर
बर्याच गोष्टी मनोमनीच करण्याची कला
हा हा हा! ही कला मला अवगत आहे. आजच संध्याकाळी मी माझी जुनी प्रेयसी डिंपल कपाडिया हिच्या सोबत जुहू चैपाटीवर मावळतीचे रंग पाहात बसलो होतो. अर्थात, मनोमन..! :)
पण तरीही जाम मजा आली! :)
तात्या कपाडिया.
10 Jan 2009 - 1:53 am | शंकरराव
अर्थात, मनोमन..! :-)
तत्यानु , म्हणूनच हा सल्ला दिला ना ?? सर्व मिपाकरांना मनतल्या मनात परंगत करायचे आहे काय?
समोरचा काही केल्या ऐकत नसेल तर त्याला प्रत्त्युत्तर देऊ नका. मोठ्या मनाने, "बरं बाबा, तू जिंकलास, तुझंच काय ते बरोबर, तुझीच काय ती लाल..!" असं मनातल्या मनात म्हणा आणि सोडून द्या रे!
मनोमन बरं का... मनो*त नव्हे ... कारण डिंपल नाही हो तिकडे.. ;-)
प्रेषक ३_१४ व्यस्त अदिती :- आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
आम्ही नवीन वर्षाची दारू पिण्यासाठी , दिवाळीची नवीन कपडे खरेदी करण्यासाठी , चतुर्थीची मोदकांसाठी , आणि वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी वाट नाही बघत
10 Jan 2009 - 2:35 pm | १.५ शहाणा
१४ विद्या कोणत्या कोणास माहीत आहे का?
10 Jan 2009 - 2:36 pm | १.५ शहाणा
विद्या बालन न्हवे