माझी भटकंती - प्रबळगड व कलावंतिणी दुर्ग ट्रेक

sagarshinde's picture
sagarshinde in भटकंती
17 Feb 2016 - 4:01 pm

प्रबळगड व कलावंतिणी दुर्ग ट्रेक
kalavantini durg
वसईच्या किल्याच्या स्वारीवरून परत आल्यावर मी प्रबळगड कलावंतिणी दुर्ग एक रात्र एक दिवस या ट्रेक च आयोजन केल आणि तशी पोष्ट मी माझ्या ब्लॉग वर टाकली आणि तशी तय्यारी हि चालू केली. काही चौकशी साठी फोन हि आले. माझा ट्रेक हा १३ – १४ फेब्रुवारी ला होता त्यात १४ तारखेला व्हलेन्तिएन डे असल्यामुळे त्याचा हि परिणाम म ट्रेक वर झाला. शेवटी ७ लोक फिक्स झाले. ठरल्यादिवसा प्रमाणे आम्ही सगळे जन हे पनवेल स्टेशन वर भेटलो. मी, राजन, बलराम आणि कुमारी हे त्याच्या आई सोबत आले होते, संकेत अन मयुरी आणि ओंकार असे आम्ही ८ जन हे पनवेल बस स्थानकाकडे गेलो आम्हाल पनवेल मधून ५:३०(संध्याकाळी) ठाकूरवाडी (गडाच्या पायथ्याचे गाव) साठी सुटणारी बस पकडायची होती. ५:३० च्या ६ वाजल्या तरी बस चा पत्ता नव्हता चौकशी केल्या नंतर अस समझल कि बस रद्द झाली आणि त्यामुळे मला खाजगी गाडी करावी लागली. साधारण ६:१५ ला आम्ही तिथून ठाकूरवाडी साठी निघालो. आम्हाला पायथ्याच्या गावात पोहचायला ७:०० वाजले. उतरल्यानंतर आम्ही लगेच चालायला चालू केल अंधार पडायला लागला होता.
राजन (एक कट्टर शिवसैनिक आणि हाडाचा ट्रेकर) यांनी बरोबर आनालेली torch बाहेर काढली, त्यामुळे अंधारात वाट काढायला आम्हाला आधार मिळाला. संकेत अन मयुरी (गोड अन उत्साही जोडप, valentine day ला काहीतरी extreme करण्यासाठी आलेलं जोडप) याचा हा पहिलाच ट्रेक होता त्यामुळे ते अगदी हळूहळू चालत होते पण तरीही त्याच्या चालण्यात उत्साह होता. इकडे चालताना बलराम अन कुमारी (छोटे पण उत्साही ट्रेकर) आम्हाला अवकाश दर्शनाचे धडे देत होते. हळूहळू आम्ही प्रबळमाची वर पोहचलो गडावर चढायला आम्हाला दीड तास लागला.
दीड तासाची चढण तशी जास्त बेताची नव्हती मात्र संकेत अन मयुरी याचा पहिलाच ट्रेक असल्या मुले त्याचा पूर्ण दमछाक झाला होता आणि हा त्याच्या चेहऱ्यावर दिसतही होता. प्रबळ माची हे साधारणपणे १५-२० घरे असलेले छोटेसे गाव आहे. प्रबळ माचीवर राहण्याची मस्त सोय आहे हॉटेल हि उपलब्ध आहेत. आम्ही तिथेच आमच्या सगळ्यांसाठी रूम घेतली होती. गावातच हॉटेल असल्याने जेवणाची सोय होते. तरी सुद्धा शक्यतो जेवणाचे डबे बरोबर घेतले होते. वरती पोहचल्यावर थोडा आराम केला थोड फ्रेश झाल्यावर बरोबर आणलेलं जेवणाचे डबे बाहेर काढाले आणि पोटभर जेवण केल. नंतर रूम च्या किल्ल्या बरोबर घेवून आम्ही झोपण्याच्या तय्यारी ला लागलो. दुसल्या दिवशी आम्हाला सकाळी कलावंतिणी दुर्ग ला जायचं होत. थोडा वेळ गप्पा झाल्यावर आम्ही झोपी गेलो.
सकाळी ओंकार ने मला ५:५० ला उठवलं. नंतर आम्ही सगळी आवरा आवरा अन कलावंतिणी दुर्ग कडे गावातून वाट काडत चालायला सुरवात केली. सकाळी माचीवर थंडीही खूप जाणवत होती. कालच्या दीड तासाच्या पायपितीने मयुरीला मात्र चलताना खूप त्रास होत होता. पण तरीही ती मोठ्या जिद्दीने संकेत च्या हातात हात देवून चालत होती. कलावंतिणी दुर्ग च्या पायऱ्या जीथापासून चालू होतात त्या च ठिकाणीउजव्या वाजूला दगडात कोरलेली बोगदा गुंफा आहे. त्या गुंफेच्या आता मी राजन बलरामची आई बलराम आम्ही आत गेलो २५ फुट आत गेलो, गुंफेची उची २:५० फुट आहे आमी आत अंदाजे ५ बाय १० मापाची ३ फुट उंच रूम आहे. त्या गुंफेत थोडे फोटो कडून आम्ही बाहेर पडलो. अन दुर्ग चढायला चालू केला. कलावंतिणी दुर्गच्या पायर्याची रचना अतिशय सुंदर अन वैशिष्टपूर्ण आहेत. कलावंतीण दुर्गाच्या भक्कम आणि उंच पायऱ्या चढून आम्ही वर चढायला चालू केल्या. अर्ध्या तासात आम्ही वरती पोहचलो. वरती सुळक्यावरून चारहि बाजूला दुरवर पाहिल्यास मलंगगड, पेब, वानरलिंगी, नवरा नवरी, माहुलीचा किल्ला तसेच जवळच माथेरानचे पठार दिसते. कलावंतिणी वरती आम्ही आमचे ग्रुप फोटो काढले. कलावंतिणीचे exploration झाल्यावर लगेचच आम्ही खाली उतरायला सुरवात केली, सकाळचे १० वाजले होते आणि सूर्यही आता हळूहळू वरती सरकायला लागता होता तास उन हि तापले होते. परत प्रबळ गड माची वर येऊन आम्हाला नाश्तापाणी करून पुन्हा आम्हाला प्रबळ गडावर चढाई करायची होती. मयुरीची हलत थोडी खराब होती पण कलावंतिणी सुळका उतारल्या नंतर ती जाता खुश दिसत होती पण पुन्हा प्रबळगड चाडण्याची मात्र तिच्या पायात ताकद उरली नव्हती. तो सुळका उतरायला आम्हाला साधारण अर्धा तास लागला सुळक्याच्या पायथ्याशी निम्बुपाण्याची छोटीशी पार्टी केली व माचीवरील बाळूच्या हॉटेलमध्ये नाश्तापाणी करायला गेलो नाश्तापाणी झाल्यावर आम्ही प्रबळगडावर जायला निघालो. मायुरीला व्यवस्थित चालता नसल्यामुळे तिने संकेत ने माचीवरच आराम करण्याचा निर्णय घेतला. मग मी अन बाकीचे पाच जन हे गडावर जायला निघालो.
प्रबळगड हा त्याच्या नावाप्रमाणेच प्रबळ आणि भक्कम असा दुर्ग आहे. प्रबळगडाची सरासरी उंची ७०० मीटर आहे. कलावंतीण दुर्गा पेक्षा हि उंच, भक्कम आणि मोठा हा किल्ला आहे. किल्ला सर करताना आम्ही फोटो काढत, थांबत, बसत एकमेकांना प्रोत्साहन देत आम्ही वरती पोहोचलो, गडावरती वरती घनदाट जंगल आहे वारुळे देखील आहेत, कधीकधी वाटेत काही वन्य जीव दिसतात त्यामुळे चालताना सावधपाने चालणे हिताचे, पावसाळ्यात या गडावर सरपटणारे प्राणी खूप आढळतात. माथ्यावरती पोहचल्यावर आम्हाला ४ लोकांची एक टीम भेटली त्यांना गडावरती असणात्या अवशेशांबद्दल जास्त माहिती नव्हती बहुदा. त्यांनी आम्हाला “इथे पाण्याचे दोन टाके आहेत हे कोणत्या बाजूला आहेत” अस विचारलं हा गड मी आतापर्यंत ६ वेळा केला असल्यामुळे आम्ही सगळेच त्याच्याबरोबर त्यांना रस्ता दाखवत गेलो त्यामुळे आमचहि गडदर्शन झाल अन त्यांनाही गडदर्शन करता आलं. पाण्याचे पाण्याची टाके पाहून झाल्यावर आम्ही थोड पुढे गेलो तिकडे आम्हाला गडाच्या इमारतीचे थोडेफार अवशेष पाहायला मिळाले अन दगडात कोरलेल्या पायऱ्याही पाहायला मिळाल्या. तिथूनच एका पाण्याच्या सुकलेल्या झऱ्याची वाट पकडून आम्ही उलट्या दिशेने माघारी फिरलो. तो झरा हा गणेशाच्या मंदिराकडे जातो. मंदिरा जवळ पोहचल्यावर मनोभावे गणेशाचे दर्शन घेताले व आम्ही किल्ल्याच्या एका टोकाला आलो तिथे प्रबळगडाच्या बुरुजाचे दर्शन होते. तिकडे जाताना वाटेत काही वड्याचे अवशेषही पाहायला मिळाले. प्रबळगडाच्या टोकावरून सुंदर असा कलावंतीण गडाचा सुळका दिसला, आणि तो बघून आम्ही तिघेही धन्य जाहलो. कलावंतिणी दुर्ग खुपच मोहक वाटत होता, त्यावरील पायऱ्या खुपच रेखीव दिसत होत्या. प्रबळगडावर अनेक बुरुज आहेत. तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारखी ठिकाणी आहेत, काळ्याभूरुजावर एक मोठा चुन्याचा ढीग आहे. हा चुन्याचा ढीग भूरुज बांधण्यासाठी पूर्वी वापर करण्यात आला असेल असे वाटते. गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट जंगल असल्याने हे सगळे बघणे वाटाड्याची गरज भासते. कलावंतिणी दर्शन झाल्यावर आम्ही माघारी फिरलो, दुपारचे तीन वाजायला आले होते. त्यातच सपाटून भूक लागली होती. थोडा वेळ आम्ही सर्वानी विसावा घेऊन ३:१५ वाजता गड उतरण्यास सुरवात केली. माचीवर आम्ही ४ वाजता पोहचलो. खाली उतरल्यावर आम्ही पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना शांत केलं मायुरी अन संकेत चा जेवण अगोदरच झाल होत. आम्हीही आमचे जेवण पटकन उरकले अन ४:४५ वाजता खाली उतरायला सुरवात केले.
आम्ही ठाकूरवाडी गावत ६ वाजता पोहचलो. मी अगोदरच फोन करून गाडी बोलावली होती पण गाडीला यायला उशीर झाला. आम्हाला पनवेल वरून ६:३० ला सुटणारी डहाणू लोकल पकडायची होती. आम्ही गाडी आल्यावर लगेच तिथून निघालो. ६:४० ला आम्ही पनवेल ला पोहचलो. डहाणू गाडी थोडी उशिरा होती त्यामुळे आम्हाला ती मिळाली आणि आम्ही सुखरूप घरी पोहचलो. प्रबळगड व कलावंतिणी हे सलग दोन्ही चढण्यास व उतरण्यास तीन ते साडे तीन तास लागतात. तसेच सोबत वाटाडया किंवा सोबती हवेतच, कारण प्रबळगडावर गहन जंगल आहे. वाट चुकण्याची शक्यता आहे. तसेच जंगलात, तरस, रानडुक्कर व इतर जनावरांचा मुक्त संचार आहे. या गडाचा जास्त काही इतिहास पाहण्यास मिळत नाही.

कलावंतीण दुर्ग इतिहास.
हा दुर्ग मुंबई पुणे हायवेवरुन सहजपणे दिसतो. कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्यावर महाल बांधला होता. हा दुर्ग प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढ़ण्याकरिता खडक कापून पाय-या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नुर्त्य करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.

प्रबळगड इतिहास..
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले. मुरंजन.बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.

ट्रेक चे फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आणखी फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

प्रतिक्रिया

वर्णन आणि ट्रेक आवडला.फोटो मात्र gmail login करूनही उमटले नाहीत. गुगल प्लस चालू करायला हवे का?

login करण्याची गरज नाही काका. असेच दिसताहेत सर्व फोटो

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Feb 2016 - 6:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

सागर, ट्रेकचे वर्णन मस्त केले आहे. फोटो नसल्यामुळे जरा निराशा झाली.

एक मात्र खटकले..तुम्ही मिपाचा वापर तुमच्या पुढील ट्रेकची जाहिरात करण्यासाठी करताय..अर्थात सं.म बघतील काय ते.पण एक मित्र म्हणुन सांगितले.

sagarshinde's picture

18 Feb 2016 - 10:26 am | sagarshinde

असे असेल तर मी तो मुद्दा कडून टाकतो

छान वर्णन छायाचित्र क्रमांक १,४,५,२२, भारीच ! आहे ...

ब्राउजर बदलून पाहिले फोटो.चांगलेत.गडाचे फोटो त्याच गडावर गेल्यावर मिळत घेता येत नाहीत,जवळ दुसय्रा गडावरून काढावे लागतात.तिथले रान भारी दाट आहे.
.(पण गुगल-फोटोची त्यतली लिंक इमेज टॅगमध्ये चालत नाहीये.शेअर लिंक दुसरी असावी)

कलावंतिणी दुर्ग व प्रबळगड फोटो या लिंक वरती पहा.

वरती दिलेल्या लिंक वरती sing in करायची गरज नाही

जगप्रवासी's picture

18 Feb 2016 - 11:40 am | जगप्रवासी

छान लेख

अमोघ शिंगोर्णीकर's picture

18 Feb 2016 - 11:34 pm | अमोघ शिंगोर्णीकर

छान फोटोज...
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... मी एकट्याने केलेला हा दुर्ग. रात्रीचा मुक्काम एकट्याने कलावंतीण दुर्गावर करायचा या बेतानेच गेलेलो. रात्री एकटाने वर जागून (एंजॉय) केलेली रात्र, स्टार ट्रेल्स चे फोटोज आणि कलावंतीण दुर्गावर फिरणार्‍या ग्रहमंडलाचा टाईमलॅप्स........ अह्हाहा..... मित्रा... हे असं सगळं आठवलं.

धन्स त्यासाठी....

कंजूस's picture

19 Feb 2016 - 4:53 am | कंजूस

अमोघ , "स्टार ट्रेल्स चे फोटोज आणि कलावंतीण दुर्गावर फिरणार्या ग्रहमंडलाचा टाईमलॅप्स"- फोटो असले तर एखादा इथेच द्या.

योगेश आलेकरी's picture

29 Mar 2016 - 7:25 pm | योगेश आलेकरी

सागर राग मानु नको पन तु लिह्लेलि महिति जरा चुकीची वाटतेय
दाखवलेला बुरुज हा काळा बुरुज नाहीये
आणि कलावंती हा दुर्ग नाहीये तो प्रबळ गडाचा एक भाग आहे
कुठूनही माहुली व वानरलिंगी दिसत नाही
जे दिसते ते तू नाही लिहलस.
मित्र आपले लिखाण वाचून लोक जात असतात
इतिहासाची मोडतोड झालेलीच आहे कृपया भूगोलाची नको