कट्टा औरंगाबाद

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
16 Feb 2016 - 1:30 pm
गाभा: 

२२ तारखेला औरंगाबाद मध्ये आहे .... संध्याकाळी साधारण ४-७ वेळ मोकळा आहे ...एखादा छोटा कट्टा होऊ शकेल किंवा कसे ?

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 Feb 2016 - 1:54 pm | प्रचेतस

२ दिवसांचा मुक्कामी कट्टा करण्यास आवडेल.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2016 - 9:00 am | मुक्त विहारि

संभाजीनगरला तुम्ही जाणार ते फक्त दर्पण सुंदरींना बघायला.

प्रचेतस's picture

17 Feb 2016 - 9:47 am | प्रचेतस

नाय ओ. तिथे फ़क्त एकच दर्पणा आहे. आमची आहे ती भुलेश्वरला.

बाकी आम्ही संभाजीनगर न म्हणता कटकी (खडकी) म्हणतो. :)

अत्रन्गि पाउस's picture

16 Feb 2016 - 11:58 pm | अत्रन्गि पाउस

आणि एकच प्रतिसाद ??

असो

आधी तिथले एक सर आमचे मित्र होते. आवडले असते यायला.
सध्या ते आमचे मित्र नाहीत तस्मात औरंगाबादेत काही नाही. करा तुमचे तुम्ही. शुभेच्छा. ;)

नाखु's picture

17 Feb 2016 - 9:03 am | नाखु

तिथले एक सर आमचे मित्र आहेतच आणि तुम्हीही आहात त्या न्यायाने ते तुमचे मित्र आहेतच (मित्राचा मित्र).

तेव्हा सोलापुर आणि औरंगाबाद भेट चिंचवडला व्हावी ही तर श्रींची इच्छा !!

सर आल्यास धन्या+वल्ली+प्रगो भेट हा बोनसही मिळेल ते वेगळेच.

दोघांनाही स्वतंत्र भेटलेला नाखु

बाबा योगिराज's picture

17 Feb 2016 - 12:35 am | बाबा योगिराज

या भेटता येईल.

समीर शिन्दे's picture

17 Feb 2016 - 1:21 am | समीर शिन्दे

औरंगाबादला खूप काही आहे पाहण्यासारख. मी औरंगाबादलाच राहतो कधी येता सांगा ?

संभाजी नगराला माझीही धावती भेट होणार आहे, २०-२१ ला संभाजी नगरात आहे, कितपत वेळ मिळेल ते आत्ता सांगता येत नाही,पण वेळ मिळालाच तिथल्या मिपाकर मंडळींना भेटण्याची इच्छा नक्कीच आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2016 - 7:34 am | अत्रन्गि पाउस

२२ फेब्रुवारी संध्याकाळी सुमारे ४-७ मध्ये काही वेळ म्हणतोय ...रात्री ९३० ची परतीची गाडी पकडायची आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2016 - 8:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वागत. मी जर त्या दिवशी औरंगाबादेत असलो तर आणि माझा जर मुड असेल तर खालील गोष्टी होऊ शकतात.

१) मी तुम्हाला भेटेन, मला मिपाकरान्ना भेटायला आवडतं औरंगाबादेत आणखी कोणीही मिपाकर नाही. आणि गप्पा मारेन. ( तुम्ही गप्पीष्ट असलं पाहिजे, उगं तुम्ही शांत, गंभीर, वैचारिक, कसं होईल देशाचं या वाहतुकीचे नियम, इत्यादी विषयावर बोलणार असाल तर मला बोर होतं)
२) मी तुम्हाला बीबी का मकबरा, पानचक्की माझ्या गाडीत फिरवून दाखवू शकतो.
३) मी तुम्हाला 'थाळी' प्रकारातलं उत्तम जेवण देईन. मटन, मच्छी, मला चालत नाही.
४) औरंगाबादेत तुम्ही काही खरेदी करनार असाल तर तुम्ही एकट्याने खरेदी करावी.
५) बरोबर सात वाजता मी तुम्हाला स्टेशनवर सोडेन. उड्डान पुलांची वर्षानुवर्ष कामं चालु असल्यामुळे ट्राफिक वाढलेली आहे, ड्रायव्हिंगला कन्टाळा येतो.

सध्या इतकंच. आंघोळीला जायचं आहे, अजुन काही सुच्ल्यास इथे लिहिनचं. वरील नियम अटी मान्य असल्यास प्रतिसादाखाली 'हो' असं लिहावं. नसल्यास तसं स्पष्ट लिहावं. प्रतिसादाखाली हो असं लिहिल्यास व्य नि ने फोन नंबर पाठविण्यात येईल त्या नंबरचा वापर फक्त एकदाच आणि कट्ट्यापुरताच करायचा. धन्यवाद;)

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

17 Feb 2016 - 8:47 am | मुक्त विहारि

यदा कदाचित संभाजीनगरला येणे झालेच तर....

१. मी तुम्हाला भेटेन, मला मिपाकरान्ना भेटायला आवडतं औरंगाबादेत आणखी कोणीही मिपाकर नाही. आणि गप्पा मारेन. ( तुम्ही गप्पीष्ट असलं पाहिजे, उगं तुम्ही शांत, गंभीर, वैचारिक, कसं होईल देशाचं या वाहतुकीचे नियम, इत्यादी विषयावर बोलणार असाल तर मला बोर होतं)

आणि

२. व्य नि ने फोन नंबर पाठविण्यात येईल त्या नंबरचा वापर फक्त एकदाच आणि कट्ट्यापुरताच करायचा.

हे २ मुद्दे ध्यानात घेतलेले आहेत.

अर्थात आम्ही येणार ते फक्त, वेरूळची लेणी बघायला (आणि त्या वेळी तुम्ही असालच, असे वाटते.वल्लीं बरोबर लेणी बघायचा चानस कोण सोडेल?) तुम्हाला भेटणे हा बोनस.

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 10:25 am | सतिश गावडे

सर, आम्ही तुम्हाला डीसेंबर १२, १३ आणि १४ असे सलग तीन वर्ष औरंगाबादला भेटलोय.

तर प्रश्न असा आहे की या पाच निकषांपैकी कोणते निकष आम्ही पाळले आणि कोणते नाही हे सांगू शकाल का? जर काही निकषांमध्ये आम्ही बसत नसू तर आम्हाला कोणत्या गोष्टीत सुधारणा करायला हवी ते कळेल आणि तशी सुधारणा आम्ही करूही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2016 - 11:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण भेटलो होतो, मला तर काहीच आठवत नाही.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2016 - 1:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

हो ना, फक्त डिसेंबर लिहिले आहे, त्याचा इसवीसन(पूर्व) लिहिला नाही. अशी अर्धवट माहिती फाऊल धरली तर दोष नाही ;) :)

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2016 - 11:28 am | अत्रन्गि पाउस

खालील अटी माझ्या कडून सुद्धा
व्य नि ने फोन नंबर पाठविण्यात येईल त्या नंबरचा वापर फक्त एकदाच आणि कट्ट्यापुरताच करायचा.

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 10:22 am | सतिश गावडे

आमचे एक मित्र आहेत चिंचवडचे. निवासी कट्टा केलात आणि कार्यक्रमामध्ये वेरूळ-दर्शन ठेवलंत तर ते धावत येतील.

संभाजीनगरात चांगली अत्तरे मिळतात काय ? मिळत असल्यास कुठे ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 11:59 am | पिलीयन रायडर

मला वाटतं गुलमंडीत मिळतात. तिथे एक गल्लीच आहे अत्तरांची.. (पण माझे ज्ञान यथातथाच आहे..!)

पाणीपुरी आवडते मला फार औ.बादची.. क्रांती चौकात एक पापुवाला आहे, त्याची आवडते. बाकी खुप ठिकाणी मिळते. काहींना गुलमंडीतलीही आवडते. किंवा कॅनॉट प्लेसची.

क्रांती चौकात गायत्रीचे दुकान आहे, तिथे पावभाजीचेही एक हॉटेल आहे. तिथे जा.. आणि त्या हॉटेलात नाही, त्याच्या समोरच्या खोपचीत गाड्यावर पाभा मिळते, ती खा. मला तर खुपच आवडली.

औ.बाद मध्ये शाली सुद्धा सुंदरच मिळतात. त्याचे चांगले दुकान मला आत्ता आठवत नाही. माहिती काढुन सांगु शकेन.

क्रांती चौकातच गार्डन वरेलीचे ही दुकान आहे. चांगले ड्रेस मटेरियल मिळते.

बीड बायपास साईडच्या धाब्यांची सुद्धा माहिती देता येईल.. हवी असल्यास.

बघायला... बीबी का मकबरा, लेण्या, पाणचक्की वगैरे आहेच. प्रोझोन मॉल वगैरे पण आहे.

एकंदरित औरंगाबाद हे एक चांगले शहर आहे. फक्त माझे सासर असल्याने..... ;)

धन्यवाद पिरा मोलाची माहिती दिल्या बद्धल ! :)

@ प्रॉ.डॉ... अहो तुम्ही सुद्धा काही तरी सांगा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 12:12 pm | पिलीयन रायडर

जरा वेळ असेल तर बीबी का मकबरा वगैरे पेक्षाही मी म्हणेन की देवगिरी किल्ला, अजिंठा - वेरुळ पहा. मला ते जास्त आवडतं.

बहुदा शनिवारी असणार आहात तिथे रात्री, तर जमल्यास भद्रा मारुतीला जाऊ शकता. लोक रात्री चालत जातात वर.

मी जर एवढी माहिती देऊ शकते तर प्राडॉ तुम्हाला पार गल्ली बोळातले पत्ते देऊ शकतील!

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 12:17 pm | पिलीयन रायडर

आणि हो.. औ.बादहुन पुण्याला परत येणार असाल तर पांढरी पुलाला भेळ खायला थांबा नक्की.. सरहदवाडीसुद्धा चांगला पर्याय आहे, पण मला पांढरीपुल जास्त आवडतो. एस.टीने येणार असाल तर गाडी लिलीयम पार्क (किंवा गांगासागर किंवा वडाळ्याचा फुडमॉल) नावाच्या भिकार हॉटलला थांबेल. नावावर जाऊ नकात. फार बेक्कार हॉटेल आहे.

नगरला "जलाराम बेकरी" नावाची बेकरी ऑन द वे आहे. तिथे तोंडात टाकताच विरघळेल अशी खारी.. आणि टाळुला चिटकुन रसभंग करणार नाही अशा क्रिमचा क्रिमरोल मिळतो.

औ.बादहुन पुण्याला परत येणार असाल तर पांढरी पुलाला भेळ खायला थांबा नक्की..
संभाजीनगरातुन जालन्याकडे प्रस्थान करणार आहे.संभाजीनगरात माझे नातेवाईक आहेत, त्यामुळे मुक्काम त्यांचेकडेच आहे.पहिल्यांदाच या भागात येत असल्याने विशेष उत्सुकता आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

बीबी का मकबरा वगैरे पेक्षाही मी म्हणेन की देवगिरी किल्ला, अजिंठा - वेरुळ पहा. मला ते जास्त आवडतं.
ओक्के. :)

जमल्यास भद्रा मारुतीला जाऊ शकता.
ओक्के.
ठांकु. :)

प्राडॉ... अहो सांगा लवकर सांगा काही तरी... एस्प्येशली उत्तम अत्तर मिळणारे ठिकाण. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2016 - 12:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या आयडीत घुसून पिराने सर्व लिहिलंच आहे, गुलमंडीत उत्तम मीठाई उपहार गृहाच्या पाठीमागे खुप अत्तर वाले आहेत. डोकं त्या भड़क वासांनी भनभन करतं. तिथेच काय ते मिळेल बाकी कुठे ख़ास नाही.

-दिलीप बिरुटे

गुलमंडीत उत्तम मीठाई उपहार गृहाच्या पाठीमागे खुप अत्तर वाले आहेत.
ओक्के. धन्स.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

बाबा योगिराज's picture

17 Feb 2016 - 6:25 pm | बाबा योगिराज

त्या गल्लीस अत्तर गल्ली हेच नाव आहे. सकाळी 6 वाजता भरणारा फुलांचा बाजार आणि अत्तर ची दुकाने हि तिथली खासियत.

मदनबाण's picture

18 Feb 2016 - 6:46 am | मदनबाण

ओक्के. धन्यवाद. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

बाबा योगिराज's picture

17 Feb 2016 - 6:31 pm | बाबा योगिराज

तुम्ही अजूनही औरंगाबादला राहता का ओ. जबरदस्त माहिती आहे तुम्हाला.

क्रांती चौकात गायत्रीचे दुकान आहे, तिथे पावभाजीचेही एक हॉटेल आहे. तिथे जा.. आणि त्या हॉटेलात नाही, त्याच्या समोरच्या खोपचीत गाड्यावर पाभा मिळते, ती खा. मला तर खुपच आवडली.

मानलं भौ...

पाव भाजी खाऊन झाली कि, बाजूच्या गाडीवर एक फ्रुट स्लाड(सलाड चा अपभ्रंश) राजभोग किंवा गुलकंद आईस्क्रीम टाकून खावा. अहाहा सुख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2016 - 12:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समीर, बाबा योगिराज, मी आणि तुम्ही. बाबा योगिराज आणि समीर कसं जमेल ते सांगा, कुठे भेटू ते सांगा.

दिलीप बिरुटे

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2016 - 1:54 pm | अत्रन्गि पाउस

सुमारे ४ वाजता मी तिथे पोहोचेन....

बाबा योगिराज's picture

17 Feb 2016 - 6:23 pm | बाबा योगिराज

सर तुम्ही सांगा तिथे येईन मी. माझं दुकान त्रिमूर्ती चौकात आहे. मला कुठेही यायला जवळच पडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2016 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोन नंबर सेंडवा. त्रिमूर्ती चौकात कशाचं दूकान आहे तुमचं ?

-दिलीप बिरुटे

मिपावर मी आल्यापासून पहिल्यांदाच औरंगाबादविषयी चर्चा पाहतोय. आनंद झाला.
माझे लक्ष नसताना काही धागे झाले असतील, पण मी पाहिलेला पहिलाच.

मी औरंगाबादचा आहे पण सध्या तिथे राहत नाही. त्यामुळे यावेळी कट्ट्यात सहभागी नसेन.
पण धागा पाहून उत्साह आला आहे, त्यामुळे औरंगाबादविषयी माहिती पुरवतोय.

औरंगाबाद शहरात आणि जवळपास पाहण्यासारख्या गोष्टी :

पाणचक्की, बिवी का मकबरा, औरंगाबाद लेणी (वेरूळइतक्या प्रसिद्ध किंवा छान नाहीत)
गोगाबाबा टेकडी : हे काही टिपिकल प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतले ठिकाण नाही. पण शहराचा मकबऱ्यासकट छान व्ह्यू मिळतो. आणि शहराबाहेर छान हवेशीर जागा आहे.

औरंगाबाद हे दरवाजांचे शहर म्हणूनसुद्धा ओळखले जाते. जुने शहर तटबंदी आणि ५२ दरवाजे यांनी बंदिस्त होते. तुम्हाला शहरात फिरताना हे दरवाजे आणि तटबंदीचे काही अवशेष दिसू शकतात.

कलेक्टर ऑफिसजवळ एक संग्रहालय आहे.

अजिंठा वेरूळ सर्वांना माहित आहेच.

वेरूळ येथे लेणी तर आहेतच. पण घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. गणपतीचे एक जुने मंदिर आहे. वेरूळ येथे शिवाजीराजे यांचे पूर्वज शहाजीराजे आणि मालोजीराजे यांचे वतन होते. त्यांचे स्मारक अशातच बांधण्यात आले आहे.

खुलताबाद येथे निद्रिस्त मारुतीचे मंदिर आहे.
औरंगजेबाची कबर आहे.

म्हैसमाळ हे औरंगाबादचे हिल स्टेशन. तिथे छान बालाजी मंदिर आहे. बालाजीचे इतके शांत मंदिर दुसरे नाही.

म्हैसमाळच्या रस्त्यावर एक लहान फाटा आहे. पटकन लक्षात येत नाही. तिथून गेल्यावर मार्लेश्वर हे गुहेतले शिव मंदिर आहे. खूप मोठे शिवलिंग पाहायला मिळेल.

जटवाडा आणि कचनेर आणि येथे जैन मंदिरे आहेत. जटवाडा येथे भव्य मूर्ती आहेत.

पैठणला जायकवाडी धरण आहे. बागेत संगीत कारंजी आहेत. आणि संत एकनाथ यांची समाधी आहे.

औरंगाबादपासून लोणार सरोवरसुद्धा जवळ आहे.

खरेदी
औरंगाबादमध्ये पैठणी आणि हिमरूशाली छान मिळतात. बऱ्याच दुकानात मिळतात. पण पर्यटक औरंगाबाद वेरूळ रस्त्यावरच्या दुकानात जास्त जातात. सिडकोमध्ये लोकमत भवनच्या बाजूलासुद्धा एक छान दुकान आहे.
पण ह्यावर महिलांनी जास्त माहिती द्यावी.

गुलमंडी, औरंगपुरा, गोमटेश मार्केट, सराफा, सिटी चौक हे सर्व एकमेकांना लागून असलेले भाग खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत.
कपडे, पुस्तके, दागिने, अत्तरे, पूजा साहित्य, इलेक्ट्रोनिक्स अशा सर्व गोष्टींची दुकाने ओळीने आहेत.

खादाडगिरी
गायत्री चाट भांडार : गुलमंडी आणि क्रांती चौक.
कचोरी समोसा आणि मुंगभजी गरम आणि मस्त मिळतात. वर्षानुवर्षे पासून उत्कृष्ट चव.

उत्तम, गुलमंडी : गरम गरम जिलेबी आणि इमरती, आणि बरेच काही.

बाजूला एक छोटे दुकान आहे तिथे मसाला दुध छान मिळते.

ओमकार पावभाजी क्रांती चौक

लक्ष्मी सँडविच क्रांती चौक

पूर्णानंद औरंगपुरा : हे माझ्या शाळेतल्या भागातले मुलांचे आवडते दुकान. इथली वडापाव, मसाला पाव, सामोसा, दाबेली यांची चव इतक्या वर्षात बदललेली नाही. औरंगाबादला गेलो आणि तिथे नाही गेलो तर चुकल्यासारखे वाटते.

पाणीपुरी : पुणे आणि मुंबईला बहुत करून रगडावाली पाणीपुरी देतात. पण औरंगाबादला बटाटावाली जास्त मिळते.
चांगले पाणीपुरी वाले : दयावान गारखेडा, पंकज कुमार एन ४, गुरुकृपा सिडको समोर

मथुरावासी : भल्ला आणि गुजीया हि इथली खासियत. बाकी सर्व प्रकारची चाट मस्त मिळते. पाणीपुरी अगदी वेगळ्या प्रकारची. घट्ट आणि तिखट पाणी असते, आणि त्यात डाळिंब आणि अंगूरसुद्धा टाकतात.

तिथून जवळच पैठण गेटला लक्की आणि पॅरिस हि ज्युसेसची मस्त सेन्टर्स आहेत.

गुरुकृपा सूतगिरणी चौक जवळ : चाट आणि मिठाईचे चांगले दुकान.

गोधुली दाबेली : कनॉट प्लेस. दाबेली सोबत भेलसुद्धा छान आहे.

कनॉटच्याच कोपर्यात एक मस्त भेळवाला आहे.

तारा पान सेंटर : पान खाण्याचे शौकीन असणार्यांना हे नाव माहित असतेच. इथल्या पानाची सर पुणे मुंबईला खाल्लेल्या एका हि पानाला नाही. अगदी पुणेकर जिथे गर्दी करतात त्या शौकीन, नाद वगैरेसारख्या ठिकाणीसुद्धा नाही.
मी औरंगाबादला गेलो कि ऑफिसमध्ये लोक इथला पान आणण्याची वाट पाहतात.

उत्साहाच्या भरात जे आठवेल ते लिहिले आहे. खादाडगिरीवर किती लिहिले आहे त्यावरून आणखी माहिती हवी असल्यास विचारावे.
जाणकारांनी आणखी माहिती पुरवावी.

आकाश खोत's picture

17 Feb 2016 - 4:15 pm | आकाश खोत

ह्या प्रतिसादाची लांबी पाहून एक नवीनच धागा उघडला. औरंगाबाद च्या माहिती साठी.
ह्या धाग्यावर तुमचे कट्ट्याचे बेत चालू द्यात.

बाकी इतक्या पूर्वअटी लादून औरंगाबादचे लोक भेटताना पाहिले नाहीत. तिथे चल जरा जाऊन येऊ म्हणताच आगापिच्छा माहित नसताना कुठेही सोबत फिरणारे लोक जास्त.

खूद्द संभाजीनगर मध्ये राहणार्‍या लोकांसाठी ह्या अटी नसाव्यात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2016 - 4:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी इतक्या पूर्वअटी ंगाबादचे लोक भेटताना पाहिले नाहीत.

=)) आता औरंगाबाद बदललं आहे आणि औरंगाबादचे लोकही.
मीसळपाव वर वावरणा-यां औरंगाबाद वाल्यांचं तर आणखीनच वेगळ काही तरी असतं.

-दिलीप बिरुटे

-

संभाजीनगर कितीही बदलले तरी, तिथली माणसे पाहुण्याचा पाहूणचार व्यवस्थित करतात.

थोडा शिष्ठपणाचा आव आणतात पण...त्यांना नाहीच जमत.

आता हेच बघाना, ह्या धाग्याच्या निमित्ताने, बिरुटे सर आणि बाबा योगीराज भेटलेच की नाही.

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2016 - 5:02 pm | अत्रन्गि पाउस

व्हा कि जोइन

मन१'s picture

17 Feb 2016 - 4:16 pm | मन१

ह्या निमित्तानं औरंगाबादबद्दलच्या माहितीचं चांगलं संकलन होतय.
बाकी... धागा वाचून आता काही गोष्टींची लिंक लागते आहे.
बरं झालं धागा काढलात ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2016 - 7:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी आणि बाबा योगी आमचं कच्च प्लानिंग झालं आहे, आम्ही आपली वाट पाहात आहोत. समीरचा अजुन काही रिप्लाय नाही. अजुन कोणी मिपाकर आम्हाला आणि अत्रिंगला भेटू इच्छित असेल तर बाबा किंवा माझ्याशी संपर्क करावा. भेटीसाठीच्या अटी सैल केल्या आहेत. ;)

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

18 Feb 2016 - 9:20 am | नाखु

अटी-तटीच्या कट्ट्याला शुभेच्छा !!!!

स्वगत :कप्तान या धाग्यावर का नाही आला अजून ????

कुणाला कशाचं तर तुम्हाला चिमण (आणि बुवांचंही)...

सनईचौघडा's picture

18 Feb 2016 - 10:18 am | सनईचौघडा

अहो अत्तरचे नाव काढलंय मग बुवा नक्की जातील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2016 - 4:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळी, औरंगाबाद कट्ट्यासाठी मी अन बाबा तयार होतो, आम्ही दोघं एकमेकांना पहिल्यांन्दाच भेटलोही पण धागा कर्ते कामात असल्यामुळे कट्टा भेट सायंकाळी साडेसहानंतर होणार आहे.अत्रन्गि (लिहायला अवघड नाव आहे चोप्य पस्ते केलं) जर साडे सहाला अत्रन्गि पाउस भेटले नै तर बाबाचा अन माझाच कट्टा होणार आहे. दोघंच बसू गप्पा मारत कुठं जाणार नै अन कै नै.

बाबाला भेटून कसं वाटलं वगैरे साठी पढ़ते रहीहे औरंगाबाद कट्टा सबसे आगे सबसे तेज. :)

-दिलीप बिरुटे

बाबा योगिराज's picture

22 Feb 2016 - 4:09 pm | बाबा योगिराज

सर,
त्ये मदनबाण भौ पण जालन्याला येणार होते. त्यांचं काही कळलंय काय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2016 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिट्ठी ना कोयी संदेश न जाने कौनसा देश जहा वो चले गये. (मरतय आज बानाकडून मी)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2016 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धागा काढला आणि आपणच पसार झालात बाबा योगीराज आणि मी आपलं मनापासून आभार मानतो. यानंतर आम्हाला कोणी कट्टा करू असे म्हनू नये. आपण नियोजन करावं आणि आम्ही पाहुण्या सारखे येण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.

प्राडॉ आणि बाबा
(आभारी)

बाबा योगिराज's picture

22 Feb 2016 - 8:32 pm | बाबा योगिराज

प्राडॉशी बाडीस.

पिलीयन रायडर's picture

22 Feb 2016 - 8:33 pm | पिलीयन रायडर

काय झाल? आलेच नाहीत का ते?

बाबा योगिराज's picture

22 Feb 2016 - 8:36 pm | बाबा योगिराज

नै णा.
आम्ही दोघे 3 वाजेपासून वाट बघत होतो. त्यांना वेळ नव्हता. त्यांना जमलच नै.

प्रचेतस's picture

22 Feb 2016 - 8:48 pm | प्रचेतस

जौद्या.
दोघे मिळून मनसोक्त गप्पा झाल्या असतीलच.
आमच्या आगामी कटकी दौऱ्यात सर आणि बाबा योगीराज पण असतील आता.

(अचानक) गायब असण्याचा अनुभव वल्लीदा,तुम्हाला मला नवीन का आहे ????

कोल्हापुरला कल्लापुरी झालेला नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2016 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

पहिल्या वाक्याचा मूड पाहता, तुमच्या इष्टाईलने शेवटच्या वाक्यातला शेवटचा शब्द "नाखु(ष)" असा हवा होता :) ;)

अत्रन्गि पाउस's picture

22 Feb 2016 - 9:28 pm | अत्रन्गि पाउस

४ वाजे पर्यंत बैठका आटपतील हि खात्री होती आणि ९३० ची ट्रेन होती त्यामुळे कट्ट्याची जबरदस्त खात्री होती ...तथापि एकातून एक मुद्दे निघत गेले आणि सगळे वेळा पत्रक कोलमडले आणि ज्येमतेम ६ वाजता सगळे आटपत आणले ...
मधेच बोका भौंचा पण फोन येऊन गेला त्यांनाही सगळ्यांशी बोलायचे होते ...
फोन वर शेवटी डॉक्टर बिरुटे आणि बाबा ह्यांच्याशी बोललो आणि मनापासून माफी मागितली ...माझा खरच नाईलाज झाला होता ..
पुन्हा एकदा जाहीर दिलगिरी व्यक्त करतो ...

राग येणे स्वाभाविक आहे रास्तहि आहे ...तथापि जमल्यास माफ करा हि विनंती ...

मितभाषी's picture

22 Feb 2016 - 11:13 pm | मितभाषी

येतो येतो म्हणून "पाऊस" काही आलाच नाही.

राघवेंद्र's picture

22 Feb 2016 - 11:40 pm | राघवेंद्र

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2016 - 5:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू पीक आम्ही असवांवर काढले
कालपर्यंत पावलांनी रस्त्यापाशी तक्रारी मांडल्या नाहीत
झाडे करपली माथे हरपली
नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो
आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही.
(कवी - डॉ. यशवंत मनोहर)

-दिलीप बिरुटे

या कवितेबद्दल धन्यवाद. बरेच दिवस शोधत होतो.

असंका's picture

23 Feb 2016 - 9:11 am | असंका

हा हा हा...

आरंभशूर मंजे काय हो भाऊ?

(कृ.ह. घ्या ही विनंती..)

दिवाना हु's picture

23 Feb 2016 - 9:35 pm | दिवाना हु

मि हि औरंगाबाद कर

सतिश गावडे's picture

23 Feb 2016 - 9:41 pm | सतिश गावडे

बरं झालं आम्ही कट्टयाला नाही आलो ते.

मितभाषी's picture

23 Feb 2016 - 10:54 pm | मितभाषी

नाशिकला या. जंगी कट्टा करू. हाकानाका.