नमस्कार,
लोकहो,
मला सध्या उचक्या लागण्याचा त्रास चालु आहे.
यावर उपायास्तव.
1) कोणी माझी आठवण काढत आहे का ?हे आठवणतील सगळ्यांन फोन करुन विचारल.
1)मुंडी वर करुन पण उच्क्या थांबल्या ना हीत..
~ तर आता काय
मुंडी वर करून उचक्या थांबल्या नाहीत,??
मग इतरही बरेच अवयव आहेत ते वर करून बघा नक्की फरक पडेल.
दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः तर तुमची आठवण काढत नाही आहात ना?याची खात्री करून घ्या.
रोज रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण एक चमचा कोमट पाण्यातून घ्या. शरीरातील टाॅक्सिन्स बाहेर काढायचा उत्तम उपाय. सध्या युनायटेड फार्मसी, पुणे हे सर्वात शुद्ध त्रिफळा बनवतात.
रोज काळे मनुके खात जा... आम्लपित्त कमी होईल...
सकाळी उठल्यावर रात्रभर भिजवलेल्या चमचाभर हिरव्या धण्यांचे पाणी ग्लासभर प्या...
अंगातली उष्णता कमी होईल...
यावरुन जुन्या पिच्चरांमधले याददाश्त खो जाने पर सांगितल्या जाणारा जालिम उपाय आठवला. 'इन्हे उसी हादसे से फिर से गुजरना होगा, शायद इनकी याददाश्त वापस आ जाये.'
मानसिक धक्का 10 Feb 2016 - 10:20 pm | श्रीरंग_जोशी
बहुधा जेपीची संपादकपदी नियुक्ती झाल्यास त्याला मानसिक धक्का बसेल =)) .
मलाही वरचेवर उचक्यांनचा त्रास होतो, यावर रामबाण उपाय म्हणजे , उभे राहचे,पाणी तोंडात भरुन घ्यायचे, कंबरेत पुर्ण वाकायचे व तोंड जमिनिच्या दिशेनेकरुन पाणि गिळायचे.उचकी थांबली नाही तर् प्रोसिजर रिपीट करायची.
धागा विनोदासाठी काढलेला नाही असे गृहित धरून उपाय सांगतो.
उचक्या अजिबात थांबत नसतील तर एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या. त्यात नाक पूर्णपणे जाईल अशा तर्हेने नाकाभोवती धरून ठेवा. पिशवीच्या आतील हवा बाहेर जाऊ शकणार नाही व बाहेरील हवा आत येऊ शकणार नाही अशा पद्धतीने पिशवी नाकाभोवती हाताने दाबून धरावी. नंतर पिशवीतच नाकाने जोरजोरात दीर्घ श्वास घ्या. पिशवीतील हवा आतबाहेर जाऊ शकत नसल्याने पिशवितील प्राणवायू कमी होऊ लागतो व पिशवीत कर्बवायू वाढू लागतो. १०-१२ दीर्घ श्वासानंतर गुदमरल्यासारखे होऊ लागते. शक्य तेवढा वेळ ही क्रिया सुरू ठेवा. श्वास घेणे अगदीच अशक्य होईल तेव्हा पिशवी थोडी मोकळी करून पिशवीत थोडी बाहेरची हवा येऊ द्या व नंतर परत हीच क्रिया करा. साधारणपणे १-२ वेळा असे केल्यावर उचकी पूर्ण थांबते.
दुसरा काहिसा संथ उपाय म्हणजे डोक्यावरून जाड पांघरूण घेऊन झोपा. काही वेळाने पांघरूणाच्या आत प्राणवायू कमी होऊन कर्बवायू वाढतो व गुदमरल्यासारखे वाटू लागते व काही वेळाने उचकी थांबते.
हा एका डॉक्टरांनीच सांगितलेला उपाय आहे. यामागचे नक्की लॉजिक डॉक्टरच सांगू शकतील. श्वास रोखून धरणे हा उचक्या थांबविण्याचा एक उपाय असतो. म्हणजे शरीराला प्राणवायूचा पुरवठा तोडणे हे त्यामागचे लॉजिक असावे. मला डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायात सुद्धा प्राणवायूचा पुरवठा कमी होऊ लागते व त्यामुळे उचकी थांबते. परंतु नक्की लॉजिक एखादा डॉक्टरच सांगू शकेल.
मग खोकला येईल असं काहीतरी करायचं. उदा. बसस्टॉपला जाऊन उभे राहणे. तिथे आपोआप खोकला येईलच. मग उचकीला लागायचा कंटाळा येईल. मग ती तुमचा नाद सोडून देईल. अर्थात हा उपाय गालांसाठी अंमळ रिस्की आहे. स्वजबाबदारीवर करणे.
खफ युग प्रवर्तक्,जिल्बी धाग्यांना घाम फोडणारे, सन्माननीय जेपी यांचा धाग्याला ५० टिचक्या माफ करा उचक्या आल्याबद्दल एक "मला लागली कुणाची उचकी " ही अस्सल गाण्याची सीडी,असोल्या नारळ आणि २१ सुपार्यांचे पाकीट देऊन सत्कार करण्यात येत आहे.
तात्पुरता सचिव
जेपी सत्कार समीती आणि अखिल मिपा हातासरशी सत्कार संघ, अभ्या मिप्त्र परीवार यांचा संयुक्त उपक्रम
प्रतिक्रिया
10 Feb 2016 - 9:06 pm | जेपी
धागा उडला तरी काय हरकत नै पण उचक्या थांबणे महत्वाते!!
..
आणी मी पयला!!
11 Feb 2016 - 9:18 am | पगला गजोधर
;)
10 Feb 2016 - 9:07 pm | _मनश्री_
माझ्या वडिलांना एकदा सलग दोन दिवस उचकी लागली होती
डॉक्टरांनी दीर्घ श्वसन करायला सांगितलं त्यानंतर उचकी थांबली होती
10 Feb 2016 - 9:10 pm | _मनश्री_
हा विनोदी धागा आहे का ?
10 Feb 2016 - 9:14 pm | जेपी
विनोदी धागा नाही..
पारंपारीक उपाय करुन पाहिले पण फायदा नाही!.
11 Feb 2016 - 12:08 pm | खेडूत
पारंपारीक काय. ते लिवा की...
10 Feb 2016 - 9:10 pm | मदनबाण
श्वास रोखुन धरा...रोखलेला श्वास सोडायला विसरु नका ! ;)
बाकी याचा १४ तारखेशी काही संबंध आहे का ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
10 Feb 2016 - 9:11 pm | जेपी
दीर्घ श्वसन करुन पाहिल..फार श्वास कोंडेपर्यंत ..पण उचक्या थांबत नाहीत!.
10 Feb 2016 - 9:15 pm | _मनश्री_
जर कुठल्याच उपायाने उचकी थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जाणच श्रेयस्कर आहे
10 Feb 2016 - 9:17 pm | _मनश्री_
जर कुठल्याच उपायाने उचकी थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जाणच श्रेयस्कर आहे
आय होप उचकी लागण्याच काही गंभीर कारण नसाव डॉक्टरांकडे जाण्याची टाळाटाळ करू नये
10 Feb 2016 - 9:07 pm | विजय पुरोहित
कदाचित आम्लपित्त असेल?
10 Feb 2016 - 9:09 pm | विजय पुरोहित
आता दंगा होणार धाग्यावर...
दू दू जेपी व मनरंग...
मला तिसरा ढकलला...
10 Feb 2016 - 9:07 pm | होबासराव
तारक मेहता चा एक छान एपिसोड होता ह्यावर त्यामध्ये उपाय सुद्धा एक से एक होते ;)
10 Feb 2016 - 9:09 pm | चेक आणि मेट
मुंडी वर करून उचक्या थांबल्या नाहीत,??
मग इतरही बरेच अवयव आहेत ते वर करून बघा नक्की फरक पडेल.
दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः तर तुमची आठवण काढत नाही आहात ना?याची खात्री करून घ्या.
10 Feb 2016 - 9:11 pm | सतिश पाटील
शाळा कॉलेजात काही प्रकरण वेगैरे?
नाही म्हणजे ते valentine का काय ते जवळ आलाय न...
10 Feb 2016 - 9:17 pm | मोहनराव
खुर्चीवर बसा व एका झटक्यात उभा रहा. सर्वात उत्तम उपाय....
10 Feb 2016 - 9:21 pm | जेपी
सर्वांचे आभार!.
आताच 4-5 विलायची(ईलायची) तोंडात टाकुन चघळ्यावर उचक्या थांबल्या..
संपादक धागा काढला तर बरे होईल..
उपाया साठी सर्वांचे आभार
10 Feb 2016 - 9:23 pm | विजय पुरोहित
वेलदोडे पण शीतल आणि मूत्रल आहेत. तुम्हाला उष्णता, आम्लपित्त झालेय. खाली मी दिलेले उपाय पण अनुसरा...
10 Feb 2016 - 9:22 pm | विजय पुरोहित
रोज रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण एक चमचा कोमट पाण्यातून घ्या. शरीरातील टाॅक्सिन्स बाहेर काढायचा उत्तम उपाय. सध्या युनायटेड फार्मसी, पुणे हे सर्वात शुद्ध त्रिफळा बनवतात.
रोज काळे मनुके खात जा... आम्लपित्त कमी होईल...
सकाळी उठल्यावर रात्रभर भिजवलेल्या चमचाभर हिरव्या धण्यांचे पाणी ग्लासभर प्या...
अंगातली उष्णता कमी होईल...
10 Feb 2016 - 9:52 pm | माम्लेदारचा पन्खा
खडी साखर खाऊन बघा....
अवांतर ....मानसिक धक्का बसवून घ्या.... सगळं बंद होईल !
10 Feb 2016 - 9:55 pm | विजय पुरोहित
मामलेदारबुवा जबर सेन्स ऑफ ह्यूमर...
अगदी निरागस असतो तुमचा विनोद...
म्हणून तर फार आवडतो...
10 Feb 2016 - 10:06 pm | प्रचेतस
खडीसाखरेवरुण ती प्रसिद्ध आर्या आठवली.
10 Feb 2016 - 10:43 pm | भिकापाटील
"स्वहस्तेच दाबावी बुल्ली" का
11 Feb 2016 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वस्त्री घरात नसता कण्डु शमनार्थ रण्डिरा खावी | तीही घरात नसता स्वहस्ते चिबुल्ली दाबावी.
रण्डिरा - साखर
चिबुल्ली= कण्ठाचा उंचवटा- पडजीभ
कण्डु = खोकला
-दिलीप बिरुटे
11 Feb 2016 - 9:11 am | प्रचेतस
=))
11 Feb 2016 - 9:15 am | अन्नू
काय?
रण्ड.... नको ते आपलं साखरंच बरं वाटतंय!
11 Feb 2016 - 10:32 am | माम्लेदारचा पन्खा
तुम्ही विविक्षित शब्द वापरलात !
10 Feb 2016 - 10:12 pm | संदीप डांगे
मानसिक धक्का बसवून घ्या
यावरुन जुन्या पिच्चरांमधले याददाश्त खो जाने पर सांगितल्या जाणारा जालिम उपाय आठवला. 'इन्हे उसी हादसे से फिर से गुजरना होगा, शायद इनकी याददाश्त वापस आ जाये.'
10 Feb 2016 - 10:20 pm | श्रीरंग_जोशी
बहुधा जेपीची संपादकपदी नियुक्ती झाल्यास त्याला मानसिक धक्का बसेल =)) .
10 Feb 2016 - 9:56 pm | टवाळ कार्टा
जुना संत आठवण काढत असेल
10 Feb 2016 - 10:08 pm | पैसा
=)) =)) =)) तुझा फेसबुक अकाउंट बंद कशाला केलास?
10 Feb 2016 - 10:37 pm | काकासाहेब केंजळे
मलाही वरचेवर उचक्यांनचा त्रास होतो, यावर रामबाण उपाय म्हणजे , उभे राहचे,पाणी तोंडात भरुन घ्यायचे, कंबरेत पुर्ण वाकायचे व तोंड जमिनिच्या दिशेनेकरुन पाणि गिळायचे.उचकी थांबली नाही तर् प्रोसिजर रिपीट करायची.
10 Feb 2016 - 10:40 pm | संदीप डांगे
छ्या! असं थोडी असतं काका. कायतरी अमेरिकन-युरोपियन उचकीवाद सांगा ज्यामुले जेपीला अशी फसलेल्या उचकीसारखी उचकी येतेय. दोन्तीन संशोधनं जोडा. कसं वजन आलं पायजेल प्रतिसादात.
10 Feb 2016 - 11:25 pm | श्रीगुरुजी
धागा विनोदासाठी काढलेला नाही असे गृहित धरून उपाय सांगतो.
उचक्या अजिबात थांबत नसतील तर एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या. त्यात नाक पूर्णपणे जाईल अशा तर्हेने नाकाभोवती धरून ठेवा. पिशवीच्या आतील हवा बाहेर जाऊ शकणार नाही व बाहेरील हवा आत येऊ शकणार नाही अशा पद्धतीने पिशवी नाकाभोवती हाताने दाबून धरावी. नंतर पिशवीतच नाकाने जोरजोरात दीर्घ श्वास घ्या. पिशवीतील हवा आतबाहेर जाऊ शकत नसल्याने पिशवितील प्राणवायू कमी होऊ लागतो व पिशवीत कर्बवायू वाढू लागतो. १०-१२ दीर्घ श्वासानंतर गुदमरल्यासारखे होऊ लागते. शक्य तेवढा वेळ ही क्रिया सुरू ठेवा. श्वास घेणे अगदीच अशक्य होईल तेव्हा पिशवी थोडी मोकळी करून पिशवीत थोडी बाहेरची हवा येऊ द्या व नंतर परत हीच क्रिया करा. साधारणपणे १-२ वेळा असे केल्यावर उचकी पूर्ण थांबते.
दुसरा काहिसा संथ उपाय म्हणजे डोक्यावरून जाड पांघरूण घेऊन झोपा. काही वेळाने पांघरूणाच्या आत प्राणवायू कमी होऊन कर्बवायू वाढतो व गुदमरल्यासारखे वाटू लागते व काही वेळाने उचकी थांबते.
तरीसुद्धा उचही थांबत नसल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या.
10 Feb 2016 - 11:31 pm | अभ्या..
ह्या उपायातले लॉजिक काय?
(श्रीगुरुजी तुम्हाला माहीतीय मी तर सिरीयसली प्रश्न विचारणारा आयडी आहे सो धिस इज नो चेष्टा हं)
11 Feb 2016 - 2:13 pm | श्रीगुरुजी
हा एका डॉक्टरांनीच सांगितलेला उपाय आहे. यामागचे नक्की लॉजिक डॉक्टरच सांगू शकतील. श्वास रोखून धरणे हा उचक्या थांबविण्याचा एक उपाय असतो. म्हणजे शरीराला प्राणवायूचा पुरवठा तोडणे हे त्यामागचे लॉजिक असावे. मला डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायात सुद्धा प्राणवायूचा पुरवठा कमी होऊ लागते व त्यामुळे उचकी थांबते. परंतु नक्की लॉजिक एखादा डॉक्टरच सांगू शकेल.
10 Feb 2016 - 11:31 pm | गवि
माझा एक मित्र इस्रायलमधे असतो. सत्तर हजार रुपये लागतील इस्रायलहून औषध आणायला.
सांगू का त्याला?
10 Feb 2016 - 11:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अहो पण ते ७० रुपये वारले ना?
माने हा शुद्ध हलकटपणा आहे.
11 Feb 2016 - 5:04 am | अत्रुप्त आत्मा
चिमणचा!
11 Feb 2016 - 2:40 pm | गवि
खी खी खी..!!
11 Feb 2016 - 12:19 am | अन्नू
तरी वाटलंच होतं मला
जेपींची उचकी थांबून तीन तास उलटले तरी प्रतिक्रिया काय बंद होईनात! ;)
आता घ्या म्हणावं- काढा अजुन धागा उचकीचा... ;) ;)
11 Feb 2016 - 12:48 am | एस
आजच केलेला उपाय -
खोकल्यावरचं औषध असतेच घरात. ते दहा एमएल इतकं घ्यायचं. उचकी बंद होते.
11 Feb 2016 - 12:48 am | एस
आजच केलेला उपाय -
खोकल्यावरचं औषध असतेच घरात. ते दहा एमएल इतकं घ्यायचं. उचकी बंद होते.
11 Feb 2016 - 12:50 am | एस
द्विरुक्तीबद्दल मोबाइल क्षमस्व आहे.
11 Feb 2016 - 9:24 am | रानडेंचा ओंकार
समजा उचकीच कारणच तेच औषध असेल तर?
11 Feb 2016 - 9:36 am | एस
मग खोकला येईल असं काहीतरी करायचं. उदा. बसस्टॉपला जाऊन उभे राहणे. तिथे आपोआप खोकला येईलच. मग उचकीला लागायचा कंटाळा येईल. मग ती तुमचा नाद सोडून देईल. अर्थात हा उपाय गालांसाठी अंमळ रिस्की आहे. स्वजबाबदारीवर करणे.
11 Feb 2016 - 9:33 am | सुनील
थांबल्या का?
11 Feb 2016 - 11:28 am | मुक्त विहारि
आता प्रतिसाद चालू आहेत.
11 Feb 2016 - 11:34 am | नाखु
उगा सौंशय आहे हा धागा उचकवायला आहे काय ते ?
11 Feb 2016 - 12:30 pm | पिलीयन रायडर
कुणीतरी अचानक जाऊन जोरात ओरडा जेपी समोर.. मग तो दचकेल.. मग उचक्या थांबतील..!
पुढल्या वेळेसाठी सांगुन ठेवलाय उपाय!
11 Feb 2016 - 2:26 pm | मीता
"मला लागली कुणाची उचकी" हे गाणे शनिवार वाड्यावर जोरजोरात म्हणणे .उचकी बंद होण्याचा रामबाण उपाय .
11 Feb 2016 - 2:35 pm | विजय पुरोहित
50 पूर्ण झाल्याबद्दल जेपी यांचा सत्कार खडीसाखर, विलायची, त्रिफळा चूर्ण पुडी देऊन करण्यात येत आहे.
11 Feb 2016 - 2:38 pm | नाखु
खफ युग प्रवर्तक्,जिल्बी धाग्यांना घाम फोडणारे, सन्माननीय जेपी यांचा धाग्याला ५० टिचक्या माफ करा उचक्या आल्याबद्दल एक "मला लागली कुणाची उचकी " ही अस्सल गाण्याची सीडी,असोल्या नारळ आणि २१ सुपार्यांचे पाकीट देऊन सत्कार करण्यात येत आहे.
तात्पुरता सचिव
जेपी सत्कार समीती आणि अखिल मिपा हातासरशी सत्कार संघ, अभ्या मिप्त्र परीवार यांचा संयुक्त उपक्रम
11 Feb 2016 - 2:44 pm | जेपी
दोनदा सत्कारा आभार..
धागा माहितीपुर्ण झाला आहे.
12 Feb 2016 - 10:22 am | मुक्त विहारि
हो ना.
काल रात्री मला पण उचक्या सुरु झाल्या.
उपाय शोधायला म्हणून हा धागा उघडला.
वाचता-वाचता हास्याच्या तुषारात, उचक्या कधी थांबल्या ते कळले पण नाही.
थोडक्यात काय? तर, उचक्या लागल्या की आधी हा धागा उघडायचा.
12 Feb 2016 - 12:09 pm | टवाळ कार्टा
चक्क बीयर सोडून जेपीचा धागा???
12 Feb 2016 - 12:19 pm | जेपी
काल गुरुवार असेल..
12 Feb 2016 - 1:32 pm | मुक्त विहारि
गणेश जयंती...
दत्तगुरुंच्या बरोबर गणपती असल्यानेच, असे झाले असेल.
12 Feb 2016 - 2:25 pm | इरसाल
जेप्स,
उचक्या थांबल्या का ?