कर्दळी वनात जात आहात का ?

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in भटकंती
5 Feb 2016 - 5:30 pm

कर्दळी वन ही जागा अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय जागृत अशी सांगीतली जाते, यु ट्युब वर तर प्रा क्षितीज पाटकुले एक करोड व्यक्तीतली एक व्यक्ती कर्दळीवनाची यात्रा करते असा प्रचार करतात. कारणही तितकच प्रभावी आहे. इथे स्वामी समर्थ प्रकटले.

ही यात्रा आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या टुरिझम पॉलीसीत बसते का यावर कोणी काही बोलत नाही. ही जागा आंध्र सरकारच्या वनखात्यात येते. या प्रदेशात वन्य पशुंचा संचार आहे. जिथे जेवणाची व्यवस्था नाही. जिथे संपर्काचे साधन नाही. कोणला साप चावला तर औषध नाही. एखादा व्यक्ती यात्रेच्या अतिश्रमाने आजारी पडला तर औषध उपचार नाहीत अश्या ठिकाणी ट्रेकर्स मंडळी सोडुन काही सामान्य माणसे जातात आणि त्यांचे अतोनात हाल होतात.

ज्याने एकही ट्रेक केलेला नाही अश्या कोणत्याही वयाच्या स्त्री/पुरुषाला कर्दळीवन सेवा संघ जाहीरात करुन भुरळ घालते. कधी कधी आंध्र प्रदेश सरकार परवानगी नाकारते. अश्या वेळी ह्या सहली अ‍ॅरेंज करणारे विना-परवाना लोकांना जंगलात घुसवतात. एकेका दिवशी २५ किलोमीटर्स पेक्षा जास्त जंगलातल्या पायदळीवर चालण्यास भाग पाडतात. वनखात्याचे पोलीस धमक्या देतात आणि स्वतःच्या जबाबदारीवर लोक ही यात्रा पुर्ण करतात.

माझी ही श्रध्दा आहे की स्वामी कोणाचे काही बिघडु देणार नाहीत. पण स्वामींना त्रास कशाला.

या ऐवजी ह्या म्हहत्वाच्या स्थळी जर स्त्री पुरुष यांना न्यायचे असेल तर अश्या सोयी सुविधा उपलब्ध होतील याकडे आयोजक आणि शासन लक्ष देईल का ?

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Feb 2016 - 5:44 pm | यशोधरा

ओह! हे माहित नव्हते.. कर्दळीवन यात्रेचे पत्रक वगैरे पाहिले आहे पण हे असे काही असेल हे माहित नव्हते.

विजय पुरोहित's picture

5 Feb 2016 - 5:46 pm | विजय पुरोहित

सहमत...
पण सर्व सोयी सुविधा पुरवल्या तर त्या यात्रेतील थरार कमी होईल. आज अनेक प्रसिद्ध देवस्थानांचा जसा बाजार झालाय तसे इथेपण होईल.

टवाळ कार्टा's picture

5 Feb 2016 - 6:00 pm | टवाळ कार्टा

हि यात्रा धार्मीक कार्य म्हणून करतात की थरार म्हणून?

विजय पुरोहित's picture

5 Feb 2016 - 6:37 pm | विजय पुरोहित

कदाचित थरार हा चुकीचा शब्द आला. पण मला काय म्हणायचंय ही यात्रा पण अगदी सामान्य लोकांना अॅक्सेसिबल ठेवली तर आज अनेक देवस्थानांची जशी वाट लागलीये तसे इथे पण नक्कीच होणार.

सतिश गावडे's picture

5 Feb 2016 - 10:48 pm | सतिश गावडे

लोक देवस्थानांना गेल्याने देवस्थानांची वाट कशी काय लागेल? तुम्ही बरोबर उलट म्हणत आहात.

सामान्य लोकांना देवस्थाने अॅक्सेसिबल ठेवली तर अधिकाधिक रंजले गांजले, दु:खी कष्टी लोक तिकडे जातील. देवस्थानाच्या पावित्र्यामुळे, तेथील दैवी शक्तीच्या प्रभावामुळे त्यांची दु:खे दूर होतील. जर कुणाच्या मनात काही वाईट विचार असतील तर ते दूर होऊन त्यांचा मनात सद्विचार उत्पन्न होतील.

काही देव आधी भक्ताची कठोर परीक्षा घेतात, पास झाला तरच पावताय. त्यामुळे या यात्रा सोप्या करणे पेपर फोडल्यासारखे आहे.

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 12:28 am | सतिश गावडे

काही देव आधी भक्ताची कठोर परीक्षा घेतात, पास झाला तरच पावताय.

संत तुकारामांचा एक अभंग आहे:

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलें
तोचि साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा

मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्‍त
ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी

दया करणें जें पुत्रासी, तेची दासा आणि दासी
तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ति

अभंगाच्या मतितार्थावरून आपण ही त्यांच्या मनातील देवाची प्रतिमा होती असे म्हणायला हरकत नाही. यात देव भक्ताला जवळ करण्याआधी कठोर परीक्षा घेतो याचा उल्लेख नाही. म्हणजे ही प्रतिमा अपुर्ण आहे असे म्हणता येईल का?

(तुमचा प्रतिसाद उपहासात्मक नाही असं समजून मी प्रतिसाद दिला आहे.)

प्रतिसाद उपहासात्मकच होता.:)
तुकोबांची डिग्री ची ब्रँच वेगळी, रावणादी राक्षस तसेच हरीश्चंद्रादी भक्तांची वेगळी.

प्राची अश्विनी's picture

5 Feb 2016 - 6:02 pm | प्राची अश्विनी

ही यात्रा एका ओळखीच्यांनी गेल्या वर्षी केली. १५ जणांचा ग्रुप होता. त्यांच्या मागून त्यांचे खाणे घेउन येणार्‍या माणसावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला होता. तो जगला की मेला कळले नाही . या ग्रुप्चे देखिल हाल दोन दिवस हाल झाले.

अजया's picture

5 Feb 2016 - 6:35 pm | अजया

कशाला जावे मग?

विजय पुरोहित's picture

5 Feb 2016 - 6:39 pm | विजय पुरोहित

हेच म्हणतो. घरी बसून नामस्मरण केले तर काय देवाला चालत नाही का?

टवाळ कार्टा's picture

5 Feb 2016 - 7:04 pm | टवाळ कार्टा

+११११११११११

टक्या घरी बसून नामस्मरण करतोय हे चित्र डोळ्यांसमोर आले.

विजय पुरोहित's picture

5 Feb 2016 - 7:44 pm | विजय पुरोहित

आरोएफएल....

टवाळ कार्टा's picture

5 Feb 2016 - 11:25 pm | टवाळ कार्टा

आम्चे पुजाविधी हे वेगळे असतात...इथे मिपावरच शास्त्रोक्त पुजा कशी करावी याचा जुना धागा आहे ;)

सतिश गावडे's picture

5 Feb 2016 - 11:51 pm | सतिश गावडे

ती पुजा सांगणारे गुरुजी आता उत्क्रांतीच्या नादी लागलेत. ;)

प्रचेतस's picture

6 Feb 2016 - 6:07 am | प्रचेतस

हो.
आणि एक धर्म सुधारणा करणारे गुरूजी अता शास्त्रोक्त पूजेच्या नादी लागलेत.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2016 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा

कर्दळी वनात नेऊन हत्तीला ठार मारायचा विचार करत असलेला :-
आत्मुभट कुठारकर
http://freesmileyface.net/smiley/leisures-and-sports/leisures-and-sports-024.gif

पैसा's picture

6 Feb 2016 - 12:33 pm | पैसा

काल खफवर अजयाने एक कोडं घातलं होतं. आणि आज तुमचा हा प्रतिसाद बघितला.

काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला:

प्रचेतस's picture

6 Feb 2016 - 12:48 pm | प्रचेतस

कापूस ओ.

पैसा's picture

6 Feb 2016 - 12:53 pm | पैसा

कापूस गोरा असतो. आणि बुवा कुठचा हती मारणार आहेत? =))

प्रचेतस's picture

6 Feb 2016 - 1:29 pm | प्रचेतस

कर्दळीवनातला.

टवाळ कार्टा's picture

6 Feb 2016 - 4:43 pm | टवाळ कार्टा

कर्दळीवनात जाउन हत्ती मारणे यात काही छुपा अर्थ आहे काय? ;)

पैसा's picture

6 Feb 2016 - 5:13 pm | पैसा

>>>>काळ्या रानात हत्ती मेला>>> या कोड्याचं उत्तर माझ्या माहितीत 'ऊ' असं आहे, आणि बुवा कर्दळीवनात हत्तीला ठार मारणार म्हणाले ना, म्हणून विचारलं, कोणता हती. =))

भीमराव's picture

7 Feb 2016 - 9:18 am | भीमराव

पै का . ते कापुसच हाय, बोंडासकट आसलेला वाळका कापुस ऊपसुन बाहेर काडत्यात त्यो प्रकार.

सतिश गावडे's picture

7 Feb 2016 - 11:25 am | सतिश गावडे

कर्दळीवनात जाउन हत्ती मारणे यात काही छुपा अर्थ आहे काय? ;)

त्यात फार गहन असा अध्यात्मिक अर्थ आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक पांढरा हत्ती असतो. हा हत्ती असतो "अहं"चा. कर्दळीवनासारख्या पवित्र ठिकाणी जाऊन हा अनावश्यक आणि न परवडणारा अहंचा पांढरा हत्ती मारायचा असतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2016 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सालं 'उठाबसायला' भारी जागा आहे ती असा विचार आला. :)

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

10 Feb 2016 - 10:05 am | नाखु

" मोक्षासाठी कुणी उठा म्हणत नसेल तरच बसायला अर्थ आहे !!
अन्यथा बसणेच काय कर्दळीवन यात्राही व्यर्थ आहे !!!

नाखुष चारोळीकर

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 10:53 am | सतिश गावडे

हे कधी झाले?
धर्म सुधारणेकडून शास्त्रोक्त पूजेकडे वळणे हे पुरोगामित्वाचे लक्षण की प्रतिगामित्वाचे?

मृत्युन्जय's picture

6 Feb 2016 - 12:01 pm | मृत्युन्जय

मुळात पुजा करणे (देवाची), सत्यनारायणाची पुजा सांगणे वगैरे हे पुरोगामित्व की प्रतिगामित्व? (शास्त्रोक्त की धर्मसुधारोक्त ही नंतरची गोष्ट)

टवाळ कार्टा's picture

6 Feb 2016 - 12:02 pm | टवाळ कार्टा

गल्ली चुकलि ओ ;)

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 12:34 pm | सतिश गावडे

ते तुमचा देवावर (किंवा देव या संकल्पनेवर) विश्वास आहे की नाही यावर अवलंबून आहे असं वाटतं. :)

प्रचेतस's picture

6 Feb 2016 - 12:07 pm | प्रचेतस

ते मनुष्यत्वाचे लक्षण.

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 12:50 pm | सतिश गावडे

वाह... मान गये. लेबल लावण्याच्या पलिकडे जाऊन तुम्ही अशा गोष्टींकडे मानवी अनुभव म्हणून पाहता तर.

प्रचेतस's picture

6 Feb 2016 - 1:29 pm | प्रचेतस

हो हो.

पिलीयन रायडर's picture

6 Feb 2016 - 8:45 am | पिलीयन रायडर

आमचे? पुजा जोडीने करायची असते. ते बघा आधी!! ;)

टवाळ कार्टा's picture

6 Feb 2016 - 11:14 am | टवाळ कार्टा

मी त्याबाबतच लिहिले आहे ;)

प्रमोद देर्देकर's picture

10 Feb 2016 - 9:07 am | प्रमोद देर्देकर

पण कोणाचे नामस्मरण करतोय 1 ? हे पण महत्वाचे आहे नाही का वल्लीदा.

कर्दळी वनात का जात आहात? स्वामी सगळी कडे आहेत. मनापासून भक्ति करा. चांगले आचरण ठेवा.

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 10:55 am | सतिश गावडे

या धाग्यात तसेच तुमच्या या प्रतिसादात उल्लेख असलेले स्वामी म्हणजे अक्कलकोट स्वामी का?

विजय पुरोहित's picture

6 Feb 2016 - 11:14 am | विजय पुरोहित

हो...

सतिश गावडे's picture

6 Feb 2016 - 12:32 pm | सतिश गावडे

मांत्रिकबुवा, याच धाग्यावर मी तुमच्या प्रतिसादाला उल्लेखून एक प्रश्न विचारला आहे. त्याचेही उत्तर दया जमले तर. :)

विजय पुरोहित's picture

6 Feb 2016 - 12:54 pm | विजय पुरोहित

आज प्रवासात आहे. सोमवारी देईन उत्तर.

मोगा's picture

6 Feb 2016 - 1:32 pm | मोगा

घरात बसुन पाच वेळा अजाण ऐकावी

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2016 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

कित्ती कित्ती अजाण प्रतिसाद ! =))

बॅटमॅन's picture

10 Feb 2016 - 3:45 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

तर्राट जोकर's picture

6 Feb 2016 - 1:38 pm | तर्राट जोकर

मक्केला कशाला मरायला जातात मग...?

मुक्त विहारि's picture

7 Feb 2016 - 10:08 am | मुक्त विहारि

"मानसपूजा हीच खरी..."

असो,

"जो जे वांछील तो ते लाहो."

जाऊ द्या ते अजाणच आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2016 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुखाचा जीव धोक्यात घालायचाच कशाला ?
कंटाळा आणला राव या लोकांनी. कशाला मरायला जायचं जिथे त्रास होतो तर.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

7 Feb 2016 - 11:34 am | अभ्या..

मग काय तर.
गप्प आपलं नैण्टीथम्साप्बिसलेरीसलाडन्शेंगा घिऊन बसायचं सन्डेला. परत जिस दिन साजन हायेच.

सतिश गावडे's picture

7 Feb 2016 - 11:42 am | सतिश गावडे

ओ तुम्ही त्या बयेला सोडली म्हणता मात्र तुमच्या मनातून ती गेली आहे असं वाटत नाही.

खरं कुणापाशी बोलायचं अन खोटं कुणापाशी हे आम्हाला त्या बयेनेच शिकविले हो धनाजीराव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2016 - 11:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जब से तुने मुझे दिवाना बना रखा है
पत्थर हर शक्स ने हाथ मे उठाया है.

म्हणुन त्या बयेचं नाव घेऊ नका. ;)

-दिलीप बिरुटे