अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
प्रतिक्रिया
16 Nov 2014 - 8:48 pm | प्रकाश घाटपांडे
>>माझी एक खात्री आहे की एरवी हेल्मेट टाळणारे हायवे वर बर्याच वेळा हेल्मेट वापरीत असतील.<<
होय माझेही तेच निरिक्शण आहे.
18 Jan 2019 - 2:34 pm | Rajesh188
जे चालक आणि ज्या चुका दुसऱ्या चा जीव घेण्याला कारणीभूत आहेत त्यांना पहिली फाशी सारखी कठोर शिक्षा देण्याचं कायद्यात प्रावधान करा आणि नंतर हेल्मेट सक्ती
14 Nov 2014 - 3:13 pm | प्रकाश घाटपांडे
(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/mr_IN/all.js#xfbml=1"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs); }(document, 'script', 'facebook-jssdk'));
पोस्ट by Dogs Today Magazine.
14 Nov 2014 - 7:46 pm | मोदक
जोपर्यंत स्वतः / नातेवाईक / एखादा जवळचा मित्र अपघातातग्रस्त होत नाही आणि 'हेल्मेट असते तर...' असा प्रश्न पडण्याइतका मार लागत नाही (आणि अशा पेशंटच्या वेदना आपल्याला "अनुभवण्यास" लागत नाहीत) तोपर्यंतच हेम्लेट वापरणे हे ऐच्छीक असावे.. सरकार कोण नियम करणार किंवा याचा फायदा, त्याचा फायदा वगैरे प्रश्न पडतात.
एखादी केस जवळून पाहिली किंवा जीवावरचे थोडक्यात निभावले की असे प्रश्न पडत नाहीत. हेल्मेट हे सेकंड नेचर होवून जाते.
"मी हेल्मेट वापरणार नाही" अशी प्रतिज्ञा करणार्यांनी स्वत:ला आत्तापर्यंत खूप खूप नशीबवान समजण्यास हरकत नाही.
14 Nov 2014 - 7:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
"मी हेल्मेट वापरणार नाही" अशी प्रतिज्ञा करणार्यांनी स्वत:ला आत्तापर्यंत खूप खूप नशीबवान समजण्यास हरकत नाही.
आणि "मी नेहमी हेल्मेट वापरतो पण त्याची लोकांवर सक्ती करू नका" असे म्हणणारे "आयजीच्या जीवावर बायजी उदार" चा प्रयोग करत आहेत.5 Feb 2016 - 4:40 pm | संदीप डांगे
प्रतिसाद खूप आवडला. अगदी कळकळ जाणवली. बाडीस आहेच हेवेसांनल
14 Nov 2014 - 11:50 pm | श्रीगुरुजी
एक (कु)शंका.
शीखांना सुद्धा हेल्मेट सक्ती करणार का? त्यांना पगडीमुळे हेल्मेट घालणे अवघड असावे. पण अपघातात पगडी डोक्याचा बचाव करू शकणार नाही. मग त्यांचं काय करायचं? का इथेही धर्माच्या आधारावर वेगळे नियम?
15 Nov 2014 - 3:25 pm | इरसाल
शिखांचे पगडी अशी बांधलेली(त्यात असलेले पेड) असते ते जरी दुचाकी वरुन पडले तरी डोक्याला मार लागत नाही.चेहरा वाचविण्यासाठी ते वायज़र लावतात
15 Nov 2014 - 2:15 pm | श्री
हम भारतीय सर पर हेलमेट पहने न पहने पर मोबाइल में स्क्रीन गार्ड और बॉडी कवर जरुर लगाते हैं।
सर फट जाये खून की नदिया बह जाये पर मोबाइल को खरोंच तक नहीं आनी चाहिए !
!!! व्हौटस अप वरुन साभार
15 Nov 2014 - 2:19 pm | प्यारे१
हेल्मेटसक्ती असावी का?
नसावी.
कारण... डोकं नसलेल्यांना त्याची गरज पडणार नाही. धन्यवाद!
15 Nov 2014 - 2:38 pm | प्रकाश घाटपांडे
:-))
15 Nov 2014 - 8:42 pm | पिवळा डांबिस
एकेक प्रतिसाद वाचून खूप करमणूक झाली.
पण धाग्यावरचे बहुतेक पुणेकर प्रतिसाद फक्त पुरूषांनी दिलेले दिसताहेत.
पुणेकर भगिनी का गप्प आहेत अजून?
की
१. हा कायदा स्कूटी या वहानाला (?) लागू नाहिये?
२. हा कायदा फक्त पुरूष चालकांनाच लागू होणारे?
३. जर तोंडावरून फडकं गुंडाळलेलं असेल तर हेल्मेटची सक्ती नाही असं काही कायद्यात आहे का?
४. "पुरूष, तुम लडो, हम हमारा फडका संभालते है", अशी काही भूमिका आहे?
५. आपले पुरुष उगाच हा येडपट वाद घालताहेत हे बघून भगिनी सुज्ञपणे मूक राहिल्यात?
असं करू नका.
तायांनो, आयांनो, आणि बायांनो,
सुदिन सुवेळ पकाकाकांनी हा गोंधळ मांडलाय,
तुम्ही विचार मांडायाला या!!!!
:)
16 Nov 2014 - 1:10 am | अत्रुप्त आत्मा
=))
16 Nov 2014 - 11:49 am | प्रकाश घाटपांडे
:-))
26 Nov 2014 - 3:30 pm | वेल्लाभट
त्रिवार लोल
16 Nov 2014 - 9:21 pm | बहुगुणी
21 Nov 2014 - 9:18 pm | धर्मराजमुटके
पुण्यातली अजून एक बातमी इथे वाचा.
21 Nov 2014 - 9:48 pm | मराठे
हेल्मेटच्या व्याख्या नीट केली आहे का कायद्यात? कारण मागे दिल्लीला एकदा एका स्कूटरवाल्याला डोक्यावर प्लास्टीकची परडी उपडी ठेऊन एका हाताने परडी व दुसर्या हाताने त्याची स्कूटर चालवताना याची देही याची डोळा बघितल्यानंतर अशी हेल्मेट्सक्ती नको रे बाबा म्हणावसं वाटलं होतं.
दुसरी गोष्ट, हेल्मेटचं थोडंसं सिगरेट, तंबाकूसारखं आहे. त्यावर अशी सरसकट बंदी का बरं येत नाही? उत्तर सगळ्यांना माहीतच आहे.
22 Nov 2014 - 2:51 pm | चौकटराजा
सरकारला मधुनच एकदम नागरिकांच्या सुरक्षिततेचे भरते येते.एक कायदा केला की आपण मोकळे असा यांचा यात सांसद, आमदार, मंत्री सगळे आले. आता तर एकाने म्हणे हेल्मेट सक्तीला विरोध करणार्याना कोर्टाचा अवमान केल्याशी शिक्षा व्हावी असा पब्लिक क्राय पिटीशन केला आहे म्हणे. त्याच माणसाने २००८ साली कोर्टानेच मुंबईच्या फलाटांची उंची वाढवावी असा आदेश देउनही तो आदेश भारत सरकारने कचर्यात टाकला आहे, याबद्द्ल भारत सरकार विरूद्धच असा दावा दाखल करावा. जनेतला फक्त उत्तर दायित्व आहे प्रशासनाला नाही ही कसली भंपक लोकशाही ? अनेकांचे प्राण सरकारच्या दुर्लक्षामुळे गेले आहेत यात सरकारला काय विकृत आनंद मिळतो कळत नाही.
22 Nov 2014 - 6:39 pm | मदनबाण
Motor Vehicles Act, 1988 च्या Section 129 नुसार हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे गुन्हा आहे.
या अर्थाने पुणेकर कायद्याचा विरोध देखील करत आहेत.
अधिक इकडे :-
Motor Vehicles Act, 1988
Section 129 in The Motor Vehicles Act, 1988
Penalties under MVA { क्रमांक १८ पहा}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }
22 Nov 2014 - 9:21 pm | चौकटराजा
पुणेकरांचे नाव यात बिन पुणेकर घेतात त्यानी दोन गोष्टी लक्षात घ्याव्या.
१. पुण्यात सार्वजनिक वहातुक मुंबईएवढी चांगली नाही . व विकसित ही नाही. त्यामुळे सक्तीचा जास्त विरोध पुण्यात होतो.
२. नुकताच मी मुम्बईस गेलो होतो व साधारण अर्धा तास क्रॉफर्ड मार्केट समोर उभा राहून निरिक्षण केले तर जवळ जवळ निम्मे दुचाकीस्वार हेलमेट विना होते. व पोलीस शांतपणे पहात होते. मुंबईत सगळीकडे हेलमेट सक्तीचे केल्यास पिलियन व रायडर दोघांचे हेल्मेट्स गाडीवर घातल्यास गाडीची पार्किम्ग मधील रुंदी वाढून आणखी अनवस्था प्रसंग मुंबईकरांवरही ओढवेल. व हेल्मेट स्वतः बरोबर न्यायचे झाल्यास लोकल गर्दीत कसे घुसता येईल याचा विचार पुणेकरांवर फालतू टीका
करण्यापूर्वी करावा. आमचा एम व्ही कायदा १९८८ बरोबर २२ वर्षे संबध आला आहे. त्यातील सर्वच प्रोव्हीजन अमलात आणावयाच्या झाल्यास पुणेकर व मुंबईकराना एव्हरेस्टवरच रहायला जावे लागेल.
24 Nov 2014 - 10:16 am | मदनबाण
पुणेकरांचे नाव यात बिन पुणेकर घेतात त्यानी दोन गोष्टी लक्षात घ्याव्या.
गंमतच आहे,जर महाराष्ट्रातल्या इतर शहरात लोक हेल्मेट घालुन कुठलीही कारणं आणि इतर सबब न सांगता प्रवास करु शकतात तर पुणेकरांनाच या गोष्टीच वावडं का आहे ? कायदा हा समान असल्याने पुणेकर आणि बिन पुणेकर हा विचारच चुकीचा आहे.
पुण्यात सार्वजनिक वहातुक मुंबईएवढी चांगली नाही . व विकसित ही नाही. त्यामुळे सक्तीचा जास्त विरोध पुण्यात होतो.
हेल्मेटचा आणि सार्वजनिक वाहतुकीचा काय संबंध ?
नुकताच मी मुम्बईस गेलो होतो व साधारण अर्धा तास क्रॉफर्ड मार्केट समोर उभा राहून निरिक्षण केले तर जवळ जवळ निम्मे दुचाकीस्वार हेलमेट विना होते. व पोलीस शांतपणे पहात होते. मुंबईत सगळीकडे हेलमेट सक्तीचे केल्यास पिलियन व रायडर दोघांचे हेल्मेट्स गाडीवर घातल्यास गाडीची पार्किम्ग मधील रुंदी वाढून आणखी अनवस्था प्रसंग मुंबईकरांवरही ओढवेल. व हेल्मेट स्वतः बरोबर न्यायचे झाल्यास लोकल गर्दीत कसे घुसता येईल याचा विचार पुणेकरांवर फालतू टीकाकरण्यापूर्वी करावा.
चांगल निरिक्षण केलेत,पोलिसांना हेल्मेट न घालता दुचाकी चालवणार्या पकडायचे हेच एक काम उरले आहे,आधिच त्यांच्यावर ताण जास्त आहे त्यात ह्याची भर ! बाकी मी सुद्धा निरिक्षण करतो बरं का... आणि माझ्या देखत अनेक दुचाकी स्वारांना हेल्मेट न घातल्यामुळे पकडले आहे, तर मी स्वतः हेल्मेट घालुन प्रवास करतो तरी सुद्धा लायसन्स, पीयुसी आणि गाडीची कागदपत्रे पडताळण्यासाठी अनेकवेळा थांबवले आहे,अगदी पावसाळ्यात सुद्धा. इतके वर्ष मी हेल्मेट वापरतोय आणि ते घेउन कुठेही प्रवास करताना मला त्रास झाला नाही. बँक, मॉल, मंडई, इं अनेक ठिकाणी हेल्मेट न्यायला त्रास झालेला नाही. बाकी पुणेकरांपेक्षा ट्रेनच्या प्रवासाचा जास्त अनुभव मुंबईकरांनाच आहे... त्यामुळे रेल्वेच्या प्रवासात इतक्या वेगवेगळ्या वस्तु घेउन जाताना मी पाहिले आहे त्यापुढे हेल्मेट काय चीज आहे ?
आमचा एम व्ही कायदा १९८८ बरोबर २२ वर्षे संबध आला आहे. त्यातील सर्वच प्रोव्हीजन अमलात आणावयाच्या झाल्यास पुणेकर व मुंबईकराना एव्हरेस्टवरच रहायला जावे लागेल.
नवलं आहे... इतका संबंध असुन सुद्धा फालतु कारणे देणे चालुच आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
26 Nov 2014 - 3:29 pm | वेल्लाभट
नसेलच मानायची गोष्ट एखादी तर कारणं मिळतच जातात व्यक्तीला....
24 Nov 2014 - 5:07 pm | नाखु
मुळातच पुण्यातील सार्वजनिक वहातुक अतिशय बेभरवशी आणि भोंगळ आहे त्यामुळेच कात्रज्-कोथरूड्-आनंदनगर-सिंहगड रस्ता ते चाकण्-रांजण्गाव्-तळेगाव (मावळ)असा प्रवास अत्यंत नाईलाजाने दुचाकीवर करावा लागतो हे नजरेआड करून चालणार नाही.
अगदी बहुचर्चीत "बस्-दिन (का दीन)" दिवशी प्रशासन चिंचवड(वाल्हेकरवाडी)तून थेट भोसरीपर्यंत बस देऊ शकले नाही.
तस्मात पुण्यात दुचाकी हे कुटुंब वाहन आहे आणि हेल्मेट सक्ती हाच (फक्त्)त्यावरील उपाय नाही.
ईतके प्रवाशी उपलब्ध असताना पिएम्पील कायम तोट्यातच का ? याचा कधीही कुणीही का विचार केला नाही?
का सगळीकडेच सार्वजनिक वहातुक तोट्यात आहे?
26 Nov 2014 - 10:10 am | थॉर माणूस
>>>ईतके प्रवाशी उपलब्ध असताना पिएम्पील कायम तोट्यातच का ? याचा कधीही कुणीही का विचार केला नाही?
फालतू कारणांवरून गोंधळ घालणे इतके साधे कारण आहे हो... आठवा, जेव्हा एसी वोल्व्हो सुरू केल्या तेव्हा त्यांचा दर जवळपास तिप्पट ठेवण्यात आला होता (जे अर्थातच योग्य होते) पण अतिशहाण्या पुणेकरांनी आंदोलने करून तो दर साध्या पीएमटीच्या दराजवळ आणायला लावला. हळूहळू एसी बंद, फुटलेल्या काचा न बदलणे, दरवाजे खराब होणे, पुढचा थांबा सांगणारी यंत्रणा बंद होणे वगैरे होत आता ती वोल्व्हो म्हणजे जरा बरी पीएमटी इतकाच अर्थ राहीला त्याला.
तुम्हाला आहे त्या पब्लिक ट्रान्सपोर्टने जायला नको वाटते - केवढी ती गर्दी, गाड्या मेंटेन केल्या जात नाहीत धूर सोडतात वगैरे कारणे लगेच सुरू. नव्या चांगल्या सोयीच्या गाड्यांना जास्त भाडे पण भरायला नको, लगेच सामान्यांना वंचित ठेवले वगैरे ओरड सुरू. डबल ढोलकी बडवणे यापलीकडे काही जमते का या आंदोलन छाप लोकांना?
असेल की तिथे भ्रष्टाचार, मान्य आहे. पण सगळं नीट होईपर्यंत मी बसने जाणार नाही हा हट्ट झाला. जोवर त्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत तोवर ते सुद्धा काही सुधारु शकणार नाहीत. मग कोंबडी आधी कि अंडे असा प्रश्न उभा रहातो ना.
साधी अपेक्षा आहे, एवढे जर जबाबदार हुशार वगैरे असाल की यंत्रणेला अक्कल शिकवू शकता तर आधी स्वतः तसे नीट वागून तर दाखवा. साधे नियम पाळता न येणारे पुणेकर उगाच परिवहन कायद्याविरोधात आंदोलने करतील तर त्याला गंभीरपणे घेण्याची काही गरज नाही असे माझे स्पष्ट मत आहे, उलट अशा वेळेस हे कायदे तिप्पट आक्रमक आणि कडक पद्धतीने राबवले गेले पाहिजेत असं मला वाटतं.
(१०३, ११०+२ ने ५ एक वर्षे आणि २४ नंबरने तितकीच वर्षे प्रवासाचा अनुभव असलेला)
थॉर माणूस
24 Nov 2014 - 5:14 pm | चौकटराजा
आपल्याकडे कसलाही कायदा करताना त्याच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष शक्यता लक्षांत घेत नाहीत. अमुक कायदा अमेरिकेत झालाय मग आपणही तो करू. असे बरेच तज्ञ सुचवीत असतात. आय एम व्ही कायदा हा ही असाच. पुण्यात सार्वजनिक वहातुक व्यवस्था बरोबर नाही. सबब दुचाकीचा वापर अटळ. सबब दुचाकींची संख्या जास्त. सबब रस्त्यांच्या रुंदीच्या मानाचे रत्यावर येणार्या दुचाकींची संख्या जास्त परिणामत: वेगाने वहान नेऊन घसरून पडण्याची शक्यता कमी. पण दुसर्या बाजूने विचार केला तर दुचाकींची संख्या इतर जिल्हा ठिकाणांच्या मानाचे जास्त सबब " वसुली" ची शक्यता जास्त. म्हणून नांदेड मधे हेलमेट सक्ती, अमरावतीत हेलमेट सक्ती अशा बातम्या येत नाहीत. कारण ही सक्ती पुण्यातच उकरून काढली जाते. त्याचे कारण वर सांगितले आहे. आता टोलला कोल्हापुरात विरोध होतो पुण्यात नाही म्हणून कोल्हापुरवाले अतिशहाणे आहेत असे पुणेकरानी म्हणायचे का ? तिथे पराकोटीचा विरोध होतो याला काही युक्त असे कारण असेलच की नाही ? आता आय एम व्ही कायद्याबाद्द्ल. यातील वाहन नोंदणी ची प्रोसेस पाहू. यात आर टी ओ इन्स्पेक्टरने डीलर कडे जाउन कायद्याने स्वत" गाडीचे हेड टेल लॅम्प , इंडीकेटर चेक करून पहाणे , चासीसचे ट्रेसिंग फॉर्म २० वर स्वत: घेणे अपेक्षित आहे. असे जर कायदा पाळावयाचे ठरविले तर एक इन्स्पेक्टर ८ तासांच्या कार्यकाळात सुमारे ३५० दुचाकी कशा तपासून पाहील बरे. सबब हे तपासून न पहाण्यासाठी तो पैसे खातो व दोन मिनिटात गाडी रजिस्टर होण्यासाठी होकाराची सही करतो. यातील गाळा पार " वर" पर्यंत अधिकाराच्या प्रमाणात मिळत असतो. आज प्रत्येक माणसाने किमान थर्ड पार्टी विमा तरी उतरवला पाहिजे असा नियम आहे. तरीही साधारणपणे गाडी जुनी झाली की तो गायब होतो. हे पोलिसाना माहीत आहे. पण त्यात पोलिसाना विमा कंपनी " गाळा" देत नसावी म्हणून त्याची तपासणी होत नाही. दुसरे एक उदाहरण घ्या. नंबर प्लेटचे . मला किती वेळा असे वाटते की मला जर पोलिसानी रीतसर कमिशन दिले तर एका दिवसात ९० टक्के बेकायदेशीर नंबर प्लेटच्या केसेस मी त्याना एखाद्या चौकात दाखवू शकेन. बहुतेक सार्या नंबर प्लेट आय एम व्ही मधे वर्णन केल्या प्रमाणे नसतातच. पोलिसानी खरेच मनात आणले तर
दिवसाला लाखो रूपयांच्या पावत्या एकेका चौकात फाडल्या जाउन शकतात( पावत्या फाडणे हा खास आर टी ओ तील शब्द)पण आपले वहातुक पोलिस कसे एकाच कोपर्यात टोळके करून उभे रहातात. ते सर्वानाच दिसते आहे. कायद्याने काही उत्तरदायित्व सरकारवर आले की ते कायद्याला कसे धुडकावून लावते याचे उदाहरण म्हणजे ३५० दुचाकीच्या रजिस्ट्रेशन साठी के आर टी ओ इन्सपेक्टर हे आहे. याधी मुंबईचे फलाटांविषयक कोर्टाचा अव्हेर कसा केला गेला आहे हे उदाहरण यापूर्वी या धाग्यात आले आहेच.
24 Nov 2014 - 10:17 pm | मदनबाण
@नाद खुळा
मुळातच पुण्यातील सार्वजनिक वहातुक अतिशय बेभरवशी आणि भोंगळ आहे त्यामुळेच कात्रज्-कोथरूड्-आनंदनगर-सिंहगड रस्ता ते चाकण्-रांजण्गाव्-तळेगाव (मावळ)असा प्रवास अत्यंत नाईलाजाने दुचाकीवर करावा लागतो हे नजरेआड करून चालणार नाही.
फक्त पुण्यातच नव्हे तर ठाण्यात देखील { टीएमटी } सार्वजनिक वहातुक अतिशय बेभरवशी आणि भोंगळ आहे त्यामुळे दुचाकी किंवा रिक्षा या शिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही.ठाण्यात ४० हजारा पेक्षा जास्त रिक्षा या विना-परवाना धावत आहेत, आणि या वरुनच सार्वजनिक वाहतुकीचे ३-१३ कसे वाजले आहेत याचा अंदाज यावा.मला वाटत ही सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी सार्वजनिक वहातुक व्यवस्था असावी. ठाण्यातली ही सार्वजनिक वहातुक ठाण्याच्या लोकसंख्येला देखील अपुरी आहे, त्यामुळे खाजगी बस चे पेव सुद्धा पसरले आहे.बेस्ट टीएमटीला टेक ओव्हर करणार अशी बातमी येताच टीएमटीवाल्यांचा लगेच विरोध होतो. कित्येक वर्षापासुन टीएमटी बेस्ट मधे विलीन केली जावी अशी मागणी आहे,पण मागणी होताच त्याला कडाडुन विरोध केला जातो,त्यामुळे नागरिकांचे हाल कुत्रा सुद्धा खात नाही.
संदर्भ :- टीएमटी के 'बेस्ट' में विलय की मांग तेज { साल -२०१० }
अनियमिततेमुळेच टीएमटी तोटयात? { साल -२०१२ }
टीएमटीच्या बेस्ट विलीनीकरणाचे पुन्हा वारे {साल २०१४ }
टीएमटी बस सेवा 'बेस्ट'मध्ये विलिन होणार {साल २०१४}
टीएमटी ‘बेस्ट’ होण्यास सेनेचा खोडा {साल २०१४ }
{मिपा वाचणारे कोणी मोठे प्रभावी व्यक्तिमत्व असेल तर त्यांनी ठाण्यात पूर्णपणे बेस्ट वाहतुक सुरु करुन ठाणेकरांना रोजच्या प्रवासाच्या चिंतेतुन मुक्ती द्यावी ही विनंती.}
@ चौकट काका
सबब रस्त्यांच्या रुंदीच्या मानाचे रत्यावर येणार्या दुचाकींची संख्या जास्त परिणामत: वेगाने वहान नेऊन घसरून पडण्याची शक्यता कमी.
अजिब तर्क आहे, रस्ता लहान असो वा नसो दुचाकी स्वाराला त्यांच्या समतोल ठेवण्याच्या क्षमतेवरच वाहन हकावे लागते, मध्यंतरी माझ्या नेहमीच्या हायवे वर एक उड्डानपुल लागतो त्यावरुन जात होतो तेव्हा अचानक पेव्हर ब्लॉकचा एक तुकडा माझ्या बाईकच्या टायरखाली आला होता, माझ्या पुढे ट्रक असल्याने मला तो पटकन दिसला नाही, मी जवळपास ताशी ५५-६० च्या वेगात होतो आणि पडता पडता वाचलो. त्यामुळे रस्ता लहान असो वा हायवे तुमचा " तोल" सांभळेच महत्वाचे असते.
महणून नांदेड मधे हेलमेट सक्ती, अमरावतीत हेलमेट सक्ती अशा बातम्या येत नाहीत. कारण ही सक्ती पुण्यातच उकरून काढली जाते. त्याचे कारण वर सांगितले आहे.
ही फक्त पुण्यातच नाही तर अगदी राजधानी दिल्ली मधे तर महिलांना सुद्धा करण्यात आलेली आहे.हैद्राबाद मधे आहे,तर बेळगाव मधे सुद्धा ती आहे.त्यामुळे फक्त पुणेकरांवरच ती लादली गेली आहे असे वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे.
संदर्भ :-
दिल्लीत महिलांना हेल्मेट सक्ती
लवकरच हेल्मेट सक्ती
ऑक्टोबरपासून दुचाकी स्वारालाही हेल्मेटसक्ती
Govt mulls making helmets compulsory on all roads
पिलीयन रायडरला फक्त हायवे वर हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. वाहन चालवणारा जर जिवंत राहिला तर त्याचे कुटुंब जगु शकेल ! आत्म सुरक्षतेला महत्व हे द्यायलाच हवे, आणि त्यासाठी काहीही कारणे देणे हे नक्कीच सुज्ञपणाचे लक्षण नाही.
हा व्हिडीयो ७:४० पासुन पुढे पहावा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
25 Nov 2014 - 8:10 am | चौकटराजा
सबब रस्त्यांच्या रुंदीच्या मानाचे रत्यावर येणार्या दुचाकींची संख्या जास्त परिणामत: वेगाने वहान नेऊन घसरून पडण्याची शक्यता कमी.
अजिब तर्क आहे वरील तर्क अजब नाही. तोल सांभाळण्याची क्रिया माणसाचे अंतर्मन अपोआपच करीत असते. मधे कित्येक महिने गाडी चालविली नाही तरी काही फरक पडत नाही.मेंदू एका क्षणात ते कौशल्य पुन्हा प्रापत करतो.
आता गाडी घसरण्याची कारणे पहा. १. रस्ता पुरेसा खरबरीत नसणे २. गाडीचा टायर अति मुलायम होणे ३. रस्ता पाण्याने ओला असणे. ४. रस्त्यात वाळू असणे ५. रस्त्यावर तेल पडलेले असणे. ६ रस्त्यावर पातळ चिखल झालेला असणे. ७, अचानक खड्डा येणे. स्पीड ब्रेकर येतो आहे या कडे चालकाचे लक्ष नसणे. यासाठी आटो गिअर गाड्यासाठी अशा जागी कमी वेगाने गाडी चालविणे व गिअर गाड्यासाठी किमान एक गिअर खालचा घेउन वहान हाकणे आवश्यक आहे. वेग गुणीले वरील स्थीती यांमुळे रोड ग्रीप कमी होऊन गाडीचे व रत्याचे नाते तुटते व गाडी घसरते. जे लोक पावसाळ्यात आपल्या कौशल्यात बदल करतात त्याना ही गाडी सटकण्याची भिति कमी वाटते असा माझा स्वता: चा अनुभव आहे.
आता पिलीयन रायडरला फक्त हायवे वर हेल्मेट घालणे सक्तीचे आहे या मागचे तर्क्ट काय असावे हे समजावून सांगाल काय ? का पिलियन सीटवर शहरसीमेत अमृत प्राशन करण्याची सोय आय एम व्ही कायदा १९८८ ने केली आहे ?
25 Nov 2014 - 9:09 am | मदनबाण
सबब रस्त्यांच्या रुंदीच्या मानाचे रत्यावर येणार्या दुचाकींची संख्या जास्त परिणामत: वेगाने वहान नेऊन घसरून पडण्याची शक्यता कमी.
तुम्ही जी घसरण्याची कारणे दिली आहेत त्याचा आणि रस्ताच्या रुंदीचा काय संबंध ? जी कारणे दिली आहेत ती कुठल्याही रस्त्याला लागु पडतील त्याचा लांबी-रुंदी काहीही संबंध नाही आणि म्हणुन मी अजिब तर्क आहे असे म्हंटले आहे.
बाकी दिलेला व्हिडीयो पाहिलात का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }
25 Nov 2014 - 4:35 pm | चौकटराजा
आपल्याला "बॉटलनेक" हा शब्दप्रयोग माहीत असेल. जेंव्हा चार लेन ची रूंदी दीड लेन पर्यंत कमी होते त्यावेळी अगदी आपसुकच सर्व वहानांचा वेग त्याठिकाणी कमी होतो. कोणत्याच वहानाला दुसर्या लेन मधे प्रवेश न घेण्या इतके ट्राफिक झाले की बोटल नेक नसतानाही गाड्यांचा वेग कमी होतो. बॉटलनेक चे उदा. पुण्यातील खडकी येथील नदीकाठचा चौक. किंवा सी ओ ईपी चा चौक. या चौकात गाडी घसरली असे होणारच नाही. स्पीडच इतका की आपोआप दोन्ही पाय टेकत माणूस गाडी हाकतो. बंगलोर मधे तर पाच पाच लेन फुल्ल्ल भरलेले असतात. की बेदरकार पणे नागमोडी जात शेवटच्या लेनला जाणेच दुरापास्त आहे. मग गाडी घसरणार कोठून आणि जबरी मार लागणार कोठून ? पहाटे रात्री अपरात्री प्रवास करायचा असेल तर हेल्मेट आपणहून घालणेच श्रेयस्कर. मी दिलेल्या कारणात रस्त्याबरोबर वेग हे एक परिबळ आहे. त्याचा विचार करताना रस्ता रूंद आहे ही अरुंद हे माप त्या रत्याची प्रत्यक्ष रूंदी हे नसून त्यावर वेगाने गाडी हाकण्यास मोकळी जागा उपलब्ध किती असे आहे. मुळात वेग, ओव्हरटेक व वळण या तीन वर चालकाचे लक्ष हवेच . हेलमेट विषय
महत्वाचा पण दूरचा.
25 Nov 2014 - 4:44 pm | मदनबाण
मग गाडी घसरणार कोठून आणि जबरी मार लागणार कोठून ? मी परत तेच सांगतोय, परत एकदा अजुन सोप्पे करुन सांगतो :- अपघात हा सांगुन होत नाही, त्याला कोणतेही निमित्त्य चालते. वेग कमी असो वा जास्त,रस्ता रुंद असो वा महामार्ग अपघात कधीही आणि कोणत्याही कारणाने होउ शकतो. ज्या हेल्मेटमुळे तुमच्या कवटीत असलेला मेंदु जबर मार बसण्या पासुन वाचु शकतो ते वापरणे हे सरकारने बंधन कारक करावे ही वेळ यावी यातच आपल्या देशात व्यक्तीगत सुरक्षते बाबत असलेला कमालिचा उदासिनपणा दिसुन येतो.
जाता जाता :- सर सलामत तो पगडी पचास ! ही म्हण आपल्या ठावुक असेलच !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }
26 Nov 2014 - 10:25 am | काळा पहाड
"म्हणजे ज्यांच्या कवटीत असतो त्यांच्या" असं लिहा आधी. नाहीतर पुणेकर या कंपल्शन वर पण भडकतील.
26 Nov 2014 - 10:57 am | मदनबाण
"म्हणजे ज्यांच्या कवटीत असतो त्यांच्या" असं लिहा आधी. नाहीतर पुणेकर या कंपल्शन वर पण भडकतील.
किंवा पुणेकर पोलिसांनी पाटी बनवावी... मेंदु गुढघ्यात असणार्यांना दंड आकारण्यात येणार नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
सहा वर्षांनंतरही तेच प्रश्न!
गेली सहा वर्षे काय करत होता?
वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर :(
26 Nov 2014 - 3:25 pm | वेल्लाभट
कुठनं कुठे जाते नई चर्चा :D
25 Nov 2014 - 9:05 am | फोटोग्राफर243
हेल्मेट ची सक्ती असावी की नाही या पेक्षा आपण दुचाकी स्वार हेल्मेट घातले तर कसा सुरक्षित राहू शकतो या बद्दल का नाही चर्चा करत? मान्य आहे की पोलीस या बाबतीत नीट वागत नाही, पण आपण शेवटी आपली सुरक्षा आणि हीत पहावे
25 Nov 2014 - 4:15 pm | चौकटराजा
हेलेमेट सक्तीला विरोध करणारा प्रत्येक माणूस हेलमेटने दुचाकी स्वाराची सुरक्षितता वाढते हे मनोमन स्वीकार करणारा असतोच.पण नाक्यावरच्या मंडईत कोथिंबीरीची गड्डी आणायला गेलो व हेलमेट घालायला विसरलो तर पोलिस पकडतील का याचा घोर नको म्हणून ही सारी चर्चा. हेलमेट बरोबरच एक विशिष्ट प्रकारचा सुरक्षा पोषाख असतो तो खांदे गुढगे, हातात खास प्रकारचे कातडी ग्लोव्हज ही मिळतात जे अधिक सुरक्षा देतात. असा पोषाख जे ऑटोमोबाईल कंपन्यामधे कामाला आहेत किंवा आमच्या सारखे होते त्यांच्या परिचयाचा आहे. पण शेवटी सारी सावधानता ही सापेक्ष असते.आयुष्यातील क्षणाक्षणाचा विमा आपण उतरवू शकत नाही . .आपण किती जगावे कधी मरावे याचा पक्का हिशेब कुणालाच मांडता येत नाही. मरण तर हेलमेट घातलेल्या क्रिकेटरला पोटात चेंडूचा जबरी मार बसूनही येते. हेलेमेटची सक्ती करताना परदेशी लोक ते गाडीत कुठे लपवितात. याचा अभ्यास झालाच पाहिजे. प्रत्येक दुचाकीला ज्या प्रमाणे २ आरसे ,हॉर्न टर्न इंडीकेटर्स कंपल्सरी असतात तसे ते दोन हेल्मेट्स हा ही गाडीचाच भाग झाले पाहिजेत.त्याचा परिंणाम गाडीचे वजन किती वाढते, लांवी किती वाढते वा रुंदी किती वाढते याचा सर्व विचार करून दुचाकी वहाने डिझाईन झाली पाहिजेत. त्याचे पार्किंग व्यवस्थेवर काय विपरित परिंणाम होतात हे ही पाहिले पाहिजे. चारचाकी ला बेल्ट सक्तीचा केला आहे त्यात गाडीच्या वजनात व अवकाशात फारसा फरक होत नाही. दोन हेलमेट्स व दुचाकी यांचे नाते कार- बेल्ट एवढे सोपे नक्कीच नाही. हेलमेट वापरा तरच नोकरीवर या असे काही कम्पन्या करतात असे आवाहन सर्व लहान मोठ्या कंपन्याना केल्यास बरेच लोक हेल्मेट वापरू लागतील. मग ते तपासण्याचा भार व कारण पोलिसाना रहाणार नाही.
25 Nov 2014 - 6:43 pm | कपिलमुनी
महाराष्ट्रामध्ये हेल्मेट ची सक्ती फक्त पुण्यातच आहे का ?
की सर्व शहरांमध्ये आहे ? आणि अंमलबजावणी पुण्यात होते ?
26 Nov 2014 - 10:26 am | काळा पहाड
महाराष्ट्रात बाकीची शहरं पण आहेत?
5 Dec 2014 - 4:12 am | मुक्त विहारि
धन्य ते पुणे आणि धन्य ते पुणेकर...
असो,
एकूणच पुर्वी सारखे पुणे राहिले नाही आत्ताशा....
माझा मित्र त्याच्या भावाला घेवून येत होता.मोटरसायकलचा वेग जास्त न्हवता, पण गाडी घसरली.मित्राच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने, मित्र वाचला पण त्याचा भाऊ मात्र कोमात गेला आणि एक ८-१० दिवसांत मित्राचा भाऊ देवाघरी गेला.
असो,
एका वाक्यात सांगायचे तर, प्रत्येक मनूष्य आपापली अमुल्य वस्तू सांभाळायचा जीवापाड प्रयत्न करतो.
4 Feb 2016 - 12:52 pm | मोदक
सकाळमधील बातमी
२०१४ मध्ये दुचाकीच्या अपघातात २१९ जणांचा बळी गेला. त्यापैकी २१८ जणांनी हेल्मेट परिधान केले नव्हते;
तर गतवर्षी २०१५ मध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २४० दुचाकीस्वारांपैकी २३९ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याची बाब समोर आली आहे.
आता तरी हेल्मेट वापरा लोकहो..!!
4 Feb 2016 - 1:18 pm | संदीप डांगे
संपूर्ण राज्यात हेल्मेटसक्ती करणार आहेत असे पेपरात होते आज. तसे लवकर घडावे अशी सरकारास प्रार्थना.
4 Feb 2016 - 1:28 pm | कैलासवासी सोन्याबापु
हेलमेट नक्की वापरा
हेलमेट खर्चात कपात म्हणून कृपया रस्त्यावरील विक्रेत्यांकडून हेलमेट घेऊ नका, दर पाच वर्षांनी हेलमेट बदला
विनंती समाप्त
-बाप्या
4 Feb 2016 - 2:17 pm | मोदक
पांच वर्षे? मी तर तीन वर्षे सुचवेन.
तीन वर्षे किंवा एक अपघात (One Fall)
5 Feb 2016 - 4:08 pm | मम्बाजी सर्वज्ञ
one fall??? हेल्मेट बदलणे सोडा, हेल्मेट आपल्याला योग्य आहे कि नाही हे सुधा न बघता निव्वळ वापरायचे म्हणून वापरतात. ते खरे तर असे असायला हवे कि गालांवर घट्ट बसेल आणि डोकं डावी-उजवीकडे हलवलं तर हेल्मेट दुग्दुग्णार नाही. बरेच लोक दुसर्याचे हेल्मेट डोक्यावर 'लावतात' आणि बाहेर पडतात. प्रत्यक्षात अपघात झाल्यावर त्याचा उपयोग होत नाही कारण धक्का बसल्यावर एक तर ते उडून तरी पडते नाही तर चेहऱ्याभोवती सरकते आणि इजा होते. मी एका गृहस्थाना ओळखतो, ते गेली २० वर्षे एकाच हेल्मेट वापरतायत, त्यात कुठल्याही प्रकारचा बदल न करता.......
5 Feb 2016 - 3:10 pm | नितीनचंद्र
कुणीतरी असे हेल्मेट शोधा जे घातल्यावर उन्हाळ्यातही थंड वाटेल आणि घाम येणार नाही तसेच त्याच्या वजनाने सर्व्हाईकल स्पॉन्डेलिसीस होणार नाही. बाकी सर्व ठिक आहे.
जे मोटरसायकल चालवत नाहीत ते पब्लीक लिटीगेशन अॅप्लीकेशन करुन हेल्मेटची सक्ती करवतात.
स्पीड ब्रेकर्स न समजल्यामुळे किती अपघात घडतात याची जबाबदारी कोण घेतो ?
5 Feb 2016 - 3:45 pm | संदीप डांगे
नितीनचंद्रजी, एवढ्यातच मी कॅप्टन जॅक स्पॅरो ह्यांच्या धाग्यावर काही अनुभव मांडले,
माझ्या ओळखीतल्या तीन-चार जणांचे अपघात, त्यात दोन जणांचा मृत्यु, दोघांचे डोके फुटून कित्येक दिवस आयसीयुत काढावे लागले, एका नवविवाहितेला दात गमवावे लागले. ह्या सर्व प्रकरणांत रस्त्यांचा, वाहतूकीचा, सरकारच्या कडून होणार्या कुठल्याही हलगर्जीचा संबंध नव्हता. झालेल्या अपघातांची तीव्रता फक्त हेल्मेट न घातल्याने भयंकर वाढली. पैकी जे दोघे जीव वाचले त्यांना तात्काळ मदत उपलब्ध झाली म्हणून, अगदी १०-१५ मिनिटात ते ऑपरेशन टेबलवर होते. भयंकर ट्रॅफिकमधे हे शक्य असते काय?
आपल्याच जीवाशी खेळ करुन दुसर्यांवर दोष देणे यापेक्षा उद्वेगजनक काय असावे? हेल्मेटसारख्या जीवरक्षक बाबींवर जर आपल्याला चर्चा करायला लागत असेल तर 'हे मुसलमानांविरूद्ध षडयंत्र आहे म्हणून पोलिओ डोस देउ नका' असे म्हणणार्या पाकिस्ताण्यांमधे आणि 'हेल्मेटसक्ती ही विशिष्ट लोकांचे स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी आहे' असे म्हणणार्या आपल्यात काय फरक राहिला?
जे मोटरसायकल चालवत नाहीत ते पब्लीक लिटीगेशन अॅप्लीकेशन करुन हेल्मेटची सक्ती करवतात.
ह्याने त्या मोटरसायकल न चालवणार्यांना काय फायदा पोचत असावा?
5 Feb 2016 - 3:53 pm | मोदक
स्पीड ब्रेकर्स न समजल्यामुळे किती अपघात घडतात याची जबाबदारी कोण घेतो ?
बर्र चला ती सरकारची जबाबदारी. आपण मोदींचा राजीनामा मागू. पण स्पीडब्रेकर न समजल्याने होणारा अपघात थांबणार आहे का?
हेल्मेट घातले असेल तर अपघाताची तीव्रता "जीवघेणा" वरून "गंभीर" पर्यंत जरी कमी झाली तरी हेल्मेटसक्तीचा उद्देश साध्य होणार नाही का?
5 Feb 2016 - 3:22 pm | श्रीगुरुजी
पुण्यात हेल्मेटसक्तीचे भूत अजून २-३ आठवडे चालेल. त्यानंतर सर्व काही थंड होईल. एका ठराविक कालावधीनंतर हेल्मेटसक्ती करण्याचा कीडा कोणाच्या तरी डोक्यात वळवळतो व नंतर २-३ आठवडे पोलिस व हेल्मेट उत्पादकांची चांदी झाल्यावर सर्व थंड होते. यावेळीही तसेच होणार आहे.
रस्ते सुधारणे, खड्डे बुजविणे, ड्रेनेजची वर आलेली झाकणे रस्त्याच्या पातळीत करणे, वाहतुकीच्या नियमांची सक्ती करणे अशी अपघात करणारी एकापेक्षा एक दादा कारणे असताना त्याविषयी चकार शब्द न काढता हेल्मेटसक्तीचे भूत सुरू झाले आहे. घराचे छप्पर गळून घरात पाणी गळत असताना छप्पर दुरूस्त करून वॉटरप्रुफिंग न करता घरात वावरताना रेनकोट व छत्री वापरणे सक्तीचे करणे आणि वरील कारणांबद्दल कणभरही उपाययोजना न करता हेल्मेटसक्ती करणे यात फारसा फरक नाही.
5 Feb 2016 - 3:33 pm | तर्राट जोकर
ते अमेरिकेत, शिंगापुरात सगळीकडे चांगले रस्ते, वाहतूक, नियम पाळणारी जनता असुन लोक तिकडे सक्ती न करताही हेल्मेट का हो घालतात? त्यांना त्या समस्या नाही जाणवत ज्या तुम्हाला जाणवतात?
5 Feb 2016 - 3:42 pm | टवाळ कार्टा
प्रचंड सहमत
5 Feb 2016 - 4:23 pm | मम्बाजी सर्वज्ञ
त्याला कारण इथे गाड्या फार वेगात धावतात. सरासरी वेग = ३० मैल तशी (५०किलो मीटर?). या वेगात गाडी वरून पडल्यावर कपाळ मोक्ष ठरलेला आहे. बर वाचलात तर वैद्यकीय खर्च सुधा भरपूर असतो. आणि जोवर डाक्टर सर्तीफिकेत देत नाही तोवर कामावर घेत नाहीत. मग पैसे मिळत नाहीत.इन्शुरन्स नावाचा भस्मासुर सगळीकडे मागे लागलेला असतो. एकदा अपघात झाला कि पुढचे ५ वर्ष प्रिमियम ढगात. २१ वर्ष वयाच्या पोराचा प्रिमियम सध्या कमीत कमी २००० पौंड आहे. लोकांची कमाई सरासरी १0०० ते १5०० पौंड असते २५ ते ३० च्या वयात (पोरं स्वतःच्या घरात मूव होतात १८ व्या वर्षी हे विसरू नका, घराचे भाडे इत्यादी खर्च आहेतच). आणि एकदा का डेंजरस ड्रायवर चा स्टीकर चिकटला, कि सगळीकडेच त्रास होतो. कधी कधी प्रोफाईल चांगले म्याच होत असले तरी डिसक्वालिफाइड ड्रायवर आहे म्हणून नोकरी मिळत नसल्याची उदाहरणे बघितली आहेत कारण बर्याचदा नोक्रीवरची कामे करताना गाडी चालवत लांब लांब जावे लागते. ड्रायवर चा पगार परवडत नाही प्रत्येक वेळी. रात्री बेरात्री पोलिसाने जर थांबवला आणि रेकोर्ड वर असले कारनामे असतील तर त्यांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी देखील बायस्ड असते.
तात्पर्य : एखाद्याने हेल्मेट न घालणे हि इथे किरकोळ गोष्ट आहे, पण एखाद्याने नियम तोडणे, शिस्त न पाळणे हा परमोच्च गुन्हा आहे. आणि त्याची फळे पुढची ४-५ वर्षे भोगावी लागतात.
5 Feb 2016 - 4:28 pm | मम्बाजी सर्वज्ञ
आपल्याकडे ५० रुपये दिले कि पोलिस सोडतो, इन्शुरन्स वाला सर्तीफिकेत देतो, टी सी जागा देतो, थोडक्यात केलेल्या चुकीला पटकन माफी मिळते. त्यामुळे चूक करणे हा 'हक्क' होतो.
5 Feb 2016 - 7:20 pm | चैतन्य ईन्या
ह्यात खरा प्र्कार आहे तो जोर्दार बाम्बू बसण्य्याचा आहे. जो पर्यन्त शिक्षा होत नाहि किन्वा होण्यचि खात्रि नाहिये तो पर्यन्त हे असेच चालु रहाणार. बाहेरच्या देशात तो बाम्बू चान्ग्लाच बसतो त्यामुळे आप्सूक नियम पाळ्ले जातात.
5 Feb 2016 - 8:51 pm | श्रीगुरुजी
तिकडे रस्ते उत्कृष्ट असतात व मोटारसायकली अत्यंत पॉवरफुल असतात. मोटारसायकलस्वार अत्यंत वेगाने (ताशी ६०+ मैल) गाड्या चालवितात. त्यामुळे हेल्मेट सक्तीचे असते. अमेरिकेत एका मोठ्या दुकानात (सॅम्स क्लब) मी आपली ल्यूना विकायला ठेवलेली पाहिली होती. किंमत ४९९ डॉलर्स लावली होती. तिथे पाटी लावली होती की या गाडीसाठी हेल्मेटची गरज नाही. अर्थात जी गाडी ताशी २० मैलापेक्षा जास्त वेग गाठू शकत नाही त्या गाडीला हेल्मेट कशासाठी हा विचार असावा.
5 Feb 2016 - 8:58 pm | मोदक
२० मैलाने चालणार्या लुनाला एखाद्या ६० + मैलाने जाणार्या गाडीने धडक दिली तर लुनाचालक चित्रगुप्तासमोर काय युक्तीवाद करेल?
5 Feb 2016 - 9:05 pm | श्रीगुरुजी
ती ल्यूना फक्त अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्येच चालवायला परवानगी होती. ती गाडी चालवायला वाहन परवान्याची गरज नव्हती. काँप्लेक्समध्ये इतर गाड्यांना ताशी १०-१५ मैलाची वेगमर्यादा होती. या सर्व गोष्टींमुळे हेल्मेटची गरज नव्हती.
5 Feb 2016 - 9:08 pm | श्रीगुरुजी
आता पुण्याचे उदाहरण घेऊ. पुण्यातल्या बहुतेक सर्व रस्त्यातून ताशी २० मैलाच्या पुढचा वेग गाठणे अत्यंत दुर्मिळ आहे. बस, कार, ट्रकसारख्या मोठ्या गाड्यासुद्धा यापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करणे (ते सुद्धा विशेषत: शहरातील रस्त्यांवर) योग्य नाही.
उद्यापासून हेल्मेटसक्तीविरोधात सर्वपक्षीय आंदोलन आहे ही एक आशादायक गोष्ट आहे.
5 Feb 2016 - 9:09 pm | मोदक
तुमच्या दोन प्रतिसादांमधली विसंगती तुमच्या लक्षात आली?
7 Feb 2016 - 5:00 pm | कपिलमुनी
भलत्याच अपेक्षा
7 Feb 2016 - 8:38 pm | श्रीगुरुजी
वड्याचे तेल वांग्यावर.
चालू द्या.
7 Feb 2016 - 9:52 pm | मोदक
अहो.. ते तेलाचे सोडा.
विसंगती लक्षात आली का?
हो किंवा नाही इतके सोपे उत्तर आहे.
("मान्य करायचे नाहीये" हा तिसरा ऑप्शन तुम्ही आपणहून घेणार असाल तर तुमच्यात आणि बाकीच्या अडाणी आयडींमध्ये काय फरक आहे ते पण सांगा)
8 Feb 2016 - 1:46 pm | श्रीगुरुजी
यात संगती अशी दिसते की जिथे वेग खूप कमी असतो तिथे हेल्मेटसक्ती नाही.
बादवे, फ्लॉरिडा राज्याने सन २००० पासून हेल्मेट वापरणे ऑप्शनल ठेवले आहे असे वाचले होते. कोणी फ्लॉरिडाकर याविषयी सांगू शकतील का?
8 Feb 2016 - 7:06 pm | मोदक
खीरभात नावाचे एक टुकार संस्थळ आहे. निव्वळ बिनडोक लोकांचे, येड्या विचारांचे आणि हुकलेले लोक तेथे नियमीतपणे हजेरी लावतात.
श्रीगुरूजींही सभासद आहेत.
असे लिहिल्यानंतर "श्रीगुरूजी खीरभातचे सभासद आहेत" हाच निष्कर्ष निघणार नाही का?
नंतर श्रीगुरूजी 'सभासद' आहेत म्हणजे ते मौजे गाताडवाडीबुद्रूकच्या आम आदमी पार्टी शाखेचे सभासद आहेत अशी सारवासारव कशाला?
**********************************
तुम्ही पहिला उदाहरण दिलेत ते ६० मैल + जाणार्या गाड्यांचे, तेथे उल्लेख केलात की लुनासाठी हेल्मेट बंधनकारक नव्हते कारण लुनाचा स्पीड २० मैल पेक्षा जास्त नाही.
नंतर म्हणत आहात की ती लुना अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्येच चालवायला परवानगी होती.
अशा परिस्थितीमध्ये हायवे आणि ६० मैल + च्या गाड्यांचा विषय सुरू असताना लुनाचे उदाहरण येणे ही विसंगती नाही का?
8 Feb 2016 - 9:06 pm | श्रीगुरुजी
ही खीरभाताची काय भानगड आहे ते समजले नाही. खीरभात हे मिश्रण खूपच विचित्र वाटते. आम्हाला आपला साजूक तूप घातलेला, लिंबू पिळलेला सात्विक वरणभातच प्रचंड आवडतो.
बाकी अमेरिकेत ल्यूनाचं म्हणाल तर त्या वाहनाला परवान्याची गरज नाही आणि त्याचा वेगही इतर वाहनांच्या तुलनेत अत्यल्प असतो त्यामुळे मुख्य रस्त्यांवर चालवायला परवानगी नाही. वेग अत्यंत कमी असल्याने विनाहेल्मेट चालवायला परवानगी आहे. पुण्यातसुद्धा अरूंद रस्ते व तुफान गर्दीमुळे दुचाकींचा वेग अतिशय कमी असतो आणि त्यात भर म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर सिग्नल्स असल्याने सारखे थांबावे लागते. अशा परिस्थितीत हेल्मेटची गरज नाही.
8 Feb 2016 - 9:16 pm | संदीप डांगे
मग अशा भयाण परिस्थितीत खरंच दुचाक्यांचा तरी काय उपयोग? सायकल वा पायी जाणे जास्त सोयीचे नाही का?
8 Feb 2016 - 9:30 pm | मोदक
शेवटचा प्रतिसाद.
(मी जिंकलो)
8 Feb 2016 - 9:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
भै मै हु ना.
8 Feb 2016 - 10:31 pm | अन्नू
आच्च नाय-आच्च नाय. मी शेवती आलो ना?
5 Feb 2016 - 11:28 pm | तर्राट जोकर
@श्रीगुरुजी, तुम्ही मम्बाजी सर्वज्ञ यांचा प्रतिसाद वाचला नाही का? तुम्ही पाहिलेले एक्मेव उदाहरण अमेरिकेच्या सर्व कायद्यांचे निदर्शक आहे काय? तिकडे सायकल चालवणार्यालाही हेल्मेट आवश्यक आहे. तुमचं नेहमीचं चर्हाट बंद करुन जरा जीवाची काळजी घ्या की. नेहमी वादविवादात जिंकण्याचाच विचार कर्ण्यपेक्षा कधी तुमच्यावर अवलंबून असलेल्या घरच्यांचाही विचार करा.
5 Feb 2016 - 3:49 pm | मोदक
रस्ते सुधारणे, खड्डे बुजविणे, ड्रेनेजची वर आलेली झाकणे रस्त्याच्या पातळीत करणे, वाहतुकीच्या नियमांची सक्ती करणे
हेल्मेटसक्ती हा वाहतुकीच्या नियमांची सक्ती करण्याचा एक भाग आहे ना? मग?
आणि तुम्ही सांगीतलेली रस्त्याची परिस्थिती कधीपर्यंत पूर्ण होईल आणि किती दिवस टिकेल?
5 Feb 2016 - 4:26 pm | शब्दबम्बाळ
बंगलोर मध्ये दुचाकी वर बसणाऱ्या दोघानाही हेल्मेट सक्तीचे आहे!
याविषयावर इतकी मोठी चर्चा?!
स्मार्ट सिटी मधल्या लोकांनी डोकी नको का जपायला?! ;)
5 Feb 2016 - 4:34 pm | संदीप डांगे
हेल्मेटसक्तीला विरोध करणार्या सगळ्यांना पाकिस्तानात पाठवा!
5 Feb 2016 - 4:51 pm | मोदक
कोणताही विषय ओढून ताणून राजकारणावर नेलाच पाहिजे का?
भले तुमची कमेंट श्रीगुरूजींना खिजवण्यासाठी असेल; मग तुम्ही इतर ठिकाणी मुद्दा सोडून लिहू नका, लिहू नका असा कंठशोष करता तो अशावेळी तुमच्याच भूमीकेला छेद देत नाही का?
5 Feb 2016 - 4:59 pm | संदीप डांगे
च्यामारी, सिरियस लिहिणार्यांनी विनोदी लिहिण्याचा प्रयत्न केला तरी लोक सिरियसच समजतेत. इथे राजकारण कुठून आले मोदक बुवा? स्माईल डालना भुल गया मै, इत्ता खफा कायको होना मंगता?
5 Feb 2016 - 5:05 pm | मोदक
इथेच चुकते राव.. स्मायली असती तर मी पण तुम्हाला सपोर्ट केला असता. ;)
ते जावूदे.. तुम्ही एक झकास लेखमाला लिहा. प्रतिसाद प्रतिसाद किती खेळणार?
5 Feb 2016 - 5:07 pm | संदीप डांगे
कंटाळा आला राव, खरंच. प्रतिसादापेक्षा स्पष्टीकरणच जास्त द्यायला लागतात इथे. इथेही तेच झालं. जाउ द्या सोडा.... ह्या धाग्यावरचे तुमचे प्रतिसाद आवडले. खरी कळकळ आहे. लोकांना का समजत नाही कळत नै पण...
5 Feb 2016 - 5:05 pm | संदीप डांगे
तसंही इतकं चिडायला काय झालं ते काही समजलं नाही.
5 Feb 2016 - 5:12 pm | मोदक
अकाली वारलेले जवळचे मित्र, पाहुणे, परिचित किंवा अपघाताने जायबंदी झालेल्यांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. :(
5 Feb 2016 - 5:34 pm | संदीप डांगे
अॅक्चुअली, ते मी खरंच उद्वेगजन्य परिस्थितीत लिहलं, हेल्मेटविरोधी एक एक प्रतिसाद पाहून खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. तुमच्यासारखे मलाही असे अनुभव आले आहेत. एकदा तर मी स्वतः आपटलोय माकडहाडावर, वर्षभर बसायची उठायची बोंब होती. हेल्मेट होतं म्हणून जीवंत राहिलोय आणि इथे सगळ्यांचं डोकं खातोय आता... तेव्हा पासून दुचाकी सोडली. जे वापरतात त्यांचे अनुभव बघितले जवळच्यांचे. काही मूर्खांना तर हेल्मेट नसल्यामुळेच आपली इंज्युरी सिवियर झाली हेच मान्य नसतं. त्या नवविवाहितेने एवढा फटका पडून, अजूनही हेल्मेट घेतलं नाही. मी नेहमी भेटलो की विचारतो तिला, ती म्हणते, हो घ्यायचंय... लोकांना स्वतःच्या जीवाची प्रायोरिटी का नाही, हे बघुन खरंच चिडायला होतं. अरे तुम्हीपण आमचीच माणसं आहात. आज आपले विचार न जुळू दे, कितीही कट्टर विरोधाभास होऊ देत, पण गुरुजींना उद्या काही बरं वाईट झालं तर (असं काही घडू नये ही देवाकडे प्रार्थना) एक मिपासदस्य म्हणून मलाही तेवढंच दु:ख होइल जेवढं माझ्या घरातल्या एखाद्या माणसाला अपघात झाला तर होईल... राजकिय मुद्द्यांवर विवाद मान्य, पण स्वतःच्या सुरक्षेवरही इतका बुद्धीहिन विवाद. खरंच उद्वेग आला, च्यायला, ह्या लोकांना खरंच उचलून पाकिस्तानात सोडून द्यायला पाहिजे. वरुन अमेरिकेचे ड्रोन दण दण बरसतील तेव्हा जीवाचं महत्त्व कळेल.
असो. कोणालाही स्वत:च्या सुरक्षेत कोणताही चॉइस घेऊ द्यायला कोणाच्याही विरोधात राहीन नेहमी.
5 Feb 2016 - 6:17 pm | मोदक
मी पण एकदा बेक्कार आपटलो आहे. सायकल वर असताना.
आमची पहिलीवाहिली कोकण राईड. ताम्हिणी घाट उतरायला सुरूवात केली आणि समोरच्याच्या सायकलवरून काहीतरी पडले म्हणून मी मागे बघत मागच्या पार्टनरला हातवारे करत चाललो होतो. सायकल उतारावर असल्याने वेगात होती आणि कधी रस्ता सोडला ते कळालेच नाही. एका खोल खड्ड्यात; बीयर बॉटल्स आणि सिमेंटचे बीम टाकलेल्या ठिकाणी मी सायकलसकट सूर मारला. निव्वळ हेल्मेटमुळे चेहर्यावर खरचटणे आणि दंडावर मुकामार + खरचटणे इतक्यावर निभावले.
सायकलींग हेल्मेटला तडे गेले इतका मोठा आघात होता. मग ते नसते तर डोक्याचे काय झाले असते?
खूप त्रास होतो असले बिनबुडाचे युक्तीवाद पाहिले की. :(
5 Feb 2016 - 6:29 pm | कैलासवासी सोन्याबापु
भाऊ जरा सांभाळून हो!
5 Feb 2016 - 6:34 pm | संदीप डांगे
बाप रे. काळजी घ्या बॉ,
5 Feb 2016 - 6:50 pm | sagarpdy
+१
१५ दिवसांपूर्वीच गेलेल्या आमच्या नवख्या सायकलस्वार मंडळातील एका मुलीचा विचित्र अपघात झाला. तिचे हेल्मेट पाहून हाच विचार आला. हेल्मेट फुटून डोळ्या-कपाळाजवळ २ टाके पडले.
5 Feb 2016 - 7:52 pm | मोदक
अबे कुठे गेलेल्या? नीट लिही जरा प्लीज.
डांगेसाहेब, सोन्याबापू.. आता सांभाळूनच आहे.. एकदम सुरूवातीलाच अपघात झाल्याने नंतरच्या सगळ्या कोकणवार्या आणि सहलींना थोडी जास्त काळजी घेतली जाते.
काळजीबद्दल धन्यवाद.
5 Feb 2016 - 8:51 pm | sagarpdy
कान्ह्याला जात होतो. देहूरोड रेल्वे स्टेशन च्या उताराने येताना ती घसरुन पडली. त्यात सायकल अर्धवट रस्त्यात व ती मुलगी रस्त्याच्या बाहेर असे पडले आणि मागील उताराने येणारी बस सायकलचा चक्काचूर करुन गेली.
नशीब चांगल म्हणून ती वाचली.
तीकडेच थोडं पुढे, मागून ट्रक येतोय म्हणून मी सायकल रस्त्याच्या खाली उतरवली, आणि जराशी चालवून दगडात स्लीप होऊन पडलो ,खरचटल आणि छाती ला मुका मार बसला. तेव्हापासून सायकल बंद आहे.
5 Feb 2016 - 9:01 pm | मोदक
गाडीला लागू आहे तेच सायकल ला लागू आहे रे.. पळवताना मजा येते पण खरी कला कंट्रोल करण्यामध्ये आहे.
आणि गाडीला स्वतःचे + चालकाचे वजन असते त्यामुळे ब्रेक लागतात व आपण ठरावीक अंतरामध्ये थांबू शकतो. आपल्या सायकली हलक्या असल्याने ब्रेक मारला आणि चाके लॉक झाली तरी आपण त्याच लयीत चाके घासत पुढे पुढे जातच राहतो.
काळजी घ्या.
6 Feb 2016 - 2:41 pm | श्रीगुरुजी
संदीप डांगे,
सदिच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! तुमच्या भावना समजल्या. मी पूर्वी काही वेळा विशेषतः हिंजवडीला दुचाकीवर जाताना हेल्मेट वापरले होते. परंतु एकंदरीत ते वापरणे खूपच गैरसोयीचे होत होते. हेल्मेटमध्ये डो़के खूपच जखडून जाणे, खूप घाम येणे, ऐकायला कमी होणे या समस्या होत्या. त्यात भर म्हणून १५ महिन्यांपूर्वी मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया झालेली आहे. अशा परिस्थितीत मानेवर वजन टाकणे हे योग्य वाटत नाही. हेल्मेटसाठी आधी डॉक्टरांचा सल्ला घेईन व नंतरच त्यानुसार ठरवेन.
6 Feb 2016 - 3:21 pm | संदीप डांगे
मला आठवत नाही नक्की पण तुम्ही व्यक्तिगत आरोग्याचा प्रश्न हेल्मेटसक्तीविरुद्ध आताच मांडताय का? तसंही अशा स्पेश्यल केसेस मधे दुचाकी वापरणंच सोडायला तुमचे डॉक्टर सांगतील. जर मणके हेल्मेटचे नगण्य वजन उचलू शकत नाहीत तर प्रवासाचे दणके कसे सहन करतील असा मला प्रश्न पडलाय.
तसंही ह्या तुमच्या व्यक्तिगत समस्येसाठी हेल्मेटविरोधी सरसकट विधान करणे नागरी जबाबदारीच्या विरुद्ध आहे. दुसरे असे की ह्याऐवजी तुम्ही इतर असंबंद्ध समस्या आतापावेतो मांडत होते.
6 Feb 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी
व्यक्तिगत आरोग्याचा प्रश्न पूर्वीच्या एका प्रतिसादात लिहिला होता. इच्छा असल्यास शोधून वाचावा. नीट ऐकू न येणे, घाम येणे इ. प्रश्नही पूर्वीच्याच २-३ प्रतिसादात लिहिले होते. खड्ड्यांसारखी इतर कारणे आहेतच, पण हेही प्रश्न आहेत.
7 Feb 2016 - 10:47 pm | संदीप डांगे
मला गरज नै हो शोधत बसायची. ते एवढ्यासाठी विचारले की तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. अपवाद आहे. इथे जालावर मांडुन हेल्मेटविरोधासाठी सहानुभूती मिळवु नका. अनैतिक आहे ते. तुम्हाला व्यक्तिगत कारणासाठी हेल्मेट नसेल वापरायचे तर नका वापरु, पण इथे जालावर त्याची वकीली अनैतिक, गैरलागू कारणांसाठी करु नका. तसेही खड्डे, इत्यादी प्रश्न आणि हेल्मेट ह्यांचा तसा काहीही संबंध नाही. हे लॉजिक तितकंच महान आहे जेवढे पाकिस्तान्यांचं पोलिओ डोसला विरोध करण्याचं लॉजिक आहे.
8 Feb 2016 - 1:50 pm | श्रीगुरुजी
मी माझ्याच वैयक्तिक समस्यांवर लिहिले आहे. इतरांनी वापरावे की न वापरावे हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्यावर सक्ती नको हाच माझा सुरवातीपासूनचा मुद्दा आहे. हेल्मेटविरोधासाठी सहानुभूती वगैरेची गरजच नाही. कोणत्याही गोष्टीसंबंधात अनेक मते असतात. तुमच्या मताविरूद्ध दुसर्याचे मत असले म्हणजे ते मत अनैतिक व तुमचे मत नैतिक असे नसते. पाकड्यांच्या पोलिओ डोसच्या विरोधाचा आणि हेल्मेटसक्तीला विरोधाचा दुरूनही संबंध नाही (बादवे, भारतात सुद्धा पोलिओ डोसला विरोध करणारे आहेत).
8 Feb 2016 - 1:58 pm | संदीप डांगे
__/\__ देव तुमचे सदैव रक्षण करो.
8 Feb 2016 - 1:57 pm | कैलासवासी सोन्याबापु
लास्ट मॅन स्टॅंडिंग अर्र कॉमेंटिंग विन्स बरंका !! :D
5 Feb 2016 - 5:20 pm | भाते
झी २४ तास काल या विषयावर झालेली चर्चा अवश्य पहा.
6 Feb 2016 - 12:35 pm | अन्नू
'हेल'मेट्स सोबतीला असेल तरच तुंम्ही 'हेल' मध्ये जाण्यापासून वाचाल!
अवांतर- कितीही सांगितलं तरी कोणी ऐकतच नै ब्वॉ! त्यामुळे सनी लिऑनीलाच आता त्याच्या अॅडमध्ये घेऊ असा विचार करतोय!! ;)
मग कसे सरसकट सगळेच ते हेलमेट घ्यायला धावत जातील बघा!! ;) (डोळा मारुन दात विचकवणारी स्माईली)
6 Feb 2016 - 12:47 pm | सुबोध खरे
हेल्मेट बद्दलचे गैरसमज या वर वैद्यकीय साहित्य काय सांगते.
Myth 1: Motorcycle Helmets Break Necks
It seems logicalyou put more weight out there on the end of your neck and when you get thrown off the bike, that extra weight will create more pendulum force on your neck. Turns out, it doesn't work that way. In fact, the energy-absorbing qualities of a DOT motorcycle helmet also absorb the energy that breaks riders' necks in impacts. Studies show that helmeted motorcyclists actually suffer fewer neck injuries when they crash compared to riders who crash without helmets.
Myth 2: Helmets Block Your Ability to See or Hear Danger
The thing you learn when you dig into the research is that motorcycle riders who use helmets crash less frequently than those who don't. Maybe that happens because motorcyclists who decide to wear helmets have a better or more realistic attitude about riding. Maybe it's because putting on a helmet is a reminder that what you are about to do can be dangerous and the act of accepting protection puts you in the right mindset. Maybe it's because a helmet provides eye protection and cuts down wind noise so you can actually see and hear better. Maybe its because, by cutting wind pressure and noise, a helmet reduces fatigue. Whatever the reasons, wearing a helmet clearly does not increase a motorcyclist's risk of having an accident and wearing one correlates to reduced likelihood of an accident.
Myth ३: A Helmet Won't Help in Most Crashes
People look at the seemingly low impact speeds used in motorcycle-helmet testing and assume that if you are going faster than that, the helmet will no longer be up to the job. That ignores a few critical facts: * Most accidents happen at relatively low speeds. * Most of the impact energy is usually verticalthe distance your head falls until it hits. * Helmets (or at least helmets that meet DOT standards) perform spectacular life-saving feats at impact speeds far above those used in testing. * When a helmeted rider suffers a fatal head injury, it frequently doesn't matter, because, to hit hard enough to sustain that fatal injury, he sustained multiple additional fatal injuries to other parts of his body. In other words, the fact that the helmet didn't prevent the head injury was of no consequence. * The numbers clearly say that riders using DOT helmets simply survive crashes more successfully than those without them.
Myth 4: A Helmet Will Leave You Brain Damaged in an Crash When You Would Have Simply Died
Of course that's possibleyour helmet attenuates the impact energy enough to keep the injury from being fatal but not enough to keep all of your eggs from getting scrambled. However, that's rare, and if you hit that hard, you are likely to get killed by some other injury. It's actually the un-helmeted rider who is likely to cross from animal to vegetable kingdom, and often from a relatively minor impact that would have damaged nothing but his ego if he'd been wearing a DOT helmet.
श्री गुरुजी एक कळकळीची विनंती. हेल्मेट सक्ती कायदा दंड ई. वादासाठी बाजूला ठेवा.
स्वतः आणी आपल्या संपर्कातील व्यक्तींना हेल्मेट घालण्याची विनंती करतो आहे.
6 Feb 2016 - 2:35 pm | श्रीगुरुजी
डॉक्टरसाहेब,
धन्यवाद! तुम्ही अनुभवी डॉक्टर असल्याने एक सल्ला विचारत आहे. सुमारे १५ महिन्यांपूर्वी माझ्या मानेच्या डाव्या बाजूच्या मणक्यातील सी-५ व सी-६ या मणक्यातील चकती झिजली होती व ती अर्धवट बाहेर आल्याने मानेची डावी बाजू, डावा खांदा, संपूर्ण डावा हात यात खूप वेदना होत होत्या. डाव्या हाताच्या बोटांना मुंग्या येत होत्या. २-३ अनुभवी अस्थिविशारद डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शेवटी शस्त्रक्रिया करून मूळची चकती काढून त्याजागी कंबरेच्या उजव्या बाजूच्या हाडाचा एक तुकडा कापून त्यापासून एक नवीन चकती तयार करून तिथे बसविली व त्या चकतीला वरच्या व खालच्या मणक्यांमध्ये स्क्रू लावून त्यांच्या सहाय्याने आधार दिला आहे.
अशा परिस्थितीत मानेवर हेल्मेटचे वजन येणे योग्य ठरेल का?
6 Feb 2016 - 3:16 pm | सुबोध खरे
हेलमेटचे वजन 0.5 अर्धा किलो असते.त्याने फारसा फरक पडणार नाही उलट जर आपल्याला लहानसा आपघात झाला तर तो आघात हेलमेट शोषून घेईल आणि चकतीचे संरक्षण करेल.आता कमी वजनाचीही उत्तम हेलमेटस उपलब्ध आहेत.
7 Feb 2016 - 10:47 am | धर्मराजमुटके
'प्रकाश' कायम रहावा म्हणून
राज्यात डबलसीटलाही हेल्मेटसक्ती
7 Feb 2016 - 3:10 pm | चौकटराजा
दिवाकर रावते यानी कोर्टाच्या अवमानाच्या भयाने हां निर्णय घेतला आहे . कोर्टाने पी सी एम् सी तील 66000 घरे अन अधिकृत घोषित केली आहेत . ती पाड्ण्याने कोर्टा चा मान रहाणार आहे .मग कधी येणार बुलडोजरवर स्वार होऊन आयुक्त ?
7 Feb 2016 - 8:50 pm | अद्द्या
इथेही (बेळगाव कर्नाटक) हेल्मेट सक्ती १ फेब्रुवारी पासून लागू केली मनपा ने . पिलन राइडर ला सुद्धा
कोणीच कुठेच आरडा ओरडा केला नाही , का कुठे फुकाचे वाद नाहीत . कि कोणी हे म्हणालं नाही कि हेल्मेट कंपनीच्या फायद्या साठी हा नियम काढलाय . कि रस्ते खराब आहेत म्हणून आम्ही हेल्मेट घेणार नाही म्हणाले नाहीत .
ज्यांना जमतं त्यांनी चांगले हेल्मेट घेतले . नाही त्यांनी रस्त्यावरचे २००-३०० रुपयाचे घेतले. पण हेल्मेट घेतले .
पण असो . पुणे तिथे फालतू वादाला काय उणे
7 Feb 2016 - 9:54 pm | सुबोध खरे
हेल्मेट सक्तीला विरोध करणारे रस्ते, फेरीवाले, सिग्नल यंत्रणा यावर उलट सवाल करणाऱ्या लोकांना एकच सल्ला. विमानात सीट बेल्ट बांधायला सांगितला की विमानतळ नीट का नाही किंवा विमान दोन तास उशीरा का सुटलं ही कारणे विचारत बसाल का...???
अपघात अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे होतात आणि चांगल्या रस्त्यावरही नक्की होतात.
..
बदली डोकं मिळायला आपण काही गणपती बाप्पा नाही...
8 Feb 2016 - 7:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
+५७८७४५४६५४७९८६५४६५४६५४६५६
हल्ली १/२ किलो ते १ किलो वजनाची केव्हलार हेल्मेट्स आहेत ती घेउन वापरा. सवय झाली २-३ दिवसात की अजिबात रास होत नाही.
7 Feb 2016 - 9:57 pm | सुबोध खरे
जालावरुन साभार
7 Feb 2016 - 10:05 pm | मोदक
शहरात कमी वेगाने गाडी चालवली जाते, असा किती वेग असतो.. वगैरे कारणे देणार्यांनी एक उपाय नक्की करावा.
आपल्या स्मार्टफोनवर सायकल ट्रॅकर, जीपीएस ट्रॅकर असल्र एखादे अॅप डाऊनलोड करा आणि घर ते ऑफिस, घर ते मंडई असल्या प्रवासात आपण किती वेगाने कसा कसा प्रवास करतो, टॉप स्पीड, अॅव्हरेज स्पीड वगैरेची नोंद मिळेल.
7 Feb 2016 - 10:26 pm | अन्नू
"हम हैलमैट वालों की बाजु घेते हय!"
तुंम्हाला रस्ता, खड्डे, नाले, प्रशासन, या समस्या असतील तर सरळ टॅक्सवर बहिष्कार घाला आणि झोपलेल्या अधिकार्यांना जागे करा, उगीच हैलमेटला नकार दिऊन सवताच्याच आयुष्याशी का खेळावं म्हणतोय मी?
7 Feb 2016 - 11:57 pm | एस
एक पुणेकर असूनदेखील मी शिरस्त्राणसक्तीचा ठाम समर्थक आहे. अगदी कोथिंबिर वगैरे आणायलासुद्धा हेमेट घालूनच (दुचाकीवर. पायी नव्हे! ;-) ) जातो. तेव्हा हेल्मेट आवर्जून वापरा. हेल्मेंटाळा करू नका.
8 Feb 2016 - 7:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हेहेहेहेहेहेहेहे. हेल्मेट घालायचं कारण चाफेकळीसारखं नाजुक आहे असं उगीचं वाटलं =))
8 Feb 2016 - 8:35 am | एस
;-)
दरवेळी कोथिंबिर -> चाफेकळी असे नाही हो! वरती कुणीतरी कोथिंबिर आणायला जातानाही हेल्मेट घालायचे का असे विचारलेय म्हणून लिहिले. :-)
8 Feb 2016 - 6:34 am | चौकटराजा
एकूणच जीवनाचा विचार केला तर जीवन हां एक जुगार आहे.मी स्वत: तेल वाळु पाणी असे सरफेस वर असताना पडलो आहे तरीही मला कधीही हेड इंजुरी झाली नाही याचे कारण या सर्व वेळी माझा वेग हां फार तर 20 किमी असेल.वळणा वर वेग कमी झालाच पाहिजे हे तत्त्व कायद्याने वद वलेले नव्हे तर अनुभवाने मुरलेले फिजिक्स आहे. पावसाळ्यात संयमाने वहान हाकले पाहिजे हां खरा धडा आहे हेल्म्टेट ची सक्ती हे त्याचे उत्तर नाही .अपघात हां अपघातच असतो मग तो प्रेमात पडण्याचा असो की मरणात .कायद्याने प्रस्थापित पद्धतीने रोज एक आर टी ओ इन्स्पेक्टर 350 वहाने तपासून पाहून नोंदणी करू शकेल काय ? तिथे पैसे फेकले की दोनमिनिटात सही होते हे सत्य आहे.पी यु सी ची काय स्थिती आहे ते किती गंभीरपणे दिले जाते हे सर्वाना चांगलेच ठाउक आहे.दंड ही एक अर्थव्यवस्था झाली आहे. वहातुक अधिकारी आवाड याना एकाने विचारले की हेलमेट सक्तीचा दुरुपयोग आतं कवादी करतील तर असे कितीसे ? असा प्रश्न त्यानी विचारला .मग त्यांचेच तर्कट वापरून त्याना असे वि चारता येते की 25 लाखात 239 मृत्यु असे कितीसे ? एखाद्याची बायको व्यभिचारी निघाली म्हणून भयाने सर्वच महिलाना आता चेष्टिटि बेल्ट सक्तीचा करा असा कायदा हवा का ? अपवादाने कधी नियम बदलायचा नसतो .हेलमेट घालणे हे जरूर आहे.ते कधी घालायचे हे वापरणार्याला ठरवू दया त्याला आपला "सेफ पिरियड " बरोबर ठाउक असतो.
8 Feb 2016 - 7:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नशिबवान आहात. तुम्ही २० किमी ला होतात. कोलिजन अॅक्सिडेंट्स मधे समोरचा फक्तं २० किमी नी येउन आपटेल ह्याची खात्री काय?
After all accidents are unpredictable. They just happen. All we can do is minimize the damage.
रस्त्याची अवस्था, वातावरण ह्या सगळ्या औट ऑफ कंट्रोल गोष्टी आहेत तुमच्या मान्य. पण किमान हेल्मेट घालुन सुरक्षितता वाढवणं हे तर आपल्याचं हातात आहे ना? २५ लाखात २३९ मृत्यु स्टॅटिस्टिकली कमी असतील पण जेव्हा त्या २३९ मधला एखादा आपला असतो किंवा देव नं करो स्वतः असलो तर तेव्हाही हाचं फॉर्म्युला ग्राह्य धरता येईल का?
बरं हेल्मेट काही फार महागडी गोष्ट नाही. आय.एस.आय. मार्क वालं उच्चं दर्जाचं हेल्मेट २०००-२५०० रुपयामधे येतं. ज्या व्यक्तीला ऑन अॅव्हरेज ५०००० रुपयाची गाडी परवडु शकते त्या व्यक्तीसाठी दोन अडीच हजार जास्तं नाहीत. ऐकु येत नाही, व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम वगैरे सगळे बहाणे आहेत म्हणणार नाही, पण त्याची फार फार तर दोन दिवसात सवय होते. नंतर तुम्ही हेल्मेट नाही घातलं तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. माझ्या माहिती प्रमाणे तुम्ही स्वत:ही हेल्मेट वापरता.
सक्ती चुकीचीचं आहे. पण वाईट नक्की नाही. शेवटी आपली सुरक्षा आपल्या हातात असते.
8 Feb 2016 - 9:57 am | चौकटराजा
कोणत्याही अपघातात जसे मेंदूला इजा हा मुद्दा महत्वाचा तसा इतर मार्गाने झालेला रक्त स्त्राव shock as a result of multiple injuries हे ही महत्वाचे .हेलमेट घातलेल्या च्या पोटावरून चाक गेले तर हेल्मेट काय करील? ज्या वेळी एखादा दुचाकीचा अपघात रस्त्यावर मी पहातो त्याच्या मदतीला जातो.त्याला मर्यादित दुखापत झाली असेल तर त्याला एक वाक्य म्हणतो " गुड जास्त काही नाही घाबरून गाड़ी चालवणे बंद करू नका . हां अपघात समजा .अपघात हां अपघात असतो तो सारखा सारखा होत नसतो"
8 Feb 2016 - 10:04 am | संदीप डांगे
घरो घरी आर ओ फिल्टर लावुन पाणी पिणार्यांबद्दलही अशीच जनजागृती करावी असे वाटते. अर्थात ते काही सक्तीचे नाही पण एकुण वातावरण बघता ती ही एक अघोषित सक्तीच आहे. तेव्हा सरकारला कोणी आम्हाला स्वच्छ शुद्ध पाणी पुरवण्याचे तुमचे कर्तव्य आहे, पाइपलाईन्स खराब आहेत, गळती होत असते, पाणी गढूळ येतं इत्यादी कारणे सांगुन आम्ही आर ओ वापरणारच नाही असे म्हणत नाही. भले त्यात सरकार आणि फिल्टरवाल्या कंपन्यांचा हेल्मेटपेक्षा कैक पटीने फायदा असु दे. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्यासाठी आपण आगावु काळजी घेतो तिथे तुम्ही दिलेलं हे "अपघात हां अपघात असतो तो सारखा सारखा होत नसतो" लॉजिक पाळत नाही.
8 Feb 2016 - 7:46 am | मदनबाण
एकूणच जीवनाचा विचार केला तर जीवन हां एक जुगार आहे.
वा.वा.वा... काय ते तत्वज्ञान !
मी स्वत: तेल वाळु पाणी असे सरफेस वर असताना पडलो आहे तरीही मला कधीही हेड इंजुरी झाली नाही याचे कारण या सर्व वेळी माझा वेग हां फार तर 20 किमी असेल.वळणा वर वेग कमी झालाच पाहिजे हे तत्त्व कायद्याने वद वलेले नव्हे तर अनुभवाने मुरलेले फिजिक्स आहे. पावसाळ्यात संयमाने वहान हाकले पाहिजे हां खरा धडा आहे हेल्म्टेट ची सक्ती हे त्याचे उत्तर नाही
हेल्मेट मेंदुला जबर धक्का / आघात होउ नये यासाठी वापरले जाते ! त्याचा वरील कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही !
अपघात हां अपघातच असतो मग तो प्रेमात पडण्याचा असो की मरणात .
वरती म्हणता जीवन एक जुगार आहे, मग जुगार खेळताना अपघाताचा विचार कशाला ?
कायद्याने प्रस्थापित पद्धतीने रोज एक आर टी ओ इन्स्पेक्टर 350 वहाने तपासून पाहून नोंदणी करू शकेल काय ? तिथे पैसे फेकले की दोनमिनिटात सही होते हे सत्य आहे.पी यु सी ची काय स्थिती आहे ते किती गंभीरपणे दिले जाते हे सर्वाना चांगलेच ठाउक आहे.दंड ही एक अर्थव्यवस्था झाली आहे.
परत एकदा रिपीट मारतो :- हेल्मेट मेंदुला जबर धक्का / आघात होउ नये यासाठी वापरले जाते ! त्याचा वरील कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही !
वहातुक अधिकारी आवाड याना एकाने विचारले की हेलमेट सक्तीचा दुरुपयोग आतं कवादी करतील तर असे कितीसे ? असा प्रश्न त्यानी विचारला .मग त्यांचेच तर्कट वापरून त्याना असे वि चारता येते की 25 लाखात 239 मृत्यु असे कितीसे ? एखाद्याची बायको व्यभिचारी निघाली म्हणून भयाने सर्वच महिलाना आता चेष्टिटि बेल्ट सक्तीचा करा असा कायदा हवा का ?
मिसळीच्या तर्रीला पुण्यात सँपल का म्हंटल जातं ? ते आज खर्या अर्थाने कळलं ! पांचटपणा आणि अंमळ वायझेडपणा अजुन काही नाही.
अपवादाने कधी नियम बदलायचा नसतो .हेलमेट घालणे हे जरूर आहे.ते कधी घालायचे हे वापरणार्याला ठरवू दया त्याला आपला "सेफ पिरियड " बरोबर ठाउक असतो.
शेवटी दोष पुणेकरांचा नसुन "पाण्याचाच" आहे नाही का ? ;)
हेल्मेट न घातल्याने पुण्यात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in Europe
S-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia Skies
8 Feb 2016 - 9:36 am | चौकटराजा
आपण मथळा नीट वाचा .तो हेल्मेट च्या विषयीच नाही त्यापेक्षा व्यापक आहे. आपण म्हणता आर टी ओ नोंदणीचा या विषयाशी सम्बध काय ?ज़रा आर टी ओ ला जाउन प्रोसेस समजावून घ्या . मी 22 वर्षात किमान 100 वेळा तरी त्या ड्यूटी वर गेलोय ! तिथे किती कायदा पाळतात ते मला तपशीलवार माहीत आहे. बाकी शक्यते च्या प्रमाणाचा अंदाज घेऊनच म्हणजे एक प्रकारचा जुगार खेळतच जीवन जगले जाते नाहीतर प्रत्येक क्षणाच्या सुरक्षित पणासाठी विमा उतरवावा लागेल. कैलासनाथा च्या यात्रेसाठी लाइफ़ जाकेट सक्ती चे करावे लागेल व् गुलमर्ग च्या गंडोला त
प्याराशूट सक्ती चे करावे लागेल .
8 Feb 2016 - 10:19 am | मदनबाण
आपण मथळा नीट वाचा .तो हेल्मेट च्या विषयीच नाही त्यापेक्षा व्यापक आहे.
हेल्मेटची चर्चा ही अशी व्यापक होते ? काहीही... हा चौरा !
आपण म्हणता आर टी ओ नोंदणीचा या विषयाशी सम्बध काय ?ज़रा आर टी ओ ला जाउन प्रोसेस समजावून घ्या . मी 22 वर्षात किमान 100 वेळा तरी त्या ड्यूटी वर गेलोय ! तिथे किती कायदा पाळतात ते मला तपशीलवार माहीत आहे. बाकी शक्यते च्या प्रमाणाचा अंदाज घेऊनच म्हणजे एक प्रकारचा जुगार खेळतच जीवन जगले जाते नाहीतर प्रत्येक क्षणाच्या सुरक्षित पणासाठी विमा उतरवावा लागेल. कैलासनाथा च्या यात्रेसाठी लाइफ़ जाकेट सक्ती चे करावे लागेल व् गुलमर्ग च्या गंडोला त
प्याराशूट सक्ती चे करावे लागेल .
उध्या म्हणाल हेल्मेट आणि मूळव्याध यांचा अगदी जवळचा संबंध आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in EuropeS-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia Skies
8 Feb 2016 - 1:45 pm | चौकटराजा
आर टी ओ नोंदणी ही नुसती नंबर देण्या ची प्रक्रिया नाही .वहातुक पोलिस यांच्या सारखेच काही अधिकार आर टी ओ ला असतात.ते पोलिस नव्हेत पण वहान व वहातुक हां दोन्हीताला दुवा आहे. बस जास्त लिहित नाही.
8 Feb 2016 - 1:55 pm | श्रीगुरुजी
सहमत
8 Feb 2016 - 10:21 am | प्रदीप साळुंखे
ज्याच्या त्याच्या कर्माने लोक मरतील,ज्याला स्वतःच्या जीवाची काळजी आहे ते लोक हेल्मेट वापरतील.सरकारने अशा दुय्यम गोष्टींना प्राधान्य देवू नये असे वाटते,बाकिच्या बर्याच समस्या आहेत महाराष्ट्रात तिकडे लक्ष द्यावे.
उगाच बॅन,सक्ती वगैरे कशाला?
(तेवढीच लोकसंख्या कमी होण्यास मदत होईल)
8 Feb 2016 - 10:36 am | shawshanky
बाईकवाल्यांमुळे बाकिच्यांना चिलखत
घालण्याची सक्ती करणे हे अधिक गरजेचे आहे.
8 Feb 2016 - 12:13 pm | पिलीयन रायडर
मी हेल्मेट वापरते आणि ते आवश्यकच आहे. रस्ते, भ्रष्टाचार, हेल्मेट कंपन्यांचा फायदा इ कारणं भिकार आहेत. मानेचा त्रास होणार्यांना लाईट वेट हेल्मेट वापरता येतीलच की. सरावाने हेल्मेट वापरुनही आजुबाजुचे नीट बघता येते. ऐकुही येते. काही अडचण होत नाही. आता हेल्मेट नाही घातलं तर विचित्र वाटतं.
परवा चेपुवर "जीव गेला तरी चालेल पण हेल्मेट घालणार नाही" असा फोटो पाहिला. हात जोडले. जीव इतका स्वस्त असतो?? की हेल्मेट घालणं एखादा राजद्रोह वगैरे आहे??
मला माझ्या ३.५ वर्षाच्या मुलासाठी हेल्मेट हवे आहे. तो अॅक्सेसवर समोर उभा रहातो. माझ्या पायात मी त्याला अडकवुन ठेवते. अंतर ३-४ किमी आहे. साधारण १० मिन लागतात. आणि वेग ४० च्या वर जात नाही. तरीही त्याला हेल्मेट घालायचे आहे. सायकलवर घालतात तसे हेल्मेट घ्यावे का?
8 Feb 2016 - 12:33 pm | टवाळ कार्टा
http://www.amazon.com/Best-Sellers-Sports-Outdoors-Kids-Bike-Helmets/zgb...
यातले घ्या :)
8 Feb 2016 - 12:40 pm | मोदक
स्केटिंग किंवा सायकलींगवाले हेल्मेट घे, डेकॅथलॉनमध्ये मिळेल.
8 Feb 2016 - 12:43 pm | पिलीयन रायडर
कुठे जाउन काही घेणे अवघडच आहे सध्या. घरपोच मागवायची सोय आहे का? नाही तर मग वीकांतापर्यंत थांबावे लागेल आणि जवळपास मिळेल ते घ्यावे लागेल. तडजोड करायची नाहिये म्हणुन घरी मागवता येणार असेल तर बरे पडेल.
टक्याने वर अॅमेझॉनची लिंक दिलीये. पण ते मला शोपीसच वाटत आहेत. दणकट वाटत नाहीत :(
8 Feb 2016 - 12:58 pm | मोदक
काटाकिर्र च्या शेजारी एक मेरीडा शोरूम आहे, तेथे मिळाले तर बघ. (पण तेथे उत्तम क्वालिटीचे असल्याने थोडे महाग वाटू शकेल.)
8 Feb 2016 - 12:49 pm | अविनाशकुलकर्णी
हेलमेट सक्ति....पुणेरी हेलमेट..
"परंपरेशी तडजोड नाहि"
8 Feb 2016 - 5:11 pm | सुधीर१३७
बंड्या : गुरुजी, गुरुजी हेल मेट का घालायचे असते ?
गुरुजी : अरे बिनडोका, हेल मेट असा उच्चार नाहीये त्याचा. हेल्मेट असा आहे.
बंड्या : पण ते का घालायचे असते ?
गुरुजी : सक्ती आहे म्हणून.
बंड्या : सक्ती कोणी केली ?
गुरुजी : सरकारने.
बंड्या : का केली :
गुरुजी : आपण जिवंत राहावं म्हणून.
बंड्या : गुरुजी, दारुमुळे आपण जिवंत राहतो की मरतो ?
गुरुजी : हळू हळू मरतो.
बंड्या : मग त्यावर का नाही बंदी आणत सरकार ?
गुरुजी : उद्या सांगीन.
बंड्या : सिगरेट मुळे आपण जिवंत राहतो की मरतो ?
गुरुजी : फार च हळू हळू मरतो.
बंड्या : मग त्यावर का नाही बंदी आणत सरकार ?
गुरुजी : उद्या सांगीन.
बंड्या : म्हणजे आपण जगावं असं सरकारला वाटतं ?
गुरुजी : हो रे बाळा.
बंड्या : मग महागाई कमी कमी का नाही करत सरकार ?
गुरुजी : उद्या सांगीन.
बंड्या : सगळं उद्या सांगणार , तर आज काय सांगणार ?
गुरुजी : तेही उद्याच सांगीन !!
बंड्या : खेळताना चेंडू लागून , किंवा डोके कशावर तरी आपटून आपण मरू शकतो ना ?
गुरुजी : हो.
बंड्या : मग तिथे का नाही हेल्मेटसक्ती ?
गुरुजी : फालतू शंका आहे.
बंड्या : रस्त्यावरून चालत जाताना डोक्यात काही पडले तर आपण मरू शकतो ना ?
गुरुजी : हो.
बंड्या : मग चालताना का नाही हेल्मेटसक्ती ?
गुरुजी : उद्या सांगीन.
बंड्या : घरात सुद्धा आपल्या डोक्यात काही पडू शकतं ना ? किंवा आपण डोक्यावर पडू शकतो ना ? मग तिथे का नाही हेल्मेटसक्ती ?
गुरूजी : उद्या सांगीन.........................
तेव्हापासून बंड्या उद्या कधी उजाडतोय याची वाट बघत बसलाय....आणि गुरुजी उद्या कधीही उगवू नये, अशी प्रार्थना करत बसले आहेत !!!
8 Feb 2016 - 5:54 pm | कपिलमुनी
बंड्या : गुरुजी, गुरुजी हेल मेट का घालायचे असते ?
गुरुजी : अरे बिनडोका, हेल मेट असा उच्चार नाहीये त्याचा. हेल्मेट असा आहे.
बंड्या : पण ते का घालायचे असते ?
गुरुजी : सक्ती आहे म्हणून.
बंड्या : सक्ती कोणी केली ?
गुरुजी : सरकारने.
बंड्या : का केली :
गुरुजी : आपण जिवंत राहावं म्हणून.
बंड्या : गुरुजी, दारुमुळे आपण जिवंत राहतो की मरतो ?
गुरुजी : हळू हळू मरतो.
बंड्या : मग त्यावर का नाही बंदी आणत सरकार ?
गुरुजी : दारू पिणे न पिणे हा चॉईस आहे , अपघात हा चॉईस नाही
बंड्या : सिगरेट मुळे आपण जिवंत राहतो की मरतो ?
गुरुजी : फार च हळू हळू मरतो.
बंड्या : मग त्यावर का नाही बंदी आणत सरकार ?
गुरुजी : सिगारेट पिणे न पिणे हा चॉईस आहे , अपघात हा चॉईस नाही
बंड्या : म्हणजे आपण जगावं असं सरकारला वाटतं ?
गुरुजी : हो रे बाळा.
बंड्या : मग महागाई कमी कमी का नाही करत सरकार ?
गुरुजी : महागाईने लोका मरत असतील तरी प्रयत्न करयला पुरेसा अवधी असतो , अपघाती मृत्यूला तेवढा अवधी मिळत नाही.
बंड्या : सगळं उद्या सांगणार , तर आज काय सांगणार ?
गुरुजी : जी सेफटी हातात आहे तेवढ पाळा
बंड्या : खेळताना चेंडू लागून , किंवा डोके कशावर तरी आपटून आपण मरू शकतो ना ?
गुरुजी : हो.
बंड्या : मग तिथे का नाही हेल्मेटसक्ती ?
गुरुजी : लेदर बॉल खेळताना हेल्मेट घालतात. आणि तुला पोहायला येत नसेल तर तु पाण्यात उडी मारतोस का ?
बंड्या : रस्त्यावरून चालत जाताना डोक्यात काही पडले तर आपण मरू शकतो ना ?
गुरुजी : हो.
बंड्या : मग चालताना का नाही हेल्मेटसक्ती ?
गुरुजी : चालताना डोक्यात पडून होणार्या अपघाताची आकडेवारी आण आणी दुचाकीवरून होणार्या अपघाताची आणून चेक कर .
बंड्या : घरात सुद्धा आपल्या डोक्यात काही पडू शकतं ना ? किंवा आपण डोक्यावर पडू शकतो ना ? मग तिथे का नाही हेल्मेटसक्ती ?
गुरूजी : घरात तुझा चालण्याचा स्पीड, आदळणार्या वस्तूचा स्पीड, वजन आणी शक्यता यांचे गणित करून पुन्हा हा प्रश्न विचार
बाकी डोक असलेल्यांनी डोक नसलेल्यांच्या हेल्मेट ची चिंता सोडावी हे उत्तम
(एखाद्याला आपल्या कर्माने मरायचा असेल तर तुम्ही काही करू शकत नाही)
तरीही प्रतिसाद लिहिला कारण स्वतःला हेल्मेट घालायचा नसेल तर घालू नका पण हेल्मेट ना घालण्याचा प्रचार करू नका
8 Feb 2016 - 6:08 pm | पिलीयन रायडर
अगदी अगदी..
8 Feb 2016 - 6:15 pm | सुधीर१३७
विनोद म्हणून वाचा, प्रचार म्ह्णून नाही.
.......... आपल्या व्यतिरिक्त इतरांना डोके आहे किंवा नाही याची चिन्ता आपण करु नये हे उत्तम ....
8 Feb 2016 - 7:39 pm | अनिरुद्ध.वैद्य
डोक असलेल्यांनी डोक नसलेल्यांच्या हेल्मेट ची चिंता सोडावी हे उत्तम
>>
सहमत!
8 Feb 2016 - 6:59 pm | बबन ताम्बे
एकदा शास्त्रीनगर,येरवडा येथील सिग्नलला लाल सिग्नल लागला म्हणून स्कूटर थांबवली. हेल्मेट घातले नव्ह्ते. अचानक कानाशेजारून सुंईई असा आवाज करत एक डंपर गेला. लोड बॉडीची रुंदी ही डंपरच्या ड्रायव्हरच्या केबिनच्या रुंदी पेक्षा थोडी जास्त असते. लोड बॉडी दोन्ही बाजूकडून बाहेर आलेली असते. कधी कधी ड्रायव्हरला शेजारच्या गाडयांचा त्यामुळे अंदाज येत नाही. माझ्या कानाशेजारून ती लोड बॉडी सुंईई आवाज करत गेली. माझे डोके आणि डंपरची लोड बॉडी यात चार इंचाचे किंवा कमीच अंतर असेल. दुस-या दिवसापासून निमूटपणे हेल्मेट घालायला लागलो.
8 Feb 2016 - 7:31 pm | मी-सौरभ
मी काय म्हणतो, सरकार म्हणते की दुचाकी स्वारांन्नी हेल्मेट घातले पाहिजे. हेल्मेटशिवाय गाडी चालवताना पकडले तर दंड भरावा लागेल.हेल्मेट की दंड हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे.
आपण ईथे चर्चा केल्याने सरकार त्यांचा निर्णय बदलणार आहे का?
8 Feb 2016 - 10:33 pm | संदीप डांगे
हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हेल्मेट उत्पादक कंपन्यांकडून व खाबुगीरी करणार्या पोलिसांकडुन मला आताच हे पार्सल आले.
त्यामुळे हेल्मेटसक्तीच्या मागे प्रचंड उलाढाल व भ्रष्टाचार होत असल्याची माझी खात्रीच पटली, त्यामुळे स्वतःच्या सदसद्विवेक बुद्धीला जागून ह्या भ्रष्टाचारात अजिबात सामिल व्हायचे नाही असे ठरवून मी ह्या धाग्यावरुन रजा घेतो.
(नाही, पार्सल कुठेही परत पाठवणार नाही. माझ्या देशभक्तीची पावती आहे ती... अर्र..अर्र.. काय चुकतंय का..? माझं नै हो, नोटा मोजणार्यांचं म्हणतोय मी...)
8 Feb 2016 - 11:06 pm | अन्नू
एकंदरीतच- भारतासारख्या पापभिरु देशात हेलमेटची सक्ती करण्याचे सत्र अगदी अनादी काळापासून चालू आहे असे समजते.
आत्ताच हाती लागलेल्या ठळक बातमीनुसार-
याबाबत यमही ढसाढसा रडल्याचे वृत्त समोर आले आहे.
पण हेलमेट काही त्याला चुकला नव्हता.
रेडा चालवत असून देखील त्याला, स्पेशल शिंग डाझाईन्ड- ५ किलो ३०० ग्रॅ.चा हेलमेट शिव महाराजांनी कंपल्सरी केला होता.
असा- 'महाशिव' पुराणाच्या 'अधांतरी ट्रॅफिक' नियामवलीच्या- कायद्यांतर्गत उल्लेख आढळतो!
16 Feb 2016 - 9:14 pm | श्रीगुरुजी
३-४ दिवस हेल्मेटसक्तीचे नाटक झाल्यावर पुण्यातील हेल्मेटसक्ती बारगळलेली दिसतेय. पोलिस कोणी हेल्मेट घातले का नाही याच्याकडे लक्षही देत नाहीत. कोणत्याही चौकात सिग्नलला थांबलेल्या दुचाकी वाहनचालकांपैकी जेमतेम २०-२५% वाहनचालकांनीच हेल्मेट घातलेले दिसते. मागे बसलेल्याच्या एकाही व्यक्तीच्या डोक्यावर हेल्मेट दिसत नाही.
पुणेकरांच्या एकजुटीचा पुन्हा एकदा विजय झाला आहे!
16 Feb 2016 - 11:11 pm | मोदक
असूदे हो.. ज्यांना स्वतःला डोके असण्याची खात्री आहे आणि ते सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे ते लोक्स हेल्मेट वापरतील असे समजा.
16 Feb 2016 - 11:18 pm | कपिलमुनी
हेल्मेटविरोधाचा , पुणेकरांच्या एकजुटीचा , न्याय लढ्याचा विजय पचनी पडलेला दिसत नाही.
-- हेल्मेटधारी पिंचिकर
16 Feb 2016 - 11:44 pm | मोदक
नाही पडला. काय कम्प्लेन हाय?
16 Feb 2016 - 11:46 pm | मी-सौरभ
कंप्लेन नाय कट्टा करा असा आग्रेव हाय
16 Feb 2016 - 11:16 pm | कपिलमुनी
वरती परदेशामधले रेफर्न्स दिले होते ना ?
पुण्यात असाल तर या कट्ट्याला :)
28 Aug 2016 - 1:55 am | मोदक
http://cycling-today.com/saved-by-the-helmet-billionaire-richard-branson...
21 Dec 2018 - 12:26 pm | प्रकाश घाटपांडे
आता १ जानेवारी २०१९ पासून पुण्यात हेल्मेट सक्ती होणार आहे. आमचा विरोध हेल्मेटला नसून सक्तीला आहे व वाहतुकीचे अन्य गंभीर बाबींकडे लक्ष देण्याऐवजी हेल्मेटसक्तीवर का लक्ष देता आहात? असा सूर सध्या पुण्यात आहे.
21 Dec 2018 - 2:34 pm | चौथा कोनाडा
मला वाटतं हेल्मेटसक्ति या वेळीही बारगळेल
असले हस्तिदंती मनोर्यावाले निर्णय जे लोक घेतात ते एसी स्कोडा स्कॉरपियो गाडीतून फिरणारे असतात.
सामान्य दुचाकीस्वारांच्या दु:खाची आणि दैनंदिन हलाखीची कल्पना त्यांना नसते.
या वेळीही सक्तिला मोठा विरोध सुरु झालेलाच आहे. खुद्द आरटीओ मधील सामान्य पोलिस शिपायांना देखील ही सक्ति जाचक आहे, हे त्यांच्याशी बोलताना जाणवते.
21 Dec 2018 - 4:05 pm | पंतश्री
२०km च्या स्पीडने असिसिडेन्ट झाल्यास किती नुकसान होऊ शकते?
पुण्यातील बहुतेक रस्त्यावरील गाड्यांचा वेग २०-४०किमी आहे. ठराविक मोठे रस्ते, शहरात असलेले हायवे अशी असे काही अपवाद वगळता वाहनाचा वेग वाढवणे शक्य होत नाही. हे वक्तव्य सामान्य नागरिकांसाठी आहे. काही विशेष व्यक्ती भर गर्दीत पण ६०किमी चा वेग गाठू शकतात. पण सामान्यतः वेग जास्त नाही. मुख्य शहरात तर २०किमीचा वेग पण शक्य होत नाही. ह्यात परत बंद सिग्नल आणि खड्डे ह्यांची भर पडते. हेल्मेट असताना मानेला जे खड्ड्या मुले हादरे बसतात ते अवर्णीय आहेत. ह्या झटक्यांनीच आधी हाडे खिळखिळी होत आहेत त्यात हि हेल्मेट ची भर. भेटलेत आव्यश्यक आहे मान्यच, पण सक्ती केली कि त्यात पैसे खाणाऱ्यांचे फळते .
21 Dec 2018 - 4:36 pm | प्रसाद_१९८२
२०km च्या स्पीडने असिसिडेन्ट झाल्यास किती नुकसान होऊ शकते?
--
फार काही नाही,
मात्र रस्त्यावर एकाद्या २०km च्या स्पीडने चालणार्या वाहनाचा तुम्हाला धक्का लागला किंवा एकाद्या खड्यामुळे तुम्ही दुचाकीसहीत रस्त्यावर पडलात व त्याचवेळी मागून २०km च्या स्पीडने एकादा ट्रक येत असेल तर तो ट्रक तुमच्या डोक्यावरुन जाऊन तुमचा जीव जाऊ शकतो इतकेच नुकसान होऊ शकते.
--
21 Dec 2018 - 4:54 pm | प्रसाद_१९८२
सामान्य दुचाकीस्वारांच्या दु:खाची आणि दैनंदिन हलाखीची कल्पना त्यांना नसते.
--
दुचाकी चालवताना लोकांना स्वत:च्या सुरक्षेपेक्षा,
होणार्या दु:खाची आणि दैनंदिन हलाची चिंता अधिक आहे, हे पाहून आश्चर्य वाटले.
21 Dec 2018 - 5:14 pm | विशुमित
हेल्मेटमधील घामाचा कुबट सोडला तर, त्याबद्दल आपली काही बी तक्रार नाही.
....
हेल्मेट मुळे डोक्यावरचे केस खुप झपाट्याने गळतात. हे खरे आहे का?
21 Dec 2018 - 5:15 pm | विशुमित
"कुबट वास " असे वाचावे.
21 Dec 2018 - 7:47 pm | सुबोध खरे
हेल्मेट च्या आतील आवरण स्वच्छ साबणाने धुवावे आणि उन्हात वाळवावे. यामुळे त्यातील घाम आणि त्याला चिकटलेली तेलकट/ धुराची घाण स्वच्छ होते.
यानंतर त्यावर बॉडी डीओ चा स्प्रे मारावा आणि एक दिवस उताणे ठेवावे.यामुळे त्यात असलेले जिवाणू नष्ट होतात आणि नुसता घाम आला तरी त्याला वास येत नाही. या सर्व गोष्टी ला रविवारचा एक दिवस पुरतो.
त्यातून अतिरिक्त घाम येणाऱ्यांनी हेल्मेटच्या आत मऊ टिशू पेपर ठेवावा आणि तो रोज बदलावा.