१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील.
२०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली.
औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे.
आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे
भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे.
२०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले.
वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली.
थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली.
ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे.
मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे.
थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे.
जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे.
प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे.
५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता.
त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती.
मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला.
काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला.
येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले.
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती.
मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे.
गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे.
मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता.
जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत.
ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला.
मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye".
याच लेखात पुढील वाक्ये आहेत.
Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing.
चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत.
२ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे.
२००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे.
"संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे.
मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे.
कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे.
देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे.
"भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल.
महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय.
दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित.
सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल.
नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते.
नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते.
मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल.
एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे.
राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते.
काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती.
मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे.
एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे.
"सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही.
लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित.
महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत.
एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे.
विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण.
_________________________________________________________________________________
मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे.
मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते.
_________________________________________________________________________________
एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण.
_________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की!
_________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो.
वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन.
जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल.
Now shoot
_________________________________________________________________________________
प्रतिक्रिया
24 Nov 2015 - 4:37 pm | नाव आडनाव
सोने : बघावे, घ्यावे की -----
ह्या धाग्यासारखा
तूरडाळ : बघावी, घावी की -----
असा धागा नाही आला अजून :)
परवाच आज पर्यंतची सगळ्यात महाग तूरडाळ विकत घेतली - १९२ रूपये ५० पैसे / किलो.
24 Nov 2015 - 4:48 pm | संदीप डांगे
बापूसाहेब, होता होत असेल तर तांदूळाचा साठा करून ठेवा. लिस्टपर अभी नेक्स्ट भात आहे.
बाकी, एकाच मालकाच्या चिकटून असलेल्या दोन (होलसेल व रीटेल) दुकानामधे एकाच वेळी तूरडाळीचा भाव असा होता: दिनांकः ४ नोव्हेंबर २०१५. होलसेल: १७० रुपये, रीटेलः २०० रुपये.
होलसेलमधून पाच किलो डाळ घेतल्यावर दुसरे सामान घ्यायला रीटेलमधे गेलो असता हे समजले. ;-)
24 Nov 2015 - 5:13 pm | कैलासवासी सोन्याबापु
डांगे साहेब,
कायले राष्ट्रनिर्मिती ले नाट लावता बावा!! आम्ही भाकर खाऊ हाओ! भात फ़क्त मरन नाहीतर तोरन रायते घरी! जवारी जदलोग महंगी करत नात तदलोग आमचे भागते भाऊ!
24 Nov 2015 - 5:20 pm | संदीप डांगे
असं काई बोल्ता का राजेहो, तुमाले उपाशी मारल्याबिगर रास्ठ्रनिर्मिती कशी व्हइन, सांगा ना बाप्पा...
जवारी खाता का धांडे खाऊन भागोता थे कायबी सरकारले समजू नका देऊ. चीमायभिन, तेभी गायप व्हइन बजारातून..
24 Nov 2015 - 5:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
घाबरवजा नोका हो! मायभईन धांडे !!
:D :D
11 Dec 2015 - 10:15 am | चिनार
कायले भेव वाटून घेता बे दोघेजन..काल राताच्याले राष्ट्रपुर्शाचा सत्कार झालता ना दिल्लीत...तिथ बी तूर दाळ नव्हती म्हने जेवनात..निस्ता भाकरी नं ठेचा हानला म्हने साऱ्याइने..साऱ्याइची असहिष्णुता वाढली असंनं आता सकाळी.. आता कराच लागते त्यैले तुरडाळ स्वस्त..
24 Nov 2015 - 5:29 pm | मोगा
http://m.maharashtratimes.com/nation/communal-clashes-killed-fewer-peopl...
गुर्जी आलेख काढा
26 Nov 2015 - 10:39 pm | मोगा
http://m.indiatimes.com/news/india/prime-minister-narendra-modi-caught-s...
10 Dec 2015 - 4:00 pm | मोगा
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे
11 Dec 2015 - 9:30 am | सुबोध खरे
हितेसभाई
श्री मोदींबद्दल इतका द्वेष कि तुम्ही तो धागा परत परत वर आणता आहात?
11 Dec 2015 - 11:10 am | मोगा
आम्ही द्वेषात लिहितो तर तुम्हीही जोशात लिहा.
11 Dec 2015 - 6:41 pm | ट्रेड मार्क
तर उगाच काहीतरी लिहून… जरा लॉजिकल काहीतरी लिहिलं असतं तर चर्चा तरी झाली असती.
खरच राउल गंदी पंतप्रधान व्ह्यायला पाहिजे होता! द्विपक्षीय भेटींमध्ये आणि इतर समिट्स मध्ये कसली मजा आली असती. संसदेतील भाषणे ऐतिहासिक झाली असती. कॉमेडी शोजचा धंदा बसला असता :)
12 Dec 2015 - 10:19 am | मोगा
मग आम्ही मोदींचा द्वेष का करायचा ?
सलमाननेमोदीबरोबर पतंग उडवला होता.
आज सलमान निर्दोष आहे.
भगवी सोशल मेडिया भुतावळही गप्प आहे.
......
जर सलमान काँग्रेसच्या काळात सुटला असता तर त्याच्याव काँग्रेसच्या व त्याच्या धर्माच्या उद्धारावर शेकडो धागे इथेच निघाले असते.
....
12 Dec 2015 - 11:17 am | सुबोध खरे
काहीही हा मो
14 Dec 2015 - 2:45 pm | इरसाल
जामोप्याच्या हातात कोलीत,
सुटला तर मोदींबरोबर पतंग उडवला
शिक्षातर तो म्हणे मुसल्मान म्हणुन, नाही का ?
(होबासराव या जरा इथे तुमची गरज आहे.....पेटंट वाक्यासाठी ;) )
13 Dec 2015 - 3:55 pm | अभिजित - १
केंद्र सरकारने गॅस सिलिंडर अनुदान योजना बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी अर्थसंकल्पात आयकर भरणाऱ्यांना हा सवलतीचा लाभ मिळणार नाही. याकरिता सिलिंडरसाठी आधारऐवजी पॅनकार्ड आवश्यक करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सिलिंडरच्या सबसिडीचा "आधार' काढणार? - सकाळ
28 Dec 2015 - 7:38 pm | sagarpdy
अनुदान केवळ अशाच कुटुंबाना मिळणार नाही ज्यांचे उत्पन्न १० लाखापेक्षा अधिक आहे. आणि माझ्या मते या अनुदानाची त्यांना गरजही नाही.
http://timesofindia.indiatimes.com/india/No-LPG-subsidy-for-consumers-wi...
26 Dec 2015 - 10:03 pm | संदीप डांगे
आज गुरुजींची खूप आठवण येते आहे.
मोदी पाकिस्तानात आहेत तर इकडे थोडे मनोरंजन झाले असते.
गुरुजी जल्दी वापीस आवो..
27 Dec 2015 - 10:50 am | मोगा
काँग्रेसनंही नमो-नवाझ याची ही भेट भेट पूर्वनियोजित असल्याचा दावा केला होता. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय हीत जपण्यासाठी वा दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानला गेले नाहीत, तर आपल्या व्यक्तिगत उद्योगातील व्यक्तीगत हितसंबंधांना वाढवण्यासाठीच त्यांनी ही भेट घेतल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे नेता आनंद शर्मा यांनी केली होती.
एका उद्योगपतीने या भेटीची आधीच व्यवस्था केली होती असा दावाही काँग्रेसने केला आहे. हा पाक दौरा अनपेक्षित होता हा परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांचा दावा फोल असून हा दौरा निश्चितच पूर्वनियोजित होता याबाबत आमच्याकडे ठोस माहिती आहे असेही शर्मा म्हणाले
29 Dec 2015 - 3:00 am | ट्रेड मार्क
जर का शर्मांकडे ठोस माहिती आहे तर जाहीर करावी, "क्यो शर्मा रहे है?". कुठल्या उद्योगपतीने भेट ठरवली होती आणि ती एवढी गुप्त कशी काय राहिली? त्यात त्या उद्योगपतीचा काय फायदा झाला हे सगळे जाहीर करावं. म्हणजे कोणाकोणाचे राजीनामे मागायचे ते पण ठरवता येईल.
पण एकूणच चांगलाच पोटशूळ उठलाय सगळ्या कोन्ग्रेसिंना आणि अतिरेक्यांना. काय तोंडाला येईल ते बरळत आहेत. अजून केजरुद्दिन काही बोलले नाहीत का या वर?
29 Dec 2015 - 5:16 am | नगरीनिरंजन
मुळात "पाकिस्तान को लव-लेटर भेजना बंद करो" असे निवडणुकीपूर्वी म्हणणारे मोदी अचानक गळाभेट घ्यायला गेलेच का? भाजपाचा असा रंगबदलूपणा अनेकवेळा उघड झाला आहे.
राम माधवांनीही "ख्रिश्चन लोक ब्लडसकर्स आहेत" असे गोडवळकरांनी म्हटल्याचे साफ नाकारले. अरे, जर म्हटलंय तर छातीठोकपणे म्हणा ना म्हटलंय म्हणून. डरपोक आणि संधीसाधू आहेत हे लोक.
28 Dec 2015 - 5:45 pm | मोगा
उत्तर प्रदेश सरकारने अखलाकच्या घरातील रेफ्रिजेरेटरमध्ये सापडलेलं मटण गौतम बुद्ध नगर येथील पशुवैद्यकीय विभागाकडे चाचणीसाठी पाठवलं होतं. या विभागाने चौकशीचा अहवाल सादर केला असून त्यात हे मटण गायीचं नव्हतं, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या अहवालात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून या मटणाचे नमुने फोरेन्सिक लॅबलाही पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी गेल्याच आठवड्यात ग्रेटर नोएडा पोलिसांनी भाजपचे स्थानिक आमदार संजय राणा यांचा मुलगा विशाल याच्यासह १५ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे
29 Dec 2015 - 6:37 am | नितिन थत्ते
>>हे मटण गायीचं नव्हतं,
>>भाजपचे स्थानिक आमदार संजय राणा यांचा मुलगा विशाल याच्यासह १५ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे
या दोन गोष्टींचा काही संबंध असायला नको. ते मांस गायीचे असते तरी गुन्हा दाखल व्हायलाच हवा.
29 Dec 2015 - 7:27 am | मोगा
ते कालच्या मटामधुन कॉपी पेस्ट केले होते.
29 Dec 2015 - 9:05 pm | ट्रेड मार्क
हे वाक्य मोगा यांना ठळकपणे सांगायचं आहे. आणि त्यामागचा उद्देश असा असावा की, आमदाराच्या मुलाला पकडलं तरी त्या आमदाराने किंवा इतर कुठल्या भाजप नेत्याने दंगा केला नाही. ;)
4 Jan 2016 - 12:24 pm | नाव आडनाव
श्रीगुरूजी, नव्या वर्षाच्या शुभेच्छा आणि भेलकम बॅक :)
मला एक विचारायचंय -
"२०२२ तक सबके लिए घर" साठी केंद्र सरकार काय करणार आहे? "सबके लिए" म्हणजे अर्थातच ज्यांच्याकडे एकही घर नाही त्यांच्यासाठीच असेल. पण जसं म्हाडा काम करतं, तसं काही शे/हजार घरं बांधून उरलेल्या ६ वर्षात (२०२२ म्हणजे २०२२ चा ३१ डिसेंबर गॄहित धरू) "सबके लिए घर" हे थोडं अवघड दिसतंय. "सबके लिए घर" साठी सरकारने काही काम चालू केलंय का? जसं गंगा शुद्धीकरण एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी ऊमा भारतींकडे एक खास खातं देण्यात आलंय, तसं काही ह्या केस मधे होणार आहे का? गंगा शुद्धीकरणापेक्षा हे काम बर्याच पटीने मोठं असणार आहे, म्हणजे गेल्या दीड वर्षांत सरकारचा काहीतरी आराखडा तयार असणार.
4 Jan 2016 - 1:19 pm | नाव आडनाव
एक दुरूस्ती-
"उरलेल्या ६ वर्षात"
ऐवजी
"उरलेल्या ७ वर्षात" असं पाहिजे होतं.
20 Jan 2016 - 1:32 pm | मोगा
तूर डाळ परवडत नसेल तर केसरी डाळ ( लाखी डाळ ) खा,
या डाळीमुळे पॅरॅलिसिस होत असल्याने त्यावर बंदी होती. मोदी सरकार ती बंदी उठवणार आहे.
The government is lifting a five-decade-old ban on a type of lentil that has been linked to nerve damage and paralysis, in a desperate attempt by Prime Minister Narendra Modi to cut legume imports and make the nation self-sufficient in the edible seeds.
http://wap.business-standard.com/article/economy-policy/govt-lifts-ban-o...
20 Jan 2016 - 1:33 pm | मोगा
तूर डाळ परवडत नसेल तर केसरी डाळ ( लाखी डाळ ) खा,
या डाळीमुळे पॅरॅलिसिस होत असल्याने त्यावर बंदी होती. मोदी सरकार ती बंदी उठवणार आहे.
The government is lifting a five-decade-old ban on a type of lentil that has been linked to nerve damage and paralysis, in a desperate attempt by Prime Minister Narendra Modi to cut legume imports and make the nation self-sufficient in the edible seeds.
http://wap.business-standard.com/article/economy-policy/govt-lifts-ban-o...
25 Jan 2016 - 11:55 am | मोगा
सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या १०० गोपनीय फायली केंद्राकडून उघड
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील फायली गोपनीय ठेवल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर जरी वारंवार निशाणा साधण्यात येत असला, तरी नव्याने खुल्या करण्यात आलेल्या फायलींमधून नेहरूंचे मानवतावादी रुपच समोर आले आहे. बोस यांच्या मृत्यूनंतर व्हिएन्नात राहणाऱ्या त्यांच्या पत्नीला आर्थिक मदत करण्यासंदर्भातील सूचना त्यांनी परराष्ट्र व वित्त विभागाला केल्या होत्या.
१२ जानेवारी १९५२ रोजी नेहरू यांनी यासंदर्भात संबंधित विभागाला लिहिले होते. त्यावर कार्यवाही करत वित्त विभागाने नेताजींच्या पत्नी एमिली शेंकेल यांना आर्थिक मदत देण्याची तजवीज केली. तसेच, यासंदर्भात त्यांच्या पुतण्यालाही कळविण्यात आले. त्यानुसार व्हिएन्नातील भारतीय उप कॉन्सुलच्या मार्फत एमिली यांना १०० पौेंड्स देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दुसऱ्या एका पत्रानुसार, नेताजींच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या जपानमधील रेंकोजी मंदिराच्या देखभालीसाठी भारत सरकारने १९६७ ते २००५ या काळात सुमारे ५२ लाख खर्च केल्याचे निष्पन्न झाले
25 Jan 2016 - 11:55 am | मोगा
सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या १०० गोपनीय फायली केंद्राकडून उघड
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील फायली गोपनीय ठेवल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर जरी वारंवार निशाणा साधण्यात येत असला, तरी नव्याने खुल्या करण्यात आलेल्या फायलींमधून नेहरूंचे मानवतावादी रुपच समोर आले आहे. बोस यांच्या मृत्यूनंतर व्हिएन्नात राहणाऱ्या त्यांच्या पत्नीला आर्थिक मदत करण्यासंदर्भातील सूचना त्यांनी परराष्ट्र व वित्त विभागाला केल्या होत्या.
१२ जानेवारी १९५२ रोजी नेहरू यांनी यासंदर्भात संबंधित विभागाला लिहिले होते. त्यावर कार्यवाही करत वित्त विभागाने नेताजींच्या पत्नी एमिली शेंकेल यांना आर्थिक मदत देण्याची तजवीज केली. तसेच, यासंदर्भात त्यांच्या पुतण्यालाही कळविण्यात आले. त्यानुसार व्हिएन्नातील भारतीय उप कॉन्सुलच्या मार्फत एमिली यांना १०० पौेंड्स देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दुसऱ्या एका पत्रानुसार, नेताजींच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या जपानमधील रेंकोजी मंदिराच्या देखभालीसाठी भारत सरकारने १९६७ ते २००५ या काळात सुमारे ५२ लाख खर्च केल्याचे निष्पन्न झाले
25 Jan 2016 - 2:21 pm | होबासराव
मागच्या आठवड्यात एक लेख वाचला कुठेतरि आठवले कि डकवतो, तर त्याच्यात छान विवेचन होत कि आंतराष्ट्रिय बाजारात तेलाच्या किमति निच्चांकि ला असताना सुद्धा भारतात त्यामानाने किमति कमि नाहि झाल्यात आणि २०१५ H2 मध्ये ह्या पॉलिसि मुळेच अंबानि आणि कंपनिने कसा दुपटिने नफा कमवलाय.
@गुर्जि आता दोन वर्षानंतर हा लेख येउ द्या हि नम्र विनंति.
25 Jan 2016 - 4:29 pm | संदीप डांगे
गुर्जी आता इकडे येणार नाहीत. आता दोन वर्षे पुर्ण होत आलीत. पहिल्या वर्षी नवलाईचा उत्साह होता म्हणून निभावले. आता हिशोब मांडायला लागतीलच, दिलेली आश्वासने आणि पाळलेली वचने ह्यावर भक्तांना बोलायला काही विशेष मिळत नाही. अजूनही घोषणांच्या तुतार्याच फुंकल्या जात आहेत. जुन्याच टॉफीज नव्या रॅपरमधे येत आहेत. साठेबाजी आणि इंधनदर हा ज्वलंत विषय आहे. शेतकर्यांच्या कळीच्या प्रश्नांवर सरकार मूग गिळून बसले आहे. अजून बरेच आहे.
काहीच झाले नाही असे अजिबात नाही. कुठल्याही सरकारमधे जे सामान्यपणे होते तेवढे तर झालेच आहे. काही बाबतीत चांगलीही कामे झाली आहेत. पण कोहळ्याच्या आश्वासनांनंतर आवळेच पदरी पडत असतील तर नाक वर करुन चालणार्या भाजपने काँग्रेसवर केलेली आगपाखड आठवावी. तुमभी यार वैसेही निकले...
घोटाळ्यांबद्दल असे की इतक्यात काही बोलू नये. टर्म संपत आली की घोटाळे बाहेर येतील...
25 Jan 2016 - 4:38 pm | होबासराव
आपल्या पुर्ण प्रतिसादाशि सहमत, ऐकायला मिळतय (भक्तांकडुन नाहि) कि कुटनितिक लेव्ह्ल वर, सुरक्षा विषयक, किंवा तंत्रज्ञानात बरेच पाउले उचलले गेलेयत्..चला हे मान्य आहे. अहो पण आंतराष्ट्रिय बाजारात क्रुड ऑइल चे भाव प्रचंड पडलेले असताना त्याचा फायदा सामान्य माणसाला काहिच नाहि व्हावा ? सगळा फायदा फक्त जो विकत घेउन रिफाइन करतो त्यालाच ?
" शेतकर्यांच्या कळीच्या प्रश्नांवर " हा प्रकार लय भयंअकर होत चालला आहे बर, विदर्भाच्या जोडिला आता मराठवाडा हि आहे.
25 Jan 2016 - 9:16 pm | श्रीगुरुजी
याचे उत्तर पूर्वीच सविस्तर दिलेले आहे. पुन्हा एकदा जरा वेगळ्या पद्धतीने देतो.
जागतिक बाजारपेठेत गडगडलेले कच्च्या तेलाचे भाव ही परिस्थिती कायम टिकणारी नाही. भाव कालांतराने पुन्हा एकदा वर जाणार. सध्याच्या काळात भारतासारख्या आयातदार देशांना लॉटरी लागली आहे. एखाद्याला लॉटरीचे १ लाखाचे बक्षिस लागले तर सूज्ञ माणूस त्यातले काही मौजमजेकरता वापरेल, काही पैसे वापरून जुनी देणी फेडेल, काही पैशांनी गरजेच्या वस्तू आणेल व काही भविष्याकरता राखून ठेवेल. तो बक्षिसाचे सर्व पैसे चैनीत उधळणार नाही. तसे करणे मूर्खपणाचे ठरेल.
भारत तेच करतो आहे. भारतीय अंदाजपत्रकात दरवर्षी अंदाचे ४% हून अधिक तूट असते. तेलाचे भाव कमी झाल्याचा काही फायदा ग्राहकांना दिलेला आहे (२५ मे २०१४ या दिवशी पुण्यात पेट्रोल प्रतिलिटर ८२.५० इतके महाग होते, आज ते ६५.०७ इतके आहे. भावात जवळपास २१% घट झालेली आहे), काही फायदा पेट्रोलियम उत्पादक कंपन्यांना संशोधनासाठी व उत्खननासाठी दिला जाईल, काही फायदा अंदाजपत्रकातील तूट कमी करण्यासाठी वापरला जाईल.
27 Jan 2016 - 7:09 am | राजेश घासकडवी
ही मस्त आयडिया आहे. म्हणजे आता प्रत्येक रस्त्यावर अदृश्य टोलबूथ आहेत - कुठूनही कुठेही एक किलोमीटर गेलात की सुमारे दोन रुपये टोल! आणि रस्ता द्रुतगती नसेल, ट्राफिक जॅमवाला असेल तर जास्त पेट्रोल जळतं, म्हणजे जास्तच टोल... जबरदस्त कल्पना आहे.
27 Jan 2016 - 8:35 am | मोगा
इतकी वर्षे काँग्रेसही तेलदर व महागाई वाढवताना तो पैसा देशकार्याला वापरावा या पवित्र उद्देशानेच करत होते गुर्जी !
मग तेंव्हा तुमचे भाजपा का ओरडत होते ?
जे लोक गांधीहत्या व जातीवाद यांचे समर्थन करु शकतात , ते लोक जगातील कोणत्याही बाजूकडुन वकिली करु शकतात. त्यामुळे गुर्जी , तोच तोच युक्तीवाद करु नका.
30 Jan 2016 - 6:16 pm | नाव आडनाव
भारतासारख्या आयातदार देशांना लॉटरी लागली आहे
लॉटरी लागली म्हणजे नक्की काय -
दुसर्या प्रकारची "लॉटरी" असेल तर ती आधीच्या सरकारात चालली असती का?
आणि मी तर म्हणतो लॉटरी काय, लॉटर्या लागल्यात. स्वच्छ भारत कर, वाढलेला व्हॅट, एलपीजीची सबसीडी आणि अश्या कितीतरी लॉटर्या आहेत. भारी आहे लॉटरी. मस्तंच :)
30 Jan 2016 - 6:52 pm | मोगा
अजुन एक नवा कर वाढणार आहे.
स्मार्ट सिटी ट्याक्स !
25 Jan 2016 - 7:06 pm | संदीप डांगे
चापलूस आणि भाटांना काँग्रेस पुरस्कार वाटते असे हे म्हणत असत. यंदाच्या पद्मपुरस्कारांच्या यादीकडे पाहिल्यास सरकार बदललेच नाही असे वाटते.
25 Jan 2016 - 7:25 pm | चैतन्य ईन्या
बाडीस!!! चला हा शब्द वापरला एकदाचा. मोदिनी भलताच भ्रमनिरास केलाय. युपीए३ वाटते आहे. इतक्या कोलांट्या मारल्या आहेत कि ज्याचे नाव ते. सगळी आश्वासने पाळणे कठीणच होते पण नेमके ह्यांना थोडे पण सुधारावेसे वाटत नाहीये. आधी त्या आधार कार्डला इतका विरोध आणि सत्तेत आल्या आल्या त्याचीच भलामण. हाच प्रकार काश्मीरबाबतीत. उगाचच आधी ढोल पिटले आणि आता आपलेच शब्द गिळावे लागत आहेत. भ्रष्टाचारावर ठोस उपाय तर काहीच नाहीत. तोच प्रकार राफेल चे डील करताना हे स्वतःच जावून ते डील फायनल करून आले. कशाला हे?
ह्यांची कार्यपद्धती आणि युपीएची ह्यात काय तो उन्नीस बीसचा फरक आहे.
25 Jan 2016 - 7:48 pm | मार्मिक गोडसे
सहमत.
सरकारी महसुलात वाढ होउन तो पैसा विकासकामांसाठी वापरला जाईल, त्यामुळे थोडी झळ सोसायला हरकत नाही. परंतू जिवनावश्यक वस्तुंची साठेबाजी, भेसळ व प्रचंड नफेखोरीकडे सरकार जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहे.
व्यापार्यांच्या गोदामांवर धाडी टाकून हजारो मेट्रिक टन तूरडाळ शासनाने जप्त केल्यावर ही डाळ खुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध केली जाईल ज्यामुळे किरकोळ बाजारात तुरडाळीचे दर १००-१२० प्र.कि. पर्यंत खाली येतील असे सरकारने आश्वासन दिले होते. पुढे ह्या जप्त केलेल्या तूरडाळीचे काय झाले ते माहीत नाही, परंतू आजही बाजारात चांगल्या प्रतीच्या तूरडाळीचे दर १६०-२०० प्र.कि. इतके आहेत. निकृष्ट दर्जाची व भेसळयुक्त (ला़खीची) तुरडाळही १००-१३० प्र.कि.च्या आसपास मिळते.
गेल्यावर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन होउनही आज किरकोळ बाजारात साखरेचे दर ३१-३४ प्र.कि. च्या आसपास आहेत्, गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये साखरेचे दर २३-२४ प्र.कि.होते. केवळ ५ महिन्यात ४०% इतकी भाववाढ! सध्या बाजारात मिळणारी साखर ही व्यापार्यांकडील (साठेबाजीची) आहे, कारखान्यातील नव्हे.त्यामुळे सरकार कोणाचे हित बघतेय ते स्पष्ट होते.
25 Jan 2016 - 7:59 pm | संदीप डांगे
जप्त केलेली तूरदाळ परत साठेबाजांच्या हवाली केली गेली आहे.
साखरेचे उत्पादन यावर्षी सुमारे २८% टक्क्यांनी घटणार आहे असे काहीसे वाचल्याचे स्मरते. त्यावर डोळा ठेवून आतापासून भाववाढ सुरु झाली असेल.
साठेबाजांचे एक चक्र असते. एका वस्तूनंतर दुसरी वस्तू पद्दतशीरपणे भाववाढ करून नफा खाल्ल्या जातो. कधी तेल, कधी डाळ, कधी साखर, कधी कांदा. एखाद्याच वस्तूचे भाव २०-३० टक्क्यांनी वाढत असल्याने सामान्य घराच्या बजेटमधे फारतर १००-२००चे फरक पडतो पण दरमहा असे १००-३०० रुपये साठेबाज पळवतात हे मात्र खरे.
25 Jan 2016 - 8:04 pm | संदीप डांगे
साखरेचे उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा २ दशलक्ष टनांनी कमी होणार आहे. मागच्या वर्षी ते २८.३ होते. उसाच्या शेतीला बसलेल्या फटक्यामुळे व कारखान्यांना झालेल्या नुकसानामुळे यावर्षी आवक कमी राहणार आहे. त्यामुळे भाव वाढते राहतील. साधारण ऑगस्ट नंतर भाव अजून वाढतील असे वाटते. यावर्षी पाऊस कसा राहिल यावरही बर्याच गोष्टी अवलंबून आहेत.
संदर्भः
30 Jan 2016 - 7:20 pm | सुबोध खरे
http://www.newsgram.com/ebbing-sugar-rush-the-fall-of-the-indian-sugar-i...
हे पण पाहून घ्या
25 Jan 2016 - 9:05 pm | श्रीगुरुजी
हा धागा अजून जिवंत दिसतो. मी मध्यंतरी सुमारे पावणेदोन महिने मिपावर नव्हतो. ताआधी ७००+ प्रतिसाद होऊन गेले होते. त्यामुळे माझ्या अज्ञातवासात धागा निजधामाला जाईल असे वाटले होते. पण अजून धुगधुगी दिसते आहे. वर्षपूर्तीनिमित्त काढलेला धागा जवळपास ८ महिने जिवंत आहे. आता दुसरे वर्ष संपत आले.
असो.
29 Jan 2016 - 8:47 pm | श्रीगुरुजी
http://www.abplive.in/india-news/abp-news-nielsen-poll-modi-above-averag...
2 Feb 2016 - 6:15 pm | श्रीगुरुजी
http://www.loksatta.com/mumbai-news/ed-arrest-chhagan-bhujbal-nephew-sam...
Beginning of the end (of corrupt leaders)?
Who would be next? Senior Bhujbal? Ajit Pawar? Tatakare?
2 Feb 2016 - 8:53 pm | मोगा
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे एकेकाळचे खंदे शिलेदार छगन भुजबळ स्वगृही परतणार, अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्राने या चर्चेला तोंड फुटलं असून खुद्द भुजबळ आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मात्र हे दावे फेटाळण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याने राजकीय कोंडी झाली असताना संजय राऊत त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. राऊत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्यात ओढून-ताणून केल्या जात असलेल्या तपासावर शंका उपस्थित केली आहे. भुजबळ आणि अधिकाऱ्यांवर लावलेले आरोप सिद्ध करता आले नाहीत तर सरकारची नाचक्की होईल, असेही राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे. राऊत यांनी अशाप्रकारे भुजबळ यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यातूनच शिवसेना आणि भुजबळ यांच्यातील दुरावा संपण्याचेच हे संकेत असल्याचेही काही जाणकारांचे म्हणणे आहे. यावर भुजबळ यांनी थेट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्यांचे निकटवर्तीय मात्र शिवसेनेशी पूर्वीचं शुत्रत्व आता उरलेलं नाही, असं सांगून नव्या समीकरणांचे संकेत देऊ लागले आहेत.
3 Feb 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी
खूप शिळी आणि अजिबात महत्त्व नसलेली बातमी.
3 Feb 2016 - 10:32 pm | मोगा
निवडणुकीत भाजपाने उधळलेले १२० की किती कोटी भाजपा कसे वसुल करणार आहे , गुर्जी ? अभ्यास वाढवा
4 Feb 2016 - 2:02 pm | श्रीगुरुजी
समीर भुजबळपाठोपाठ राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांना देखील ईडीची नोटिस गेली आहे. दोन दिवसांपूर्वी भुजबळांच्या अनेक कार्यालयावर घातलेल्या छाप्यात प्रचंड रोख रक्कम सापडली आहे व त्याची अजून मोजदाद सुरू आहे अशी बातमी येत आहे (खरे खोटे खुदा जाने). समीरपाठोपाठ छगनसुत पंकज आत जाईल असादेखील वाहिन्यांचा अंदाज आहे.
http://www.hindustantimes.com/india/ajit-pawar-among-44-politicos-barred...
भ्रष्टाचारामुळे नुकसानीत गेलेल्या सहकारी संस्था, दूध महासंघ इ. सहकारी संस्थावर सध्याच्या संचालकांना १० वर्षे संचालक म्हणून काम करण्यास महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. या संस्थांवर बहुतेक संचालक राष्ट्रवादी व काँग्रेसचे आहेत. काही प्रमाणात इतर पक्षांचेही संचालक आहेत. या बंदीमुळे अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटिल, दिलीप देशमुख इ. दिग्गजांना संचालकपदाची निवडणूक लढविण्यास बंदी आली आहे.
हळूहळू भ्रष्टाचार्यांविरूद्ध फास आवळला जात आहे.
3 Feb 2016 - 6:22 pm | दिवाकर देशमुख
डॉलरचा भाव कुणाच्या वयानुसार झाला आहे.?
सुषमा मॅडम मागच्या सरकारवेळेस म्हणाली होती आज रुपये ने किंमत खोई है और प्रधानमंत्रीने गरिमा खोई है
आज मोदीची गरिमा कुठे पोहचली?
जे डाळ ७० वर असताना आंदोलन करत होते ते आज२०० वर पोहचल्यावर कुठल्या बिळात लपले आहे.
पेट्रोलचा भाव कवडीमोलावर असताना सरकार सरचार्ज का वाढवून किंमती वाढवत आहे?
कुणाचे खिसे भरत आहे जर सरकार स्वत:चे खिसे भरत असेल तर या आधीच्या सरकारच्या भाववाढी विरुध्द भाजपा शिगमा नाच करत होती.?
ही उत्तरे भक्तांनी द्यावी.
3 Feb 2016 - 6:40 pm | संदीप डांगे
त्यांची उत्तरे पचवण्याची आमची शक्ती संपली, तुम्ही ताज्या दमानं या मैदानात. ;-)
3 Feb 2016 - 7:07 pm | कैलासवासी सोन्याबापु
:D :D :D
3 Feb 2016 - 7:19 pm | होबासराव
पेट्रोल च बोलायच काम नाय ! इथे जो कोणि
पेट्रोलचा भाव कवडीमोलावर असताना सरकार सरचार्ज का वाढवून किंमती वाढवत आहे?
बोलतो त्याला खरडवहितुन धमकिवजा समजावणि आणि ते बि ईंग्लिस मधुन देण्यात येते. संदर्भः- होबासराव ह्यांचि खरडवहि.
4 Feb 2016 - 9:32 am | नाव आडनाव
आज रुपये ने किंमत खोई है और प्रधानमंत्रीने गरिमा खोई है
काय भारी बोलतात सुषमा स्वराज! फॅनंच झालो एकदम. बायदवे, ह्याच लॉजिकने आत्ताच्या पंतप्रधानांच्या "गरिमे" बद्दल त्यांचं काय मत असेल बरं :)
3 Feb 2016 - 7:20 pm | होबासराव
:)
3 Feb 2016 - 7:23 pm | होबासराव
i hope this person understands the meaning of "insinuation"
3 Feb 2016 - 7:31 pm | कैलासवासी सोन्याबापु
एकंदरित तुम्हाले बी झाबु भेटला नाई मंग
:D :D
3 Feb 2016 - 7:45 pm | संदीप डांगे
तुम्हालेई भेटला काय..? मां तं नांदी नै लागेल कोनी अजून. तुमी लोकाईनच आळवं केलं काय तिकळल्या तिकळेच..?
3 Feb 2016 - 8:48 pm | कैलासवासी सोन्याबापु
नाई डांगे ब्वा आमच्या नांदी नाई लागल कोई बी पर अटीसा का कमी दही होयलाय का लेक भेज्याचे
3 Feb 2016 - 7:36 pm | होबासराव
बर मि काय म्हन्तो का बॉ आमचि अशि कुटल्याच राजकिय पक्षाशि बांधिलकि नाहि का बॉ जि जि र जि कर्याले म्या त्याईच्याकडे काहि नौकरि नाय करत. जे काम पटल तथि चांगल म्हणतो आन जे नाय पटल तथि परश्न विचारतो. आता मले सांगा बापु माल काय चुकल ? त लागे मले सांगण्या आल का "This is in response to your insinuation" आता व माय भेलो ना मि.
3 Feb 2016 - 8:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
थुमी एका पक्षाले अक्कल गिरवी ठेवेल नाई! हे सऱ्यात मोठी चुकी वाटते मले थुमची!! पर जाऊ द्या आम्ही हाओ थुमच्या संग काई काई चुका मेंटल स्वास्थ्य जप्याले बर्या रायतेत नाई तर मानुस केळकर कड़े भर्ती करा लागते!! आपुन चुका करू राहलो त्याच ठीक हाय!
3 Feb 2016 - 7:39 pm | होबासराव
आपन प्रतिसाद टाकाव गुर्जि च्या धाग्यावर आन खरडवहित वेगळाच आयडी स्पष्टिकरन देते.
3 Feb 2016 - 7:42 pm | संदीप डांगे
कोनाले सांगजा नका होबासराव, तुमी आपले हा म्हुन सांगतो, थे लेकायची ग्याण्ग आहे पुरी.
3 Feb 2016 - 8:20 pm | श्रीगुरुजी
आताच तुमची खरडवही पाहिली. "प्रदीप" नामक ७ वर्षे २ महिने वय असलेल्या खूप जुन्या सदस्याने तुमच्या खरडवहीत खरड लिहिली आहे. हे प्रदीप कोण आहेत याची मला सुतराम कल्पना नाही. माझा त्यांच्याशी यापूर्वी संवाद झाल्याचे स्मरत नाही. मिपावर माझा श्रीगुरूजी हा एकमेव आयडी असून माझा आयडी सुमारे ३ वर्षे १ महिना जुना आहे या आयडीव्यतिरिक्त माझा कोणताही दुसरा आयडी नाही.
12 Feb 2016 - 8:41 am | प्रदीप
मग?
मी तुम्हाला खरडीतून का लिहीले ह्याचे स्पष्टीकरण तिथेच, तुम्ही विचारल्यावरून लिहीले आहे. जे लिहीले ते खरडीतून लिहीले, व्यनितून नव्हे, ज्यायोगे ते सर्वांना दिसावे.
insinuation: an unpleasant hint or suggestion of something bad.
"भारतात त्यामानाने किमति कमि नाहि झाल्यात आणि २०१५ H2 मध्ये ह्या पॉलिसि मुळेच अंबानि आणि कंपनिने कसा दुपटिने नफा कमवलाय". ह्या तुमच्या विधानास मी insinuation म्हटले आहे. ह्यात कुठलीही धमकी वगैरे नाही. ते माझे मत आहे. त्याबद्दल थयथयाट कशाला?
मी दिलेल्या दुव्यांविषयी तुम्ही काहीच म्हणत नाही. तसेच इथे आता तुमच्याबरोबर टाळ्या- हंशा करणारे कुणीही. धाग्यात थोडीफार मौजमजा असावी हे ठीक. पण इथे निव्वळ तेच चालले आहे! कुणाला 'एक गँग' आहे असा भासही होतोय! चालू दे.
3 Feb 2016 - 10:24 pm | मोगा
संघ मोड ऑन
गुर्जींची उत्तरे मान्य नसलेल्यानी पाकिस्तानात जावे.
......
3 Feb 2016 - 10:29 pm | मोगा
इयम आकाशवाणी ..
गुर्जीविरोधका: मोदीविरोधकाश्च पाकिस्ताने गच्छतु /
4 Feb 2016 - 12:34 am | अर्धवटराव
मोदी मंडळी कितीही प्रयत्न करतील तरी किती उंची गाठणार... आमचे बारामतीचे साहेबच पंतप्रधान व्हायला हवे.
4 Feb 2016 - 10:52 am | sagarpdy
हि फिरंगी बया आली नसती तर झाले पण असते (साहेब __/\__)
4 Feb 2016 - 11:03 am | अर्धवटराव
काँग्रेसच्या गांधी घराण्याची हुजरेगिरी करण्याच्या नालायकीने देशाने एक सर्वोत्तम पंप्र उमेदवार घालवला.
4 Feb 2016 - 11:41 am | मोगा
दिल्लीला जाउन हुजरेगिरी नाही केली की नशिबात फक्त महाराष्ट्राचा सवतासुभाच येतो.
पैल्या जाणत्या राजापासून दुसरा जाणता राजा काही शिकला नाही .
जै म्हाराष्ट्र !
4 Feb 2016 - 12:50 pm | अर्धवटराव
जै हिंद
5 Feb 2016 - 8:10 pm | मोगा
औरंग्याच्या विदेशीपणाचा मुद्दा करुन महाराजानी नवीन हिंदवी स्वराज्य पक्ष काढला होता.
साहेबानी सोनियाबाईंच्या विदेशीपणाचा मुद्दा करुन रा. वा. काढला.
पण कालांतराने त्याच दिल्लीच्या मदतीला अनुक्रमे पेश्वे व साहेब धावले.
5 Feb 2016 - 8:11 pm | मोगा
दिल्लीच्या कुतुबमिनारापुढं कळसुबैचं आजही काही चालत नै .
6 Feb 2016 - 6:16 am | अर्धवटराव
सो व्हॉट ??
6 Feb 2016 - 10:43 pm | sagarpdy
पेशवे मदतीला धावले कारण दिल्ली ला उत्तरेच्या जनमानसात असलेला आदर. नंतर तर बादशाह नाममात्र करून टाकला. टोपीकर नसते आले तर कदाचित आजवर तख्तावर पण बसले असते.
आमच्या साहेबांवर पण आमचा असाच विश्वास आहे. लवकरच घराणेबदल होणार ! साहेब तख्तावर बसणार !
6 Feb 2016 - 11:16 pm | श्रीगुरुजी
ROFL
काका सध्या बेकार आहेत. त्यांना दिल्लीत, राज्यात किंवा गल्लीत सुद्धा कोठेच काहीही काम नाही व कोणीही हिंग लावून सुद्धा विचारत नाहीत. त्यामुळे ते स्वतःच बोलविलेली इतिहास परीषद, साहित्य संमेलन अशा ठिकाणी हजेरी लावून प्रकाशात राहण्याची धडपड करीत असतात. तिथे जाऊन सुद्धा "इतिहासाचे विद्रूपीकरण होत आहे", "भारताला हिंदूराष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत" अशा काड्या घालत असतात. साहित्य संमेलनात सुद्धा साहित्याशी दुरूनही संबंध नसताना उद्घाटन केलेच व स्वतःच्या मुलाखतीचा कार्यक्रम पण ठेवला. तुमचे भाषण साहित्य परीषदेने छापले नाही अशी सबनिसांकडे काडी लावून देऊन मजा देखील बघितली.
6 Feb 2016 - 11:28 pm | संदीप डांगे
ROFL
तुमचे भाषण साहित्य परीषदेने छापले नाही अशी सबनिसांकडे काडी लावून देऊन मजा देखील बघितली.
पुरावा....?
10 Feb 2016 - 5:50 pm | श्रीगुरुजी
"साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हाती सुपूर्द केली. पवार यांनी या भाषणाच्या पुस्तिकेचे अखेरचे पृष्ठ पाहिले. हे भाषण साहित्य महामंडळाने प्रकाशित केले नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले. यासंदर्भात विचारणा केली असता अध्यक्षीय भाषण न छापल्याबद्दल मी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो, असे सबनीस यांनी पवार यांना सांगितले, अशी माहिती महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली. "
http://www.loksatta.com/pune-news/sahitya-mahamandal-ignored-sabniss-spe...
10 Feb 2016 - 5:57 pm | संदीप डांगे
ह्यावरुन "पवारांनी काडी लावून मजा बघितली" असे सिद्ध कसे होते?
की, 'एखादी गोष्ट खटकल्यावर विचारणा करणे म्हणजे काडी लावणे' हा अर्थ आहे?
10 Feb 2016 - 10:59 pm | श्रीगुरुजी
पवारांशी बोलणे झाल्यानंतरच सबनिसांनी "माझे १५० पानांचे पूर्ण भाषण साहित्य महामंडळाने छापावे व मी स्वतःच्या खर्चाने छापलेल्या २००० प्रतींचा खर्च द्यावा. नाहीतर मी पत्नीसह मसापसमोर उपोषण करीन" अशी धमकी दिली होती. हीच तर ती काडी आणि मजा.
11 Feb 2016 - 12:02 am | संदीप डांगे
'श्रीगुरुजींचे मत हाच पुरावा' असे आहे तर. पुन्हा एकदा सिद्ध झाले. वरचा प्रतिसाद त्याचा पुरावा आहे.
10 Feb 2016 - 2:37 pm | कपिलमुनी
मला तर बॉ मागचा व्हॅलेंटाईन डे आठवला.
जेटली सारखे नेते सुद्धा काकांची स्तुती करतात. बाकीच्यांनी पण केली आहे. त्याचे दुवे पण मिळतील. त्यामुळे हिंगाची फोडणी जमली नाही.
10 Feb 2016 - 5:43 pm | श्रीगुरुजी
काकांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त (चुकलो. तिसरी पंचविशी संपवून चौथ्या पंचविशीत प्रवेश केल्याबद्दल) त्यांचा दिल्लीत जंगी सत्कार केला गेला. त्या सत्कारसमारंभात यच्चयावत सर्व पक्षांचे नेते हजर होते. अगदी मोदींपासून, सोनिया गांधींपासून सर्व डाव्या, उजव्या, पुरोगामी, प्रतिगामी, धर्मांध, निधर्मांध, समाजवादी, साम्यवादी, भांडवलशाही अशा सर्व पक्षांच्या नेत्यांनी काकांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. हे आठवत असेलच.
10 Feb 2016 - 6:34 pm | कपिलमुनी
तुमच्या विधानांमधली विसंगती तुमच्या लक्षात येते आहे का ?
एका बाजूने काकांना कोणी हिंग लावून विचारत नाही म्हणायच आणि त्यांच्या ७५ ला सर्व पक्षाचे नेत्यांनी हजर राहून स्तुती केली म्हणायच !
कस ओ जमवता?
बाकी जेटली , मोदी यांनी केलेली स्तुती पंचाहत्तरीच्या पूर्वीची आहे.
10 Feb 2016 - 11:13 pm | श्रीगुरुजी
अहो, ते नुसते सत्कारसमारंभाला जमतात व पवारांवर स्तुतीसुमने उधळतात. याव्यतिरिक्त इतर पक्ष त्यांना व त्यांच्या पक्षाला फारशी किंमत देत नाहीत. पवार १९९८-९९ या काळात लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. पण जेव्हा एप्रिल १९९९ मध्ये वाजपेयी सरकार १ मताने पडले तेव्हा राष्ट्रपतींनी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले. तेव्हा खरे तर पवारांच्या नेतृत्वाखाली सरकार बनविणे योग्य ठरले असते कारण पवार लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. पण काँग्रेसजनांनी पवारांकडे ढुंकुन न बघता सोनिया गांधींनाच नेता म्हणून निवडले व संभाव्य मंत्रीमंडळाच्या यादीत पवारांना १९९१ प्रमाणे संरक्षणमंत्रीपदच ठरविले होते. त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता ते पंतप्रधान असायला हवे होते. किमान गृहमंत्री तरी. पण पवारांच्या वाट्याला महत्त्वाचे मंत्रीपद येणार नव्हते.
मुळात पवारांपेक्षा इतर प्रादेशिक पक्ष व त्यांचे नेते कितीतरी जास्त बलवान आहेत. मुलायम, जयललिता, करूणानिधी, नितीश, लालू, नवीन पटनाईक, मायावती, ममता इ. नेत्यांनी आपापल्या राज्यात स्वबळावर बहुमत मिळवून दाखविले आहे. जयललिता, ममता इ. पक्षांचे लोकसभेत ३०+ खासदार आहेत. पवारांना महाराष्ट्रात कधीही स्वबळावर सत्ता आणता आली नाही. त्यांच्या पक्षाला जास्तीतजास्त २८८ पैकी ७१ जागा २००४ मध्ये मिळाल्या होत्या. त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या कधीही दोन अंकी नव्हती. अशा व्यक्तीला देशाच्या राजकारणात फारच किरकोळ महत्त्व आहे.
काँग्रेसप्रमाणेच इतर कोणताही पक्ष सत्तावाटपाच्या किंवा निवडणुकांच्या दृष्टीने पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला फारसे महत्त्व देत नाही.
बाकी जेटली, मोदी इ. ची स्तुती म्हणाल तर ते बारामतीला म्हणजे पवारांच्या गावात गेले होते व एखाद्याच्या घरी गेल्यावर त्याच्या उपस्थितीत आपण त्या व्यक्तिविषयी ४ शब्द बरे बोलतो, तितकाच जेटली व मोदींनी बारामतीत पवारांच्या उपस्थितीत पवारांच्या केलेल्या स्तुतीला अर्थ आहे. त्यापेक्षा त्यात काहीही जास्त नाही.
12 Feb 2016 - 1:06 pm | कपिलमुनी
हा तुमचा वैयक्तीक दृष्टीकोन आहे.
माझ्या मते शरद पवार हे पॉवरफुल राजकारणी आहेत.
13 Feb 2016 - 12:06 am | अर्धवटराव
तसं बघितलं तर अडवाणी साहेब सुद्धा अडगळीत पडले आहेत. पण म्हणुन त्यांचं एक राजकारणी म्हणुन असलेलं मुल्य कमि होत नाहि ( मोदि ते वापरायला तयार नाहित हा भाग वेगळा ).
5 Feb 2016 - 3:39 pm | मोगा
BHEL, ONGC, IOC, HPCL, यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांची मोठ्या प्रमाणात निर्गुंतवणूक करण्याचा रोडमॅप सरकारने तयार केला आहे.
भरपूर फायद्यात असणाऱ्या सरकारी कंपन्या पब्लिक सेलच्या माध्यमातून भांडवली बाजारात लिस्ट करण्याचा सरकारचा विचार आहे
5 Feb 2016 - 3:46 pm | होबासराव
BHEL, ONGC, IOC, HPCL, यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांची मोठ्या प्रमाणात निर्गुंतवणूक करण्याचा रोडमॅप सरकारने तयार केला आहे.
भरपूर फायद्यात असणाऱ्या सरकारी कंपन्या पब्लिक सेलच्या माध्यमातून भांडवली बाजारात लिस्ट करण्याचा सरकारचा विचार आहे
देशपांडे मामा ह्याचा विचार भारत सरकार गेलि कित्येक वर्ष करतेय, it is a part and parcel of ओपन ईकॉनोमि जि आपण १९९१ ला खुलि केलिय.
नरसिंहराव :- आज ज्यांच्यामुळे माझ्यासारखे कित्येक लाख लोक MNC मध्ये जॉब करतायत.
5 Feb 2016 - 7:59 pm | मोगा
काय कळलं नै बुवा !
शेअर मार्केटात शेअरचे लिस्टिंग होणे याचा अर्थ सरकार त्यांच्या हिश्श्यातले काही शेअर्स इतराना विकणार व ते शेअर शेअर बाजारात येणार.
यात सरकारला फायदा होइल. कारण सरकारला शेअर फेस व्याल्युने दिलेला असतो. पण विकताना तो बाजारभावाने विकुन सरकार पैसे कमवील.
नेहरुनी त्या काळात २ रुला घेतलेले सागवानी टेबल मोदीनी आजच्या बाजारभावाने विकुन पन्नास हजार मिळवणे , असा प्रकार आहे हा !
5 Feb 2016 - 3:54 pm | होबासराव
तुमच्या ह्या वाक्यातच त्याचे उत्तर आहे, जेव्हा आपण एक Welfare State किंवा समाजवादाने भारताचे राज्य शकट हाकत होतो त्यावेळेस "भरपूर फायद्यात असणाऱ्या सरकारी कंपन्या " हे वाक्य कधिच खरे ठरले नसते.
5 Feb 2016 - 6:21 pm | दिवाकर देशमुख
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/how-business-partners-of-g...
मोदी गुजरातमधून गेल्यानंतर एक एक प्रताप बाहेर पडू लागले आहे. ही जमीन खुद्द मोदी मुख्यमंत्री असताना दिली आहे. ते ही "जनकल्याण" म्हणून रिसोर्ट बांधण्याकरीता दिली आहे. रिसोर्ट सुध्दा झाले नाही.
त्यांचा जावई तर यांची लेक.
आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे.
निवडणुकित "जावईवर पुस्तक" भाजपाने काढले होते मग यांच्यावर १२वर्षमधल्या प्रतापांवर विरोधकांना कादंबरी लिहावी लागणार असे दिसत आहे
भक्तांनी अवश्य अज्ञान प्रकट करावे.
जय राधामाधव
5 Feb 2016 - 9:12 pm | श्रीगुरुजी
समीर भुजबळपाठोपाठ आता अशोक चव्हाणांचा क्रमांक आला आहे. काँग्रेसने इतके दिवस अशोक चव्हाणांना संरक्षण दिले होते. परंतु आता त्यांना राज्यपालांच्या पडद्याआड लपता येणार नाही.
6 Feb 2016 - 6:18 am | अर्धवटराव
तेच ठरवणार कोण कुठे कसा 'जाणार' ते.
6 Feb 2016 - 10:11 am | संदीप डांगे
हा हा हा. आक्षी बरूबर पकडलायसा... गुर्जींना वाटतंय माझ्यामुळं हर्भरा टरारून वर. इथे साहेब हलवतायत सगळ्या प्यादांना. कठपुतली केलंय सरकारला. असं असतं तर भुजबळ सोडून तटकरे, ट्ग्याभाऊ आधी आत जायला हवे. शासनातल्या थेट भ्रष्टाचार्यांवर कार्यवाही न करता अप्रत्यक्ष भ्रष्टाचारावर कार्यवाही करुन भाजपा पाठ थोपटून घेतेय.
भक्त भी खुश, पुतण्याभी खुश,
भुजबळको मिली सपने देखने की सजा,
एका दगडात किती पक्षी माराल काका?
व्वा! शब्बास पट्ठे. लगे रहो.
6 Feb 2016 - 2:56 pm | श्रीगुरुजी
म्हणजे भुजबळांवरील कारवाईप्रमाणे राष्ट्रवादीचे रमेश कदम, कोल्हापूरची तृप्ती माळवे इ. आणि अशोक चव्हाण, सोनिया गांधी, राहुल गांधी, हिमाचल प्रदेशचे वीरभद्रसिंग अशा दुसर्या पक्षांमधील नेत्यांमागील कारवाईमागे साहेबच आहेत की काय? तसं असेल तर इतका पॉवरफुल माणूस केव्हाच पंतप्रधान व्हायला हवा होता. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या पलिकडे त्यांचे अस्तित्व दिसत नाही.
6 Feb 2016 - 3:16 pm | संदीप डांगे
अरे वा! बरं का. म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कार्यवाहीसाठी बळ वापरले जातंय तर. भाजपच्या सगळ्या राज्यांमधे झाडून सारे हरिश्चंद्र भरलेत आणि भाजप राज्यांमधे एक रुपयाचाही भ्रष्टाचार आजवर झाला नाही तर...? गुड.
हेमामालिनी प्रकरणाचे काय झाले कुणाला माहिती आहे काय?
6 Feb 2016 - 3:33 pm | श्रीगुरुजी
दुर्दैवाने युपीएच्या कारकीर्दीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने व युपीएने भ्रष्टाचाराला पूर्ण संरक्षण दिल्याने २०१४ पर्यंत ही प्रकरणे पुढे गेली नव्हती. आता ते संरक्षण गेल्याने खटले सुरू झाले आहेत. त्यामागे बळबिळ वापरले जाण्याचा मुद्दाच नाही. जर भाजप नेत्यांची भ्रष्टाचार केला असेल तर संबंधितांनी खटले भरावेत. येडीयुरप्पावरही युपीएच्या काळात खटले भरले गेले होते, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
6 Feb 2016 - 3:42 pm | संदीप डांगे
संबंधितांनी म्हणजे कुणी? सध्या भुजबळांच्या मागे इडी लागली आहे बुवा. सरकारी एजन्सी. आधीचे सरकार सिबीआय वापरायचे, हे इडी वापरतात काय? बाकी खूप लोकांची यादी आहे हो. चुन चुन कर फायदा तोटा बघुन कारवाई होणार का असा आम्हा सामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे. वर्षाचा वायदा केला होता साहेबांनी, दोन वर्ष होत आली तर आता कुठे शेपुट झटक्ले आणि भुजबळाच्या नाकात धूळ गेली. हत्ती चालायला कधी लागेल काय माहित. चालेल की नाही तेही नाही माहित.
6 Feb 2016 - 6:18 pm | श्रीगुरुजी
युपीएच्या काळात कॉंग्रेसने अनेक भाजप नेत्यांविरूद्धही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. बहुतेक आरोप खोटे होते ते आरोप निव्वळ निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात केले गेले होते उदा. कारगिल युद्ध सुरु असताना शवपेट्या खरेदीत जॉर्ज फर्नांडिस यांनी घोटाळा केला असा आरोप सोनिया गांधींनी प्रचाराच्या काळात वारंवार केला होता. वाजपेयींच्या मानलेल्या मुलीच्या नवर्याने भ्रष्टाचार केला असाही आरोप केला गेला. मे २००४ मध्ये युपीएने सरकार स्थापन केल्यावर या सर्व आरोपांचा विसर पडला कारण ते सर्व आरोप खोटे होते.
याउलट किरीट सोमय्या यांनी भुजबळांच्या विरोधात भरपूर सबळ पुरावे गोळा केल्याने ईडीला कारवाई करावीच लागली. सुब्रह्मण्यम स्वामींनी गांधी कुटूंबियांविरोधात पुरावे गोळा करून थेट न्यायालयात धाव घेतल्याने खटला सुरू झाला.
भाजपचे नेते भ्रष्टाचारात गुंतले असतील तर त्यासाठी सबळ पुरावे हव्वेत. नुसते हवेत आरोप करून सीबीआय किंवा ईडी लगेच कारवाई सुरू करीत नाही. विनोद तावड्यांनी खोटी पदवी दाखविली, गिरीष बापटांनी तूरडाळ प्रकरणात २००० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला असे पत्रकार परीषद घेऊन आरोप केले म्हणून लगेच तपाससंस्था तपास सुरू करीत नसतात. त्यासाठी निदान प्रथमदर्शनी सबळ वाटतील असे पुरावे लागतात. संबंधित म्हणजे जी मंडळी हे आरोप करीत आहेत त्यांनी यासंबंधी काहीतरी पुरावे पुढे आणावेत व त्या आधारावर तपाससंस्थांना तपास करण्याची मागणी करता येईल. जर तपाससंस्थांनी तपास करण्यात चालढकल केली तर न्यायालयात दाद मागता येते. परंतु फक्त पत्रकार परीषदेत नुसते आरोप करायचे व कणभरही पुरावे द्यायचे नाहीत अशा परिस्थितीत कसला तपास करणार?
6 Feb 2016 - 8:18 pm | संदीप डांगे
स्वामींकडे जेटलींविरूद्ध भक्कम पुरावे आहेत म्हणे. ते कुठवर आलंय प्रकरण?
6 Feb 2016 - 11:08 pm | श्रीगुरुजी
>>> स्वामींकडे जेटलींविरूद्ध भक्कम पुरावे आहेत म्हणे. ते कुठवर आलंय प्रकरण?
वरील ठळक केलेल्या पीतवर्णीय शब्दातच पुढील प्रश्नाचे उत्तर आहे.
7 Feb 2016 - 5:06 pm | कपिलमुनी
अगागा !! काय म्हणतेयाव याला !
7 Feb 2016 - 6:00 pm | संदीप डांगे
आणि हे म्हणतात केजरीवाल एक शिवी आहे, =)) =)) =))
7 Feb 2016 - 8:55 pm | श्रीगुरुजी
You said it!
7 Feb 2016 - 8:54 pm | श्रीगुरुजी
याचा अर्थ असा की यांच्या आरोपात काहीही तथ्य नसून निव्वळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी असे आरोप केलेले आहेत. आरोपात खरोखरच तथ्य असेल तर ही मंडळी त्या प्रकरणाच्या मागे लागून त्याचा पूर्ण पाठपुरावा केला असता (जसा किरीट सोमय्या किंवा सुब्रह्मण्यम स्वामी करतात व भ्रष्टाचार्यांना न्यायालयापर्यंत आणतात).
यांच्यासारखी मंडळी (म्हणजे केजरीवाल, दिग्विजय, नबाब मलिक, मनीष तिवारी इ.) एखादी पत्रकार परीषद बोलवितात किंवा ट्विटरवरून मनाला येईल ते बिनबुडाचे आरोप करतात. त्यात काही तथ्य नसतेच. काही दिवसांनी पहिला आरोप सर्वांच्याच विस्मरणात जातो. लगेच हे दुसरा आरोप करतात. त्यातही काही तथ्य नसते. मग काही दिवसांनी तिसरा .... असे चक्र सुरू राहते.
10 Feb 2016 - 2:50 pm | कपिलमुनी
जसा तुम्ही आप आणि आपसेनेच्या बाबतीत केला तसाच्च ना ओ ??
10 Feb 2016 - 2:53 pm | सुबोध खरे
म्हणजे ही मंडळी बिनबुडाचे आरोप करतात हे तुम्हाला मान्य आहे तर?०
10 Feb 2016 - 6:27 pm | कपिलमुनी
दिग्विजय सिंग कैच्या कै आरोप करतात.
केजरीवालंच्या वर झालेली शाईफेक भाजपाने केली हा आरोप पण बिनबुडाचाच आहे.
मनिष तिवारीने मधे सैन्याची एक तुकडी दिल्लीकडे निघाली होती हे पण अकलेचे तारे तोडणे आहे.
जे खोटा ते खोटा ! ते कबूल करण्याचा प्रामाणिकपणा माझ्याकडे आहे.
नेत्यांच्या वाट्टेल ते वागण्याचा , बोलण्याचा समर्थन करायला मी भक्त नाही की प्रवक्ता नाही.
( आता असेच एक इंजेक्शन त्यांनापण द्या बघू :) )
10 Feb 2016 - 5:39 pm | श्रीगुरुजी
मी आआपवाला नाही. मी कोणताही बिनबुडाचा आरोप केलेला नाही. त्या धाग्यावर सर्व पुरावे दिले आहेत.
10 Feb 2016 - 6:30 pm | कपिलमुनी
तुम्ही खोटारडे आहात
तुम्ही फक्त स्वत:ला काय वाटत तेवढा सांगितला आहे त्यासाठी एकही त्रयस्थ पुरावा जोडला नाही.
सर्व पुरावे कोठे दिले आहेत त्याचा तरी दुवा द्या ??
10 Feb 2016 - 11:15 pm | श्रीगुरुजी
तुम्ही पुन्हा एकदा यक्तिगत टिप्पणी सुरू केलीत. धागा पुन्हा एकदा वाचा. अगदी सुरवातीपासूनच लिंक दिलेली आहे.
10 Feb 2016 - 11:28 pm | कपिलमुनी
" ती महिला आपची आहे " याचा पुरावा नाही , हवा तर मिपाकरांची एक त्रयस्थ कमिटीकडुन धागा चेक करुन घ्या.
10 Feb 2016 - 11:29 pm | श्रीगुरुजी
ती महिला आआपची नाही याचा काही पुरावा आहे का?
10 Feb 2016 - 11:57 pm | संदीप डांगे
'श्रीगुरुजी हे भाजपाचे पेड कार्यकर्ते आहेत' ह्याचाही आमच्याकडे पुरावा नाही आहे हो... आता कसं करायचं बोला.
11 Feb 2016 - 12:41 am | कपिलमुनी
मी तुम्हाला ते पुरावे लिंकांसहीत दिले आहेत.
ती महिला आपचसेनेची आहे.
आता फक्त आप आणि आपसेना एकच आहे म्हणुू नका कारण तुमच्याशिवाय तसा कोणीही म्हणत नाही .
म्हणत असतील तर पुरावा द्या
11 Feb 2016 - 2:20 pm | श्रीगुरुजी
ती महिला जशी आआपसेनेची आहे तशीच ती महिला आआपची सुद्धा आहे. ती सुरवातीपासून आआपमध्येच होती व नंतर आआपसेना नावाच्या संघटनेशी संबंधित आहे. बेसिकली ती दोन्हींशी संबंधित आहे.
11 Feb 2016 - 2:40 pm | संदीप डांगे
आम आदमी पार्टी आणि आम आदमी सेना हे दोन वेगळे पक्ष आहेत. आम आदमी सेना ही आप मधुन बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कारण त्यांना केजरीवाल यांचे एककल्ली प्रशासन मान्य नव्हते. त्यांनी पक्षनिधीसंदर्भात आणि इतर धोरणात्मक तृटींबद्दल आप चा विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्या बद्दल वेळोवेळी आंदोलने केली आहेत. असे सर्व स्पष्ट असतांनाही तुम्ही ती व्यक्ती जी केजरीवाल विरोधक आहे, तीच आपची कार्यकर्ती आणि केजरीवालची समर्थक आहे असे म्हणताय. हद्द आहे बुवा.
11 Feb 2016 - 2:43 pm | श्रीगुरुजी
नितीश राणे हा इंदिरा काँग्रेसमध्ये आहे का स्वाभिमान संघटनेमध्ये?
11 Feb 2016 - 3:57 pm | संदीप डांगे
तुम्ही त्या आआसेनाच्या कार्यकर्तीचं बोला हो. मी यादी काढली तर कठिण होईल...
11 Feb 2016 - 10:51 pm | श्रीगुरुजी
तेच मी पुन्हापुन्हा सांगायचा प्रयत्न करतोय. ते तुमच्या लक्षात येतच नाहीय्ये. म्हणून मी नितेश राणेचं उदाहरण दिलं. त्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तेच उत्तर भावना अरोराच्या आआप पक्ष व आम आदमी सेना यांच्या संबंधात आहे.
अजून एक उदाहरण देतो. राम माधव हे भाजपचे आहेत का रा.स्व.संघाचे याचे उत्तर शोधा म्हणजे भावना अरोरा संबंधित प्रश्नाचे उत्तर मिळेल.
11 Feb 2016 - 1:33 pm | कपिलमुनी
तुम्हाला पूर्वी सांगितला होता , जो आरोप करतो त्याने ते सिद्ध करायचे आसतात.
11 Feb 2016 - 2:22 pm | श्रीगुरुजी
मी ते पूर्वीच सिद्ध केले आहे. गुगलवर त्या महिलेच्या नावावर शोध घ्या. ती सुरवातीपासून आआपमध्ये आहे व नंतर आआपसेना या संघटनेच्या माध्यमातून ती निदर्शने वगैरे करते असे सर्वत्र लिहिलेले आढळेल.
11 Feb 2016 - 2:56 pm | कपिलमुनी
ती महिला आधी आपमधे होती नंतर आपसेने मधे गेली तिचा सध्या आपशी संबंध नाही.
भुजबळ सध्या सेनेत आहेत की राष्ट्रवादीमध्ये ?
तुम्ही जी जो आरोप केला आहे की ती महिला आपमध्ये आहे आणि केजरीवालांनी स्वतःवर हल्ला करवून घेतला आहे हा आरोप खोटाच आहे.
माझे म्हणणे एवढाच आहे , ती महिला आपसेनेची आहे , ती पुर्वी आपमध्ये होती या एवढ्या कारणावरून केजरीवालांनी स्वतवर हल्ला कएला म्हणने चुकीचा आहे.
भुजबळ सेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेले आणि नंतर बाळासाहेबांना अटक झाली म्हणजे शिवसेनेने किंवा बाळासाहेबांनी स्वतःला अटक करवून घेतली असा होतो का ??
11 Feb 2016 - 11:00 pm | श्रीगुरुजी
आआप हा एक राजकीय पक्ष आहे. आम आदमी सेना हा राजकीय पक्ष नसून एक संघटना आहे. ती महिला आम आदमी सेनेत आहे हे सत्य आहे व त्याचवेळी ती आआप या पक्षात देखील आहे. तिने आआप पक्ष सोडला आहे असा कोठे पुरावा आहे का? ज्याप्रमाणे नितेश राणे हा इंदिरा कॉंग्रेस या पक्षात आहे व त्याचवेळी तो स्वाभिमान या संघटनेतही आहे. तसेच त्या महिलेबद्दल आहे.
हा प्रश्नच इथे गैरलागू आहे. राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत.
केजरीवालांनी भूतकाळात आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्वत:वर शाई शिंपडण्याची व स्वत:ला थोबाडून घ्यायची अनेकवेळा नाटके घडवून आणली आहेत. हे नवीन नाटक पूर्वीसारखेच आहे.
ती अजूनही आआपमध्येच आहे. तिने आआप पक्ष सोडलेला नाही.
वर उत्तर दिले आहे.
12 Feb 2016 - 1:18 pm | मोदक
नवीन मुद्द्यांकडे वळा हो.
कंटाळा आला या वादाचा.
12 Feb 2016 - 3:13 pm | कपिलमुनी
एवढा साधा कळू नये म्हणजे आश्चर्य आहे .
तुम्ही करत असलेल्या आरोपांना तुम्हीच पुरावे द्यायचे आहेत.
12 Feb 2016 - 11:38 pm | श्रीगुरुजी
सर्व पुरावे पहिल्या दिवसापासूनच दिलेले आहेत. परंतु ते मान्यच करायचे नाहीत हा तुमचा अट्टाहास आहे.
12 Feb 2016 - 3:14 pm | कपिलमुनी
ही आपमधून फुटून बाहेर पडलेल्या लोकांची संस्था आहे जे आपविरोधी काम करतात .
मेक युवर फॅक्टस राईट !
12 Feb 2016 - 11:37 pm | श्रीगुरुजी
चूक. ही आआपमध्ये असलेल्या काही जणांनी काढलेली संघटना आहे. ते अजूनही आआपमध्येच आहेत. मेक युवर फॅक्टस राईट !
14 Feb 2016 - 3:45 pm | कपिलमुनी
आप सोडलेल्या लोकांची संघटना म्हणजे आपसेना
दुवा
घटनेचा दुवा
असे स्पष्ट पुरावे द्या बघू
15 Feb 2016 - 10:56 pm | श्रीगुरुजी
गफलत होतेय.
The AAS was reportedly formed by disgruntled volunteers who alleged that there were many discrepancies in the internal working of the Aam Aadmi Party.
केजरीवालांच्या हुकुमशाही वर्तनाने नाराज असलेल्या आआपमधील असंतुष्ट कार्यकर्त्यांनी आम आदमी सेना ही संघटना स्थापन केली आहे. ही एक संघटना आहे, राजकीय पक्ष नाही. या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडलेला नाही. ज्याप्रमाणे भाजपमध्ये किर्ती आझाद, शत्रुघ्न सिन्हा, अडवाणी गटाचे नेते पक्षात राहून सातत्याने मोदींवर टीका करीत असतात, अगदी तसेच इथे पण आहे.
15 Feb 2016 - 11:16 pm | कपिलमुनी
सोडल्याचा तुमच्याकडे पुरावा नाही !
आझाद, सिन्हा यांची कोणती संघटना आहे ? जी एकही पद ना घेता भाजपाला उघड राजकीय विरोध करते ?
15 Feb 2016 - 11:24 pm | श्रीगुरुजी
त्यांनी आआप सोडल्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? असल्यास द्यावा ही नम्र विनंती.
नितेश राणे हा काँग्रेसमध्ये आहे व त्याचवेळी स्वाभिमाना नावाच्या संघटनेत सुद्धा आहे. या संघटनेने महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारविरूद्ध आंदोलन केले होते.
भुजबळ एकाच वेळी समता परीषद या संघटनेत व राष्ट्रवादीत आहेत.
भाजपचे अनेक नेते एकाच वेळी भाजपत व संघात आहेत. संघ अधूनमधून कामगार कायद्यातील बदल, वॉलमार्टला भारतात परवानगी इ. विषयांवर भाजप सरकार विरूद्ध भूमिका घेत असतो.
एकाच वेळी एका पक्षात व एका संघटनेत असणे भारतात नवे नाही. आणि त्या संघटनेने आपल्याच प्क्षाच्या सरकारविरूद्ध आंदोलन करणे हेही नवे नाही.
त्यामुळे आआप पक्षात राहून आम आदमी सेनेच्या माध्यमातून दिल्ली सरकारविरूद्ध आंदोलन करणे यात काहीही नवीन नाही.
16 Feb 2016 - 12:17 am | कपिलमुनी
??
तुम्ही तुमची चूक कबूल करुन ती महिला आपची होती हा आरोप चुकीचा असून मागे घ्याल का ?
16 Feb 2016 - 2:37 pm | श्रीगुरुजी
ती महिला सुरवातीपासून आआपमध्येच आहे. तिने अजून आआप हा पक्ष सोडून दुसर्या पक्षात प्रवेश केलेला नाही. त्या महिलेने आआप सोडल्याचा विश्वासार्ह पुरावा तुमच्याकडे आहे का? असल्यास द्यावा ही नम्र विनंती.
16 Feb 2016 - 3:26 pm | कपिलमुनी
मी आम आदमी पक्षासोबत पत्रव्यवहार केला त्यांचा ईमेल ला आलेल्या रीप्लाय चा स्क्रीन शॉट देत आहे .
यात पक्षाच्या अधिकृत ईमेलवरून स्पष्ट भाषेत लिहिला आहे
तुमचा मेल आयडी दिल्यास ईमेल कम्युनिकेशन पाठवण्यात येईल.
अथवा Aam Aadmi Party या मेल आयडी वर मेल करुन माहिती मागवल्यास आप ची सर्व माहिती मिळते.
हा पुरावा ती महिला सध्या आपची कार्यकर्ती नाही हे दाखवायला पुरेसा असेल असे वाटते.
16 Feb 2016 - 4:38 pm | मी-सौरभ
ह्याला पुरावा म्हणण्याईतका हा सबळ नक्कीच आहे.
16 Feb 2016 - 4:52 pm | प्रचेतस
प्रचंड चिकाटी.
श्रीगुर्जी आता तरी विधान मागे घ्या तुमचे.
16 Feb 2016 - 9:06 pm | श्रीगुरुजी
हे महेश केदारी नक्की कोण? आआपमध्ये त्यांचे काय स्थान व भूमिका आहे? नक्की कोणत्या भूमिकेतून ते उत्तर देत आहेत? दिल्लीसारख्या २ कोटी लोकवस्तीच्या शहरात आआपचे कोण सदस्य आहेत व कोण नाहीत हे त्यांना चिंचवडमध्ये बसून पक्षाच्या कोणत्याही अधिकृत राष्ट्रीय पदावर नसताना कसे समजले?
२०१५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेक आआपभक्तांनी सोशल मिडियावरून उस्फूर्तपणे आआपचा प्रचार केला होता. अनेक अनिवासी भारतीय दिल्लीत २-३ महिने ठाण मांडून बसले होते व आआपचा प्रचार करीत होते. वेगवेगळ्या शहरातून अनेकांनी उस्फूर्तपणे स्वतःहून अनेक नागरिकांना फोन करून आआपला मत देण्याची विनंती केली होती. त्यात वेगवेगळ्या शहरातील अनेक आयटी कंपन्यातील तरूण होते. हे महेश केदारी त्यातलेच आहेत. ते पक्षाच्या कोणत्याही अधिकृत पदावर नाहीत. स्वयंस्फूर्तीने ते आआपचा प्रचार करीत आहेत.
त्यामुळे भावना अरोरा ही दिल्लीतील महिला आआपची सदस्य नाही ही माहिती ते चिंचवडमध्ये बसून सांगत आहेत ते अजिबात विश्वासार्ह नाही.
16 Feb 2016 - 9:19 pm | तर्राट जोकर
हे महेश केदारी नक्की कोण? आआपमध्ये त्यांचे काय स्थान व भूमिका आहे? नक्की कोणत्या भूमिकेतून ते उत्तर देत आहेत? दिल्लीसारख्या २ कोटी लोकवस्तीच्या शहरात आआपचे कोण सदस्य आहेत व कोण नाहीत हे त्यांना चिंचवडमध्ये बसून पक्षाच्या कोणत्याही अधिकृत राष्ट्रीय पदावर नसताना कसे समजले?
>> तुम्हाला तर त्या पक्षात नसूनही कळते. तसा दावा तुम्ही करता, त्याचे पुरावे तुमच्याकडे नसतात. फक्त अंदाज असतात, मतं असतात.
२०१५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेक आआपभक्तांनी सोशल मिडियावरून उस्फूर्तपणे आआपचा प्रचार केला होता. अनेक अनिवासी भारतीय दिल्लीत २-३ महिने ठाण मांडून बसले होते व आआपचा प्रचार करीत होते. वेगवेगळ्या शहरातून अनेकांनी उस्फूर्तपणे स्वतःहून अनेक नागरिकांना फोन करून आआपला मत देण्याची विनंती केली होती. त्यात वेगवेगळ्या शहरातील अनेक आयटी कंपन्यातील तरूण होते. हे महेश केदारी त्यातलेच आहेत. ते पक्षाच्या कोणत्याही अधिकृत पदावर नाहीत. स्वयंस्फूर्तीने ते आआपचा प्रचार करीत आहेत.
>> तुम्हीही ना आपचे पदाधिकारी आहात ना आसेनेचे. तरीही बेधडक बिनबुडाची विधानं करत आहात.
त्यामुळे भावना अरोरा ही दिल्लीतील महिला आआपची सदस्य नाही ही माहिती ते चिंचवडमध्ये बसून सांगत आहेत ते अजिबात विश्वासार्ह नाही.
>> तुम्हीही पुण्यातच बसून दिल्लीतील महिला आआपचीच सदस्य आहे हे मत कुठलाही पुरावा नसताना बेधडक ठोकून देताय ते विश्वासार्ह आहे असे म्हणायचे काय?
16 Feb 2016 - 9:28 pm | होबासराव
सगळे प्रतिसाद एक्स्ट्रिम उजविकडे जातायत्...
17 Feb 2016 - 1:02 pm | श्रीगुरुजी
मी नेहमी संदर्भासहीत लिंक्स देतो.
माझा या संघटनेशी किंवा इतर कोणत्याही संघटनेशी किंवा कोणत्याही पक्षाशी काहीही संबंध नाही. कोणत्याही संघटनेचा व पक्षाचा मी चार आणे सुद्धा सदस्य नाही.
17 Feb 2016 - 1:04 pm | श्रीगुरुजी
घटना घडल्यानंतर त्याचे वृत्तांत वेगवेगळ्या वृत्तपत्रात आले होते. ते जरा वाचा. अर्थात माझ्यावर व त्याचवेळी कोणत्याही वृतपत्रावर अजिबात विश्वास न ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
16 Feb 2016 - 9:30 pm | कपिलमुनी
गुरुजी,
मी "महेश केदारी" या व्यक्तीची संपर्क साधला नव्हता .
मी आपच्या अधिकृत ईमेल आयडी सोबत संपर्क केला आहे. तुम्ही सुद्धा करू शकता .आणि तुमचे शंकानिरसन करू शकता.
१. पक्षाच्या अधिकृत ईमेल आयडीवरून मिळालेली माहिती खरी मानतात ( ती माहिती देणार्याला त्या ईमेलचा अक्सेस्स आहे, याचा अर्थ तो ती माहिती देउ शकतो).
२. आम आदमी सेनेचा आणी आपचा संबंध नाही असा अधि़कृतपणे सांगितला आहे.
३. त्या महिलेने कुठेही स्वतः ती आपची आहे हे सांगितला नाही.
४. तीने , सर्व मिडीयाने नी आम आदमी सेनेची आहे हे सांगितले आहे.
यावरून
बाकी मिपाकर सुज्ञ आहेतच !!
17 Feb 2016 - 12:59 pm | श्रीगुरुजी
हहपुवा. पक्षाच्या अधिकृत ईमेल आयडीवरून पक्षविरोधी किंवा आपल्या पक्षाला घातक ठरेल अशी माहिती कशी दिली जाईल? आपल्या पक्षाचा उदोउदो करणारीच माहिती पक्षाच्या अधिकृत ईमेल आयडीवरून दिली जाते. ज्या माहितीमुळे आपल्या पक्षाची प्रतिमा वाईट होईल किंवा ज्यामुळे आपला पक्ष अडचणीत येईल अशी माहिती कधीही दिली जात नाही.
त्यामुळे या ईमेल आयडीवरून जी माहिती आली आहे त्यावर विश्वास ठेवता येत नाही.
लोल. जेव्हा जेव्हा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता एखाद्या गुन्ह्यात सापडतो, तेव्हा त्या पक्षाचा प्रवक्ता "तो अमुकतमुक माणूस आपल्या पक्षात नाही. तो पक्षाचा अधिकृत सदस्य नाही" असे सांगून नामानिराळे होतात. पक्षाचा एखादा अधिकृत पदाधिकारी काही वादग्रस्त विधाने करतो तेव्हा मात्र असे सांगता येत नाही. तेव्हा मात्र 'हे त्याचे वैयक्तिक मत आहे. ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही" अशी सारवासारव केली जाते. त्यामुळे वरील दाव्यावर विश्वास ठेवता येत नाही
ती महिला आआपची आहे असे ती घटना घडल्यावर सर्व वृत्तपत्रातून आले होते.
बरोबर आहे. जसे नितेश राणे हे एकाचवेळी इंदिरा काँग्रेस व स्वाभिमान संघटनेशी संबंधित आहेत किंवा विनोद तावडे एकाच वेळी संघ, भाजप व अभाविप मध्ये होते, अगदी तसेच इथेही आहे.
या दोन्ही दाव्यांवर विश्वास ठेवणे शक्य नाही. ती महिला आआपची आहे असे सर्व वृत्तपत्रातून व वाहिन्यांवर आले होते आणि केजरीवालांनी भूतकाळात एकदा नव्हे तर अनेक वेळा स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःवर शाईफेक व थोबाडायचे कार्यक्रम आखले होते. हा हल्ला हा त्यातलाच एक प्रकार.
यावरून