२६-जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर कुंभारगाव-भिगवणला भेट दिली. यंदा अपेक्षेपेक्षा खूपच कमी रोहित पक्षी होते. मागे जेव्हा भेट दिली होती तेव्हा शेकड्याने दिसलेले रोहित पक्षी यंदा मात्र केवळ पाचच दिसले. त्यामुळे जे मुख्य आकर्षण होते त्या आघाडीवर जरा निराशा झाली, तरीदेखिल इतर बरेच पक्षी होते. त्यातलेच थोडे इकडे टाकत आहे.
१. सूर्यदेव बाहेर पडताच हौशी पक्षीप्रेमी देखिल एक-एक करुन बोटीतून निघाले.
२.POND HERON - वंचक, भुरा बगळा, कोक, ढोकरी, खरबा बगळा (कोकण भाग)
३.Juvenile BLACK-WINGED STILT - शेकाट्या, पाणटिलवा, ढांगाळ्या
४.BLACK-HEADED IBIS - कुदळ्या, पांढरा शराटी, पांढरा अवाक, कंकर
५.ASIAN OPENBILL STORK - मुग्धबलाक, उघडचोच करकोचा
६.BROWN-HEADED GULL - तपकिरी डोक्याचा कुरव
७.FLAMINGO - रोहित, अग्निपंख, पांडव
८.LITTLE RINGED PLOVER - कंठेरी चिखल्या
९.PAINTED STORK - चित्रबलाक, रंगीत करकोचा, चामढोक
१०.EURASIAN SPOONBILL - चमच्या, दर्वीमुख
११.GLOSSY IBIS - छोटा शराटी, चिमणा अवाक, चिमणा कुदळ्या, मोर शराटी, तकतकीत शराटी
१२.BLACK-TAILED GODWIT - मळगुजा, काळ्या शेपटीचा पंकज
१३.CORMORANT – पाणकावळा
१४.NORTHERN SHOVELER – थापट्या
१५.Seagull – कुरव
१६.Grey Heron – राखी बगळा
प्रतिक्रिया
5 Feb 2016 - 11:22 am | प्रचेतस
अहाहा.
जबरी फोटो.
5 Feb 2016 - 11:27 am | विजय पुरोहित
याचा पण खंड्या झाला की काय?
:(
5 Feb 2016 - 11:28 am | विजय पुरोहित
अरेच्चा सॉरी साहेब...
दिसू लागले फोटो...
मस्तच....
5 Feb 2016 - 11:31 am | प्राची अश्विनी
सुरेख!!
5 Feb 2016 - 11:44 am | स्पा
अप्रतिम
5 Feb 2016 - 11:48 am | कंजूस
बदकं गेली वाटतं.
8 Feb 2016 - 8:31 pm | के.के.
बदकं होती (ब्राह्मणी/टील वगैरे) . पण कवडीपाटला त्यांचे फोटोसेशन केले होते म्हणुन त्यांच्यावर जास्त वेळ घालवला नाही.
हां, पण ह्यावेळेस पट्टकदंब(Bar-Headed Goose) काही दिसले नाही. त्यामुळे थोडा हिरमोड झाला.
5 Feb 2016 - 11:50 am | नीलमोहर
सुरेख फोटो !!
5 Feb 2016 - 11:54 am | कविता१९७८
मस्त फोटो
5 Feb 2016 - 1:06 pm | मराठी_माणूस
मस्त फोटो. पक्षांची नावे माहीत झाली.
5 Feb 2016 - 1:16 pm | शान्तिप्रिय
मस्त फोटो.
सुंदर.
5 Feb 2016 - 1:31 pm | सर्वसाक्षी
मला चित्रं दिसत नाहीत.
5 Feb 2016 - 1:45 pm | जव्हेरगंज
5 Feb 2016 - 3:13 pm | सुमीत भातखंडे
मस्त आहेत सगळे फोटो
5 Feb 2016 - 4:28 pm | नाखु
फोटोंना मस्त म्हणावं का सुंदर नावाच्या माहीतीला (सहज सोपी मराठी नावे विशेषतः अग्निपंख, मुग्धबलाक्,थापट्या ई).
दंडवत ___/\___.
अति अवांतर :खंड्या पहातोयसं ना धाग्याला पंख न लावता(ही) पक्षी कसे दाखवावेत.
8 Feb 2016 - 8:42 pm | संदीप डांगे
सर्व प्रतिसादाला... +१०००००
5 Feb 2016 - 4:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
माझा गणेशा झालाय
5 Feb 2016 - 4:48 pm | यशोधरा
मस्त फोटो!
5 Feb 2016 - 5:20 pm | अजया
फार सुंदर.
8 Feb 2016 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
एक नंबर !!!
8 Feb 2016 - 8:59 pm | मयुरMK
अप्रतिम फोटो ! आणि माहिती
9 Feb 2016 - 7:10 am | मदनबाण
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bruce Lee's One inch punch
9 Feb 2016 - 9:47 pm | एक एकटा एकटाच
मस्त
शेवटचा फ़ोटो उत्तम