दोन व्यवसाय: मान अपमान

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
29 Jan 2016 - 9:44 pm
गाभा: 

परवाचा वाद परत उकरुन काढतो. कारण माझे नेमके काय चुकले हे कोणीच सांगितले नाही अजून.

वेश्यालयातल्या स्त्रीयांच्या शारिरिक संदर्भासाठी सनी लियोनचे उदाहरण दिले तेव्हा पब्लिक चिडली. म्हणे हा सनी लियोनचा अपमान आहे. म्हणजे 'वेश्या असणे, ते काम करणे' हे अपमानास्पद आहे असे त्यांचे म्हणणे आहे का? भले त्या वेश्या मजबूरीने, अजून कशानेही बळजबरीने झाल्या असल्या, आपले प्रपंच चालवत असल्या, आपल्या मुलींचे-मुलांचे शिक्षण करत असल्या, थोडक्यात आलिया भोगासी म्हणून सादर होत असल्या तरी त्यांची तुलना एका पॉर्नस्टारशी करणे हे त्या पॉर्नस्टारसाठी अपमानास्पद आहे. जी पॉर्नस्टार स्वतःच्या बुद्धीने, मर्जीने, घसघशीत पैसा घेऊन सर्वसामान्यांसाठी निषिद्ध अशा क्षेत्रात काम करते.

मारवा म्हणाले. "सनी लियोनी ही कलाकार आहे पॉर्न चित्रपटात काम करते म्हणजे.....असेलच, असा विचार करत असाल तर ठीकच आहे " म्हणजे पॉर्नस्टार असणं हे उच्चभ्रू आणि वेश्या असणं हे नीच कृत्य असे काही आहे काय?

पैसाताईंनी म्हटलंय की "ती लग्न झालेली मुले बाळे असलेली बाई आहे. तिच्याबद्दल असे बोलणे योग्य वाटले नाही. किंबहुना कोणाचाही उल्लेख अशा चर्चेत असा यावा हेच दुर्दैवी वाटले." 'असे बोलणे' म्हणजे नेमकं काय? वेश्यांना मुलंबाळं नसतात काय? वेश्याव्यवसाय करणारे समाजविघातक वैगरे काम करतात आणि पॉर्नस्टार हे समाजहितकारक काम करतात असे काही म्हणायचे आहे काय?

मृत्यूंजय यांच्यामते, "एकुणात आक्षेप विधानाच्या सत्यतेबद्दल नसून औचित्याबद्दल आहे " येथे औचित्य म्हणजे नेमके काय? जेव्हा डॉक्टर "एखाद्याची बायको सनी लियोन(सारखी मादक दिसणारी, वैगरे) नसते" असे म्हणतात ते उचित. आणि "वेश्यालयात सनी लियोन(सारख्या माद्क दिसणार्‍या, वैगरे वेश्यां)साठी मोठी किंमत मोजावी लागते" हे माझे म्हणणे हे अनुचित, हे कसे काय?

हे काथ्याकूट काढण्याचा उद्देश एवढाच की खालील प्रश्नांची उत्तरे मिळावीत.

१. पॉर्नस्टार आणि वेश्या यांच्याबद्दल वाचकांच्या काय भूमिका आहेत?
२. दोन्ही व्यवसायापैकी कोणते काम चांगले, कोणते वाईट असे वाटते व का?
३. दोन व्यवसायात तुलना आवश्यक की अनावश्यक?
४. दोन्ही व्यवसायात मान-अपमान करण्याचे/होण्याचे व्यवच्छेदक लक्षण कोणते व का?
५. माझ्या मूळ विधानातून मला जे म्हणायचे होते तो अर्थ संदर्भासहित व्यवस्थित ध्वनित होतोय की वाचकांना स्वतःला वेगळं काही वाटलं?

आपल्या प्रतिसादांबद्दल आधीच खूप खूप आभार मानतो. अपेक्षा आहे नेहमीप्रमाणेच योग्य तर्‍हेने चर्चा होईल. धन्यवाद!

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

2 Feb 2016 - 4:21 pm | संदीप डांगे

मारवा, तुम्ही उगाच वाकड्यात शिरू नका हो. जे काय आहे स्पष्ट मुद्देसूद बोला. प्रच्छन्नतेने टोमणेवजा बोलणे गंभीर चर्चेत उपयोगाचे नाही व योग्यही नाही. तुम्हाला तिथेही सांगितले, इथेही तेच सांगतो. जे मी म्हटलंच नाही ते वाक्य माझ्या तोंडी कोंबण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जे उदाहरण इथे देताय त्यावरुन तुम्ही माझ्यावर स्पष्टपणे 'मी असंस्कृत, हिन व क्षुद्र विचारांचा असल्याचे' आरोप करत आहात, हे गंभीर आहे. ज्या पद्धतीने आपण संपूर्ण वाद मांडायचा प्रयत्न करत आहात त्यामुळे असा ग्रह होतोय की कसलाही संबंध नसतांना अचानक कुठेतरी, उगाच, एका वाक्यात मी माहिती वा मत सांगितल्यासारखे हे विधान केलंय: "सनी लियोन वेश्या आहे" व त्याच मताला चिकटून बसलोय.

तुम्हाला जे म्हणायचे आहे ते स्पष्ट व समजून उमजून बोला. उगा कळफलक मिळायला म्हणून मनाला येईल ते बडवू नका. अन्यथा चर्चेत भाग नाही घेतला तरी चालेल.

धन्यवाद!

मारवा's picture

2 Feb 2016 - 4:53 pm | मारवा

अभिनंदन आणि शुभेच्छा !

संदीप डांगे's picture

2 Feb 2016 - 4:59 pm | संदीप डांगे

मुद्यात दम असता, मुळात मुद्दा असता तर असे पलायन करायची गरज पडली नसती. 'अभिनंदन आणि शुभेच्छा' टंकायच्या आधी आपला मुद्दा पुरेसा पटवून द्यावा लागतो असा मिपाचा शिरस्ता आहे. ते न करताच शेलके, बिनबुडाचे, टोमणे मारुन जाताय? गर्दीमागे तोंड लपवून 'मारो इसको' म्हणणार्‍यासारखे वाटतंय.

वेश्या असो किंवा पोर्न स्टार किंवा आणखीन काही जो पर्यंत एखादी व्यक्ती स्वखुशीने काही काम करत असेल आणि त्यांचे ग्राहक सुद्धा स्वखुशीने त्यात सहभागी होत असतील तर उगाच त्यांच्या वर टीका टिपण्णी करायला जावू नये असे मला वाटते.

माझ्या मताप्रमाणे वेश्या किंवा पोर्न स्टार हि जवळ जवळ सारखी आहेत कारण ह्यात शेवटी आपल्या देहाचा कामुक स्वरूपांत उपयोग केला जातो. वेश्या ह्या पूर्वीच्या काळांत नॉर्मल होत्या, इंग्रज सरकारने आपले विक्टोरियन कायदे लागू करून तताकथिथ नैतिकतेचे नियम हिंदी समाजावर जबरदस्तीने लादले. तेंव्हा पासून हा व्यवसाय भूमिगत झाला. आज काल लोक समजतात कि वेश्या ह्या नेहमी जबरदस्तीने ह्या धंद्यात आणल्या जातात.

अमेरिकेतील नेवाडा मधील कायदेशीर वेश्या व्यवसाय आणि LA मधील पोर्न व्यवसाय ह्याच्या बद्दल मला (काही कारणास्तव ) प्रथमदर्शनी अनुभव आहे. ह्यातील सर्वच स्त्रिया स्वखुशीने ह्या धंद्यात येतात, इतकेच नव्हे तर त्यांना त्या कामात गर्व सुद्धा असतो. हा व्यवसाय कायदेशीर असल्याने त्यांना कायद्याचे सरंक्षण तर भेटतेच त्या शिवाय इतर व्यवसायांत ज्या प्रकारच्या सुविधा भेटतात त्या सुद्धा मिळतात. (उदा बँक लोन). ह्या मुळे त्या स्त्रिया आपले आयुष्य फार चांगल्या पद्धतीने व्यतीत करतत. बहुतेक (stripper) स्त्रिया आठवड्यातील इतर दिवस शिक्षक, नर्स, कारकून इत्यादी कामे करतात. बहुतेक जनी लग्न करतात त्यांना मुलें असतात आणि बहुतेकांचे आयुष्य इतर लोकां प्रमाणेच समाधानी वगैरे असते.

पण अमेरिकेत इतर शहरांत वेश्या व्यवसाय कायदेशीर नसल्याने तेथील वेश्यांची खूपच पंचायत होते, शारीरिक हल्ले, ड्रग्स इत्यादी गोष्टींत त्या गुराफातल्या तर जातातच पण कायद्याकडून त्यांना संरक्षण सुद्धा भेटत नाही. अगदी hi class escorts सुद्धा आयुष्यांत किमान दोन वेळा STD च्या शिकार होतात.

भारतांतील वेश्या व्यवसाय ह्यावर माझा अभ्यास नाही आणि अनुभव सुद्धा नाही. काही escorts मंडळीची मला ओळख होती पण त्या सुद्धा त्यांत स्वखुशीने होत्या हे स्पष्ट होते. पण काही ठिकाणी human traffiking होत असेल असे मला वाटते.

स्त्रीच्या शरीरावर फक्त तिचाच १००% हक्क असतो. तिने वाट्टेल त्या प्रकारे आपले शरीर वापरावे जो पर्यंत दुसर्याचे नुकसान होत नाही तो पर्यंत तिला कायद्याचे संरक्षण सुद्धा भेटले पाहिजे.

खोटी नैतिकता जबरदस्तीने समाजावर लादली असता त्याचा परिणाम फारच वाईट होतो.

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2016 - 9:08 pm | श्रीगुरुजी

१. पॉर्नस्टार आणि वेश्या यांच्याबद्दल वाचकांच्या काय भूमिका आहेत?

माझ्या कुटुंबातील किंवा नात्यातील किंवा जवळच्या/ओळखीच्या/बिनओळखीच्या व्यक्तींपैकी/अपरिचित अशा कोणीही वरील दोनपैकी काहीही झालेले मला आवडणार नाही. याव्यतिरिक्त माझी कोणतीही भूमिका नाही.

तर्राट जोकर's picture

4 Feb 2016 - 3:53 pm | तर्राट जोकर

भयंकर चर्चा आहे च्यामारी! पॉर्न च्या सर्वेतून पॉर्नच्या गरजेत, तिथून सनीलियोन्च्या बायोडाटातून फिरुन स्त्रियांच्या उरोजात असलेल्या कॅन्सरच्या मानसिक किड्यापर्यंत... भन्नाट आहे सगळं. इनी मीनी मायना मो.

अजया's picture

4 Feb 2016 - 3:55 pm | अजया

खरंय =)))

होबासराव's picture

4 Feb 2016 - 3:57 pm | होबासराव

मानसिक किडा :))
Dangerous than Cancer

प्रीत-मोहर's picture

4 Feb 2016 - 3:58 pm | प्रीत-मोहर

महालोल धागा आहे

उडन खटोला's picture

4 Feb 2016 - 8:21 pm | उडन खटोला

एकूण चर्चेचा सूर अन नूर पाहून मला काही मूलभूत बेसिक प्रश्न पडले

परम आदरणीय सौभाग्यवती सनीताई लियोन यांचे असे कोणते "अंग"भूत अभिनयगुण आदरणीय महेश भट्ट साहेबांना "दिसले" की ज्यामुळे ज्यांचा भूतकाळातील व्यवसाय "वयस्क प्रौढ लोकांच्या कामोत्तेजक चित्रफीती मध्ये कामुक अभिनय करण्याचा " आहे अशा एका स्त्रीस बॉलीवूड मध्ये हिरोईन म्हणून launch केले ?

पूर्वाश्रमीचा "वयस्क प्रौढ लोकांच्या कामोत्तेजक चित्रफीती मध्ये कामुक अभिनय करण्याचा " व्यवसाय राजीखुशीने करणार्‍या सदर बयेस हिरवीण म्हणून मान्यता देवून भारतीय रसिक प्रेक्षक तथा बॉलीवुड चे स्टँडर्ड मातीमोल करणार्‍या व पिग्गी चोप्स अथवा कतरिना कैफ अथवा दीपिकाताई यांच्या जोडीस सदर वारांगनेस बसवून भारताच्या सांस्कृतिक प्रतिमेचा देश-विदेशात विध्वंस करणार्‍या "महेश भट्ट" नामक महाभागास तोंड काले करून लाथबुक्क्यांनी तुडवून काढून गाढवावरून धिंड काढून त्यांचा यथोचित सन्मान का करण्यात येवू नये ?

स्वगत -म्हणो कोणी आम्हास सनातनी , आम्ही असेच राहणार अन इतरांनाही आमच्यासारखेच बनवणार
फेक्युलर फुररोगामी गेले तेल लावत !

खटपट्या's picture

5 Feb 2016 - 2:19 am | खटपट्या

हायला बरीच चर्चा झालीय.
जेवढे वाचता येतील तेवढे प्रतिसाद मी वाचले. मी मांडत असलेला मुद्दा वर कोणी मांड्ला आहे की माहीत नाही.

मुळात सनी लीओन हीला आपण वेश्या म्हणू शकतो का?
माझ्या अल्पबुद्धीनुसार "वेश्या म्हणजे पैश्यांच्या बदल्यात आपल्या शरीराचा वापर संभोगासाठी करु देणारी स्त्री". इथेही तीला "गिर्‍हाईक" नाकारण्याचा अधिकार असावा/असेल. सनी कीतीही पैसे दीले तरी कोणालाही उपलब्ध आहे का? (माझ्या मते नाही) जर ती कोणालाच कीतीही पैसे दीले तरी उपलब्ध नसेल तर आपण तीला वेश्या कसे काय म्हणू शकतो? फारफार तर मी म्हणेन की "सनी म्हणजे, तीच्या मित्रांबरोबर केलेला संभोगाचे चित्रीकरण विकणारी स्त्री". तीने तीच्या संभोगाचे चित्रीकरण जाहीर उपलब्ध करुन देणे म्हणजे ती वेश्या नव्हे. आणि तीने कोणाला आवतणही दीलेले नाही. आणि ज्या देशात तीने हे केले तीथे तो एक कायदेशीर व्यवसाय आहे. त्यामुळे सनीला वेश्या म्हणणे चुकीचे आहे एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो.
मी सनीची बाजू का घेतो असे कोणाला वाटत असेल तर त्याचे कारण ती मला आवडते. ती सुंदर आहे. ती शरीराने बेढब असती तरी मला आवडली असती. तीने जे काही केले ते तीने अजीबात लपवले नाही. आणि तीचा जो काही भुतकाळ होता त्याबरोबर ती पुढे जात आहे.
परत एकदा - सनीला वेश्या म्हणणे चूकीचे.

संदीप डांगे's picture

5 Feb 2016 - 7:15 am | संदीप डांगे

चर्चा व मुद्दा नीट न वाचता मत देण्याची इम्पल्सिव घाई बरेच करत आहेत. माफ करा पण तुमचा प्रतिसादही तसाच वाटला. कृपया थोडा वेळ काढून पुन्हा मुद्दा व चर्चा नीट वाचून समजून घेतलंत तर योग्य असेल.